चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

बाईपण रिव्युज लोल आहेत. भारतात बायकांना भयंकरच आवडलेला दिसतोय. युट्युबवर सगळीकडे ह्या वंगु, सुकु ह्या बायकांचेच इंटरव्युज दिसतायत आणि ३ दिवसांत ६ कोटीचा धंदा केलाय म्हणे.
मलाही झिम्माची निराशा आठवून हा बघायची हिंमत नाही.

ट्रेलरवरूनच अंदाज आला काय प्रकरण आहे. वरच्या एक्स्पर्ट कमेंटसने शिक्कामोर्तब झालंय नाही बघितला तरी चालेल Wink

दोन्ही भाषांची वाट Lol
मेथ कूट Rofl ब्रेबॅ .. तुफानी कोट्या सुचतात.

मेथ कुट Lol जबरी!
अमित चा पी भौ तू. कशाला असे पिकचर बघतोस आणि त्रास करुन घेतोस Lol

अमित Lol

मेथकूट मूळचं आहे काय! पण मग तो वाक्प्रचार मेतकूट जमणे तयार होईपर्यंत आधीच अपभ्रंश झाला होता काय? की तो वाक्प्रचार प्री - अपभ्रंश आहे?

ब्रेबॅ >> विनोद समजवावा लागणे यासारखी नामुष्की नाही; पण तरी याचा अर्थ विचारतो. ब्रेकिंग बॅड का?

हो ब्रेकिंग बॅड --> मेथॅम्फेडमीन --> (क्रिस्टल) मेथ --> मेथ कूट --> मेथॅम्फेडमीन चे क्रिस्टल कुटावे लागणे --> - श्री. नवनीत. Proud

>>> आधीच अपभ्रंश झाला होता काय? >> होय >>>> मग वाक्प्रचारात मेतकूट म्हणण्यात यावे. आय डिकलेअर द केस क्लोजड. Wink

अमित, फारच मेथॉडिकल लॉजिक आहे ते.

असू द्या हो हर्पा. कधीकधी जीव 'मेथाकुटीला' येतो, तेव्हा वापरू द्या. Wink माझा कॉपीराइट आहे लोकहो वापरायच्या आधी पुडी पोचती करा.

>>> जीव 'मेथाकुटीला' येतो, तेव्हा वापरू द्या
थँक्यू हं कधीकधी बरोबर शब्द वापरायच्या परवानगीसाठी शिफारस केल्याबद्दल. Proud

अस्मिता Lol

अमितव Lol
मला आवडला बाईपण भारी. एवढा काही वाईट नाही. Wink
वंदना गुप्ते ही अत्यंत कॉम्पिटिटिव्ह असते. सतत स्पर्धा करणे या सवयीमुळे ती मुलीच्या सासूशी या बाबतीतही स्पर्धा करायला जाते.
रोहिणी हट्टंगडीची मुलगी बहुतेक मृतजात असते. पण वंदना गुप्तेला त्याच वेळी मुलगी होते तेव्हा ती प्रेमाने बहिणीला आपल्या आनंदात सहभागी करून घेत नाही. (कदाचित वरच्या कारणानेच) म्हणून त्यांच्यात तणाव वाढत वाढत जातो.
बाकी तू लिहिलेले आणि अजूनही अनेक दोष आहेत. पण तरी आवडला मला. शिवाय यात सिद्धार्थ चांदेकरपण नाही. Lol

कोणी मिडीयम स्पायसी बद्दल लिहा Happy
माझा पाहून झालाय पण लिहायची एनर्जी ठेवण्याइतका बारकाईने पाहिला नाही.
ललित प्रभाकर ला मात्र बघा.त्यातल्या त्यात अंकुश चौधरी नंतर हाच.

झिम्मापेक्षा कितीतरी चांगला आहे. वंदना गुप्ते एकूणच ' मी बेस्ट ' अशी दाखवली आहे आणि ती सासूची एंट्री हा ट्रिगर आहे.
सुकन्या कुलकर्णी चे आणि तिच्या घरचे पण असे काही क्षणात परिवर्तन दाखवले नाहीये. ३/४ प्रसंग आहेत की.
दीपा परब काही त्या पैशातून सगळे लोन फेडणार नसते. लोन हा तिचा ट्रिगर आहे इतकंच.
बाकी शिल्पा नवलकर आणि सुचित्रा बांदेकरच्या कथा पण व्यवस्थित मांडल्या आहेत.
रोहिणी हट्टंगडीची पार्श्वभूमी, तिचे नवरा आणि कौन्सेलर बरोबरचे प्रसंग पण एकदम नेटके आहेत.
दारूचा प्रसंग अनावश्यक आहे हे बरोबर. रोहिणी हट्टंगडी खूप वयस्कर वाटते वंदना गुप्तेच्या मानाने हे पण बरोबर.

IMG-20230705-WA0001.jpg

Hi I took this picture but went to watch Indiana Jones an old love. But there were groups and groups of ladies taking selfies at this poster at 10 am on a Sunday. More crowds for Bai movie than Indiana movie. Ground report for maayboli Happy

Lol Lol Lol

हे भारीय अमा!!मला एकदम अंगुर मधला 'मूह मेरा धुलवाया, रिक्षा उसका लेके गये' डायलॉग आठवला.तो बाईपण भारी पिक्चर मनात हा डायलॉग मारत असेल Happy

अमा Lol

Lol

अमितव Lol
शेवटच्या पंच सह भारी लिहिलय

हाय अमितची पोस्ट एकदम भारी आहे. मला असल्या बायकी कुचंब णेचा काहीच अनुभव नाही त्यामुळे वंदना गुप्तें ची मुलाखत बघून पिक्चर बघायचे ठरिवले. पण चुकून व्हिविआना विआयपीचे तिकीट काढलेले ते शुक्रवार ३० चे झाले. नॉन कॅन्सलेबल. मला चुना लागला पण मराठी दिग्दर्शका ला फायदा मिळेल म्हणून पाणी सोडले. संध्याका ळी नीता भा बी कडे सतार बासरी ऐकायला जायचे होते. ह्याचा वृ एन मॅक धाग्यावर लिहिला आहे.

तर लेकीने पण आधी बाई बघू कबूल करुन मग इंडिआना ची तिकिटे काढली. तिच्या फोन वरून फोटो काढला व मला पाठिवला फोन वर
म्हणून फोन वरुन पोस्ट केला. मला काय फोन वरुन मराठी कसे लिहायचे कळत नाही म्हणून इंग्रजी लिहिली. स्वारी रघू. मला बघायचा आहे सिनेमा पण आता ओटी टीवर येइल तेव्हा त्या बायकांची ओटी भरण करू.

सिनेमात जे प्रॉब्लेम म्हणून दाखवले आहेत अ‍ॅज पर अमित पोस्ट ते काही मला प्रॉब्लेम वाटतच नाहीत. यु आर पिस्ड ओव्हर धिस!!! असे वाटले. चला जाते लेक मिडल ऑफ द वीकच घरी यायचे म्हटली म्हणूण आज घर झाडू पोच्छा करणॅ भाग आहे. रेस्ट्रूम साफ केली. कोतबो कोतबो. व हपिसात मरणाचॅ काम आहे.

अमेरिकेचा स्वातंत्र्य दीन म्हणून जुना पहिला इंडिपेंडन्स डे लावला आहे. ह्यातले प्रेसिडेंटचे भाषण फार गोड आहे. व अजून दोन हॉट आयटेम आहेत. एक शास्त्रद ज्ञ व एक पायलट. व एक बूमर नावाचा कुत्रा आहे. माझे ह्या पेक्षा फार मागणे नाही. माझा दिवसातून एक पिचर पण पाच मिनिटे बघून होत नाही. हपिसातून ग्राउंड रिपोर्ट लिहि ते. - मायबोली साठी.

श्री. नवनीत. Proud<<<

श्री. नवनीत, आपले '२१ अपेक्षित' लवकरात लवकर प्रकाशित करावेत. आमची ऑक्टोबर बॅच वाट पहातेय.. Lol

अमितव Rofl

मला बाईपणचं पोस्टर बघूनच तो बघावासा वाटला नव्हता. पण सो.मि.वर अनेकांनी तो आवडल्याचं सांगितलं... (तरी मी बघणार नव्हतेच)... पण तुझी पोस्ट वाचून बरं वाटलं. Biggrin

हे भारीय अमा!!मला एकदम अंगुर मधला 'मूह मेरा धुलवाया, रिक्षा उसका लेके गये' डायलॉग आठवला.तो बाईपण भारी पिक्चर मनात हा डायलॉग मारत असेल >>> Rofl

अरे काय हे… खूप दिवसांनी मी एक मराठी पिक्चर थिएटरला जाऊन बघणार होते. तुम्ही पिसंच काढली ना राव पिक्चरची

Pages