४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

US Economy बद्द्ल मला एक प्रश्न आहे. ट्रंप ने टॅक्सपेयरला $६०० वाटल्यावर बायडन ने $१४०० वाटायची काय गरज होती. बाजारात जास्त पैसे आल्याने लोकानी भरमसाट खरेदी चालु झाली त्यामुळे Demand- Supply चे गणित बिघडले आणि महागाई वाढायला लागली. महागाई वाढली म्हणुन व्याजाचे दर वाढायला लागले. हे व्याजाचे दर असेच वाढत राहिले तर सामान्य लोकाचे गणित बिघडु शकते.
अमेरिकेत १९८० मध्ये व्याजाचे दर २०% झाले होते त्यावेळी अमेरिकेतील लोकाने घराचे कर्ज कसे मॅनेज केले होते ते जाणुन घ्यायला आवडेल. बायडन त्यावेळी ३८ वर्षाचे असतिल, ट्रंप पण तिशीत असेल आणि त्यावेळी लोकाचे काय हाल झाले ते बघितले असतिल, २००८ चे रिशेशन दोघानी बघितले होते तरी त्यानी परिणाम जाणुन न घेता Economy control करण्याचा निर्णय का घेतला नाही हे कळले नाही.

भारतात जर एवढ्या पटीने महागाई वाढली तर सरकार मध्ये उलथापालथ होते. ब्रिटन मध्ये पण Economy मुळे आजच पंतप्रधानानी राजिनामा दिला. अमेरिकेत मात्र Economy / महागाई मध्ये कोणी सरकारला धारेवर का धरत नाही? बाकी सगळ्या विषयावर डिबेट मध्ये चर्चा होते पण Economy वर कधीच चर्चा होताना दिसत नाही. असे का?

अमेरिकेच्या फेड बॅकेने पण २०२१ च्या शेवटी व्याज दर का नाही वाढवले हा एक वेगळा प्रश्न आहे. त्याबद्दल पण फेड बॅक किंवा पॉवेल ला कोणी जाब विचारत नाही.

<>
एकनाथ शिंदे यांनी वेगळा पक्ष का काढला?
कॉन्ग्रेसमधे कायम सोनिया गांधीच का अध्यक्ष?

या प्रश्नांना एकच उत्तर -
अहो, देवोSपि न जानाति, कुतो मनुष्यः !

नंदया७५ Lol

साहिल शहा - मला इकॉनॉमीबद्दल फारसे कळत नाही. लेस्ली निएल्सनच्या एका पिक्चर मधे त्यातील राष्ट्राध्यक्ष "इन्फ्लेशन = बॅड, इकॉनॉमिक ग्रोथ = गुड" अशी काहीतरी चिट्ठ्री बरोबर घेउन इकॉनॉमीबद्दलच्या मीटिंगला जातो तसलाच प्रकार Happy

एकूण महागाईबद्दल रिपब्लिकन उमेदवार मुद्दा लावून धरत आहेत. डेम्स साहजिकच गप्प आहेत. पण रिपब्लिकन उमेदवारांची क्रेडिबिलिटी सध्या शून्याखाली आहे त्यांच्या गेल्या दोन वर्षांतील धादांत खोटारडेपणामुळे. त्यामुळे डेम्सचे एका प्रकारे फावले आहे. त्यांच्या बाजूच्या मेनस्ट्रीम मीडिया मधे यावर फारसे येत नाही - सीएनएन, एमएसएनबीसी ई. न्यू यॉर्क टाइम्स, वॉपो चे माहीत नाही.

गुन्हेगारांबद्दल सॉफ्ट असणे, इमिग्रेशन आणि महागाई - हे प्रचाराचे मुद्दे इथे आहेत डेमोक्रॅट्सविरोधात. पण अ‍ॅबॉर्शन लॉ, जाने-६ चे "इनसरेक्शन" म्हणा नाहीतर "टूरिस्ट व्हिझिट" आणि नुसते २००२ ची निवड नाकारण्याचे प्रकार इतकेच नव्हे तर आगामी मिडटर्मचे निकाल सुद्धा मान्य करण्याबाबत शंका निर्माण करणे हे मुद्दे रिपब्लिकन उमेदवारांविरूद्ध आहेत. उमेदवार बिनडोक असणे हा एक स्वतंत्र मुद्दा.

ई. >> हा पूर्णविराम निसटला आणि हायफन हा पूर्णविराम वाटला. आता का विचारू नको.
त्यामुळे आता सीएनएन आणि एनबीसी सोडून आणखी कट्टर डेम्स मिडिआ कुठला विचारात पडलेलो. Lol

माइक पेन्स चे भाषण सुरू असताना जॉर्जटाउन युनि. मधले बरेच विद्यार्थी त्याच्या विरोधात घोषणा देत उठून गेले. हा एक वोक बिनडोकपणाच आहे. माइन पेन्स मोक्याच्या वेळी तात्याच्या नादी न लागता कायद्याप्रमाणे वागला होता. पण आपल्याकडे झुकू पाहणार्‍यांनाही तुच्छ लेखणे आणि आणखी उजवीकडे ढकलणे हा एक वोक लोकांचा एक आवडता उद्योग आहे.

तसा या फॉक्सच्या बातमीत एक त्यापेक्षा मोठा विनोद आहे. त्यांच्या दृष्टीने माइक पेन्स सभागृहात असताना विद्यार्थी उठून गेले ही "बातमी" आहे. पण माइक पेन्स (कॅपिटॉल) सभागृहात असताना त्याला मारायला लोक गेले ही त्यांच्या दृष्टीने "बातमी" नाही Happy

डेफिसिट वाढवले कुणी आणि कमी कुणी केले ?
अपेक्षेपेक्षा उलटे उत्तर आहे. सो कॉल्ड फिस्कली रिस्पॉन्सीब्ल रिपब्लिकन पक्ष येतो आणि डेफिसीट वाढवून जातो.

कान्ये वेस्ट अनेक अँटीसेमायटिक गोष्टी बोलतो.
खुद्द ट्रम्पचा जावई कुशनर, ह्याला तो ज्यू असल्यामुळे टार्गेट करतो. ट्रम्प चांगला पण ज्यू जावयामुळे काही वाईट गोष्टी केल्या असे सुचवतो.

ट्रम्प ह्याबद्दल बोलायचे टाळतो. कारण कान्ये कायम ट्रम्प बद्दल गोग्गोड बोलत आला आहे. ज्यू जनतेचा राहिला बाजूला, स्वतःच्या जावयाचा आणि मुलीचा सुद्धा बचाव करावा वाटला नाही त्याला. आणि अर्थातच, ट्रम्पचा एक व्होटर बेस पक्का ज्यूद्वेष्टा आहे, त्यामूळे ट्रम्पला तोंड उघडता येत नाही.

फा, सिक्रेट सर्व्हिस चा वापर करत तात्याने नि त्याच्या हॉटेल्स नी कसा मस्त चुना लावलाय हे वाचलेस का ? जिथे जिथे तात्याची हॉटेल्स आहेत तिथे तिथे तात्या किंवा त्याचे कुटूंबीय गेले की त्याच हॉटेल्स मधे राहत. सिक्रेट सर्व्हिस लाही अर्थात तिथेच राहाणे भाग असल्यामूळे ते बिल सिक्रेट सर्व्हिस वर पडत असे. तिथले रेट्स दहा-पंधरा पटीने प्रस्थापित रेटस पेक्षा लावले गेले आहेत. तात्याच्या पुत्राने त्याचे स्पष्टीकरण देताना सर्व्हीस चार्जेस असे अर्थातच निर्लज्जपणे सांगितले आहे. "ड्रेन द स्वँप" असे करायचे होते हे माहित नव्हते. Lol

सिक्रेट सर्व्हिस चा वापर करत तात्याने नि त्याच्या हॉटेल्स नी कसा मस्त चुना लावलाय हे वाचलेस का ? >> Happy हो ते ही वाचतोय.

मला वाटले व्हाइट हाउस ची "प्रीफर्ड हॉटेल्स" असतील आणि अध्यक्षांना त्याच हॉटेल्स मधे राहावे लागत असेल. कंपन्या करतात तसे Happy तात्या अकांउंटिंग टीमशी हुज्जत घालतोय नेटवर्क बाहेरचे हॉटेल का वापरले म्हणून असे डोळ्यासमोर आले.

“तसा या फॉक्सच्या बातमीत एक त्यापेक्षा मोठा विनोद आहे. त्यांच्या दृष्टीने माइक पेन्स सभागृहात असताना विद्यार्थी उठून गेले ही "बातमी" आहे. पण माइक पेन्स (कॅपिटॉल) सभागृहात असताना त्याला मारायला लोक गेले ही त्यांच्या दृष्टीने "बातमी" नाही Happy”

फारेंड.. असामीच्या शब्दात म्हणायचे तर “फा, धोतरालाच हात घालतोस राव!” Happy

फारेंड , बिनडोक उमेदवार असणे( पक्षी लोरेन बोबर्ट, मार्जरी टेलर ग्रीन) हा एक वेगळा विषय होउ शकतो हे खरे आहे पण त्या बिनडोक्या उमेदवारांना निवडुन देणारे , क्विनॉन मधे बिलिव्ह करणारे बिनडोक मतदार अमेरिकेत आहेत त्याचे काय करशील?

गेल्या काही दिवसात सिनेट आणि गव्हर्नर उमेदवारांचे डिबेट बघण्यासारखे होते.
पेन्सिल्वेनियात फेटर्मन नामक एक पात्र डेमोक्रॅट पक्षातून उमेदवार आहे. मुळात ह्याची राजकीय कारकीर्द सुमार. त्यात अर्धांगवायूचा झटका येऊन गेलेला आहे. ह्याला लोकांचे बोलणे कळत नाही. अनेकदा हा काय बरळतो ते कळत नाही. थोडक्यात म्हातारबा आणि हा ह्यात डावे उजवे करणे अवघड आहे! इतके गुण अंगात असल्यामुळे ह्याला सिनेटमधे पाठवावे असे डेम मंडळीना वाटणे स्वाभाविक आहे!
असो. तर ह्याची डिबेट एक गंमतीदार शो होता. आता डेमो ह्याच्या वरची कडी म्हणजे एखादे प्रेत किंवा कोमात गेलेला/ली/ले कुणी उमेदवार म्हणून नेमते का ते पाहू.
म्हातारबाची गगनाला भिडणारी लोकप्रियता बघून अनेक उमेदवारांनी "आमच्या प्रचाराला अजिबात येऊ नका. आम्ही आमचे पाहून घेऊ" असे आग्रहाचे निमंत्रण दिले! एक अपवाद म्हणजे हा फेटरमन. कदाचित दोन अर्धमेले प्रचारक मिळून एक पूर्ण प्रचार करणारा बनत असेल असे कुणीतरी ठरवले बहुधा. म्हातारबाने नेहमी प्रमाणे घोळ घालून फेटरमन ची सौ (जी स्वतः म्हातारबाच्या भार्येप्रमाणेच पाताळ यंत्री आहे) तिलाच तुम्ही सिनेटची शोभा वाढवाल वगैरे कौतिकाचे शब्द बोलुन आला.

दोन आठवड्यात काय निकाल लागतो ह्याची खूपच उत्सुकता आहे.

एखाद्या गुन्ह्याला बळी पडणार्या व्यक्तीपेक्षा गुन्हेगाराची जास्त काळजी करण्याच्या धोरणामुळे न्यू यॉर्क शहरात अनेक गंमती जमती घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी एका नराधमाने अकारण एका प्रवाशाला डुक्कर मुसंडी मारून रेल्वेमार्गावर ढकलून दिले. जर एखादी गाडी जवळ असती तर ह्या माणसाचे काय झाले असते ते ओळखणे अवघड नाही. अशा गमती वारंवार घडत असल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. शहराच्या महापौराने अशा भयग्रस्त लोकांना आश्वासन देणे अपेक्षित होते. त्या ऐवजी, फोन, इअर बड वगैरे लावू नका. चौफेर लक्ष ठेवा असा उपदेश ह्या धीरोदात्त नेत्याने दिला.
न्यू यॉर्क राज्याची गव्हर्नर कॅथी होचल अशा प्रकारे गुन्हेगारांना कुठलीही शिक्षा देऊ नये. त्यांना अटक झाली तर शून्य पैसे वाला जामीन तात्काळ दिला जावा म्हणजे त्यांना पुन्हा पुन्हा गुन्हे करता येतील अशी भूमिका घेते.
अशा पुरोगामी भूमिकेमुळे कदाचित ह्या डेमोक्रॅटच्या हक्काच्या मानल्या गेलेल्या राज्याची सत्ता गुन्हेगाराला कडक शिक्षा व्हावी आणि न्यू यॉर्क सुरक्षित बनावे अशा बुरसटलेल्या विचारांच्या रिपब्लिकनकडे जाईल अशी भीती माध्यमातील विचारवंत व्यक्त करू लागले आहेत.
आपला रोजचा रेल्वे प्रवास सुरक्षित व्हावा. पोरेबाळे शाळेतून येताना जाताना रेल्वे वापरत असतील तर धडधाकट परत यावीत. माथेफिरु पिसाट लोकांनी धक्के मारून कुणालाही ट्रॅकवर फेकू नये अशा जुनाट, कालबाह्य कल्पना बाळगणारे अनेक मतदार आजही न्यू यॉर्क मधे आहेत असे दिसते आहे. असे लोक वर्णद्वेष्ट्या, गर्भपातविरोधी, लिंगबदल विरोधी पुराणमतवादी रिपब्लिकन लोकांना निवडून देतात का अशी एक भयंकर शक्यता निर्माण झाली आहे. शांतम् पापम्!

हे समांतर विश्वातलं आहे काम?

मास शूटिंगच्या घटना होतात त्यावर काय उपाय सुचवतात वरच्या प्रतिसादातील विश्वातले लोक? सगळ्यांनाच गन्स द्या आणि फास्टेस्ट फिंगर्स फर्स्ट खेळू द्या?

असे लोक वर्णद्वेष्ट्या, गर्भपातविरोधी, लिंगबदल विरोधी पुराणमतवादी रिपब्लिकन लोकांना निवडून देतात का अशी एक भयंकर शक्यता निर्माण झाली आहे. >> शेंडे नक्षत्र, रिपब्लिकन वर्णद्वेष्ट्या, गर्भपातविरोधी, लिंगबदल विरोधी पुराणमतवादी आहेत असे म्हणतोयस का ? Wink

त्या न्यू यॉर्कच्या मेयरने निदान Our thoughts and prayers are with the victim, but there are some good people on the other side असे म्हणायला पाहिजे होते, म्हणजे रिपब्लिकन लोकांची मते डेमोक्रॅट्सनाच मिळतील.

>>पेन्सिल्वेनियात फेटर्मन नामक एक पात्र डेमोक्रॅट पक्षातून उमेदवार आहे.<<
डिस्पाय्ट द डिबेट डिझास्टर अगेंस्ट डॉ. आझ, हिज कँपेन मॅनेज्ड टु रेझ २ समथिंग मिल्यन्स; गो फिगर. कोण रे तो रेप्सना अंधभक्त म्हणत होता...

आणि त्याची सौ. तर.. बडे मियां तो बडे मियां; अर्धे मियां सुभानल्ला... Proud

ओ बाय्दवे, इथल्या काहिंची लाडकी स्टेसी एब्रम्स इज काइंडा डेड इन द वॉटर - लेटेस्ट पोल नुसार. माझ्या ओळखीतल्या डेम्सनी पण वैतागुन केंपला मत दिलं. आता बोला...

हरशेल वाकर आणि छोटे मालक रॉनजी डिसांतीसजी ह्यांच्या डिबेट फार चांगल्या झाल्या नाहीत. फेटरमेन मुळे थोडा दिलासा मिळाला. हुश्श !

कालपरवा नॅन्सी पेलोसीच्या नवर्यावर कुणी माथेफिरूने हातोड्याने हल्ला केला आणि जखमी केले. एकंदरीत हे प्रकरण दिसते तितके सरळ नसावे. त्याचे टायमिंग अगदी निवडणु़कीच्या तोंडावर आहे! पोलिसही फार तपशील देत नाहीत. ज्याने हा हल्ला केला तो घरात कसा शिरला वगैरे प्रश्न आहेत. इतक्या काहीच्या काही श्रीमंत घराला कडेकोट सुरक्षा नसेल हे खरे वाटत नाही. ज्या तत्परतेने हा हल्ला रिपब्लिकन च्या माथी मारण्याचा प्रयत्न म्हातारबा पासून सगळे लोक करत आहेत त्यावरून त्यात बरेच पाणी मुरत असावे.
काही महिन्यापूर्वी पापा पेलोसी (अर्थात आजचा हातोड्याने बदडलेला नॅन्सीचा पती) दारू आणि अन्य नशिल्या पदार्थाचे सेवन करून वाहन हाकताना पकडले गेले. अर्थात अशा महाथोर माणसाला पोलिस थांबवणे कसे शक्य आहे? नशा जास्त झाल्यामुळे सदर गृहस्थ कुठेतरी कार आदळते झाले आणि त्यातून हे उघडकीस आले. सामान्य माणूस (अमेरिकन नागरिक) डी यु आय खाली पकडला गेला तर त्याला जबर दंड, कदाचित तुरुंगवास आणि दीर्घकाळ लायसेन्स रद्द करणे वगैरे शिक्षा होतात. पापाजी आम नसून खास असल्यामुळे कोर्ट संपेपर्यंत बाकावर उभे रहाण्याची शिक्षा झाली जी वयाकडे बघून माफ केली गेली! त्यांच्याबरोबर कारमधे कोण होते, कुणीतरी इसम साक्षीदार होता (अपघात पहाटे २-३ वाजता कधीतरी झाला) हे सगळे गुलदस्त्यात ठेवले गेले. त्याबद्दल अनेक कुजबुजी ऐकू आल्या आहेत. पण हे प्रकरण दाबून टाकले गेले आहे.
असले सगळे असल्यामुळे पापाजींना बळीचा बकरा बनवले असणे शक्य आहे.
निवडणूकीला जेमतेम दोन आठवडे उरले आहेत. त्यामुळे ह्या हल्ल्याची जाने ६ च्या तिसर्या महायुद्धाशी तुलना आणि बरोबरी केली जाणे स्वाभाविक आहे! सॅन फ्रान्सिस्को हे शहर हे व्हाईट सुप्रिमसिस्ट आणि मेगा म्यागा वगैरे लोकांचे मुख्य ठाणे बनले आहे आणि आता ते समस्त डेमोक्रॅट नेत्यांवर जीवघेणे हल्ले करणारेत म्हणून गुपचूप डेमोक्रॅट लोकांना मते द्या. चलन फुगवटा, महागाई, इंधनाचे चढे भाव, थंडीत घरे गरम ठेवायला इंधन कसे मिळवायचे वगैरे रोजचे रडगाणे विसरा आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी कंबर कसा असा काही संदेश द्यायचा असेल!

सध्या समस्त पुरोगाम्यांची लाडकी आणि स्वतःला एब लिन्कनचा स्त्री अवतार समजणारी लिझ चेनी आता अ‍ॅरिझोना राज्यात कारी लेक विरुद्ध मोहिम उघडत आहे. खरे तर ह्या लिंकनबाईंचा ह्या राज्याशी काय संबंध आहे ते लिंकनच जाणे! पण लेकबाई ट्रंपच्या बाजूच्या असल्यामुळे आता कंबर कसून लिझबाई डेमोक्रॅटच्या बाजूने प्रचार करत आहेत. चेनीताईंची एक जळजळीत जाहिरातही अ‍ॅरिझोनात झळकू लागली आहे.
लिझ चेनी आपल्या विरुद्ध प्रचार करत आहे ह्याचा फायदा घेऊन जवळपास ३ लाख डॉलर्स लेक बाईनी उभे केले असे आत्ताच सांगितले.
लिझ चेनीचा करिष्मा पुन्हा तळपताना दिसत आहे!

लिझ चेनी आता अ‍ॅरिझोना राज्यात कारी लेक विरुद्ध मोहिम उघडत आहे >>> त्याला दम लागतो. विजयाची कसलीही शक्यता नाही. डेम्सवाले वापरून सोडून देतील, रिपब्लिकन्स पुन्हा जवळ करणार नाहीत. हे सगळे माहीत असून ही बाई सत्याच्या बाजूने उभी आहे. आपला तर टोटल रिस्पेक्ट. नाहीतर आणखी एका म्हातारबाची इलेक्शनची बकवास तशीच रेटत राहणे सोपे आहे. बाकी तेच करत आहेत. ६१ वेळा कोर्टात फेल गेल्यावर सुद्धा.

राज्याशी संबंध नसलेल्याने तेथे जाऊ नये याबद्दल सहमत आहे. डॉ ऑझलाही सांगा जरा मात्र.

पापाजी आम नसून खास असल्यामुळे कोर्ट संपेपर्यंत बाकावर उभे रहाण्याची शिक्षा झाली जी वयाकडे बघून माफ केली गेली! >>> वा वा काय सॉलिड चाड आहे सर्वांना न्याय समान असण्याची! तुमच्या लोकांनी तर एकेक मानदंडच उभे केले आहेत "खास लोकांच्या गुन्ह्यांबद्दलच्या" शिक्षांबद्दल. गेल्या दोन वर्षातीलच उदाहरणे बघितली तर पुरेशी आहेत.

शेकडो लोकांना त्यांच्या खर्चाने कॅपिटॉलवर सोडून, त्या आगीत आणखी काड्या घालून त्यांना भरपूर शिक्षा होत असताना, त्यांच्या नोकर्‍या जात असताना स्वतः मात्र नामानिराळे राहणे, खटल्यांमधे "फिफ्थ"- किंवा तुमच्या भाषेत मिठाची गुळणी का काय ते - घेउन गप्प बसणे, एरव्ही इलेक्शन बद्दल - पुन्हा तुमच्याच भाषेत- कोकलून्/कांगावा करून - जेव्हा शपथेवर बोलायची वेळ आली तेव्हा तीच गुळणी धरणे, त्याहीवरच्या पित्त्यांना सरळ पार्डन करणे - इतके निरागस वागायची लेव्हल अजून डेम्स मधे यायची आहे.

राज्याशी संबंध नसलेल्याने तेथे जाऊ नये याबद्दल सहमत आहे. डॉ ऑझलाही सांगा जरा मात्र. >> तात्यापासून सुरूवात करा Wink

ट्रंप हा काही लोकांच्या रिकाम्या डोक्यात भाडे न देता रहातो आहे. डेमोक्रॅट लोकांनी काहीही वाईट केले तरी ट्रंप हेच करत होता म्हणून त्याचे समर्थन करायचे. थोडक्यात ट्रंप हाच मापदंड आहे. ट्रंपने केले म्हणून ते किंवा त्याहून वाईट कृत्य क्षम्य.
पापा पेलोसी दारू आणि अमली पदार्थ सेवन करून बेफाट गाडी (पोर्श गाडी, करोला वा अ‍ॅकोर्ड नाही!) चालवत होता. त्याच्याखाली येऊन मेले असते तर कोण मेले असते? ९०% डेमोक्रॅट पक्षाला मत देणारेच. पण सामान्य लोकांना जी शिक्षा होते ती ह्या प्राण्याला नाही. का ? कारण ट्रंपही तसेच करत होत म्हणून! वा! किती छान.
जर सगळ्या गोष्टीचे समर्थन ट्रंपही असेच करतो असे असेल तर ट्रंपलाच निवडायचे होते. त्याची भ्रष्ट कॉपी करणारे कशाला?

लिझ चेनीबद्दल मलाही आदर वाटू लागला आहे. केरी लेकला फायदा होतो आहे हे उघड दिसत आहे तरी तिच्याविरुद्ध प्रचार करणे थांबवत नाही!
स्वतःचा मतदारसंघ सांभाळता येत नाही आणि दुसर्या राज्यात जाऊन प्रचार करायचा तोही जन्मभर ज्या पक्षाला विरोध केला त्याच्या बाजूने! वा! छान!
मतदारांचा कौल पाहिला तर जाने ६, गर्भपात हे मुद्दे अगदी गाळात आहेत. लोकांना महागाई, चलनफुगवटा, बेरोजगारी, पेट्रोल आणि उर्जेचे गगनाला भिडू घातलेले भाव, शून्य पैशात जामीन वगैरे बिनडोक योजनांमुळे अफाट वाढलेली गुन्हेगारी, चोरी, खून, बलात्कार आणि ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करण्याची डेमो वृत्ती. बेछूट , लाखोंच्या संख्येने घुसणारे बेकायदा घुसखोर हे सगळे मुद्दे जिव्हाळ्याचे आहेत. विशेषतः मेक्सिकोला खेटून असणारी राज्ये (कॅलिफोर्निया अपवाद. विद्वान लिबरलना हे सगळे योग्य वाटते कारण ट्रंप असेच काहीतरी करत असे!)

पापा पेलोसीवर झालेला हल्ला हा ६ जानेवारी, ९/११, पर्ल हार्बर, पहिले आणि दुसरे महायुद्ध ह्या तोडीचा आहे आणि आता डेमोक्रॅट पक्षाला भरघोस मतदान करण्याखेरीज पर्याय नाही असे गळी उतरवण्यात डेम नेते यशस्वी झाले तर कदाचित निळी लाट येईल आणि आणखीच गंमत येईल!

ट्रंपने ६ जानेवारीला कॅपिटॉलमधे धुडगुस घाला असे म्हटले नव्ह्ते. शांततापूर्ण आंदोलन करा असे सांगितले होते. आता ते पाठिराखे पिसाळले आणि त्यांनी काही फर्निचर आणि काचा तोडल्या असतील तर त्यांना शिक्षा व्हावी. अर्थात बी एल एम आणि अँटिफा ह्यांनी कितीतरी जास्त विध्वंस आणि लुटालूट केली आहे. सामान्य लोकांचे उद्योग, नोकर्‍या, सामग्री, वाहने, घरे, दुकाने आणि अनेकांचे जीव ह्यांचे अफाट नुकसान केले. पण त्यांचे नेते तुरुंगात आहेत का? नाही. उलट ते आलिशान हवेल्या विकत घेऊन विलासात रहात आहेत. पण ट्रंपला मात्र फासावर लटकवावे अशी अपेक्षा कारण काही आंदोलकांनी काचा फोडल्या वा! खूप छान!
६ जानेवारीच्या प्रकरणाचा हवा भरून एक मोठ्ठा फुगा बनवून लोकशाहीवरील संकट वगैरे ट्यॅव ट्यॅव खूप करुन झाले. लोकांना त्यात काहीही रस नाही. अशाच प्रकारे निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह करुन शंका घेण्याचे काम डेम २००० पासून करत आहेत. त्यांना माध्यमे इलेक्शन डिनायर म्हणून बदनाम करत नाहीत.
ट्रंप निवडून आल्यावर अनेक ठिकाणी रस्ते बंद, दंगली, आगी लावणे वगैरे प्रकार ओकलंड, पोर्टलंड, फिली येथे मोठ्या प्रमाणात झाले. तेही इलेक्शन डिनायल होते. पण ते "योग्य" बाजूचे असल्यामुळे त्यांच्या नावाने ठो ठो बोंबलणे झाले नाही.
६ जानेवारीला केंद्र सरकारच्या इमारतींच्या रक्षणार्थ जास्त कुमक मागवा वगैरे संबंधित अधिकार्याची विनंती पेलोसी बाईनी धुडकावली होती.कारण तिला असे काहीतरी व्हावे अशीच इच्छा असणार. मग त्याचे भांडवल करून पुढची चार पाच वर्षे पुरेल इतपत मतांची बेगमी करुन ठेवावी अशी योजना असावी.

Pages