मॅरॅथॉन रनिंग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00

मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका

http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन हर्पेन !

आमचे हाफचे ट्रेनिंग परत सुरू झाले. मध्ये २ महिने मोठा गॅप पडला. हाफच बरे वाटते आहे, अजून फुल करायची की नाही त्याचा फैसला होत नाहीये Lol अल्ट्रा म्हणजे खूपच दूरचा पल्ला Wink

काल आय आय टी बॉम्बेने आयोजित केलेल्या पावसाळी शर्यथीत धावलो. IIT Bombay Monsoon Run 11km

सुरुवातीपासून पाऊसही भारी होता. मी अंदाजे एक तास २० मिनिटांमध्ये पूर्ण केली. काही ठिकाणी निसरडे होते आणि एक दोन ठिकाणी ( जंगलसदृश्य मार्गावर) रस्त्यात चिखल होता. मजा आली. Happy

अरे मला वाटले काल कोणीतरी हैदराबाद मॅरॅथॉन मधे पळाले की काय.
गजानन अभिनंदन... स्पर्धा मार्ग कुठला होता आय आय टी कॅम्पस मधे का?

काल आम्ही (सातारा मॅरॅथॉनसाठी सराव म्हणून) आतकरवाडीपासून सिंहगडपर्यंतचे अंतर घाटरस्त्याने चढून उतरलो. तिथेही वाटेत चिखल होता. आम्हालाही मजा आली. हवामान मस्त होते उतरताना वेगावर नियंत्रण ठेवणे मजबूत अवघड होत होते. लहानपणी पर्वती उतरताना उडालेल्या तारांबळीची आठवण आली.

मस्तच, मला आवडेल तिकडे पळायला. आता पुढच्या वर्षी Happy

मी सध्या असे ठरवले आहे की मुंबई वगळता पुण्याबाहेरच्या मॅरॅथॉन्स रिपिट करायच्या नाहीत.
त्या प्रमाणे या वर्षी हैदराबादला न जाता लोणारला गेलो. पुढच्या वर्षी चेरापुन्जी करायचा विचार आहे आणि माझ्या यादीत आता बरीच ठिकाणं वाढली जेव्हा माझ्या पाहण्यात ही साईट आली.

http://www.goheritagerun.com/

कुर्ग बदामी हम्पी बिदर खजुराहो उदयपुर पुढच्या अनेक वर्षांची सोय झाली Proud

मुंबई वगळता पुण्याबाहेरच्या मॅरॅथॉन्स रिपिट करायच्या नाहीत >> अरे वा मस्तच. इथेही बरेच लोक असेच करतात. काही कॉन्स्टन्ट ठेवून बाकी मग बदलतात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी पळणे पण होते आणि ठिकाणं पण पाहिली जातात.

लगे रहो.

काल सातारा हिल हाफ मॅरॅथॉन धावून पुर्ण केली.
लागलेला वेळ २ तास ०१ मि. ३५ से.
स्पर्धा मार्ग म्हणजे कास पठारा वर जाणार्‍या रस्त्याने १०.५ किमी वर जाऊन परत फिरायचे असा होता.
आयोजन मस्त होते. वातावरण देखिल मस्त. सातारकरांचे प्रोत्साहन तर एकदम जबरदस्त
मजा आली.

आज आपल्या पायाला बरेच वेगेवेगळे स्नायु आहेत त्याची जाणीव होते आहे. Proud

अभिनंदन हर्पेन !!

आज आपल्या पायाला बरेच वेगेवेगळे स्नायु आहेत त्याची जाणीव होते आहे >> Lol

खुप डोंगर होते का ? कास पठारावर जायचा रस्ता बराच चढाचा आहे. तसे असेल तर २ तासांचा वेळ भारी आहे. आणि मग पाय काय सगळ्याच शरिरातील स्नायु अठवण करून देतील Wink

Thanks धनि, डोंगर एकच होता पण जाताना सतत चढ आणि येताना सतत उतार.

सर्व सबटू करता Hill Champion Gold medal
दोन ते अडीच Hill Conquerer Silver Medal
नंतरच्या सर्वांना Hill Challenger Bronze Medal

अशी योजना होती
मला सिल्वर मिळाले तरी योजना आवडली.
नाहीतर सगळ्यांना एकच मेडल देतात सगळीकडे

हो योजना मस्त आहे. त्यामुळे तरी सब २ करण्याची इच्छा होईल. नाही तर आरामात करू २ नाही तर २:१५ मध्ये करूच असे वाटते Wink

मुंबईला आता जेमतेम १५-१६ आठवडे उरलेत. फुलचं शेड्युल कसं ठेवू ते सांगा नां कुणीतरी!
हर्पेनसाहेबांची साताऱ्यास भेट झाली त्यामुळे ही मॅराथॉन कारणी लागली.
अभिनंदन हर्पेन _/\_

धन्यवाद श्री. धन्यवाद आणि अभिनंदन हेम Happy
मी हे आता वाचतोय. तू ही कधी बघशील तर तुझी विपु बघ.

ही मॅरॅथॉन म्हणजे माबो करांचे मिनी गटग होते.

आपले सायकलपटू यावेळी धावपटू झाले होते. हेम, अमीत, सुधाकर, माबोकर नसलेला पण आशू च्या सायकल टूर मधला ओंकार असे सगळे तिकडे धावले आणि सगळ्यांनीच ही अवघड स्पर्धा निर्धारित वेळेच्या आत संपवली.

वाह हर्पेन मस्तच फोटो. मला पण सातारा हिल करायची आहे. पण भारत ट्रिपची वेळ जुळत नाहीये. Sad फोटो खूपच छान.

मी रविवारी बॉस्टन हाफ केली आणि नवर्यानेही. रेस फ्रान्क्लिन पार्क मधे होती. बरेच उतार चढाव आहेत त्या कोर्सला. नवरर्‍याला २ तास ३२ मिनिटे लागली आणि मला २ तास ५२ मि.
यावेळी रेसच्या दिवशी सतत पाऊस पडत होता. आक्खे तीन तास भिजून धावलो. मजा आली. शिवाय 'फटिग' ,'डिहायड्रेशन' जास्त झाले नाही. स्नायूही बरेच कमि दुखले दुसर्या दिवशी.
मी यावर्षी बॉस्टन्चे ५किमी १० किमी आणि हाफ केली त्यामुळे 'मेडले' चे ज्यादा मेडल्ही मिळाले. Happy पुन्हा करणार पुढच्या वर्षी.
वर्षातली सर्व मेडल्सः
FullSizeRender(12).jpg

भिजलेले आम्ही
14642160_1265237200216919_1112076087530170559_n(1).jpg
विद्या.

Pages