Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00
आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरूचा upcoming डायलॉग- "मनाने
अरूचा upcoming डायलॉग- "मनाने आम्ही कधीच एकत्र आलो आहोत. " अगं कधी? एकमेकांकडे बावचळून गेल्यासारखे बघता. प्रेमबीम कधी झालं? तेवढा वेळच कुठे मिळाला देशमुखांची लफडी सांभाळताना? अरू-आशूचं रिलेशन बिल्डअप होताना दाखवायला हवं होतं पण ते महत्वाचं नसावं सिरियलवाल्यांसाठी कदाचित.
"मनाने आम्ही कधीच एकत्र आलो
"मनाने आम्ही कधीच एकत्र आलो आहोत. ".. नाही..
मनाने आम्ही कधीच एकमेकांचे झालो आहोत. ".... !!!!
खूपच धाडसी विधान आहे हे अरुंधती च्या मानाने...!!! आणि खूपच फोल!!
मंगळसूत्राचा तमाशा किती
मंगळसूत्राचा तमाशा किती बाळबोध, अप्पा म्हणतात आता अन्याने मंसू आणायचं अरुसाठी शिक्षा म्हणून. काहीच्या काही डायलॉग
लग्नाचा महा एपिसोड एखाद्या रविवारी करायचा असेल म्हणून दिवस काढणं चालू आहे.
म्हणतात आता अन्याने मंसू
म्हणतात आता अन्याने मंसू आणायचं अरुसाठी शिक्षा म्हणून>>> तो म्हणेल हो, मग ते मीच अरूला घालतो.
तो काही काम-धंदा नाही करत का? जेव्हा बघावे तेव्हा घरातच असतो. मग निदान त्याला सोफ्यावर पडून टिव्हीवरच्या रोजच्या मालिका बघताना तरी दाखवावे. जेणेकरून त्याच्या डोक्यात असे विचार का येतात ते लोकांना कळेल.
<<<मग निदान त्याला सोफ्यावर
<<<मग निदान त्याला सोफ्यावर पडून टिव्हीवरच्या रोजच्या मालिका बघताना तरी दाखवावे. जेणेकरून त्याच्या डोक्यात असे विचार का येतात ते लोकांना कळेल.>>>>
सोनाली ने सिक्सर मारलाय. एकटीच हसत बसले मी.
"पुढील भागात" मध्ये जे दाखवलं ते बघून मी वैतागून पाहिलाच नाही कालचा भाग. जाम बोर करताहेत हे लोक सध्या. आधी लग्न ठरवायला वर्ष घेतलं आता लावायला किती एपिसोड पिळतात काय माहित. प्राजक्ता म्हणाली तसा शेवटी एक महाएपिसोड: सगळे विधी आणि त्यावर सगळ्यांच्या चिडक्या/रडक्या प्रतिक्रिया दाखवणारा.
आजच्या भागात नव्या मंसु चे
आजच्या भागात नव्या मंसु चे तुकडे तुकडे झाले. ह्यांच्यात महागाच्या वस्तु लॉकर मध्ये टाकून कुलूप लावत नाहीत वाट्ते. मग जगप्रसिद्ध मनाने एकत्र ड्वायलोक. हे काही पुढे जाणार नाहीत. तिकडे अनुजची विबासंची तयरी पूर्ण पण झाली. सध्या अरु ला मुद्दाम अगदी साध्या साड्या दिल्या आहेत. अनिरुद्ध फारच रुद्ध झालेला आहे. संजनाचे पोपटी आरशावाले कानातले मस्त. पण वयानुरूप शोभात नाही. तिचे केस रंगवलेले पन अगदी कोरडे स्ट्रॉवाणी दिसता नाही का? फार पूर्वी कॉस्मोपोलिटन मासिकात हेअर सिरम ची जाहिरात यायची . त्यात असे एका बाजूला स्ट्रॉसारखे केस व एका बाजूला औषध लावले ले मौ सूत केस अशी जाहिरात असायची. त्याची आठव्ण येते. आजचा पुढचा भाग पार्ट एकदम मोहोब्बते सिनेमा सारखा होता.
वरपक्षाक डे वर अजून कपडे पन घेतलेले नाहीत. अनुश्का लोचट पणा करत तिथेच उभे राहून लाळ गाळत असते. खरेदी पण तीच कर णार
म्हण वर अगदीच निरुत्साही आहे. एकदा फेशिअल करून घेतले तर बरे होईल नाहीतर रिसेप्शन मध्ये तेल्कट तसेच. लग्नात बुंदीचे लाडू असतात ना पण म्हातारीने बेसनाचे केलेत. दुसृया लग्नात करत असतेल.
अरुच्या भावने लग्नाच्या
अरुच्या भावने लग्नाच्या खर्चासाठी पैसे दिले असता, अरुच्या आईविषयी आणि भावा विषयी कांचन किति वाईट बोलते . अरु कशी काय अशा बाईच्या मागे आई आई करत जाताना दाखवतात कळत नाही. अगदीच बिनडोक , कणाहीन पात्र रन्गवलेय
आज लग्नघरातला नवरदेव अशू
आज लग्नघरातला नवरदेव अशू लॅपटॅापमधे डोके घालून बसलाय, बरीच कामे आहेत म्हणे. एरवी अरूकडे जरा खूट्ट झाले कि हा रिकामटेकडा असल्यासारखा लगेच मदतीला धावून जायचा, दिवस-रात्र तिची काळजी करायचा, तिच्या घरच्या भटकलेल्या लोकांना स्वत: शोधायचा. आता तर नितीन सुद्धा कामे सोडून लग्न एंजॅाय करतोय तर याला कोणती कामे आहेत!
अरु कशी काय अशा बाईच्या मागे आई आई करत जाताना दाखवतात कळत नाही. >>+१
खरेच.. मलाही वाटले.. बेसनाचे
खरेच.. मलाही वाटले.. बेसनाचे लाडू कसे काय?... आणि नितीन ला अगदीच काही काम नाही ... वर्षा एकदा तरी दाखवा ना गडे!
आता काय करतील? तेच मं सू पुन्हा गाठवून आणतील का नवे घेतील ? अनुष्का चा ओव्हर डोस होतोय.
आम्ही मनाने कधीच एकत्र आलो
आम्ही मनाने कधीच एकत्र आलो आहोत. हे वाक्य फारच डेंजरस होतं.
भांडणाने 'फक्त प्रौढांसाठी' वळण घेतलं असतं. अनिरुद्धने याआधी अनेकदा तसा संशयही व्यक्त केला होता आणि पुरावे शोधायचे प्रयत्न केले होते.
त्याला बिचाऱ्याला काय माहीत की लग्नानंतरही तसं काही होण्याची शक्यता कमीच आहे.
तुला साधं मंगळसूत्र सांभाळता येत नाही, तू स़ंसार काय सांभाळणार?
स्वर्गात बाळ कोल्हटकर म्हणाले असतील " हीच माझी वारसदार"
(९ अक्षरांत बसवलं)
संवाद लेखिकेला घरी पाठवून तिच्या आईच्या हाती सूत्रे देण्याची तीव्र गरज आहे. आपण २०२३ सालात आहोत. हे लोक प्रेक्षकांना कोणत्या काळातले समजतात?
अरूंधतीच्या चेहऱ्यावरचे भाव
अरूंधतीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतच नाहीत. तिने त्यावर मेहनत घ्यायला हवी. ती जशी अशूकडे बघते तशीच कांचनकडे बघते.
अरूंधतीच्या चेहऱ्यावरचे भाव
अरूंधतीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतच नाहीत. तिने त्यावर मेहनत घ्यायला हवी. ती जशी अशूकडे बघते तशीच कांचनकडे बघते.>>> +१२३४
तो प्रॉब्लेम सगळ्याना आहे, रोंमॅटीक्,हळुवार अस काही कूणालाच जमत नाही.
खरं सांगायचं तर आता आशु बरा
खरं सांगायचं तर आता आशु बरा वाटायला लागला आहे. कशी बघते ती अरु त्याच्याकडे. मारुन मुटकून लग्न करते आहेस का? नाही ना. मग जरा आनंद दाखव कि चेहऱ्यावर. आणि एक्स नवर्याबद्दल इतके वेगेवेगळे फीलिंग्स असतील / भीती, हताश, निराशा, आणि इत्यादी तर मग नको करू ना लग्न. बस त्याच्यात लाथा आणि शिव्या खात.
जो माणुस तुझ्यासाठी इतकी वर्ष थांबला आहे, तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो आहे, हि नीड्स टु बी रिस्पेक्टड बेबी. अँड सो डज हिस फॅमिली.
अरुंधतीच्या चेहर्यावर
अरुंधतीच्या चेहर्यावर आशुतोषसाठी जे भाव यायला हवेत ते कांचनसाठी येतात. हळदीच्या आणि पुढे नवरी सजतानाच्या प्रसंगात बघा.
हो ना..त्यापेक्षा ईशा आणि
हो ना..त्यापेक्षा ईशा आणि गौरी ने छान भाव दाखवले..अनीश आणि यश ने हातात हात घेतला तेव्हा!!
ही आपली कायम भूत पहिल्यासारखी चकित + भय + गोंधळ असे भाव दाखवते.
She needs to really work on it..
कोणाबद्दल प्रेम वाटायला तो
कोणाबद्दल प्रेम वाटायला तो माणूस आवडायला लागत असावा. अरुंधती आशुतोषच्या उपकारांखाली दबलेली आहे. तिला दुसर्यांदा लग्न करायची भीती वाटते. आतातरी ते धड चालेल का आणि दुसरं पहिल्या लग्नातली नाती दुरावतील का .
दुसरं पहिल्या लग्नातली नाती
दुसरं पहिल्या लग्नातली नाती दुरावतील का>>> हे महत्वाचं आहे. बाकी लग्नानंतर आशु व त्याचे कुटुंबिय अरूच्या आईच्या आणि भावाच्या रांगेत जाऊन बसणार. कायम दुर्लक्षित.
देशमुखांना बाकी नातेवाईक
देशमुखांना बाकी नातेवाईक नव्हतेच कधी, केळकरांना पण नाहीयेत वाटतं.
इंस्टा वर ओम्कार गोवर्धनने लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. कांचीला समोर बसवून लग्न लावले आहे.
मधुराणीने अरुचा कणखरपणा आधी चांगला उभा केला होता, आता तिचा अभिनय मर्यादीत झाला आहे. गिल्ट आणि भिती. नवीन आयुष्याबद्दल काळजी वाटणं वेगळं, हिला तर सतत कांचीचं अप्रूव्हल हवं आहे. सगळ्यांनी सांगूनही ती अजून चेहरा पाडून.
अरुंधतीचा उखाणा -
अरुंधतीचा उखाणा -
सगळ्यांच्या संमतीने देते हात आशुतोषच्या हाती.
अरुंधती स्टॉक होम सिंड्रोम ची
अरुंधती स्टॉक होम सिंड्रोम ची बळी आहे. त्यानुसार तिला कांची चे approval लागणे योग्य वाटते
अरुधती लग्न सम्रुद्धी मधे
अरुधती लग्न सम्रुद्धी मधे लावण हे हिपोक्रेसी ऑन अदर लेव्हल आहे, त्यापेक्षा तिच्या घरीच करायचे ना सगळे सोहळे. ड्रामा क्रियेट करायला करत असतिल तर प्रेक्षकाना यातला फोलपणा,नाटक आधिच माहिती आहेत.
अनुपमा ओव्हर द टॉप आहे पण त्यात निदान अनुजच भरभरुन प्रेम, अनुपमा -अनुज मधली केमेस्ट्रि तरी जाणवते इथे हे दोघ मारुन मुटकुन लग्न करतायत असच वाटतय.
काल कान्चनचा आयमेकप किती ओव्हर होता?व्यक्तीरेखेप्रमाणे मेक्प करायला हवा ना?स्मोकी आयशॅडो अगदी ठळक दिसत होती.
अरुंधतीच्या चेहर्यावर
अरुंधतीच्या चेहर्यावर आशुतोषसाठी जे भाव यायला हवेत ते कांचनसाठी येतात. >>> म्हणूनच कांचन नाराज आहे. प्यार मुझसे और शादी उससे! भावनांचा तू भुकेला … सुरू झाल्यावर खूप हसू आले मला. स्वत:च्या हळदीला कोण असले गाणे गाते!!
सोनाली..:हाहा:प्यार मुझसे और
सोनाली..
प्यार मुझसे और शादी उससे!
खरेच...समृद्धी मध्ये लग्न लावायची काहीच गरज नव्हती! जादाची ड्रामेबाजी!!!
समृद्धी मध्ये लग्न लावायची
समृद्धी मध्ये लग्न लावायची काहीच गरज नव्हती!>>+१ अशू पण लगेच तयार झाला. असला कसला घरगुती बिल्डर अन गायक ज्याच्या लग्नाला बाहेरचे ४ लोक सोडा नात्यातले सुद्धा लोक नसणार.
निदान आशूच्या आईची आई
निदान आशूच्या आईची आई पुण्यात असते तिला तरी मागवायचे गाडी पाठवून. मी ते गाणे वगैरे फॉरवर्ड केले. ती आश्रमातली बाई पुढे हळ द लावायला. इथे तरी वरशा हवी होती चुडा भरायला. मी तरी संजनाच्या हातून बांगड्या भरून घेतल्या नसत्या. स्वाभिमान कसा तो नाहीच हिला.
गौरी गर्दी करत उभी आहे.
अमा...:हाहा: अगदी खरे!
अमा... अगदी खरे!
त्या आश्रमातल्या राठी बाईंनाच फुटेज दिलं..क्लोज अपवर क्लोजअप दाखवून!!
वर्षा ला अनुल्लेखाने मारतात.
उद्या बहुतेक अविनाश भाऊजी येणार.
देवीका ला कुठे विसरली लेखिका?
आणि गाणे अगदीच रडके, अप्रस्तुत होते. मीही फॉरवर्ड केले.
काय ते एकेकाचे चेहेरे आणि त्यावरील आर्त, हृदय पिळवटून टाकणारे भाव! लग्नाला जमले आहेत की मयतीला ते कळेना!!
हल्ली मुलगा गेल्यावर सुनेचं
हल्ली मुलगा गेल्यावर सुनेचं दुसरं लग्न सासू-सासरे लावून देतात पण ईथे वेगळी केस आहे.
अरुला एकदाही सख्ख्या आईकडे रहायला जाताना दाखवलं नाही. इतकचं काय अरुची आई, भाऊ रहात सुद्धा नाहीयेत लग्नासाठी, रोज डोंबिवली बोरीवली अप डाऊन. अरुचं घर आहेच की समृद्धीत नसेल रहायचं तर. गेला बाजार जावई मोठा बिल्डर, एक घर नाही मिळणार २ दिवस रहायला ?
वर्षाला लग्नाच्या दिवशी काय संकटामुळे गायब करणार हे बघायचं आता. वर्षा, सुधीरचा मुलगा , इरिटेटिंग मैत्रीण, गावचे मामा, अंघाचे आई वडील, आश्रमातला शिपाई, केदार कोणीच नाहीतर निदान विशाखाची मुलगी
वर्षाला लग्नाच्या दिवशी काय
वर्षाला लग्नाच्या दिवशी काय संकटामुळे गायब करणार हे बघायचं आता. वर्षा, सुधीरचा मुलगा , इरिटेटिंग मैत्रीण, गावचे मामा, अंघाचे आई वडील, आश्रमातला शिपाई, केदार कोणीच नाहीतर निदान विशाखाची मुलगी >>>>>>>> लग्नावर एवढा खर्च केला यांचा पर डे परवडणार नसेल
घटस्फोट झाल्या झाल्या
घटस्फोट झाल्या झाल्या अरुंधती आईकडे राहायला गेली होती. आश्रमाच्या ऑफिसमधली नोकरी करायला रोज डोंबिवली ते बोरिवली असा प्रवास करायची. मग लगेच भाड्याने घर घेतलं
<लग्नाला जमले आहेत की मयतीला ते कळेना!! > खरंय!
तीन जोड्यांचे हात हात घ्यायचे सीन होते त्यात थोबाड रडकं करायची स्पर्धा लागली होती.
अनीश ही हल्ली वात आणतो...तोच
अनीश ही हल्ली वात आणतो...तोच तो गणगणे चेहेरा!!
Pages