मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162
सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....
हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/
ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year
मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.
आपले म्हणजे तिचे कि तुमचे ?
आपले म्हणजे तिचे कि तुमचे ?
माय नेम इज शीला... शीला
माय नेम इज शीला... शीला केजवानी (चुकीची ऐकू आलेली गाणी) ... शीला की जवानी
बरोबर हरचंद.
बरोबर हरचंद.
my name is sheelaa, sheelaa
my name is sheelaa, sheelaa kejwani !
८/६८
८/६८
रामराव आणि शामराव घनिष्ट मित्र. 'आचमनाच्या' वेळी दोघांना एकमेकांची कंपनी लागे. पण गेले काही दिवस रामरावांना मुहुर्तच लागत नव्हता. सोमवारी त्यांच्या घरात भाचीचं केळवण होतं. तर मंगळवारी बंटीचा बर्थडे होता. बुधवारी सानिकेचा बॉयफ्रेंड अचानक घरी आल्याने रामराव शेपेरॉनगिरी करत घरातच थांबले. अखेर गुरूवारी त्यांना वेळ मिळाला आणि ते घाईघाईने शामरावांकडे निघाले. रस्त्याने जात असताना अचानक गावचा स्थानिक चोर भिकू भुरटे उडी मारून त्यांच्यासमोर आला आणि त्याने त्यांच्या पोटाला चाकू टेकवून त्यांना सगळे खिसे रिकामे करायला सांगितले. रामरावांनी निमूटपणे त्याला पँटच्या खिशातून फोन, पाकीट वगैरे काढून दिले. भिकूने त्यांना शर्टच्या खिशात काय आहे ते विचारले.
तेवढ्यात त्यांनी पाहिले तर समोरून शामराव त्यांच्याचकडे यायला निघाले होते. ते दुरूनच ओरडले "अहो रामराव, होता कुठे इतके दिवस? गेले तीन दिवस मी एकटाच बसतोय. म्हटलं खुशाली घेऊन येऊ."
तेवढ्यात भिकू दरडावतो, ए टकल्या, ऐकू नाही आलं का? शर्टच्या खिशात काय आहे सांग लवकर!
रामराव खिसा उघडून बघतात. मग ते दोघांनाही एकाच गाण्यात उत्तर देतात.
मोरोबा, क्लू लागेल अस वाटतय!
मोरोबा, क्लू लागेल अस वाटतय!
झिलमील किंवा श्रद्धा यांनी
झिलमील किंवा श्रद्धा यांनी क्लू मागितला म्हणजे कोडे चुकलेय
ये कली (खाली) जब (जेब)तलक फूल
ये कली (खाली) जब (जेब)तलक फूल (full)बन के खिले
इन्तज़ार, इन्तज़ार, इन्तज़ार करो, इन्तज़ार करो
long shot!!
ईचक दाना ईचक दाना दाने उपर
ईचक दाना ईचक दाना दाने उपर दाना
(चखणा म्हणून शेंगदाणे घेऊन जात होते)
longer shot
मेरे प्यार का रंग जरा चखणा
मेरे प्यार का रंग जरा चखणा
ओय मखणा, ओय मखणा (चीज क्यूब्स)
(Further longer shot)
क्लू 1 - @झिलमिल, 'जेब खाली'
क्लू 1 - @झिलमिल, 'जेब खाली' असतो हे बरोबर आहे (पण ते शब्द गाण्यात नाहीत)
क्लू 2 - रस्त्यात गाठून लुटणाऱ्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात?
क्लू 3 - पहिल्या ओळीत शामरावांना उत्तर दिले आहे आणि दुसऱ्या ओळीत भिकूला
क्लू २ - मगर
क्लू २ - मगर
८/६९
८/६९
एकदम शिंपळ कोडं.
एक मराठी माणूस कामानिमित्त उत्तर भारतात राहत असतो. त्याच्या बायकोला एक पदार्थ खाण्याचे डोहाळे लागलेले असतात. तो शहरभर फिरतो पण त्याला तो पदार्थ कुठेच मिळत नाही. शेवटी एका मराठी उपाहारगृहात त्याला तो पदार्थ मिळतो. तो घेऊन येत असताना त्याला एक बस उडवते. दोन तीन तासांनी तो शुद्धीवर येतो तेव्हा रात्र झालेली असते आणि सगळी दुकानं बंद झालेली असतात. तो दुःखी अंतःकरणाने घरी येतो. बायको त्याला 'आणला का पदार्थ?' असं विचारते तेव्हा तो हे गाणं म्हणतो.
८/६९ - वादा (वडा) तेरा वादा,
८/६९ - वादा (वडा) तेरा वादा, वादा तेरा वादा
वादे पे तेरे मारा गया बन्दा मैं सीधा साधा
माधव, चूक.
माधव, चूक.
८/६८ चे उत्तर -
८/६८ चे उत्तर -
(अहो रामराव, होता कुठे इतके दिवस?)
"रोज शाम अतिथी"
(शर्टच्या खिशात काय आहे सांग लवकर)
"Mugger, आय सी नथिंग"
8/69
8/69
बरेलीत असतात का ती दोघं?
'झुणका गिरा रे बरेली के बाजार मे' असणार.
आधीचं कोडं आत्ता पाहिलं. चांगलं होतं.
श्रद्धा, बरोबर.
श्रद्धा, बरोबर.
श्रद्धा आणि झिलमिल यांना क्लू
श्रद्धा आणि झिलमिल यांना क्लू देऊनही न येणारं कोडं घातल्याबद्दल मोरोबा यांना धोतरजोडी, शाल, टोपी, आणि ... हां हां, हे श्रीफल ... झालंच तर महावस्त्र देऊन जाहीर सत्कार करण्यात यावा.
तो हेल्थ वर्कर असतो. सतत
तो हेल्थ वर्कर असतो. सतत फ्लू, कोविड, डेंग्यू, डोळे येणे असले आजार सुरू असतात आणि लोक त्याच्याकडे येत असतात उपचारांसाठी. तो अशाच आजारांवर उपचार करत असतो. बोलताना थोडे मराठी आणि बहुत करून हिंदीत बोलण्याची त्याला सवय असते.
तर होते काय की हे आजार हळुहळू कमी कमी होत जातात आणि रोज येणाऱ्या रोग्यांमुळे दहा तास व्यग्र असणाऱ्या त्याचावर आता कधी एक दोनच रोगी तर कधी सलग काही दिवस कोणीच नाही अशी परिस्थिती स्थिती येते. त्याच्याकडे पैसा अडका तुंबाड असतो पण कोणी येत नसल्याने त्याला अजिबात करमत नाही. तर तो कोणते गाणे म्हणेल?
ओ साथी रे
ओ साथी रे
तेरे बिना भी क्या जीना
हे उत्तर जुळते आहे.
हे उत्तर जुळते आहे.
त्या रोगांना साथी संबोधतो हे बरोबर.
पण एकदम तुमच्या शिवाय जगण्यात काय अर्थ या पेक्षा जरा सौम्य करता आले तर बघा.
अर्थात हे उत्तरही ग्राह्य धरले आहे.
साथीया नही जाना के जी ना लगे
साथीया नही जाना के जी ना लगे
बरोबर माधव हेच माझ्या डोक्यात
बरोबर माधव हेच माझ्या डोक्यात होते.
८/७०
तो हेल्थ वर्कर असतो. सतत फ्लू, कोविड, डेंग्यू, डोळे येणे असले आजार सुरू असतात आणि लोक त्याच्याकडे येत असतात उपचारांसाठी. तो अशाच आजारांवर उपचार करत असतो. बोलताना थोडे मराठी आणि बहुत करून हिंदीत बोलण्याची त्याला सवय असते.
तर होते काय की हे आजार हळुहळू कमी कमी होत जातात आणि रोज येणाऱ्या रोग्यांमुळे दहा तास व्यग्र असणाऱ्या त्याचावर आता कधी एक दोनच रोगी तर कधी सलग काही दिवस कोणीच नाही अशी परिस्थिती स्थिती येते. त्याच्याकडे पैसा अडका तुंबाड असतो पण कोणी येत नसल्याने त्याला अजिबात करमत नाही. तर तो कोणते गाणे म्हणेल?
दोन उत्तरे अनुक्रमे वावे व माधव यांनी दिलेली:
१. ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जीना
२. साथी या, नहीं जाना के जी ना लगे.
मस्त होतं कोडं मानव.
मस्त होतं कोडं मानव.
मस्त कोडं, मानव.
मस्त कोडं, मानव.
८/७१:
८/७१:
ती दोघे मिसळ खायला गेली असतात. तिला बोलता येत नसते, पण ऐकू येत असते. ती त्याच्याशी मूक भाषेत संवाद साधते. तो सुद्धा कधी मूक भाषेत तर कधी तोंडाने बोलून संवाद साधतो. ऑर्डर देणे वगैरे काम तोच करत असतो.
मिसळ फारच झणझणीत असते. तिचे पाव संपतात आणि ती वेटरला अजून दोन पाव सांग असे त्याला सांगते. तो हो असे खुणावतो. जरा वेळ जातो. ती अजून एकदा सांगते, तो हो असे खुणावतो. पण वेटरला काही सांगत नाही.
थोडावेळ वाट पाहून ती चिडते तिला आणि त्याला रागाने परत एकदा मूक भाषेत सांगते. तो आधी घशात आग होतेय असे हाताने खुणावून मूक भाषेत तिला उत्तर देतो.
हा वरच्या परिच्छेदातला संवाद कुठल्या गाण्यात होतो ओळखा.
गाणं मूक भाषेत आहे का?
गाणं मूक भाषेत आहे का?
मराठी गाणे आहे. रेडिओवर
मराठी गाणे आहे. रेडिओवर लागायचे नेहमी. (मराठी कविता गायलेली).
यूट्यूबवर सापडले नाही, पण कुणीतरी पहिल्या दोन ओळी म्हणतंय असा व्हिडीओ आहे. गुगलवर सुद्धा पूर्ण गाणे नाही दिसले.
१९९०-२००० काळात रेडिओ ऐकणाऱ्यांना माहीत असावे.
मागे एकदा झाले, तसे हे गाणे
मागे एकदा झाले, तसे हे गाणे फारसे कुणी ऐकले नसावे असे वाटतेय. माहीत असल्यास आता पर्यंत कोणी ओळखले असते. उत्तर सांगु का?
---
तरी एक हिंट देऊन पहातो. पावसाळी - कविता - गाणे आहे.
एका शब्दाची फोड करून दोन शब्द करताना ती त्याला एक सौम्य शिवी देतेय रागाने असे कल्पले आहे.
Pages