भाषा (२) : शब्दवेध व शब्दरंग

Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53

भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !

नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).

अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !

येऊद्या भाषेविषयी काहीही..

अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !
..
यातून निघालेला पुढचा मुद्दा.
या दोघांचे अर्थ असे दिले आहेत :
मलमल = Muslin, बारीक कापड.
मल / मखमाल = Velvet, एका बाजूस अगदीं नरम अशी दाट लव आहे असें उञ्ची वस्त्र.

दोन्ही एकच धरायचे की वेगळे ?
ढाक्याचे Muslin (इति गुगल )

मोझेस म्हणजे आग. आगीतून बाहेरपडून काळा पडलेला संगमरवर = काळा संगमरवर.
क्रेडिट: आमचे पर्शियनचे सर >> वा! धन्यवाद अवल. तुमचे आणि सरांचेही आभार.

मलमल अर्थातच जास्त तलम. सुती अगदी पांतळ अन मुलायम कापड. पूर्वी उत्तम मलमल कुठली? तर धोतराचे पान (एक धोतर) उलगडले अन अंगठीतून पार करता आले तर ते उत्तम मलमल मानले जाई. हीच
परीक्षा रेशमी कापडालाही वापरली जाई. पूर्ण साडी उलगडून अंगठीतून जाईल अशी रेशमी साडी उत्तम.

मखमल ही जाड असते. एका कापडाला विणीमधून वरच्या बाजूने दुसरे मउ, बारीक धागे वर आणलेले असतात. त्यामुळे त्याची जाडी वाढते, तलमपणा जातो परंतु वर येणारे धागे अतिशय नरम असतात म्हणून ती बाजू जास्त मऊ, सुखद असते.

मूसा/मोझेस कनेक्शन माहीत नव्हतं. धन्यवाद. Happy

मर्मर हा लॅटिन ‘मार्मोर’पासून (चमकदार/gleaming) झालेला ‘मार्बल’चा भाऊ दिसतो आहे.
Much of the early classical marble came from the 'Marmaris' sea above the Aegean असाही उल्लेख दिसतो आहे तिथे.

वावे, अवल
धन्यू .
एक धोतर) उलगडले अन अंगठीतून पार करता आले
छान !

सेंलनच्या जागी संमेलन वाचलं तर अर्थ बरोबर लागतोय का?
हा शब्द दोन ठिकाणी मिळाला. दोन्ही ठिकाणी संमेलन हवं असं वाटतंय.
१. छायाचित्राखालची पहिली ओळ.
२.
मराठी बालकुमार साहित्य सेंलन - सातवी ओळ

वाक्य “सामाजिक सेंलन घडून आले” असे होते, त्यावरुन अभिसरण असे वाटले.

संमेलन वरुन समारंभ किंवा मीटिंग सारखा बोध होतो आहे.

जनरल विचारलं. मराठी शब्दांचे अर्थ ऑनलाइन शब्दकोशात शोधता येतात तसे उर्दू शब्दांचे अर्थ शोधता येतात का ते हवंय.
रेख्तामध्ये मार्बल म्हणजे संग ए मरमर कळलं. पण उलट कसं शोधायचं?

आणखी एक नवीन शब्द वाचला.

आदकरणी

= आधी केलेली कृती, पूर्वीचे आचरण.

लेखातले वाक्य “तुमची आदकरणी बघता तुमच्यावर विश्वास कसा ठेवावा?” असे होते.

मला तरी आद्य + करणी अशी फोड वाटते

भरत, रेख्ता डिक्शनरीवर जाऊन उदा. रोमनमध्ये sang-e-marmar सर्च केलंत तर उलटही दाखवतो. देवनागरीतही शोधता येईल असंच.

आदकरणी > +१
[सं. आद्य + कृ; आदि + करणी.]
.........
गुणश्री (प्राध्यापक) हा शब्दप्रयोग अलीकडे वापरात आहे.
emeritus (professor) या अर्थी.

हडसभडस
एक मजेदार विशेषण.
" हडसभडस बसका चेहरा"

यातले 'हडस" हाडावरून आले आहे. = दणकट
(भडसचा मूळ अर्थ वेगळा आहे).

आता श्रावण / अधिक मास सुरु होईल आणि सुरु होईल धार्मिक अनुष्ठानांची लगबग. त्यात हमखास केळीचे खांब वापरतात. त्यासाठी

रंभाकंद

असा शब्द जुन्या मराठीत सापडतो.

स्री सौंदर्याचे वर्णन करतांना ‘केळीच्या खांबासारख्या मांड्या’ हे खूपदा येते. “रंभाकंद” मात्र आता हरवलय !

हरफनमौला = अष्टपैलू
हा शब्द एका मराठी लेखात वाचायला मिळाला (https://www.aksharnama.com/client/article_detail/6800) :

.... अर्थात ही हरफनमौला फकिरी पुरुषसत्ताक मक्तेदारी असलेल्या राजकीय पत्रकारितेच्या आखाड्यात करता आली, याचं समाधान खूप मोठं आहे.

भाषेच्या संबंधात एक शंका आहे.

एखादा शब्द जर पुल्लिंगी नाम असेल तर तो आपण स्त्रीसाठी किंवा निर्जीव वस्तूसाठी विशेषण म्हणून वापरू शकतो का ?

दिग्गज हे पुल्लिंगी नाम आहे. ते निर्जीव गोष्टीसाठी किंवा स्त्रीसाठी विशेषण म्हणून वापरता येते का ? तुमचे मत जाणून घेण्यास इच्छुक.

अच्छा. आलं लक्षात. माझ्या वरच्या उदाहरणात वाघ विशेषण झाला नाहीये, क्षमस्व.

दिग्गज कंपनी .. इथे दिग्गज हे विशेषण आहे, तर कंपनी दिग्गज आहे ... हे वरच्या वाघासारखे आहे.
बोलीभाषेत मजेत हे म्हणता येईल. पण वृत्तपत्रात नाही.

दिग्गज -
स्त्रियांसाठी विशेषण म्हणून वापरता येत नाही पण सुरुवात झाली तर आवडेल. एखाद्या सिनेमात अनेक दिग्गज अभिनेते/कलावंत आहेत असं आपण म्हणतो तेव्हा त्यातील सर्वांनाच गृहित धरतो.

Pages