मॅरॅथॉन रनिंग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00

मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका

http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हार्दीक अभिनंदन मॅराथॉन मायबोलीकरांचे. हर्पेन, सिंबा,यो रॉक्स, इंद्रा, मध्यलोक आणि रोमा . ग्रेट. एवरेस्ट सर करणे. आयर्न मॅन, मॅराथॉन, ट्रीपल सेंचुरी आणि पीएचडी मला सारख्याच चॅलेंजिंग वाटतात. कॅन ओन्ली इमॅजिन. Happy

धन्यवाद धनि आणि विकीकाका.
मॅराथॉन, ट्रीपल सेंचुरी आणि पीएचडी एकाच ओळीत वाचून काय वाटलं ते नाही सांगता येणार Proud

मॅराथॉन, ट्रीपल सेंचुरी आणि पीएचडी एकाच ओळीत वाचून काय वाटलं ते नाही सांगता येणार >>>> अगदी अगदी Proud

मुंबई मॅराथॉनमध्ये धावणार्‍या मायबोलीकरांचे पुन्हा एकदा अभिनंदन. Happy

इकडे कुठे हार्ट रेट झोन्स वगैरे वर चर्चा झालीये का ?
परवा एक हाफ मॅरेथॉन केली. २.३० तास लागले. त्यात जवळजवळ २ तास ८ मि मी झोन ५ मध्ये होते. हे बरोबर आहे का चुक हे कळत नाहीये. झोन ४ मध्ये राहील्याने जास्तीत जास्त वेळ स्टॅमिना टिकवून ठेवता येतो असे काहीतरी वाचले आहे. १३/१४ के नंतर मी पार म्हणजे पारच गळपटले. ( नेहमी १७/१८ करायची सवय असूनही) हे सतत झोन ५ मध्ये राहील्याने होत असेल का ?

झोन ५ मध्ये इतका वेळ राहणे चांगले नाही इतके नक्कीच सांगू शकतो. फार फार तर १०% वेळ झोन ५ मध्ये असावा.
कुठल्या तरी धाग्यावर हार्ट रेट झोन्स ची चर्चा झालेली आठवतेय. हर्पेन सांगू शकेल अधिक.

सॉरी मी हे आता वाचतोय.
मला हार्ट रेट बेस्ड ट्रेनिंगची / धावायची सवय नाही. पण
झोन ५ मध्ये इतका वेळ राहणे चांगले नाही इतके नक्कीच सांगू शकतो. याला +१

बाकी धागा भरत यांनी दिलेला आहे तोच आठवला.

मी परवा ( शनिवारी ) पहिली फुल मॅरेथॉन केली. सोलो आणि सेल्फ सपोर्टेड. कोणताही इव्हेंट वगैरे नव्हता. मला ५ तास २५ मि. लागली. एक टप्पा पार केला.

बरेच आहेत फुल्ल ला
मीही रजिस्ट्रेशन केलं होतं पण काही अडचणीमुळे जाऊ शकत नाहीये

भरत, तुमचा प्रश्न मी आज वाचतोय.
आशू ने लिहिल्याप्रमाणे अजूनही माबोकर होते.

मी माझी आठवी मुंबई (फुल) मॅरॅथॉन ४:३६ मधे पुर्ण केली. ( एकूणात दहावे वर्ष. पण मधे २०२१ आणि २०२२ मधे स्पर्धा झालीच नाही)

आयर्नमॅनची रिकव्हरी डी ट्रेनिंग मधे कधी आणि कशी बदलली ते कळलेच नाही. Proud
त्यामुळे निदान आयर्नमॅनमधे लागलेल्या वेळेपेक्षा कमी वेळात ही स्पर्धा पुर्ण व्हावी असा प्रयत्न होता आणि त्याप्रमाणे ती वेळ साधली.
त्यामुळे एकंदरीत आनंदात आहे. Happy

भरत, धन्यवाद
यंदा खरोखरच छान हवा होती.
आदल्या दिवशी पोचल्या पोचल्याच हे बोलणे झाले मुंबईत दुपारी बारा वाजता देखील घाम न येणे म्हणजे चमत्कारच.
रवीवारी फुल मॅरॅथॉन सव्वापाच वाजता सुरु होणार म्हणून सव्वाचार वाजता बाहेर पडलो तेव्हाच जाणवले आज मजा येणार.
नेहेमी पेक्षा सराव कमी पडला असला तरीही माझी वेळ साडेचार तसाच्या जवळपास साधण्याचे प्रमुख कारण छान हवा हेच होय.
यावेळी अनेक जणांनी त्यांची सर्वोत्तम वेळ साधली.

पराग - धन्यवाद
चिन्मय - अभिनंदन
इतकं त्रोटक नाही लिहायचं
सविस्तर वृतांत हवा.

काल खरदूंगला चॅलेंज ही 72 km ची अल्ट्रा marathon पूर्ण केली
या रेस बद्दल हर्पेन ने सविस्तर लिहिलेच आहे. त्यामुळे अजून लिहीत नाही.
पण मी मी कार चां दोष पत्करून 2 ओळी लिहितो.

हर्षद ची खरदूनला सीरिज माबो वर वाचलेली. तेव्हा काय खसकले डोक्यात माहीत नाही, पण एकदा तरी ही रेस करायची असे डोक्यात पक्के बसले.
तो पर्यंत मी अर्धा km सुध्धा धावत नव्हतो. 2 एक वर्षा पूर्वी एक half marathon मरत मरत केलेली इतकीच पुंजी होती.
त्यात योगा-योगाने हर्षद प्रत्यक्ष भेटले, नंतर त्यांच्याबरोबर धावायला सुरुवात केली.
72 km करण्यासाठी लागणारी शारीरिक आणि त्याहून महत्वाची मानसिक शक्ती येण्यासाठी बराच काळ जावा लागला.
पण finally 5 वर्षानंतर माझे स्वप्नं प्रत्यक्षात उतरले. आणि हे घडण्यात हर्षद यांचा सिंहाचा वाटा आहे Happy

As they say,
There are no impossible dreams,
There can be impossible time lines.

माझ्या साठी ही एक मोठी achievement आहेच. पण 16 आठवद्याच्या training cycle मध्ये आणि "त्या" 14 तासात शिकलेल्या गोष्टी आयुष्यभर पुरतील.

Pages