आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<मुळात मुलीच्या वडीलांना हे लग्न मान्य नाहीये अशी कल्पना अनिशच्या घरच्यांना द्यायला काय हरकत होती ? सगळं नाट्यमय, अन्याला शिरा ताणून ओरडण्याची संधी देऊनच झालं पाहीजे असा नियम आहे देशमुखांकडे.>>>

अगदी अगदी. त्यातही तो अनिशचा बाबा आशुतोष+ नितीन ह्या दोघांचा पोरकटपणा स्वतः मध्ये घेऊन फिरतो. येऊन टेकला नाही तर चला देशमुखांच्या घरी म्हणे. माणुस सोशल आणि मोकळ्या मनाचा आहे हे दाखवायला त्याला काॅमन सेंस नाही हे दाखवण आवश्यक आहे का? काहीही चाललय.

@ चिन्मयी, गुड गेस! माझ्या आधी हे लक्षात आले नव्हते पण असं असण्याची शक्यता जास्त आहे. तसंही आता समृद्धी मधले जवळ जवळ सगळे प्राॅब्लेम संपत आले आहेत. माझा असा अंदाज आहे की लवकरच गौरी पश्चात्ताप दग्ध होऊन परत येणार आहे. मग उरल काय? तर अनिरुद्ध वीणा, पार्टनर शिप, फसवणूक गैरसमज, अरु आशु बद्दल विखार आणि अन्या आणि वीणा प्रेम! साधारण २०० एपिसोड चा ऐवज आहे त्यामुळे हे लोक काही ही संधी सोडणार नाहीत.

<<<मुळात मुलीच्या वडीलांना हे लग्न मान्य नाहीये अशी कल्पना अनिशच्या घरच्यांना द्यायला काय हरकत होती ? सगळं नाट्यमय, अन्याला शिरा ताणून ओरडण्याची संधी देऊनच झालं पाहीजे असा नियम आहे देशमुखांकडे.>>> नविन पाहुण्याना सम्रुद्धीवर दर्शनाला नेणे आणी त्याचा आणी स्वत्;चा घाउक अपमान करुन घेणे यात अरुचा पुढाकार असतो.

Lol
बरोबर. अनिशचं पात्र समृद्धीवर जाऊन अपमान करून घेण्यासाठीच आणलंय. त्याचे वडील वेगळे का असतील?

अरुंधती त्यांच्या घरी राहून आली आहे. केळकरांच्या नात्यातले आहेत अनिशला सगळं माहीत आहे. तर वडिलांनाही माहीत असेलच की.

आज तो अनीशचा बाबा फारच बाई उतावीळ होउन चला चला करत होता. पेपर होउन जाउदे मग भेटू असे पण सर्वानुमते ठरवता आले असते. मी असेच केले असते. त्यात ह्याला ड्रिक्स डिनर ची घाई. इतक्या घरगुती डिस्कशन मध्ये पण तो नित्या कशाला हवा समोर सारखा. लुब्रे पणा हावरट पणा करत तिथेच घुटमळत असतो.
संजा ना समजावणी मोड मध्ये असली की दोनदा प्लीज प्लीज म्हणते ते आज झाले. इशाला साडी नेसवणार की नाही? ती जे फेकत होती तेड्रेस फारच भंगार होते. अनीश पण गौरीमोड मध्येच आहे. प्रेम आहे पण लग्न करायचे आहे पण अजून थोडा वेळ माझी करीअर. हे देश मुख दुसृयाला काही विचारच करू देत नाहीत. हे पण साखर पुड्यानंतर दोन वर्शे थांब णार!!!

अनुपमात दाखवल्या प्रमाणे ईथेही अन्या आपल्या बिझनेस पार्ट्नरवर लाईन मारताना दाखवणार आहे.

बादवे गौरी येणार नाही. हिन्दी मध्ये कोणीतरी डिम्पल म्हणून नवीन मुलगी आली आहे. तिच्याशी यश लग्न करणार आहे. आधी गौरी म्हणून नन्दिनी होती अनुपमा मध्ये.

आज वाचलं की अन्घाच्या वडिलांची भूमिका सुलभा देशपांडेंच्या मुलगा निनाद ( शापित मध्ये होता हा - दिवस येतील दिवस जातील)
याने केली आहे. अरेरे!

आणि यश चित्रपटासाठी लेखन करणार आहे.
किती टीव्ही अभिनेते लेखन करताहेत त्याची यादी करायला हवी.

आज अपेक्षित हंगामा झाला. मी अगदी चहा बिस्किटे घेत घेत बघितला. अनीश चा बाप व नित्या हे हावरट पब्लिक खा खा करत उगीच चिकटत आत शिरले. नमस्कार चमत कार झाले मग इशाला आणण्यात आले. संजना उगीचच आपलाच चहा पोहे चालू आहे अशा उत्साहात होती. ब्लाउज पूर्ण पाठ उघडी. सासू व्हायला आली तरी पोच नाही. बाकी मापात होते. पण अन्याने भांडण काढलेच. शेव टी त्या function at() { [native code] }इ उत्साही बापाला पण कळले की इथे आपला अपमानच होतो आहे. व तो लग्नाला नाही म्हणतो. अन्या इन फुल अमरीश पुरी मोड. इशा बधिर झालेली आहे हिने पण साडी नेसायला हवी होती. आजीला कळत नाही. ( ही खरंच खुर्चीच्या साइजची झालेली आहे. )

अरु च्या नवी नवेली दुल्हन साड्या चालू आहेत.

तो अनिश किती मेंगळट आहे .
संजना आणि ईशुचं बॉण्डींग आवडलं . अनिशचे बाबा फारच डोक्यात जातायेत .
संजनाची साडी सुन्दर आहे .

उत्साही बापाला पण कळले की इथे आपला अपमानच होतो आहे>> नशीब! मला वाटले तो अशूसारखा वागतो कि काय! अनिरूद्धला मी आवडत नसलो तरी बाकीचे लोक माझ्या जवळचे आहेत म्हणत तो अपमान करून घ्यायला तिथे यायचा. अनिशसुद्धा तसाच आहे पण त्याच्या वडिलांमुळे आता त्याला तसे करता येणार नाही.

अन्याकडे तारतम्य उरलेलं नाही हे आता ठळक होत चाललंय. काय तो आरडाओरडा, काय ती चिडचिड. मिलिंद गवळी खरंच कंटाळला असेल. आणि मुलीच्या बापाला लग्न मान्य नाही हे अनीशच्या आई बापाला आधी सांगायला नको? असलं थर्ड क्लास सरप्राइज द्यायचं होतं त्यांना? मुळात अन्या यापेक्षा काही वेगळा वागेल असा विचार कसा काय शिवतो देशमुख गॅंगला?

आणी वरताण हिपोक्रिसी म्हणजे हे सगळ घडल्यावर वर त्या अनिशच्या बाबालाच अपमान सहन करण्याचा छोटेखाणी कोर्स देत होते .अन्या कसा असाच वागतो,बोलतो आपण कस लक्ष द्यायच नाही.
अरे मठ्ठानो!! हे सगळ आधि सान्गायला काय तुमचि जिभ काय फिरायला गेली होती कि काय?तुम्हाला अपमान करुन घ्यायचा सोस आहे तो सगऴ्याना कसा असेल?
बाकी हा सगळा गोन्धळ इशाच्या परिक्षेतच का घालायचा आहे???अर्थात कॉलेज घर का तो डर किस बात का?

इशा पळून अनिश कडे आली. आता अन्या इथे येउन दंगा करणार. अरु अभ्यास अभ्यास करत होती. इशा आधीच बिथरलेली आहे. ह्यांचे लवकर लग्न लावले तर त्रास वाचेल.

अन्या म्हणजे न सुधारणारा आहे, अजूनही प्रोमोत दाखवलं की तो मनापासून इनिशा सापुला तयार नाहीये.

सध्या म्हणजे बघायची म्हणून बघायची मालिका असं झालयं.

सध्या म्हणजे बघायची म्हणून बघायची मालिका असं झालयं>>> +१ धुणे-भांडी मालिका! मालिका लावायची आणि आपली रोजची कामे करत बघायची.

उद्याच्या भागाचा प्रोमो पाहिला -
आपल़ं संपूर्ण आयुष्य कुणा माणसाच्या आधाराने काढणं ही कल्पना सुंदर आहे - अरुंधती. म्हणजे परावलंबी जगणं सुंदर?

माझ्या मुलीची काळजी घेशील ना रे?
अगदी शेवटच्या श्वासापर्य़त - अनिश.
till my last breath चा अनुवाद.‌
प्रत्यक्षात कोण असं बोलणं?

लॉजिक शी पुर्णपणे फारकत घेऊन चाललंय सगळं. अरुंधती ने देशमुख परंपरेला जागत आधी इनिश साखरपुडा जाहीर केला आणि मग लागोपाठ दोन एपिसोड अनिश ला घाई होते आहे का? असं विचारलं आणि इशा ला घाई करू नकोस असं समजावल!

हे सगळं करताना अनिरुद्ध चा विरोध आहे ह्याचा कुणीच विचार केला नाही, मुलाच्या आई वडिलांना तशी कल्पना दिली नाही, कळस म्हणजे संजना ने चक्क इशाला समजावलं की अनिरुद्ध अनिश पालकांच्या भेटीत कसा वागेल ह्याचा विचार करत बसु नकोस!

अनिश चे वडिल पण महान, आपण मुलीच्या वडिलांबद्दल विचारले तेव्हा सगळे एकदम टेन्स झाले हे काही ह्या सो कॉल्ड जग बघितलेल्या माणसाला लक्षात आलं नाही.

अनिरुद्ध तर सगळ्यात महान ज्या मुलीला लहानपणापासून हा बघत आलाय ती एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाल्यावर किती आक्रस्ताळेपणा करते हे त्याला माहीत नाही, तसंच आपण आतापर्यंत जे जे काही तरी मारलेत त्या बद्दल तिचं काय मत असु शकेल हे पण त्याला माहीत नाही. म्हणुन इशाने मला तुमची लाज वाटते म्हंटल्यावर एकदम त्याच्या डोळ्यात पाणी आले.

सगळे मुर्खपणा करताहेत तर आशुतोष तरी कसा मागे राहील? अरुंधती ला म्हणाला मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात अनिरुद्ध ला तुझ्या बद्दल आदर आणि प्रेम आहे! इतके दिवस एवढे विविधरंगी तमाशे बघुनही अजुन ह्याला अनिरुद्ध च्या मनाचे सगळे कोपरे दिसले नाहीत.

धन्य ते देशमुख आणि धन्य ते केळकर!

मला तर वाटलं आशु अरुला परत पाठवेल अनिरुद्धकडे. तुम्हारी अमानत वगैरे Wink चादरी द्यायचं लक्षात राहिलं त्यात काय नवल, आशुचं पहिलंच लग्न आहे पण अरुने सव्वीस वर्ष हेच तर केलंय. जेव्हा अरु झोपते तेव्हा आशुतोष जागा असतो आणि उलट. एकाचवेळी झोपायची परवानगी नाही वाटते यांना. अनिशला तर असे हाकलतात की आता काय करणार आणि काय नाही Biggrin

चंपा... Lol ... हो ना.... आणि नंतर आशु पुस्तक वाचत बसतो! आणि पायाशी काय तो सोफा का काय ठेवलाय? आशु पलंगावर पण वाचू शकतो ना....साईड लँप लावून... का तिच्या पासून पाच फूट अंतर राखणं अनिवार्य आहे ? Angry काहीही दाखवतात...

मला तर आशु ला प्रॉब्लेम आहे असेच वाटतेय !! त्याचे एकूण कॅरेक्टर प्लॅटोनिक च्या वर जाईना......

मला तर आशु ला प्रॉब्लेम आहे असेच वाटतेय !! त्याचे एकूण कॅरेक्टर प्लॅटोनिक च्या वर जाईना.>> मैने पैलिच बोला था. आता इशा चिरकत सापु ला १० लाख खर्च करवणार.

आता अभि डोक्यावर पडलाय आणि त्याचा दोष अनघाच्या माथ्यावर मारत आहेत. त्यात अनिरूद्धचा कायम एकच चॅनल चालू असतो.. अरू त्याच्यावजळ थांबली तर मीही थांबणार म्हणे.
अनिष श्रिमंत दांपत्याचा एकूलता एक मुलगा आहे हे इशा जाणून आहे. मग त्यांनी नाहीतर अशूतोषने तिच्या सापूवर भरपूर खर्च करावा असे तिचे म्हणणे आहे. ही जाम लुटणारे अनिषला!

आज मी फारा दिवसांनी महाएपिसोड आहे म्हणून बघतोय. अभिषेकला काय झालं होतं? ताप आलेला, मार लागलेला, दरदरून घाम सुटलेला पलंगावरून, दाणकन पडलेला अभिषेक कसला फ्रेश दिसतोय.

तो कामावरून घरी येताना गाडीवरून पडला. घरी आला जरा लागलंय म्हणून आराम करायला गेला तेव्हा अनघाला कळले कि त्याच्या डोक्याला पण मार लागला आहे. त्याच्या दवाखान्यातल्याच डॅाक्टरने अभिने आजपर्यंत जे काही सांगितले आहे त्यावरून अनघाने त्याच्याजवळ जास्त वेळ असायला हवे असे सांगितले. सकाळपर्यंत उठला तर ठिके नाहीतर दवाखान्यात न्यायलाही सांगितले आहे. घरातलेही अन्यासोडून सगळे वाट बघू म्हणत आहेत. अनघा तर त्याच्यातल्या प्रत्येक बदलावर तो आता मेला कि काय अशी वागते आहे.

Lol
आज हे लोक एकमेकांना जेवायचा आग्रह करत असताना तो उठला आणि पाणी प्यायला जाताना चक्कर येऊन पडून पुन्हा बेशुद्ध झाला. मग परत शुद्धीवर आला तर टुणटुणीत.

आशुतोष आता आयलव्हयु म्हण आंदोलन करतोय.

Lol
भरत!!
अभि तर आधीपासूनच डोक्यावर पडलाय की..पुन्हा काय वेगळे दाखवायचे तेच ते ..?

अरु च्या मना त हल्के हल्के फीइलिन्ग जागृत व्हायला लागले आहेत. बिरबलाची खिचडी.
लहान मुलांची नवीन बॅच सुरु होत आहे तर गाणे कोणते म्हणणार? तर प्रथम तुज पाहता!! अनीशचे समजून घेता येइल पण ह्या मॅडमचे काय?
मुगाचा शिरा करून तो वाढताना आयलव्ह यु म्हणेल.

संज ना हॅज रीच्ड अदर एंड ऑफ द स्पेक्ट्रम. तिला कधी अन्या बद्दल फार र प्रेम मालकी हक्क दाटून येतो तर दुसृया बाजूला गेली की हात समोर करुन चल हट मोड. तो आज होता . लगेच शेखरला फोन करुन निखिल ला इकडे पाठव इथून परीक्षा देइल म्हणे. अशी देता येते का?
मग अप्पा समजूत घालाय ला पुढे सरसावत आहेत. अन्या तिचे सामान फेकूनच देतो.

कालच्या भागात ईशा चक्क अरुंधतीला ऑर्डरी सोडतेय असं वाटत होते. ती अरुंधतीची सून होऊन जाणार आहे पण तिथे जाऊन तिला सासुरवास करील. मज्जा.

संज ना हॅज रीच्ड अदर एंड ऑफ द स्पेक्ट्रम. तिला कधी अन्या बद्दल फार र प्रेम मालकी हक्क दाटून येतो तर दुसृया बाजूला गेली की हात समोर करुन चल हट मोड. तो आज होता >>>>>>>>तिच काही चुकल नाही. अन्या डिझर्व्हस इट

अनुपमामध्ये तिच्या मोठया मुलाला पॅरालाईज झालेला दाखवला आहे.

Pages