चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

चमेली की शादी मस्त टाईमपास पिक्चर आहे.अनिल कपूर,पंकज कपूर, अन्नू कपूर, अमृता सिंग, लुडका लुडकी म्हणणारा चांगला अमजद खान सगळ्यांनी धमाल केलीय.

मायबोलीमुळे मुलंही शहाणी होतात >>> सहमत.
पण काही माबोकर शेवटी बापच असतात. त्यांना आधीच कल्पना असते की जेव्हा आपला टिंग्या मोठा होईल तेव्हा आपले लिखाण वाचून आपल्या बद्दल काय विचार करेल?
बाबा तुम्ही? तुम्हीच का ते? तेच का तुम्ही?
म्हणून त्यांनी मायबोलीवर जन्म घेतानाच पोराच्या बापालाही पत्ता लागणार नाही असे आयडी घेतलेत. बाबांचै मुलांपुढे एक कॅरेक्टर असते आणि बाहेर दुसरे.
आयांचं तसं नसतं. कोण काय म्हणेल याचा विचार न करता सोबत आलेल्यांना लाज येईल असं बार्गेनिंग करताना, टू व्हीलर चालवताना ब्रेक सोबत विमानाच्या चाकाप्रमाणे दोन्ही पाय बाहेर काढून घासताना न लाजणारी आई वेडं वाकडं मत मांडताना लाजणे शक्यच नसते. उलट टोपण नाव घेतलं तरी फटकारण्याच्या तीव्रतेवरून " अरेच्चा! ही आपली आई तर नसेल?" असं बोलणी खाऊन मोठ्या झालेल्या मुलांना ओळखता येणे अशक्य नाही.

खुषाली कुमारी म्हणून ही नवीन मुलगी अगदी चकचकीत व मख्खं वाटली. >>>

टी-सिरीज चा घरचाच प्रॉडक्ट असल्याने हि येते काही वर्ष डोळ्या समोर येतच राहील.

तसेही हे सिनेमे म्हणजे भूषण कुमार ने बायको किंवा बहिणीनींचा वेळ जावा म्हणूनच काढलेले असतात.

टी-सिरीज चा घरचाच प्रॉडक्ट असल्याने हि येते काही वर्ष डोळ्या समोर येतच राहील.
>>>हे माहिती नव्हते, अक.

'पल्लू उपर करो' , बघितले >>> Happy नंतर संजीव कुमारने फोन ठेवल्यावर सुद्धा त्याची बायको (देवश्री रॉय?) - नीता मेह्ता.

साप नेमके कोणी चोरले ? गौरव मोरे ने तर तमंग आणि राधिका आपटे ने कसे वापरले ?
निशी आणि अरविंद चा dna पोलीस बाजूला काढून ठेऊन असतात ?

मी इतके दिवस हा धागा वाचत होतो तेव्हा प्रश्न पडला होता की हास्यजत्रेतला गौरव मोरे हिंदीत कधीपासून काम करायला लागला? शेवटी त्यासाठी पिक्चर बघितला मी Lol

हृषीकेश मुखर्जींच्या चित्रपटांची नावं आलेली पाहिलं. त्यांच्या चित्रप टांचा आस्वाद घेणारं एक पुस्तक वाचलं. त्या लेखकाच्या मते त्यांचा बेस्ट चित्रपट बीवी और मकान. यु ट्यूबवर आहे. इच्छुकांनी पहावा.
मुखर्जींना सांधेदुखी होती त्यामुळे चित्रपटांचं बरंचसं शूटिंग इन्डोर - तेही त्यांच्याच बंगल्यात होत असे. असं त्या पुस्तकात म्हटलं होतं. गोलमाल बहुतांश भाग त्यांच्या बंगल्यात शूट झालाय.

Kannathil Muthamittal - तमीळ , नेटफ्लीक्स

नक्कीच बघावा असा सिनेमा. नाव मी तरी नव्हतं ऐकलं पण मणीरत्नमचा वन ऑफ द फायनेस्ट मूव्ही आहे. एक छोटी मुलगी तिचे दोन धाकटे भाऊ आणि त्या तिघांवर खूप प्रेम करणारे आईबाबा. सगळं छान चालू असतं पण नवव्या वाढदिवसाला बाबा तिला सांगतो की ती त्यांची दत्तक मुलगी आहे. तिच्या चिमुकल्या जगात प्रचंड उलथापालथ होते, अनेक प्रश्न पडतात तिला. काही उत्तरे आईबाबांकडून मिळतात. तिचे जन्मदाते आईबाबा हे श्रीलंकन असतात. बाबा संघर्षात मारला जातो आणि आई थोड्या दिवसांकरता भारतात आश्रयाला येते. मुलीच्या जन्मानंतर मात्र तिला फार राहता येत नाही. इतकं कळाल्यानंतर ती मुलगी जन्मदात्या आईला भेटायचा ध्यास घेते. पुढे काय होते ते सिनेमात सांगितले आहे...

२००२ साली आलेल्या सिनेमातला काळ मात्र श्रीलंकेत घडलेल्या संघर्षाचा आहे, चेन्नईचे नाव मद्रास असल्याचा आहे. कॅमेर्‍याला सुंदर काही टिपायला खूप वाव होता - रामेश्वरमचा पूल, श्रीलंकेतलं जंगल असे काही शॉट्स वाया गेले म्हणून छायाचित्रांचे शौकीन क्षणभर हळहळतील - पण ते क्षणभरच. मणीरत्नम संपूर्ण चित्रपटात असे काही क्षण पेरतो की दुसरं काही फारसं लक्षात रहात नाही. बाबा आईला लग्नाची मागणी घालतो तेंव्हा "तुझं माझ्यावर प्रेम आहे की त्या अनाथ बाळाकरता माझ्याशी लग्न करतो आहेस" हा प्रश्न, 'तुझ्या' आईला नक्की भेटवीन असं बाबा सांगतो तेंव्हा आईच्या डोळ्यातले भाव, छातीशी कवटाळणे, पापी घेणे असं काहीही न करता जन्मदात्या आईने आपल्याला बोटाने फक्त ओझरता स्पर्श केला होता हे कळल्यावर त्या चिमुकलीच्या डोळ्यातले भाव (हा क्षण तर रिवाईंड करून ३ वेळा बघितला मी) असे अनेक मोमेंट्स आहेत. आणखी एक आवडलेली गोष्ट म्हणजे आईचं प्रेम आणि बाबाची माया यातला फरक दाखवून देणारे क्षण - ना कम ना जादा पण दोघांच्या प्रेमात फरक असतो हे नक्की.

अभिनय तर सगळ्यांचाच बावनकशी आहे - अगदी माधवनचा पण. (कॉलेजच्या दिवसात त्याची 'बनेगी अपनी बात' ही मालिका यायची. आम्ही फिरदोस दादीचे पंखे होतो आणि माधवन ठोकळा वाटायचा आम्हाला, मुलींचं म्हणणं आमच्या उलट असायचं) पण सगळ्यात कमाल केली आहे ती त्या चिमुरडीने - किर्थनाने. कुठेही आगाऊ न वाटता बालकलाकाराचा इतका सुंदर अभिनय क्वचीतच बघायला मिळतो.

आठवला हा पिक्चर. टीव्हीवर सुरू होता आणि तुकड्यांत पाहिला होता. मणी रत्नमचा आहे हे माहीत नव्हते.

You don't mess with the zohan नेटफलिक्स वर पहिला !
Adam sandier आणि John turturro च्या अभिनयाने नटलेला मस्त विनोदी मूव्ही , कुरकुरीत संवाद , हिंदी डब पाहिला तर अजून जास्त मजा !
इस्रायली आणि पॅलेस्टाईन सुपर ह्युमन मधील संघर्ष विनोदी पद्धतीने कोणत्या टोकाला जातो ते पडद्यावर पाहण्यातच खरी मजा !
न्यूयॉर्क मधील पॅलेस्टाइन टॅक्सी ड्राईव्हर गँग चा हैद्राबादी टोन सिनेमातील सर्वोच्च शिखर ....
बरेचसे डायलॉग जास्तच कुरकुरीत असल्यामुळे हेडफोन लावूनच बघा !!!!

धोखा आज घरात लावलेला असल्याने पाहिला. वीकडेज मधे तसाही पाहून झाला नसता.
होस्टेज सिच्युएशन आणि त्याला वेगवेगळे तडके, फोडण्या अशा मालिका, सिनेमे आता माहीत होऊ लागलेत. (नीरजा वगैरे विमान ओलीस धरणारे वेगळे).
हॉटस्टारवरच होस्टेज मालिकेचे दोन सीझन्स आहेत. एक मध्यंतरी संजय दत्तचा मूव्ही होता. त्यात त्याचा मुलगा हॉस्पिटलमधे असतो, एक नवाजुद्दीन कि इरफान खानचा होता. अशा मूवीज मधे एक स्टोरी त्या दहशतवाद्याची असते, एक एक स्टोरी त्या कहानीतल्या पात्रांची असते. यामी गौतमीचा पण एक मूवी इतक्यात येऊन गेलाय. त्यामुळे खूप काही वेगळा मूवी नव्हता.

हा खूपच प्रेडीक्टेबल निघाला. हे असे धक्के असणार हे ठाऊक होतं. असे मूवीज ब्रिलियंट असल्याचा आव आणतात प्रत्यक्षात मीडीया चॅनेल्सचा तडका, एक तडका राजकारणाचा या मार्गाने जातात. यात शेवटी उगीचच धक्के दिलेत. कोणता पोलीस अधिकारी आपली सर्विस रिव्हॉल्वर अशी देऊन टाकेल ? एकटाच कसा व्हॅन मधे बसेल ? अशा स्थितीत पळालेल्या कैद्यासाठी मलिकची चौकशी होत नाही. उलट त्यालाच मिशन वर पाठवले जाते. वर होस्टेज सिच्युएशन असताना इमारतीत कुठेच फोर्स दाखल होत नाही. पिक्चर मधे तो ठराविक वेळाने खिडकीत येत असतो. मधल्या काळात पोलीस इमारतीत, जिन्यात का दाखल होत नाहीत ?

ना विनोदाचा शिडकावा, ना मनोरंजन मूल्य. ताण ठेऊ पाहिलाय तो फसलाय. घिसीपिटी हाताळणी वाटली. एकदा सुद्धा पाहण्यासारखा नाही. चार पाच दिवसांपूर्वी सेम सिच्युएशनवर पाहिलेला धमाका यापेक्षा बरा होता.

ती बाई खुशाली एकदमच यामी गौतम सारखी दिसते.
पदर पडणं बघून खरोखरच अशोक सराफ चा पदरावर फेव्हीकोल वाला सीन आठवलाच.
इतका भोळा भाबडा निरागस अतिरेकी मुळात अतिरेकी पणाची इंटर्नशिप चालू करताना इंटरव्ह्यू घेऊन नापास करायला हवाय.

मीही नेटफ्लिक्सवर बघितला धोका धोखा, राउंड ड कॉर्नर . हे 'राउंड ड कॉर्नर' कशासाठी , नुसताच 'धोखा' द्यायचा! >>> Lol
अस्मिता, राभु, मी अनु तुमच्या धैर्याला आणि चिकाटीला सलाम. अशा नावाचा सिनेमा काढणार्‍यांनाही त्यांच्या मेहनतीचा मेहनताना म्हणून पाहिला असाल तर आपके जज्ज्बे को सलाम (असंच म्हणतात ना हिंदी / उर्दूत ?) , ज्यांना प्रॉडक्टचे नाव देतानाच "कंटाळा द बोरडम" येत असे ल त्यांचे चित्रपट कसे असतील ? या विचाराने बघत नव्हतो.

खरं तर पूर्वी दाग - द फायर अशा नावाचे मूव्ही यायचे. मिसाईल डागणे तसे फायर डाग असे वाटायचे. कारण डाग आणि विस्तवाचे नाते काय हे कळायचे नाही. इम्तेहान द अ‍ॅसेसमेंट, लव्ह का द एंड वगैरे मूवी यायचे बंद झाले असे वाटत असतानाच हा मूवी आल्याने भुतावळ पुन्हा जागी झाली आहे हा इशारा मिळाला. सावध रहा.

रात्री २ नंतर सकाळी ७ वाजल्यानंतर पहिला प्रतिसाद.
आज सकाळी साडेआठ नंतर आत्ता १०.४० पर्यंत प्रतिसाद नाही. धाग्याचं काही खरं नाही.

असेही एकदा व्हावे - युट्युबवर पहाते आहे.
उमेश कामत गोड आहे की दिसायला Happy प्रिया बापट व त्यांची जोडी छान दिसते आहे.
मस्त वाटतोय सिनेमा.

मीही नेटफ्लिक्सवर बघितला धोका धोखा, राउंड ड कॉर्नर . हे 'राउंड ड कॉर्नर' कशासाठी , नुसताच 'धोखा' द्यायचा! >>> Lol हिंदी आणि मराठीच्याही - या टॅगलाइन फार बोअर करतात. हिंदीतल्या काहीतरी कूल इंग्रजी उपनाव आणायचा आटापिटा असलेल्या वाटतात, तर मराठीच्या प्रचारकी -आपल्याला ज्ञान पाजणार्‍या.

People you hate at weddings - बहुधा प्राइमवर आहे. थोडा पाहिला. मजेदार वाटतो. खूप ब्राउजिंग केल्याने नक्की कोठे होता लक्षात नाही Happy

हुरडंग आत्ताच बंद करू मगच बंद जरू म्हणत चांगला सव्वा तास पाहिला.
काल गॉडफादर ( तेलुगू - हिदी डब्ड) आख्खा पाहिलाय. कॉन्फिडन्स वाढला होता.

You don't mess with the zohan नेटफलिक्स वर पहिला !
Adam sandier आणि John turturro च्या अभिनयाने नटलेला मस्त विनोदी मूव्ही , कुरकुरीत संवाद , हिंदी डब पाहिला तर अजून जास्त मजा !
इस्रायली आणि पॅलेस्टाईन सुपर ह्युमन मधील संघर्ष विनोदी पद्धतीने कोणत्या टोकाला जातो ते पडद्यावर पाहण्यातच खरी मजा !
न्यूयॉर्क मधील पॅलेस्टाइन टॅक्सी ड्राईव्हर गँग चा हैद्राबादी टोन सिनेमातील सर्वोच्च शिखर ....
बरेचसे डायलॉग जास्तच कुरकुरीत असल्यामुळे हेडफोन लावूनच बघा !!!!

नवीन Submitted by फुरोगामी on 23 November, 2022>>>>

वाक्यावाक्याशी सहमत... विशेषतः शेवटच्या.. मी हा बघत असताना मुलगा बाहेरून आला आणि " आई, हे काय बघतेयस" हा जो लूक दिला तो अजूनपर्यंत विसरले नाहीय...

काल अर्धसत्य पाहिला. ज्या वेळी आला त्या वेळी मुलांना नाही आवडणार म्हणून आम्हाला कुणी दाखवला नव्हता. नाहीतरी त्या वेळी ओम पुरी, नासूरूद्द्दीन शाह, शाम बेनेगल, गोविंद निहलानी ही नावं ऐकून कधी पिक्चर बघावेसे वाटायचे नाही. बाकीचे सगळे सिनेमे दर वर्षी रि रन ला यायचे पण हा आल्याचं आठवत नाही. नंतर टीव्हीवर आल्याचं माहिती नाही. कालपर्यंत एकदाही पाहिला नव्हता.

त्यानंतर या विषयावर कितीतरी सिनेमे येऊन गेले. त्यातले कमर्शिअल बरेच पाहिले. घायल सर्वात जास्त गाजलेला. पण अर्धसत्यचा काळ पाहता आजही या विषयावरचा सर्वात सुंदर आणि समतोल वाटला. ओम पुरी तर ग्रेटच... शफी इनामदार पण आवडून गेले.

रघु

अर्धसत्य आवडला असेल तर द्रोहकाल हि बघा.

निहलानी / ओम पुरी / नासिर चा अजून एक भारी सिनेमा.

अक, बघतो. धन्यवाद. टीव्हीवर बहुतेक आलेला आहे असे वाटते.

कांतारा हिंदी ओटीटीवर तर नाही दिसत. इथे युट्यूबवर आहे असं दाखवतंय.
त्यातल्या एकाची प्रिंट चांगली नाही. दुसर्‍याची क्वालिटी चांगली दिसतेय.
युट्यूबवाले उडवतात अशा प्रिंटस.

Pages