Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53
भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !
नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).
अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !
येऊद्या भाषेविषयी काहीही..
अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उत्तम धागा
उत्तम धागा
माझे एक लहानसे योगदान
जौबन हा शब्द अनेक हिंदी गाण्यात येतो
म्हणजे यौवन!!!
जौबन >>> छान !
जौबन >>> छान !
आणि
जोबन = स्तन
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AF%E0%A5%8C%E0%A4%B5%E0%A4%A8)
चपराशी
चपराशी
या शब्दाबद्दल काही वाचले :
चपरास = कंबरेत बांधायचा पट्टा (हिन्दी/ पहाड़ी/ डोग्रा तीनही भाषेत सेम अर्थ)
वेशभूषेवरुन मग चपरास वापरणारा चपरासी आणि मराठीत “चपराशी” अशी व्युत्पत्ती.
कितपत विश्वसनीय आहे ?
एकदम विश्वसनीय.चपराशी-सी
एकदम विश्वसनीय.
चपराशी-सी
पु. चपरास (बिल्ला) धारण करणारा; जासूद; नोकर; शिपाई; दूत; हरकारा; पट्टेवाला; सरकारी शिपाई. [हिं.]
(दाते शब्दकोश)
अजून एक अपभ्रंश :
चपडास, चपडाशी
चपरास, चपराशी पहा. [सिं. चपिडासी]
“घोस्ट रायटर” साठी ‘पडलेखक’
“घोस्ट रायटर” साठी ‘पडलेखक’ हा शब्द इथे वाचला :
https://www.loksatta.com/sampadkiya/columns/information-about-david-kirk...
अन्य काही पर्याय हे सुचतात :
* क्रीतलेखक ( क्रीत = विकत घेतलेला)
* उपरा लेखक
अन्य काही ??
लोळपाट चा अर्थ ?
लोळपाट चा अर्थ ?
.. "लोळपाटलेला उंदीर.." असे वाचले.
गाळपेर
गाळपेर
जुन्या महसुली नोंदी वाचतांना आज 'गाळपेर जमीन' असे वाचले.
एरवी नदीपात्र / तलावातील पाण्याखाली असलेली जमीन पाणी आटल्यावर उघडी पडते, त्यात अनेकजण शेती करतात. हीच ती 'गाळपेर' जमीन.
पडलेखक !
पडलेखक !
हे नवीन आहे. चाकराला पडचाकर अशी म्हण ऐकली आहे
गाळपेर >> छान आहे.
गाळपेर >> छान आहे.
म्हणजे असे वाटले, की जो गाळ उरला आहे त्यात नव्याने पेरणे !
थारा = राहण्याची जागा
थारा = राहण्याची जागा
यावरून ..
दोन वैशिष्ट्यपूर्ण शब्द तयार झालेत :
१. थारेपालट = स्थलांतर
२. थाराथार = स्थिरता; स्तब्धता.
स्वच्छंद या शब्दाची
स्वच्छंद या शब्दाची व्युत्पत्ती काय?
की स्वछंद चे स्वच्छंद झाले?
संधी होताना र्हस्व स्वरापुढे
संधी होताना र्हस्व स्वरापुढे छ् हे व्यंजन आलास त्या छ् च्या आधी च् हे व्यंजन येऊन संधी होते.
स्व+छंद = स्वच्छंद
परिच्छेद, अनुच्छेद, शब्दच्छल, प्रच्छन्न .
आ हा दीर्घ स्वर असूनही आच्छादन
धन्यवाद भरत
धन्यवाद भरत
पक्ष्यांच्या बाबतीत 'रात्री
पक्ष्यांच्या बाबतीत 'रात्री राहण्याची जागा/ झाड' यासाठी 'रातथारा' हा शब्द वापरतात.
वितान = छत
वितान = छत
हा अपरिचित शब्द वाचला.
वि + तन्
अशी त्याची फोड आहे.
तन् =१. शरीर
२. तृण, गवत.
वितानमधील ‘तन्” वरीलपैकी कोणत्या अर्थाने असावा?
वितान शब्दात तन् धातु आहे,
वितान शब्दात तन् धातु आहे, ज्याचा अर्थ विस्तार करणे. तुम्ही पुढे जे शरीर आणि तण हे अर्थ दिले आहेत, तो तन धातु नाही, नाम आहे, आणि त्यात न चा पाय मोडलेला नको आहे.
ह पा समजले. धन्यवाद
ह पा
समजले. धन्यवाद
आज हे बघितले. आता “जेवन” आणि
आज हे बघितले. आता “जेवन” आणि “मेजवाणी” दोन्ही सवयीचे झाले आहेत नजरेला
पाटीवर नजर पडली की खटकते.
पाटीवर नजर पडली की खटकते.
नॉणव्हेज लिहिलं तर नाही खटकणार.
मानव
मानव
त्यांनी न-ण अक्षय्यतेचा
त्यांनी न-ण अक्षय्यतेचा सिद्धांत (लॉ ऑफ काँझर्वेशन ऑफ न अँड ण) पाळला आहे. त्यानुसार जगातले एकूण न आणि ण तेवढेच राहतात.
मानवदादा आणि हर्पा
मानवदादा आणि हर्पा
भारीच !
भारीच !
दुभोजक
दुभोजक
दिवसातून फक्त दोनदाच जेवणाऱ्यांसाठी हा शब्द आहे.
मटामध्ये वाचला
हा नवीनाय. दिवसात एकचदा
हा नवीनाय. दिवसात एकचदा जेवणार्याला “एकभुक्त” माहिती होता.
भोजक असा शब्द आहे का? मराठीत
भोजक असा शब्द आहे का? मराठीत / संस्कृत मध्ये?
भोजक वाचनात आलेला नाही कधी,
भोजक वाचनात आलेला नाही कधी, पण टेक्निकली चूक नसावा. भोजन, भोज्य, भोजक ही त्रिपुटी योग्य वाटते.
अनिंद्य म्हणतात तसा 'एकभुक्त' शब्द ऐकला आहे - मग दोनदा जेवणार्याला द्विभुक्तही म्हणायला हरकत नसावी.
.. भोजन, भोज्य, भोजक…
.. भोजन, भोज्य, भोजक…
त्रिपुटी ! सुंदर शब्द. हा शब्द बोधीकथांमधे अनेकदा वाचलाय.
“भुक्ती” हा पण असाच एक सुंदर शब्द आहे. (सुखोप)भोग याअर्थी.
आध्यात्मिक साहित्यात भुक्ती च्या विरुद्ध मुक्ती
भुज् धातु कसा चालतो हे हपा
भुज् धातु कसा चालतो हे हपा सांगतील या अपेक्षेत.
मानव
मानव
Pages