Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04
४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण
“>>> अपघाती गर्भपात (स्त्री
“>>> अपघाती गर्भपात (स्त्री स्वातंत्र्याचा मुक्त आविष्कार वाला नव्हे!)
This is beyond disgusting!”
स्वाती, मेडिकल फिल्ड मधे अक्कलशुन्य व माठ असलेल्या माणसांकडुन असल्या डिसगस्टींग व “ उचलली जिभ व लावली टाळ्याला“ प्रकारच्या कॉमेंट्स शिवाय अजुन तु काय अपेक्षा करतेस? लसी व लसीकरणाबद्दलही काडीचेही ज्ञान नसुनही लसीबद्दलही काय एक एक तारे तोडले आहे वर ते नाही का बघीतले? एक फुकट फोरम मिळाला म्हणुन अक्कल नसलेल्या विषयांवरही काय वाट्टेल ते बरळत सुटायचे! चालु द्यात!
“ मग आता आपण त्या गावचेच नाही अशा थाटात हे सगळे कोणीतरी भलतेच लोक होते असे प्रोजेक्ट करत आहात. >> फा एकदम धोतरालाच हात घालतो राव तू. Happy“
असामी, ज्या लोकांचे फुकटच्या फोरमवर धोतर सोडुनच बरळणे चालु आहे त्यांना “फा” ने त्यांच्या धोतराला हात लावण्याची कसली भिती रे!
बेन शापिरो रॉक्स.
बेन शापिरो रॉक्स.
म्हातारबाचे धोतर फेडून पार वाळत घातले
आणि हे वोक्स गॉन वाईल्ड च्या लेटेस्ट एडिशन मधून...
पावसात भिजणे आता रेसिस्ट !!!
स्टुडण्ट लोन माफी वगैरे काढून
स्टुडण्ट लोन माफी वगैरे काढून बायडेन ने खरे खूप संधी दिली आहे पॉलिसी, कायद्याचा वापर वगैरे वर बोलण्याची - त्या लोन माफीला दोन्ही पक्षात विरोधक आहेत. अॅबॉर्शन च्या निकालाने डेम्सचा बेस पेटला आहे असे एकूण दिसते. त्यामुळे रिपब्लिकन्सना इतके दिवस दोन्ही हाउसेस परत घेण्याची खात्री होती ती सध्या दोलायमान दिसते.
फॉक्सवर सध्या ट्रम्प वरच्या रेड ची बातमी स्क्रोल करून शोधावी लागते. पण जेव्हा कोणी "एक्स्पर्ट" येउन बोलतात तेव्हा ते अजूनही "ट्रम्प म्हणतो तसे त्याने सगळे डि-क्लासिफाय केले होते" वगैरे रेटून बोलतात. यातले बरेच लोक स्वतः लॉयर आहेत. तरीही बिनधास्त यात काहीतरी तथ्य असल्यासारखे दाखवतात. पण ते ही चतुरपणे "ट्रम्प म्हणतो..." हे लावून. आता त्रयस्थ व्यक्तीला त्या रेडबद्दल चौकशी करायला नेमले जाईल अशी चिन्हे दिसत आहेत. कोण नेमतात पाहू.
पण ट्रम्प जेव्हा म्हणतो की लोकांचा डेमोक्रसी, सिस्टीम्स बद्दलचा विश्वास उडाला आहे, तेव्हा मला पुन्हा पुन्हा जॉर्ज क्लूनी आठवतो ओशन्स १२ मधला "I was once in the bank locker when it was getting robbed"
सध्या फक्त रॉन डिसॅण्टिस या परिस्थितीचा फायदा घेतोय असे दिसते. उद्या ट्रम्पला जर अपात्र ठरवले गेले किंवा त्याने स्वतःच न उतरायचे ठरवले तर डिसॅण्टिसला सर्वात जास्त फायदा होईल असे दिसते. त्याने फ्लोरिडा मधे जे निर्णय घेतले होते त्यामुळे तेथे कोव्हिड चा परिणाम इतर राज्यांपेक्षा जास्त झाला की नाही याबद्दल कल्पना नाही. त्याच्या विरोधातील डेमोक्रॅट उमेदवाराने मागा क्राउडला "मला तुमचे मत नको" वगैरे बोलून नक्की किती नुकसान करून घेतले आहे ते कळेल. त्याला फंडिंगचेही सध्या वांदे दिसत आहेत. अर्थात ही रेस गव्हर्नरपदाची आहे. पण त्यातून डिसॅण्टिस किती पुढे जाऊ शकेल हे ठरेल.
मोरोबा, स्टुडंट लोन माफीबाबत
मोरोबा, स्टुडंट लोन माफीबाबत रिपब्लिकन पक्षाशी सहमत. पण फारेंड म्हणतो त्याप्रमाणे त्याला विरोध डेमॉक्रेटिक पक्षातही बर्याच जणांचा आहे.
मुलतः कोणाचे लोन माफ करुन टाकणे हे ज्या लोकांनी इमाने इतबारे हार्ड वर्क करुन लोन फेडले त्यांना सणसणिक चपराक आहे व त्यांचा अपमान आहे. मला तर हे चक्क व्होट खरेदी प्रकरण वाटते.
मुळात भारतात ज्याप्रमाणे
मुळात भारतात ज्याप्रमाणे शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज मिळते(विविध शासकिय योजनांद्वारे) तशी काही योजना राबवायला हवी होती.
“ मुळात भारतात ज्याप्रमाणे
“ मुळात भारतात ज्याप्रमाणे शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज मिळते(विविध शासकिय योजनांद्वारे) तशी काही योजना राबवायला हवी होती.” - डिसक्लेमरः राजकारण माझा प्रांत नाही. त्यामुळे माझी पोस्ट राजकीय नाही.
पैसा फुकट नसतो. there’s always a cost of money and someone has to pay it. हे कर्जमाफी प्रकरण म्हणजे robbing Paul to pay Peter असतं असं मला वाटतं.
मुलींना फी माफी, गरीब मुलांना
मुलींना फी माफी, गरीब मुलांना कमी फी, श्रीमंत व्यक्तीकडून जास्त कर, कमी श्रीमंत व्यक्ती कडून कमी, गरिबांकडून अजिबात नाही, आरोग्य विम्यात धडधाकट व्यक्तीकडून घेतलेल्या प्रीमियम ने आजारी व्यक्तीची काळजी करणे, GST सगळ्यांकडून घेऊन तो गरिबांना परत करणे.... अशी अनेक उदाहरणे कमी अधिक फरकाने हेच तर करतात. त्यात काही नवं आहे का! प्रत्येक ठिकाणी पैसा सुविधा सवलतीत द्यायला तो कुठून तरी घ्यावा लागतोच.
कॉर्पोरेशन टॅक्स सवलतीत उलटी गंगा होती. तेव्हा ट्रिकल डाऊन होणार म्हणत होते. तेव्हाही हेच वरील लॉजिक लावलं होतं का? लावलं पाहिजे.
यात मला वाटतं १०,००० पर्यंत + इतर अटी आहेत. ज्यांनी फेडले/फेडू शकले त्यांना चपराख फारच हार्ष प्रतिक्रिया झाली. बाकी आकडे वाचून डोळे फिरले. १/३ लोकावर लोन आहे आणि डिग्री मिळालीच नाही. इ. अनेक नव्या गोष्टी समजल्या. राजकारण माहीत नाही पण यावर sustainable तोडगा निघावा.
“ त्यात काही नवं आहे का!” -
“ त्यात काही नवं आहे का!” - कॉमनली घडतं म्हणजे ते योग्य ठरत नाही ना?
“ प्रत्येक ठिकाणी पैसा सुविधा सवलतीत द्यायला तो कुठून तरी घ्यावा लागतोच.” - पैसा सवलतीनं पुरवणं आणि टोटली कर्जमाफी देणं ह्यात फरक आहे. स्वस्त आणि फुकट ह्या सर्वस्वी वेगळ्या गोष्टी आहेत.
अमेरिकेतील स्टुडंट लोन मॉरल
अमेरिकेतील स्टुडंट लोन मॉरल हॅझार्ड आहे.
पर्सनल बँकरप्सी मध्ये स्टुडंट लोन ही पुसून जाईल अशी तरतूद केली तर ही समस्या चटकन सुटेल.
अमितव, सहमत.
अमितव, सहमत.
अमितला अनुमोदन.
अमितला अनुमोदन.
पण ही छोटीशी बॅन्डएड पट्टी आहे.
कॉलेज शिक्षणाची कॉस्ट हा खरा पेन पॉइंट आहे, त्याचं काय?
मेडिकल कॉस्ट्सची तीच गत आहे.
अमित आणी स्वातीला अनुमोदन!
अमित आणी स्वातीला अनुमोदन!
>>पर्सनल बँकरप्सी मध्ये
>>पर्सनल बँकरप्सी मध्ये स्टुडंट लोन ही पुसून जाईल अशी तरतूद केली तर ही समस्या चटकन सुटेल.<<
कायच्या काय, सोलुशन आहे; टु से धिस अॅन ओवर्किल इज अॅन अंडरस्टेटमेंट. बॅकरप्सीचे रिपर्कशन्स काय आहेत, आणि केवळ स्टुडंट लोन पासुन सुटका मिळायला लोक बँकरप्सी डिक्लेर करतील हि समजुत भाबडी आहे.. असो...
बाकि, हार्ड कोर डेम्स हळू हळू डेमक्रॅटिक सोशलिझमच्या विरोधात आवाज उठवु लागलेत हि चिन्हं प्रगतीची आहेत. व्हॉट नेक्स्ट? सँक्च्युअरी सिटीज?..
विद्यार्थ्यांना कर्ज देऊच नये
विद्यार्थ्यांना कर्ज देऊच नये. खाजगी संस्था देतील. प्रत्येक बाबतीत सरकारने मधे मधे करायचे. सरकारला अक्कल नसते. आधी कर्ज दिले मग ते माफ केले. काही आकडे गोळा केले आहेत का - किती लोकांना कर्जमाफीचा उपयोग होऊन खर्च केलेल्या पैशापैकी किती वसूल होतील?
श्रीमंतांचा टॅक्स कमी ही अशीच एक कल्पना. आजतागायत त्याचा फायदा झाला का? जागतिक इकॉनॉमीत सगळे पैसे चीन नि इतर देशात गेले, अमेरिकन तसेच बसले. टॅक्स कमी करून जेव्हढे पैसे कमी मिळाले तेव्हढे उद्योगधंदे वाढून करातून परत आले का? SNAPमधून, वेल्फेअर मधून परत आले का? याचा हिशोब कुणी करते का?
सरकारला अक्कल नसते.
उगीच बावळटासारखे काहीतरी करायचे नि त्याच्यावर भांडायचे!!
कर्जमाफी बद्दल काही शंका आहेत
कर्जमाफी बद्दल काही शंका आहेत त्या अश्या आहेत.
समाजातील सगळ्यात गरीब घटकांनाच फायदा झाला आहे असे वाटत नाही. बऱ्यापैकी वेल ऑफ लोकांना सुद्धा झाला असणार.
ह्यात डेमोक्रॅटिक सोशलिझम/ वेल्फेअर इकॉनॉमिक्स बद्दल फंडामेंटल शंका नाहीत, तर प्रयोरिटी बाबत शंका आहेत.
<<प्रयोरिटी बाबत शंका आहेत.>>
<<प्रयोरिटी बाबत शंका आहेत.>>
एवढी अक्कल असती तर ते राजकारणात कशाला घुसले असते? निवडून येण्यासाठी काहीतरी मूर्खासारखे करायचे. जनतेचाच पैसा, आपले काय जाते?
आता श्रीमंतांना कर कमी का? तर तेच तर निवडणुकीला पैसे पुरवतात - लाखालाखानी. मला कर कमी केला तर मी काय फार तर फार १०० नाहीतर २०० देणार!
ज्या लोकांनी शिक्षणासाठी कर्ज
ज्या लोकांनी शिक्षणासाठी कर्ज काढले, कष्ट करून, अर्धवेळ नोकरी करून ते फेडले आणि एकंदरीत अंथरूण पाहून पाय पसरले त्यांना भुर्दंड. जे बेफिकीर होते, कर्ज फेडले नाही त्यांना करदात्यानी पुरस्कृत केलेली कर्जमाफी.
तसेच विमानाने अमेरिकेत येतात मग ते जोकोविच सारखे खेळाडू, उद्योग धंदा, कामासाठी येणारे कर्मचारी उद्योजक, पर्यटक, मुलीकडे, मुलाकडे येणारे म्हातारे आई वडील ह्यांना सगळ्यांना करोना लशीचे कडक निर्बंध. मात्र बेकायदा घुसणारे अशिक्षित, अर्धशिक्षित, इंग्रजीचा गंधही नसणारे, कुठल्या गुन्हेगार कायोटी ला चार पाच हजार डॉलर देऊन येणारे लोक ह्यांच्यावर काहीही बंधन नाही. वाट्टेल ते रोग, ड्रग घेऊन खुशाल अमेरिकेत या. सरकार चांगला मोबाईल फोन प्लॅन सकट देईल..मग ऐश करा. तुम्हाला राहायला अनेक शहरे चांगली हॉटेल रूम फुकट देतात. कधीतरी अमेरिकन नागरिकत्वही मिळेल. तोपर्यंत मनसोक्त ड्रग विका, बारीक सारीक जमतील तसे गुन्हे करा. बिना पैसा जमीन वगैरे "सोयी" आहेतच. तसेही पोलीस गुन्हेगारा पेक्षा वाईट मानले जातात. त्यामुळे तेही टरकून असतात हल्ली. त्यामुळे कारवाईची धास्ती नको.
पापभीरू, कायदा पाळणाऱ्या, कर भरणाऱ्या लोकांना दंड आणि दंडुका. गुन्हेगार, कायदे धुडकावणाऱ्या लोकांना धन, मान, सन्मान!
म्हातारबा अजब तुझे सरकार!
<<मात्र बेकायदा घुसणारे
<<मात्र बेकायदा घुसणारे अशिक्षित, अर्धशिक्षित, इंग्रजीचा गंधही नसणारे,...............म्हातारबा अजब तुझे सरकार!>>>
१०० टक्के अनुनोदन.
हे प्रकरण गेली ५० वर्षे चालू आहे. स्वस्तात मजूर मिळतात, ड्रग्स मिळतात असे आर्थिक फायदे असल्याने सगले लोक नुसता कांगावा करतात, ढोंगी कुठले. कुणि म्हणतात भिंती बांधा, कुणी आणखी काही, पण कश्शाचा फरक पडत नाही. मुळात इथल्या लोकांना हे स्वस्त मजूर हवे आहेत, आर्थिक फायदा. बाकी एका पक्षाने दुसर्या पक्षाला शिव्या द्यायच्या हे यांचे राजकारण!
हाच काय, इतर अनेक प्रश्नांपैकी एकहि प्रश्न अजून गेल्या ५० वर्षात सुटल्याचे माझ्या पहाण्यात नाही. फक्त निवडून आलेल्या पक्षाला शिव्या देण्यापलीकडे दुसरे काहीहि होत नाही.
माझ्यासारख्या कमी अक्कल, कमी कर्तुत्व असणार्या माणसाचा भारतात निभाव लागणार नाही म्हणून मी इथे आलो. अहो, मला लाच सुद्धा कशी द्यायची ते जमत नाही. म्हणून इथे माझे बरे चालले आहे. बाकीचे बसू देत "चर्चा" करत.
बाकी काही असो. म्हातारबा
बाकी काही असो. म्हातारबा वाचलं की फिस्सकन हसायला येतं. तात्या, म्हातारबा, कमळी हे सगळे कसे घरातलेच कुणीतरी ज्येष्ठ, तर्कटी थेरडे वाटतात ज्यांची टिंगल करायला भाग पडते.
वाटतातच कारण ते तसेच आहेत.
वाटतातच कारण ते तसेच आहेत.
नुकतेच मती भ्रष्ट म्हातारबाने
नुकतेच मती भ्रष्ट म्हातारबाने असे जाहीर केले की समस्त मागा रिपब्लिकन हे लोकशाहीचे कट्टर शत्रू आहेत.
स्वतः अनेक कायदे धाब्यावर बसवून नोटा छापून त्या वाटायचे. युक्रेन ला अब्जावधी डॉलर्स ची खिरापत ( म्हणजे खरे तर शस्त्रास्त्रे विकणारे, त्यांची कंत्राटे घेणारे ह्यांचे उखळ पांढरे), बेकायदा घुसखोरी कडे सोयीस्कर दुर्लक्ष किंबहुना त्यांना रेड कार्पेट वाले आमंत्रण.
आता स्टुडंट लोन माफी. आपण मनात येईल तसा आणि तितका पैसा छापून वाटू आणि आपल्या लाडक्या लोकांचे भले करत राहू अशी काही कल्पना ह्या म्हातारचळ लागलेल्या विकृत माणसाने करून घेतली आहे. दुसरीकडे तोंडाला फेस येई पर्यंत आपल्या विरोधकांना म्हणाजे ट्रम्प आणि समर्थकांना शिव्या घालणे आणि नंतर आपण असे म्हणालोच नाही अशी मखलाशी करून ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणे.
कुठले औषध देऊन ह्या प्राण्याला तात्पुरते शुद्धीवर आणून भाषण करवले जाते देवास ठाऊक (किंवा सैतानास. कारण शेवटच्या भाषणाच्या वेळेस जे भयावह नेपथ्य होते ते नरकाचे बायबल वा कुरानातले वर्णन वाचून केले होते बहुधा!)
अहो पण सध्याच्या
अहो पण सध्याच्या व्याख्येप्रमाणे प्रेसिडेण्टला अमर्याद अधिकार आहेत ना? तो प्रेसिडेण्ट नसताना सुद्धा आपल्याला एक्झिक्युटिव्ह प्रिविलेज आहे असे क्लेम करू शकतो - ते ही एक्झिक्युटिव्ह ब्रांचविरूद्ध. तो टर्म संपताना एका जादूच्या कांडीने कोणत्याही लेव्हलची टॉप सिक्रेट्स "डि-क्लासिफाय" करू शकतो - ते ही आत काय आहे माहीत नसताना. त्यापुढे लोन माफी वगैरे किस झाड की पत्त्ती!
DOJ जे काही अफाट दावे करत आहे
DOJ जे काही अफाट दावे करत आहे जसे ट्रम्प ने अण्वस्त्र दगायचे अती गुप्त कोड पळवून नेले आणि ते कुठल्याशा शत्रू राष्ट्राला विकणार होता (तिरंगा मधला फ्युज कंडक्टर स्टाईल!) ते हळूहळू धादांत खोटे असल्याचे निष्पन्न होत आहे. Classified चे de-claasify करण्याचा अधिकार त्या पदावर असणाऱ्या राष्ट्रपती चा आहे. जर ट्रम्प ने हा अधिकार वापरून तसे केले असेल तर तो गुन्हा कसा?
आणि हो, एकाच्या चुकीचे परिमार्जन दुसऱ्याच्या चुकी कडे बोट दाखवून होत नसते.
ते हळूहळू धादांत खोटे
ते हळूहळू धादांत खोटे असल्याचे निष्पन्न होत आहे >>> कधी झाले निष्पन्न? किंवा ते "हळुहळू निष्पन्न" होत असल्याची सुरूवात होत आहे असे कोणते चिन्ह दिसले आहे आत्तापर्यंत? उलट ट्रम्प व त्याच्या लॉयर्सची वक्तव्ये पाहता उलटेच सिद्ध होत आहे.
Classified चे de-claasify करण्याचा अधिकार त्या पदावर असणाऱ्या राष्ट्रपती चा आहे >>> हे आफ्रिका किंवा मिडल इस्ट मधल्या कोणत्या देशाच्या घटनेनुसार? अमेरिकेत असे काही नसते. चार पाने आधीच मी लिहीले होते की जेथे चेक्स अॅण्ड बॅलन्सेस आहेत अशा कोणत्याही सिस्टीम मधे एक व्यक्ती बसल्या बसल्या एक कांडी फिरवून डि-क्लासिफाय करू शकणार नाही. सगळे नियम बाजूला ठेवा - निव्वळ कॉमन सेन्स ने हे होऊ शकते का विचार करा.
अर्धवट वाक्ये फिरवण्यात फॉक्स व चाहते वाकब्गार आहेत. म्हणून हे डिटेल्सः प्रेसिडेण्ट डि-क्लासिफाय करू शकत नाही. तशी शिफारस करू शकतो. पण ज्या मूळ विभागाने क्लासिफाय केले आहे त्यांची संमती लागतेच लागते. ही संमती कोणत्याही "व्यक्ती"ची नसते. त्या त्या "ऑफिस"ची असते. म्हणजे त्या त्या वेळेस जी व्यक्ती त्या ऑफिस मधे आहे तीच ते करू शकते. ट्रम्पने असले काही केलेले नाही. खुद्द ट्रम्पलाही असले काही करण्यात इंटरेस्ट नसेल. या सर्च नंतर ट्रम्प, त्याचे लॉयर्स व फॉक्स मधले विद्वान यांनी ज्या असंख्य पुंगळ्या सोडल्या आहेत त्यातलीच ही एक.
पण हे डीक्लासिफाय चे हत्यार ज्या वॉल स्ट्रीट जर्नल च्या लेखामुळे फॉक्सवाल्यांना मिळाले, त्याच वॉस्ट्री़ज ने बनवलेली ही क्लिप पाहा. सर्व शंका दूर होतील.
https://www.youtube.com/watch?v=HE0tsm4x4rk
याचा अर्थ प्रेसिडेण्ट घरबसल्या डिक्लासिफाय करू शकतो असा फक्त फॉक्सवरचे विद्वानच काढू शकतील.
प्रेसिडेण्ट घरबसल्या
प्रेसिडेण्ट घरबसल्या डिक्लासिफाय करू शकतो असा फक्त फॉक्सवरचे विद्वानच काढू शकतील >>> आणि एक विद्वान विसरलास का तू फा? रागवतील हं ते
आणि हो, एकाच्या चुकीचे
आणि हो, एकाच्या चुकीचे परिमार्जन दुसऱ्याच्या चुकी कडे बोट दाखवून होत नसते. >
जर ट्रम्प ने हा अधिकार वापरून तसे केले असेल तर तो गुन्हा कसा? >> कधी केले हे ? बर केले होते तर मग जेंव्हा वर्षभर डीओज नि नॅशनल आर्काईव्ह्स विचारत होते तेंव्हा काय बुद्धीभ्रम झाला होता का ? तेंव्हा का नाही जाहीर केले ?
आणि डीओजे ने काय चुकीचे
आणि डीओजे ने काय चुकीचे म्हंटले आहे? ट्रम्पने त्याच्या मालकीची नसलेली टॉप सिक्रेट कागदपत्रे घरी नेली. ती नॅशनल आर्काइव्ज ("नारा") च्या अनेक मागण्यांनंतरही पूर्णपणे परत दिली नाहीत. खुद्द बिल बार सुद्धा हेच सांगतोय. पूर्वी ट्रम्प बरोबर काम केलेले अनेक जण हेच सांगत आहेत. पण पब्लिकला ट्रम्प ला विरोध करणारे सर्व डेम्स व रिपब्लिकन्स हे चोर आहेत व ट्रम्प हाच एक हरिश्चंद्राचा अवतार आहे असे वाटत असेल तर त्याला काय करणार.
आताही डीओजे फक्त हे म्हणत आहे की ही कागदपत्रे तपासण्याची गरज आहे. स्वतःची "पेट्रियट" वगैरे कौतुके करणार्यांना इतके तरी वाटले पाहिजे की अमेरिकन इंटरेस्ट या कागदपत्रात आहेत. अमेरिकेला मदत करणारे परदेशी लोक वगैरेंची नावे त्यात असू शकतात. अगदी याने आवर्जून नेली नाहीत असे एकवेळ धरले, तरी टाइम मासिकाची कव्हरे व ही कागदपत्रे एकत्रच ठेवण्याइतका भोंगळपणा जर हे लोक करू शकतात तर तेथे सर्च करूनच ती चेक करायला हवीत. परत या सर्च बद्दल दवंडी डीओजे ने नाही पिटली, ट्रम्पनेच ते जगजाहीर केले. मूळ सर्च मधे "ट्रम्प" या व्यक्तीबद्दल काहीच नव्हते. असा सर्च हा लोकेशनचा असतो. व्यक्ती/मालकी वगैरे त्यात नसते. तेथे काही सापडले तर हे सगळे नंतर येते.
आता जज ने "स्पेशल मास्टर" नियुक्त करायला संमती दिलेली आहे. त्यामुळे काही दिवस हे थंड असेल. अर्थात त्या स्पेशल मास्टरने यांच्या बाजूने निकाल दिला तर ठीक, नाहीतर पुढची पुंगळी तयार असेल - की तो ही बायडेनचाच कोणीतरी आहे.
मुळात त्याला अधिकार नसताना आधी त्याने ती कागदपत्रे नेली. नंतर अनेक मागण्या झाल्यावर सगळी देउन टाकली असती तरी इतकी वेळ आली नसती. पण याची नंतरची बडबड व याच्या लॉयर्सनी तोडलेले तारे याने या लोकांनीच स्वतःला गोत्यात आणायची तयारी चालवली आहे. आधी त्या एक लॉयरने "सर्व कागदपत्रे परत दिलेली आहेत" हे शपथेवर कळवले. आता ती स्वतःवर घेते की ट्रम्पनेच ते सांगितले म्हणते ते पुढच्या काही दिवसांत कळेल. मग त्याची दुसरी एक अॅटर्नी फॉक्स वर जाउन सांगते की त्याच्या ऑफिसात अनेक लोक येत-जात होते, जेथे ही कागदपत्रे सापडली. असला कॉमेडी प्रकार सुरू आहे.
शेंडेनक्षत्र यांना अनुमोदन.
शेंडेनक्षत्र यांना अनुमोदन.
<>
पुटीन किंवा चीन किंवा उत्तर कोरियाचे प्रेसिडेंट यांच्यापैकी कुणितरी असे विधान केले आहे का की त्यांना ट्रंपकडून गुप्त माहिती मिळाली?
याहून मोठा पुरावा कोणता?
<>
अर्थातच. आणि त्रंप प्रेसिडेंट नाही असे कोण म्हणते? तो अजूनहि प्रेसिडेंटच आहे. फक्त सध्या तो गोल्फ खेळायला गेला आहे तरी काम करतोच आहे ना?
चेक्स अँड बॅलन्सेस फार पूर्वीचे कायदे. आता अमेरिका इज ग्रेट अगेन!
शेंडेनक्षत्रांना कोण पैसे देतो असले लिहायला कुणास ठाउक? मी पण त्याला भेटीन म्हणतो.
कृपया सढळ हस्ते मदत करा
कृपया सढळ हस्ते मदत करा
बेकायदेशीर घुसखोरांसाठी अश्रु
बेकायदेशीर घुसखोरांसाठी अश्रु गाळणारे डेमॉरॅट नेते आता ऍबट, डिसॅंटिसने त्यांच्याच भागात घुसखोरांना नेऊन सोडल्यावर थयथयाट करत आहेत!
#दांभिक
Pages