Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04
४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण
थॅंक्स अमा. रन ऑफ आता ६
थॅंक्स अमा. रन ऑफ आता ६ डिसेंबरला.
अजून एक दोन सिनेट सीट्सचे आणि इतर काही निकाल बाकी आहेत. आता सगळीकडे प्रतिक्रियांचा महापूर आला आहे. डेम्स साइडच्या लोकांचे सेलिब्रेशन आणि फॉक्स वगैरे वर रिपब्लिकन पार्टी व त्यांच्या मतदारांवर सणकून टीका सुरू आहे ("मी तुम्हाला आधीच सांगितले होते की तुम्ही जाउन वोटिंग केले नाहीत तर डेम्स जिंकतील" - शॉन हॅनिटी ने मतदारांना दिलेली नवीन माहिती). एकूण वातावरण असे आहे की जणू काही डेम्सच जिंकले आहेत - प्रत्यक्षात हाउस मधे रिपब्लिकन मेजॉरिटी येणार आहे. सिनेटही अजून ओपन आहे, जरी चान्सेस डेम्सचे दिसत असले तरी. पण पोल्स मधून व एकूणच गेल्या अनेक मिडटर्म्समधल्या निकालांमधून लोकांची अपेक्षा डेम्सची धूळधाण उडण्याची होती. आणि महागाई, क्राइम आणि बॉर्डरवरच्या राज्यातील लोंढे - यावर डेम्सनी काही ठोस मुद्दे आणलेले मला फार दिसले नाहीत. तरीही निकाल बरेच "मध्यावर" राहिले. सर्वसाधारणपणे बघितले तर राज्याराज्यांत गव्हर्नरपदावरचे आधीचे लोकच पुन्हा निवडून आलेत. सिनेट मधेही फार फरक नाही - एक दोन अपवाद वगळता. हाउस मधेही तसाच पॅटर्न दिसतोय. ५-७ सीट्सचा फरक पडेल बहुधा.
१९९८ मधली तेंडुलकरची शारजातील बॅक टू बॅक शतके होती - त्यातले पहिले लक्षात असेल तरः त्याने जबरदस्त बॅटिंग करून १४३ मारले. भारत ती मॅच हरला होता पण रन रेट मुळे फायनल मधे गेला. त्यादिवशी मॅच हरली असली तरी मूमेण्टम भारताकडे आले होते व लोक आनंदाने नाचत होते. साधारण तसेच चित्र आहे
भारी आलेत रिझल्ट्स. इकॉनॉमी
भारी आलेत रिझल्ट्स. इकॉनॉमी प्रचंड गाळात चालली आहे. महागाई वाढते आहे, दुसरीकडे लेऑफ वाढत आहेत. या मुद्द्यावरून डेम्सचं पानिपत होणार असं वाटत होतं. पण अबोर्शन आणि गन कंट्रोल या मुद्द्यांवर डेम्सचं होऊ घातलेलं नुकसान थोपवलं गेलं. त्यांनीही मस्त pivot केलं. शेवटचा महिना तर इलिगल्स, ट्रान्स बायका, पोलीस brutality हे नेहमीचे लाडके पण वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवून अबोर्शनवर फोकस ठेवला ज्याचा फायदा झाला.
रिपब्लिकन्स बद्दल इतकंच- they got what they deserve. Abortion without any exceptions चा चुकीचा आततायी मुद्दा लावून धरला आणि तो त्यांच्यावरच उलटला हे बेस्ट झालं.
दुसरीकडे अगदी स्कुल इयर संपत आलेलं असताना टेक्ससमध्ये लहान मुलांचं हत्याकांड, त्यानंतर लगेच झालेली NRA कॉन्फरन्स, गन कंट्रोलबद्दलचा आडमुठेपणा याचाही व्यवस्थित फटका बसला तेही बरं झालं.
यावेळेची मिडटर्म बर्यापैकि
यावेळेची मिडटर्म बर्यापैकि गाजली. काहि अपेक्षित, तर बरेचसे अनपेक्षित निकालांमुळे. आमच्या (रेड) जॉर्ज्यात कॅटगोरी ३ हरिकेन सदृश परिस्थिती अपेक्षित होती, परंतु तिचं रुपांतर ट्रॉपिकल स्टॉर्म मधे झालं. टिपिकली गवर्नरचा उमेदवार स्ट्राँग असला कि तो पार्टिच्या सगळ्या उमेदवारांना एंडझोन कडे घेउन जातो, पण यावेळेस चित्र थोडं वेगळं दिसलं. हर्शल वॉकरला त्याचा फटका बसला; थँक्स टु ट्रंप? रनॉफमधे हर्शल जिंकला तर त्याला हत्तीवरुन साखर वाटायला लागेल...
“टिपिकली गवर्नरचा उमेदवार
“टिपिकली गवर्नरचा उमेदवार स्ट्राँग असला कि तो पार्टिच्या सगळ्या उमेदवारांना एंडझोन कडे घेउन जातो, पण यावेळेस चित्र थोडं वेगळं दिसलं. हर्शल वॉकरला त्याचा फटका बसला; थँक्स टु ट्रंप?”
राज! बरोब्बर!अरे हर्शल वॉकरचेच काय घेउन बसला आहेस? ट्रंपने “ हँड पिक्ड“ केलेल्या बहुतेक उमेदवारांनी या निवडणुकीत लॅकलस्टर परफॉर्मन्स केला आहे . आणी राज, हर्शल वॉकर हा काही स्ट्राँग उमेदवार नाही हे पण विसरु नकोस. ही हॅज लॉट ऑफ बॅगेज!
रिपब्लिकन पार्टीच्या या लॅकलस्टर परफॉर्मन्सची ( तेही त्यांच्यासाठी इकॉनॉमिकली व पॉलिटिकली अनुकुल वातावरण असुनही!) कारणे शोधायची तर अॅबॉर्शनवरचा रिपब्लिकन पार्टीचा “ काइच्या काई“ स्टान्स हे एकच कारण नाही.
माझ्या मते ट्रंप व त्याने हँड पिक्ड केलेल्या उमेदवारांचे (व त्यांना अंधभक्तासारखे फॉलो करणार्या व फॉक्स वर जे काही बरळले जाते तिच खरी अमेरिकेतली वस्तुस्थिती आहे असे मानणार्या शेंडेनक्षत्रांसारख्या लोकांचे) जे डिव्हायजिव्ह , विषारी व डिस्टॉर्टेड विचार आहेत हेही रिपब्लिकन पार्टीच्या या असल्या लॅकलस्टर परफॉर्मन्सला तेवढेच कारणीभुत आहेत!
शेंडेनक्षत्र इथे नियमीत मांडत असलेले डेमॉक्रेटिक पार्टीबद्दलचे “ डिस्टॉर्टेड“ विचार प्रमाण मानुन अमेरिकेत जर मतदान झाले असते तर डेमॉक्रेटिक पार्टी “ अमेरिकन राजकारणातुन “ परागंदाच झाली असती. पण तसे काही झाले नाही. ट्रंप व शेंडेनक्षत्रांसारखी जहाल , डिव्हायझिव्ह व एककल्ली विचारसारणी असणार्यांना अंतर्मुख व्हायला मात्र या निवडणकीने संधी दिली आहे( होपफुली! )
खुद फॉक्सवरही आता ट्रंपच्या माथ्यावर या लॅकलस्टर परफॉर्मन्सचे खापर फोडण्यास सुरुवात झाली आहे तर उलट ट्रंप शॉन हॅनीटी व खुद्द त्याच्या बायकोने त्याला उमेदवारांबद्दल साउंड“ सल्ला दिला नाही असे कोकलत बसला आहे.
या सगळ्या गदारोळात ट्रम्पने
या सगळ्या गदारोळात ट्रम्पने रिपब्लिकन पार्टीला दिलासा देत पुढची दिशा ठरवू आणि मूव्ह ऑन करू म्हणत सर्वांना बरोबर घेउन जाणारे नेतृत्वगुण दाखवले आहेत. रॉन डिसॅण्टिस व मी एकत्र काम करू असेही म्हंटले आहे. आवश्यक तेवढी मते मिळाली नाहीत तरी काळजी करू नका, तुम्ही सगळे जोरदार लढलात, आता २०२४ कडे लक्ष द्या असे सर्वांपुढे एक आशादायी चित्र त्याने उभे केले आहे.
JUST KIDDING! तात्या असले काही करत नसतो. काल सगळे लोक या निकालांचे विश्लेषण करत होते. रॉन डिसॅण्टिस व फ्लोडिडा मधे झालेला रिपब्लिकन्सचा मोठा विजय इतरत्र परावर्तित का झाला नाही वगैरे वगैरे. अशा वेळेस साहेबांचे ट्रुथ सोशल वर ट्विट कशाबद्दल होते, तर डिसॅण्टिस ला आत्ता मिळाली तेव्हापेक्षा जास्त मते त्याला (ट्रम्पला) २०२० मधे मिळाली होती!
Shouldn't it be said....
Shouldn't it be said....
>>आणी राज, हर्शल वॉकर हा काही
>>आणी राज, हर्शल वॉकर हा काही स्ट्राँग उमेदवार नाही हे पण विसरु नकोस. ही हॅज लॉट ऑफ बॅगेज!<<
नाहि रे, तसलं बॅगेज इथे वॉर्नाकच्या बाबतीतहि बाहेर आलं होतं - डोमेस्टिक व्हायलंस. पण ते होतंच. एव्हरिबडि हॅज स्केलटन्स इन देर क्लॉजेट...
पण हर्शल इज लाइक अॅन अमेरिकन हिरो, यार. ए स्टाँच बुल्डॉग, हाइझमन ट्रॉफि विनर. पाथ टु सेनेट कुड हॅव बिन ए पिस ऑफ केक फॉर हिम. पण मी वर लिहिल्या प्रमाणे, केंप डिडंट कॅरि हिम टु द फिनिश लाइन. तुला आठवत असेल केंप आणि रॅफसन्बर्गर वेंट अगेंस्ट ट्रंप्स विश इन २०२० इलेक्शन्स; अँड बिलिव इट ऑर नॉट, इट हेल्प्ड देम बिगटाइम इन २०२२ मिडटर्म. याचा इन्डायरेक्ट फटका वॉकरला बसला; रेप्स हु वोटेड फॉर केंप/रॅफसन्बर्गर डिड नॉट वोट फॉर वॉकर...
बाकि, अॅबॉर्शनचा पॉइंट सदर्न स्टेट्समधे तरी माझ्या मते मूट आहे. इट इज नॉट ए कांट्रिब्युटिंग फॅक्टर इन डेम्स विन.. अॅटलिस्ट इन सदर्न स्टेट्स...
हो एक्झॅक्टली
Shouldn't it be said.... >>> हो एक्झॅक्टली
आणखी काही इंटरेस्टिंग गोष्टी:
Split Ticket
वरती एका पोस्टमधे मी लिहीले होते की एकाच बॅलट मधे बर्याच वेगवेगळ्या पदांकरता लोकांनी मत नोंदवायचे असते. त्यामुळे एकाच वेळी तोच मतदार गव्हर्नर कोण असेल, सिनेटर कोण असेल, स्थानिक शेरीफ कोण असेल हे सगळे एकाच मतपत्रिकेवर ठरवतो. मग एकाच राज्यात गव्हर्नर आणि सिनेटर यांच्या मतांमधे इतका फरक कसा पडतो? यावेळची दोन उदाहरणे:
जॉर्जिया - इथे गव्हर्नर म्हणून ब्रायन केम्प चांगल्या मताधिक्याने निवडून आला. पण त्याला जाणारी सगळी मते हर्शेल वॉकरला सिनेटर म्हणून मिळाली नाहीत. केम्पला वॉकरपेक्षा २ लाख मते जास्त मिळाली. म्हणजे २ लाख मतदारांनी रिपब्लिकन केम्पला मत देताना त्याच मतपत्रिकेवर रिपब्लिकन वॉकरला मत दिले नाही.
या निवडणुकीत ट्र्म्पने पाठिंबा दिलेल्या उमेदवारांना फार यश मिळालेले नाही. तसेच २०२० च्या निवडणुकीबद्दल अजूनही फ्रॉड चे क्लेम करणारेही अनेक जण पराभूत झालेत. वॉकरला त्याच्या स्वतःच्या स्कॅण्डल्स इतकीच या लाटेमुळेही कमी मते मिळाले असे दिसते. हे जॉर्जिया मधे जास्त क्लिअर आहे - कारण ब्रायन केम्प हा जरी रिपब्लिकन असला, तरी २०२० मधे ट्रम्पच्या प्रेशरपुढे तो नियमानुसारच वागला होता. तसेच तेव्हाचा सेक्रेटरी ऑफ स्टेट रॅफेन्सपर्गरही पुन्हा निवडून आला आहे. त्यानेही ट्रम्पच्या मागणीला जुमानले नव्हते. याउलट ट्रम्पने पाठिंबा देऊनही वॉकर निवडून आला नाही (आता रनऑफ मधे काय होईल ते वेगळे).
पेनसिल्वेनिया - हे दुसरे उदाहरण. फेटरमन वि. डॉ ऑझ या सिनेटच्या लढतीत डॉ ऑझ ४% मतांनी पराभूत झाला. पण त्याच पेन्ससिल्वेनिया मधे गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत डग मास्ट्रियानो १४% मतांनी हरला. तेथेही डॉ ऑझला मत देणार्यांपैकी २ लाख लोकांनी गव्हर्नर म्हणून मास्ट्रियानोला निवडले नाही. या मास्ट्रियानोने २०२० ची निवडणूक रद्द करण्याबद्दल बरेच प्रयत्न केले होते.
अॅरिझोना गव्हर्नर रेस मधे केरी लेक अजूनही पिछाडीवर आहे. पण तेथे अजून जवळजवळ १/३ मते मोजून व्हायची बाकी आहेत. गंमत म्हणजे जर इथून पुन्हा लीड घेउन केरी लेक जिंकली, तर ती इतके दिवस ज्या सिस्टीमला फ्रॉड म्हणून बेसलेस टीका करत होती त्याच सिस्टीममुळे ती निवडून आलेली असेल.
यावेळेस अजूनतरी एखाद दुसरा अपवाद वगळता कोणी या इलेक्शन बद्दल फ्रॉड क्लेम्स केलेले नाहीत. पण सर्व निकाल आल्यानंतरच काय ते कळेल.
म्हातारबाच्या स्टुडंट लोनचा
म्हातारबाच्या स्टुडंट लोनचा दौलतजादा कोर्टाने अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून तूर्तास तरी हाणून पाडला आहे.
अर्थात आता इलेक्शन्स पार पडल्याने या चोरांना फरक देखिल पडणार नाही म्हणा
बाकि, अॅबॉर्शनचा पॉइंट सदर्न
बाकि, अॅबॉर्शनचा पॉइंट सदर्न स्टेट्समधे तरी माझ्या मते मूट आहे. इट इज नॉट ए कांट्रिब्युटिंग फॅक्टर इन डेम्स विन.. अॅटलिस्ट इन सदर्न स्टेट्स... >>>> अबॉर्शन हाच मुद्दा उलट जिओपी च्या विरोधात गेला असू शकतो. इवन इन सदर्न स्टेट्स. कारण नवी वोटर्स ची पिढी हे अबॉर्शन बॅन वगैरे सपोर्ट करत नाही.
*हे मी अर्थात सिएनेनच्या सर्वे रिपोर्ट्स मधे ऐकले. फॉक्स काय म्हणतात ते पाहिले नाही.
>पण हर्शल इज लाइक अॅन
>पण हर्शल इज लाइक अॅन अमेरिकन हिरो,
Really ? Am I missing something ?
फॉक्स काय म्हणतात ते पाहिले
फॉक्स काय म्हणतात ते पाहिले नाही. >> ते नेहमीप्रमाणे दिवे पाजळण्यात मग्न आहेत. एकंडर ६५ % अविवाहित बायकांनी डेम च्या बाजूने कल दाखवला, ४९ का ५५% % विवाहित नि ३९% पुरुषांनी तात्याच्या पार्टीच्या बाजूने तर ह्यावर चर्चा काय होती तर ' ह्यांची लवकर लग्न लावून द्यायला हवीत' . मी हे ह्याची देही ह्याची डोळा पाहिले म्हणून .............
<<<गंमत म्हणजे जर इथून पुन्हा
<<<गंमत म्हणजे जर इथून पुन्हा लीड घेउन केरी लेक जिंकली, तर ती इतके दिवस ज्या सिस्टीमला फ्रॉड म्हणून बेसलेस टीका करत होती त्याच सिस्टीममुळे ती निवडून आलेली असेल.>>>
तरी चालेल. कसेहि का होईना जिंकणे महत्वाचे, लॉजिक नाही.
लॉजिकली बोलणे, वागणे राजकारण्यांना वर्ज्य आहे. फक्त परिस्थिती पाहून बरळणे हे त्यांचे काम. आता या दळभद्र्या झालेल्या अमेरिकेत मूर्ख लोकांचे प्रमाण फार वाढल्यामुळे कुणि खोटे, अगदी रिडिक्युलसली खोटे सांगितले तरी विश्वास ठेवणारे लोक आहेत. मूर्ख लोकांचे बहुमत! खरी लोकशाही!!!
बाकी "म्हातारबा" ला मानला
बाकी "म्हातारबा" ला मानला पाहिजे. त्याला स्टेजवरून कोठे जायचे हे न का झेपेना. त्याने ट्रम्पिझमला दोनदा हरवले एकदा खुद ट्रम्पला हरवताना व एकदा मिडटर्म्स मधे ३०-४० जागा हरण्याच्या परंपरेला हरवताना.
He beat a president and he beat a precedent!
https://twitter.com
https://twitter.com/RiegerReport/status/1590846178241150976?ref_src=twsr...
फॉक्स उवाच! पुर्ण क्लिप बघा!
हे असल बघुन बघुन शेंडेनक्षत्र इथे येउन म्हातारबाच्या पार्टीचे यवं होइल आणी त्यांव होइल अस लिहीत! अश्या फक्त फॉक्स चॅनल बघुन ब्रेनवॉश झालेल्यांची परिस्थिती विहीरीतल्या बेडकासारखी झाली आहे
राज, हर्शल वॉकर “अमेरिकन हीरो“ याबाबत पुर्ण असहमत! हायझमन ट्रॉफी विनर हाच जर निकश असेल तर खुनी ओ जे सिंप्सन यालाही अमेरिकन हिरो म्हणशील?
बहुतेकांच्या क्लॉजेट मधे काहीतरी असते याबद्द्ल मात्र सहमत.
बर आता रेड सुनामी आली नाही म्हणुन डेमोक्रॅट्सनी नाचायचे कारण नाही. बरेचशे मोठे प्रश्न देशापुढे आ वासुन उभे आहेत. दोन्ही पार्टीजनी एकत्र येउन ते सोडवावे असाच कौल मतदारांनी दिला आहे. त्याचा मान दोन्ही पार्टीज राखतील ही माफक अपेक्षा!( प्रत्यक्षात ते होइल का याबाबत मी जरा साशंकच आहे!)
तिथे अॅरिझोना मधे ती आकांडतांडवी केरी काय तमाशा करत आहे! निवडणुक जिंकायच्या आधीच फ्री प्रेसला धमक्या देतानाचे तिचे सैतानी रुप बघुन ती हरुन तिचा माज उतरावा असे मला मनापासुन वाटते. पण आज अमेरिकेत अशी वस्तुस्थिती आहे की अश्या माजोरड्या व्यक्तीलाही मत देणारे लक्षावधी मतदार अॅरीझोनात आहेत!
टॉकींग अबाउट अॅरिझोना, मॅरीकोपा काउंटी इलेक्शन बोर्ड इज अ जोक! ४ दिवस झाले तरी अजुन रिझल्ट नाही!
बाकी "म्हातारबा" ला मानला पाहिजे.. फारेंड! सहमत!
”
बायडन ओबामापेक्षा चांगला
बायडन ओबामापेक्षा चांगला प्रेसिडेंट आहे.
मोरोबा, मीही त्या स्टुडंट लोन
मोरोबा, मीही त्या स्टुडंट लोन फरगिव्हनेसच्या दौलतजाद्याच्या विरुद्ध होतो. दौलतजादा हा पर्फेक्ट शब्द वापरलात तुम्ही!
राज , तु केंप व रॅफेन्सबर्गर का जिंकले याबद्दल जे लिहीले तेच मी काही दिवसांपुर्वी लिहीणार होतो. एकदम बरोब्बर लिहीले आहेस!ते दोघेही २०२०इलेक्शनमधे ट्रंपच्या बुलीला बळी न पडुन त्यांचा कणा दाखवणारे निघाले होते. ( फारेंडने स्प्लिट टिकीट म्हणजे काय हे लिहीताना केंप- हर्शल वॉकरचे उदाहरण वर दिलेच आहे)
त्यांना परत निवडुन देउन जॉर्जियाच्या जनतेने त्यांच्या बाजुने कौल दिला व ट्रंपला एक सणसणीत चपराक ठेउन दिली आहे! तरी ट्रंपचे या मिडटर्ममधे त्याने काय मर्दुमकी गाजवलीआहे असे( स्वतःचेच ) टुमणे चालुच ठेवले आहे! तिकडे फ्लोरीडामधे रॉन डिसँटस स्व कर्तृत्वावर जिंकला तर याच्या पोटात शुळ उठले आहे! रॉन “ डिसँक्टिमोनस“ वगैरे असे बरळुन त्याचा आय क्यु अजुन शाळकरी मुलाचाच आहे हे परत एकदा जगाला त्याने दाखवुन दिले! डिसँटस वर त्याच्याकडे चिकलफेक आहे वगैरे धमक्याही त्याने डिसँटसला दिल्या आहेत. व्वा!
फॉक्स उवाच! Proud पुर्ण क्लिप
फॉक्स उवाच! Proud पुर्ण क्लिप बघा! >>> पूर्ण नाही पाहिली पण अंदाज आला. यातले काही मी पाहिले होते तेव्हा. अजून एक लक्षात आहे म्हणजे यांनी दोन पोल्स्टर्स आणले आणि जगातील सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे त्या दोघांनी विचारलेल्या प्रत्येक लढतीत रिपब्लिकन उमेदवार निवडून येणार असा अंदाज सांगितला होता. वॉकर, ऑझ पासून बरेच लोक.
पण फॉक्सने एकाच दिवसात १८० डिग्री टर्न घेतला आहे! आता जेव्हा ट्रम्पचा विषय निघतो तेव्हा आपण एमएसएनबीसी पाहतोय की काय अशी शंका येते. परवा तर केली मॅकनेनी ने सुद्धा ट्रम्पचा विषय झटकून टाकला.
याचा आता "ग्लोरी डेज" संपल्यानंतरचा राजेश खन्ना होणार की, तो हे सगळे पचवून पुन्हा मतदारांच्या जोरदार पाठिंब्याने परत येणार ते बघू. डिसॅण्टिसच्या रूपात बच्चन ऑलरेडी पॉलिटिकल सीन वर आलेला आहे. सगळी चर्चा त्याचीच आहे.
ती स्टुडंट लोन ची माफी मलाही
ती स्टुडंट लोन ची माफी मलाही झेपली नाही. म्हणजे ज्यांना हार्डशिप आहे त्यांना मदत मिळायला विरोध नाही पण तशी मदत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचेल असे करण्यापेक्षा हा एकच गट का निवडला माहीत नाही. त्यातही लिमिट ७५००० चे न ठेवता १२५००० चे ठेवायचे आणि मग लांबलचक स्टॅट्स देत बसायचे की कसे ९०% लाभार्थी हे गरीब गटातलेच आहेत ई. रिपब्लिकन्सनी हे जबरी एक्ल्प्लॉइट केले होते अॅड्स मधून. एका अॅड मधे असाच कोणीतरी "हार्डवर्किंग अमेरिकन" दाखवून - बहुधा प्लंबर्/इलेक्ट्रिशियन- त्याच्या टॅक्स मधून रिच लोकांना पैसे वाटणार असे दाखवले व रिच लोक म्हणजे याट वर वाइन सिप करत असलेले कोणीतरी कोस्टल लिबरल्स टाइप दाखवले होते
पण असेही ऐकले की ही केस याबद्दलच्या अशा विरोधामुळे आली नाही, तर कोणत्यातरी विद्यार्थ्यांना कमी कर्जमाफी मिळाली म्हणून त्यांनी केस केली आणि न्यायालयाचाही विरोध मूळ माफीला नसून काँग्रेसमधून तसे पास न करून घेता अध्यक्षाने लेखणीच्या फटकार्याने हे लागू करण्याबद्दल आहे. नक्की काय आहे माहीत नाही.
अर्थात अध्यक्षाला मोठमोठी कामे करायला लेखणीच्या फटकार्याचीही गरज नसते हे नवीन ज्ञान अजून कोर्टापर्यंत पोहोचलेले नाही. नुसते मनातल्या मनात विचार करून सुद्धा तो काय वाट्टेल ते करू शकतो असे नुकतेच निदर्शनास आलेले आहे. "just by thinking about it"
अर्थात अध्यक्षाला मोठमोठी
अर्थात अध्यक्षाला मोठमोठी कामे करायला लेखणीच्या फटकार्याचीही गरज नसते हे नवीन ज्ञान अजून कोर्टापर्यंत पोहोचलेले नाही. नुसते मनातल्या मनात विचार करून सुद्धा तो काय वाट्टेल ते करू शकतो असे नुकतेच निदर्शनास आलेले आहे. "just by thinking about it" >> घाला घाला धोतराला हात घाला
Cancum cruz मे मॉस्को मिच ला तत्वतः विरोध म्हणून सिनेट चि रिपब्लिकन निवडणूक पुढे ढकलावी (हर्शेल वॉकरचा निकाल लागेतो ) अशी रुबियो च्या हो मधे हो मिळवायला सुरूवात केली आहे. अब आयेगा मजा. मिच गेला तर बाकीच्या रिपब्लिकन लीडर मधे गोड गोड बोलत कावेबाजपणा दाखवायचे कौशल्य नाही नि ते अधिक पोलराईज्ड मतांचे आहेत.
फॉक्स उवाच! Proud पुर्ण क्लिप बघा! >>
फारेंड, नुसता अंदाज घेउ नकोस,
फारेंड, नुसता अंदाज घेउ नकोस, पुर्ण क्लिपची मजा लुटच! असामीला विचार
आत्ताच आलेल्या बातमीनुसार जॉर्जिया रन ऑफ मधे काय होइल याला आता तेवढे महत्व राहीले नाही आता! नेव्हाडा सेनेट रेस डेमॉक्रेट्स जिंकले.
त्यामुळे आता ट्रंप त्याची उमेदवारी कोणाचाही विरोध न होता जाहीर करण्यास मोकळा झाला आहे. त्याने परत जॉर्जियाला जाउन हर्शल वॉकरच्या वतीने प्रचार केला काय किंवा नाही केला तरी सेनेट मेजॉरीटी वर काहीही परिणाम होणार नाही.
मॅरिकोपा काऊंटी मत मोजणी बुधवार पर्यंत संपणार नाही असे तिथले काउंटी ऑफिशिअल्स म्हणत आहेत! अक्षम्य!
तेवढ्या वेळात असंख्य कॉन्स्पिरजीज पसरावयाला आता कॉन्स्पिरसी थिअरीज पसरवणार्यांना रान मोकळे! ती ( सत्तेशिवाय झालेली!) उन्मत्त माथेफिरु केरी बाइ जर हरली तर तिचा( अजुन मोठ्ठा!) भयंकर अवतार बघायला सज्ज रहा!
अमेरिकेत अजूनही वोटिंग मशीन
अमेरिकेत अजूनही वोटिंग मशीन चा वापर का होत नाही?
काल ड्राइव्हवरुन परत येताना
काल ड्राइव्हवरुन परत येताना ही साइन दिसली - https://stopdemocratsbigotry.com/
न्यू जर्सीमध्ये या साइन्स लावलेल्या आहेत.
फारेंड, नुसता अंदाज घेउ नकोस,
फारेंड, नुसता अंदाज घेउ नकोस, पुर्ण क्लिपची मजा लुटच! असामीला विचार >>> हो पाहिली आत्ता. धमाल आहे.
सिनेट मधे मेजॉरिटी राखली आहे डेमोक्रॅट्सनी. हाउस जाइल रिपब्लिकन्स कडे पण अगदी थोड्या फरकाने. अगदी कार्ल रोव्ह सुद्धा कबूल करत आहे की रेड वेव्ह वगैरे फुसके बार होते.
मुख्य म्हणजे ट्रम्पिजम फार चालत नाही असे रिपब्लिकन एस्टॅब्लिशमेण्टच्या लक्षात आलेले दिसते. कारण आता सगळे डिसॅण्टिस चे नाव घेत आहेत - तसा तो ही गरिबोंका ट्रम्प आहेच पण ट्रम्पच्या तुलनेत सेन्सिबल आहे. यातून सगळे आचरट क्लेम्स करणे या लोकांनी बंद केले तर चांगलेच आहे. पण अॅरिझोना मधे केरी लेक अजून मागे पडली आहे. ती हरली तर ती नक्कीच कांगावा करणार. अर्थात ती जिंकली तरी तेच करेल. स्वतः मूळची पत्रकार असून पत्रकारांशी फार उर्मटपणे बोलते ती. ते पोश्चरिंग करता करत असेल - जणू मतदारांना वाटावे काय धारेवर धरत आहे ही "फेक मीडिया" ला. ती त्यांच्यापेक्षा फेक आहे हे त्यांना कळेल काही दिवसांनी.
सामो , यावर इथे लिहिणे
सामो , यावर इथे लिहिणे विषयांतर होईल.
> मुख्य म्हणजे ट्रम्पिजम फार
> मुख्य म्हणजे ट्रम्पिजम फार चालत नाही असे रिपब्लिकन एस्टॅब्लिशमेण्टच्या लक्षात आलेले दिसते.
ते ठीक आहे पण हे बेस च्या लक्षात आले आहे का ? माझा फार अभ्यास नाही पण जितका आहे त्यावरून मला वाटते की ट्रंप प्रायमरीत उतरला तर इतर सर्वांना आपापले चंबू गबाळे आवरून घरी जावे लागेल.
रीपबलिकन पंडितांनी ट्रम्पला
रीपबलिकन पंडितांनी ट्रम्पला सोडून दिलेले दिसते आहे. Lol.
ट्रम्प प्रायमरीत उतरणार का ते
ट्रम्प प्रायमरीत उतरणार का ते मंगळवारी कळेल. तो उतरला तर बरेच मतदार त्याच्याबरोबरच राहतील पण हळुहळू लोक गळू लागले आहेत असे चित्र आहे. त्यात रॉन डिसॅण्टिस च्या मागे एस्टॅब्लिशमेण्ट आहे आणि डोनर्स सुद्धा. म्हणजे त्याच्या बाजूने व ट्रम्पविरोधात अॅड्स येउ लागतील - या अॅड्स मागावर्ल्ड जे मीडिया बघतात त्यातच येतील. त्यामुळे डेम्स व त्यांना अनुकूल मीडियामधून त्याला होणारा विरोध व हा विरोध यात खूप फरक असेल.
नॉर्मल केसेस मधे अशा वेळेस पडद्यामागे हालचाली होउन मतदारांपुढे एकी दाखवली जाते. आपल्याकडे हे कॉमन आहे. पण ट्रम्पने आख्ख्या पार्टीचा एक कल्ट करून टाकला आहे. त्यामुळे असले काही शक्य दिसत नाही. त्याने ऑलरेडी डिसॅण्टिस, मॅकोनेल व इतरांवर शेरे मारणे सुरू केले आहे.
आणि ट्रंप बरोबर बरेच लचांडे
आणि ट्रंप बरोबर बरेच लचांडे आहे. डी. तसा क्लीन माणूस आहे. जास्त इंडिपेंडंट मते मिळवेल.
ओके विकु.
ओके विनय कुलकर्णी.
Pages