Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04
४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण
असं आहे की निवडणुकीतले
असं आहे की निवडणुकीतले गैरप्रकार करणारे अमेरिकन नागरिकच होते. काही सरकारी नोकर, काही निवडणुकीत स्वयंसेवक तर कुणी पोलीस, सुरक्षा कर्मचारी. गेल्या दोन वर्षातील म्हातरबांच्या अव्यापारेषू व्यापारामुळे, भ्रष्टाचारामुळे, अनिर्बंध बेकायदा घुसखोरी सुरू केल्यामुळे, चलन फुगवट्या मुळे, समलिंगी, लिंग बदल करणाऱ्यांचे अनाठायी उदात्तीकरण, गर्भपाताचे स्तोम इ इ विकृत कामामुळे हे नागरिक संतप्त असतील आणि ते ह्या खेपेस गैरप्रकारात सहभागी होणार नाहीत आणि चेनीला जसे चेचले तशीच डेमची वाट लावतील अशी एक अंधुक आशा आहे. बघू या. घोडा मैदान जवळ आहे. गाढव वरचढ होते का हत्ती ते कळेलच!
त्यांचा शब्द शेवटचा. जानेवारी
त्यांचा शब्द शेवटचा. जानेवारी ६ कमिटी म्हणजे लोकशाहीचा अंतिम शब्द नाही. >>> ६ जाने. ची कमिटी लिझ चेनीला निवडून द्यायला बसली नाही. ती कमिटी जे काम करत आहे ते सर्वसामान्य मतदार करू शकत नाहीत. तेथे एक्स्पर्टच लागतात.
लिझ असेल अहंकारी, स्वतःला लिंकन समजत असेल. पण रिपब्लिकन पार्टीमधे ज्या चुकीच्या गोष्टींना पाठिंबा दिला जात आहे त्याविरूद्ध आवाज उठवण्याला गट्स लागतात. आपण निवडून येउ शकत नाही हे माहीत असून सुद्धा तसा स्टॅण्ड घेणे सोपे नाही. दुसर्या बाजूवर टीका करणे खूप सोपे आहे. स्वतःच्याच लोकांवर करणे खूप अवघड आहे.
बाकी रिपब्लिकन लोकांनीच केलेल्या गोष्टींवर आजकाल त्यांचेच पाठिंबावाले अशी टीका करतात, की जणू काही हे सगळे दुसर्याच कोणीतरी केले इराक वॉर वगैरे.
डेम्स चे स्वतःचे प्रॉब्लेम्स आहेत. तेथे सगळे दीडशहाणे बसलेत. "द वायर" मधे तो सोबोत्का म्हणतो(*) तसे "4 p****, 6 opinions". रिपब्लिकन साइडला जशी २०२० गैरप्रकार ई. कशात काय नसलेल्या मुद्द्यावर ठाम एकी असते तसे तेथे नाही. त्यामुळे ते कधीतरी कसेबसे जिंकतात. कधी क्लिंटन तर कधी ओबामाचा करिष्मा. २०२० मधे इतका गोंधळ होउन सुद्धा कसेबसे निसटले. त्यामुळे नोव्हेंबर मधे दोन्ही हाउसेस पुन्हा रिपब्लिकन्स कडे गेली तरी त्यात काही आश्चर्य नाही.
(*) प्रत्यक्षात तेथे पोलिश लोकांचा उल्लेख आहे. इथे तो सॅनिटाइज केला. नाहीतर कॉन्झर्वेटिव्हज परवडले असे वोक पब्लिक वैताग देते.
इथे "दृष्टि आड शृष्टि" हि
इथे "दृष्टि आड शृष्टि" हि म्हण वापरायचा मोह आवरतो. असो. नेफिवर "वाइस" नांवाचा बायोपिक आहे, डिक चेनीवर. इच्छुकांनी लाभ घ्यावा. क्रिश्चन बेलने तुफान काम केलं आहे; पण असं म्हणतात चेनी इज ए बिगर डिक दॅन द वन पोर्ट्रेड इन द मुवि. कुडंट अग्री मोर...
वोक जनतेचे एकेक प्रताप पाहून
वोक जनतेचे एकेक प्रताप पाहून आता वोकारी यायला लागलीय
https://torontosun.com/news/weird/white-teachers-to-be-laid-off-first-un...
इराक युद्ध ज्या रिपब्लिकन आणि
इराक युद्ध ज्या रिपब्लिकन आणि democrats नी अमेरिकेवर लादले ते समस्त ट्रंप विरोधी आहेत. अगदी कडवे विरोधी. चला यादी करू या.
चेनी खानदानातले समस्त खलपुरुष आणि खलनायिका
बुश खानदानातले समस्त लोक डब्या बुश ने जाहीर केले की मी भ्रमिष्ट म्हातारबालाच मत देणार!
मिट रोमनी. कडवा ट्रम्प विरोधक. इराकी युद्धाचा खंदा समर्थक.
मॅकेन ट्रम्प विरोधी. इराक युद्धाचा मोठा समर्थक.
हिलरी क्लिंटन, बायडन सगळे इराकी युद्धाला संमती देणारे Dems
थोडक्यात आजची रिपब्लिकन पार्टी ही ट्रम्प च्या बाजूची आहे आणि त्यातले बहुतांश इराकी युद्धाच्या विरोधी आहेत.
खुद्द ट्रम्प ने एकही युद्ध सुरू केले नाही. उलट साप मुंगूस असे वैर असणारे इस्रायल आणि सौदी ह्यांना चर्चेला बोलावून त्यांच्यात समेट केला.
भ्रमिष्ट म्हातारा जो, ओबामा (नोबेल शांती पुरस्कार!), क्लिंटन सगळ्यांनी अनेक युद्धे अमेरिकेवर लादली. बुश बद्दल काय बोलायलाच नको.
थोडक्यात आजची रिपब्लिकन
थोडक्यात आजची रिपब्लिकन पार्टी ही ट्रम्प च्या बाजूची आहे आणि त्यातले बहुतांश इराकी युद्धाच्या विरोधी आहेत.>>> रिपब्लिकन पार्टी फुटते की काय?
Trump इराक युध्दाच्या वेळेस डेमॉक्रॅटिक पार्टी त होता
वरची पोस्ट वाचून ट्रंप हा
वरची पोस्ट वाचून ट्रंप हा कोणी प्रेषित आहे आणि त्याच्या नावाचा पंथ होऊ घातला आहे असं वाटतंय.
नुसता उपरोध आणि कुठल्याही
नुसता उपरोध आणि कुठल्याही मुद्द्याला उत्तर नाही म्हणजे नुसताच मसाला, कोंबडीचा पत्ताच नाही किंवा श्रावण चालू आहे म्हणून मसालेभातात नुसता मसाला, भाताचा पत्ताच नाही असे वाटते!
थोडक्यात आजची रिपब्लिकन
थोडक्यात आजची रिपब्लिकन पार्टी ही ट्रम्प च्या बाजूची आहे आणि त्यातले बहुतांश इराकी युद्धाच्या विरोधी आहेत. >>> पण हिलरी सोडली तर बाकीच्या नगांना तुम्हीच निवडून दिलेत ना? ते ही इराक युद्धाचा निर्णय चुकीचा होता हे क्लिअर झाल्यावरही २००४ मधे पुन्हा निवडून दिलेत. मग आता आपण त्या गावचेच नाही अशा थाटात हे सगळे कोणीतरी भलतेच लोक होते असे प्रोजेक्ट करत आहात. इथे "तुम्ही" म्हणजे रिपब्लिकन वोटर्स. हे वैयक्तिक नाही.
म्हणजे आम्ही लोकांच्या क्रेझी थिअरीज वर विश्वास ठेवून त्यांना निवडून दिले. ती चूक होती हे कळाल्यावर सुद्धा पुन्हा २००४ मधे तेच केले, चांगला चान्स असताना. त्यावर mea culpa, regret वगैरे सोडा. वर पुन्हा आमच्या आत्ताच्या क्रेझी थिअरीजवर पुन्हा विश्वास ठेवा. चोरलेली इलेक्शन ते स्पेस लेझर्स पर्यंत. अॅडिक्ट्स बोलतात तसे झाले. मागे दोन वेळा घेतली होती पण आता पुढे एकदम टोटल सोबर!
https://www.youtube.com/watch?v=qs6mBh2uXRM&t=136s
पण लोक महत्वाच्या
पण लोक महत्वाच्या मुद्द्यांबद्दल बोलत नाहीत.
त्यांना फक्त दिसते की ट्रंपने इव्हांका नि जारेद यांना नोकर्या दिल्या, सेक्यूरिटी वाल्यांना स्वतःच्या हॉटेलात रहायला लावून पैसा केला, बरेचदा गोल्फ खेळायला गेला, त्याने नेमलेले लोक गुन्हेगार होते वगैरे हेच पहातात.
ज्या अनेक राष्ट्राध्यक्षांना इतके वर्षे जमले नाही ते इस्राईल मधील एम्बॅसी जेरुसलेमला हलवली.
तो युद्धात कैद झालेल्या मॅकेन सारख्या लोकांना हिरो मानत नाही, त्याची रास्त अपेक्षा अशी दुसर्या महायुद्धात जसे सगळे जनरल्स हिटलरशी एकनिष्ठ राहिले तसे त्याचे जनरल्स त्याच्याशी एकनिष्ठ न रहाता - घटनेशी एकनिष्ठ रहातात. अशाने कसे होईल, काही पाठिंबाच नाही.
जनरल्स जर त्याच्या बाजूने झाले असते, तर मिलिटरी वापरून त्याने बीएलेमसारखे दंगे थांबवले असते. पण लक्षात कोण घेतो?
मग आता आपण त्या गावचेच नाही
मग आता आपण त्या गावचेच नाही अशा थाटात हे सगळे कोणीतरी भलतेच लोक होते असे प्रोजेक्ट करत आहात. >> फा एकदम धोतरालाच हात घालतो राव तू.
रिपब्लिकन पक्ष म्हणजे दगडावर
रिपब्लिकन पक्ष म्हणजे दगडावर कोरलेली रेघ नाही. पक्ष बदलतात. त्याला मत देणारेही बदलतात. लिंकन च्या काळात democrat हे रेसिस्ट होते आणि रिपब्लिकन पुरोगामी. नंतर कधीतरी बदल होऊन उलट चित्र झाले. काळे आणि लॅटिनो आणि अन्य अल्पसंख्य हे गॅरंटीड डेमॉक्रॅटिक मतदार असा नियमच बनला. तेव्हाचे Dems आणि आजचे ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. तसेच इथेही होत आहे..एकेकाळी रिपब्लिकन हे युद्धखोर, गर्विष्ठ, श्रीमंत लोकांचे, उद्योगपतींचे होते. आज ते बदलले आहे. ब्लू कॉलर लोक रिपब्लिकन बनू लागले आहेत. कारण म्हातारबा त्यांचे रोजगार हिरावून घेऊन चीनला देत आहे. युद्धेही वोक बनत आहेत. कसे युक्रेन आणि रशिया युद्ध. त्यामुळे त्यातही बहुतांश रिपब्लिकन लोकांना रस नाही. Trump मुळे लोकांना हे कळले की नवीन युद्धे लादून न घेता अमेरिका विकास करू शकते.
हे कळणे इतके अवघड आहे का? २००१ मधली रिपब्लिकन पार्टी आता बदलली आहे हे सोदाहरण समजावून दिले तरी पालथ्या घड्यावर पाणी.
झोपेचे सोंग घेणाऱ्याला उठवणे अशक्य असते हेच खरे.
कुठल्याही पक्षाला मत देणारा अमुक एका साच्यात बसणारच असला पाहिजे असे लोकांना आपल्या purvagrahamule वाटत असले तरी वस्तुस्थिती तशी असेलच असे नाही.
हे कळणे इतके अवघड आहे का?
हे कळणे इतके अवघड आहे का? २००१ मधली रिपब्लिकन पार्टी आता बदलली आहे हे सोदाहरण समजावून दिले तरी पालथ्या घड्यावर पाणी.
झोपेचे सोंग घेणाऱ्याला उठवणे अशक्य असते हेच खरे. >>> आँ? अगदी आत्ताचे उदाहरण दिले की. आत्ता हीच पार्टी २०२० ची निवडणूक बायडेनने चोरली म्हणून गेली २ वर्षे ओरडत आहे. ही तर वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन पेक्षाही मोठी क्रेझी थिअरी आहे. नक्की काय बदलले आहे?
तुम्हाला मी ओळखत नाही. तुमच्याबद्दल मी काहीच बोललेलो नाही. रिपब्लिकन वोटर्स बद्दल लिहीले आहे.
पक्ष बदलतो, माणसे बदलतात - पण
पक्ष बदलतो, माणसे बदलतात - पण उद्योग एकच, परत निवडून येणे, म्हणजे सत्ता नि पैसे.
त्यासाठी मग खोटे बोलणे, अफवा पसरवणे हे सगळे चालते - त्यात, तुमच्याच पक्षाचे लोक, लष्कर, न्यायाधीश सगळे सामील.
आता ट्रंपचेच उदाहरण घ्या - २००० म्यूल्स सिनेमात धडधडित पुरावा आहे की निवडणूकीत घोटाळा, ट्रंपच जिंकला पण कुणीच न्यायाधिश
ते ऐकायलाच तयार नाही.
आँ? अगदी आत्ताचे उदाहरण दिले
आँ? अगदी आत्ताचे उदाहरण दिले की. >> तमाम "तात्या" लोकांसाठी २०२० हा बखरीमधला इतिहास झाला रे. सध्या फक्त मार-ला-गो ची रेड हे नि फक्त हेच सत्य आहे ....
त्याचे किंवा जान ६ च्या
त्याचे किंवा जान ६ च्या चौकशीचे पुढे काहीहि होणार नाही. मुलर च्या चौकशीचे काय झाले?
तसेच - कोर्टात अपील वर अपील नि मग सगळे विसरून जातील.
सध्याच्या मार-ला-गो मधल्या
सध्याच्या मार-ला-गो मधल्या रेड बद्दल इतर मीडीया मधे वाचले/पाहिले आणि नंतर फॉक्स पाहिले तर आपण दोन वेगळ्या जगात वावरत आहोत असे वाटेल. एकीकडे ट्रम्पने व त्याच्या लॉयर्सनी त्यांना गोत्यात आणणार्या स्टेप्स घेतल्या आहेत असे दिसते. तर दुसरीकडे प्रेसिडेण्ट जणू पाहिजे ती डॉक्युमेण्ट्स घरी घेउन जाऊ शकतो अशा थाटात सांगितले जात आहे.
फॉक्सचे एक मला आवडते. आपल्या प्रेक्षकांकरता ते ३-४ शब्दांत "डिसमिस" करता येइल असे कोणत्याही घटनेचे सार काढतात. आणि प्रत्येक होस्ट तेच तेच परत शो मधून बोलत राहतात. पूर्वीही No collusion, No laws were broken वगैरे स्लोगन्स चालत. जरी केस वेगळ्याच मुद्द्यावर असली तरी. आता हॅनिटी वगैरे "फेडरल रेकॉर्ड्स अॅक्ट" नुसार प्रेसिडेण्ट काय करू शकतो हे स्वतःची कल्पनाशक्ती ताणून काय वाट्टेल ते सांगत आहेत. ट्रम्पचे अॅटर्नीज तेच सांगत आहेत.
आता "ट्रम्पचे अॅटर्नी" या प्रकाराला गेल्या दोन वर्षांत एक जगावेगळी विश्वासार्हता प्राप्त झालेली आहे हे आपल्याला माहीत आहे , पण फॉक्सच्या एको चेंबरमधे तेवढे पुरते.
त्यामानाने MSNBC, CNN वगैरे "डेम्स फ्रेण्डली" मीडिया मधे एखादी गोष्ट नीट समजावून घ्यायला तुम्हाला १५-२० मिनीटे नीट बघावे लागते
जेथे चेक्स अॅण्ड बॅलन्सेस आहेत अशा कोणत्याही सिस्टीम मधे एका व्यक्तीला - अगदी अध्यक्षालाही - वाट्टेल ते डॉक्युमेण्ट स्वतःच डि-क्लासिफाय करून घरी नेण्याची मुभा असणे शक्यच नाही हा कॉमन सेन्स आहे. ते ही ७०० डॉक्युमेण्ट्स. पण या लोकांना डिटेल्स मधे इंटरेस्ट नसतो. प्रेसिडेन्शियल रेकॉर्ड्स अॅक्ट चे डीटेल्स पाहिले तर प्रेसिडेण्टची रेकॉर्ड्स ही "अमेरिकेच्या" म्हणजे "पब्लिकच्या" मालकीची असतात हे उघड आहे. त्यात आश्चर्यही नाही.
पण असल्या काहीतरी पुंगळ्या २-३ दिवस नाचवायच्या आणि ते खोडून काढले गेले की नवीन काहीतरी काढायचे ही यांची पद्धत आहे. "स्टोलन इलेक्शन" प्रकारापासून हे सुरू आहे. आधी "अहो निदान विचारायचे होते, लगेच सगळी कागदपत्रे दिली असती" झाले. मग सिद्ध झाले की गेले सहा महिने पाठपुरावा सुरू आहे. मग आले की ट्रम्पने स्वतःच ती डि-क्लासिफाय केली होती. मग आले की अहो इतर लोक ऑफिसचे पेपर्स कधी घरी नेतात तशी याने नेली असतील. पण ७००? मग बाहेर येउ लागले की साहेब हा सगळा प्रकार सिरीयसली घेत नसत. ऑफिसमधे असतानाही. आता फेडरल रेकॉर्ड्स अॅक्ट चे कारण काढले आहे. २-३ दिवसांनी अजून काहीतरी वेगळे असेल.
मला खुद्द ट्रम्पच्या कारकीर्दीत त्याच्यावर जे आरोप झाले त्यातले अनेक आरोप हे निष्काळजीपणाने/जबाबदारी सिरीयसली न घेतल्याने ओढवून घेतलेले होते असे वाटायचे. पण या प्रकारात आता काहीतरी जास्त आहे अशी शंका येते.
हिलरीच्या निष्काळजीपणावर
हिलरीच्या निष्काळजीपणावर टीका करणारा माणूस त्याच चूका करतो हे एकंदर गमतीशीर आहे. ह्या प्रकरणाचा एकंदर बचाव ह्या मुद्द्यावरून त्या मुद्द्यावर एव्हढा फास्ट सरकत गेला आहे की निव्वळ त्यावरूनच ह्या पार्टिला ह्यातला कणमात्रही कळत नाही असे वाटायला लागते.
बाकी एव्हढ्या स्टेबल जिनियस मनुष्याला कुठले कागदपत्र न्यावे नि कसे न्यावे हा कॉमन सेन्स नाही हे बघून मजा वाटली. त्याची वकालत करणारे एकेक नग बघता त्याची कीव वाटते.
फॉर द रेकॉर्ड एकूण कागदपत्रांचा मामला मला तरी एकंदर अंगात असलेल्या माजामूळे/ निष्काळजीपणाने/जबाबदारी सिरीयसली न घेतल्याने ओढवून घेतला आहे नि जन्मजात इगो नि नार्सिझम मूळे 'झालेली चूक मान्य न करता आता सारवासारव' करण्याचा प्रयत्न वाटतो.
फा विलियम बा नि म्यूलर
फा विलियम बा नि म्यूलर रिप्पोर्ट बद्दल वाच. अजून करमणूक होईल. डीफ्लेटगेट च्या ""more probable than not" पेक्षा जास्त कोलांट्या उड्या आहेत.
हो ते सगळे अजून बघायचे आहे.
हो ते सगळे अजून बघायचे आहे. तिकडे रूडीने ६ तास काय सांगितले आहे ते कधी कळते पाहू. ट्रम्पच्या लीगल टीमने जो जज हे सगळे मॅटर तपासत आहे त्याला बायपास करून ट्रम्पने पूर्वी अपॉईण्ट केलेल्या जज कडे यावर तोडगा काढायची मागणी केली पण त्या जजनेही ते साभार परत केले - तो सगळा विनोदी प्रकार चालू आहे. "हे डायरेक्ट माझ्याकडे का पाठवलेत मधली न्यायालये सोडून", "तुम्हाला नक्की तोडगा कसला हवा आहे" वगैरे बेसिक प्रश्न उपस्थित केले. एकूण ही लीगल लेव्हल २०२० च्या केसेस सारखीच दिसते. त्यात लीगल मागण्या कमी आणि ट्रम्पची तारीफ जास्त असला प्रकार आहे
आणि ट्रम्पच्या घरावर धाड पडली
आणि ट्रम्पच्या घरावर धाड पडली म्हणजे काहीतरी मोठा मर्यादाभंग झाला असल्याचे नाटक करणारे पण महान आहेत.
आपल्या विरुद्ध उमेदवाराला निवडून आल्यावर "लॉक हर अप" स्लोगन देणारा मर्यादापुरुषोत्तम कोण बरे ???
समलैंगिक विवाह संरक्षित
समलैंगिक विवाह संरक्षित करण्याविरुद्ध मत देणारे GOP कॉंग्रेसमेन- १५२ (७३%)
Contraception उपलब्धी/हक्क संरक्षित करण्याविरुद्ध मत देणारे GOP कॉंग्रेसमेन- १९५ (९०%)
GOP Candidate Says Stone G@y People To Death | The Kyle Kulinski Show
https://www.youtube.com/watch?v=dZyZT7Rm4Tg
आणि शंख करायचा कशाबद्दल तर "वोकीझम" बद्दल. ह्या असल्या लोकांसोबत वोकिझम आणि कॅन्सल कल्चर राबवणे इष्टच म्हणायला पाहिजे.
फेसबुकचा संस्थापक मार्क
फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गने मान्य केले की त्यांनी हंटर बायडनची स्टोरी फेसबुकवरून बाद केली. त्याबद्द्ल लिहिणार्या लोकांना सेन्सॉर् किंवा ब्लॉक केले. आणि म्हणे एफ बी आयचे अधिकारी येऊन त्यांनी त्यांना तसे करण्यास भाग पाडले. अर्थात एफ बी आयच्या सांगण्यावरून ते केले. हंटर बायडन लॅपटॉप, त्याचे अमली पदार्थ सेवन, त्याचे वेश्यागमन, त्याचे आपल्या बापाचे नाव वापरून काँट्रॅक्ट मिळवणे वगैरे वगैरे दुष्कृत्ये लपवता लपत नाही असे पाहून झुकरबर्ग साहेबांना एफ बी आय आणि त्यांची धमकी आठवली. इतके दिवस त्यांची अधिकृत भूमिका अशी होती की ही चुकीची /खोटारडी माहिती आहे म्हणून ती आम्ही आमच्या माध्यमातून मांडू देणार नाही.
एकंदरीत काय, ट्रंप निवडून येऊ नये म्हणून समस्त उच्चवर्गाने कंबर कसलेली होती. फेसबुक आणि ट्वीटरवर बायडनची बदनामी करणार्या अगदी अस्सल खर्या बातम्यांवरही वरवंटा फिरवला जात होता. एफ बी आय धमकी प्रकरण खरे असेल तर सरकारच्या अत्यंत शक्तीमान, सत्ता बाळगणार्या एका यंत्रणेचा निवडणुकीचे निकाल फिरवण्यासाठी गैरवापर केला गेला. त्यासाठी संवैधानिक दृष्ट्या महत्त्वाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्डपले गेले. असे असूनही जर कुणाला २०२० ची निवडणूक गैरप्रकारांनी बरबटलेली होती असे वाटले तर त्याला लोकशाही विरोधी, अमेरिका द्रोही, ९/११ च्या आत्मघातकी अ तिरेक्यांपेक्षा भयानक विध्वंसक वगैरे वगैरे विशेषणे लावली जातात. हा कांगावा किती टिकणार आहे?
करोना लस सगळ्यांना जबरदस्तीने घ्यायला लावायची कल्पना म्हातारबांच्या भ्रमिष्ट सरकारचीच होती. अनेक लोकांना ह्या सक्तीमुळे नोकर्या सोडाव्या लागल्या. आता ह्या लशीचे दुष्परिणाम उघडकीस येऊ लागले आहेत. हृदयाचे विकार, अकाली मृत्यू, पुनरुत्पादनाशी संबंधित असणारे विकार (लो स्पर्म काउंट, अपघाती गर्भपात (स्त्री स्वातंत्र्याचा मुक्त आविष्कार वाला नव्हे!) )इ. प्रकार आणि त्यांची आकडेवारी हळूहळू बाहेर येत आहे. तसे डेमो मंडळी लशीची जबाबदारी ट्रंपच्या माथी मारू पहात आहेत. ट्रंप हा जंतुभयगंडग्रस्त (जर्मोफोब) आहे. त्याचा लशीवर प्रचंड विश्वास आहे आणि होता. परंतु त्याने लस घ्या नाहीतर नोकरीतून कटाप वगैरे धोरण कधीही राबवले नव्हते. रोजगार हिरावून घ्यायची धमकी देऊन अशी घातक, जीवघेणी, निरुपयोगी लस लोकांना सक्तीने घेण्याची ह्या सरकारला शिक्षा मिळायला पाहिजे.
करोना लस सगळ्यांना जबरदस्तीने
करोना लस सगळ्यांना जबरदस्तीने घ्यायला लावायची कल्पना म्हातारबांच्या भ्रमिष्ट सरकारचीच होती.
>>>कुठे आणि काय जबरदस्ती सराकरतर्फे झाली ?
घातक, जीवघेणी, निरुपयोगी लस
घातक, जीवघेणी, निरुपयोगी लस
>>> आणखी काही विशेषणे ? माईंड कंट्रोल चिप इत्यादी ?
तो दावा सुद्धा तितकाच सुद्न्य आहे.
एफ बी आय धमकी प्रकरण खरे असेल
एफ बी आय धमकी प्रकरण खरे असेल तर सरकारच्या अत्यंत शक्तीमान, सत्ता बाळगणार्या एका यंत्रणेचा निवडणुकीचे निकाल फिरवण्यासाठी गैरवापर केला गेला. त्यासाठी संवैधानिक दृष्ट्या महत्त्वाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्डपले गेले. असे असूनही जर कुणाला २०२० ची निवडणूक गैरप्रकारांनी बरबटलेली होती >> निवडणुका होईतो तात्याचे सरकार होते हो. आता तुम्ही असे म्हनत असाल कि डेम सत्तेबाहेरून सगळे कंट्रोल करत होते तर मग तात्या काय करत होता ?
>>> अपघाती गर्भपात (स्त्री
>>> अपघाती गर्भपात (स्त्री स्वातंत्र्याचा मुक्त आविष्कार वाला नव्हे!)
This is beyond disgusting!
<< तात्या काय करत होता ?>>
<< तात्या काय करत होता ?>>
तात्या नि त्याचे लोक करत काहीच नाहीत हो. आता तात्याच्याच काळात म्हणे एफ बी आय ने झुक्यावर दडपण आणले! मग तात्यानेच एफ बी आय ला सांगितले नसेल कशावरून? कशावरून ते हंटर बायडेन सगळे खोटे असल्याने तात्याच्याच लोकांना माहित असेल नि ते जर उघडकीला आणले तर तात्याच्याच लोकांपर्यंत पोहोचले तर?
अहो काय वाट्टेल त्या कॉन्स्पिरसी थेअरिएस करायची अक्कल आम्हालाहि आहे हो. पण द्वेषापायी, दुसर्याला नावे ठेवणे या पलीकडे दुसरे काहीहि जमत नसल्याने, कर्तुत्वाचा संपूर्ण अभाव असल्याने, अकलेला गहाण ठेवून नुसते अफवा पसरवणे या पलीकडे यांना काहीहि उद्योग नाही.
त्यांच्या नशीबाने या अमेरिकेत असंख्य बिनडोक लोक असल्याने ते निवडूनहि येतात. काही काही इतर देशातून आलेले हुषार लोकहि याला बळी पडतात. कदाचित ते सर्व काही उपहासाने लिहीत असतील.
ज्याला लशीचे दुष्परिणाम म्हणतात ते लशीमुळेच झाले कशावरून? काही पुरावा? टकर कार्ल्सन नि हॅनिटी नि लेविन सांगतात हा? असेलहि. बिनडोक माणसांना काय कळते? गळलेले पान बघून आकाश कोसळते आहे अशी अफवा उठवणारे हे लोक!
तसा माझाहि लशीकरणाच्या सक्तीला विरोध होता. सक्ती नसती केली तर हे सगळे मूर्ख लोक एकदाचे मेले असते नि सर्व्हायवल ऑफ फिट्टेस्ट तत्वाने शहाणे लोकच जिवंत राहिले असते.
एफ बी आय धमकी प्रकरण खरे असेल
एफ बी आय धमकी प्रकरण खरे असेल तर सरकारच्या अत्यंत शक्तीमान, सत्ता बाळगणार्या एका यंत्रणेचा निवडणुकीचे निकाल फिरवण्यासाठी गैरवापर केला गेला. त्यासाठी संवैधानिक दृष्ट्या महत्त्वाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्डपले गेले. असे असूनही जर कुणाला २०२० ची निवडणूक गैरप्रकारांनी बरबटलेली होती असे वाटले >>> हे असले धंदे प्रत्येक निवडणुकीत होतात. २०१६ आठवते का? निवडणुकीच्या ८-१० दिवस आधी याच एफबीआय कडून हिलरीबद्दल केलेले वक्तव्य लक्षात आहे का? तेव्हा ते ट्रम्पला फायदेशीर होते म्हणून आनंदाने नाचवले गेले. २०२० मधे उलट्या बाजूने होते म्हणून एकदम टोटल फ्रॉड!
मार-ला-गो बद्दल वेगवेगळी कारणे काढून झाली. सगळीच्या सगळी पूर्णपणे खोडली गेल्यावर काहीतरी नवीन विषय चघळायला मिळाला आहे त्यामुळे सध्या ट्रम्प सर्कल खुश आहे.
करायची होती तेव्हा चौकशी, अजून खटले दाखल करा हंटर बायडेनवर. कोणी अडवले आहे. मात्र फोर सीझन लॅण्डस्केपिंगच्या पार्किंग मधे रॅण्डम कागद नाचवून सामान्य लोकांना नादाला लावायचे आणि प्रत्यक्ष खटल्यात एकही आरोपसुद्धा करायचा नाही असे करून या गोष्टी सिद्ध होत नसतात. यांची विश्वासार्हता काय आहे ते गेल्या दोन वर्षात उघड झाले आहे.
असामी - ते बिल बार, म्युलर रिपोर्ट वगैरे बद्दल पाहिले काल. तो आणखी एक भारी प्रकार आहे. आणि यांना डेमोक्रसीची काळजी आहे.
करायची होती तेव्हा चौकशी,
करायची होती तेव्हा चौकशी, अजून खटले दाखल करा हंटर बायडेनवर. कोणी अडवले आहे. >> हे भारी आहे. मला आठवते हे तू २०२० निवडणुकीच्या आधी पण बोलला होता अशाच कुठल्या तरी आकांडतांडव करणार्या पोस्ट वर .
Pages