मॅरॅथॉन रनिंग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00

मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका

http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इन्ना आणि सिम्बा धन्यवाद,

यावर्षी अवघड आहे, ट्रेनिंग मधे फार खाडे झालेत त्यामुळे तयारी नीट झाली नाहीये आणि छोट्या दुखापतीने ग्रस्त आहे सध्या. म्हणजे दुखापत तशी गेल्यातच जमा आहे पण नंतर एक ट्रेक करायचाय त्यामुळे यावेळी मुंबईत जीवाला जपून धावणार आहे.

जीवाला जपून धावत असतानाही दुखापतीने तोंड वर काढल्यामुळे जरा कठीणच गेलेल्या ह्या मॅरॅथॉनला केवळ पुर्वपुण्याईच्या जोरावर (मुंबई मॅरॅथॉन मधे धावण्याची ही सलग सहावी खेप) ५ तास १३ मिनिटे लावून पार पाडले.

कालच्या रविवारचा सगळ्यात जास्त संस्मरणिय आणि आनंदाचा भाग म्हणजे अगदी थोडा वेळ का होईना पण स्पर्धा सुरु व्ह्यायच्या अगोदर अनेक ट्रेकर (ज्यांच्या लिखाणाचा आणि आपापसातल्या मैत्रीचा मी फॅन आहे) टर्न्ड रनर मायबोलीकरांना पहिल्यांदाच भेटलो.

काल पुण्याच्या आशिष कसोदेकर यांनी लडाख सारख्या विरळ हवेच्या प्रदेशातील ५५५ किमी अंतराची धावण्याची स्पर्धा पार पाडली. ते ही स्पर्धा पुर्ण करणारे पहिले भारतीय ठरले आहेत. याआधी त्याच भागात त्यांनी १११ आणि ३३३ किमी अंतराच्या स्पर्धा पुर्ण केल्या होत्या. ५५५ किमी अंतराचे हे पहिलेच वर्ष होते.

आशिष यांचे हार्दिक अभिनंदन!

वाह ! अभिनंदन ! काय एकेक भन्नाट लोक असतात. लडाखमध्ये 555 किमी म्हणजे कल्पनेच्या पलीकडे झालं. ही स्पर्धा किती दिवसात पूर्ण करायची असते? अजून पण प्रश्न आहेत, त्यासाठी गुगल करेनच

वॉव! ग्रेट. आशिष यांचं अभिनंदन!

येत्या डिसेंबरमध्ये दुसर्‍यांदा अर्धमॅरेथॉन धावायचा विचार आहे.
(इथल्या धावपटूंसोबत असे व्यक्त केल्यावर, लॉक केल्यागत तो विचार सहसा रद्द होत नाही, म्हणून हे इथे नमूद करतोय. Happy )

गेल्या वर्षी पहिल्यांदा २१ किमी धावताना मनात फारच धास्ती होती, ती आता बरीचशी निवळलेली आहे. त्यामुळे यावेळी अधिक आत्मविश्वासाने सामोरे जाऊ असे वाटतेय.

गोवा आयर्नमॅन पूर्ण केल्याबद्दल सिंबांचे अभिनंदन.
सध्याच्या अपडेटनुसार ६:५३:०९ तास

वयोगटात ३६/१३३ तर ओव्हर ऑल २११/८०० वा रॅंक.

अतिभयंकर, महाभयंकर, मायंदाळ भयंकर!

मी गेल्या शनिवारी १६ नोव्हें. ला १०० किमी पुणे अल्ट्रा मॅराथॉन धावलो. गार्मिनने १०२ किमी दाखवले. एक मस्त अनुभव. लेख पाडण्याचा प्रयत्न करतो.

अनेक लोकांना अर्धवट सोडून द्यावी लागली अशा प्रतिकूल परिस्थितीत १०० किमी करणे म्हणजे पराकोटीची अवघड गोष्ट, आमची काही मंडळी ५० किमी ला आणि एक ७५किमी करता होता.
हेम विशेष हार्दिक अभिनंदन, लेख वाचायला जरूर आवडेल.

१०० किमी पुणे अल्ट्रा मॅराथॉन धावलो. <<<<< काय भारी.. . नक्की लिहा लेख. अगदी हाफ, फुल, अल्ट्रा सगळे टप्पे कसे पार केलेत ह्यासकट लिहा.

अभिनंदन हेम,

PIM ला आहात का? प्रत्यक्ष भेटायला आवडेल. Happy

सिम्बानी पुणे इंटरनॅशनल (हाफ) मॅरेथॉन १ तास ५४ मिनिटात धावून पूर्ण केली, हार्दिक अभिनंदन.
मी त्याच्या पाठीशी होतो Proud

मागच्या रविवारी अजून एका (अर्ध) मॅरॅथॉन मधे भाग घेतला.
भाग घ्यायचा काहीच इरादा नव्हता पण 'फिक्की फ्लो' तर्फे महिला सबलीकरणा करता म दत म्हणून मगरपट्ट्टा येथून आयोजित केलेल्या स्पर्धेत आमच्या ऑफीसतर्फे नावनोंदणी करण्यात येणार असल्याचे अगदी आयत्यावेळी म्हणजे दोन दिवस आधी समजले मग म्हटले ऑफीसातले इतके सगळे सहकारी तिकडे असणार (सगळे मिळून ३० जण होते) तर होऊनच जाऊ दे.

मग काय केली अजून एक सब टू
१ तास ५४ मि. १० से.

आता मात्र पुर्ण लक्ष मुंबई मॅरॅथॉनच्या तयारीवर

रोज रोज काय कौतुक करायचं. >>>> Proud

खरंय. पण मी आपलं नोंद म्हणून लिहिले हो. परत काही काळानंतर वाचायला छान वाटतं. खासकरून मधेमधे जेव्हा आपण ढेपाळतो तेव्हा टॉनिक म्हणून उपयोगी पडते.

Pages