४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तो थयथयाट नुसता दाखवायला. हेच जर एखाद्या डेमोक्रॅट गवर्नरने केले असते तर असा थयथयाट झाला नसता.

राजकारणात जे काही चालू आहे त्यात जनतेचा काहीहि संबंध नाही.
काही ठराविक लोक आपाआपसात हास्यविनोद करताहेत (Inside jokes).
एका वेगळ्याच विनोदाचे हे एक उदाहरण आहे. जसे कुणि आतिशयोक्ति करतात, कुणि कोट्या, कुणि उपहास तसे.
जसे त्रंपने गंमतीत म्हंटले करोनासाठी लाईट किंवा disinfectant वापरा, तो विनोद कुणाला कळलाच नाही.

बरेच लोक बरेच काही काही बरळतात, माझ्यावर त्याचा ढिम्म परिणाम होत नाही. बदलत्या काळानुसार आपण आपले पैसे, कुटुंब सांभाळून असावे. तेव्हढी अक्कल असावी. ती जर राजकारणाचा विचार करण्यात घालवली तर कठिण आहे.

मार्थाबाईंच्या द्राक्षमळ्यात अर्थात Martha's Vineyard ह्या आलिशान, कोट्याधीश आणि अब्जाधीश पुरोगामी लोकांच्या आलिशान राजवाड्यांनी नटलेल्या बेटावर वोकत्व मोठ्या प्रमाणात जाणवते. येथे आम्ही बी एल एम, बेकायदा घुसखोर, LGBTQABCDXYZ*/!@#$%^&*((){}:">?<, मूलनिवासी अमेरिकन आणि सर्व धर्माचे लोक ह्यांचे स्वागत करतो (तरी युक्रेन राहिलेच!).
असे असून त्यांना ५० बेकायदा घुसखोरांना सामावून घेणे जमले नाही. एक दोन दिवस कॉर्न पॉप, फ्रुट लूप (केल, क्यावियार, महागडी चिजे दिसली नाहीत!) वगैरे जंगी पाहुणचार दिल्यावर त्यांना न्यायला या असा "वरून" कुणीतरी फोन केला आणि ह्या समस्त उपटसुंभ घुसखोरांना तत्काळ एका सैनिकी तळावर हलवण्यात आले!
अनंतकोटी ब्रह्मांड नायक, ईश्वराचा पृथ्वीवरील अवतार वगैरे समजले जाणारे ओबामाजी ह्यांचाही कोट्यावधी डॉलर खर्चून बांधलेला राजवाडा ह्या बेटावर आहे. बहुतेक वेळ हा आलिशान महाल रिकामा असतो. त्यात ५० व्हेनेजुएलामधून आलेले बेकायदा घुसखोर आरामात मावले असते.
अनेकदा आपल्या दैवी आवाजात ओबामाजी उच्च व्यासपीठावर बसून बेकायदा घुसखोर ही एक दैवी देणगी आहे त्यांचे हात उंचावून स्वागत करा, त्यांना आपल्यात सामावून घ्या, जरा आपले हृदय विशाल करा वगैरे थोर थोर उपदेश करत आले आहेत. मात्र जेव्हा त्यांच्या अंगणात ही दैवी देणगी अवतरली तेव्हा हे अवतारपुरुष अचानक मौन धारण करते झाले. कदाचित ह्यांच्याच फोनमुळे काही तासात अनेक सैनिक ह्या द्राक्षमळ्यात अवतरले आणि त्यांनी ह्या दैवी देणग्यांचे बखोट पकडून त्यांना सैनि़की तळावर पिटाळून दिले.
एकंदरीत निम्बी अर्थात माझ्या घराच्या आवारात नको (नॉट इन माय ब्याक यार्ड) हे महान तत्त्व तमाम पुरोगामी अवलंबत आहेत. जे बेकायदा घुसखोरांच्या नावाने ढसाढसा रडत असतात, ज्यांची नाजूक मने अशा उपेक्षितांच्या हाल अपेष्टा पाहून कायम गहिवरतात हा सगळा अभिनय आहे. प्रत्यक्ष मदत करायची वेळ आली की ते कांगावा करतात आणि योग्य ती चक्रे फिरवून ह्या उपेक्षितांना कुठल्यातरी उपेक्षित जागी पाठवतात.
किती ढोंग! जी लहान सहान गावे अमेरिकेच्या दक्षिण सींमेवर आहेत तिथे हजारो बेकायदा घुसखोरांचे लोंढे रोज येत आहेत. तिथल्या लहान गावांकडे पुरेशी यंत्रणा, पुरेसा निधी, पुरेसे बळ ,नाही ह्याची ह्या ढोंगी पुरोगाम्यांना काडीची चिंता नाही.
आपले लाडके भ्रमिष्ट म्हातारबा अशी घुसखोरी थांबवू इच्छित नाही. ना त्यांची घुसखोरी सम्राज्ञी म्हणून नेमलेली कमलाबाई. एकीकडे कायदेशीर रित्या येऊ इच्छिणार्‍या लोकांना मुलाखत अर्ज वगैरे सोपस्कार करायला आठ आणि दहा महिने उशिराने अपोइंटमेंट देत आहेत. अन्य कायदेशीर मार्गात (ग्रीन कार्ड, नागरिकत्त्व) वगैरे अफाट विलंब आहे. मात्र अशिक्षित, अर्ध शिक्षित, इंग्रजीचा गंधही नसणार्या अती गरीब देशातील गाळातील लोकांना कायोटी (घुसखोरीतील माफिया) ह्यांना हजार एक डॉलर देऊन बेकायदा घुसायची खुली संधी आहे. अशा अनिर्बंध घुसखोरीचा काय फायदा? अमेरिकन गरीब लोकांचे रोजगार त्यांच्याहून गरीब लोक हिसकावणार नाहीत काय? कोण लोक येत आहेत, किती लोक येत आहेत? त्यांच्या रहाण्याची, खाण्याची, नोकरीची व्यवस्था अमेरिकन करदात्यांनी काय म्हणून घ्यायची? समस्त मध्य आणि अमेरिकेतील गरीब देशांची जबाबदारी अमेरिकेच्या शिरावर का? अमेरिकेत पुरेशा समस्या नाहीत काय? असले लोक अमाप ड्रग घेऊन येतात आणि त्यांच्या सेवनामुळे अनेक अमेरिकन लोक आयुष्यातून उठतात.
ह्या लोकांना कुठले रोग आहेत, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे ह्याची काही तपासणी नाही. अनेक पुरोगामी, डावी राज्ये स्वतःला अभिमानाने सँक्चुअरी शहरे, राज्ये, कौंट्या म्हणवतात. ह्या भागात बेकायदा घुसखोरांनी अनेक गुन्हे पुन्हा पुन्हा केलेले आहेत. अशा नरपुंगवांना त्यांची अमेरिकेतील उपस्थिती कायदेशीर आहे का असे विचारणे ह्याला त्याहून जास्त गंभीर गुन्हा समजतात.
कठिण आहे. अर्थात जनतेला अशाच प्रकारे अनिर्बंध घुसखोरी आवडत असेल तर नाईलाज आहे!

मजेदार लिहीले आहे Happy इतर विषयांवर वाद असले तरी या विषयावर माझा अभ्यास नाही त्यामुळे उगाच प्रत्येक पोस्टवर विरोधी लिहीणार नाही. ट्रम्पच्या काळात आणि आत्ता, यात नक्की काय फरक पडला आहे हे कोणी लिहीले तर आवडेल वाचायला. पण इल्लिगल इमिग्रेशनच्या बाबतीत माझे जनरल मत कायमच रिपब्लिकन्सच्या जवळ जाणारेच आहे.

मला इतकेच माहीत आहे की रिपब्लिकन्सचा आवेश अनेकदा स्वतःच्याच गरजा (उदा बॉर्डर राज्यांतील हंगामी मजूर ई. ज्यांच्याकरता बुशनेही एक मार्ग काढला होता) न लक्षात घेता सर्व इल्लिगल्सना गुन्हेगार ठरवणारा आहे आहे. तर डेम्सचा मानवतावादी ई. अ‍ॅप्रोच अनेकदा अमेरिकेच्या हिताविरूद्ध पण आपल्या सर्कल्स मधे ब्राउनी पॉइण्ट्स मिळवायला ठरवलेला वाटतो.

पण शेंडे- ड्रग्जचा प्रॉब्लेम डिमाण्डमुळे आहे. उद्या ट्रम्पच्या वोटर्सनी इल्लिगल लोकांकडून ड्रग्ज घेणार नाही व अमेरिकेला पुन्हा ग्रेट बनवेन अशी बाणेदार प्रतिज्ञा केली तर सध्याच्या हिशेबाने ड्रग ट्रेड अर्ध्यावर खाली येइल Happy

मी सुद्धा इमिग्रेशन बद्दल साशंक आहे. (ते रिपब्लिकन्स च्या "ग्रेट रिप्लेसमेंटच्या" बागुलबुव्यामुळे नाही हे वेगळे सांगणे न लगे)

इमिग्रेशनमुळे "अर्थव्यवस्था" ह्या व्यक्तीस हातभार लागतो हे खरेच आहे (जीडीपी वाढतो इ.)
पण कमी भत्त्यामध्ये काम करणाऱ्या सगळ्या नागरिकांचे उत्पन्न इमिग्रेशन मुळे खालावते. त्यामुळे, ह्या "अर्थव्यवस्था" सुधारणेचा प्रमुख फायदा मुख्यत्वे श्रीमंत, अतिश्रीमंत लोकांनाच होतो. नाही, तसे म्हणायला मध्यमवर्गीय लोकांना अनेक वस्तू सुविधा स्वस्तात मिळतात, नाही असे नाही. पण मुख्यत्वे फायदा व्यवसायिकांना होतो आणि मुख्यत्वे तोटा सर्वात कमी पगारी लोकांना होतो.

"फ्री मार्केट" देवाची पूजा करणारे कधीकधी इमिग्रेशन बाबत मात्र फ्री मार्केटचा दुस्वास करतात हे काहीसे बरे वाटून जाणारे आहे.

आणि इमिग्रेशनचा कमी उत्पन्न असलेल्या लोकांवर वाईट परिणाम होतो हे मान्य केले तरी शेजारील देशातील गोरगरिबांना मदत करणे हे काही "अत्यंत चुकीचे" आहे असे मला वाटत नाही, त्याउलट रिपब्लिकन पक्षातील काहींचा xenophobia, रेसिझम मात्र शुद्ध तिरस्करणीय आहे. इमिग्रेशनमुळे तयार होणाऱ्या मलईचे योग्य प्रकारे वाटप केल्यास इमिग्रेशनमुळे दुष्परिणाम झालेल्या लोकांना मदत करता येऊ शकते.

अनंतकोटी ब्रह्मांड नायक, ईश्वराचा पृथ्वीवरील अवतार वगैरे समजले जाणारे ओबामाजी हे उपहासाने लिहिले आहे.
खरे अनंतकोटी ब्रह्मांड नायक, ईश्वराचा पृथ्वीवरील अवतार त्रम्प आहे.
तो जिझसपण आहे.
२००० खेचरांनी हे सिद्ध केले आहे कि निवडणुकीत घोटाळा झाला म्हणून त्रम्प हरला. खरा तोच प्रेसिडेंट आहे. त्यामुळे त्याला कुठलाहि कायदा लागू होत नाही. त्याने भर दिवसा भर रस्त्यावर न्यू यॉर्क सिटि त कुणाला गोळी घातली तरी लोकांना चालेल.
त्याने ५० रिपब्लिकनांना मारले तरी लिंड्से ग्रॅम ला चालेल. (माझ्या मते ग्रॅमलाच पहिले मारावे)
शिवाय बायडेन ला जी जागा मिळाली त्यापेक्षा कितितरी चांगली जागा त्रंप ला मिळाली असती. खरे तर त्यालाच सवपेटिकेत घालून त्याच्या नावाचा जयजयकार करून पुरुन टाकायला हवे होते.

कॉमी, सहमत.
<<कमी उत्पन्न असलेल्या लोकांवर वाईट परिणाम होतो>>
मग काय झाले? तुम्ही रॉम्नी काय म्हणाला ऐकले नाहीत का? तो म्हणला जवळपास ४८ टक्के लोक काळे नि गरीब आहेत, ते आपल्याला मत देणारच नाहीत, तर त्यांचा विचारच कशाला?
तर हा देशच मुळी फक्त श्रीमंत लोकांसाठी आहे. कसेहि करून पैसे मिळवा, नि स्वतःची काळजी घ्या.
गरीब लोकांचे कल्याण वगैरे असल्या कल्पना असतील तर भारतात नाहीतर अफ्रिकेत जा. अमेरिकेत असले काहीहि नसते.
इथे फक्त मी, माझे!

घटनेमध्ये आधी फक्त जमीन मालक असणार्‍यांनाच मताधिकार होते.
तेंव्हा घटना प्रमाण मानायची असेल तर सर्वांना बंदुकी द्या (फुकटसुद्धा!) नि फक्त श्रीमंत लोकांनी मते द्यावीत.

घटनादुरुस्ती करून काळ्या लोकांना जरी स्वतंत्र केले तरी थॉमस सकट सगळे सुप्रीम कोर्ट म्हणेल की काळ्या लोकांना गुलामच ठेवा, कारण ती घटना दुरुस्ती मूळ घटनेत नाही.
त्रम्पला शिव्या द्या वाटले तर, पण मते रिपब्लिकनांनाच द्या!! कारण न्यायाधीश नेमणे, निरनिराळ्या राज्यात सेक्रेटरी ऑफ स्टेट (जे निवडणुकीला जबाबदार असतात) ते रिपब्लिकन असणे हे जास्त महत्वाचे आहे. प्रेसिडेंट फक्त सही करायला.

अमेरिकेत येऊन रहावे असे अब्जावधी लोकांना वाटत असणार कारण तो जगातील एक प्रगत, मुक्त वातावरण असलेला देश आहे. पण ह्याचा अर्थ त्या समस्त इच्छुकांना सामावून घेण्याची सक्ती अमेरिकेवर आहे असे मला वाटत नाही. किंबहुना बेबंद, बेहिशेब पद्धतीने अशिक्षित, अर्धशिक्षित लोकांची आयात करणे आर्थिक दृष्ट्या फायद्याचे असूच शकत नाही. अशा प्रकारे कुठल्याशा कायोटी माफियाला कसे बसे काही पैसे देणे, त्याबदल्यात ड्रग नेणे, त्याबदल्यात लैंगिक शोषण सहन करणे, हाल अपेष्टा सहन करणे ह्यामुळे ह्या माफियांचे फावते आणि ते गब्बर होतात.
मुळात अमेरिकेचा प्रवेशाबद्द्ल असणारा कायदा धुडकावून आलेला बेकायदा घुसखोर अमेरिकेत शिरताच अत्यंत कायदेभीरू, पापभीरू होऊन अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला भक्कम पाठबळ देणारा बनतो ह्यावर माझा विश्वास नाही. अशा प्रकारे येणारे घुसखोर डेटा सायंटिस्ट, ब्रेन वा हार्ट सर्जन वा रॉकेट वैज्ञानिक कधीच नसतात. अशा लोकांचे उत्पन्न आणि त्यांचा सरकारी आणि अन्य सेवांवर पडणारा भार ह्याचा हिशेब जुळत नाही.

जर अशा बेकायदा घुसखोरीचा बक्खळ फायदा होत असेल तर डेमोक्रॅट लोकांनी कायदे बदलून अमेरिकेच्या सीमा पूर्ण उघड्या कराव्यात. विमानाने येणार्या लोकांवरही व्हिसा वगैरे बंधने लावू नयेत. पायी येणार्यांना नाही तर हवेतून येणार्या लोकांवर बंधने का? हा भेदभाव नाही का?

(मारूनमुटकून) सीमा साम्राज्ञी अर्थात बॉर्डर झार बनवलेल्या कमला ताईंनी असे बिनबुडाचे विधान केले की अमेरिकेची सीमा सुरक्षित आहे. मग हे हजारो घुसखोर कसे येतात? त्याचे उत्तर टेक्सस गव्हर्नराने कमलाबाईंच्या निवासस्थानाजवळ दोन तीन बस भरून बेकायदा घुसखोर पाठवून दिले!
मार्था विन्यार्ड प्रकरणी काही डेमोक्रॅट आणि समर्थकांनी ताळतंत्र सोडला आहे. म्हणे फ्लोरिडा गवर्नर डी सँटीस चे कृत्य हे होलोकॉस्टच्या तोडीचे आहे! अगदी तसे नाही पण जवळपास! चार्टर्ड विमानाने त्या पन्नास भाग्यशाली घुसखोरांना आलिशान बेटावर नेले. तिथे त्यांचा तब्बल ४४ तास पाहुणचार झाला. आणि मग आता पुन्हा इथे येऊ नका ह्या प्रेमळ आग्रहानंतर त्या घुसखोरांची कुठल्याशा सैनिकी तळावर रवानगी केली. ह्याला आउश्वित्झ वगैरे प्रकाराशी साम्य असल्याचे दावे हास्यास्पद आहेत. पुरोगामी लोकांचे पितळ उघडे करण्याची ही एक उत्तम युक्ती फ्लोरिडाच्या राज्यपालाने केली. २०२४ च्या निवडणुकीत जर रॉन डिसॅंटिस उतरला तर हा मुद्दा त्याचे पारडे जड करणार हे नक्की.

बेकायदा ड्रग येतात त्यालाही ट्रंप आणि त्याचे मतदार जबाबदार आहेत असा हास्यास्पद दावा वर केला आहे. ड्रग हे बेकायदा आहेत. ते आणणे, विकणे हेही बेकायदा आहे. पौगंडावस्थेतील मुले हेरून हे ड्रग विकणारे त्यांना ही जीवघेणी व्यसने लावतात. व्यसनग्रस्त लोकांना दोष देण्याऐवजी अशा प्रकारची घातक द्रव्ये देशात पोचूच नये ह्याची खबरदारी घेणे कितीतरी शहाणपणाचे आहे. परंतु प्रत्येक बाबतीत ट्रंपला कसे गोवता येईल ह्या विचारांनी ग्रस्त असणार्या लोकांना असे व्यवहार्य विचार पटणे अवघड आहे. असो.

बेकायदा ड्रग येतात त्यालाही ट्रंप आणि त्याचे मतदार जबाबदार आहेत असा हास्यास्पद दावा वर केला आहे. >>> टोटल बकवास क्लेम. परत वाचा. मी असला काहीही दावा केलेला नाही. उलट सांगतोय की तुम्हाला जर हे लोक नको असतील तर त्यांच्याकडून ड्रग्ज घेउ नका. अर्धा व्यापार खाली उतरेल केवळ ट्रम्पवाल्यांनी तेवढे केले तर. ड्रग ट्रेडकरता ट्रम्पला कोणी जबाबदार धरले आहे.

ही घातक द्रव्ये देशात पोहोचूच नयेत वगैरे आदर्शवाद ठीक आहे. पण ती विकत घेणारे अमेरिकनच आहेत. तोपर्यंत ती येतच राहणार. गेली ३०-४० वर्षे वॉर ऑन ड्रग्ज वगैरे सुरू आहे. मधे अनेक वर्षे रिपब्लिकन सरकारे आली. ४ वर्षे ट्रम्पही होता. वॉल करता अजाण मागालोकांडून मिलियन्स घेउन झाले. त्याचे नक्की काय केले यावर खटले सुरू आहेत. बॅनन साहेब सध्या पुन्हा चर्चेत आहेत. ट्रम्पनेही त्यातलाच पैसा स्वत:च्याच खटल्यातील वकिलांना दिला वगैरे आरोप होत आहेत. ते राहूद्या सगळे. डेम्सना शिव्या घालणे सोपे.

मुळात हा सगळा फार्स ती चर्चा अ‍ॅबॉर्शन वरून वेगळ्या विषयावर नेण्याकरता आहे. कारण मिडटर्म्समधे उत्साही अ‍ॅबॉर्शनबॅनला होत असलेला विरोध पाहून रिपब्लिकन्सची तंतरली आहे. विशेषत: स्त्रियांचा विरोध. त्यामुळे त्यांना पुन्हा भीती घालण्याकरता हा उद्योग काढला आहे.

बाय द वे, खुद गब्बर ट्रम्प या उद्योगावर खूप नाराज आहे असे ऐकले. तात्त्विक विरोध वगैरे नाही त्याचा (हॅ हॅ हॅ). सगळा फोकस डिसॅण्टिस वर जातोय म्हणून Happy

कोवळ्या वयातील मुलांना हेरून, इट इज सो कूल वगैरे वातावरण निर्मिती करून मुलांना ड्रग्जच्या आहारी नेले जाते. आता ह्यात ट्रंप आणि त्याचे मतदारच कसे गुंतलेले आहे हे कळणे अवघड आहे निदान मला तरी. हे म्हणजे एखाद्याने बलात्कार करावा आणि त्याचा दोष त्या मुलीवर, तिच्या कपड्यांवर, तिच्या वागण्याला देण्याचा प्रकार आहे. ब्लेम द व्हिक्टिम! छान. अल्पवयीन लोक अशी व्यसने करत आहेत हे कित्येकदा आई वडलांना समजत ही नाही आणि जेव्हा कळते तेव्हा उशीर झालेला असतो. ह्यावर उपाय म्हणजे कायदा कडक असणे.
पण जेव्हा देशाच्या सीमा सुरक्षित नसतात तेव्हा अशिक्षित लोकांबरोबर ड्रग्जही मोठ्या प्रमाणात प्रवेश करतात हे ट्रंपद्वेषाची झापडे काढली तर सहज दिसेल. पण इथून तिथून रिपब्लिकन आणि ट्रंपला दोष कसा देता येईल ह्या हास्यास्पद एककलमी कार्यक्रमाचा अंत आवश्यक आहे.
गेल्या २ वर्षात ड्रग्जचा ओव्हरडोस घेऊन मरणार्‍यांची संख्या भयंकर वाढलेली आहे. अर्थात बायडन सरकार ह्याचा दोष कोविड आणि हवामान बदल ह्यांना देते आहे. (जानेवारी ६ ला कसा देत नाही हे एक आश्चर्यच आहे!)
जर डिसँटिस जास्त चांगला उमेदवार असेल (उजवा म्हणणार होतो. पण नको!) तर तोच जिंकावा. ट्रंपला चिकटून रहाण्यात काय अर्थ आहे? जो स्पर्धेत उतरेल आणि जिंकेल तोच पुढे जावा. प्रतिस्पर्ध्यांचे राजकारण चालूच राहील. ट्रंपला डि सँटिसची तोंड भरुन स्तुती करणे परवडणार नाही. कमलाबाई आणि न्यूसम नाही का राष्ट्रपतीपदासाठी उत्सुक आहेत पण म्हातारबा २०२४ ची निवडणुक लढवायला ठार नालायक आहे असे उघड म्हणत नाहीत तसेच!
गर्भपाताचा मुद्दा हा फार भिडणारा नाही असे वाटते. एकंदरीत देशाची भूमिका ही दोन टोकांच्या मधे आहे. जन्म झाल्यावरही मातेची इच्छा असल्यास अर्भकाला ठार मारता यावे हे एक टोक आणि ज्या क्षणी गर्भ जन्मतो त्या क्षणी तो एक पूर्ण माणूस असतो हे मानणारे दुसरे टोक.
गर्भपात म्हणजे स्त्री मुक्ती चा हुंकार म्हणणारे एक टोक आणि गर्भपात म्हणजे खून म्हणणारे दुसरे टोक. ह्यातील कुठलेही टोक सामान्य अमेरिकन् माणसाला पटणारे नाही.
सीमेवरील राज्यांना बेकायदा घुसखोरीचा प्रचंड त्रास होत आहे आणि बुद्धीभ्रष्ट म्हातारबा आणि त्याचे सरकार ह्याबद्दल काहीही करत नाहीत त्यामुळे सीमेवरील राज्ये त्यांच्या परीने काहीतरी करत आहेत. ह्याचा गर्भपाताशी काहीही संबंध नाही. ट्रंप आणि त्यांचे समर्थक ह्यांना काही करून दोष द्यायचा ह्या एककलमी कार्य क्रमाचा परिपाक म्हणजे ह्या अस्सल समस्येला नको ते फाटे फोडणे चालू. असो.

अशा प्रकारे येणारे घुसखोर डेटा सायंटिस्ट, ब्रेन वा हार्ट सर्जन वा रॉकेट वैज्ञानिक कधीच नसतात////

पण उजव्या डाव्या दोन्ही बाजूच्या गोऱ्या लोकांना या घुसखोरांनी सायंटिस्ट, डॉक्टर बनावं अशी अपेक्षाच नसेल ना. त्यांना त्यांच्या स्वतःच्या मुलांकडून तशी अपेक्षा असेल. आणि हे इलिगल लोक त्याना अंगमेहनतीची कमी पगाराची unwanted कामं करायला हवे असतात. आमच्या भागात construction मध्ये हेच नॉन इंग्लिश स्पीकिंग लेबर असतं. इलिगलही असतील त्यात. त्यांना राबवणं तर अधिकच सोपं.
रिपब्लिकन्सना इलिगल इमिग्रेशन थांबवायचं आहे असं वाटत नाही. त्यांच्या डोनर्सनाही हे स्वस्त लेबर हवंच असेल. फक्त बेसला बरं वाटावं म्हणून जरा विरोधाचं नाटक करून दाखवतात इतकंच.

Just a side note. People transported to Martha's were asylum seekers from Venezuela and they had their paperwork. They were not necessarily illegals.

उगीचच नेहमीचे टॉकिंग पॉईंट वापरून दोन्ही बाजू कशा सारख्याच दोषी आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केविलवाणा वाटतो. असा अट्टाहास का?
बेकायदा घुसखोरी शून्य कधीच नव्हती पण हा भ्रमिष्ट म्हातारबा राज्य करायला लागल्यापासून ह्या बेकायदा घुसखोरीचे प्रमाण गगनाला भिडले आहे. ह्याचा त्रास सीमेलगतच्या राज्यांना प्रचंड होतो आहे. तिथे बहुतांश रिपब्लिकन सरकारे आहेत. नागरिकांचे हाल होत असताना त्याकडे दुर्लक्ष करणे रिपब्लिकन सरकारना परवडणारे नाही.
लेबर म्हणून कितीही आकर्षक असले तरी त्यांची आयात काम जितके आहे तितकीच असली पाहिजे. कोट्यावधी घुसखोर आले म्हणजे त्या प्रमाणात शरीरमेहनतीची कामे आपोआप निर्माण होतील असे मानणे कितपत योग्य आहे? बिनडोकपणा आहे.
उलट डेमोक्रॅट लोकांना भरपूर आयात करून विविध शहरे, गावे, राज्ये ह्यांचे डेमोग्राफिक बदलायचे आहे आणि त्याकरता घाऊक आयात आवश्यक आहे. (अर्थात अशा पार्श्वभूमीतून आलेले लोक बहुधा जुन्या वळणाचे, पारंपारिक विचारांचे, धार्मिक असतात. त्यांना टोकाचे वोक विचार जसे अनिर्बंध गर्भपात, लिंगांची अदलाबदल इ. कितपत पचनी पडेल ह्याबद्दल शंकाच आहे.)

सीमेवरील राज्यांना बेकायदा घुसखोरीचा प्रचंड त्रास होत आहे आणि बुद्धीभ्रष्ट म्हातारबा आणि त्याचे सरकार ह्याबद्दल काहीही करत नाहीत त्यामुळे सीमेवरील राज्ये त्यांच्या परीने काहीतरी करत आहेत. >> हो ना, फ्लोरीडाचा गव्हर्नर टेकसासमधल्या फेडरल फॅसिलिती मधल्या पन्नास जणांना उचलून मार्थास मधे नेऊन ठेवतो. हे बेट आहे, विंटरमधे ते कट ऑफ असते तिथे त्या वेळेमधे फक्त ५०-६० लोक असतात अशा फुटकळ गोष्टींकडे कशाला बघा ? काहीतरी करत नसून काहीही करत आहेत. आधी तात्या ने सो कॉल्ड मोठी वॉल बांधली तसाच मूर्खांचा बाजार सगळा. निवडणूकीसाठी केलेला स्टंट ह्यापलीकडे काहीही वॅल्यू नाही त्याला.

ब्लेम द व्हिक्टिम! छान >>> आँ? कधी केले हे? पुन्हा एकदा. पुन्हा वाचा. आणखी उलगडून लिहीतो.

बेकायदा घुसखोर कोवळ्या मनाच्या अमेरिकन्सना फितवून ड्रग्सच्या आहारी नेतात असा तुमचा दावा आहे ना? आता अमेरिकन्सपैकी अर्धे लोक ट्रम्पचे मतदार आहेत. हेच लोक इल्लिगल्सच्या विरोधात आहेत. केवळ त्यांनी या लोकांकडून जर ड्रग्ज घेणे बंद केले तर आपोआपच अर्धे मार्केट बंद होईल ना? बाकी भोंगळ डेम्स वगैरे घेत राहतील. त्यांचाही सहभाग आहेच की. तो कोठे नाकारला आहे? तुम्हाला पोस्ट समजली नाही. यात ट्रम्पलाही जबाबदार धरलेले नाही आणि त्याच्या मतदारांनाही. फक्त इतकेच सांगतोय की सुरूवात स्वतःपासून करा. जे इल्लिगल्स आहेत त्यांच्याकडून ड्रग्ज घेणे बंद करा. आता यात काय विक्टिम ब्लेमिंग आले.

ड्रग्ज वगैरे एकदम कूल आहे हे हाय क्लास अमेरिकन गोर्‍या व्यक्तीला एक होम डेपो समोरचा अमिगो सांगतोय, आणि तो त्याने इम्प्रेस होउन आयव्ही लीगचा अभ्यास सोडून ड्रग्जच्या नादी लागतोय ही कल्चरल इमेज फार भारी आहे.

बाकी बिलियन डॉलर्सचा ड्रग्ज चा व्यवसाय प्रामुख्याने असल्या बेभरवश्याच्या लोकांतर्फे चालतो हा तर फार थोर अ‍ॅनेलिसिस आहे. त्यांच्या सप्लाय चेन्स फार रिलाएबल असतात. ठराविक काळाने ठराविक ठिकाणी तो माल सदोदित सप्लाय होत राहावाच लागतो. तो परदेशातून अमेरिकेत पोहोचवायला असे कधीही पकडले जाउ शकणारे, त्याचा काहीही अनुभव नसलेले सामान्य लोक कामाचे नाहीत. त्यांच्यातर्फे येणारी ड्रग्ज एकूण व्यापाराच्या १०% ही नसतील. बाकी ९०% सप्लाय चेनवाले एकदम सराईत असतात. त्यांच्या उलाढाली या असल्या लोकांच्या भरवश्यावर नसतात.

ड्रग्ज वगैरे एकदम कूल आहे हे हाय क्लास अमेरिकन गोर्‍या व्यक्तीला एक होम डेपो समोरचा अमिगो सांगतोय, आणि तो त्याने इम्प्रेस होउन आयव्ही लीगचा अभ्यास सोडून ड्रग्जच्या नादी लागतोय ही कल्चरल इमेज फार भारी आहे. >> Lol

ड्रग विकणे हे एक मोठे रॅकेट आहे. बेकायदा घुसखोरीचा फायदा घेऊन कुणी रिकार्डॉ किंवा मार्कोस ड्रग आणत असेल पण त्याची भूमिका एक भारवाही आहे. तो काही गब्बर श्रीमंत होत नाही. पण असा मुबलक पुरवठा असेल, जर मोठी डेमोक्रॅटिक शहरे गुन्हेगारांना शिक्षाच देत नसतील, शून्य पैसे देऊन जामीनावर बिनबोभाट सुटका होत असेल तर अशा शहरात अशा मुबलक ड्रग पुरवठ्याचा फायदा घेऊन ड्रग ची रॅकेट निर्माण होतात. (इथे कुठेही ट्रंप वा त्याचा मतदार जबाबदार नाही.) आणि बेकायदा घुसखोर हे केवळ एखादे खेचर इतपतच भूमिका बजावतात. कोट्यावधी डॉलरची उलाढाल असले निरक्षर लोक करतात असा विनोदी दावा आपणच करू शकता. बडे व्यावसायिक पूर्वी मच्छीमार, ट्रक वगैरे अन्य वाहतूक करणारे, प्रवासी विमानात सेवा पुरवणारे कर्मचारी, कधी कधी चक्क ड्रोन वगैरे मार्ग वापरुन ड्रग अमेरिकेत उतरवायचे. आता म्हातारबाच्या कृपेने रोज हजारो लोक बेकायदा घुसत असतील तर अशा बड्या अमली पदार्थ व्यापारी लोकांना एक नवे आणि उत्तम माध्यम मिळाले आहे जे वापरून आणखी शेकडो टन ड्रग आणता येतात. आणि आकडेवारी पाहिली तर त्यात तथ्य आहे असेच दिसते.

विविध बंडखोर रॅप म्युझिक, ती गाणारे नाचणारे वेळोवेळी ड्रग, हिंसा ह्याचे समर्थन करत असतात. पौगंड वयातील मुलांवर ह्याचा वाईट परिणाम होत असतो. ह्या वयात स्वाभाविक असणारा बंडखोरपणा अ त्यंत वाईट वळण घेऊ शकतो आणि आयुष्याचे नुकसान करु शकतो.

निव्वळ ड्रग घेऊ नका म्हणजे समस्या सुटेल असे समजणे हे भोळसटपणाचे आहे. ड्रग घेऊ नका याविषयीचे प्रबोधन शाळा कॉलेजात चालूच असते. पण जोडीला कडक कायदे, शिक्षेची भीती आवश्यक आहे. मी जर ड्रग विकताना पकडलो गेलो तर माझे आयुष्य संपेल मला २५-३० वर्षे तुरुंगात सडावे लागेल अशी भीती असेल तर कदाचित ड्रगचा ओघ मंदावेल.
ट्रंप आणि त्याचे मतदार हे इतर जनतेपेक्षा जास्त प्रमाणात ड्रग घेतात आणि ड्रगच्या व्यापाराला हातभार लावतात असा काही पुरावा असेल तर जरूर द्या. माझ्या माहितीनुसार ट्रंप दारुलाही शिवत नाही.

कोट्यावधी डॉलरची उलाढाल असले निरक्षर लोक करतात असा विनोदी दावा आपणच करू शकता.>>> अहो तुम्हीच केला आहे. मीच तो खोडतोय.

ट्रंप आणि त्याचे मतदार हे इतर जनतेपेक्षा जास्त प्रमाणात ड्रग घेतात आणि ड्रगच्या व्यापाराला हातभार लावतात असा काही पुरावा असेल तर जरूर द्या. >>> कधी म्हंटलो मी हे? तुमच्या डोक्यातील स्ट्रॉमॅन तुम्हीच उभे करताय. जर अर्धे लोक ट्रम्पला मत देत आहेत, जर त्यांचा इल्लिगलस ना विरोध आहे, तर अर्धे कस्टमर कमी झाले तर व्यापार अर्धा होईल हे साधे मॅथ आहे.

तुमच्या पोस्टला बरेचसे समर्थनच होते. शेवटी एक गंमत म्हणून कॉमेण्ट टाकली होती की जर हे लोक ड्रग्ज आणत आहेत हा मुख्य प्रॉब्लेम असेल तर उत्तर सोपे आहे. मागालोकांनी इल्लिगल्स कडून ड्रग्ज घेउ नयेत. अमेरिकेतील अर्धे मतदार ट्रम्पच्या बाजूने आहेत. त्यांनी हे केले तर व्यापार अर्ध्यावर येइल. आता यात ट्रम्पला कोठे जबाबदार धरले? तुम्ही बळंच ती स्वतःच्या अंगावर घ्यायचे काही कारण नव्हते.

अर्ध्या संख्येने लोक. त्यांनी बंद केले तर व्यापार अर्धा होईल. साधे मॅथ. यात हे लोक व्यापाराला हातभार लावतात वगैरे आरोप कोठून दिसले ते तुमचे तुम्हाला माहीत.

ड्रग्जचा दावा तुमचाच होता. माझा नाही.

बेकायदा घुसखोरीचा फायदा ड्रग डिलर करून घेतात. त्यातून त्यांचे मेक्सिकोतील ड्रग माफियाशी साटेलोटे होते. त्यांचा धंदा अधिक फोफावतो असा माझा दावा आहे. निरक्षर घुसखोर १००-२०० फारतर १००० डॉलरच्या बदल्यात मेक्सिकोतील ड्रगचा पॅक अमेरिकेतील ड्रग डीलरला पोचवतात.
निरक्षर घुसखोर ह्यातून कोट्याधीश बनतात आणि तमाम ड्रगचा व्यवसाय आपल्य हातात घेतात असा हास्यास्पद समज आपण करुन घेतला आहे.
इतकी वर्षे चालू असलेला ड्रगचा व्यापार बेकायदा घुसखोरीमुळे आणखी तेजीत येतो आणि त्यातून जास्त लोक त्याला बळी पडत आहेत अशी आकडेवारी दिसते आहे. तरी त्याला ट्रंप आणि त्याचे मतदार तेवढेच जबाबदार आहेत जेवढे बायडन आणि त्याची बिनडोक धोरणे हा निष्कर्ष माझ्या मते साफ चूक आहे. ट्रंप आणि त्याच्या मतदारांनी अशा बेकायदा, बेबंद, अनिर्बंध घुसखोरीचे कधीही समर्थन केलेले नाही. त्यामुळे ते जबाब्दार नाहीतच.

अहो तुम्हीच केला आहे. मीच तो खोडतोय. >> Lol "माझाच गणपुले!" सिंड्रोम.

मला तर शेंडेच भ्रमिष्ट म्हातारबा वाटून राहिलेत. Proud

अमेरिकेच्या हिताची इतकी काळजी असलेल्या लोकांना माजी अध्यक्ष १०० टॉप सिक्रेट कागदपत्रे मागूनही देत नाही. ती डिक्लासिफाय केल्याचे पब्लिक मधे सांगतो पण कोर्टात तसा दावा करत नाही. ज्यावर अमेरिकन लोकांचे व इतर देशातील माहितगारांचे लाइफ धोक्यात येउ शकते अश्या कागदपत्रांची बिनिदिक्कत हेळसांड करतो याचे काहीही वाटत नाही. लायबरीतील पुस्तक लेट रिटर्न केल्यासारखे आहे म्हणे. स्टोरेज इश्यू. हे नावाजलेले रिपब्लिकन्स जे स्वतः लॉयर्स आहेत ते सांगत आहेत. एकसो एक विद्वान आहेत.

त्या स्पेशल मास्टर ने पहिल्याच बॉलला जवळजवळ विकेट काढली आहे. पहिलाच प्रश्न ती कागदपत्रे डिक्लासिफाय केली आहेत का सांगा विचारले. इतके दिवस लोकांना बहकवायला बडबडत होते पण कोर्टात अजिबात दावा करत नव्हते. आता हो किंवा नाही सांगावे लागेल. यांचा हाच ट्रेण्ड आहे. बाहेर कागद नाचवून मागाक्राउडला काहीही फेकायचे पण कोर्टात चकार विषयही काढायचा नाही.

फॉक्सचा चरितार्थ या डीक्लासिफाय दाव्यावर १५ दिवस चालला होता. आता या स्पेशल मास्टरने काही रिलीफ दिला नाही, तर फॉक्सवरून हळुहळू सुरू होईल की तो कसा मूळचाच ट्रम्प हेटर आहे. डीप स्टेट वगैरे.

अहो तुम्हीच केला आहे. मीच तो खोडतोय. >> Lol "माझाच गणपुले!" सिंड्रोम. >>> हो ना Happy अजूनही पुन्हा तेच म्हणत आहेत.

"माझाच गणपुले!" सिंड्रोम. >> Lol

आता या स्पेशल मास्टरने काही रिलीफ दिला नाही, तर फॉक्सवरून हळुहळू सुरू होईल की तो कसा मूळचाच ट्रम्प हेटर आहे. डीप स्टेट वगैरे. >> हो ते वाचून पहि ला विचार हाच आला होता रे मनात.

शेंडेनक्षत्र, जरा दमाने घ्या.
जरी कुणि म्हंटले असेल की त्रंपमुळे ड्रग्स चा प्रश्न वाढला तरी त्यात काहीहि अर्थ नाही.
त्रंपच्या आधीपासून हे ड्रग्सचे प्रेम अमेरिकेत आहे. १९६० च्या दशकात हे वाढले.
जसे त्रंप म्हणला कोविडसाठी डिसैन्फेक्टंट प्या नि ते हसण्यावारी नेले, तसे त्रंपच्या विरोधातले लोक काय वाट्टेल ते म्हणतात तेहि हसण्य्यवारी न्या.
आम्हाला माहित आहे तुमचे रडगाणे - लोक आम्हालाच का नावे ठेवतात म्हणून गळा काढतात! ओबामाला, हिलरीला नि बायडेन ला काय कमी नावे ठेवल्या जातात? ते कधी असे रडल्याचे ऐकीवात नाही! So, suck it up, buttercup! हे डेमोक्रॅट्स नी म्हंटलेले नाही!

ड्रग्स प्रश्न सुटायला एकच उपाय, ड्रग्स कायदेशीर करा. कारण कुणि काय खावे, प्यावे हे ठरवणारे सरकार कोण?
अल्कोहोल एकेकाळी बेकायदेशीर होते तेंव्हा काळा बाजार खूप झाला नि अल्कोहोलवरचे निर्बंध उठवल्यावर लगेच काळा बाजार थांबला, त्याच्यावरच्या करातून फायदाच झाला.
मारिवाना कायदेशीर केल्यावर त्यावरील करातून फायदाच झाला.
वेश्याव्यवसाय लास व्हेगास मधे कायदेशीर केल्यावर त्यातूनही फायदाच. खेळांवर बेटींग होते तेहि कायदेशीर नि त्यातूनहि फायदाच होतो.

तर गरीब बिचारी मुले, नैतिकता, चांगल्या सवयी, स्वस्त हेल्थ केअर हे सर्व इतर देशांसाठी. अमेरिकेत जिथून मिळेल तिथून पैसा.
म्हणूनच त्रंप नेहेमी आपल्याच मालकीच्या गोल्फ कोर्स वर जायचा, जनतेच्या करातून आपल्या सेक्युरिटी लोकांना आपल्याच हॉटेलात ठेवून आपलाच फायदा करून घ्यायचा. हे सर्व मान्य आहे. कारण पैसा मिळतो!

<<शेंडेच भ्रमिष्ट म्हातारबा वाटून राहिलेत>>
हे तुमच्या आत्ता लक्षात आले? पहिल्यापासून वाचले नाहीत वाटते?

मुद्द्याला उत्तर देता येत नसेल तर वैयक्तिक हल्ले करुन करमणूक करणे हे चालायचेच. तशात अहो रुपम अहो ध्वनिम करणारा जमाव जमला की काय विचारयलाच नको. असो.
मार्था विन्यार्ड प्रकरणात ओढून ताणून ट्र्म्प घुसवून स्वतःला हास्यास्पद करुन घेण्यात लोकांना धन्यता वाटत असेल तर आनंद आहे.

बायडन भ्रमिष्ट आहे ह्याची शेकड्याने उदाहरणे अनेक क्लिपांमधून दिसतात. नसलेल्या व्यक्तीशी शेकहँड करणे, अचानक मी कोण आहे कुठे आहे असे प्रश्न पडणे. कर्ता, कर्म क्रियापदे रानोमाळ हरवलेली निरर्थक शब्दांची भेंडोळी फेकणे इ. मुळे डेमोक्रॅट पक्षालाही हा प्राणी २०२४ ची निवडणुक लढवायला लायक आहे की नाही असा प्रश्न पडत आहे. त्याच्या (राजकीय) शवपेटिकेची मोजमापे घेणे सुरू झाले आहे.

पण तुम्ही तर स्वतःच उपस्थित केलेला मुद्दा दुसर्‍यानेच केलेला आहे असे भासवून तो किती हास्यास्पद आहे सांगत आहात. स्ट्रॉमॅननेही स्वतःच्या डोक्याला हात लावला असेल. ट्रम्पला कोणी जबाबदार धरले आहे? त्याच्या मतदारांना कोणी ड्रग्ज बद्दल जबाबदार धरले आहे? मी तरी नाही. तुम्हाला अजूनही तेच रेटून सांगायचे असेल तर पुन्हा असले खुलासे करणार नाही.

Pages