भाषा (२) : शब्दवेध व शब्दरंग

Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53

भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !

नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).

अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !

येऊद्या भाषेविषयी काहीही..

अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी जन्माने वैष्णव आहे, माझ्या लहानपणी आईने सांगितले होते आपण उभ्या गंधाचे आहोत (घरी कोणीही लावत नाही तरी.) ऊर्ध्वपुण्ड्र म्हणजे उभे U आकाराचे गंध. उत्सुकता वाटून ऊर्ध्वपुण्ड्राची माहिती वाचली. शरीरावर याचा तिलक विष्णूच्या नावाचे लावतात. केशव:कपाळ , माधव: हृदय, नारायण : पोट इ. विष्णूला थंडावा देणाऱ्या गोष्टी प्रिय आहेत, म्हणून चंदन, तुळस, कापूर यांचा वापर करतात. ही वरवर व घरगुती माहिती आहे. इथं बघू शकतेस. Happy
https://en.m.wikipedia.org/wiki/Urdhva_Pundra

माझी मागच्या जन्मीची उजळणी झाली.

ओह म्हणजे खरंच नामा(/वा)चा संबंध आहे तर? पण नाव या अर्थाचा नाम शब्द नपुसकलिंगी, तर हा नाम पुल्लिंगी असतो.
(साखळीने?) नाम 'ओढला' असंही वाचल्याचं आठवतं.

लिंक बघते, धन्यवाद. Happy

>>> नाम 'अपौरुषेय' आहे नं
Happy
इन्टरेस्टिंग आहे ती लिंक. चाळताना विष्णूची पदचिन्हं या त्या Uच्या दोन बाजू (मग 'पद' न म्हणता 'नाम' का हा प्रश्न माझ्या डोक्यात नित्य वास करून असणार्‍या शंकासुराला पडतोच Proud ) आणि त्याच्या आतला लाल टिळा हे लक्ष्मीचं प्रतीक असं दिसलं - नीट डीटेल्स वाचते. धन्यवाद. Happy

मानव, शक्य आहे. Happy

धन्यवाद मानव. Happy
पण ठशालातरी नाम का म्हणतात हा प्रश्न उरतोच.

धन्यवाद मानवदादा. बघितले.
ठशाला ठसा म्हटलं तर कुठलाही ठसा वाटेल नं. Happy पण हा 'नामांकित' ठसा आहे. उदा. देवांच्या मूर्तींनाच 'विग्रह' म्हणतात. मूर्ती म्हटलं तर कुठलीही मूर्ती वाटेल म्हणून जास्त स्पेसिफिक कमी शब्दांत. शब्दसंपदा आहे आपली.
हा अंदाज आहे फक्त. आता बरेच शब्द प्रचलित नाहीत म्हणून कदाचित संदर्भ लक्षात येत नसावेत.

सेंलन

= अभिसरण (?)

वाक्य “सामाजिक सेंलन घडून आले” असे होते, त्यावरुन गेस:-)

नाम 'अपौरुषेय' आहे नं >> हो. पण अपौरुषेय म्हणजे लिंगनिरपेक्ष नाही. Happy

ओढला - हे मानव म्हणतात तसं आकार काढला/ओढला या अर्थाने असणार.

(जसं चिकवा धाग्यावर कोणीतरी 'मला वाळवी आवडला' असं म्हटलं होतं. वाळवी स्त्रीलिंगी आहे, पण इथे चित्रपट अध्याहृत आहे.)

होय , हर्पा Happy
म्हणूनच तर अवतरण चिन्ह देऊन विंक केलं.
आकार काढला/ओढला या अर्थाने असणार.>>>शक्य आहे.

सेंलन
>>> हे प्राचीन मराठी वाटतंय. बराच प्रयत्न केला शोधण्याचा.
शीलनशी काही संबंध असेल का ?
माहित नाही

मर्मर
हा शब्द असलेले हे वाक्य वाचले :

शांत समुद्राच्या लाटांची मंद मर्मर

दातेंनी मर्मरचा अर्थ
संगमरवरी दगड; आरसपान हा दिलेला आहे.
तो काही वरील वाक्यात बसत नाही.

मग तिथे 'मरत आलेल्या लाटा ' असा अर्थ घ्यायचा का ?
(मरमर)

इंग्रजी murmur दिसते आहे ही!
इथे 2a बघा.

अवांतर : संगमरवर हा फार्सी ‘संग-ए-मर्मर’चा मराठीत येताना झालेला अपभ्रंश आहे. फार्सीत संग म्हणजे दगड.

(एक बस तू ही नहीं मुझ से ख़फ़ा हो बैठा
मैं ने जो संग तराशा था ख़ुदा हो बैठा
- फ़रहत शहज़ाद)

अरे हो, खरच की !
(मला तशी पुसटशी शंका होती )
धन्यवाद !

‘संग-ए-मर्मर’ >>> मस्तच !!
..

स्टेथोस्कोपने ऐकू येणाऱ्या हृदयविकारातील विविध murmurs वैद्यकशास्त्रात प्रसिद्ध आहेत

संग-ए-मरमर

बरोबर.

पांढरा शुभ्र असला तर 'संग-ए-मरमर' आणि त्याहून दुर्मिळ काळ्या संगमरवराला 'संग-ए-मूसा' किंवा 'संगमूसा' म्हणतात फारसीत.

'मरमर' चा दुसरा एक अर्थ कातळातून झिरपणारे शुद्ध-स्वच्छ पाणी (हिंदी)

मराठीत आपण संगम + रवर असा उच्चारतो. हिंदीत संग + मर + मर.

किती ही मरमर शब्दांच्या अर्थासाठी Happy

मरमर Lol

संग-ए-मूसा >> हा शब्द माहीत नव्हता. याचा कुराणातल्या मूसा(बायबल मधील मोझेस)शी काही संबंध आहे का?

किती ही मरमर शब्दांच्या अर्थासाठी >>> Happy +११
पण आनंद देणारी !
..
इथल्या मरवरून..

die हे जेव्हा नाम म्हणून वापरले जाते त्याची गंमत या धाग्यावर लिहिली आहे :
https://www.maayboli.com/node/62893?page=15#comment-4917275

संग-ए-मर्मरमधल्या मर्मरचा अर्थ काय आहे? मलमल का? ' जब तेरे मर्मरी हाथों को छुआ था मैंने' वरून वाटलं. संग म्हणजे दगड ना?

@ वावे

मरमर आणि मलमल मध्ये काहीतरी संबंध असावा असे नेहेमी वाटते.
दोहोंचा कोमल हवाहवासा स्पर्श हे साम्य तर उघडच आहे Happy

.. सेंलन
>>> हे प्राचीन मराठी वाटतंय. बराच प्रयत्न केला शोधण्याचा....

मी पण.

शब्द जुन्या लेखातच वाचला. शब्दकोशात अर्थ दिलेला नाही दिसला. कुणी भाषाप्रेमी सांगू शकतील म्हणून इथे विचारले.

मरमर याचा पर्शियन अर्थ संगमरवरी.
संग ए मरमर म्हणजे संगमरवरी दगड.
हिंदी गाण्यातला मरमर हा मलमल असावा.
मूसाचा अर्थ काळा हे ही बरोबर अन त्याचा संबंध मोझेस शी हेही बरोबर.
मोझेस म्हणजे आग. आगीतून बाहेरपडून काळा पडलेला संगमरवर = काळा संगमरवर.
क्रेडिट: आमचे पर्शियनचे सर Happy

मरमर, मलमल यांचा संबंध मात्र तपासावा लागेल. शक्य आहे की संगमरवराचा गुळगुळीत, नितळपणा यातून असेल? -एक अंदाज फक्त!

Pages