'चांदोबा'तील हार, गजरे आणि माटुंगा मार्केट

Submitted by मामी on 14 November, 2014 - 22:49

'चांदोबा' मासिकातील चित्रे फारच भन्नाट असायची. एक अदभूत जग होतं ते. वेगळ्याच प्रकारचे पेहराव, दागिने, चेहर्‍याची ठेवण असलेली पात्रं त्या चित्रांतून दिसत. त्याचबरोबर देवादिकांनी घातलेले मोठ्ठे आणि विविध प्रकारचे फुलांचे हार असत. चित्रातल्या बायका भरपूर गजरे माळलेल्या दिसत. चांदोबातील या चित्रांवर दाक्षिणात्य ठसा होता.

तेच ते 'चांदोबा'तले हार माटुंग्याच्या बाजारात बघायला मिळतात. अतिशय आकर्षक आणि नक्षीदार रचना केलेले हे हार बघून त्या कलाकारांचं कौतुकच वाटतं. काही हार तर खास दाक्षिणात्य स्टाईलचे - हे भलेमोठ्ठे. माणसापेक्षाही जास्त उंचीचे.

नविन नविन शक्कल लढवून फुलांच्या अत्यंत सुरेख रचना करून किती सुंदर सुंदर हार बनवले आहेत पहा :

(सर्व प्रचि त्या त्या दुकानदारांची परवानगी घेऊनच घेतली आहेत.)

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

माणसापेक्षाही उंच हार :

प्रचि ७

ताडाच्या पात्यांपासून बनवलेले हे झुंबर :

प्रचि ८

हार, गुच्छं, झुंबरं आणि खाली पात्यांचीच बनवलेली चटई :

प्रचि ९

अजून झुंबरं. सुकलेल्या पात्यांपासूनही बनवली आहेत :

प्रचि १०

जरा जवळून बघुयात. हार कसे गुंफले आहेत ते बघा. गुलाबाच्या पाकळ्यांत मोगर्‍याची फुलं, फुलांच्या रंगांचा, गुलाबाच्या पाकळ्यांच्या शेडिंगचा खुबीनं वापर करून किती मस्त रंगसंगती साधली आहे. तीच फुलं घेऊन प्रत्येक हाराला वेगळं रुप दिलंय. कमाल आहे की नाही!

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

भरतनाट्यमच्या वेळी डोक्यात घालतात ती वेणी :

प्रचि १५

पात्यांपासून बनवलेले हार :

प्रचि १६

ही एक वेगळीच रचना - ताडाच्या पात्यांचीच आहे.

प्रचि १७

हे हातावर मोजून विकण्याचे गजरे. यातही किती छान रंगसंगती आहे.

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

माटुंगा मार्केटमधली दाक्षिणात्य भाजीचा स्टॉल :

प्रचि २३

प्रचि २४

टॅपिओका आणि केळीचे गाभे :

प्रचि २५

ही मुळं कसली ते माहित नाही. नाव सांगितलं त्या माणसानं पण कळलं नाही.

प्रचि २६

बाळ कांदे :

प्रचि २७

खाऊचा स्टॉल :

प्रचि २८

गोड अप्पम :

प्रचि २९

हलवा, पापड (अप्पलम) आणि वेफर्स :

प्रचि ३०

लाल उकडे तांदूळ :

प्रचि ३१

केरळी परकर पोलकं

प्रचि ३२

लेटेस्ट फेरीतून अजून काही

ताडपातींपासून बनवलेली अजून दोन डेकोरेशन्स

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी काय मस्त आठवणी जागवल्यात.:स्मित: माझे जीवाचे माटुन्गा कधी होईल देव जाणे, पण आता या क्षणाला तरी मी मुम्बईत पोहोचले. खूप सुन्दर गजरे, हार, खाऊ ( पिशवीत बालुशाही होती बहुतेक, यम्मी!) केरळी दुकानावर धाड घालाविशी वाटतेय.

वा मामी, झकास !
माटुंग्याचे हे मार्केट म्हणजे मिनी तामिळनाडूच की !
जिथे दाक्षिणात्य वस्ती जास्त असेल तिथे आता ही अशा तर्हेची मार्केट्स डेव्हलप व्हायला लागली आहेत.
चेम्बुर स्टेशनच्या बाहेरही या मार्केटचा छोटा भाऊ बस्तान बसवू लागलाय.

आणखी एक या माटुंग्याच्या फुलवाल्यान्चे वैशिष्ट्य असे की हे लोक गणपती वगैरेची ऑर्डर घेतात व घरी येवून हे नारळाच्या झावळ्याचे डेकॉरेशन मापानुसार करुन देतात. अगदी हटके दिसते ही आरास !

फुलमार्केटावरुन नल्लीच्या रस्त्याला दाक्षिणात्य मंदिरं पण आहेत टिपिकल कळस असलेली. महेश्वरी उद्यानाच्या दिशेनेही आहेत. अगदी तामिळनाडूमध्ये आल्यासारखं वाटतं. > >एकदम बरोबर. झेड ब्रिजवरून उतरून महेश्वरी उद्यानाकडे जाताना आपण पटकन दक्षिण भारतामधेच आलो आहोत असे वाटते. इथले गणपती पण वेगळेच असतात. त्या रामेश्वर मंदिरासमोर जो उसाचे गुर्‍हाळ (नवनाथ का काही असे नाव होते) असायचे त्या मामांकडे मुंबईअमधला सर्वात चविष्ट उसाचा रस मिळतो (किंवा मिळायचा) Happy

मामी जुन्या आठवणी चाळवल्या कॉलेजच्या धन्यवाद Happy

मामी तुझ्या नजरेला दाद दिली पाहिजे. मस्त शोधले आहेस. बाजारातून आणि बरोबरीने जुन्या दिवसांतून कसली मस्त चक्कर मारून आणलीस.>>> अगदी अगदी!

नंदिनी,
गजरा' मस्तच.

अक्षरशः अप्रतिम ! मामी हे आमच्यापर्यंत पोचवल्याबद्द्ल धन्यवाद.

२८ वर्षांपूर्वी हे माहित नव्हतं, नाहीतर लग्नात हाच हार गळ्यात पडायला हवा असा हट्ट धरला असता. Wink

एक प्रश्नः मुंबईच्या हवेला हे असं उघड्यावर टांगून किती वेळ फ्रेश रहातं? कसं टिकवतात?

वॉव मामी मस्तच सफर घडवलीस.
वेगळ्याच प्रकारचे पेहराव, दागिने, चेहर्‍याची ठेवण असलेली पात्रं त्या चित्रांतून दिसत.>>>>>>>>>> आणि याबद्दल +१०००
अगं मी वेड्यासारखे चांदोबे वाचायची. अजूनही ही चित्रं डोळ्यापुढे आहेत. त्यात वेगळ्याच प्रकारची हेअर स्टाइली असलेल्या अरबी बायका अजूनही डोळ्यापुढे!

Banana stem juice was advised by my dietician to help weight loss but it's very hot (उष्ण ).

एवढे वेगवेगळे हार बघून मी आनंदाने वेडीच होईन बहुदा. कसला घमघमाट असेल तिथे मोगर्‍याचा. तिथे साड्यांचीपण दुकाने आहेत का? मला ते केरळी परकर पोलके फार आवडले.

सगळे फोटो पाहून इतकं प्रसन्न वाटतंय! मोगऱ्याचा, निशिगंधाचा वास दरवळला आजूबाजूला अगदी!
पूर्वी दर गुरुवारी सकाळी मंडईत जाऊन भला मोठा निशिगंधाचा हार घेऊन यायचे घराच्या स्वामी समर्थांच्या फोटोफ्रेम साठी त्याची आठवण झाली!

वपा किंवा वापा हे त्या चित्रांचे चित्रकार होते.
हे पहा:

http://en.wikipedia.org/wiki/Vaddadi_Papaiah

https://plus.google.com/photos/103485182548061116918/albums/502171820792...

https://www.google.co.in/search?q=Vaddadi+Papaiah&es_sm=122&source=lnms&...

वा! मामी मस्त, मन अगदी प्रसन्न झाले. माझ्यासारख्या फुलवेडीला तर ही मेजवानीच होती.

त्या गजऱ्यांमधल्या गुलाबी फुलांचे नाव विसरले. काय म्हणतात त्यांना?>>>>>अकु, ती गुलाबी कण्हेर आहे ना?

http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yellow-okay-hand-smiley-emoticon.gif

वावा!! सुगंधी धागा.
उघडल्यावर नाकात एकदम सांबार, कॉफी, केळा वेफर्स आणि फुलांचा संमिश्र टीपीकल वास तरळला.

या सगळ्या फोटोंत केळी किंवा केळा वेफर्सचा फोटो असे वाटत असताना 'केरळी परकर पोलके' आले, ते मी 'केळी अन् परकर पोलके' वाचले. फोटो पुन्हा पुन्हा बारकाईने पाहिला, केळी दिसली नाहीत, पण एक साडी हळूच दृष्टीस पडली, भारीच्च आवडली.
मद्रासी बाळकांदे मला भयंकर आवडतात. तू लिहिलेला पंजाबी पालक हे बाळकांदे घालून खूप मस्त होतो.

या फुलांच्या दुकानाच्या समोर एक कपड्यांचं दुकान, तिथे पुरुषांच्या शॉर्ट्स उत्तम दर्जाच्या मिळतात. मायबोलीवर उद्यापरवा शॉर्ट्सची विचारणा करणारा धागा निघेल तेव्हा कोणीतरी लक्षात ठेवून माझ्या या पोस्टीचा नक्की उल्लेख करा हं!

Pages