४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नाहीच.
पण अडचण अशी आहे की व्हाईट सुप्रिमसिस्ट न रॅप येतच नाही! त्यांना ब्रेक डान्सिंग येत नाही, बरेच काही काही येत नाही काळ्या लोकांसारखे.
आता काळ्या रिपब्लिकन लोकांपैकी कुणी ब्लॅक लोकांना मारा, ठोका, जमल्यास बलात्कार वगैरे करा. पण हे सर्व तो रॅप मधून गायला, तर हरकत नाही. पण रिपब्लिकनांत एव्हढे हुषार लोक कुठून आणायचे?
मला वाटते मोरोबा, तुमच्यासारख्या हुषार माणसांना चांगली संधी आहे. तुम्ही करा मदत.

मला वाटते मोरोबा, तुमच्यासारख्या हुषार माणसांना चांगली संधी आहे. तुम्ही करा मदत. >> Lol मोरोबा, व्हाईट सुप्रीमिस्ट सध्या साध्या भाषणांमधेही हे सांगत आहेत आधीच. सध्या तात्या पण त्याच पंथाला लागला आहे. तात्या मिच बद्दल काय बोलले दोन दिवसांपूर्वी ह्याची कल्पना असेलच ना

कोको चाओ Happy

हे त्याच्याबरोबर काम केलेल्या, आणि अजूनही काही वितुष्ट वगैरे नसलेल्या व्यक्तीबद्दल. अर्थात क्रूज च्या बायकोबद्दल जे बोलला होता त्यामानाने हे काहीच नाही.

अर्थात क्रूज च्या बायकोबद्दल जे बोलला होता त्यामानाने हे काहीच नाही. >> बापाबद्दल पण बोलला होता. अर्थात क्रूज कोडगा असल्यामूळे त्याला काहीच फरक पडत नाही म्हणा. स्टेट मधे प्रॉब्लेम आला कि कँकून ला पळणारा माणूस तो ......

मार-ला-गो च्या केस मधे त्या कॅनन ने परस्पर मुदतवाढ दिली आहे डिअरीला त्याने मागितलेली नसताना. उगाच मिड टर्म मधे ही भानगड नको म्हणून. बॅटसमन ने मागितलेला नसताना अंपायरने बॅड लाइट ऑफर करण्यासारखे आहे हे Happy आणि त्याहून पुढे जाउन ट्रम्प टीमने कागदपत्रांबाबत कोर्टात कसलाही क्लेम करायची गरज नाही असेही सांगितले आहे. म्हणजे फॉक्सवर व इतरत्र सगळीकडे बिनधास्त फेकाफेकी करा की आम्ही कागदपत्रे डिक्लासिफाय केली आहेत, एफबीआयने प्लॅण्ट केली आहेत वगैरे वगैरे. कोर्टात त्याबद्दल बोलायची गरज नाही. कोर्टाबाहेर मागा पब्लिकला उल्लू बनवणे चालू द्या Happy

बाकी डेम्स वाल्या शहरांमधे क्राइम वाढलेला आहे हे एक नॅरेटिव्ह फॉक्स वाले सेट करत आहेत. ते आणि इमिग्रेशनबद्दलचे त्यांचे आरोप - यात नक्की किती तथ्य आहे? डेम्स या दोन्ही बाबतीत भोंगळपणा करू शकतात हे नक्की. पण गेल्या दोन वर्षांत फॉक्स ने इतकी धादांत खोटी नॅरेटिव्हज पसरवली आहेत की त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही.

आपल्याला काय फरक पडतो?
अमेरिकन राजकारण म्हणजे अफ्रिकेतल्या किंवा दक्षिण अमेरिकेतल्या एखाद्या देशासारखे झालेले आहे. कसली लोकशाही नि कसली घटना?
जो उठतो तो मनाला येइल ते बोंबलतो. उघड उघड गुंडगिरीला आता जास्त वेळ नाही, केंव्हाहि सुरु होइल.
डेमोक्रॅट काय नि रिपब्लिकन काय, राजकारणी नालायक.

कशाला आपण त्यावर चर्चा करायची?

स्पाय एक्स्चेंज करतात तसे करा म्हणावं. लिझ घेऊन तुलसी द्या.

बाकी तात्या म्हणजे टोटल व्हॉट्सअ‍ॅप अंकल झाले आहेत आता. बुश (सिनीयर) ने बोलिंग अ‍ॅली/चायनीज रेस्टॉ मधे सिक्रेट डॉक्युमेण्ट्स नेली. कार्टर ने अशीच कोठे कोठे नेली आणि काय काय. उद्या नासाने मला सर्वात भारी प्रेसिडेण्ट म्हणून डिक्लेअर केले आहे म्हणून सुद्धा सांगेल.

मागाचा नवीन लाँग फॉर्म - मेक अ‍ॅटर्नीज गेट (देअर ओन) अ‍ॅटर्नीज झाला आहे असे ऐकले Happy क्रिस्टिना बॉब सध्या त्या मार्गावर आहे. इतरांनीही स्वतःचे लॉयर्स घेतले आहेत.

<<बुश (सिनीयर) ने बोलिंग अ‍ॅली/चायनीज रेस्टॉ मधे सिक्रेट डॉक्युमेण्ट्स नेली.>>
यात थोडे तथ्य आहे. बुश (सिनीयर) ची लायब्ररि जेथे आहे तिथे पूर्वी चायनीज रेस्तॉ होते. आता जेंव्हा ती डॉक्युमेंट्स नेली तेंव्हा ते तिथे नसेल, पण मायनर डिटेल!!
शिवाय ते तात्याचे सपोर्टर, त्यांच्या अकला तेव्हढ्याच!

>>> नासाने मला सर्वात भारी प्रेसिडेण्ट म्हणून डिक्लेअर केले आहे म्हणून सुद्धा सांगेल.
इन द एन्टायर युनिवर्स!! Lol

यात थोडे तथ्य आहे. >>> यापुढचे वाचत नाहीत लोक, नंद्या७५ Happy फॉक्स त्यांना एक सोपे वाक्य चघळायला देते तेच घेउन बसतात Happy

इन द एन्टायर युनिवर्स!! >> लोल हो. दोन दोन तास सध्या भाषण करतो तात्या. पण कोणाच्याही प्रमोशन करता गेलेला असो, स्वतःचीच दर्दभरी दास्तान सांगत बसतो. "ते म्हैशीचा काय झाला, पण हरचंद पालवाच्या कपाटाची बिजागरी गंजून खल्लास, काय?" सारखे. म्हणे माझ्याइतका कोणत्याच प्रेसिडेण्टला त्रास दिलेला नाही. एक दोघांचे खून झालेत. एकाला राजीनामा द्यावा लागला. पण ते सोडा. हा बोलतो आणि मागे भाविक लोक माना डोलावतात.

या लोकांचं ट्रम्प बद्दलचं ऑब्सेशन काही समजत नाही बुवा. जो माणूस दोन वर्षांपूर्वीच पायउतार झाला आणि आता परत येण्याची कोणतीही शक्यता नाही त्याच्याबद्दल एवढे ऑब्सेस्ड का असावेत? कुठलाही विषय असो, ट्रम्प पर्यंत नेऊन भिडलाच पाहिजे. ब्रेक अप नंतर एखादा माणूस गर्लफ्रेंडच्या आठवणीत बुडून गेलेला असावा त्याप्रमाणे 'माझा ट्रम्प काय करत असेल आता? जेवला असेल का' अशा विचारांत ट्वेन्टीफोरबायसेव्हन मग्न असतात.
यांचे लीडरही दर थोड्या दिवसांनी ट्रंपचं काहीतरी प्रकरण उकरून यांच्यासमोर आणून टाकतात, म्हणजे मग इतर प्रश्नांवरून लक्ष डायव्हर्ट करायला बरं. ते मग चार दिवस यांना चघळायला पुरतं. सध्या काय तर ट्रम्प कसलीतरी कागदं घरी घेऊन गेला त्यावरून बळेच रामायण चालू आहे.
"महागाईने कहर केलाय. एखाद्या थर्ड वर्ल्ड कंट्रीला लाजवेल असा इन्फ्लेशन इंडेक्स चालू आहे"
"हो, पण तो ट्रम्प कसलीतरी कागदं घरी घेऊन गेला म्हणे"
"स्टॉक इंडेक्स २०२० च्या लेव्हल ला उतरलाय. रिसेशन इमिनंट दिसतंय"
"हो, पण ती कसलीतरी कागदं.."
"इंधनाचे भाव खाली उतरायला तयार नाहीत. म्हातारबावर स्ट्रॅटेजिक रिझर्व मधून इंधन उपसण्याची आणि व्हेनेझुएला सारख्या देशांकडे पदर पसरायची वेळ आलीय."
"हो, पण ती कागदं.."
"आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिकेचा काही दाब उरला नाहीये. तो पुतिन अमेरिकेला ठेंगा दाखवून धुडगूस घालतोय."
"पण कागदं..."
"इल्लिगल इमि..."
"कागदं..."

मोरोबा Lol

बरं is it too early to speculate about २०२४? बायडन पुढच्या महिन्यात ८० पूर्ण. मग तो परत दोन वर्षांनी लढणारे का? दुसरं कोण? कमलादेवी हिंमत करतील का? तो एक गे मेयर असतो नेहमी तो असेल का? बरणीआजोबा तेव्हा ८३ असतील सो परत लढतील असं वाटत तरी नाही.
आणि जीओपीकडून परत तात्यासाहेब? तो आत्ता ७६ वय आहे. किंवा तो फ्लॉरिडावाला जो खूप लोकप्रिय आहे.
तसे दोन्ही पक्षांकडे गव्हर्नर आहेत अनुभवी. त्यातलं कोणी असेल तर बरं निदान अनुभव तरी आहे.

निवडणूक पार पडल्यानंतर दीड वर्ष फॉक्स तेच धादांत खोटे रडगाणे गात होते. त्यांच्या अधिकृत उत्तराप्रमाणे "त्याला न्यूज व्हॅल्यू होती". तात्याला तशीच न्यूज व्हॅल्यू आहे.

बाकी कसलीतरी कागदं वगैरे प्लेडाउनगिरी असू दे. पण कोणीतरी कधीतरी टॉप सिक्रेट कॅटेगरीज लावल्या होत्या तर निदान पब्लिकला चेक करू दे काही गडबड आहे का? इन फॅक्ट ते फक्त कागद मागायला आले होते. यानेच कांगावा केला. गपचूप देऊन टाकायचे होते. इतकी न्यूज व्हायचीच गरज नव्हती. जितके जास्त नाटक तितका जास्त संशय.

आता तर "डील" करतोय. आर्ट ऑफ अ डील. कागदपत्रे परत देतो त्याच्या बदल्यात तुम्ही घेतलेली द्या.

हा सीन आठवला Happy
https://www.youtube.com/watch?v=uxviBxaSjyc&t=42s

बाकी पुतिन विरूद्ध बायडेन बोलतोय तरी. तात्याने स्वतःच्या एफबीआयची नाचक्की केली होती पुतिनसमोर.

या लोकांचं ट्रम्प बद्दलचं ऑब्सेशन काही समजत नाही बुवा. जो माणूस दोन वर्षांपूर्वीच पायउतार झाला आणि आता परत येण्याची कोणतीही शक्यता नाही >> नक्की खात्री आहे परत उभा राहणार नाही नि रीप उमेदवार म्हणून येणार नाही ह्याची ?

ते तर आहेच. ऑब्सेशन फक्त "या लोकांचे" नाही. तो उभा राहणार नसेल आणि रिपब्लिकन पार्टी त्याच्या दावणीला बांधलेली नसेल तर पब्लिक स्पेस मधून तो हळुहळू विसरला जाईल. पहिले वर्षभर गेलाच होता. या कांगाव्यामुळे व जाने. ६ च्या खटल्यामुळे पुन्हा आला चर्चेत.

"त्या लोकांच्या" ऑब्सेशन चे काय? अजून शंभर एक रिपब्लिकन रेप्रेझेण्टेटिव्हज्/सिनेटर्स तेच धरून बसलेत की २०२० ची इलेक्शन चोरलेली वगैरे. ट्रम्प ने बॅक केलेलेच उमेदवार जिंकत आहेत मिडटर्म्स मधे. फेथ, फॅमिली व्हॅल्यूज, नॅशनल सिक्युरिटी वगैरे सगळ्या कन्सर्न्स गाळात घालून सगळे रिपब्लिकन्स (लिझ व अ‍ॅडम किनझिंगर सारखे अपवाद सोडता) ट्रम्प म्हणेल ती पूर्वदिशा मोड मधे आहेत. मग अशा वेळेस हे इतर लोक सिरीयसली घेतील नाहीतर काय? तुम्ही ट्रम्पला सोडा, बाकीचेही सोडतील.

हिलरीचा गुन्हा सिद्ध झाला, हंटर बायडेन विरूद्ध सिद्ध झाला, त्यात जो चा हात असला तर त्यांच्यावर खटले भरा. ट्रम्पप्रमाणेच. आपले लॉजिक क्लिअर आहे. एकाला "लॉक हर अप" आणि दुसर्‍याला "कसले तरी कागद" असला दुटप्पी प्रकार नाही.

हिलरीचा गुन्हा सिद्ध झाला, हंटर बायडेन विरूद्ध सिद्ध झाला, त्यात जो चा हात असला तर त्यांच्यावर खटले भरा. ट्रम्पप्रमाणेच. आपले लॉजिक क्लिअर आहे. एकाला "लॉक हर अप" आणि दुसर्‍याला "कसले तरी कागद" असला दुटप्पी प्रकार नाही.>>
स्ट्रॉ मॅन. हिलरी काय किंवा ट्रम्प काय, सत्तेवर आलेल्याने सत्तेबाहेर गेलेल्याला काहीतरी आरोप ठेवून, ईडी वगैरे लावून विचहंटिंग करणे हे थर्ड वर्ल्ड राजकारण आहे. ते अमेरिकेत नकोच अशी कोणाचीही इच्छा असेल. दुर्दैवाने थेरड्याच्या अंमलात नेमकं तेच होतंय.
तुम्ही ट्रम्पला सोडा, बाकीचेही सोडतील.>>
पुन्हा स्ट्रॉ मॅन. याच धाग्यावर मागची काही पानं जाऊन पाहिलंत तर रिप सपोर्टर्स ॲक्च्युअली बायडनच्या कारभाराबद्दल लिहितायत. 'ट्रम्पसायबांच्या टायमाला आण्याला शेरभर दूद' असा गळा कोणी काढत नाहिये. त्या उलट डेम सपोर्टर्सचा कुठलाही प्रतिसाद ट्रम्पचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाहीये. बाकी रिप नेत्यांनी त्यांच्या कोअर क्राउडला २०२० निवडणुकीवरून पेटवत राहणे हा राजकारणाचा भाग आहे. जसा डेम्स ६ जान्युआरीचे भांडवल करत राहतात त्याप्रमाणे.
तरीही ट्रम्प ट्रम्प करत रहायचं असेल तर निदान धाग्याचं नाव बदलून '४५ वे आणि ४७ वे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प' असं तरी करून घ्या. Happy म्हणजे जे लोक उगाच इथे बायडन बद्दल लिहित सुटलेयत ते थांबतील.

सत्तेवर आलेल्याने सत्तेबाहेर गेलेल्याला काहीतरी आरोप ठेवून, ईडी वगैरे लावून विचहंटिंग करणे हे थर्ड वर्ल्ड राजकारण आहे. ते अमेरिकेत नकोच अशी कोणाचीही इच्छा असेल. दुर्दैवाने थेरड्याच्या अंमलात नेमकं तेच होतंय. >> तरी बर स्वतःच म्हण्\ताय कि बायडन च्या अमलात होत आहे मग बाफशी संबंधित विषय झालाच कि हो Happy "नक्की खात्री आहे परत उभा राहणार नाही नि रीप उमेदवार म्हणून येणार नाही ह्याची ?" ह्याचे उत्तर दिलेनाही ह्यातच सगळे आले.

रिप पार्टि ही तात्याची खाजगी पार्टी झाली आहे हे शेंबड्या पोरालाही माहित असलेले सिक्रेट आहे तेंव्हा तात्या बद्दल बोलू नका हा सूर टोटल गंडलेला आहे.

कसले विचहंटिग? ट्रम्प के काही केलेच नाही म्हणता? उगाच बिचार्‍याला सगळी दुनिया त्रास देत आहे. डीओजे, न्यू यॉर्क अ‍ॅटर्नी, जॉर्जिया अ‍ॅटर्नी, नारा, बाकीचे खटले ई.
- जॉर्जियाच्या लोकांना आणखी मते शोधा म्हणत होता तो सन्मार्गाने शोधा म्हणत असावा.
- काही कागद गेला घेउन बरोबर तर बिघडले कोठे? त्यावर टॉप सिक्रेट म्हणून लिहीलेले असले तर काय झाले. प्रेसिडेण्टला अमर्याद अधिकार आहेत. मिडास राजासारखे त्याच्या ओव्हल ऑफिस मधे आलेले कागद आओआप डिक्लासिफाय होतात. आता बिचार्‍याचे एक ठरत नाही की त्याने ते डिक्लासिफाय केले, की मुळातच ते सिक्रेट नाहीतच, की एफबीआयने प्लाण्ट केले, सगळे देऊन टाकले, की नाही अजून काही बाकी आहेत. पण इतके प्रेशर आल्यावर तो काय करणार.
- आपण हरलो म्हणजे इलेक्शन चोरलीच असली पाहिजे अशी त्याची भाबडी समजूत. त्याचे मूर्ख समर्थक आपण लोकशाहीचे रक्षण करत आहोत या भावनेने कॅपिटॉल बिल्डिंग वर चालून गेले. कोणी कोणाला हात पण लावला नाही. कॅपिटॉल पोलिसांना मारणारे आधी समर्थक असले तरी त्याच दिवशी ते अ‍ॅण्टिफामधे होते. आता यात ट्रम्पची काय चूक? ट्रम्पचा काही दोष नाही. तो तर त्या दिवशी काय चालू आहे ते बघतही नव्हता. त्याच्या हस्तकांना त्याने पार्डन केले. अडकले ते मूर्ख समर्थक. प्यादी. पण पुन्हा ट्रम्पचा काय संबंध यात? शराबी वो, जुआरी वो, लेकिन उसका कोई कसूर नही

विचहंट!

ओके.. मग या न्यायाने २०२४ मध्ये डिसॅंटिस आला आणि त्याने बीएलेम रायट्स बद्दल (जे ६ जान्युअरीच्या शेकडोपट हिंसक होते) जबाबदार ठरवून डेमोक्रॅट नेत्यांना खोड्यात अडकवले तर कोणाला काही प्रॉब्लेम असणार नाही असं समजूया.
कॅपिटॉल पोलिसांना मारणारे समर्थक>>
जरा इथे फॅक्ट चेक करून पाहूया. हे तुम्हाला सीएनेन किंवा वॉपो किंवा तत्सम पिवळ्या पत्रात सापडणार नाही.
The USCP accepts the findings from the District of Columbia’s Office of the Chief Medical Examiner that Officer Brian Sicknick died of natural causes.
factcheck.org/2021/11/how-many-died-as-a-result-of-capitol-riot/

मोरोबा ताकाला जऊन भांडे न लपवता सरळ सरळ ह्या प्रश्नांचे उत्तर दे
१. जान ६ च्या दंग्यासाठी तात्या जबाबदार होता कि नाही ?
२. त्याने मार ला गो ला कागदपत्र नेणे चुकीचे होते कि नाही ?

एव्हढे बोलून वेताळ परत झाडाच्या फांदिला लटकू लागला Wink

त्याने बीएलेम रायट्स बद्दल (जे ६ जान्युअरीच्या शेकडोपट हिंसक होते) जबाबदार ठरवून डेमोक्रॅट नेत्यांना खोड्यात अडकवले तर कोणाला काही प्रॉब्लेम असणार नाही असं समजूया. >>> जे काय कायद्याने सिद्ध होईल ते. काही प्रॉब्लेम नाही. कोणी डेम्सनी लोकांना भडकावले असेल तर भरा खटले. आत्ताही भरा.

इथे तुमचे presumption फार गंडलेले आहे इतकेच सांगतो. आपण सोडून इतर लोक एखाद दुसरे चॅनेल्स पाहून मते बनवतात हा एक फार गोड गैरसमज आहे. त्याला मी काही करू शकत नाही. मी कोणाचाही गंडा बांधलेला नाही. बीएलएमच्या दंग्यांवर मी तेव्हाही टीकाच केली होती.

बाकी ते फॅक्टचेक चा मुद्दा काय आहे? ते जे काय झाले ते हिंसक नव्हते? मी तर म्हणतोय मी त्या घुसलेल्या लोकांना पूर्ण दोष देत नाही. कारण ते आपण लोकशाहीचे समर्थन करतोय अशा समजुतीने घुसलेले होते. ते ओथ कीपर्स तर जणू आपणच या नव्या युगातील पोलिस व सैन्य असणार आहोत असल्या डिल्यूजन मधे होते. दोषी आहेत ते त्यांना काय खोटेनाटे सांगून नादाला लावणारे. अजूनही करत आहेत. तात्याने काखा वर केल्या. त्याच्या निकटच्या चेल्यांना त्याने पार्डन केले. उरलेले रूडी ई. खटले लढत आहेत. फॉक्स, न्यूजमॅक्स ई. वर वाट्टेल त्या पुड्या सोडत आहेत. या सगळ्यात अडकले आहेत ते त्या दिवशी हे सगळे खरे धरून अमेरिकेतून कोठून कोठून स्वखर्चाने आलेले. प्यादी. १ वर्ष ते ५ वर्षे शिक्षा झाल्या आहेत. त्यांचे जॉब गेले आहेत. ते बिनडोक असले तरी सर्वसाधारण अमेरिकन्सच आहेत. त्यांना अजूनही पत्ता नाही.

<<<तुम्ही ट्रम्पला सोडा, बाकीचेही सोडतील>>>>
<<हा हा हा भारी लिहिलंय मोरोबा!>>
अनुमोदन.
फारएण्ड, तुमचा शेवटचा परिच्छेद खरा आहे.

मिड टर्मची डिबेट्स बघत आहात का कोणी?

मला ब्रायन केम्प आणि स्टेसी अब्राह्म्स मधे केम्पला सपोर्ट करावासा वाटतो (जॉर्जिया गव्हर्नर). पण त्याचे अ‍ॅबॉर्शन बद्दल नक्की काय मत आहे माहीत नाही. त्याची उत्तरे गोलमटोल वाटली. २०२० मधे ट्रम्प त्याला व रॅफेनबर्गरला भयंकर प्रेशर आणत होता खाबूगिरी करायला तेव्हा त्याच्याविरोधात दोघेही ठामपणे उभे राहिले. पक्षातील व एकूणच मागापब्लिकचा विरोध सहन करून.

स्टेसी अब्राह्म्स चांगली आहे पण एक अ‍ॅबॉर्शन स्टान्स सोडला तर केम्पला त्याच्या कामाचे क्रेडिट मिळायला हवे.

जॉर्जियाच्या सिनेट सीट साठी हर्शेल वॉकर आणि वॉरनॉक मधे अजूनही टफ फाइट आहे हा फार मोठा विनोद आहे. वॉकर ला मागालोकांनी "फरगिव्ह" वगैरे केले आहे असे काही लोकांच्या कॉमेण्ट्स मधे वाचले. पण बिल मार म्हणतो तसे डेम्स हे जर देशद्रोही ई वाटत असतील त्यापेक्षा हा चालेल हे लॉजिक आहे रिपब्लिकन्स चे.

तिकडे ओहयो सिनेट करता मधे जे डी व्हान्स हा रिपब्लिकन उमेदवार. मधे आलेला तो "हिलबिली एलिजी" त्याचाच पिक्चर. तो सुरूवातीला सेन्सिबल होता. राजकारणात आला तेव्हा ट्रम्प विरोधक होता. ट्रम्पला हिटलर वगैरे म्हंटला होता. नंतर फुल १८० मधे फिरून आता त्याचाच सपोर्ट घेउन लढत आहे. तात्या हा कोणीतरी संत महात्मा असल्याचा त्याला साक्षात्कार झाला आहे. ती रेस सुद्धा कट टू कट आहे असे दिसते.

पण खरा विनोद मार्जोरी टेलर ग्रीनने केला. जाने ६ च्या दंग्याची ती विक्टिम होती असे तिने डिबेटमधे सांगितले. मग पब्लिकने जाने ६ च्या आधीची तिची एक क्लिप पुढे आणली ज्यात चोरलेली इलेक्शन ई बकवास तर होतीच पण जो बायडेनची निवड रोखण्याबद्दल सर्व प्लॅनिंग झालेले आहे वगैरे व्यवस्थित ती सांगत होती. ते प्लॅनिंग म्हणजे काय होते हे रॉजर स्टोन ची वक्तव्ये, तात्याची वक्तव्ये आणि ओथ कीपर्सच्या मुलाखती यातून उघड आहे.

बाय द वे, बायडेन ने अफगाणिस्तानातून सैन्य बाहेर काढले तेव्हा भयंकर टीका करून ट्रम्पचा यात काहीतरी भारी प्लॅन होता आणि ट्रम्पने हे योग्य प्रकारे हाताळले असे असा समज असणार्‍यांकरता नुकतीच बाहेर आलेली माहिती. नोव्हेंबर २०२० मधे निवडणूक हरल्यानंतर एक दिवस त्याने एका चिठ्ठीवर मिलिटरीला आदेश दिला की अफगाणिस्थानातून सैन्य ताबडतोब बाहेर काढा. यात कसलीही प्रोसेस/प्रोटोकॉल फॉलो केलेला नसल्याने मिलिटरीच्या लोकांनी व्हाइट हाउस मधे येउन ट्रम्प च्या स्टाफशी चर्चा करून तो मागे घ्यायला लावला होता.

सध्या एकूणच मार-ए-लागो मागे पडले आहे व जाने ६ ची चर्चा जास्त सुरू आहे. अगदी फॉक्स, न्यूजमॅक्सवरही. ट्रम्पवरच्या बहुतेक खटल्यांमधे एक "बिनडोक" एक्स्प्लनेशन असते. म्हणजे २०१६ पूर्वी त्याने रशियाबरोबर आवर्जून स्कीमिंग केले नाही. पण कोणीतरी ऑफर करायला आले आणि या लोकांनी त्यांना एंगेज केले. आताही कागदपत्रे त्याने आवर्जून नेली नाहीत, त्याबद्दल तो जनरली निष्काळजी होता - हे सहज शक्य आहे. पण जाने ६ च्या बाबतीत त्याने लोकशाही प्रोसेस न जुमानता सत्तेवर राहण्याकरता लोकांना उद्यूक्त केले याशिवाय इतर कसलेही कारण, एखादे बिनडोक जस्टिफिकेशन सांगता येत नाही.

पण वरती लिहील्याप्रमाणे यातील सर्वात शोकांतिका ही आहे की ते मागालोकच अडकले आहेत. त्यांच्या तेव्हाच्या मुलाखती पाहिल्या तर टोटल ब्रेनवॉश झालेले नेहमीचे लोक आहेत. त्यांना जेन्युइनली असे वाटत होते की लहान मुले खाणारी, देशाला कम्युनिजम कडे नेणारी एक टोळी सत्तेवर येणार आहे आणि त्यांनी इलेक्शन चोरली आहे. त्यांना गेली ४-५ वर्षे तेच फीड केले गेले. त्यातल्या फॅक्टस दाखवणारे एकही चॅनेल ते बघत नाहीत. त्यावर विश्वास ठेवत नाहीत.

बाय द वे काल मार्जोरी टेलर ग्रीन पुन्हा तेच म्हंटली - की इलेक्शन चोरली होती. पुरावा विचारला तर म्हणे "माझ्या नवर्‍याकडे आहे". लो कल्लो बात. ६१ खटल्यां मधे निष्णात वकिलांना जे देता आले नाही ते हिच्या नवर्‍याकडे आहे. पण त्यावरही विश्वास ठेवणारे आहेत.

जगात एव्हढे सगळे पूर, वणवे, मोठ्या प्रमाणावर रोगराई इ. सर्व होत असतानाहि, देव दयाळू आहे, यावर विश्वास ठेवणारे लोक आहेतच.
वास्तविक देव कुणालाच दिसला नाही, तरी. त्रंप तर प्रत्यक्ष दिसतो, तो कसा खोटा असेल?

>>> वास्तविक देव कुणालाच दिसला नाही, तरी. त्रंप तर प्रत्यक्ष दिसतो, तो कसा खोटा असेल?
कसं बोललात! टाळ्या!! Lol

Pages