Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04
४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण
SNL ने फॉक्स च्या आत्ताच्या
SNL ने फॉक्स च्या आत्ताच्या सिच्युएशन बद्दल धमाल स्किट केले आहे काल. त्यात केरी लेकचीही जबरी खेचली आहे
https://www.youtube.com/watch?v=Fr2LyxJpHu8
फारेंड, सॅटर्डे नाइटची कोल्ड
फारेंड, सॅटर्डे नाइटची कोल्ड ओपनींग्स निवडणुकींच्या वेळेस बघण्यासारखी असतात. पुर्वी डेना कार्व्ही सिनिअर बुशच्या काळात धमाल करायचा! ही क्लिपही मस्त आहे:)
डेना कार्व्ही अॅज सिनिअर बुश… सॉल्लिड धमाल
https://youtu.be/L8jiBKWRWeg
डेना कार्व्ही अॅज सिनिअर बुश गिव्हिंग अॅडव्हाइस टु ज्युनिअर बुश डयुरिंग कँपेन अँड डिबेट प्रिपरेशन अगेन्स्ट अॅल गोर जबरी धम्माल
https://youtu.be/kssJdMtcSVg
“मुख्य म्हणजे ट्रम्पिजम फार चालत नाही असे रिपब्लिकन एस्टॅब्लिशमेण्टच्या लक्षात आलेले दिसते.” फारेंड, हे तु बरोबर लिहीले आहेस. होपफुली मॉडरेट रिपब्लिकन्स “ देरसे आये लेकिन दुरुस्त आये!” वुइ डेफिनेटली नीड् बॅलन्स्ड रिपब्लिकन पार्टी टु प्रिव्हेंट एर्क्स्ट्रिम लिबरलिझम ऑन इमिग्रेशन व एक्स्ट्रिम वोकिझम इन धिस कंट्री.
शेंडेनक्षत्र कुठे गेले?
शेंडेनक्षत्र कुठे गेले? निवडणुकांमधे डेमोक्रॅट्स नी कसे फसवले याची नवीन कॉन्स्पिरसी थेअरी शोधण्यात ते मग्न आहेत का?
मला वाचायला आवडेल त्यांची थेअरी.
मोठे ballot drop हे खोटेच
मोठे ballot drop हे खोटेच असतात, unless त्याने GOP नेता जिंकतो, मग ते बरोबर असतात.
अब्सेंटी मतदान म्हणजे घोटाळा असे gop मतदारांवर ठसवायाचे आणि नंतर म्हणायचे सगळे ballot डेम्सना कसे जातात ?
वॉशिंग्टन डीसीतल्या
वॉशिंग्टन डीसीतल्या नागरिकांना मतदानाचा अधिकार नाही, असं वाचलं. हा काय प्रकार आहे?
त्यांना सिनेटर नाही. डीसीतून
त्यांना सिनेटर नाही. डीसीतून सिनेटर जात नाही म्हणून. Taxation Without Representation
Katie Hobbs wins ·The
Katie Hobbs wins ·The Associated Press has called the race
यस! आत्ताच वाचले!
यस! आत्ताच वाचले!
कसली अॅरोगंटली बोलायची ती केरी पत्रकारांशी, स्वतः पत्रकार असूनही!
सगळ्यात आनंदाची बातमी!
सगळ्यात आनंदाची बातमी!
हरलो तर निवडणुका खोट्या असतात असल्या ट्रंपिझम विचाराची व अमेरिकेतल्या फ्री प्रेसला खुले आम धमक्या देणारी अरेरावी, गर्विष्ट व कट्टर ट्रंपिस्ट हरली!
निवडणुकीच्या प्रचारात हे ती बोलली होती!
“We don't have any McCain Republicans in here, do we?" eliciting boos from her supporters.
"Okay, if you [are], get the hell out," she added with a laugh.”
आय गेस त्या मॅकेन रिपब्लिकांनी तिला, ट्रंपला व तिच्या माजोरड्या पणाला मस्त धडा शिकवला!
अश्या रितीने ट्रंपची तो २०२० इलेक्शन हरला नाही अशी री ओढणारे सगळे एका पाठोपाठ एक नेस्तनाबुत झाले! त्यात ही आक्रस्ताळ व माजोरडी बाइ सगळ्यात अग्रगण्य होती!
( पण हे सुद्धा मान्य केले पाहीजे की २०२२ मधे एखाद्या निवडणुकीचा निकाल लागायला८ दिवस लावणे यात मॅरिकोपा काउंटीला लाज वाटली पाहीजे! २०२० मधेही हाच लोचा त्यांनी करुन ट्रंप व त्याच्या पाठिराख्यांना तिथे काहीतरी काळेबेरे चालले आहे अश्या वावड्या उठ्वायला वाव दिला होता! त्यामुळे याही वेळेला तिथे ट्रंपचीच री ओढणारी व त्याच्याच पुस्तकातुन “ हरले तर निवडणुक प्रॉसेस फ्रॉड आहे “ हे पान काढणारी ही बाई सुखासुखी हार मानेल असे वाटत नाही)
आता उद्या ट्रंप २०२४ इलेक्शनसाठी आपली उमेदवारी जाहीर करणार आहे म्हणे! व ते तिकीट ट्रंप- केरी लेक असेल असा काही जणांचा अंदाज आहे . पण आता ही बाइ हरली. ट्रंपला तर लुजर्स आवडत नाहीत. त्यामुळे ट्रंप( २०२० लुजर) व केरी( २०२२लुजर) हे गणीत कसे जमणार हे एक कोडच आहे!
लिझ चेनीने ट्विटरवर लेकची छान
लिझ चेनीने ट्विटरवर लेकची छान खेचलीये. आता कधी कंसिड करते बघायचे.
पॉलिटीकल व इकॉनॉमिक चित्र
पॉलिटीकल व इकॉनॉमिक चित्र रिपब्लिकन पार्टीला अनुकुल असुनही रेड वेव्ह का आली नाही त्याला ट्रंप व त्याची री ओढणारे मुख्यतः जबाबदार होते असे म्हणायला हरकत नाही.
नुकताच जिंकलेला न्यु हॅम्पशायरचा रिपब्लिकन गव्हर्नर ख्रिस सुनुनु याबबतीत एकदम बरोब्बर बोलला
“What I think people said was, 'Look, we can work on these policies later, but as Americans, we got to fix extremism right now,'" he said.
आणी खरोखरच रिपब्लिकन पार्टीच्या मतदारांनी ट्रंप व केरी लेक सारख्या एक्स्ट्रिमिस्ट व लोकशाहीला धोका असणार्या लोकांना त्यांची पायरी दाखवुन दिली.
आतातरी मेनस्ट्रिम रिपब्लिकन नेत्यांनी या निवडणुकीतुन बोध घेउन( सेनेटर्स व इतर निवडुन दिलेले रिपब्लिकन काँगेसमन, गव्हर्नर्स) ट्रंपसारख्या खोटारड्या माणसाच्या ताटाखालचे मांजर होणे सोडुन द्यावे व देशाच्या पुढे असलेल्या अनेक प्रॉब्लेम्सना एकजुटीने व बायपार्टीसन रितीने सोडवावे.
आतातरी मेनस्ट्रिम रिपब्लिकन
आतातरी मेनस्ट्रिम रिपब्लिकन नेत्यांनी या निवडणुकीतुन बोध घेउन( सेनेटर्स व इतर निवडुन दिलेले रिपब्लिकन काँगेसमन, गव्हर्नर्स) ट्रंपसारख्या खोटारड्या माणसाच्या ताटाखालचे मांजर होणे सोडुन द्यावे व देशाच्या पुढे असलेल्या अनेक प्रॉब्लेम्सना एकजुटीने व बायपार्टीसन रितीने सोडवावे. >> असे लिहून घे कि असे होण्याचा चान्स शून्य आहे.
असामी, मलाही माहीत आहे की
असामी, मलाही माहीत आहे की इट्स अ विशफुल थिंकिंग! तसे मी कालच्या माझ्या पोस्टमधे तेच लिहीले होते .
पण ज्या पद्धतीने मेनस्ट्रिम रिपब्लिकन जनतेने या मिडटर्ममधे कौल दिला आहे ते बघुन क्रिस सुनुनु सारखेच अजुन अनेक रिपब्लिकन नेते विचार करतील अशी आशा वाटते!
आणी हो! लिझ चेनीचे श्रम वाया नाही गेले! त्या बाइमधे गट्स आहेत ! मानले पाहीजे तिला!
कॉमी, लिझ चेनीचे “ यु आर
कॉमी, लिझ चेनीचे “ यु आर वेलकम“ हे केरीच्या लांबलचक वायफळ थँक्यु लेटरला उद्देशुन केलेले एका वाक्याचे आजचे ट्विट वाचुन “ सौ सुनारकी एक लुहारकी“ या म्हणीची आठवण आली!
मुकुंद, आणखी गंमत पण आहे.
मुकुंद, आणखी गंमत पण आहे.
कारी लेक ने आपण हारलो हे समजल्यावर ट्विट केले -
Arizonans know BS when they see it.
आता इतके प्रांजळ सेल्फ रिफ्लेक्षन इतर कुणाला जमले असते का ?
कॉमी! केरीच्या ट्विटकडे तुझा
कॉमी! केरीच्या ट्विटकडे तुझा बघण्याचा (जबरी) अँगल खुप आवडला!
निकालांची जनरल पद्धत बघता. एक
निकालांची जनरल पद्धत बघता. एक निरी क्षण नोंदवावे असे वाट्ते. सोशल मीडिआ मधून रेशिअल वीष / चुकीची माहिती पसरवणे /मत दारांचा बुद्द्धीभेद करणे / इन जनरल रेटून खोटी माहिती पसरवणे हे खूप करुन झाले. परंतु तसे असतानाही जनतेने ऑफलाइन जीवनात आपले काय प्रश्न आहेत व ते कसे सुटतील व कोणात र्फे सुटतील त्यांना निवडून आणले आहे. खरे इशू सोड वणे महत्वाचे ठरले आहे. मतदार शहाणा असतो हे एक व्यापक अर्थाने खरे ठरले. ऑनलाइन विश्व/ काँप्रमाइज्ड पत्रकारिता/ सोमी वरील नॅरेटिव सेट करणे ह्याची लिमि टेशन्स दिसुन आली आहेत का? मागा वर्ल्ड व त्यांचे क्यु अॅनॉन वगिअरे जग फारच विचित्र बिल्ड केलेले आहे. ह्याच्या पुढे जाउन जनता - तरुण / महिला व इतर गट असे झाले असे वाट्ते का?
आमच्या इथे अजून सोशल मीडिआचा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी वापर हीच फेज चालू आहे. जनतेचा काय कल आहे ते काही वर्षात दिसून येइल.
नेवाडा आणि अरिझोना निकालानंतर
नेवाडा आणि अरिझोना निकालानंतर डेमॉक्राटस ५०% सिनेट सिट + कमला हॅरिस निर्णायक मत असे मेजोरिटी मिळवून सीनेट जिंकले आहेत.
पण, जर आता जॉर्जिया रनॉफ मध्ये वॉरनोक जिंकला तर सिनेमा आणि manchin ह्यांची निर्णायक मक्तेदारी फोडण्यास मदत होईल.
अहो, पण ही महागाई, देशावरील
अहो, पण ही महागाई, देशावरील भले मोठे कर्ज, चीनवर जीवघेणे अवलंबन, शिक्षणाचा बट्ट्याबोळ हे सगळे कमी कसे करणार?
उगीच, मागे कशी गुलामगिरी होती, LGBTQ हे असले सगळे शाळेत शिकवण्यापेक्षा STEM वर कधी भर देणार? कसा?
काही योजना आहेत का कुणाकडे?
नाहीतर तेच भारताला किंवा चीनला outsorce करा नि आपण इथे बसू, डेमोक्रॅट, रिपब्लिकन त्रुम्प वगैरे करत!
आता इतके प्रांजळ सेल्फ
आता इतके प्रांजळ सेल्फ रिफ्लेक्षन इतर कुणाला जमले असते का ? >>
आणी हो! लिझ चेनीचे श्रम वाया नाही गेले! त्या बाइमधे गट्स आहेत ! मानले पाहीजे तिला! >> एकदम. इथेच तिला उद्देशून कोणि तरी ताशेरे ओढले होते त्याची आठवण झाली
असामी, मलाही माहीत आहे की इट्स अ विशफुल थिंकिंग! >> मुकुंदा तू जर मॅकर्थी किंवा कॅम्कुन क्रूझ चे फॉलो केलेस तर बायडेन इंपीचमेंट, हंटर ची चौकशी (काय करायची ती करा ना बाबा एकदा - काय तो सोक्ष मोक्ष लागून जाऊ दे - फक्त आधी हि निश्चित करून घ्या कि एफबी आय, सी आयआय, फेड कशा सोरोस ने विकत घेतल्या आहेत कि नाही - त्याप्रमाणे समजा सुटलाच निर्दोष तर मग परत कटकट नको ) , सोशल सिक्युरीटी कट वगैरे नेहमीच्या शिळ्या कढीपुढे जाण्याची तयारी दिसत नाहीये.
Georgia Senate candidate
Georgia Senate candidate Herschel Walker (R): "If we was ready for the green agenda, I'd raise my hand right now. But we're not ready right now ... What we need to do is keep having those gas-guzzling cars, 'cause we got the good emissions under those cars
जॉर्जिया रिपब्लिकन सेनेट उमेदवार हर्शल वॉकर उवाच! आता बोला!
हो रे असामी, एफ बी आय, सी आय ए वगैरेनी त्यांच्या विरुद्ध ब्र जरी काढला तर लगेच त्या संस्था सोरोसने विकत घेतल्या आहेत..
किंवा लिझ चेनी, जॉन मॅकेन किंवा इतर कोणी “ सेन“ रिपब्लिकनांनी यांच्या एक्स्ट्रीम राइट विंगच्या “ नटी“ ( वर हर्शल वॉकर जे म्हणाला तश्या) गोष्टींना विरोध केला की ते “ सेन“ रिपब्लिकन्स कसे “ RINO” म्हणजे रिपब्लिकन्स इन नेम ओनली वगैरे आहेत..
किंवा ते किंवा त्यांचे उमेदवार जर हरले तर निवडणुक प्रॉसेस खोटी पण ते किंवा त्यांचे उमेदवार जिंकले तर मात्र निवडणुक प्रॉसेस खरी!..
पण हा असा त्यांच्या अंधभक्त फॉलोअर्सना उल्लु बनवायचा प्रकार त्यांच्या फॉलोअर्सना आता कळुन चुकला असावा अशी अंधुकशी आशा मला या निवडणुकीचा निकाल बघुन येते रे बाबा!
लिझ चेनीचे श्रम वाया नाही
लिझ चेनीचे श्रम वाया नाही गेले! त्या बाइमधे गट्स आहेत ! मानले पाहीजे तिला! >> टोटली!
मॅकेन च्या सपोर्टर्सना सभेतून हाकलणे हा जागतिक दर्जाचा बिनडोकपणा होता. यश मिळाले की सहसा स्वतःबद्दल इन्फ्लेटेड इमेज तयार होते. आणि नंतर तीच इमेज असले निर्णय घ्यायला कारणीभूत होते. पण बहुतेक लोकांचे ४-५ वर्षांच्या स्पॅन मधे/करीयर मधे हे होते. हिचे काही महिन्यातच आणि कोणतीही निवडणुक जिंकायच्या आतच झाले जॉन मॅकेन हा अॅरिझोना मधे तर वेल रिस्पेक्टेड होताच पण इतरत्रही होता. आज वाचले की त्याने बुश व ओबामा दोघांविरूद्ध अॅरिझोना राज्य जिंकले होते व ते ही मोठ्या फरकाने. अजूनही त्याच्या बद्दल लोकांमधे आदराचीच भावना आहे. पण हे मागा वाले इतके वर चढले होते गेल्या काही दिवसांत की त्यांना वाटत होते जितके जास्त क्रेझी बोलू तितके चांगले.
मतदारांनी खाडकन उतरवली आहे सर्वांची. प्रायमरीज मधे "क्रेझी" आवश्यक होते नॉमिनेशन मिळवायला पण नंतर मॉडरेट्सना चुचकारायला ते टोन डाउन करायची गरज होती. ते या अनेकांना समजले नाही.
आता इतके प्रांजळ सेल्फ
आता इतके प्रांजळ सेल्फ रिफ्लेक्षन इतर कुणाला जमले असते का ? >>>
रिपब्लिकन एस्टॅब्लिशमेण्टच्या आर्टिकल्स मधे केरी लेक ट्रम्पिजमच्या मागे न लागता जर नेहमीच्या/नॉर्मल रिपब्लिकन उमेदवारासारखी वागली असती तर तिचे जिंकायचे चान्सेस जास्त होते असे लिहीले आहे. कारण तिची सभेत, मुलाखतीत बोलण्याची स्टाइल व एकूणच कौशल्य जबरी आहे. पण तिने मॉडरेट लोकांना दूर लोटले. अॅरिझोनामधला शिक्षित वर्ग हा मॉडरेट पण रिपब्लिकन्स कडे झुकणारा आहे. त्यांची मते इथे निवडीत फरक करणार होती - आणि तीच तिच्या विरोधात गेली. मागावर्ल्ड ऑलरेडी तिच्या खिशात होती.
Georgia Senate candidate
Georgia Senate candidate Herschel Walker (R): "If we was ready for the green agenda, I'd raise my hand right now. But we're not ready right now ... What we need to do is keep having those gas-guzzling cars, 'cause we got the good emissions under those cars >> अमेरिकन हिरो शोभतो खरा
रिपब्लिकन एस्टॅब्लिशमेण्टच्या आर्टिकल्स मधे केरी लेक ट्रम्पिजमच्या मागे न लागता जर नेहमीच्या/नॉर्मल रिपब्लिकन उमेदवारासारखी वागली असती तर तिचे जिंकायचे चान्सेस जास्त होते असे लिहीले आहे. >> हे ह्या बोटावरची थुंकी लिलया त्या बोटावर करू शकणारे अधिक धोकादायक फा ! त्यांचा अजेंडा निव्वळ येन केन प्रकारेण सत्ता प्राप्ती ! त्यापेक्षा तात्या बरा.... असेना मग कसही वेडंविद्र
बाय द वे या लोकांबद्दल
बाय द वे या लोकांबद्दल वाचण्याच्या नादात ज्या वेबसाइट्सवर जाउन वाचत होतो त्यामुळे मला आता "Toenail clippers for seniors" छाप जाहिराती आणखी किती दिवस सहन कराव्या लागतील माहीत नाही या हार्डकोअर रिपब्लिकन साइट्सचा वाचकवर्ग हा त्या वयोगटातील समजला जातो. परवा एसएनएल मधेही अॅरिझोनामधले सरासरी तापमान, "आणि वय" ९०ज मधे आहे असे म्हंटले
खर म्हणजे इस्टॅब्लिश्ड व
खर म्हणजे इस्टॅब्लिश्ड व ट्रॅडिशनल रिपब्लिकन पार्टीकडे खुप चांगले “ सेन“ पॉइंट्सचे भांडवल आहे जे माझ्यासारखे सेंट्रिस्ट सपोर्ट करु शकतात.
पण झालय काय… गेल्या ६-७ वर्षात व्हॅक्सिन विरोधी, सायंस विरोधी, कॉमन सेंस विरोधी, क्विनॉन सारख्या नटी थिअरी मधे बिलिव्ह करणार्या “ नटी“ लोकांनी( पक्षी: ट्रंप, केरी, जॉश हॉली, मार्जरी टेलर ग्र्रीन, लोरेन बोबर्ट वगैरे) रिपब्लिकन पार्टी अक्षरशः हायजॅक केली आहे.
ती हायजॅक झालेली पार्टी परत आपली खरी आयडेंटीटी शोधत आहे असा या निवडणुकीच्या निकालांवरुन तरी वाटतय!
त्यापेक्षा तात्या बरा....
त्यापेक्षा तात्या बरा.... असेना मग कसही वेडंविद्र >>>
ती हायजॅक झालेली पार्टी परत आपली खरी आयडेंटीटी शोधत आहे असा या निवडणुकीच्या निकालांवरुन तरी वाटतय! >>> हो त्यांना हा निकाल ते करायला भाग पाडेल असे दिसते. गेली दोन वर्षे हा चॉइस त्यांच्याकडे होता. पण ट्रम्पच्या नादी लागलेल्या लोकांची समजून घालायची सोडून त्यांचा बिनडोकपणा हे लोक amplify करत होते आणि कॉंग्रेस मधे व प्रचारात तेच धादांत खोटे मुद्दे रेटून त्याला आणखी अधिकृत रूप देत होते. माझ्या दृष्टीने त्या "कल्ट मधे अडकलेल्या" सामान्य लोकांपेक्षा हे त्यांना फितवणारे आणि त्याच कल्ट मधे त्यांना ठेवणारे लोक जास्त जबाबदार आहेत.
बाय द वे आज तात्या २०२४ चीच घोषणा करणार की आणखी तिसरेच काहीतरी?
“मॅकेन च्या सपोर्टर्सना
“मॅकेन च्या सपोर्टर्सना सभेतून हाकलणे हा जागतिक दर्जाचा बिनडोकपणा होता”
फारेंड, अरे त्याला “ बिनडोकपणा” तर म्हणायचेच पण त्याच्याच जोडीला “व माजोरडेपणा“ पण म्हटले तर जास्त उचित होइल!
तिच ते उद्दाम वक्तव्य जेव्हा मी वाचले तेव्हाच मी म्हटले हीचा माज उतरवला पाहीजे या मॅकेन सपोर्टर्सनी! आणी तेच झाले!
फारेंड, अरे त्याला “
फारेंड, अरे त्याला “ बिनडोकपणा” तर म्हणायचेच पण त्याच्याच जोडीला “व माजोरडेपणा“ पण म्हटले तर जास्त उचित होइल! >> माजोरडेपणा तर नक्कीच. पण निवडणूक जिंकणे हा उद्देश धरला तर असे बोलणे हा बिनडोकपणा
पत्रकार लोक काय संत महात्मे नाहीत पण ही त्यांच्या तोंडावर काय अपमान करायची प्रत्येकाचा! हे लोक येतात कशाला प्रश्न विचारायला हा प्रश्न पडायचा. आता तो प्रश्नच मिटला
बाय द वे आज तात्या २०२४ चीच
बाय द वे आज तात्या २०२४ चीच घोषणा करणार की आणखी तिसरेच काहीतरी?
फारेंड, बहुतेक ट्रंपच्या बुडत्या जहाजाच्या शिडातील हवाच निवडणुकीतले त्याचे बहुतेक “ चमचे“ उमेदवार हरल्यामुळे निघुन गेली आहे. त्याच्या नेहमीच्या “ क्विक्झॉटिक“ तो कसा २०२० इलेक्शन हरला नाही या क्लेमचे या निवडणुकीत बारा वाजल्यामुळे त्याच्या ” फुसक्या“ तोफखान्यात जो काही दारुगोळा होता तो बहुतेक संपलेला दिसतोय.
त्यामुळे आज त्याच्याकडुन “ सौदी अरेबिअन बिझिनेसमन बरोबर मोट्ठा करार” किंवा “त्याच्या पुतणीविरुद्धचा खटला तो कसा जिंकणार आहे” असल्या फुसक्या गोष्टीच तो आज “ बिग अनाउंसमेंट“ म्हणुन बहुतेक खपवणार आहे अशीच चिन्ह दिसत आहेत
Pages