Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00
आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इशा इतका थयथयाट का करते दर
इशा इतका थयथयाट का करते दर वेळी...? काय त्या आत्महत्येच्या धमक्या, काय ते चिरक्या आवाजात सानुनासिक बोलणं, अतिशय तिरस्कार, आणि द्वेष दाखविणारे आततायी संवाद...!!
चिडका रडका स्वर आणि प्रचंड प्रेशराईज करणे !
अनुपमा अनुज च्या घटस्फोटाचे
अनुपमा अनुज च्या घटस्फोटाचे नेमके काय कारण झाले?>>> अनुपमाची महानता नडली. आपली soon to adopt पोरगी तिच्या biological आईला देऊन टाकली तिने. कारण पोरगी पण महासमजूतदार. अनुपमा-अनूजमधे भांडण नको म्हणून "मला जाऊ दे" म्हटली आणि अनुपमाँने जाऊ दिलं. त्यामुळे अनुजचा २५ वर्षे जून्या प्रेमावरचा विश्वास संपला.
इथे मुल दत्तक वगैरे परवडणारं नाही. देशमुख कुटुंब ऑलरेडी दत्तक पडलेलं आहे अरूंधतीकडे. अनिरूद्ध आता स्क्रिनवर पण सहन होईनासा झालाय.
ओह्ह!!...अनुपमा पण महा आहे!!!
ओह्ह!!...अनुपमा पण महा आहे!!!.
तिला अनुज पुढे सर्व काही व्यर्थ वाटले पाहिजे खरे म्हणजे...!!!
सुलु..आपण जर आशु च्या जागी
सुलु..आपण जर आशु च्या जागी असतो...तर बरंच काही रॅशनल वागलो असतो!!! >>>>>>>>> अगदी अगदी
आता इशाने खोलीत बंद करुन घेतले आहे ------" तू दरवाजा उघड नाहीतर मी बाहेरून कुलूप लावेन"
------------ हा डायलॉग मिस केला का लोकांनी इथल्या???? >>>>>>>> ऐकलाय हा डायलॉग. फार विनोदी बोलला अन्या. हाहाहा
अनिरूद्ध आता स्क्रिनवर पण सहन होईनासा झालाय. >>>>>>>> _++++++१११११११
नवीन प्रोमो पाहिला. अरु इनिशचा साखरपुडा करणारे. म्हणजे पुन्हा एकदा देशमुखान्च्या घरी नाचगाण्याला उधाण.
अनुपमाचा डिव्होर्स झाल्याचं
अनुपमाचा डिव्होर्स झाल्याचं वाचल्यावर मी ही मालिका बघायचं थांबवलं. इतर मालिकांप्रमाणे ही सुद्धा त्याच ठरलेल्या लूप मध्ये फिरणार हे पक्के झाले. इतर मालिकांत खलव्यक्ती अधिकाधिक नीच पातळी गाठतात, बावळट सद्वर्तनी लोक त्यांच्या जाळ्यातून प्रत्येक वेळी वाचतात आणि आपल्याबाबत हे असं वारंवार का होतंय याचा शोध घेत नाहीत वा विचार करत नाहीत. खलव्यक्ती पकडल्या गेल्याच तर त्यांना माफ करून संधीवर संधी देत राहतात. तशी ही मालिका लग्न आणि घटस्फोट या लूपमध्ये फिरेल असं दिसतं.
आतापर्यंतचा काउंट - घटस्फोट साडेचार. अरुंधती-अनिरुद्ध, अविनाश , अनघा , अनिरुद्ध - संजना, यश - गौरी. इशा साहिल धरले तर पावणेपाच.
+अभिषेक-अंकिता, संजना शेखर.
+अभिषेक-अंकिता, संजना शेखर. नितीन अशुतोष पुढे त्याच्या कुटुंबाला दुय्यम स्थान देतो त्यामुळे त्याचाही काडीमोड होऊ शकतो.
हो. हे दोन सुटले होते. नितीन
हो. हे दोन सुटले होते. नितीन आणि त्याची बायको एकमेकांना भरपूर स्पेस देत असावेत.
स्पेस...
स्पेस...
काल अरुने सेन्सिबल सल्ला
काल अरुने सेन्सिबल सल्ला दिला ईशाला. पण जेव्हा ती 'तु एक मुलगी आहेस, बाई आहेस' सुरु केल, वाटल की आता हिच पुन्हा तेच लग्नाआधी जवळ येण्यावरुन लेक्चर देण चालू होईल की काय. पण सुदैवाने तसे झाले नाही.
सुरुवातीला मात्र साखरपुडयाची न्यूज न सान्गता अरु लेक्चर देत होती. ती न्युज सान्गायला अनघा आणि सन्जनाला पुढे केल वाटत.
आता हि बया (ईशा) साखरपुडयापर्यन्त तरी थाम्बेल का? शन्का आहे.
आज इशाने शेवट्चा पेपर दिलेला
आज इशाने शेवट्चा पेपर दिलेला नाही. ब्लँक होउन परत आलेली आहे. ते बघून अन्या खवळ णार आहे व तिला दिल्ली का कुठे पाठिवणार.
वीणा येणार म्हणून आशू सटपटलेला आहे. त्यात मागील भागात आशू व अरु ने पाणी पुरी खाउन आशूला जोराचा ठसका लागायचे नाटक परत परत झाले. मग अरुने बाळास पाणी पाजले. डोंबिवलीत आज्जीने कांदेनवमी केली असेल.
घरी परत काचेचा ग्लास फुटल्यावर हळद भरायच्या निमित्ताने अशूने बायकोचे पाय धरिले. व तिने त्याचा हात. आता त्यांन एकत्र आणायला भूकंपच करावा लागेल बहुतेक. आशू तर करहा करी झाले की दोन मिनिटे ब्लँक होउन महिरुन बसतो.
आईचे व वीणाचे काय रहस्य!!
ह्यांच काॅलेज अजब आहे. ईशा ची
ह्यांच काॅलेज अजब आहे. ईशा ची फायनल परिक्षा आणि पेपर सुरू आहेत ते ही काॅलेजातल्या काॅलेजात सामान्य लोकांसारख परिक्षा सेंटर, टाइमटेबल, पेपर मधल्या गॅप, अभ्यास ह्यांचा उल्लेख नाही. डायरेक्ट शेवटचा पेपर आणि तो परत देता येऊ देत अशी विनंती यश प्रिन्सिपॉल मॅम कडे करणार आहे. तर तिकडे अरुंधती आणि अनिश परिक्षेला सहा एक महिने अवकाश असल्याप्रमाणे निवांत आहेत. त्यांचं आणि इशाच शैक्षणिक वर्ष वेगवेगळ्या टाइमटेबल नुसार चाललंय.
अनिरुद्ध चे तमाशे आणि अभिनयाचा अभाव आता असह्य व्हायला लागलेत. पहिले किमान अरुंधती शी शाब्दिक चकमकी होताना टोमणे मारुन झाल्यावर तिच उत्तर ऐकण्यासाठी किमान गप्प तरी बसायचा पण हल्ली नुसताच ओरडत असतो.
अनुष्का बरेच दिवस झाले फिरकली नाही केळकरांच्या घरी, असं तर नाही ना की तिने गुडबाय केले ह्यांना आणि मोघे काकांसाठी आता वीणाला आणताहेत!
बाकी अरुंधती इतकी सगळ्यांची काळजी घेणारी आणि घरच्या खाण्याची भलामण करणारी, पण ती हल्ली आशुतोष ला तिखट पाणीपुरी झेपत नाही हे सोईस्कर पणे विसरून हातगाडी वर पाणीपुरी खाण्याचा हट्ट धरतेय हे काही झेपेना. हिला नितीन सोबत राहून वाण नाही पण गुण लागला वाटतं.
पाणीपुरीवाल्याकडे प्रत्येकजण
पाणीपुरीवाल्याकडे प्रत्येकजण आपल्याला कशी पाणीपुरी हवी ते सांगतो, अगदी सामान्य ज्ञान आहे ते. अरू म्हणते तिखट द्या तर ह्यानेही तशीच घेतली. उगाच आपलं ठसका लागला कि पाठीत धपाटे घाल्यायचे, पायाला लागले कि पाय धुवायचे, काचेचा ग्लास समोरच फुटलाय तरी त्यावर पाय ठेवायचा अन मग थेंबभर रक्त बघून मोठा अपघात झाल्यासारखी बडबड करायची. लग्नाआधी हे सगळं झालं आहे आणि पुन्हा तेच.
इतके दिवस झाले तरी अरू अशूमधे जरा सुद्धा रस दाखवत नाही. आता मानलेली नणंद येणार आहे मग तर अरूचा संपूर्ण फोकस तिच्यावर असणार आहे.
लेखिका हे विसरलीये की आशू
लेखिका हे विसरलीये की आशू रक्ताला घाबरायचा. बेशुद्द पडायचा रक्त बघून.
विणाचे वर्णन ऐकून वाटले की ही सेम ईशासारखी आहे.
ईशाला अप्पान्चा विस्मरणाचा आजार झालाय का? पेपर लिहिण्याआधी ती कुठे होती हेच तिला आठवत नाही?
विणा म्हणून कोण असेल? मीरा जगन्नाथ? रसिका सुनील? शिवानी सुर्वे? केतकी विलास की विणा जगताप?
काल का परवा अन्या म्हणतो की
काल का परवा अन्या म्हणतो की अरुंधती इशाला समजावू नाही शकली तर मी तिला बाहेर पाठवेन. नक्की काय समजावणं अपेक्षित होतं ?
शेवटचा पेपर होता तर आता इशा कसला अभ्यास करते आहे ? रिएक्झाम लगेच होणार म्हणे. काहीही चालू आहे.
वीणा, अनिशचे आई वडील अश्या ३ पात्रांची एंट्री होणार आहे पण अजून वर्षाचं काही दर्शन नाही.
आशुतोषचा कॉलेजमध्ये जॅक असेल
आशुतोषचा कॉलेजमध्ये जॅक असेल ना? ईशाची आई सेलेब्रिटी स्टुडंट. तो करून घेईल ईशाची रिएक्क्झाम.
मध्ये एक सीन पाहिला ज्यात अभिषेक म्हणतो की त्याच्या बॉस डॉक्टरीण बाईंनी नवीन क्लिनिक उघडलंय आणि याला इनचार्ज केलंय. ऑपरेशन चालू असेल तर फोन घेता येणार नाही. एकतर क्लिनिक म्हणजे फक्त ओपीडी. पेशंटला अॅडमिट करत नाहीत. त्यामुळे ऑपरेशनचा प्रश्न नाही.
ज्याचं कोणाचं ऑपरेशन झालं असेल त्याला माहीत असतं की भूलतज्ज्ञ काही हॉस्पिटलमध्ये कायम बसून राहत नाही. ऑपरेशनच्या वेळी त्याला बोलवलं जातं. आणि त्या डॉक्टरीण बाई गायनॅक आहेत. फार मोठं हॉस्पिटल नाही की रोज ऑपरेशन करत असतील. याला पण गायनॅकच दाखवायचं ना? अॅनास्थेटिक कशाला दाखवलं? मागे पेशंट दगावला तर मेन डॉक्टर सोडून अॅनास्थेटिक पेशंटच्या नातलगांशी बोलायला आणि त्यांचा मार खायला गेला.
काल का परवा अन्या म्हणतो की
काल का परवा अन्या म्हणतो की अरुंधती इशाला समजावू नाही शकली तर मी तिला बाहेर पाठवेन. नक्की काय समजावणं अपेक्षित होतं ?>>> मला वाटत ना एक्झॅम होणार नाही काही, इशाच परत डोक फिरेल आणि अनिशला भरिला पाडून लग्नच करुन येतिल.... हा माझा अनुपमा वरुन अन्दाज आहे.अन्याचे सन्तापाने डोळे आणी शिरा फुटल्या नाही म्हणजे मिळवली.
विणा ट्रॅक कशापायी वाजवुन राहिले ते काही समजुन नाही राहिले.
<<<काल का परवा अन्या म्हणतो
<<<काल का परवा अन्या म्हणतो की अरुंधती इशाला समजावू नाही शकली तर मी तिला बाहेर पाठवेन. नक्की काय समजावणं अपेक्षित होतं ?>>>>
जे काय अपेक्षित होतं आणि जे काही अरुंधती ने समजावलं त्यातलं काहीच ईशाला समजलं नाहीये. अरुंधती तिला अनिश कडे लग्नाची घाई करु नकोस त्याला त्याच्या करीयर बद्दल ची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वेळ दे, तुही उच्च शिक्षण घेऊन स्वतः च्या करियर च नीट प्लानिंग कर असं काय काय आज समजावत होती आणि शेवटी तिने भरत ने सांगितले त्या प्रमाणे नितीन च्या शब्दानुसार प्रिन्सिपॉल बाई इशा ला परत परिक्षा देण्याची संधी देतील हे सांगितले. त्यावर इशा ने बालिशपणे मग मी चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवीन आणि हक्काने अनिश शी लग्न करीन अस तिला उत्तर दिले. धन्य ती इशा.
इकडे अनिरुद्ध ने अरुंधती आणि संजना पाठोपाठ आता लाॅजिक शी पण काडीमोड घेतला आहे. परवा इशा ला म्हणाला अनिश ला भेटलीस तर तुझे लग्न लावून देईन माझ्या पसंती च्या स्थळाबरोबर, आज अरुंधती ला म्हणाला मला तिने इतक्या लहान वयात लग्न करायला नको आहे. हा इतका गंडलेला माणुस म्हणे मार्केटिंग मधला 'दादा' आहे. त्यामुळे एका बिल्डरला तो त्याच्या आगामी प्रोजेक्ट मध्ये हवाच आहे आधी ह्या क्षेत्रातील कुठलाही अनुभव नसतानाही. पण 'जिनियस' अनिरुद्ध तिरक्या डोक्याचा असल्याने त्या बिल्डरला शेंड्या लावेल अशी नितीन ला भिती आहे! धन्य तो आशुतोष आणि धन्य तो नितीन!
अभिची प्रॅक्टिस पण समृद्धी मध्ये असलेल्या खोल्यांच्या संख्येसारखी सतत बदलत असते. कोविड काळात तो विमल च्या वस्तीत लोकांना प्रिव्हेन्टीव्ह केअर शिकवत होता. अनघाच्या प्रेग्नंसि मध्ये डॉ वसुधा चा ताण हलका करण्यासाठी त्यांचं पेशंट लोड वाटुन घेत होता. अप्पांच्या आजारात न्युरोलाॅजिस्ट बनुन त्यांच्या टेस्टस करवुन घेत होता, सध्या सर्जरी मध्ये बिझी आहे असं सांगतोय.
(No subject)
भरत पर्णका .. :khokho:
भरत आणि पर्णका....
मालिका टीव्हीवर पाहायची
मालिका टीव्हीवर पाहायची थांबवली, तरी व्यसन सुटायला वेळ लागतोय. स्टार प्रवाहच्या फेसबुक पेजवर अरुंधती ईशाला समजावते तो भाग पाहिला. अरुंधतीने अगदी शांत, समजुतदार, आश्वासक, इ.इ. आवाज लावला. पण तिने जे सांगितलं ते नापास झालेल्या मुलांना जनरली सांगावं तसं होतं. ईशाला पेपर चांगला गेला नाही, म्हणून ती नापास झाली. इ. ती ब्लँक झाली त्याचं काहीच नाही. बरं ही मुलगी तीन तास ब्लँक होती का? थोड्या वेळाने सावरता आलं असतं ना? की ब्लँक झाली म्हणून लगेच बाहेर पडली?
तिने याआधी असे अनेक भयंकर प्रसंग अनुभवले आहेत - कोणीतरी बळजबरी करणं, आपण खून पाहिला आहे , आपल्या भावाच्या हातून खून व्हायला आपण कारण आहोत, या स गळ्यातून ती गेली आहे, हे अरुंधतीच्या गावी नाही. तरी यांच्या घरात एक प्रोफेशनल कौन्सेलर आहे.
आणि अनिरुद्ध तिला एकटीला कॅनडाला पाठवणार आहे का?
पर्णीकानी लिहिलंय तसं अर्जुनाला माशाचा डोळा दिसत होता तसं ईशाला फक्त अनीशशी लग्न दिसतंय.
अरुंधतीच्या समजावण्यातूनही एकदा लग्न झालं की करियर शिक्षण काही करता येत नाही असा अर्थ लागत होता. म्हणजे लग्न केलंत की तुम्ही संसार एके संसारच करा?
त्याआधी कधीतरी अन्घा आता मी कौन्सेलिंग पुन्हा सुरू करणार आहे, अशी घोषणा करते ती क्लिप पाहिली.. पण तेवढा वेळ जानकीला कोण बघणार याबाबत ही मंडळी काहीच ठरवत नाहीत. तिच्या झोपेच्या वेळेत करेन, कोणी ना कोणी बघेल. इ. तेवढ्यात अनिरुद्ध शेअर ट्रेडिंग करून पैसे कमवतो, असंही कळलं.
ते गौरी गेली गौरे आली गुर्
ते गौरी गेली गौरे आली गुर्हाळ अजून चालूच आहे. परवा आशुतोष तुम्ही मला फार आव्डता झालं झोपेत म्हणून मग येडं हातात हात घेउन रात्रभर बसलं आता फोन वर आय लव्ह यू म्हणे परेन्त प्रगती आहे. हा व नित्या शाळेत बसल्या सारखे काम करत असतात. नित्या हनिमूनला जोडीस पाठवू बघत आहे. पण बाईच्या डोक्यात शिरत नाही. ती गाणे गुणगुणते तेव्हा येडं परत बघत बसतं .
आता इशाचा परत पेपर आहे तेव्हाच नेमके अनीशचे आईबाबा येणार की ती परत बिथरणार.
अन्घा अभी समेट होतो असें दिसत आहे. ही पण नवृया जवळ नुसती बसत सुद्धा नाही. मग कसली डोंबलाची जवळीक निर्माण होणार?!
संजना चा मोडेल म्हणून फोटो आला आहे त्याचे कोण कौतूक तर कोण निर्भत्सना करत आहे. कोण काय ते ओळखा पाहू मुलांनो.
येडं
येडं
अरे किदर गये सब लोगां आज कल
अरे किदर गये सब लोगां आज कल बंद कर दिये क्या देखना?!
आज अरु ची हिरवी कॉटन साडी व ब्लाउ ज छान होता. मेंदी कलरची ब्लोक प्रिंटेड सारी. बरा च वेळ चिक्कट गूळ अनिशची खेचत होती. व सून बाई भाजी निवडत होती. सो स्वीट घरगुती. मग आशू साहेब आले. तोच टीशर्ट जीन्स वर टॅन कोट!! व टॅन शूज. ह्याने लग्नात नवे कपडे घेतले नहीत. मग सासवेने सुनेस स्वयंपाक करयला ठेवुन घेतले व नवरा आज्ञा धार क पणे हपिसला गेला. आता ही घरी बिझी अनीश झोपलेला व म्युझिक स्कूल रिकामे पडले असावे.
हपिसातून नवर्याने बायकोचा फोन घ्यायचा लाडीक सीन बघा दोस्तो. घरी राहुन ही तयारी काय करते तर गोडाचा शिरा!!! हातर पाव्हणे आले की लगेच दहा मिनिटात होईल ताजा. पण बायको डबा पाठवू का म्हणते. व नवरा आय लव्ह यु म्हणतो पण बायकोला उत्तर देता येत नाही कारण सासू समोरच रवा भाजीत बसली आहे. मग सासू लाडीक पणे बोला हो कायते म्हणून निघून जाते. हौ क्युट.
इकडे इशा चा अभ्यास झाला आहे परवा परीक्षा तर उद्याच तिच्या लग्ना ची बोलणी म्हणून अन्या उख डला आहे. बरोबर आहे त्याचे. पण तो नव्या लोकांशी काही बोलणार नाही म्हणे लग्नाचे. इक डे इशा कधीपण कोसळेल अश्या चेहर्ञाने सर्व ऐकत आहे. व अप्पाला सर्व संभाळून घ्यायला सांगते. संजनाने पण हिरवा टॉप व छानच कानातले घातले आहे. अभी आजारी आहे तर अनघा रात्र भर पट्ट्या ठेवत होती. त्याच्या डोक्यावर!! जल्दही दूसरा बच्चा होने कु है शायद. आजी खूष आहे.
सर्वात प्रथम आजा यश ची समजूत घालून नव्याने सुरुवात नव्याने सुरुवात करत त्याला ओढत घरात नेतो पण यश मागे बघत च आहे. इसकी भी शादी करा दो भाइ जल्दीसे.
अनीशचा बाप त्याच्या पेक्षा
अनीशचा बाप त्याच्या पेक्षा सवाई उतावळा दिसतो आहे.
मी कालच्या दिवसात फेसबुकवरही
मी कालच्या दिवसात फेसबुकवरही क्लिप नाही पाहिली.
झी मराठीवर नवा गडी नवं राज्य पाहतो. सगळ्यांचा अभिनय उत्तम आहे. नायक चक्क एकटा बसून रडताना दाखवला.
अनिता दातेचा ट्रॅक थांबल्याने मध्ये मध्ये म्युटही करायला लागत नाही.
सगळ्यांचा अभिनय उत्तम आहे.
सगळ्यांचा अभिनय उत्तम आहे. नायक चक्क एकटा बसून रडताना दाखवला. >>>> राघव काल किचन मध्ये अगदी नव्या सुनबाईसारखा राबत होता, बिचारा। त्याचे स्वगत आवडले।
आज इशा रूम मध्ये बसते तर यश
आज इशा रूम मध्ये बसते तर यश तिला अब्यास हे ते बोलत असतो तर परत गौरीची आठवण काढते इशा. खरेच मंद आहे. ज्याचे विषय सेन्सिटिव
तेच मुद्दाम टोकून बोलतात. मग अरे अरे सॉरी सॉरी.
इकडे प्रेमाचा शिरा वाढणे चालू आहे. पण आयत्या वेळी अनीशचे आईबाबा येतात व ते बाबा यप्पडच दिसत आहेत. गावावरून आल्यावर हात पाय न धुता लगेच आशू समोरची डिश ओढून घेउन प्रेमाचा शिरा खायला सुरू. व त्याला इशाला बघायला आज आत्ताच जायचे आहे!!! खुद शादी कररा क्या!! हौला. अनीशची आई जेनेरिक बाई आहे. अन्या त्यांना लगेचच नकार देणार आहे.
भरत..तुम्ही आई कुठे..पासून
भरत..तुम्ही आई कुठे..पासून मनाने दूर दूर जाताहात का?.....
अनिष चे आई वडील कोण दाखवलेत?
अन्याचा हा सिक्रेट पार्टनर
अन्याचा हा सिक्रेट पार्टनर वीणा असावी अशी दाट शंका आहे.
बाकी अनीशची आई कुठल्या तरी सिरीयल मध्ये होती. अशीच एक्स्ट्रा म्हणून. बाबा आताच बघितला. त्याला बघून सतीश तारेंचा भास होतो. पण कहां राजा भोज कहां गंगू तेली असा प्रकार आहे.
अनिशची आई झालेली अभिनेत्री
अनिशची आई झालेली अभिनेत्री निवेदिता जोशी - तेजश्री प्रधानच्या मालिकेत तेजूची आई झाली होती असं अंधुक आठवतयं.
मुळात मुलीच्या वडीलांना हे लग्न मान्य नाहीये अशी कल्पना अनिशच्या घरच्यांना द्यायला काय हरकत होती ? सगळं नाट्यमय, अन्याला शिरा ताणून ओरडण्याची संधी देऊनच झालं पाहीजे असा नियम आहे देशमुखांकडे.
Pages