भाषा (२) : शब्दवेध व शब्दरंग

Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53

भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !

नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).

अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !

येऊद्या भाषेविषयी काहीही..

अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांना आवडेल असं कोकणगीत शोधून काढल्याचा आनंदच झाला. मलाही रामायणातील सीतेची आख्यायिका असावी असं वाटलं होतं. पण हे वेगळं निघालं.

हे दोन्ही माधव एकच आहेत का हीरा? हे गीतही सुरेख आहे.

बेसर पु ^१ संज्ञा पुं॰ [सं॰ बेसर] खच्चर । बेसर । उ॰—बसर ऊँठ बृषभ बहु जाती । चले वस्तु भरि अगनित भाँती ।—मानस, १ ।३० ।

बेसर पु ^२ संज्ञा स्त्री॰ [देश॰]

१. स्त्रियों का नाक में पहनने का एक आभूषण । उ॰—वेसर बनी बुद्धि की सजनी, मोती बचन सुधार हो ।—कबीर श॰,

खेचर सुद्धा आहे एक अर्थ.
#विकिपीडिया

छान.
....
अंकुरसाठी कोंभ, मोड, डीर हे परिचित समानार्थ.

आरवसा हा अजून एक पर्यायी शब्द समजला. >>> अरोसा.

अंकुरसाठी विरुढी हा शब्द ज्ञानेश्वरीत वापरला गेला आहे. आणि मला वाटते ह्या विरूढी वरूनच सुप्रसिद्ध बिरडे हा शब्द आला असावा.

तुझे ठायी माझी भक्ती
तुझे ठायी माझी भक्ती
विरुठावी गणपती
तुझे ठायी ज्याची प्रीती
त्याची घडावी संगती, संगती
त्याची घडावी संगती

इथे पण भक्ती रुजावी असा अर्थ असेल का ?

विरुठावी ?
(सं.) आर = अंकुर
(दाते शब्दकोश)
एवढाच संदर्भ कोशात मिळतोय

मेधा, हो. विरुठावी हे विरुढावीचेच रूप .
अश्वत्थमेनं सुविरूढ मूलं : हा अश्वत्थ दृढ रुजलेला (with strong roots)
Wisdom Library
https://www.wisdomlib.org › viruha
Viruha: 2 definitions
17-Aug-2021 — Viruha (विरुह) in Prakrit or Virūḍha in Sanskrit refers to sprouted puses or grains.

अश्वत्थमेनं सुविरूढ मूलं …

बनारस (आता काशी) ला एका विद्यालयाच्या फलकावर लिहिलेले होते हे .. त्यांच्या लोगोखाली !

चुना लावणे
याचे दोन अर्थ आहेत :
१. वाक्प्रचाराचा अर्थ माहित आहे.
२. दुसरा अर्थ दाते शब्दकोशात असा आहे :
एक मुलींचा खेळ.

हा खेळ कधी ऐकला नाही. काय असतो ?

साधर्म्य असलेले, एकाच अर्थाचे विविध भाषांतील शब्द -

तेलगू - गुसगुसलु
कन्नडा - गुसगुसु
तमिळ - कुसु कुसु
मराठी - कुजबूज
हिंदी - फुसफुसना
जपानी - कुसु कुसु

(तमिळ कुसु कुसुचा जास्त प्रसिद्ध अर्थ वेगळाच आहे.)

तन्वंगी
हा शब्द प्रथमच वाचला.

= सुंदरी; सुकुमार व सुंदर, बांधेसूद व सडपातळ स्त्री. [सं. तनु = कृश, नाजुक + अंग = शरीर]

रानभरी/रू
= इतरांपासून पळून जंगलात गेलेला माणूस किंवा जनावर ( हा मूळ अर्थ )

लाक्षणिक अर्थ :
१. बायको व मुलांना सोडून निघून गेलेला आणि भटकता पुरुष
२. पूर्ण गोंधळलेला किंवा भंजाळलेला

अडकून सीताराम
हा नवा वैशिष्ट्यपूर्ण शब्दप्रयोग ऐकला. अभिनेते हृषिकेश जोशी यांच्या लवकरच येऊ घातलेल्या चित्रपटाचे हे नाव आहे : ३ अडकून सीताराम.

त्याचा अर्थ खुद्द त्यांनीच असा सांगितलेला आहे :
विचित्र मनोरंजक परिस्थितीत अडकलेल्या माणसासाठी ही म्हण वापरली जाते.
https://www.loksatta.com/manoranjan/marathi-cinema/marathi-actor-and-dir...

अडकून सीताराम ?

शब्दाचे जनक स्वतः सोडून आणखी कुणी वापरतं का कुणास ठाऊक Happy

सुंदरी; सुकुमार व सुंदर, बांधेसूद व सडपातळ स्त्री. [सं. तनु = कृश, नाजुक + अंग = शरीर] >> मग तुंदिलतनू कसे काय म्हणतात? तिथे मला तरी तनू म्हणजे अंगकाठी / शरीरयष्टी अशा अर्थाने वापरलेला वाटतो.

तनु / तनू
1. (सं) स्त्री०तन = शरीर
२ वि ० नाजूक.
(शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

नाम/विशेषणानुसार दोन अर्थ.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%82

तनु + अंगी
तुंदिल + तनू

सचकार
= आगाऊ घेतलेली रक्कम.
सं. सत्यकार वरुन आलाय .

(विसार; इसार; बयाणा हे समानार्थी ).

Pages