आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरत.. Lol
खरे तर आशुतोष ला मोकळेपणी हसायला, आनंद व्यक्त करायला काय प्रॉब्लेम आहे? तोही सदा अवघडल्यासारखा का असतो? कशाचे गिल्ट ?
अरुंधती चे आता जादाच सुरू आहे..टू मच ड्रामा!!

Lol
अवघडल्यासारखा का असतो?>>> कारण अरू. तिला यांऊ होतंय, तिला त्यांऊ होतंय, तिला आवडेल का?, तिला पटेल का?, तिला कसलंतरी दु:ख आहे, ती सुखी होईल का या चिंतेत असतो तो.

बाळंतपणात तिची स्वच्छता केली आणि भरवलं , ते ओझं आहे. >>>>>> खरच कान्चनने एवढ केलय अरुच? तिच्या आळशीपणाकडे बघूनतर नाही अस वाटत.

सप्तपदीला अरुच्या मनात आलं की आशु अन्यासारखा वागेल की काय. मग कशाला मनाने एकत्र येण्याचे दाखले देत होती ?

बाळंतपणात तिची स्वच्छता केली...
आं ? कोण लिहितं अशी मराठी ?
तिचे बाळंतपण केले...असे म्हणतात ना?
बाळंतपणात तिची स्वच्छता केली....हे विचित्र नाही वाटत?

कांचन कन्यादान करायला तयार झाली आणि अरू हसली ते पण मिनिटभरच. मग लगेच तिचा फोकस बदलला. तिला अनिरूद्ध दिसायला लागला. Uhoh याबाईला काहीही करून सुखी व्हायचेच नाही असे वाटते.
आता पुन्हा घरसोडून जाताना रडारड! आधीही अशी रडारड दाखवून झाली आहे.

मग लगेच तिचा फोकस बदलला. तिला अनिरूद्ध दिसायला लागला. >>>
अगदी अगदी!! तो अनिरुध्द पण त्या मंगळसूत्राच्या फ्रेम मध्ये येण्यासाठी अगदी मुद्दाम तिथपर्यंत चालत आला, मंगळसूत्र घालून झाल्यावर पुन्हा
आज्ञाधारकपणे आपापल्या जागेवर निघून गेला बापडा!

"याने आपल्या घराची रक्षा केली ."
संवाद लेखिकेची आई चुकीच्या मराठीवर पेपरात लेख लिहिते आणि मुलगी असे संवाद लिहिते.

अरुंधतीची आई लग्नात दूरच्या पाहुणी सारखी वाटली. कालच्या भागात एकही संवाद नाही.

सगळा फोकस कांचीवर.

रच्याकने, माप कसं ओलांडायचं हे अरुला माहीत नसेल का, इला भाटेने बळचं उजवा पाय वगैरे उपदेश केला.

वर्षाने काही दर्शन दिलं नाही शेवटपर्यंत.

भरत, हो माझ्या कानांना पण ती केलेली रक्षा खड्यासारखी टोचली. त्या कांचन मनधरणी प्रकरणाचा मला इतका वैताग आला होता की मी मधले ७/८ एपिसोड बघितलेच नाहीत, डायरेक्ट पाठवणी बघितली तर त्यात हे.

@ प्राजक्ता, अरु च्या सासुने ज्ञान वाटायचे असा प्रोटोकॉल दिसतोय. बाय द वे ज्यांनी पाठवणी केली तेच सगळं लटांबर अरु च्या आधी केळकर महालात हजर आणि आधीची कमी पडलित म्हणून त्यांनी केळकरांच्या घरातही नाचगाणी केली. तो सगळा प्रकार अगदीच काहीच्या काही होता.

"याने आपल्या घराची रक्षा केली ."..कुणी? मी मिसला वाटतं हा संवाद..!
मला त कांची ची मन धरणी अगदि बोअर व्हायला लागल्याने..मी असेच उडत उडत पाहीले.....
काय ते रडणे..काय त्या जुन्या आठवणी.......!!
आठवणींचा तर एक पीस तयारच आहे यांच्या कडे

आज पण टीपीच चालू होता. अने क हु़ंदके .. व इशा अनीश लव्ह स्टोरी अरू ला कळते. नवरदेव इतका उत्साही आहे की अजून टोपी व मुंडावळ्या तस्या च आहेत डोक्याला. इला भाटे परत गोड गोड बोलत आहेत. ही सासू कधी नखे दाखवेल कोण जाणॅ.

एक वेळ अशी येइलच की सर्व सण समारंभ संपवून लग्नाची एक बोअरिन्ग रिआलिटी सुरू होईल. नवरा बनियन अंडरपेंट मध्ये हात खाजवत एक कप चहा मागेल व बायको चा स्वयंपाक तोच तो होईल. इथे अजून अरुच्या हातच्या पोह्यांचे पण सोन्याचे पोहे बनवल्या सारखे कौतूक चालू आहे.

नित्या चिंगी वगिअरे फुकट खाउ लोक्स कधी टळणार व हनीमुन कुठे होईल? अरु वेस्टर्न ड्रेस घालेल का. थेट ऑस्कर मध्ये च गाणे गाईल का लाजत मुरडत असे प्रश्न आहेत.

आणि अरुंधती च्या भावाचे चिकट, लाचार संभाषण पुरे झाले आता...हात जोडून अरु साठी विनंती करणे...
!
ग्रो अप बडी!. अरुंधती ने हा नवरा पटकावला आहे....तो काही उपकार नाही करते लग्न करून तिच्याशी!

तो हात जोडून रडत आशुतोषला म्हणाला , ही धमकी समजा हवं तर.
अनिरुद्ध बहिणीला छळत होता, तेव्हा हा कुठे होता?

बहिणीनेही शपथ घातली असेल, तू मध्ये पडू नकोस.

सुधीरचे भाषण किती बळचं. सगळेच संवाद, नाच बेगडी.

त्यातल्या त्यात ईशाच्या मनातले भाव जरा खरे, की आईला भेटायला वेगळ्या घरात जावं लागेल वगैरे.

गौरीला २-३ भागांचेच पैसे दिले असल्याने लग्न लागल्या लागल्या ती गायबली. कोणाच्याही लक्षात आलं नाही.

अजून एक पोटेंशियल जोडी कोणाला दिसली का ह्या सगळ्या गोतावळ्यात ?

ममो, करेक्ट

कोणालाही एकटं सोडत नाहीत हे लोक. ईशाचा सो कॉल्ड बॉफ्रे गेला लगेच अनिश हजर. अरु पण काही महीनेच एकटी असेल.

अरुनेही तो शेला काही काढला नाही का मुंडावळ्या काढल्या नाहीत.

Lol येस्स .मलाही जाणवली...अविनाश आणि अनुष्का मधील जवळीक ..
म्हणजे...अर्थात..दिग्दर्शकानेच तसे आपल्याला कळावे असे पोर्ट्रे केले असणारे....!!
मग आता कोण सिंगल राहिलं...?
सुधीर साठी आश्रमातील कुणी आणतील !!
वीणा ला आणायचे बजेट नाही यांचे बहुतेक...!!!

पण अनुष्का आणि अविनाश यांच्यात वयाचा फरक किती असेल ? काही ही दाखवतील अर्थात ते

मला वाटलं होतं की अविनाश साठी अरु ची ती धुमकेतू मैत्रीण असेल पण तिला बहुतेक आता सगळे विसरले. अनुष्का आणि अविनाश मध्ये वयाच अंतर फार नसावं बहुदा. स्वरांगी मराठे लहान वाटत असली तरी अनुष्का ही आशु आणि नित्याची बालमैत्रीण आहे आणि अविनाश पण साधारण त्याच वयोगटातील असणं अपेक्षित आहे अनिरुद्ध पेक्षा वयाने लहान आणि अरु च्या बरोबरीचा, तिला घरकामात मदत करणारा असा उल्लेख होता मागे कधीतरी.

अर्रर्र ! काय बेकार लग्नसोहळा होता, त्यात चिडचिड्या दोन लोकाना समोर उभ केल होत, आशु ओठ दाबुन कसानुसा हसत होता, आरुला सगळ मागचच अजुन आठवत असल्याने रडत तोडक करुनच सगळ चालल होत..

सध्या अग्निहोत्र युट्युबवर बघत असल्यामुळे बहुधा सजेशन्स मध्ये ही मालिका दिसते. त्यात एका व्हिडियोच्या display photo मध्ये अरुंधती इतकं विचित्र हसते आहे. ते नवपरिणीतेचं लाजून हसणं वाटतच नाही. जुनी नवी दोन्ही पेन्शन स्कीम मिळवलेल्या पेन्शनरची विजयी मुद्रा वाटते.

शेवटी कसेबसे त्या दोघांना एकमेकांच्या गळ्यात हात घालताना दाखविले - तेही एकमेकांपासून दोन फूट अंतरावर बसून - अत्यंत ऑकवर्ड पणे - आणि रात्र उरकली! पण हे अन्याचे स्वप्न होते की वास्तव - हे दिग्दर्शक कदाचित तो स्वतः ही अत्यंत संकोची असल्याने - घोळातच ठेवले आहे.
संजना अगदी मस्त हासताना दाखवली अन्या दचकून उठतो तेव्हा.......छान अभिनय केला तिने!

अरे नेक्स्ट डे आशू बाळ म्हणते न की तु लवकरच उठलीस आपण तर पहाटॅ परेन्त गप्पा मारत बसलो होतो. किती गोड पहिले मनो मीलन होणार.
नव्या घरातील आरू ची साडी छान आहे आकाशी. सूर नवे शब्द नवे. व ती पहाटे खाली येते व हातात पाण्याचा तांब्या घेउन .........

....... तुळशी वृंदावन शोधते गं बाई.

ते दिसेना मह्टल्यावर तिला तंबोरा दिसतो. लगे च रियाज चालू.

शनिवारचा आचरटपणा. आधीच्या भागात दोघांना ऑकवर्ड वाटणं साहजिक होतं. अरुंधतीने ते फार ताणलं नाही. पण आशुतोषने पोरकटपणा केला - अनिश आणि नितीनला थांबवून.
झोपायला गेलेला अनिश पुन्हा (फोन घ्यायला ?) आला , त्याने या लोकांमधून धक्का लागेल इतक्या जवळून चालत जाऊन मान खाली घालून फोन शोधला आणि मग त्याला हे तिघे दिसले.
अरुंधती देशमुख पुराण सांगते आहे. प्रत्येकाला वेगळा नाश्ता लागतो. कोणाला हे तर कोणाला ते आवडत नाही. हे नखरे मुलांचेच अधिक असतील. तिनेच मुलांना नीट शिस्त लावली नाही. आणि ती सांगते तसं सकाळी तीन नाश्त्याचे पदार्थ दिसल्याचं आठवत नाही.

कपडे ठेवायला जागा नसणं पण जरा ओढून ताणून वाटतंय. अनिरुद्ध तिच्यासाठी साड्या घ्यायचा तर वेगळं कपाटही घेतलंच असेल. घर सोडून जाताना एकच बॅग होती तरी अरुंधतीकडे भरपूर साड्या असाव्यात. एकटी राहतानाच्या काळातल्या साड्याही व्यवस्थित होत्या.
--
त्याआधीच्या पाठवणीच्या भागात केदार सगळ्यांच्या वतीन गिफ्ट देतोय म्हटल्यावर पुन्हा एरंडेल चेहरा केला.
--
अप्पा यशला म्हणाले , आजची तुमची पिढी असं काय लग्नानंतरच केलं पाहिजे म्हणून शिल्लक ठेवता? What is he saying?

ते शंभो ऐकूनच अन्या उठला असावा. कभी खुशी कभी गम मधला सुबह सुबह शुरू हो गयी मडोना आठवले. मग डोळे उघडले तर अनीश व आशू बाळ भक्तीभावे ऐकत व कौतूक करत बसलेलेच असतात. मग घरी तुळस आणा यची तोड होते व रोज रोज रियज करायचा गं बाई अशी गळ घात्ली जाते. शेजारी बडवतील!!!

मग आज तुझ्या आव्डीचे तेच खाईन असे बाळ म्हणते. आता हिला आपल्याला काय खायला आव्डते ते माहीत नाही तर लाइफ पार्टनर आव्डतो असा शोध कूटुन तिला लागला असावा!! का लोकांनीभरीस घातले.

गौरी जाम पिळत आहे. अनघा पण तिला लग्न कर गं बाई अन ये इथे पोळ्या लाटयला असा संदेश देते.

Pages