माबोकरांचे प्रचि दालन.. (सूर्योदय आणि सूर्यास्त..)

Submitted by अ'निरु'द्ध on 10 October, 2020 - 10:08

माबोकरांचे प्रचि दालन..
अर्थात सबकुछ फोटोग्राफी..

प्रकाश-चित्रे : मायबोली आर्ट गॅलरी..

मायबोलीच्या गणेशोत्सव स्पर्धेत रंगाची जोडी या प्रकाशचित्रण उपक्रमाला छानंच प्रतिसाद मिळाला..
रोज वेगळ्या रंगाची जोडी असल्यामुळे रोज नवीन धागा असायचा.
अनेक मायबोलीकर छान फोटोग्राफर आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
या आधी फोटो न टाकणाऱ्या अनेक सभासदांनीही नवीन आहोत म्हणत छान फोटो टाकले आणि सगळ्यांनीच त्यांच कौतुक केलं, प्रतिसाद देऊन हुरुप वाढवला.

आपल्यापैकी अनेक जण उत्तम फोटो काढतात, त्या फोटोंचे विषयही खूप निरनिराळे असतात.
इतरांचे चांगले फोटो पाहून डोळ्यांना, मनाला बरं तर वाटतंच पण काही शिकायलाही मिळतं, नवीन संकल्पना कळतात.
त्याच ठिकाणचा किंवा त्याच विषयावर आपण काढलेलाही एखादा छान फोटो असतो.

तर असे सर्व फोटो एका जागी, एका ठिकाणी बघायला मिळावेत यासाठी हा धागा..

जे प्रकाशचित्र आपण देऊ त्या प्रत्येकाबद्दल एखादी आठवण म्हणा, ठिकाणाबद्दल म्हणा, कशा प्रकारे फोटो काढला यावर चार अथवा जास्त ओळीत माहिती दिली तर अति उत्तम.

चांगल्या चांगल्या फोटोग्राफर्सनी काही टीप्स दिल्या, कॅमेराबद्दल, सेटिंग्ज बद्दल माहिती दिली तर सोन्याहून पिवळं..

फोटोग्राफीच्या काही टिप्स देणारी, मायबोलीकर अवल यांच्या Simple Photography ह्या ब्लॉगची लिंक : https://photographyforcommonpeople.blogspot.com/?m=1

तेव्हा चला मायबोलीकरांनो.. आपापली प्रकाशचित्रं इथे द्यायला सुरुवात करा..
नवोदितांच्या चांगल्या फोटोंचं, आठवणींचंही स्वागतच आहे..

मसाई मारा- केनया : निळी जांभळी सायंकाळ..

जंगलातल्या पार्क राऊंडनंतर जंगललॉजवर परतताना संध्याकाळ गडद होत गेली. आणि एक अविस्मरणीय दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलं;
मसाईमारातला सूर्यास्त.

सर्व साधारणत: आपल्याकडे सूर्योदय आणि सूर्यास्त हे दोन्ही केशरी रंग छटांत होतात पण मसाईमाराच्या स्थानानुसार किंवा काय माहित नाही पण सूर्यास्तावेळी निळ्या रंगाच्या छटा दिसतात.
विस्तीर्ण गवताळ कुरण, घननिळी संध्याकाळ आणि मसाईमारातील Typical अकॅशियाच्या विशिष्ट छत्रीसारख्या (Topiary) आकारामागे मावळणारा सूर्य.


टीप : प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे.

सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.

सर्व प्रकाशचित्रे स्वतःची असावीत. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4

या धोरणाचे कृपया पालन करावे..

तसेच "ज्यांना मायबोली.सीसी या किंवा अशा उपक्रमात भाग घ्यायचा असेल त्यानी कृपया हा फोटो मी प्रताधिकार मुक्त करत आहे असे फोटोखाली लिहा." अशी वेमांची सूचना आहे..
त्याचा विचार व्हावा..

(मी या धाग्यावरचे माझे प्रचि प्रताधिकार मुक्त करित आहे..)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निरु, ( अ'निरु'द्ध) थांकु
आठवण काढलीत आवर्जून Happy

अनिरुद्ध धन्यवाद, चेक करतो अवल यांचा ब्लॉग
पण मायबोलीवर असा धागा हवा होता असे वाटते.

खरे तर डीएसएलआरपेक्षा मोबाईलने वगैरे फोटो काढतानाही काय केल्यास ते चांगले येतील अश्या टिप्स तर आणखी उपयुक्त ठरतील.

@ याकीसोबा
मी एक हौशी असल्यामुळे मला प्रो लेव्हलचे अनुभव/सल्ले यापैकी काही देता येईलसं वाटत नाही पण आपण सुचवल्याप्रमाणे एखादा धागा काढून पाहतो.
>>>>>>
जरूर काढा. प्रो लेव्हल नकोच आहे. आणि धागा आला की प्रतिसादातही जाणकार भर टाकतातच. त्यामुळे आपणच सर्व काही कव्हर करावे अशी जबाबदारी नसतेच Happy

बऱ्याच वर्षानी पुन्हा इथे आलो, अतिशय सुंदर धागा आहे, किती छान फोटो आहेत आणि उपयुक्त माहिती आहे, अजूनही वाचतोय आणि चाळतोय मागची पान, काही फोटो मात्र दिसले नाहीत, कदाचित डाऊनलोड होत नसतील किंवा काही इतर तांत्रिक बाब असेल, पण जे पाहायला मिळाले ते सुरेख आहेत.
हा सुर्योदयचा फोटो मी Mount Diablo ला घेतला होता २०१७ मधे,
अजून खूप सूर्यास्तचे फोटो आहेत, इथे पोस्ट करावे का गूगल अल्बम ची लिंक पोस्ट कारण योग्य होईल?
520.JPG

मन्या सुंदर फोटो

जे नियमीत अन मनापासून काढतात फोटो. https://www.flickr.com/वर नक्की जॉईन व्हा. खूप छान फोटोग्राफर्स आहेत तिथे. जगभरातले. नवनवीन बघायला, शिकायला मिळतं. शिवाय गावांनुरुप/ विषयानुरुप गृप्सही आहेत, त्यांची प्रदर्शनंही भरवतात. एकत्र फोटो काढायला जातात.

धन्यवाद अवल
Flickr फार पूर्वी जॉईन केलं होत, काही फोटो upload केले होते, पण आता तस नियमित फोटो काढणं होत नाही.
पूर्वीचे काही 35mm फिल्म कॅमेरा आणि मॅक्रो लेन्स ने काढलेले फोटो पोस्ट करायचे होते.
फिल्म कॅमेरा फोटोग्राफी किंवा मॅक्रो लेन्स फोटोग्राफी चा विशेष धागा आहे का?
इथे बऱ्याच वर्षांनी येतोय त्यामुळे नवीन काही सुरू करण्या आधी सध्या काय नियम आहेत ते विचारलेले बर

नक्की आठवत नाही पण बहुदा कोकणातील मुरुड किनार्‍यावरुन काढलेला.
FB_IMG_1661427808447.jpg

हाही त्याच किनार्‍यावरचा
FB_IMG_1661427819183.jpg

मॉर्निग वॉकच भुत काही काळासाठी अंगात आल होत तेव्हा परतीच्या वाटेवर
FB_IMG_1661427876962.jpg

स्वयंपाकघराच्या खिडकीतून समोर बघितल तर खट्याळपणे डोकावत होता. Happy
FB_IMG_1661427884199.jpg

खट्याळपणा पकडला गेल्यावर आला निमुट बाहेर
FB_IMG_1661427889053.jpg

गोकर्ण महबळेश्वरचा सुर्यास्त. तिथला फेमस पॉईंट आहे हा.
FB_IMG_1661427925133.jpg

स्वयंपाकघराच्या खिडकीतून समोर बघितल तर खट्याळपणे डोकावत होता. Happy
>>>>>
छान. आमच्याकडेही मला स्वयंपाकघराच्या खिडकीतून डोकावून सुर्यास्त बघायला फार आवडते. त्यामुळे तो फोटो फार रिलेट झाला. बिल्डींगच्या पलीकडे मावळताना असाच काहीसा दिसतो. फक्त तुमचा सुर्य वर येतो, आमचा खाली जातो Happy पुढे मग आकाशातल्या रंगछटा छान वाटल्यास बेडरूममधील बाल्कनीत जातो. तिथे खास सुर्यास्त बघायला एक सनसेट पाँईट बनवला आहे. त्या कट्ट्यावर जाऊन बसतो.. हिरवळ, ईमारती, लाल तांबडे आकाश, सारे एकदमच दिसून जाते Happy

अहाहा! क्लासिक फोटोज आहेत एकेक. याकीसोबांचे विशेषतः
मलाही सुर्यास्ताचे फोटो काढायला फार आवडतात. सुर्योदय कधी बघितले नाहीयेत फारसे. लवकर न उठणार्‍या जमातीतली आहे मी Wink
हे गेल्या काही दिवसांतले सुर्यास्त!

ऑफिस च्या बिल्डींगमधून

IMG_0078.jpg

घराजवळची संध्याकाळ

IMG_4896.jpg

टेक्सास मधे एक हे हॉटेल आहे. जिथून सुंदर असा हा सुर्यास्त व्ह्यु बघायला लोकं येतात. नाव आठवत नाहीये आत्ता.

IMG_0915_0.jpg

ईथे काय एक से एक सुंदर फोटो आहेत!

हा हवाई (Haleakala नॅशनल पार्क समिट) येथे १०,००० पेक्षा जास्त फुटांवरून दिसणारा सूर्योदय!
पहाटेचा सूर्योदय बघायला हॉटेलवरुन रात्री २ च्या आधीच निघायचं. गाडी डोंगर चढतानाच गर्दीची जाणीव होते, अंधारात नीट कळत नाही की किती उंचावर ढगांना मागे सोडून पुढे जात आहोत.
मग माथ्यावर पोचलो की तांबड फुटू लागलेलं असतं. सगळी शांत गर्दी समोरचा ढगांचा समुद्र, आकाशात उधळलेले रंग असा अप्रतीम नजारा साठवत असते आणि सूर्य देव कधी एकदा दर्शन देत आहेत ही वाट बघत असते.
मग हळूच तो वर यायला लागतो. तो सूर्योदय बघताना वेळेत फोटो घ्यायची पण आठवण राहत नाही, पण हे काही क्षण

WhatsApp Image 2022-08-31 at 3.29.16 PM.jpegWhatsApp Image 2022-08-31 at 3.29.15 PM.jpegWhatsApp Image 2022-08-31 at 3.29.15 PM (1).jpeg

तीनएक वर्षांपूर्वी तोक्यो बघायला गेलो असताना सूर्यास्ताच्या वेळी एका आकाश पाळण्यात बसून हे दृश्य दिसलं होतं. नंतर कधीतरी एडिटिंग मध्ये काही प्रयोग करताना फोटोमध्ये अक्षरं (text) ऍड करून बघत होतो आणि हे असं फायनल केलं.
(तेव्हाच्या मोबाईलमध्ये काढलं आहे : Redmi note ५ pro)
एडिटिंग सॉफ्टवेअर: Google Snapseed

ResSunset_Tokyo.jpg

मस्त धागा! सुन्दर चित्रे. माझ्याकडे हि काही सूर्यास्ताचे फोटो आहेत, सध्या कॅमेराने घेतलेले. हे सांता बार्बरा, CA ला घेतलेले
322169002_3521032068186032_7367035454078258935_n.jpg322616277_669589831308107_8790003171767943660_n.jpg322903425_468938305440354_3299281403579502249_n.jpg

मस्त धागा आहे! माझेही काही फोटोज...

दापोली ते रत्नागिरी किनारी मार्गाने केलेल्या प्रवासात 'तवसाळ - जयगड' फेरीबोटीसाठीच्या तवसाळ धक्क्याच्या थोडे अलीकडे टिपलेले सूर्यास्ताच्या काही मिनिटे आधीचे दृष्य. ▼

.
तवसाळ धक्क्यावर उभा असताना एकाचवेळी उजव्या बाजूला मावळतीचे सूर्यबिंब आणि डाव्या बाजूला चंद्रबिंब असे दृश्य पाहायला मिळाले.

मावळतीचे सूर्यबिंब ▼


.
चंद्रबिंब ▼


.
त्यानंतर काही मिनिटांनी फेरीबोटीतून जयगडला उत्तरल्यावर धक्क्यावरून झालेले चंद्रदर्शन ▼

.
रत्नागिरी जवळच्या कोळंबे गावात पाहिलेला सूर्योदय ▼

.
वालावल येथील लक्ष्मी नारायण मंदिराच्या आवारातील तलावात आकाशातील मावळतीच्या सूर्यबिंबाची दिसलेली दोन प्रतिबिंबे. ▼

.
या प्रतिसादातील माझे फोटोज प्रताधिकार मुक्त करित आहे!

पहिले तीन सुर्योदयाचे एकाच ठिकाणचे; वेगवेगळ्या दिवशीचे
1.
IMG_20230808_224357.jpg
2.
IMG_20230808_224449.jpg
3.
IMG_20230808_224520.jpg
अन हा सुर्यास्ताचा, ठिकाण वेगळे
4.
IMG_20230808_224315.jpg

Pages