आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखिका मध्ये मध्ये समाजप्रबोधन , विशेषतः स्त्रियांस उपदेश मोड मध्ये जाते. संजनाने अरुंधतीला जे सांगितलं ते त्यातून आलं असेल.

त्यांच्या लग्नात नितीनच्या बायकोला जेवणाचे कंत्राट द्यायचे असे नितीन बोलला होता. तिकडे देशमूखांनी लग्न दारात आणि जेवण आठवल्यांकडून मागवायचे ठरवून सुद्धा टाकले.

सगळे व्याही भोजनाला/केळवणाला आल्यावर अशूतोषने अरूंधतीला शोधण्याचा अभिनय छान केला. अगदी प्रत्येकाकडे नीट बघून ती अरूंधती आहे का नाही याची खात्री करून घेतली.

<<<<<सगळे व्याही भोजनाला/केळवणाला आल्यावर अशूतोषने अरूंधतीला शोधण्याचा अभिनय छान केला. अगदी प्रत्येकाकडे नीट बघून ती अरूंधती आहे का नाही याची खात्री करून घेतली.>>>>

सोनाली हे वाचून इतकी वेड्या सारखी हसले ना मी, काय सांगू. १००% अचुक निरिक्षण. बाकी ह्या बाबतीत अरु -आशु हा समसमा संयोग आहे. त्या दिवशी रिक्षा ला धडकली तेव्हा तिने ही अगदी असाच नीट अभिनय केला होता आशुतोष च नाव स्लो मोशन मध्ये घेत. भरत नी लिहलय पण होत त्याबद्दल.

यश चोप्रा/करणं जोहर च्या पिक्चर्स मध्ये कस काही पात्रांना विनाकारण हिणवलं जाते निव्वळ ते हिरो किंवा हिरोईन नाहित म्हणून तसं काही स इथे हे लोक वर्षाबद्दल करतात. ती बिचारी अगदी जीवनमरणाची लढाई हाॅस्पिटल मध्ये लढत असताना तिचा नवरा अरु आशु च्या अल्बम का म्युझिक स्कुल मध्ये बिझी होता. आताही तिचं अस्तित्व फक्त तिच्या पाककौशल्यापुरत मर्यादित आहे. ज्या आशुतोष ला ती भाऊ मानते आणि त्याच्या आयुष्यात इतकी वर्षे तिला महत्वाचे स्थान आहे ती त्याच्या लग्नात कुठेच नाही सगळं फुटेज इशा यश आणि त्यांचे हौशै गवशे मित्र मैत्रिणी ह्यांना.

<सगळे व्याही भोजनाला/केळवणाला आल्यावर अशूतोषने अरूंधतीला शोधण्याचा अभिनय छान केला. अगदी प्रत्येकाकडे नीट बघून ती अरूंधती आहे का नाही याची खात्री करून घेतली> पाहिलं Lol
------
अनिरुद्ध स्वत:च्या दुसर्‍या लग्नाच्या वेळी पळून गेला होता आणि लपून बसला होता. अरुंधतीसुद्धा तसंच करेल अशी त्याला आशा आहे.
-----
संजनाने अरुंधतीला दिलेला सल्ला अस्थानी आहे. तिला स्वतःला किचनमध्ये कोंडून घ्यायला, सासूची सेवा करायला खूप आवडतं. तिने करियरच्या नावावर जे काही केलंय - दोन तीन गाणी, म्युझिक स्कूल, कॉलेजमधली स्पर्धा हे सगळं तिला मारून मुटकून घोड्यावर बसून करवून घेतलंय. कशाला, नकोच ते , मला कसं जमेल अशी टेप वाजवतच तिने ते केलं.
--
कॉलेजात आजकाल अ‍ॅब्सेंट राहण्यासाठी पत्र द्यायला लागतं का? आधी जशी काय ती रोजच कॉलेजात जायची. आणि रजिस्टर्ड लग्न करायचंय तर १० दिवस सुट्टी कशाला हवी? डिग्री कॉलेज सकाळचं असतं. सगळे कार्यक्रम दुपारनंतर ठेवता येतील. उगाच ही किती काय काय करते असं दाखवायचं. आश्रमात आणि म्युझिक स्कूलमध्ये पण रजेचा अर्ज देणार का?
-----
एवढ्या माणसांसाठी केलेला स्वैपाक पाहिला का? प्रत्येकाच्या वाटयाला एकेक डाव पदार्थ येईल.

अजब लग्नाची गजब कहाणी/अशूतोषने अरूंधतीला शोधण्याचा अभिनय छान केला./कशाला, नकोच ते , मला कसं जमेल अशी टेप वाजवतच तिने ते केलं./एवढ्या माणसांसाठी केलेला स्वैपाक पाहिला का? प्रत्येकाच्या वाटयाला एकेक डाव पदार्थ येईल>> धम्माल लिहिलंय सगळ्यांनी

सगळ्या पोस्ट वाचून करमणूक झाली.

सतत प्रो आणि अँटी अरु टीमने वाद घालणे आणि अप्पांनी कांचीचं मन वळवणं ह्याचा आता अतिरेक होतोय.

बापरे..पर्णका.. Biggrin एकटीच हसतेय मी. मुलीला सिरियल मध्ये काडीचे स्वारस्य नाही..तिला आशु अरु च माहिती नाहीत तर..त्या कॉलनी तील मुलं कुठे ठाऊक असायला!!! त्यामुळे तिला सांगूनही काही उपयोग नाही.........
धन्य आहे यांचं प्लॅनिंग

सगळे व्याही भोजनाला/केळवणाला आल्यावर अशूतोषने अरूंधतीला शोधण्याचा अभिनय छान केला. अगदी प्रत्येकाकडे नीट बघून ती अरूंधती आहे का नाही याची खात्री करून घेतली.>>> ह्हपुवा ! अगदी अगदी
आशुतोशचा गुलाबी कुडता छान आहे.
सगळे आले पण अरु आली नाही म्हणजे ती "ओ काची रे काची " करत तिची मनधरणि करायला गेली असणार.

आंबटगोड :). अति झालं आणि हासु आलं प्रकार आहे सगळा.

<<<कॉलेजात आजकाल अ‍ॅब्सेंट राहण्यासाठी पत्र द्यायला लागतं का?>>>
ह्यांच काॅलेज स्पेशल नाही का, तिथे एक विद्यार्थीनि आणि एक प्रोफेसर अशी दोघिंचीच स्पर्धा होते आणि बक्षीस दोघिंना विभागुन दिलं जातं! त्या ईशाच्या शाळेपासून अरुंधती च्या काॅलेज पर्यंत अरु सोबत असणार्या प्रिन्सिपॉल बाई बदलल्या. बहुतेक अरु -आशुच लग्न करण्याची वाट पहाता पहाता आधिच्या रिटायर्ड झाल्या असतील.
<<एवढ्या माणसांसाठी केलेला स्वैपाक पाहिला का? प्रत्येकाच्या वाटयाला एकेक डाव पदार्थ येईल>>

हा एकदम सिक्सर होता बरं का!

मस्तच लिहिलं आहे सगळ्यानी.
सिरीयल मधल्या पात्रांचे कपडे अगदीच सुमार असतात आणि तेच ते दोन कपडे घालतात पात्र आलटून पालटून.
ह्या सिरीयल मध्ये कपडे मात्र बरेच बरे दाखवले आहेत. आशुचे तर तेवढ्यातल्या तेवढ्यात दोन झब्बे दाखवले व्याही भोजना चे.

-) अरुंधती च्या साड्याही छान असतात..शिवाय संजना चे कपडे, अनुष्का चे कपडे छान असतात.
भरत...तुम्ही अगदी बारीक निरीक्षण केलं..स्वयंपाका च्या अंदाजाचं..
Biggrin
अनुष्का कशाला हवीय आता आणि?. अमा म्हणाल्या तसं..तिला हाकलून द्यावे आता ...
कुणालाही absent व्यक्तींची आठवण येत नाहिये..
कदाचित अविनाश भाऊजी सरप्राईज देतील ही एकदम येऊन...!! प्रेक्षकांनाही आणि अरुलाही...!!

बाय द वे..असे कोण केळवण करते...? नवरा नवरीला बसवून.... लग्नाआधीच?
केळवण आपण आप्तेष्ट करतो....नवरा मुलगा अथवा मुलीच्या कुटुंबाचे..
!!!

आंबटगोड हे लोक फक्त केळवण करुन थांबत नाहीत त्या आधी मुलीच्या आई वडिलांना ओवाळतात. ह्यांच्या प्रथा आपल्या आकलनाच्या पलिकडच्या आहेत.

Happy राईट!
आणि तसेही फक्त आशु अरु च जेवताना दाखविले..सो..तेव्हढा स्वयंपाक पुरला असावा!!
छकुली फार गोड आहे आणि चक्क छान अभिनय करते आहे....

तिने करियरच्या नावावर जे काही केलंय - दोन तीन गाणी, म्युझिक स्कूल, कॉलेजमधली स्पर्धा हे सगळं तिला मारून मुटकून घोड्यावर बसून करवून घेतलंय. कशाला, नकोच ते , मला कसं जमेल अशी टेप वाजवतच तिने ते केलं. >>>>>>एकदम बरोबर अचूक निरीक्षण , स ह म त

एवढ्या माणसांसाठी केलेला स्वैपाक पाहिला का? प्रत्येकाच्या वाटयाला एकेक डाव पदार्थ येईल. >>>>ते जेवतात तरी का ???? नॉर्मली सर्व सिरियल्स मध्ये पूर्ण भरल्या डायनींग टेबलवर काहीतरी वाद होऊन तडक उठून जायची प्रथा आहे , संस्कारी असतील तर ताटाला नमस्कार वैग्रे करून उठणे हे कॉमन

छकुली फार गोड आहे आणि चक्क छान अभिनय करते आहे... >>>>>> अगदी अगदी. बारश्याच्या वेळी अभिषेकच भाषण ऐकताना चक्क ती त्याच्याकडे रागाने बघत होती.

बाय द वे..असे कोण केळवण करते...? नवरा नवरीला बसवून.... लग्नाआधीच?>>> व्ह्याहीभोजन म्हणतात त्याला पण, तरी भावि वर-वधुला एकत्र बसवयाचि पद्धत नाही, आता चेन्जेस झाले असतिल.
अरुच्या उखाण्यानतर आशु तिच्याकडे प्रेमाएवजी कन्फ्युज असल्यासारखा बघत होता, आणी अरु नेहमिप्रमाणे प्रचन्ड अपराधी भाव घेवुन... दोघामधे केमेरस्ट्री तर सोडा भुगोल,इतिहास, समाजशास्त्राच्या वेटेज इतक सुद्धा काही नाही.
अरुची साडी छान होती.

अरु आणि आशुच नागरिक शास्त्र असं म्हणत जाऊ आपण आता. ते कसं शाळेत १० मार्कांपुरत असायचं तितपतच बाॅंड आहे ह्या दोघांमध्ये आणि तितकाच रुक्ष.

अरु आणि आशुच नागरिक शास्त्र असं म्हणत जाऊ आपण आता. ते कसं शाळेत १० मार्कांपुरत असायचं तितपतच बाॅंड आहे ह्या दोघांमध्ये आणि तितकाच रुक्ष.

नवीन Submitted by पर्णीका on 21 February, 2023 - 18:20 >>>>>बरोबर ...

हा बिनडोकपणा कधी संपणार आहे या बाबत कुणाला काही माहिती ? कि आता त्यांचा हनिमून वैगरे पण दाखवणार हे ??

हा बिनडोकपणा कधी संपणार आहे या बाबत कुणाला काही माहिती ? कि आता त्यांचा हनिमून वैगरे पण दाखवणार हे ?? >>>>>हि मालिका आनुपमा च्या आधी सुरु झाली होती व लोकडाऊन मुळे रखडली अनुपमा नंतर सुरु झाली आणि आता बरीच बरी पुढे गेली आहे दोन्ही सिरीयल बंगाली मालिकेवर बेस्ड आहेत। हिंदीमध्ये अनुज अनुपमा यांचा रोमान्स बराच जमलाय पण मराठीत पाणी कम चाय। पुढे भरपूर आहे पण हे लोक लग्नातच अडकले आहेत। तिकडे कलर्स , स्टार , सोनीवर एका एका कपल्स ची २/३ दा लग्न होण्याचा सोस पूर्ण होतोय (हिरोचा हिरोईनबरोबर , हिरोची याददाश्त जाऊन साईड हिरोईनबरोबर , हिरोईनला पळवून नेवून अजून कुठल्यातरी माणसाबरोबर , त्यांची दिलजमाई होऊन पुन्हा हिरोचे हिरोईनबरोबर ) यांचे एकाच लग्नात एवढे तमाशे। खूपच पोटेन्शियल आहे पण काय करणार ?

माझ्या घरचं कार्य असतं तर मी वेगळ्या ठिकाणी हॉल घेउन मजेत एंजॉ य करत मेहंदी संगीत केले असते. इथे बोट चेपे धोरन आहे. अरु सकट सर्वांना रोजच अनिरुध च्या शिव्या खायची सवय झाली आहे. ह्या स डू पब्लिक समोर कस्याला आनंद व्यक्त करायचा?! हॉल वर आशू आई पण आले असते. म्हातारी नाचली असती मुलाच्या संगीत मध्ये. चांदणी ओ मेरी चांदणी. अनुश्का नाचली असती.

अरूच्या आईला सिरियल सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच इतकेे डायलॉग्ज मिळाले असावेत. नाहीतर रडके किंवा भरून पावल्याचे एक्सप्रेशन्स देणे यापलिकडे काहीच नसतं बिचारीला. तेवढ्यासाठी अख्खा दिवस घालवावा लागत असणार.
अभिने हेयरकट केलाय. थोडा बरा दिसतोय असं वाटत असतानाच त्याने तोंड उघडलं. बॅक टू झिरो.
आशु-अरू जबरदस्तीने लग्न लावून दिल्याचे एक्सप्रेशन्स टिकवून आहेत. अनीशकडे काकाचा वारसा आहे. प्रेमातले कन्फ्यूज्ड तेलकट एक्सप्रेशन्स.

Lol भरत...
Stockholm syndrome चे उदाहरण आहे ती.

तो आशू सर्व काही आलबेल आहे किंवा मी प्रेमात आहे मी किती क्युट आहे असे दाखवताना कसे एक्स्प्रेशन देतो?! ओठ घट्ट मुडपून हसायचे व खळ्या पाड्याच्या. अरु काय अनुश्का सुद्धा लगेच प्रेमात पडत असणार. ( असा बिचार्‍या दिग्दर्शकाचा गैरसमज.) अभी न्हाव्या कडे जाउन आलेला आहे. गोरा पण दिसत होता. नवे लफडे चालू झाले असावे.

Pages