Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00
आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आई मुलगी सासू सून बनणार तर.
आई मुलगी सासू सून बनणार तर.
आई मुलगी सासू सून बनणार तर.….
आई मुलगी सासू सून बनणार तर.…..>> मला आधी कळेना आई मुलगी आणि सासू सून कशी होणार
आत्ताच ते एकमेकांना ILU बोलले. लगेच त्यांना ओरडा बसला. मग लगेच पळून लग्न! २ दिवसात मालिका संपवणार आहेत का?
आज अरु अॅक्टिन्ग लाइक हे
आज अरु अॅक्टिन्ग लाइक हे बरोबर नाही. अगं बाई तू काय कर्तेस तुझा एक्स काय कर्तो. मग मुलगी तर वयात आहे. >>>>>>>> अगदी अगदी. मारली मिठी तर काय बिघडल? ईशाने प्रेमप्रकरणे केलेली कोणालाच पचत नाही. ना अनिरुद्दला ना अरुला. देशमुखान्च्या पुरुषान्नी/ मुलान्नी कितीही बायका/ गर्लफ्रेण्डस बदलल्या तरी चालत. पण ईशा म्हणजे त्यान्च्यासाठी अजून टिन एजरच ना. तिकडे यश- गौरीने गौरीच्या घरी काय प्रताप केले ते अरुला माहित तरी आहे का?
हिच्या मते ईशाने नेहमीच सोवळे राहावे. उगाच ईशा नव्हती म्हणत ओव्हरडोमिनेटेड हिला काल.
नाही..मला नाही वाटत..लग्न
नाही..मला नाही वाटत..लग्न करतील. जस्ट तसे बोलतात आहेत
नाही..मला नाही वाटत..लग्न
नाही..मला नाही वाटत..लग्न करतील.>> अनुपमा मध्ये आहे. मुल गी मुला बरोबर सापडते रिजॉर्ट मध्ये लगे च मोठा ड्रामा व ते दोघे लग्न करुन येतात.
अरु बाहेरुन आली तरी नथ दागिने से ट तसाच. यश ला अपघात ? मग हॉस्पिटल मध्ये अरु चोविसतास. माझी मुल माही मुले. करत. हनिमोर इन मसुरी बाजूलच राहिला. आशु वैता गून अनुश्काला फोन करुन बोलवणार. तीच खरी सुटेबल होती पर इसकी किसमत बैंगन की है. आशूची आई पण सुट्टीवर गेल्याली दिसते लग्न लावुन.
बैंगन हा हैद्राबादी
बैंगन हा हैद्राबादी वाक्प्रचार आहे.
अरुंधती ला अतींद्रिय शक्ती
अरुंधती ला अतींद्रिय शक्ती अवगत आहेत. ती दिव्य चक्षू नी जगभरात कुठेही काय चालू आहे ते लाईव्ह पाहू शकते!!
म्हणून तिला यशचा अपघात दिसला.
बिचारा आशुतोष!
फुकटची तीन तीन मुलांची जबाबदारी आली..
क्या करे...इसकी किसमत बैंगन ही है....
आणि चिकट गूळ म्हातारीला एका रात्रीतून गायब केलं....!! यांना प्रायव्हसी मिळावी म्हणून!!
पण त्यांना गरज आहे का?
पण त्यांना गरज आहे का?>>
पण त्यांना गरज आहे का?>> त्यांचं विशुद्ध प्रेम आहे. मनो मीलन वगैरे वर भर आहे. त्याने तर तिचे पायच धरलेले दुसर्या दिवशी. चांगलं आहे चांगलं आहे. नवरा विषय सुखाच्या मागे धावला तर पत्नी विशुद्ध प्रेमाचे समर्थन करत आहे. मुलीची ही तिसरी केस. दिराचा डिवोर्स नो किड्स नणंद चा नवरा दारुडा, मोठ्या मुलाने एक साइड अफेअर केले आधीच त्या आधी लग्न मोडले , यश ऑलमोस्ट लिव्हि इन विथ नो रिस्क. क्या करते क्याकी. बैंगन के संस्कारा.
नवरा विषय सुखाच्या मागे धावला
नवरा विषय सुखाच्या मागे धावला तर पत्नी विशुद्ध प्रेमाचे समर्थन करत आहे. >>>>>> कसल काय विषयसुख? तोही तिच्याच बाजूने आहे. तिच्यासारखाच विचार करतो. मोहाचे क्षण? सिरियसली? अरुने लग्नाआधी आशुतोषला मिठी मारली होती तेव्हा आठवले नाही का ह्यान्ना हे हिट ऑफ मोमेण्ट? अरु हे सगळ इशाला शान्तपणे सुद्दा समजावू शकली असती. पण नाही, फक्त तमाशा करायचा असतो ह्यान्ना.
ईशा पण तसलीच. पळून जाऊन लग्न करुया म्हणे! इतक सोप्प वाटत का तिला? खाणार काय मग लग्नानन्तर?
यश ला अपघात ? >>>>>> यशला नीट बाईक चालवता येत नाही का? जेव्हा बघाव तेव्हा गौरीचा विचार चाललेला असतो ह्याच्या डोक्यात?
बिचारा आशुतोष!
फुकटची तीन तीन मुलांची जबाबदारी आली >>>>>>> नैतर काय. म्हणूनच तिकडे अनुज वैतागून अनुपमाला घटस्फोट दयायला निघालाय.
यशला अपघात झाला नसेल. उगाच
यशला अपघात झाला नसेल. उगाच ड्रामा वाढवायला तसं सजेस्ट करत असतील.
स्टार प्रवाहच्या फेसबुक पेजवरून हे लग्न बर्याच प्रेक्षकांना पचलं नाहीए. काहींना थाटामाटात , देशमुखांच्या घरात लग्न लावणं पटलं नाहीए.
इशा. गौरी प्रकरणे बळेच घडवलीत. गौरी घरून निघेपर्यंत ठीक होती. मग अचानक विमानतळावर तिला अंगठी परत करावीशी वाटली.
यशची रिअॅक्शनपण तो या सगळ्याची अपेक्षा ठेवून होता, उलट बरं झालं आता त्रिशंकू अवस्था नाहअशी, अशी.
अरुंधती नटून थटून पाडवा करायला आली आणि सगळ्यांदेखत यशला (ती नेहमी लावते तसा कोणीतरी मेल्याच्या सुरात) कसा आहेस विचारलं. आधी साड्या, दागिने कशाला कशाला करत आता मस्त वापरतेय सगळं.
अभिषेकचं मन जसं काही कारण नसताना आणि चमत्कार झाल्यासारखं धुवून निघालं तसं ईशाच्या डोक्यात उगाचे हे खूळ घुसलेलं दाखवलंय.
अनिशने सुद्धा गौरीने अंगठी परत केल्याचं तिला ब्रेकिंग न्युज सारखं लगेच कळवलं आणि हिने पुन्हा कोणीतरी गेल्याची बातमी द्यावी तसं सगळ्यांना सांगितलं . यांनाच गौरीने काय तो निर्णय घ्यायला हवा होता ना? फारच मेलोड्रामा.
केळकरांकडे आतापर्यंत नेहमी बेल /दार वाजवून लोक आत यायचे. आज पहिल्यांदाच लॅच उघडून आले.
आशुतोषने अरुंधतीची काळजी ऑफिशियली करता आणि घेता यावी फक्त यासाठी लग्न केलंय. अरुंधती असल्यामुळे त्याचं झुरळ आणि पालींपासून रक्षण केलं जाईल हा फायदा.
भरत..
भरत..
<<<< आशुतोषने अरुंधतीची काळजी
<<<< आशुतोषने अरुंधतीची काळजी ऑफिशियली करता आणि घेता यावी फक्त यासाठी लग्न केलंय. अरुंधती असल्यामुळे त्याचं झुरळ आणि पालींपासून रक्षण केलं जाईल हा फायदा.>>>>
भरत तुम्हाला अंतिम सत्य समजलं आहे:). इतक्यात कधीतरी संजना अनिरुद्ध ला म्हणाली होती ना की तुला सतत ड्रामा लागतो तुझ्या आयुष्यात तसंच अरुंधती ला रडव्या चेहर्याने कुणासाठी तरी प्रार्थना करायची असते. लग्न बिग्न असले बिनमहत्वाचे विषय त्यापुढे गौण.
आज ती आशुतोष ला म्हणाली 'मला माहिती आहे माझीच मुलं आहेत जाऊन जाऊन किती पुढे जातील? मर्यादेतच रहाणार.' आता अप्पांच्या आजार अरु च्या वाट्याला आलेला आहे असं दिसतंय. अभिच एवढं मोठं प्रकरण नाहीतर कोण विसरेल आणि हे असं वाक्य कोण बोलायला धजेल?
जाता जाता, अनिश इशा ला म्हणाला 'मला सन्मानाने वाजत गाजत वरात घेऊन तुझ्या घरी लग्नासाठी यायचं आहे '. मराठी लग्नात वरात लग्न झाल्यानंतर निघते हे संवाद लेखिका विसरलेल्या दिसतात. ह्यांना खरच त्यांच्या मातोश्री कडे ंंमराठीच्या शिकवणी साठी पाठवायला हवे.
ईशा आणि यशच्या बाबत अरुंधतीचे
ईशा आणि यशच्या बाबत अरुंधतीचे डबल स्टँडर्ड्स दिसताहेत. तिने यशला कधी तुमच्या मर्यादा सांभाळा असं सांगितलं नाही. दोघे एकांतात राहू नका असं म्हटलं नाही. गौरीच्या घरी देशमुखांचे विविध करमणुकीचे कार्यक्रम सुरू असताना यश नंतर तिथे आला आणि त्याला फक्त गौरीच दिसल्याने तिला किस करणार होता.
संवादलेखिकेच्या मातोश्रींनी हात टेकले असावेत. अभिनेत्यांनी नाटकं, मालिका लिहायची ट्रेंड दिसते.
या मालिकेच्या लेखिकेचे ( नमिता वर्तक) आईवडील पंधरा दिवसांच्या अंतराने गेल्याची बातमी आहे. या म्हणजे फक्त आई की अनुपमा ते कळलं नाही.
ईशा आणि यशच्या बाबत अरुंधतीचे
ईशा आणि यशच्या बाबत अरुंधतीचे डबल स्टँडर्ड्स दिसताहेत. तिने यशला कधी तुमच्या मर्यादा सांभाळा असं सांगितलं नाही. दोघे एकांतात राहू नका असं म्हटलं नाही. गौरीच्या घरी देशमुखांचे विविध करमणुकीचे कार्यक्रम सुरू असताना यश नंतर तिथे आला आणि त्याला फक्त गौरीच दिसल्याने तिला किस करणार होता. >>>>>>>> अगदी अगदी. अरुला अभिषेक ईमोशनली strong (?) वाटतो यश आणि ईशापेक्षा! हिला अजूनही ईशा अडनिडया वयाचीच का वाटते?
ईशा काल अरुबद्दल करेक्ट बोलली.
काल अरु आशुसमोर म्हणत होती की
काल अरु आशुसमोर म्हणत होती की इशाला साहिलने फसवल होत आता परत तस नको व्हायला ...ऑ?? हा आपला माना डोलावतोय, बरोबर आहे तुझ म्हणून? अरे तुझ्या पुतण्याविषयी बोलतेय ती.
प्राजक्ता!!!
प्राजक्ता!!!
माझीच मुलं आहेत जाऊन जाऊन
माझीच मुलं आहेत जाऊन जाऊन किती पुढे जातील? मर्यादेतच रहाणार.' आता अप्पांच्या आजार अरु च्या वाट्याला आलेला आहे असं दिसतंय.>>>नैतरकाय! अभि लग्नाची बायको असताना हॅाटेलवर परक्या स्त्रीबरोबर होता, यश आता (तिच्या शब्दात) बायको सोडून गेल्याच्या दु:खात आहे, मागे इशा साहिलबरोबर रूमवर होती तेव्हा हिच तिला घरी घेऊन आली होती. तरीही हिची मुलं मर्यादेत आहेत म्हणे. हिच्या मर्यादा तरी काय आहेत बरे!
लेखिकेचा अभ्यास कमी पडतोय!
माझीच मुलं आहेत जाऊन जाऊन
माझीच मुलं आहेत जाऊन जाऊन किती पुढे जातील? मर्यादेतच रहाणार.' आता अप्पांच्या आजार अरु च्या वाट्याला आलेला आहे असं दिसतंय.>>>नैतरकाय! अभि लग्नाची बायको असताना हॅाटेलवर परक्या स्त्रीबरोबर होता, यश आता (तिच्या शब्दात) बायको सोडून गेल्याच्या दु:खात आहे, मागे इशा साहिलबरोबर रूमवर होती तेव्हा हिच तिला घरी घेऊन आली होती. तरीही हिची मुलं मर्यादेत आहेत म्हणे. हिच्या मर्यादा तरी काय आहेत बरे! >>>>> अगदी अगदी. अनिश आणि ईशा एका छताखाली राहायला नको लग्नाआधी म्हणे. लग्नाआधी यन्ग कपल्स 'हेच' करतात असा तिचा गैरसमज असावा बहुतेक. मग अभि-अनघाच्या साखरपुडयावेळी गावी देशमुखान्बरोबर यश आणि गौरी एका छताखाली राहत होते की. हे तिला कस चालल?
काल अरु आशूला प्रसाद भरवताना अनिश त्यान्च्याकडे रागाने बघत होता वाटत. म्हणत असेल, " छान, आम्हाला कटवल आणि हे म्हातारे इथे रोमान्स करत बसलेत.
कालच्या सो कॉल्ड रोमॅण्टिक सीनमध्ये आशू किती बावळटपणे बघत होता अरुकडे.
साखरपुडयावेळी गावी
साखरपुडयावेळी गावी देशमुखान्बरोबर यश आणि गौरी एका छताखाली राहत होते>>> तेव्हा तर अन्या आणि संजना पण तिथेच राहत होते
आज इशा आनीश प्रेम प्रकरण बाँब
आज इशा आनीश प्रेम प्रकरण बाँब फुटला. ती फारच घायकुतीला येउन लग्न लग्न करत होती. माफक मारामारी झाली.
इक्डे गोडाची परिसीमा सासवा सुना चहा करता करता मोगरा फुलला गाणे गात होत्या एकत्र कोरस मध्ये. आता इशाने खोलीत बंद करुन घेतले आहे. अम्मा के साथ इसकी बी शादी कर देना था. अब बैंगन का प्यार. सुकट बोंबिल का इतके का घाबरतात हे?
आता अरु मा लेकीच्या खोलीच्या दारावर धप्प धप्प करायला परत देशमु ख वाडीत येणार उद्याला.
इक डे अनुपमा अनुज चा प्रेम भंग करवला मातेने. काय नाटक
ईशाची anxiety समजण्यासारखी
ईशाची anxiety समजण्यासारखी आहे. प्रकरण कळल्यावर वडील टोकाचा निर्णय घेणार ही तिची भीती रास्त आहे. तसंच होतंय.
तिने खोलीत स्वतःला बंद करून घेतल्यावर मला बाल्कनी आठवली.
अनिश चम्या आहे. लग्न करून काकाकडे राहायचं नाहीतर इंदूरला जायचं. ईशाने प्रेम लग्न हे स्पष्ट सांगून छान केलं. आईसारखी दोन वर्षे लावली नाहीत.
या दोघांनी जवळ येण्यावरून एवढा तमाशा केल्यावर आशुतोष अनिशशी बोलणार होता ते कधी?
आश्रमातलया बदललेल्या बायकांकडून बळंच कौतुक, कामाची नाटकं यात त्याला मुहूर्त मिळाला नाही का?
आशुतोष नवीन लग्न असून कामाला जायला लागला. अरुंधतीला कॉलेज (परीक्षांचे दिवस आहेत) म्युझिक स्कूल, झालंच तर आश्रम , त्याचं ऑफिस यातलं काहीही बघायची गरज नाही.
अरुंधतीने गाण्यातले इकार आणि उकार दीर्घ केले. मी एक ओळ ऐकून गाणं स्किप केलं. लताच्या गाण्यात ते कानाला टोचत नाहीत.
अरुंधतीला कॉलेज (परीक्षांचे
अरुंधतीला कॉलेज (परीक्षांचे दिवस आहेत) म्युझिक स्कूल, झालंच तर आश्रम , त्याचं ऑफिस यातलं काहीही बघायची गरज नाही.>> आता ती फक्त खायचं मी बघते. करुन न्हाउन डोक्यास पंचा बांधून गुण गुणत किचन मध्ये वावरते. वो येडे को वही काफी है.
अनिरुद्धला चिडायला नवे विषय शोधायला हवेत आता. ये लास्ट था फट गया
मला नाही पटला इशा चा पवित्रा.
मला नाही पटला इशा चा पवित्रा. तिचा नेहमीचा आक्रस्ताळेपणा सुरू झाला आहे. त्यातही एकदा एक बोलते, तर दुसर्या क्षणी भलतंच. वडिलांचा विरोध आहे म्हणून डायरेक्ट लग्न? वडिल परगावी किंवा परदेशी शिकायला पाठवायच म्हणताहेत तुरुंगात नाही. तिथे शिकायला जाऊन अनिशच्या संपर्कात राहणं आजकालच्या काळात कठीण आहे का? उद्या हिच्या हट्टापायी दोघांनी लग्न केले तर रहाणार कुठे आणि खाणार काय?
संपूर्ण प्रकरणात मला दोनच लोक तर्कशुद्ध बोलताना दिसले एक यश आणि दुसरी संजना. बाकी सगळे नेहमी प्रमाणे हायपर ऍक्टिव झालेत.
अभिचा आईवरचा राग निवळला हे ठीक पण मग लगेच त्याला घरातल्या सगळ्या माणसांच्या सुखदुःखात अचानक इंटरेस्ट निर्माण झाला का? यश ला जेल झाली तेव्हा मला त्या भानगडीत पडायचे नाही म्हणणारा अभि आता गौरी आणि अनिश प्रकरणी एकदम भावंडांची काळजी करायला लागला आहे ये बात कुछ जमी नही!
उदया इशा-अनिश विरुद्ध अनिरुद्ध प्रकरण इंटरेस्टिंग वळण घेणार आहे. इशा ने अनिरुद्ध ला अनिश ची माफी मागायला सांगितली आहे विनाकारण थोबाडीत मारल्याबद्दल. बघुया काही नवीन दाखवतात का. नाही तर अनिरुद्ध ने शिरा ताणून ओराडायच आणि कांगावा करायचा आणि बाकीच्यांनी हतबल होऊन बघत रहायचे हा ह्यांचा स्टॅंडर्ड प्रोटोकॉल आहे.
<<<<अनिरुद्धला चिडायला नवे
<<<<अनिरुद्धला चिडायला नवे विषय शोधायला हवेत आता.>>>
अगदी खरं अमा, माझ्या डोक्यात पण हेच आलं की ८/१५ दिवसांत इनिश प्रकरण मार्गी लागेल मग अनिरुद्ध च काय होणार?
बाकी लग्न होईपर्यंत मी कलेच्या प्रांतात रमणारा माणूस आहे असं म्हणणारा आशुतोष लग्न झाल्यावर ऑफिस च्या कामात बिझी झाला हे कशाचे लक्षण म्हणायचे?
सपुर्ण ट्रॅक मधे सध्या सन्जना
सपुर्ण ट्रॅक मधे सध्या सन्जना आणि यशच योग्य अॅक्टिन्ग करतायत बाकी सगळे एकतर इलॉजिकल किवा आक्रस्ताळेपणा यातलच काहितरी करत असतात.
याआधीही लिहलय मी बहुधा, मिलिन्द गवळीच्या अभिनयाला फार मर्यादा आहेत एकतर शिरा ताणुन आरडाओरडा किवा टोमणेबाजी त्यातही आरडाओरडाच एवढ्या दोनच प्रकारात खेळत असतो.बघतना प्रचन्ड इरिटेट होत.
अरुधती आधी त्यातल्या त्यात बरी होती तर सध्या तीही लॉस्ट आहे.
मिलिन्द गवळीच्या अभिनयाला फार
मिलिन्द गवळीच्या अभिनयाला फार मर्यादा आहेत एकतर शिरा ताणुन आरडाओरडा किवा टोमणेबाजी त्यातही आरडाओरडाच एवढ्या दोनच प्रकारात खेळत असतो.बघतना प्रचन्ड इरिटेट होत.>> व्हय त्यात एक दोन वाक्ये सलग इंग्रजी बोलणे ही त्याची मो नोपोल्ली आहे.
हे कशाचे लक्षण म्हणायचे?>> कलेचा प्रांत घरीच आला ना. तो प्रौढ कुमार आहे. पुढे काय करायचे शंका असतील. पण अरु काय सॉसी वागायला तयार न्हाई. अनुश्का बरी होती यार बायको ह्याला. हे काय दळण.
ईशा आणि अनिश दोघान्चही पटतय.
ईशा आणि अनिश दोघान्चही पटतय. सगळेजण ( यश आणि सन्जना सोडून) तिला अजूनही लहानच समजतात. तिला स्वतः चे निर्णय स्वतः घेण्याचा हक्क असायलाच हवा.
अनिशच पण काही चुकल नाही. तो ईशाला म्हणाला होता की बाई ग, दोन वर्ष थाम्बू, करियर करु आणि नन्तर लग्न करु. काय चुकीच बोलला तो? पण हिच आपल एकच तुणतुण- नात जुन झाल की तुटत म्हणे. अस सगळयान्च्या बाबतीत कुठ होत? अप्पा- कान्चन, विशाखा-केदार ह्यान्ची उदाहरणे तिला दिसतच नाही. दोन वर्ष एकमेकान्ना दया, एकमेकान्ना ओळखा, आणि वाटल्यास मग लग्न करा हा बेस्ट ऑप्शन आहे.
मला नाही पटला इशा चा पवित्रा. तिचा नेहमीचा आक्रस्ताळेपणा सुरू झाला आहे. त्यातही एकदा एक बोलते, तर दुसर्या क्षणी भलतंच. वडिलांचा विरोध आहे म्हणून डायरेक्ट लग्न? वडिल परगावी किंवा परदेशी शिकायला पाठवायच म्हणताहेत तुरुंगात नाही. तिथे शिकायला जाऊन अनिशच्या संपर्कात राहणं आजकालच्या काळात कठीण आहे का? उद्या हिच्या हट्टापायी दोघांनी लग्न केले तर रहाणार कुठे आणि खाणार काय? >>>>>>>>> अगदी अगदी
अरु आता ईशाला म्हणते की आपण शान्तपणे बोलूया. आधी मात्र जरा मिठी काय मारली तर हिने आणि आशुतोषने तमाशा केला होता. म्हणून तर प्रकरण आता तापलय.
अनिरुद्दला साहिल आवडायचा नाही? हे कधी झाल? जेव्हा अरुने त्याला साहिलविषयी सान्गितल होत तेव्हा अन्या हे अफेअर कूलली घेत होता. त्यात काय एवढ वाईट? हे वयच आहे तस ईशाच. अस म्हणत होता तो अरुला.
अनिरुद्धला चिडायला नवे विषय शोधायला हवेत आता. >>>>> मिळालाय ना. सन्जना मॉडेलिन्ग करतेय प्रमोदच्या कम्पनीसाठी. अन्याचा जळफळाट होतोय.
कान्चनने आशू-अरुला टोमणा
कान्चनने आशू-अरुला टोमणा मारली की कुठल्याही वयात माणसे प्रेमात पडली की ती वेडयासारखीच वागतात. आशुला ते कळल नाही. मी जर आशूच्या जागी असते तर कान्चनकडे रागाने बघितल असत.
त्यातही एकदा एक बोलते, तर दुसर्या क्षणी भलतंच >>>> अगदी अगदी. काल ईशा म्हणत होती की आईला काही बोलू नका. बिचारीला आधीच माझ्यामुळे खुप बोलणी खावी लागली. पण काही मिनिटापुर्वीच तीच अरुला बोलत होती की तूच बाबान्चे कान भरलेस माझ्याविरोधात.
सुलु..आपण जर आशु च्या जागी
सुलु..आपण जर आशु च्या जागी असतो...तर बरंच काही रॅशनल वागलो असतो!!!
पण या जर तर च्या गोष्टी!
अमा..बाय द वे..
अनुपमा अनुज च्या घटस्फोटाचे नेमके काय कारण झाले?
आता इशाने खोलीत बंद करुन
आता इशाने खोलीत बंद करुन घेतले आहे ------" तू दरवाजा उघड नाहीतर मी बाहेरून कुलूप लावेन"
------------ हा डायलॉग मिस केला का लोकांनी इथल्या????
Pages