आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिशला आता पश्चताप होतोय .
"माझही तुझ्यावर प्रेम आहे आणि तु माझ्यासाठी जेजे केलस त्यासठी आदर ही आहे "
नक्की काय केलय तिने , साडी नेसले आणि पोहे बनवले ते का?

तिकडे अरू आणि ईकडे अनघा , पुस्तकी बोलून , प्रवचन देउन वात आणतायेत "रागः
मला फक्त संजना आणि ईशा नॅच्युरल वाटतात.

ह्या दोघी कमी म्हणून तो आशु एक चेकाळलाय . भारतीय ग्रुहीणी - तुम्ही बायका - किती बोलतो तो .

आज घ टस्फोटाच्या बातमीचा बॉम्ब फुटला एकदाचा. सर्व लोक्स खाली वर बसून काहीतरी टीपी करत होते व केदार पण पायजे पायजे असा लाडिक हट्ट करत होते. तेव्हा विशाखा निक्ष्हून सांगते तो येणार नाय म्हण जे नाय( गप्प बसा ) व उठून वर जाते. तिथे अरु येउन हळूवार पणा करत असते व मागून अप्पा पण येतात तेव्हा ती एकदम अरुला मिठी मारून रडू लाग ते. दोघांच्यातले प्रेम संपले आता अजून काय सांगू म्हणते. म्हणजे बाहेर लफडे आहे इतकेच नव्हे तर व्हिसा पण मंजूर झाला आहे केदार परदेशी नव्या पाखरा बरोबर चालला आहे. हे सर्व ऐकून खंग्री मॅन उत्साहित होउन दणा दणा मुझिक कुटू लागतो. त्यावरताण अप्पा इतके ओरडू लागतात की केदारच्या घरी पण कळेल, पण काम्चन काही वर जिना चढून येत नाही.

ह्या आधी संजना समजुतदार पदर घेउन नव्या जोडप्याला आहेराचे पाकी ट देते. ते उगीच नको नको करतात. खरे म्हणजे हॉलवर लग्न कार्य
उरकून आपापल्या स्वच्छ शांत घरी येउन झोपण्या सारखे सूख नाही. पण देशमुख्स ना कळत नाही.

होय फा, बरोबर आहे.
धागा शोधून काढला काल. म्हणून चुकून लिहिलं इथे लिहिलं गेलं, आता नवीन प्रतिसाद ही इथेच येतील की काय अशी भीती वाटत होती पण तस काही झाल नाहीये. नवीन प्रतिसाद भाग 3 वरच लिहिले गेले आहेत.

कोणी बघत नाही का ही शिरेल??
इशा-अनिष घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहेत. त्या इशाला बघून प्रचंड संताप येतो. काय उर्मट, आगाऊ मुलगी आहे. समोर असती तर खरच दोन वाजवल्या असत्या. एक इशा दुसरा तिचा मोठा भाऊ. डॉक्टर आहे ना तरी कायच्याकाय उद्योग करत असतो. आता वसुलीसाठी माणूस समृद्धीत आलेला. आईला पैसे दे म्हणे, ती नाही म्हणाली तर वाट्टेल तसा बोलला. यांना नक्की काय दाखवायचं? खरच आजकालची मुलं अशी वागतात का? कि यांना मुलांनी असं वागावं असं वाटतय?
काहे दिया परदेस चा हिरो आणत आहेत. अरूधंतीच्या बरोबर सिन दाखवत आहेत.

काहे दिया परदेस चा हिरो आणत आहेत. अरूधंतीच्या बरोबर सिन दाखवत आहेत. >>>>>>हो. तो तिला ताई म्हणतो. ह्याला आता थोडीफार मराठी यायला लागलीये.

सेम अनुपमाच्या लाईन वर चाललीये सीरियल.
अनुपमा अमेरिकेत शेफ चा किताब जिंकली ना..
म्हणून हिला पण इकडे स्पर्धेत उतरवणार

आज कळलं की कांची-अप्पांच्या लग्नाला ५५ वर्षे झाली आहेत. म्हणजे अन्या जास्तीत जास्त ५४ वर्षाचा. अभि किमान ३० हवा. डॉक्टरकी शिकून मग एक भलत्याच कोणाशी लग्न ह्या सगळ्यात किती वर्षे गेली पत्ता नाही. अन्याचाही बाल विवाह होता का अरुंधती सारखाच ?

FB वर एक मराठी सिरीयल ला वैतागलेली मंडळी ग्रुप आहे व्हिजिट करा तिथे अकुकाक च्या एपीवर किंवा सीन्सवर मस्त MEME बनवतात . इतरही सिरिअल्स वर मस्त पोस्ट असतात .

Pages