मॅरॅथॉन रनिंग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00

मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका

http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद हर्पेन, टण्या.

सकाळी ७ ला एलिट रनर्स निघाले .. आमची ४ तासात फिनिश करणारी कॉरल साधारण ७:२० ला निघाली असेल.
दुपारी १२ पर्यंत ४०-४२ फॅरनहाईट (६ डिग्री सेल्सिअस) पर्यंत तापमान गेलं होतं... वातावरण ढगाळ होते त्यामुळे सूर्यमहाराजांचे दर्शन फार झाले नाही पण नशिबाने वारा नव्हता.

आमचा दिवस रात्री २ वाजताच सुरू झाला Proud .. आवरून , स्ट्रेचिंग वॉर्म-अप करून ४ ला घरातून निघालो. तासाभराचा ड्राईव करून ५ ला पोचलो. मग पार्किंग ते स्टार्ट लाईन असे मैलभर चालणे.. सिक्युरिटी चेकईन च्या लाईनीत अजून ४० मिनिटे कुडकुडत काढली. ५-ते ७ दोन तासात पाय गोठून गेले.

आणि हो... रनिंग कोर्स श्यामलन च्या 'सिस्क्थ सेंस' चित्रपटात दाखवलेल्या नेबहुडातनं गेला... पळतांना चित्रपटाच्या आठवणी जाग्या झाल्या. Proud

धन्यवाद पराग,
हो पहिलीच फुल होती.
न्यूयॉर्क, शिकागो आणि मरीन कॉर्प्स ह्या तीन करण्याची ईच्छा आहे. दरवर्षी एक ते दोन आठवड्यांच्या अंतरानेच त्यांचे स्केड्यूल असते त्यामुळे पुरेश्या रिकवरी टाईमच्या अभावी एका वर्षी एकच करता येते. पुन्हा लॉटरीचा वेगळा घोळ. बघू ट्रेनिंग कसे जमते.. ऊत्साह कितपत टिकतो.
बॉस्टनला तर ह्याच काय पुढच्या चार जन्मात क्वालिफाय होणे शक्य नाही.

हाब, बोस्टन करता मी म्हातारा होण्याची वाट बघतोय Proud
नेव्हर से नेव्हर

आणि तुझी पहिलीच फुल्ल मॅरॅथॉन होती का, विशेष अभिनंदन. पहिल्याच प्रयत्नात खूपच भारी वेळ साधलीस.

हाब, बोस्टन करता मी म्हातारा होण्याची वाट बघतोय >> भले शाब्बास! तू पळ... मी माझी बत्तीशी सांभाळत तुला चिअर अप करेन. Lol

अरे,सप्टेंबर पर्यंत मी कन्सिस्टंटली २० मैल ३ तासात करत होतो. मध्ये एक हाफ मॅराथॉन पळालो तेव्हा १:५० चा पीआर आला. (नंतर ट्रेनिंग मध्ये एकदा १:४६ सुद्धा आला)
पण ऊन्हाळा संपून हवा जसजशी थंड होऊ लागली तसतसे मला लाँग रन्स मध्ये साईड स्टिच चा प्रॉब्लेम होऊ लागला. लांब पल्ल्यात पळतांना पायांच्या स्नायू मध्ये वेदना होणे ठीक, त्रास होतो पण पण वेदनेसहित ३-४ मैल वेग कमी करून पळता येते. मात्र साईड स्टिचची वेदना आली की स्पर्धा संपलीच (निदान माझ्यासाठी तरी भयंकर वेदनादायी प्रकार आहे हा). म्हणून मी ४ तासांचे टार्गेट ऑक्टोबरच्या आधी सोडून दिले आणि रेस पूर्ण करण्यावर भर दिला.
त्यात संप्टेंबरनंतर अंधार लवकर पडू लागला (तोवर रात्री साडे आठ - नऊ पर्यंत ऊजेड असायचा). मला कम्यूटमुळे संध्याकाळी ७:३० च्या आधी पळणे शक्य नव्हते सकाळीही ६:३० ची ट्रेन .. त्यामुळे शेवटच्या दीड महिन्यात ट्रेनिंग फक्त वीकेंड लाँग रन पुरतीच मर्यादित झाली.
तेव्हा ४ च्या आत करू पूर्ण शकणार नाही असा अंदाज आला होता (तुला कल्पना असेलच लोक ४ च्या आत बाहेरचा मेंटल ब्लॉक केवढा मोठा असतो), तरी ४:१० जमेल असे वाटत होते.
पण महत्वाच्या वेळी कमी झालेले शॉर्ट डिस्टन्स रन्सचे ट्रेनिंग, थंड हवेचा प्रॉब्लेम ह्या सगळ्यांचा परिपाक आणि अचानक ऊद्भवलेली डाव्या पायाच्या हॅमस्ट्रिंगची वेदना... त्यामुळे शेवटच्या स्ट्रेच मध्ये फार डिफेन्सिव अ‍ॅप्रोच घ्यावा लागला. साईड स्टिचची वेदना शेवटपर्यंत जाणवली नाही हे मात्र मोठेच नशीब म्हणावे लागेल.

शिकागोसाठी (October 13, 2019) रजिस्टर केले आहे.. लॉटरी मध्ये नंबर लागला तर ह्यावेळ्च्या फिलीच्या अनुभवातून शिकून अजून चांगली ट्रेनिंग करता येईल. पळत्याची खोड... Proud

हो पहिलीच फुल होती. >>>> भारीच मग ! फुल करायचं कधी पासन ठरवतो आहे. पण टरेनिंगचं टाईमटेबल बघूनच भिती वाटते.

भारी रे हाब !! लगे रहो.
मी या विकांताला तलसा मध्ये हाफ पळालो. सेम ३२ डीग्री होते. आणि पूर्ण रेस भर तेच राहीले. पण थंड होते त्यामुळे माझे गोल २:२० पेक्षा फास्ट पळालो. २:१६ मध्ये पूर्ण केली या वेळेस. शेवटच्या टेकडीने जीव काढला. अगदी दीड मैल राहिल्यावर जवळ जवळ आर्धा मैल चढ होता पूर्ण. त्यामुळे पी आर काय झाला नाही.

कमी झालेले शॉर्ट डिस्टन्स रन्सचे ट्रेनिंग >> हा खुप मोठा फॅक्टर आहे रे ! ते चांगले झाले तर रेस चांगली होते.

बोस्टन करता मी म्हातारा होण्याची वाट बघतोय >> Lol अगदी बरोबर म्हणालास हर्पेन ! बहुतेक मी फुल चे ट्रेनिंग म्हातारा झाल्यावरच सुरू करेन. सध्या काय वेळ जमत नाही Proud

पराग, पुणे रनिंग मध्ये मी मुलीबरोबर पळालो ६ किमी.. बाकीच्या मायबोलीकरांपैकी श्यामली १० किमी आणि सुन्या आंबोलीकर २१ किमी पळाले.. बाकी तिघे जण व्हॉलेंटियर म्हणून होते.. ह्याच्या व्यतिरिक्त कोणी पळाले का नाही त्याची काही कल्पना नाही..

सही धनि..
२:१६ मस्तच टाईमिंग आहे.

शेवटच्या टेकडीने जीव काढला. अगदी दीड मैल राहिल्यावर जवळ जवळ आर्धा मैल चढ होता पूर्ण. त्यामुळे पी आर काय झाला नाही. >> मागे एन. सी. मध्ये 'टार हिल' नावाची १० माईलर केली होती. तिथे शेवटचा १ मैल ऊभ्या टेकडीचा चढ आहे आणि त्या टेकडीच्या फास्टेस्ट चढासाठी एक वेगळे चॅलेंज आणि वेगळे बक्षीस होते त्याची आठवण झाली Proud

सही हिम्या !! दोघांचही अभिनंदन ! श्यामली आणि सुन्याचेही अभिनंदन ! >> अभिनंदन.

फुल करायचं कधी पासन ठरवतो आहे. पण टरेनिंगचं टाईमटेबल बघूनच भिती वाटते. >> मला पहिली हाफ पळाल्यानंतर पहिली फुल पळायला अजून डझनभर हाफ आणि फक्त अर्धा डझन वर्षे लागली. Proud

पुणे रनिंग मध्ये मी मुलीबरोबर पळालो ६ किमी.. >>
तुम्हा दोघांचे अभिनंदन हिम्या.

श्यामली आणि सुन्याचेही अभिनंदन !
अजूनही काही माबोकर धावलेत तिथेच इथे का लिहिनात कळे ना

धनि, तुझेही अभिनंदन रे

PRBM 2018 HM सब टू पूर्ण केली, सब टू म्हणून उगाच शाईन मारायचा प्रयत्न, 1:59:59 मध्ये झाली Lol
आत्ता पर्यंतचे माझे सगळ्यात बेस्ट timing
आता dec ची पुणे मॅरेथॉन झाली की 4 5 महिन्यांचा इव्हेंट संन्यास.

सही रे सिम्बा !!

हिम्या, शामली आणि सुन्याचेही अभिनंदन !!

२५ नोव्हेंबर ला पुण्यात झालेल्या पुणे अल्ट्रा मॅरेथॉन मधील ५० km कॅटेगरी ची अल्ट्रा रन ६:२५:४२ मध्ये पूर्ण केली. अल्ट्रा मॅरेथॉन ला २५किमी आणि ५०किमी ला कटऑफ वेळ होती २५किमी साठी कटऑफ ३:०५ होता तर ५०किमी साठी कटऑफ ६:३० होता. मला २५किमी कटऑफ साठी २:४३:३९ ऐवढा वेळ लागला. ५०किमी साठी ६:२५:४२ म्हणजे कटऑफ वेळेच्या जस्ट आधी पोहोचलो.

हि माझी पहिलीच अल्ट्रा तसेच फुल्ल मॅरेथॉन होती, ह्या पूर्वी सराव करताना जास्तीत जास्त अंतर हे ३८किमी पार केले होते. माबोकर "हेम" ह्यांचे अल्ट्रा रनिंग साठी खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

रन संपल्यावर आमच्या सौ नी टिपलेला हा फोटो.
Ultra Finish.jpg

ओह!! मध्यलोक म्हणजे विराग का! Happy अभिनंदन !
हाय मी इन्ना , पाषाण पूणे रनिंग च्या सेशन्स मधे अधून मधून डोकावणारी!
सगळ्या पळकुट्यांचे अभिनंदन! पळाते रहो!

धन्यवाद हर्पेन, सिम्बा, इन्ना आणि धनि

@हर्पेन
हेम पण भाग घेणार होता ना ह्या अल्ट्रा मधे? >> हो, हेम ७५km लाहोता, इंज्युरीमुळे ४२च्या जवळ DNF झाले
तुमच्या ६व्या मुंबई मॅरेथॉन साठी शुभेच्छा, तसेच आपण मुंबईला भेटू.

Pages