आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पापड बेलायला लागतात.

हे असे संवाद लिहिणाऱ्या आणि म्हणणाऱ्या़च्या टाळक्यात लाटणं घातलं पाहिजे.

पापड बेलायला लागतात.

हे असे संवाद लिहिणाऱ्या आणि म्हणणाऱ्या़च्या टाळक्यात लाटणं घातलं पाहिजे.

Submitted by भरत. on 29 June, 2023 - 10:56
>>>>>>>>>>>>हे कश्यासाठी होते ?

निखिलचं येणं सार्थकी लागतंय. अन्याने ढापलेला मोबाईल बाहेर पडणार बहुतेक.
वीणाचा ट्रॅक पार फसत चाललाय. इतके दिवस नवर्याने डांबून ठेवलेली अचानक पळून आली तिच डायरेक्ट बिझनेस थाटायला? ते पण अन्यासोबत? अधूनमधून आशूतोषला ईमेल करायची तेव्हा सांगता आलं नसेल? कमाल.

आशुतोषने अरुंधतीशी पुन्हा कट्टी केली.

चक्क नितीन अनिरुद्धच्या जाळ्यात सापडतोय.

बदललेला संवादलेखक कळतोय. आवंढ्याबरोबर शब्द शब्द गिळता येतात, पण भावना नाही.

अभिषेकला भूलतज्ञ कशाला केलं? दुसरी एखादी स्पेशलिटी द्यायची होती. आता घोळ घालत बसलेत.

वाईट नवर्‍याच्या तावडीतून सुटून आलेल्या वीणाने हवेतून बिझिनेस कसा निर्माण केला ते कधी सांगणार?

भरत.. Lol
ती लेखिका सोडून गेली ना..म्हणून सीरियल मध्येही अभिने तिचे हॉस्पिटल सोडले..
नावच नको तिचे !!!!
बाळाला वेळ देता यावा म्हणून अभिने स्वतंत्र प्रॅक्टिस करू नये असे अनघा ला वाटते !!
कमाल आहे !!
हेच दिवस आहेत ना धडाडीने काम करण्याचे?? काही.....

आशुतोष इतक्या हलक्या कानाचा कसा काय निघाला? नितीन ला..ऑफ ऑल पीपल, नितीनला...थोबाडीत ठेवून दिली?
काही दाखवतात!!!

मुळात नितिन निर्दोष आहे ह्याचा फैसला फार तर आशुच्या घरी / ऑफिसमधे होईल, समृद्धीमधे का होईल ?

<<<आशुतोष मंदच आहे.>>>>

कोण नाही त्यांच्या पैकी, चढाओढ सुरू असल्यासारखे सगळे बावळटपणा करत असतात.

<<<<मुळात नितिन निर्दोष आहे ह्याचा फैसला फार तर आशुच्या घरी / ऑफिसमधे होईल, समृद्धीमधे का होईल ?>>>>

असं कस कांचन आणि अप्पा हवेच सगळीकडे, भले त्यांना कशातल काही कळत नसे ना का. अभिचा प्रेमभंग, हॉस्पिटल मधील बिलामती, संजना ची अरुंधती विरुद्ध कारस्थाने आणि त्यावर बाकीच्यांचे तिच्या वर पलटवार, अनघाचे करियर मधले पुनरागमन, यशला सोडवण्यासाठीचे डावपेच सगळे सगळे घडताना कांचन आणि अप्पा तिथे हवेच. मध्यंतरी अरु अन्याच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायच्या तेव्हा बॅडमिंटन ची मॅच बघत असल्यासारखे अप्पा एकदा हिच्याकडे आणि एकदा त्याच्या कडे बघत बसायचे.

संजनाने कधीच अविचारसांगितले कि अन्याकडे दुसरा मोबाईल आहे. त्याने कपाटात लपवला होता. तिथे ही मला काही माहीत नाही म्हणून गेली. तो मोबाईल नितीनच्या केबीनमधे सापडला तरी ही गप्पच. आता निखिलने दुसरा पुरावापण शोधलाय पण सगळा तमाशा होईपर्यंत सगळे बघत बसतील.

आशुतोष इतक्या हलक्या कानाचा कसा काय निघाला?>>> अगदी
नंतर घरी गेल्यावर बोलतोय कि ती थोबाडीत त्याने शेयर्स मधे पैसे गमावले, घर गहाण टाकले, कर्जबाजारी झाला पण मला एका शब्दाने सांगितले नाही म्हणून दिली. पण अन्याने ते सगळं थोबाडीत मारल्यावर सांगितले.

एकदम घर गहाण टाकण्याएवढे पैसे शेअर मार्केटमध्ये गमावले म्हणजे अदाणीचे शेअर्स कर्ज काढून घेतले होते का?

तो दिवसभर अशूबरोबर असतो, त्याची सगळी कामे करतो शिवाय त्याचा बहीणीच्या कारभारावर लक्ष ठेवतो. अन्यावरही लक्ष ठेवतो. त्याला हे बाकीचे उद्योग करायला वेळ कसा मिळतो काय माहीत!

आशुतोष अचानक बदलला. एवढ्यातेवढ्यावरून कट्टी करायला लागला. चक्क थोबाडीत मारू लागला. सॉरी तोंडाने बोलायची गरज नाही, असं म्हणून लागला.
नितीनची पण कमाल आहे. आशुतोषने सॉरी म्हणायच्या आधीच त्याच्या घरी गेला आणि वर कॉफी केली.

आशुतोषची नितीनशी कट्टी झाली त्याच्या दुसर्‍या दिवशी तो हे विसरून ऑफिसला निघाला. मग नितीन येणार नाही, हे कळल्यावर बेत रद्द कारण नितीनशिवाय त्याला नाहीच काम करता येत नाही . आप ली बहीण तिचे प्रॉब्लेम आपल्याला सांगत नाही, बायकोही सांगत नाही आणि आता मित्रही सांगत नाही यावरून त्याने समजून जायला हवं की यांच्या दृष्टीने आपण कुचकामी आहोत; आणि हे खरंच आहे.

नवीन संवादलेखक वि स खांडेकर स्कूलचे आहेत. ऊठसूट सुभाषित , तत्त्वज्ञान पेरतात.

आजचे उठाबश्या काढून प्रियाराधन तद्दन विनोदी होते. सातवीतली पोरे पण बरे कर तात. ह्याला दुसरी आईच हवी आहे. उद्या अन्याला वीणा डच्चू देणार. संजनाला अन्याची किळस येउ लागली आहे म्हणे. अरे एका बाईचा संसार उध्वस्त करुन ति ला हाकलवून लावले व आता अक्कल आली!! अनघा पण नेह मी पर्माणे नवृया विरुद्ध कारवाया करत आहे. ही त्याच्या बरोबर फिरायला जायला कायम नकार का देते?! आता तर पोर ही झाले आहे. इशाचे लग्न धोक्यात कार ण " हे" आहे.

रुसवा काढण्यासाठी हे लोक उठसूठ उठाबशा काय काढत असतात? आणि अरुंधती ने पण मागचाच कावराबावरा डायलॉग मारला.

आणि उठबाशा तरी कसल्या !! तो फक्त गुडघ्यातून वाकत होता...अगदीच बेंगरुळ ध्यान दिसतं....
आणि पडायची ॲक्टिंग तर अगदीच बोगस..!!! सगळीकडे मातीच खायची असे ठरविले आहे त्याने !
अरुंधती ची हेअर स्टाईल आणि कपडेपट बदला म्हणा आता जरा...
ड्रेस घालायला काय हरकत आहे?

रुसवा काढण्यासाठी हे लोक उठसूठ उठाबशा काय काढत असतात? आणि अरुंधती ने पण मागचाच कावराबावरा डायलॉग मारला.>>> याच्यात नसलेल्या केमेस्ट्रिने सगळच भयकर बोअर होत.... अनुपमा अजुन एक लेव्हल इरीटेटिन्ग असली तरी किमान तिच्यात आणी अनुज मधल नात तरी खर वाटत...

ईशा आणि अनिश पहिल्यांदा दहीहंडीच्या वेळी भेटले ना? मग सहाच महिने कसे झाले?

आजचे सुविचार - जो चुकत नाही त्याला देव म्हणतात.
बिझिनेस हे प्रोफेशन नाही, वृत्ती आहे.

आणखीपण काय काय होतं

वीणाची कंपनी होती की पार्टनरशिप फर्म? पार्टनरला एकतर्फी काढता येत नाही.

अरुंधतीपण बिझिनेसवुमन झाली. कॉलेज आणि म्युझिक स्कूल दोन्हीकडे प्रॉक्सी लावलेत?

भरत.. Lol
हो ना.. सगळा बिझिनेस म्हणे अरुंधती आशुतोष केलकर हिच्या नावे करून देते आहे...काही.
यांना डॉक्युमेंटेशन, नोटीस पिरेड, पेनल्टी, व्हॅल्यूएशन, हॅण्ड ओव्हर...काहीच शब्द माहिती नाहीत का?
आणि ईशा अनीश केव्हा भेटले..हे आपल्याला जास्ती चांगलं आठवते आहे....!!!
आता अनिरुध्द लग्नाला का नाही म्हणायलाय?
सारखं आपलं स्वतः च फोकस मध्ये राहणं !!!!
आशू ला फुटेज द्या की....

आता अनिरुध्द लग्नाला का नाही म्हणायलाय?>> त्याला कंपनीतून काढले ना म्हणून.
पण एव्हढे सगळे केल्यावर सुद्धा घरातली लोकं त्याच्या बोलण्याकडे कसे काय लक्ष देतात. एक अन्या सोडला तर बाकी सगळे लग्नाला तयार असताना आपले लग्न होणारच नाही असे तिला वाटते. म्हणून इशा लगेच नेहमीप्रमाणे जीव द्यायला निघाली आहे. ती एकटी असताना गुपचूप मरायचा प्लॅन कधीच करत नाही. कोणीतरी तिला अडवायला असेल ते बघून करते. मालिका आता हिंसक झाली आहे.. जो तो कानाखाली देतो आणि मग तत्वज्ञान पाजळतो.

Happy हो ना..
विशेषत: अरुंधती !
सटासट कानाखाली देण्यात वस्ताद झाली आहे...!

डॉक्टरने यशला झोपेच्या गोळ्या कशासाठी दिल्या होत्या ते आता कळलं Lol

कांचन अनिरुद्धच्या कानाखाली वाजवेल का?

संजनाला अन्याची किळस येउ लागली आहे म्हणे. अरे एका बाईचा संसार उध्वस्त करुन ति ला हाकलवून लावले व आता अक्कल आली!! >>>>>>त्यात तिची एकटीचीच चूक कशी? अन्यासुद्दा तेवढाच जबाबदार आहे.

अनघा पण नेह मी पर्माणे नवृया विरुद्ध कारवाया करत आहे. ही त्याच्या बरोबर फिरायला जायला कायम नकार का देते?! >>>>>>> बरोबर वागते ती. अभी डिझर्वज इट!!!

अगदीच पकाऊ एपिसोड.

नितीन सकाळीच देशमुखांच्या घरी.

अनीशची दया येऊ लागली आहे.

आपण घर सोडून जातोय हे याहीवेळी वीणा आपल्या नातलगांना धड सांगत नाही.

Pages