भाषा (२) : शब्दवेध व शब्दरंग

Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53

भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !

नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).

अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !

येऊद्या भाषेविषयी काहीही..

अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

‘अरुवार’ (= कोमल; नाजुक; मृदु)
हा सुंदर शब्द इथे वाचला : https://www.aksharnama.com/client/article_detail/6839

"महानोरांच्या शब्दकळेचा उल्लेख ‘अरुवार’ या चपखल आणि लोभस शब्दात केला आहे".

याची व्युत्पत्ती कन्नड दिसते आहे :
अरळु = फूल (https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%...)
अरवार-ळ हा त्याचा अन्य एक पर्याय.

विधु : चंद्र :
भालचंद्र, कृष्णचंद्र, प्रेमचंद्र ( प्रेमचंद), क्षीणचंद्र, प्रफुल्लचंद्र, अर्धचंद्र, नवीनचंद्र, उत्तमचंद्र ( चंद), मधुचंद्र ह्यातील सगळ्या शब्दांचे समास एक नाहीत. कित्येक तत्पुरुष, कर्मधारय तत्पुरुष आहेत.

दुसऱ्या धाग्यावर या बातमीची लिंक बघितली.
<< पहिली म्हणजे काहीही इश्यू काहीही असो, आपल्या आईवडिलांसोबत आपण षीशशश्रू बोलू शकतो, शेअर करू शकतो आणि सारे मिळून चर्चेने तोडगा काढू शकतो, हा विश्वास मला तिच्या मनात निर्माण करायचाय. >>

षीशशश्रू म्हणजे काय?

महसूल विषयक मराठी लेखात नुकतेच वाचलेले काही शब्द :-

पोटखराब (!) हिस्सा
किर्द
ठरावबंद

आणि सर्वात मजेशीर-

“दवंडीचा उतारा”

दवंडी ३० वर्षात कुणी बघितली - ऐकली असेल असे वाटत नाही तरी हा दाखला अजूनही सर्रास न्यायालयात मागितला जातो आणि तलाठी गावात दवंडी देवून नोटिस दिली असल्याचा (खोटा) दाखला न्यायालयात सादर करतात म्हणे !!!

होय,
अरुवार/ अळुवार / हळूवार

लेखनकामाठी =
केवळ पैशांसाठी केलेले हलक्या प्रतीचें लेखन.
यातल्या
कामाठीचा अर्थ
झाडणें, बैठक घालणें वगैरे घरकामाकरितां ठेविलेला नोकर, असा आहे.

त्यावरून संयोग शब्द तयार झालेला दिसतो.

खिस्ती
हे आडनाव ऐकले होते. त्याचा अर्थ सावकार असा आहे.
गुजराती उगम.

सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. Prostitute, Hooker, Whore, Keep, Mistress, Slut असे चाळीस शब्द आपल्या नव्या हँडबुकमधून वगळले आहेत.

https://www.loksatta.com/desh-videsh/supreme-court-releases-its-handbook...

मजेशीर नाव आहे. रामफळ, सीताफळ, सीतेचा अशोक, सीतेचे पोहे, राम कुंड ... रामायणाने आपला भवताल असा सहज व्यापलेला आहे याची एरवी पटकन कल्पना येत नाही.

मजेशीर नाव आहे. >>> +१
सीता व कवडा यांची काहीतरी लोककथा आहे म्हणे. अधिक माहीत नाही.

मी तर नुकतेच 'हनुमानफळ' पण चाखले आहे, रामफळ आणि सीताफळ यांच्या मधला प्रकार Happy

जेजुरी भागात अनेक जागी याच नावाने विक्रीला होते.

गवत गुलाबी आणि सुरेख आहे. सीतेचा दिवाळीचा चिवडा चिरोट्यांसारखा दिसत असावा. Happy
हनुमानफळ व्वा.

वरची माहिती रोचक वाटल्याने सीता आणि कवड्याची लोककथा शोधली. ही श्रावणमासातल्या एखाद्या कहाणीसारखी वाटली.

शिताबाईच्या गोड हातचे पोहे जे काननी.
रागाने दे बाईलवेडा कवडा भिरकावूनी.
रोपे त्याची बनुनी पसरली नाचत चोहीकडे.
अजुनी पहा या मंडित त्यांनी कोकणचे हे सडे.
इतिहासाला वार्ता ज्याची श्रुत नाही जाहली.
दंतकथासही विस्मृती ज्याची होऊनिया राहिली.

या लोककथेचा उल्लेख कवी माधव यांच्या कोकणगीतात आलेला आढळतो.
संदर्भ -https://www.mymahanagar.com/featured/poha-plant-artical/115663/

@ अस्मिता.

सीता आणि कवड्याची लोककथा प्रथमच वाचली.

जय हो !

सीतेच्या पोह्यांना श्रावणातल्या आदित वाराच्या पत्रीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. शिवाय वाघाचे पंजे, वाघनखे अशाही वनस्पती असतात पत्रीमध्ये.

>>>>तो क्षीणही विधु, महोन्नती घे क्रमाने
जाणोनि हे, सुजन ज्या दुबळीक आली,
त्याची कधी न करिती सहसा टवाळी.

वाह वाह!!

>>>>>शिताबाईच्या गोड हातचे पोहे जे काननी.
रागाने दे बाईलवेडा कवडा भिरकावूनी.
रोपे त्याची बनुनी पसरली नाचत चोहीकडे.
अजुनी पहा या मंडित त्यांनी कोकणचे हे सडे.
इतिहासाला वार्ता ज्याची श्रुत नाही जाहली.
दंतकथासही विस्मृती ज्याची होऊनिया राहिली.

मस्त!

चस्का
हिन्दी शब्द आहे. पण खालच्या वाक्यात अगदी मस्त वाटतो :

‘मनाचे ऋतू सहा नव्हेत, तर कदाचित पत्त्याच्या कॅटसारखे बावन्न असावेत’ असे टागोरांना वाटते. कधी कशाचा चस्का लागेल ते सांगता येत नाही, म्हणून हा सगळा बाडबिस्तरा बरोबर घेऊनच हिंडतात.

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/6854

पोहे उडवून टाकल्यावर कवड्याला पश्चात्ताप झाला. अजूनही तो सीतेला साद घालीत फिरतो : ' ऊठ ग सीते, कवडा पोर पोर पोर!'

अस्मिता, गीत छानच आहे.
" हिरवे कोंकण हे नंदनवन इथे फुलांचे लाख सडे "
आणि हे दुसरे:
सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण
राष्ट्रदेविचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन!
हे कवी माधव केशव काटदरे ह्यांचे आहे.

सगळ्यांना आवडेल असं कोकणगीत शोधून काढल्याचा आनंदच झाला. मलाही रामायणातील सीतेची आख्यायिका असावी असं वाटलं होतं. पण हे वेगळं निघालं.

हे दोन्ही माधव एकच आहेत का हीरा? हे गीतही सुरेख आहे.

Pages