Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रणबीर कपूर भंपक अभिनेता आहे
रणबीर कपूर भंपक अभिनेता आहे असे मला अचानक वाटू लागले. एका पॉइंटआधी मला रणबीर कपूर एकदम भारी अभिनेता वाटायचा.
डार्लिंग्ज चा ट्रेलर आलाय..
डार्लिंग्ज चा टिजर आलाय.. चांगला वाटतोय
https://youtu.be/Ny_24QMdyYM
रणबीर कपूर भंपक अभिनेता आहे
रणबीर कपूर भंपक अभिनेता आहे असे मला अचानक वाटू लागले. >>> का बरं? कित्तेक वर्षांत तर त्याचा चित्रपटही आलेला नाहिये.
रणबीर कपूर भंपक अभिनेता आहे
रणबीर कपूर भंपक अभिनेता आहे असे मला अचानक वाटू लागले. >>>
मलाही त्याच्याकडे बघुन असेच वाटायला लागले आहे कारण काहीच नाही.
पोन्नीयीन सेल्वन (Ponniyin
पोन्नीयीन सेल्वन (Ponniyin Selvan Part 1) चे ट्रेलर लाँच झाले आहे. तमीळ मधील खूप गाजलेली ऐतिहासीक कादंबरी मणिरत्नम पडद्यावर आणतो आहे त्यामुळे मजा असेल. यामुळे इतिहासाच्या पुस्तकात वाचलेली काही नावे पडद्यावर दिसतील आणि जास्ती नाट्यमयतेने दिसतील.
https://www.youtube.com/watch?v=LYMhbm2ORoc
दक्षिणेतील मद्रास टॉकीज चा
अच्छा !
पोनियन सेल्वन म्हणजेच पी एस
दक्षिणेतील मद्रास टॉकीज चा चोल साम्राज्य वर आधारित पी एस १ सिनेमा येतोय .
ट्रेलर पाहता हा सिनेमा देखील बाहुबली १/२ इतके यश संपादन करील याची खात्री वाटतेय.
बॉलिवुड कंटेंटलेस सिनेमे धडाधड पडत असताना दक्षिणेतील सिनेमे मात्र भरभरून यश मिळवत आहेत .
हा पी इस १ देखील तुफान चालेल असे ट्रेलर वरून तरी वाटतंय .
https://youtu.be/2HbAWSIOY1s
पहिल्यांदा साऊथ रिमेक
पहिल्यांदा साऊथ रिमेक सिनेमाचा ट्रेलर आवडला.
विक्रम वेधा
कास्टिंग पण परफेक्ट वाटतंय.
वेताळचे वेदा का केले? ट्रेलर
वेताळचे वेदा का केले? ट्रेलर आवडला. सुपर ३० मधला ऋतिक आठवला. सॉलिड काम केलेले त्यात, यातलेही जितके दिसले तितके आवडले.
थेटरात जाऊन पाहायचे यासाठी अवतार भाग २ व पिएस हे दोन चित्रपट मार्क करुन ठेवलेत. अवतार १ परत रिलिज केला तर सोन्याहुन पिवळे. तेव्हा ठेटरात जाऊन पाहिला नाही याची हळ्हळ आजही आहे.
ते वेताळचे वेधा केले आहे की
ते वेताळचे वेधा केले आहे की वेधचे?
विक्रम वेध असे काही आहे का?
किंवा वेद पण असेल. विक्रम आणि वेद दोन भाऊ/गडी..
अवतार १ परत रिलिज केला तर
अवतार १ परत रिलिज केला तर सोन्याहुन पिवळे. तेव्हा ठेटरात जाऊन पाहिला नाही याची हळ्हळ आजही आहे.
>>>>> अगदी सहमत!
बिक्रम वेताळ आहेत ते. वेताळ
बिक्रम वेताळ आहेत ते. वेताळ गोष्ट सांगतो आणि विक्रम परत अडकतो असे.
अवतार १ पुन्हा रीलिज होणार
अवतार १ पुन्हा रीलिज होणार आहे थेटर मध्ये २३ सप्टेम्बरला..
Avatar will be re-released in English in India on September 23 by 20th Century Studios India, three months before its much-anticipated sequel, Avatar: The Way of Water, is set to hit the theatres on December 16.
विक्रम आणि वेध अशी दोन नावे
विक्रम आणि वेध अशी दोन नावे असतात त्या दोघांची...
पोन्नीयीन सेलवन १ ट्रेलर
पोन्नीयीन सेलवन १ ट्रेलर आवडला.
अवतार १ पुन्हा रीलिज होणार
अवतार १ पुन्हा रीलिज होणार आहे थेटर मध्ये २३ सप्टेम्बरला..
>>>>काय भारी बातमी, धन्यवाद अस्मिता
श्रेयस तळपदे चा आपडी थापडी
श्रेयस तळपदे चा आपडी थापडी
पण मस्त वाटतोय !
मराठी कॉमेडी फिल्म्स चा वैताग आला होता ,पण श्रेयस ने कंजूस कॅरेक्टर मस्त उठवलं आहे .
अवतार १ पुन्हा रीलिज होणार
अवतार १ पुन्हा रीलिज होणार आहे थेटर मध्ये २३ सप्टेम्बरला..>>>>>
ओ गॉड… बेळगावला आयमॅक्स मध्ये येतोय का बघायला हवे. पण ते आय्मक्स फुल्ली लोडेड नाही त्यामुळे अवतार २ पाहायला मुम्बै गाठायची असा लेकिचा हट्ट आहे. अवतार १ पाहायला मुम्बै गाठणे सध्या शक्य नाही…
अवतार एक वर घमासान चर्चा
अवतार एक वर घमासान चर्चा झालेली इथे दिनेश दा बघुन आलेले मला वाट्ते. काय झाडे, काय दगड काय निळी हिरॉइन. एकदम ओक्के.
विक्रम वेधा ट्रेलर मस्त आहे. ह्रितिक जरा पुष्पा सारखा दिसतो का? सैफ मस्त नेहमी प्रमाणी. बाकी काय मार धाड.
युट्युब व्हिडिओच्या आधी एक बबली बाउन्सर चे ट्रेलर लागते ते ही छान आहे. २३ ला रिलीज आहे. म्हारी छोरी टाइप. हिरवीण क्युट व शक्तिशाली आहे.
बॅबिलोन ट्रेलर पाहिला का ?
बॅबिलोन ट्रेलर पाहिला का ? कास्ट तर जबर आहे, सिनेमा कसा असेल ट्रेलर वरून काही कल्पना नाही आली. पण ट्रेलरमधील धून आवडली.
विक्रम वेधा! आख्खाविच बदाम
विक्रम वेधा! आख्खाविच बदाम बदाम बदाम!
काय रितिक, काय सैफ, काय दोघांचा लुक, काय दोघांचा स्वॅग, काय मारामारी.
येकदम वोक्के! येकदम भारी!
सस्मित +७८६
सस्मित +७८६
हृतिक त्याच्या सध्याच्या या लूकमध्ये आवडू लागलाय. त्या आधीच्या चिकन्याचुपड्या लूकमध्ये ती मजा नव्हती. आता पिक्चरही त्याला चांगले मिळू लागलेत.
सैफ देखील एकेकाळी गर्लिश दिसायचा. तसाच बोलायचा. लोकं मजाक उडवायचे. पण नंतर त्याचाही लूक डॅशिंग रावडी झाला तसे फॉर्मला आला.
लुक मस्त आहे पण बिहारी
लुक मस्त आहे पण बिहारी अक्सेंट जमत नाहीय...
मोदी जी की बेटी चा ट्रेलर पहा
'मोदी जी की बेटी' चे ट्रेलर पहा लोक्स. जाम टाइमपास आहे.
डॉक्टर जी ट्रेलर पाहिला..
डॉक्टर जी ट्रेलर पाहिला.. फायनली theater मध्ये जायला कारण मिळालं!
https://youtu.be/H42M6qfsjTk
https://youtu.be/H42M6qfsjTk
डॉक्टर जि धमाल वाटतोय. आयुष्मान, रकुल, शेफाली.....
सस्मित +१
शेफाली मस्त! फायनली तिला मस्त
शेफाली मस्त! फायनली तिला मस्त रोल्स मिळायला सुरूवात झालीच.
ती आता विक्रांत मास्सी सारखी जळी स्थळी होतेय (नॉट दॅट आय कम्प्लेन )
द ग्रेट इंडियन किचन ह्या
द ग्रेट इंडियन किचन ह्या सिनेमाची जी मल्याळी नायिका आहे (निमिषा सजयन), तिची मुख्य भूमिका असलेला एक मराठी चित्रपट येतोय - हवाहवाई. चि ट्रे बरा वाटला. बरेच नावाजलेले लोक आहेत इतर भूमिकांत.
डॉक्टर जी धमाल वाटतोय.
डॉक्टर जी धमाल वाटतोय.
PS 1 चा ट्रेलर बघितला का.
PS 1 चा ट्रेलर बघितला का..नॉर्थ पट्ट्यात एवढी पब्लिसिटी नाही केली जात आहे ..पण दक्षिनेकडे चांगली हवा आहे .. चोल साम्राज्य हा कथेचा सार आहे..मणिरत्नम चा सिनेमा , a r rehman च music, कथा,कलाकार म्हणून जरा अपेक्षा आहेत ..
हे खालील गाणे dubi डूबी नक्की बघा .खूपच सुंदर चाल, अंतरा नंदी चा सुरेल आवाज आणि संगीत
https://youtu.be/yWoP4G0-N3E
चारही भाषेत तिनेच गायलं आहे.. लॉक डाऊन पासून ती आणि तिची बहीण बाल्कनी concert करून लोकप्रिय झाल्यात
अवतार १ पुन्हा रीलिज होणार
अवतार १ पुन्हा रीलिज होणार आहे थेटर मध्ये २३ सप्टेम्बरला..
>>>> शनिवारची तिकीट बुक केली
Pages