मॅरॅथॉन रनिंग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00

मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका

http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धनश्री, हा माझा अनुभव होता.

मागच्या वर्षी ट्रेनिंग नीट झाले होते. रेस च्या आधी विक डेज मध्ये पण जवळ जवळ २ - ३ दिवस ४ ते ५ मैल पळत होतो आणि शनिवारी लाँग रन्स ११ -१३ मैल झाल्या होत्या. त्यावेळेस मला अजिबात त्रास झाला नाही. लाँग रन्स इतक्याच आठवड्या मधल्या ३ - ४ मैलांच्या शॉर्ट रन्स तुमचा स्टॅमिना वाढवायला महत्त्वाच्या असतात.

मात्र यावर्षी (२०१६) अर्धवट ट्रेनिंग झाले. आठवडेभर संध्याकाळी काही ना काही चालू असल्याने शॉर्ट रन्स नीट झाल्या नाहीत. आणि लाँग रन सुद्धा लाँगेस्ट ९ मैलांचीच झालेली. असे असताना जवळ जवळ १० मैल मी नीट पळालो. त्यानंतर मात्र मला दम लागला आणि मग रन - वॉक असे करत हाफ पूर्ण केली.

बहुतेक तरी बाकीच्या रनर्स चा सुद्धा काहीसा असाच अनुभव ऐकला आहे. जर बॉडीला ते माईल्स पळण्याची सवय झालेली असेल तर शेवटी दम लागत नाही. नाही तर मात्र माणूस दमतो.

अजून एक म्हणजे तुमचा पेस खुप जास्ती असेल सुरवातीलाच तरी सुद्धा शेवटी दम लागू शकतो. त्यामुळे थोडे स्लो सुरूवात करून / पेस मेंटेन करून बघा उपयोग होतोय का.

तेवढे माईल्स पळण्याची सवय.... ह्म्म... मी लाँग रन्स जनरली १७/१८ पर्यंतच करते. २० वगैरे एखादेवेळी होतात. आता बदलून बघेन.
पेस माझा जनरली सेमच असतो सुरुवातीपासून... अगदी शेवटचे २/३ के कमी होतो... पण ते पण करुन बघेन.

धन्यवाद धनि.

मुंबई मॅरॅथॉनवर जरा सविस्तर लिहेन असे ठरवले होते पण तसे काही हातून होत नाहीये असे लक्षात आल्याने ही क्षणचित्रे -

लाईन-अप सेक्शनकडे जाताना बिब वरील माहिती नुसार चेहरे तपासायसाठी लागलेली भली मोठी रांग
नंतर ( फ्लॅग ऑफ पाच चाळीसला असताना साडेपाच वाजत आले तरी बाकी असलेले शेकडो धावपटू पाहून असावे कदाचित) सगळ्यांना एकदम सोडून देणे
त्यामुळे उडालेला सावळा गोंधळ ( ए बी सी सगळ्या लाईन-अप सेक्शनचे एकत्रच धावायला सोडलेले धावपटू)
त्यामुळे मी ज्याच्या बरोबर पळायचे ठरवले होते त्याची आणि माझी झालेली ताटातूट
जरा वाट पाहून तशीच सुरु केलेली धाव
छ. शि. ट. पासून धावायला चालू केल्यावर चर्चगेट येतंय न येतंय तोच (अगदी पहिल्याच किमी पासूनच) यायला लागलेला घाम
आताच हे असं तर नंतर सुर्य उगवल्यावर कसं असं वाटून त्यामुळे फुटलेला आणखिन घाम
नंतर मरीन ड्राईव्ह वर आल्यावर नेव्हीचा बँड ऐकून आलेले स्फुरण
एक पुण्याची तिकडी पळत मला मागे टाकून गेल्यावर त्यांना गाठायच्या नादात वाढलेला वेग
वाढलेल्या वेगाची सापडलेली लय
अर्ध मॅरॅथॉन करणार्‍या लोकांनी आपल्याला आणि आपण त्यांना केलेल्या हाकामार्‍या
लगेचच नजरेच्या टप्प्यात आलेला वरळी वांद्रे समुद्री जोडपूल
त्याच्या जरा अलिकडे भेटलेले ढक्कन एन्जल्स (आमच्या गृपचे नाव आहे ढक्कन अ‍ॅथ्लिट्स आणि आम्हाला पळताना पाणी पाजणारे / चिअर करणारे / मदत करणारे आमचे मित्र/नातेवाईक आमच्या करता असतात एन्जल्स)
सी लिंकवर फोटो काढायकरता म्हणून मुद्दम घेतलेला आणि ऐनवेळी उसवलेल्या खिशामुळे त्यांच्याकडे द्यावा लागलेला फोन
सी लिंक वर फोटो काढता येणार नसल्यामुळे वाटलेली निराशा
मात्र तिकडे पुलावर गेल्यावर दिसलेला नजारा पाहून आणि मस्त गार वारा लागून आलेला उल्हास
वाटेत भेटलेल्या काही परदेशी धावकांनी पळता पळता दिलेले प्रोत्साहन
तुम्ही कुठले आम्ही कुठले अशा माफक संभाषणानंतर ते जपानी आहेत असे कळल्यावर त्यांना म्हटलेले अरिगातो आणि त्यांनी उलटून म्हटलेले सुस्पष्ट धन्यवाद.
नंतर परत एकट्याने (पळायला लागल्याने) पळताना लागलेली तंद्री
आयोजकांनी दिलेले ऑआरएस अजीबात न वापरता दर तासाला सॉल्ट पिल खात केलेली मार्गक्रमणा
त्यामुळे असेल पण बर्‍याच जणांना आले तसे न आलेले क्रॅम्पस
यु-टर्न घेऊन वरळी डेअरीकडे जात असताना परत एकदा भेटलेले ढक्कन एन्जल्स
पेडर रोडच्या चढावरही पळणे न थांबवावे लागल्यामुळे वाटलेले अतीव समाधान
अधून मधून केलेले स्पंजिंग /जरासे सुगंधी आणि गारवा राखून असलेले त्यातले पाणी
बाबुलनाथ जवळ केलेल्या स्पंजिंगमुळे वाटलेली जबरदस्त तरतरी
त्याच्या आणि लगेच पुढे दोनवेळा असलेल्या तुषार फवारणार्‍या बूथच्या जोरावर उन्हातूनही बर्‍यापैकी नीट पार पाडलेले चौपाटीपासून पुढचे अंतर
डावीकडे परत वळल्यावर लाभलेली सावली आणि दिसलेले ड्रीम रन मधे नटून-थटून सामील झालेले देखण्या लोकांचे जथे (जे याधीच्या तीनही वर्षी मरीन ड्राईव्ह वरच दिसलेले होते)
अतिशय दमलेल्या अवस्थेतही हे नोटीस झाल्यामुळे परत वाटलेला उत्साह
त्या नादात जोरात पळायला लागल्यावर लगेचच लागलेली वाट :प
मग परत काबूत आणलेला श्वास आणि लय आणि शेवटचे मस्त धावत, २-३ जणांना मागे टाकत पार केलेले ब्ल्यु कार्पेट वरचे २०० मिटर
पहिल्यांदाच एकट्याने पळत पार केलेले सगळेच्या सगळे अंतर
साधलेली ४ तास १३ मिनीटाची (आजवरची) सर्वोत्तम वेळ

सगळ्यांचे पळापळीकरता अभिनंदन. Happy

शेवटचे ३ के त्रासदायक होत आहेत. >>>> काही केलं तरी ते त्रासदायक वाटतातच. Wink त्यात मी पळालेल्या सगळ्या हाफ्समध्ये शेवटचा अर्धा मैल अपहील होता. ते अंतर पळत असताना असा रूट डिझाईन करणार्‍यांच्या सुस्थळी शिमटीने फटके द्यावेसे वाटतात !!

धन्यवाद मंडळी Happy

आता इतक्यात नवीन कोणतीही ईव्हेंट नसल्याने सध्या पळताना किती हलकं वाटतंय :प

मस्त हर्पेन आम्ही पण फिरून आलो Happy थोडक्यात पण सर्व माहिती दिलीत. अभिननदन पुन्हा एकदा. हा एक धागा आहे ज्यावर आवर्जून येऊन वाचायची आणि उत्तर द्यायची इच्छा होते आजकाल. Happy

विद्या.

>>> हर्पेन मस्त लिहील आहेत... अगदी डोळ्यासमोर उभ राहीलं. <<<< +१०००
अगदी स्वतःच अनुभवतो आहोत असे वाटले Happy मस्त अनुभव.
(च्यामारी आम्ही फक्त हे वाचुनच हासहूस करणार - कधीतरी एकदा मॅरॅथॉन मधे पळालेच पाहिजे. Happy )

हा एक धागा आहे ज्यावर आवर्जून येऊन वाचायची आणि उत्तर द्यायची इच्छा होते
अगदी अगदी विद्या. माझ्याकरता आजकाल नव्हे तर गेले तीनेक वर्षांपासून म्हणजे जेव्हा पासून हा धागा सापडला तेव्हापासून अगदी हेच वाटते.

बुवांना मनापासून धन्यवाद...

लिंटी मॅरॅथॉन पळावे नित्य वदावे
पळाल हो तुम्हीही मॅरॅथॉन... अगदी तुमच्या व्याधी उपाधींसकट.
मला हार्ट अ‍ॅटॅक येऊन गेल्या नंतर वर्षाच्या आत फुल पळणारा, कॅन्सर सर्व्हायव्हर, अस्थमा असलेले असे सर्व प्रकारचे मॅरॅथॉनर्स माहीत आहेत. सर्व-सामान्यातले असामान्य मंडळी आहेत ही पण तुम्हीही असामान्यच आहात.

फक्त धरसोड / स्वतःवर सारखे प्रयोग करणे सोडून द्या आणि "किप काम अ‍ॅण्ड जस्ट रन" पॉलिसी अवलंबवा.
या बाबतीत दिवा बिवा काही नाहीये तुम्हाला.
तुमची फुल मॅरॅथॉन झाली पळून की आपण पार्टी करू Happy

लिंटी, मी वाट बघेन.

पण पोकळ धमकी नकोय. पार्टीची तारीख पक्की करा.
वर्षानंतरची(च) चालेल तितका वेळ घ्या / द्या स्वतःला

Post Oxford Marathon, the winner was asked to say something to audience and he just reiterated sentence from other marathoner - Just shut up and run...
मस्त हर्पेन...
या week end ला PIM मधे जाणार आहे...३rd half marathon....hope to do better in timing...

बारिशकर
भरपूर शुभेच्छा !
मी घाबरवत नाही पण पिम मधे पळायला जाताना वॉटर सपोर्ट बाबत एक्स्पेक्टेशन अ‍ॅडजस्ट करून जा.
आपल्या मित्र मंडळींपैकी कोणी येऊ शकणार असेल तर वाटेत शेवटाकडे त्यांना एलेक्ट्रॉल घेऊन थांबायला सांगा.
पिम चा वॉटर सपोर्ट बाबत ऐकीव माहीती आणि अनुभव नॉट सो गूड आहेत. अर्थात मी 'ही' रन दोन वर्षामागे फक्त एकदाच पळालोय.

Just shut up and run... >>>
आणि अ‍ॅक्च्युअली लिंटी वयाने मोठे असल्याने त्यांना शट-अप कसं म्हणणार म्हणून कीप काम म्हटलं :प
बाकी त्यांनी / इतर कोणीही स्वतःला एक वर्ष भर सकाळाचे दोन तास दिले तर ते फुल मॅरॅथॉन करू शकतील याबाबत मनात अजीबात शंका नाही.

>>> आणि अ‍ॅक्च्युअली लिंटी वयाने मोठे असल्याने त्यांना शट-अप कसं म्हणणार म्हणून कीप काम म्हटलं :प <<<
बाबोऽऽ, वयाचा संबंध लावु नका रे, तुम्हा लोकांच्या अनुभव व प्रत्यक्ष कतृत्वापुढे आमचे नुसतेच वाढलेले वय (अन वाया घालवलेली ऐन तारुण्यातील वर्षे) सर्व फिक्केच आहे.
तेव्हा या बाबतीतील तुमचा प्रत्येक शब्द मी प्रमाणच मानणार. तुमच्या शब्दाबाहेर जाणे नाही.
जसे सायकलिंगच्या बाबतीत केदार/ आशुचॅम्प् इत्यादी लोक आहेत, तसेच रनिंगच्या बाबतीत येथिल लोकं . Happy

लिंटी चे वय नाही माहित.... पण oxform marathon मधे १०० miles, 100 km अशा catagories पण होत्या...१०० miles ची रेस Anthony D'Souza नावाच्या ५८ yrs च्या माणसाने जिन्कलि.....he finished 100 miles in 27 hrs :)...Milind Soman was in same category...he took 31 hrs......
PIM मी मागच्या वर्षी केली आहे....१० km ...so I m aware about the mismanagement there...its chaos actually..but thanks for the information...स्वतः ची बाटली (पाण्याची) घेऊन पळणार आहे....lets see how it goes...

बारिशकर यांनी 2:01:20 या वेळेत पुणे अर्ध मॅरॅथॉन पुर्ण केली.
मस्तच टायमिंग, हार्दीक अभिनंदन !

>>>> बारिशकर यांनी 2:01:20 या वेळेत पुणे अर्ध मॅरॅथॉन पुर्ण केली.
मस्तच टायमिंग, हार्दीक अभिनंदन ! <<<<
व्वा.... ग्रेटच... अभिनंदन आणि भले शाब्बास..... Happy

आजच आलेली एक रोचक इमेल
Dear Satara Hill Half Marathoner,

Our "Sairaat" runner friend Navnath Dige is getting married on coming Friday, on the 3rd February 2017.

Nothing really Earth shattering about this news, but there is something else which makes it a bit more interesting, especially for our friends from the running community.

Navnath and his bride Punam are going to RUN from their respective homes to Satara to get married.

The Baraat will comprise of runners from the Satara running community, who will accompany the Bride and Groom ( roughly a 25 km run from Medha to Satara ) , starting at 6 am and reach the Registrar Office in Satara around 10 am where they will exchange vows in the presence of their "Running friends" and Family.

Those who wish to participate can choose between running all the way or join us near Molacha odha or Mahanubhaav math ( roughly 4 to 5 km ) as as we approach Satara , around 8.30 am.

Our ever supportive and sporting Collector Shri Ashwin Mudgal and SP Shri Sandeep Patil will grace the occasion and bless the new couple.

We would like to invite YOU ALL to participate in this unique and fun marriage on coming Friday.

Let's prove that no day is important enough to miss a run - not even your Wedding Day.

Each participant will run wearing a unique BIB which says "Varhadi" meaning "Baraati" and will also get a unique Participation / Finisher certificate as a souvenir of this "Jhingaat" event !!!

Happy Running ,

Team Satara.Invite.jpg

धन्यवाद हर्पेन माझे PIM che details टाकल्या बद्दल.....या वर्षी खुपच छान organize केली होती PIM ...at par with PRBM..
सब २ थोडक्यात हुकले. पण २:०१:२० चि पण मानसीक तयारी नव्हती. २:१०-२:१५ चा plan होता......३.५ ते ११ किमी पर्यन्त डाव्या पायामधे cramp आला होता. ८ नन्तर वाटले की सोडुन द्यावे. पण आजुबाजुची जनता बघून थोडे continue करू असे करत ११ पूर्ण केले. ११ नन्तर थोडे normal झाल्यासारखे वाटायला लागले. so overall really happy with best time...next time sub 2 चा पुन्हा ट्राय करीन..

हर्पेन तुम्ही पाठवलेली पत्रीका जबरा आहे. मी सातार्याचा आहे. लग्न जर sat/sun असते तर जायचा विचार केला असता Happy

धनि, असं काही करायची संधी हुकली म्हणून हळहळ वाटतेय का? Wink Proud

बारिशकर, सबटू झालीच की जवळ जवळ. आता पुढची नक्की होऊ शकेल. इट इज ओन्ली मॅटर ऑफ (अ मिनिटफुल ऑफ) टाईम. Happy
अभिनंदन आणि शुभेच्छा Happy

पुणे रनिंगची यावेळची 'लास्ट संडे ऑफ द मंथ' एव्हेंट कल्याणी नगर भागात होत आहे.
एल्सॉम म्हणजे धावकांनी, धावकांकरता, धावणे या क्रीडाप्रकाराला प्रोत्साहन म्हणून आयोजित केलेला उत्सवच असतो. एरवी स्वतःच मस्तपैकी जोरदार पळणारे इकडे तुम्हाला निरलसपणे, नि:स्वार्थी भावनेने स्वयंसेवक बनून पाणी पाजताना, वाहतूक वळवताना, फोटो काढायला, प्रोत्साहन द्यायला हजर असतात.

शिवाय नवीनच सुरुवात केलेल्या धावकांना आटोक्यातली वाटतील अशी ३ किमी, ५ किमी १० किमी अंतरेही या स्पर्धीत असतात. नोंदणी शुल्क तर फक्त १०० रुपये असते. संपुर्ण भारतात ह्या प्रकारचा अनुभव कुठेही मिळत नाही. तर जरूर भाग घ्या, मित्रांना सांगा.

https://www.townscript.com/e/march-lsom-400044/march2017

Pages