Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पुणे ५२ च्या वरताण मराठी
पुणे ५२ च्या वरताण मराठी किल्ला कि अशाच नावाचा पिक्चर आहे. पिक्चरचा अर्थ जाणकाराने सांगितल्याशिवाय अजिबात कळणार नाही.
हिंदी डब्ड गॉडफादरचे असेच गूढार्थ समजून घेतोय.
मी पण कला आणि गुडबाय मध्ये
मी पण कला आणि गुडबाय मध्ये गुडबाय निवडला आणि पस्तावले. किती संथ आणि रटाळ. तो घाटावरचा सीन तर किती ताणलाय. पळवत होते तो सीन, संपता संपत नव्हता. पण अचानक त्या सीननंतर सगळे छान वागायला लागले एकमेकांशी.एकुण मुलं किती वगैरे प्रश्न पडले पण मी परत नाही पाहिला. बरं सगळे एकमेकांशी असे तुसडेपणाने का वागत होते? वडिल हेकेखोर होते म्हणुन? ते कारण काही पटलं नाही. नीना गुप्ता फार सुंदर दिसलीये.
Qala पाहिला आत्ताच...छान आहे
Qala पाहिला आत्ताच...छान आहे मूव्ही..सगळ्यांचीच काम छान... हिरोईन मध्ये खूप वेळा श्रद्धा कपूर चा भास होतो..आवाजही तसाच आहे...
hotstar वर आला आहे. ..छान आहे
फ्रेडी hotstar वर आला आहे. ..छान आहे मूव्ही..सगळ्यांचीच काम छान..
ब्लॅक पँथर - पँथर मिळमिळीत व
ब्लॅक पँथर - पँथर मिळमिळीत व बोर, बाकी चांगले. पहिल्याला वाहिलेली श्रद्धांजली पाहुन वाईट वाटते.
द्रुश्यम-२ बघितला,
द्रुश्यम-२ बघितला, कन्टिन्युटी आवडली.अजयने दाढी वाढवल्याने त्याच्या चेहरा उगाच फार लाबट वाटतो, तब्बुच वय जाणवायला लागलय, अक्षय खन्ना म्हातारा दिसतो.पहिला भाग जास्त आवडला होता.यातला काही काही भाग फारच ओढुनताणून जुळवुन आणल्यासारखाही वाटला.दोन्ही मुलिमधे आणी श्रिया सरण मधे मात्र फारसा बदल जाणवत नाही.
७ वर्श घडुन गेल्यावर त्या तिघिनी पोलिसाना बघुन तेवढ्याच प्रमाणात घाबरण फारस पटल नाही
त्यावेळेस सबटायटल्स मधे "हे
त्यावेळेस सबटायटल्स मधे "हे जनरली इतकं बोअरिंग नसतं" द्यायला हवे Happy
>>Sagalyach posts rofl
फ्रेडी : कार्तिक आर्यन
फ्रेडी : कार्तिक आर्यन असल्याने बघू की नको करत लावला. पण कार्तिकने धक्का दिला. लाजरा, सोषली ऑकवर्ड, एकाकी, पारसी डेंटिस्ट मस्त उभा केला आहे. रिव्हेंज सायको थ्रिलर आहे. शेवटी शेवटी कनविनियंट प्रकारचा अतिरेक होतो तो टाळायला हवा होता. एकदा बघायला ठीक आहे.
किल्ला यावेळी पूर्ण पाहिला.
किल्ला यावेळी पूर्ण पाहिला.
अमृता सुभाष ही सिंगल मदर आहे. कोकणातल्या एका गावी तिची बदली झालीय. तिचा मुलगा या गावात खूष नाही. पुण्यात त्याला चौथीला शिष्यवृत्ती मिळाली होती. आता सातवी ला इथल्या बेशिस्त मुलांच्या शाळेत त्याचं मन रमत नाही. शाळेतल्या बाई वर्गात त्याची ओळख शिष्यवृत्ती मिळालेला हुषार मुलगा अशी करून देतात. त्यामुळे त्याला ए शिष्यवृत्ती नाव पडतं. एकदा वर्गातल्या गणितात ढ असलेल्या मुलाची मास्तर हजेरी घेत असतात. फळ्यावरचं गणित तुला या वर्षीही सोडवता येणार नाही अशी पैज लावतात तेव्हां हा शिष्यवृत्ती त्याला हळूच उत्तर दाखवतो. ढ मुलगा उत्तर देतो तेव्हां मास्तर खजिल होतात. त्यांना त्या मुलात सुधारणा करण्याऐवजी टोचून बोलण्यात सुख मिळत होतं.
उत्तर दाखवणे चूक आहे हे माहिती असूनही ते दाखवल्याने गावातली मुलं आणि त्याच्यातली दरी कमी झाली. मुलांशी मैत्री कशी करायची हे त्याला कळल, इकडे त्याची आई एका धर्मसंकटात सापडली आहे. जमिनीच्या कागदपत्रांवर बँकेची एनओसी नसतानाही व्यवहार नोंदवण्यासाठी सही करायचा दबाव तिच्यावर येतो. साळवी म्हणून कुणी तालुक्याचा तारणहार आहे. त्याला पाहून कार्यालयातले इतर सहकारी आणि अरीष्ठ सुद्धा दबावाखाली आलेले दिसतात. हिच्यावर सहीसाठी मोठा दबाव येतो. ती त्यांच्या सांगण्यावरून सही करते. पण नंतर कुणीतरी तहसील कार्यालयात तक्रार केल्याने नोटीस येते.
मुलगा बाबांना जास्त अॅटॅच असतो. आईला लवकर जायचे असल्याने तिला रात्री लवकर झोपावे लागत असे. अशा वेळी बाबा त्याला गोष्टी सांगायचा, त्याला फिरायला न्यायचा. आईला मुलासाठी वेळ नव्हता. बाबा गेल्याने अचानक दोघांचे एक असे नाते तयार झाले आही ज्यात एकमेकांशी म्हटले तर ओळख आहे पण अॅटॅचमेंट नाही. ती त्याच्या विश्वात येऊ पाहतेय.
पण त्याने त्याचे विश्व , मन चहुबाजूंनी घट्ट बंद करून घेतलेय. तिथे त्याचे बाबा आहेत. पुण्याचे सवंगडी आहेत. तिथल्या आठवणी आहेत. एका किल्ल्यासारखी अभेद्य तटबंदी आहे ज्याची कल्पना आईला नाही. एका सायकल रेसने त्याला या किल्ल्याची जाणीव होते. किल्ल्याच्या गर्भातला अंधार आणि त्याची वाटणारी भीती, तिथून दिसणारा उजेड. एकटे पडल्याने उजेडाकडे घेतलेली धाव आणि त्याक्षणी कुणाही सवंगड्याची असलेली गरज याची झालेली जाणिव पण त्याचे आकलन नाही.
किल्ल्याबाहेर येतो तेव्हां पाऊस सुरू झालेला असतो. सगळे मित्र त्याला सोडून गेलेले असतात. पुन्हा एकटेपणाची जाणिव झाल्याने पुण्याला जाण्ञासाठी त्याचा आईकडे त्रागा सुरू होतो. अशात समुद्रावर एकटा असताना एक मच्छीमार त्याला आपल्यासोबर समुद्रावर घेऊन जातो. दिवसभर मासे पक्डल्यावर संध्याकाळी किनार्यावर शेकोटी पेटवून त्यावर मासा भाजून त्याला खायला सांगतो. याला मासे खायचे नाहीत पण नाही म्हणू शकत नाही. त्याचा मान राखायसाठी चव बघतो ती आवडते. तिथे त्याच्याशी झालेल्या संभाषणानंतर त्याला चुका समजत जातात. तिथून तो आईला आपल्या किल्ल्यात प्रवेश देतो....
नितांत सुंदर सिनेमा आहे. कोकणचं छायाचित्रण, कलाकारांचे अभिनय. छायाप्रकाशाची योजना अगदी बारीक विचार केला आहे. कोकणातला पाऊस तुंबाडसारखाच सुंदर टिपला आहे. समुद्राचे सुरूवातीचे खवळलेले रूप आणि नंतरचे शांत स्वरूप. अर्थात ही प्रतिके क्लिशे आहेत. तरीही चालण्यासारखी आहेत.
संथ लय ही कुणाला नकारात्मक बाजू वाटू शकते, पण चित्रपटाची ही लय त्याची जान आहे. ती कमी किंवा जास्त झाली तर सगळंच बिघडेल.
अमृता सुभाषचा अभिनय उत्कृष्ट आहे. पण तिचा आंबट चेहरा सतत बघवत नाही हे सांगायचे धाडस केले पाहीजे.
चित्रपटावर सविस्तर लिहायचे
चित्रपटावर सविस्तर लिहायचे असेल तर वेगळा धागा काढायचा हा नियम मोडल्याबद्दल क्षमा असावी. चार पाच ओळीतच लिहायचे होते पण मोठी पोस्ट झाली.
एक प्रश्न नेहमी पडतो. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे हे मान्य केले की त्याच्या समाधानासाठी त्याने गोदावरी, किल्ला, ख्वाडा असे चित्रपट बनवले की त्याला प्रेक्षक मिळत नाही. दुसरीकडे मराठीत चांगले चित्रपट का बनत नाहीत अशीही ओरड होते. धंदा झाला नाही तर असे चित्रपट कसे बनवता येतील ? नाहीत बनले तर प्रेक्षकाची आवड तरी कशी बदलेल ? हे एक अवघड कोडं आहे.
छान पोस्ट रघू आचार्य
छान पोस्ट रघू आचार्य
किल्ला मलाही आवडलेला
संथ असेना, पण तो संथपणा आवडत असेल तरच निवांतवेळी त्या चित्रपटाकडे वळावे.
कोकणचे चित्रीकरण सुंदर आहे. भपकेबाज सौंदर्याऐवजी सादगी आवडत असेल तर जरूर ते चित्रीकरण आवडेल.
ज्यांनी आईवडीलांच्या सततच्या बदलीमुळे असे शाळाबदलाचे अनुभव घेतले असतील त्या मुलांना फार रिलेट होईल. मला माझे शाळेतले एक दोन मित्र आठवले होते.
'किल्ला' पोस्ट आवडली.
'किल्ला' पोस्ट आवडली.
मलाही सिनेमा आवडला होता.
'ग्रीन बुक' पाहिला (फायनली).
'ग्रीन बुक' पाहिला (फायनली). आवडला.
महेरशाला अलीला ऑस्कर मिळालंय, पण मला मॉर्टेन्सेनचं काम जास्त आवडलं.
म.अलीचे एलोक्वेन्ट इंग्रजी उच्चार आणि मॉ.चं इटालियन-मिश्रित स्ट्रीट इंग्लिश याचं कॉन्ट्रास्ट सिनेमाभर जाणवतं, तेच मला फार आवडलं.
ब्रॅड पिट चा बुलेट ट्रेन आलाय
ब्रॅड पिट चा बुलेट ट्रेन आलाय नेफि वर. one time watch..वीकेन्डला रात्री बसून २ तासात सम्पतो..मस्त वेगवान आहे. डार्क कॉमेडी आवडत असल्यास नक्की बघा.
अमित, 'कला' सुचवल्याबद्दल
अमित, 'कला' सुचवल्याबद्दल धन्यवाद! भारी आहे !
धन्यवाद , ललिता प्रीति /
धन्यवाद , ललिता प्रीति / ऋन्मेष
कुणी बाराह आणा पाहीला का?
कुणी बाराह आणा पाहीला का? कृपया एंड काय आहे ते सांगावे.
दोन सीरियन बहिणींनी
दोन सीरियन बहिणींनी दमास्कसमधील युद्धग्रस्त घरातून पळ काढला, रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी ग्रीसमध्ये आश्रय साधक म्हणून पोहोचण्यासाठी खडबडीत भूमध्य समुद्रात तासनतास पोहून.
>>>>
काल हा चित्रपट पाहिला. द स्विमर. बरा वाटला. सिरीयावर पाहिलेला हा दुसरा चित्रपट. पहिला टायगर श्रॉफचा बागी पाहिलेला. तरी हा ईंग्लिश सबटायटल्स वाचत पाहिला हे विशेष.
काल नेफ्लिवर द स्विमर्स
काल नेफ्लिवर द स्विमर्स बघितला. दोन सिरिअन बहिणींची कथा. युस्रा आणि सारा. दोघी बहिणी स्विमर्स असतात पण धाकटी सारा अव्वल असते. ऑलिंपिक मधे स्वतःच्या देशाचं नेतृत्व करण्याचं तिचं स्वप्न असतं. वडिल प्रशिक्षण देत असतात पण सिरीयातल्या युद्ध्यजन्य परिस्थितीत त्यांचा काही निभाव लागणार नाही हे वडीलांना कळताच ते त्यांना सिरियाबाहेर जाण्याचा सल्ला देतात.
तिथून बाहेर पडण्यापासून ते रेफ्युजी टीम ऑलिंपिक्स मधे पोचण्यापर्यंतचा तिचा थरारक प्रवास हे नक्कीच बघण्यासारखं आहे. तिची बहिण आणि चुलतभाऊ यांच्या साथीने काय काय करत ते जर्मनी, ब्राझिल पर्यंत पोचतात. रेफ्युजींचं आयुष्य अनुभवतात. सुदैवाने पुढे तिला चांगला ट्रेनर मिळून पुढची ऑलिंपिक पर्यंतची वाटचाल ती करते.
फार फार आवडला हा सिनेमा. बहुतेक खर्या कहाणीवर आहे. मोटिवेशनल आहे एकदम.
दंगलची खूप आठवण होत होती समहाऊ बघताना.
पण धाकटी सारा अव्वल असते.
पण धाकटी सारा अव्वल असते.
>>
युस्रा अव्वल असते ना.. सारा रेफ्युजीची हेल्प करायला जाते..
काल नेफ्लिवर द स्विमर्स
काल नेफ्लिवर द स्विमर्स बघितला. दोन सिरिअन बहिणींची कथा. युस्रा आणि सारा.
>>>
सत्यकथा आहे.
हे पहा - https://www.maayboli.com/node/78494
युस्रा अव्वल असते ना.. सारा
युस्रा अव्वल असते ना.. सारा रेफ्युजीची हेल्प करायला जाते..>>>> येस्स सॉरी चुकून लिहिलं. संपादनाची वेळ गेली.
त्यावेळेस सबटायटल्स मधे "हे
त्यावेळेस सबटायटल्स मधे "हे जनरली इतकं बोअरिंग नसतं" द्यायला हवे >>> फा टोटली फुटले..पुणे५२ पाहिलेला असल्याने सर्व प्र.क्री. ना
काल रात्री 'कला' बघितला..
काल रात्री 'कला' बघितला.. रात्रीचा बघितल्याने की काय पण जरा जास्तच डिप्रेसिंग वाटला. बराच प्रेडिक्टेबलही वाटला. खास करून ते कट्यार काळजात घुसली मधे जे दाखवलेलं त्या टाईप्स इथेही असंच होणार हि कल्पना दूधाच्या ग्लासपासूनच आलेली. आई तर कायच्या काय क्रूर दाखवली आहे. डिसेंबरमधे मला छान हॅप्पी हॅप्पी मुव्हीज बघायला आवडतात त्यामुळे हा फार काही झेपला नाही.
म्हाळसा
म्हाळसा
+७८६
प्रेडीक्टेबल आणि डिप्रेसिंग दोन्ही मुद्द्यांना अनुमोदन
सविस्तर नंतर लिहितो. वाटलेच तर..
त्याचा वेगळा धागा आहे
डिसेंबरमधे मला छान हॅप्पी
डिसेंबरमधे मला छान हॅप्पी हॅप्पी मुव्हीज बघायला आवडतात
>>>
ईंग्लिश ख्रिसमस मूवी का
याचा वेगळा धागा काढा ना कोणीतरी..
आमच्याकडेही हेच चालू असते
प्रेडीक्टेबल आणि डिप्रेसिंग>>
प्रेडीक्टेबल आणि डिप्रेसिंग>> मला वाटलं मीच एकटी आहे की काय. काही संदर्भ फार भारी वाटले आणि काही त्या धाग्यातून कळले. पिक्चर च्या बाबतीत मी आजकाल जास्तच picky झालेय असं वाटायला लागलय.
प्रेडीक्टेबल आणि डिप्रेसिंग >
प्रेडीक्टेबल आणि डिप्रेसिंग >>> अगदी अगदी. मला ट्रेलर पाहूनच वाटलं होतं तसं. त्यामुळे मी हा पिक्चर पहायच्या भानगडीत पडलेच नाहीये.
डिसेंबरमधे मला छान हॅप्पी हॅप्पी मुव्हीज बघायला आवडतात >>> मलाही!
ईथल्या पोस्ट भारी आहेत एकेक.
चित्रपट एक कलाकृती म्हणून चांगला आहे वा असावा. पण मला आवडला नाही.
प्रामुख्याने दोन कारणे.
१) डिप्रेसिंग आहे फार.
त्यात घडणाऱ्या घटना आणि चित्रपटाची फ्रेम सारेच असे आहे की एकत्रित परीणाम मन उदास करते. आणि आता काही अशुभ घडेल असे वाटत राहणारा हा मूड चित्रपटभर राहतो.
मला अंतर्मुख करणारे चित्रपट आवडतात. ते विचारांना नवी दिशा देतात. पण याने नैराश्य दिले असे वाटले. चित्रपट बनवणाऱ्याचा हाच हेतू असेल तर तो साध्य झाला आहे म्हणून शकतो. पण का? हा प्रश्न उरतोच. अश्या चित्रपटाच्या वाटेला गेलो हि माझीच चूक. नॉट माय टाईप समजायला हवे होते. पण बघितले तर बघतच राहिलो. ज्यांना डिप्रेशन आणणारे चित्रपट नाही झेपत त्यांनी टाळावे हा सल्ला.
२) प्रेडीक्टेबल आहे.
कथानकात नावीन्य नाही असे नाही. पण जे घडते ते फार प्रेडीक्टेबल वाटते. अगदीच धक्कातंत्र नको होते. पण आता काय घडणार याचा अंदाज आधीच येत राहतो. कदाचित त्यामुळेच वर जे मी म्हटलेय की अशुभाची चाहूल आधीपासूनच लागल्याने नैराश्य दाटून येत असावे.
असो. यावर उतारा म्हणून चित्रपट संपताच लगेच दुसरा हलकाफुलका चित्रपट बघायची ईच्छा झाली होती. पण रात्र झाली असल्याने थोडेफार पोरांशी खेळून झोपून गेलो. थोडक्यात मूड चेंज करणे गरजेचे वाटले..
पारा दुधात विरघळतो का पण?
पारा दुधात विरघळतो का पण?
आणि पारा खाऊन कोणाचा आवाज permanently जाऊ शकतो का?
जुन्या काळच्या 'गाणाऱ्या बायका' हायफाय इंग्लिशमध्ये बोलत असत?
भारतातल्या इमारतींवर गार्गॉयल्स पाहिलेयत कोणी?
की हे सगळं अल्टरनेट युनिव्हर्स मध्ये घडतंय?
Pages