Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05
आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
आमच्या नात्यात कार्तिक आर्यन
आमच्या नात्यात कार्तिक आर्यन अजिबात न आवडणाऱ्या वय वर्षं 11 व 16 च्या 2 स्त्रिया मिळाल्या.
केस बांधून येते
अनु
अनु
अनु
अनु
एज ईज जस्ट ए नंबर
एज ईज जस्ट ए नंबर
यू कॅन कार्तिक आर्यन आवडतो
यू कॅन कार्तिक आर्यन आवडत नाही
बट यू कान्ट कोण कार्तिक आर्यन?
बाई दवे,
कार्तिक आर्यनचे एज ईझ ३१+
सो टेक्निकली थर्टी प्लस बायका आल्सो एंजॉय कार्तिक आर्यन्स सौंदर्य
चंद्रमुखी बघायचा प्रयत्न केला
चंद्रमुखी बघायचा प्रयत्न केला. राजकीय ड्रामा ची सुरूवात ठाकठीक. पण अमृता खानविलकरची एन्ट्री झाली आणि पुढे पाहवला नाही. वजन वाढवल्याने थोराड दिसते. आदिनाथ कोठारे लहान दिसतो तिच्यापुढे. तिच्या प्रेमात एखादा भावी केंद्रीय मंत्री ते ही तरणाबांड पडेल अशी कन्व्हिन्सिंग कास्टिंग वाटत नाही. पुढे बघण्यात अर्थच नाही.
अचानक प्राईम व्हिडीओ वर हिरोपंतीचा पप्पा सापडला. जॅकी श्रॉफचा हिरो. हा सिनेमा युट्यूब किंवा कुठेही उपलब्ध नव्हता. बहुतेक आजच लोड केलाय. अर्धा बघून झाला.
अरे वाह सही. मस्त पिक्चर आहे
अरे वाह सही. मस्त पिक्चर आहे हिरो. ईथे नमूद केल्याबद्दल धन्यवाद. दाखवायला हवा घरच्या टायगर श्रॉफ फॅन जनतेला. टायगरच्या बाबांचा पिक्चर म्हणून तरी नक्की बघितला जाईल.
अग अनु, भन्नाट आहेस, हाहाहा.
अग अनु, भन्नाट आहेस, हाहाहा.
मुलांना आमच्या वेळचे पिक्चर
मुलांना आमच्या वेळचे पिक्चर म्हणून शोधत होतो कित्येक दिवस. बेताब सापडला. आज कर्ज आणि हिरो सापडले. जॅकी आणि सनी दोघांनाही अभिनय जमलेला नसताना दोन्ही पिक्चर्स सुपरडुपर हिट होते. बेताब जास्त चाललेला.
बेताब, हिरो आहाहा. परत
बेताब, हिरो आहाहा. परत बघायला हवेत.
कुणी वाय पाहिला का? मुक्ता
कुणी वाय पाहिला का? मुक्ता बर्वे आणि बाकी स्टारकास्ट पण चांगली आहे. सध्या प्रमोशन जोरात चालू आहे.
भुभु2 मला पण बिलकुल आवडला
भुभु2 मला पण बिलकुल आवडला नाही,मंजुलीका बद्दलच दया आली, तिने बिचारीने नक्की काय मिळवलं याचं तर उत्तर पण मिळत नाही(अर्थात असा प्रश्न बनवणाऱ्यांना पडतच नसतील) कारण ज्या नवऱ्यासाठी ती सगळं करते तो तर जागेपणी कोमात गेल्यासारखा होतो,मग ती तिथे का राहते,ती काळी जादू पुढे कॉन्टिनू का करत नाही?जादू तर लहानपणापासून आवडत असते मग बाबा बहीण मेली तर इंटरेस्ट संपला लगेच काळ्या जादूतला??मला काही झेपलं नाही हे,
साऊथ मधले एक दोन पिक्चर बघितलेत या स्टोरी सारखे पण निदान त्यांना नवऱ्याचे सुख तरी मिळते किंवा थोडे दिवसांनी का होईना मिळण्याची आशा तरी असते पण इथे तर तब्बू ला काहीच भविष्य नाही,नवरा कधी बोलायला लागला तर हिचेच वांदे व्हायचे
भूत तब्बू मजेशीर दिसते,जोकर सारखी
बिलकुल आवडला नाही हा पिक्चर
भूल-भुलय्या २ पाहिला. तब्बूने
भूल-भुलय्या २ पाहिला. तब्बूने एकहाती (दोन-हाती) संभाळायचा बराच प्रयत्न केलाय, पण बाकी कुणाचीच (तेव्हढं जरा कथा-पटकथेवर सुद्धा कष्ट घेतले तर चालेल अधून-मधून) साथ नाही. मिलिंद गुणाजी च्या आवाजात आणि अभिनयात दोन्हीत दम नाही. कार्तिक आर्यन अक्षय मनोज कुमारची नक्कल करतो. नक्कलच करायची तर एखाद्या अस्सल अभिनयपटुला तरी पकडायचं. अक्षय कुमारची मिमिक्री बघितल्यासारखी वाटते. कियारा छान दिसते. पण मुळातच कथेत जोर नाहीये.
वाय ला गेलो होतो शो कँसल
वाय ला गेलो होतो
शो कँसल
अनु, चाणक्याने जणू धनानंदाचा
अनु, चाणक्याने जणू धनानंदाचा पाडाव केल्यागत कामगिरी पार पाडून केस बांधलेत (त्यानेही केस बांधणार नाही वगैरे प्रतिक्रिया दिली होती त्याच्या मायबोलीत)
हिरोपंतीचा पप्पा सापडला. जॅकी श्रॉफचा हिरो. >> जॅकी श्रॉफचा पोरगा हिरोपंतीचा हिरो आणि हिरोपंतीचा पप्पा जॅकी श्रॉफचा हिरो - ही ओळ आज दिवसभर माझ्या डोक्यात घोंगावणार आहे.
जॅकी श्रॉफ चा पण हिरो आहे का?
जॅकी श्रॉफ चा पण हिरो आहे का? आम्हाला फक्त सुरज पांचोली आणि अथिया चा हिरो चा माहित आहे...
रन-वे ३४ बघीतला प्राइमवर. ठीक
रन-वे ३४ बघीतला प्राइमवर. ठीक आहे. बर्याच गोष्टी ढापल्यात. उदा. तो ATC Controller ब्रेकिंग बॅड मधल्या जेसीच्या ड्रगिस्ट गर्लफ्रेंडच्या बापासारखा आहे. सलीवरुन पण थोडा प्रेरित आहे.
न आवडलेल्या गोष्टी - बच्चनचा अभिनय उगीचच आक्रस्ताळेपणा करतो. आता बच्चन बोअर करतो.
तपासकाम खुपच थिल्लरपणे दाखवले आहे. सलीवरुन जरा व्यवस्थित तरी ढापायचे.
गंमत म्हणजे दुबईहुन कोचिनला जाण्यार्या विमानात एकही मल्लु नाही
तो flight ची कॉपी आहे...
तो flight ची कॉपी आहे...
अस्मिता आणि अनू
अस्मिता आणि अनू
कमाल आहात!
जॅकी श्रॉ. ला त्याच्या तिनपाट तोंडावरून माशी न हलणार्या लेका वरून ओळखावे...हन्त हन्त..फार वाईट काळ आलाय
जयकिशनभाई सराफ आणि अजयसिंग
जयकिशनभाई सराफ आणि अजयसिंग देवल यांचे चलचित्रपट आले तेव्हा दहावीत होतो कि अलिकडे हे आठवत नाही. सागर, मिस्टर इंडिया नंतर आले होते कि आधी याचा गोंधळ झाला आहे. बहुतेक दहावीच्या परीक्षेनंतर सागर नटराजला आला होता. हे चार सिनेमे चांगले लक्षात आहेत. रोटी, कपडा और मकान आणि जंजीर हे त्यानंतर पाहिले होते. गुंजन थिएटरला अमिताभचे सिनेमे री-रन ला यायचे म्हणून ते बघता आले. त्यातला हडकुळा अमिताभ पाहून धक्का बसला होता.
मेरी जंग चे नाव बरेच दिवस मेरा जांग्या असे समजत होतो. असा कसा पिक्चर म्हणून अलंकार ला गेलो तेव्हा करेक्ट नाव कळले होते.
सोनु के टिटु की स्विटी मधे
सोनु के टिटु की स्विटी मधे आवडला होता कार्तिक, धमका मधे बन्डल वाटला होता.एकदम टिपिकल देल्ही स्टाइल पोरगा वाटतो.
सगळेच नविन हिरो कुणा न कूणाचि स्टाइल मारतातच अपवाद रणविर आणि रणबिरचा.
भुभु२ चे रिव्ह्यु वाचुन त्याच्या वाट्याला जाणार नाही.चन्द्रमुखी आमच्या प्राइम वर नाहिये.
सगळे मराठी मुव्हिज ट्रेलरच भारी बनवतात आणी मुव्ही बन्डल हे आता कितव्यादा तरी प्रुव्ह झाल, झिम्मा,चोरिचा मामला,चन्द्रमुखी.
आयुष्मानचा अनेक बघायला घेतलाय
आयुष्मानचा अनेक बघायला घेतलाय.. अर्धा तासाचा बघून झाला ..उरलेला उद्या बघेन ..चांगला वाटतोय
रन-वे ३४ >> नाही आवडला ,
रन-वे ३४ >> नाही आवडला , वेगळा विषय , अजय देवगण आणि अमिताभ पाहून खूप अपेक्षा होत्या
शेवटचा सिन तर अगदीच काहीतरी वाटलं
अनावश्यक खूप स्मोकिंग खटकले
रन वे चे लॅण्डिंग आणि चौकशी
रन वे चे लॅण्डिंग आणि चौकशी असे सरळसोट दोन भाग पडतात. पहिल्या भागात थरार आहे. नंतर रूटीन चौकशीत नाट्यमयता आणि ताण निर्माण करण्याचा प्रयत्न कमी पडला आहे.
चौकशी दरम्यान लॅंडींगचा पार्ट उलगडत जाताना दाखवला असता तर एकसंध कथा वाटली असती.
<<<अमृता खानविलकरची एन्ट्री
<<<अमृता खानविलकरची एन्ट्री झाली आणि पुढे पाहवला नाही. वजन वाढवल्याने थोराड दिसते. आदिनाथ कोठारे लहान दिसतो तिच्यापुढे. तिच्या प्रेमात एखादा भावी केंद्रीय मंत्री ते ही तरणाबांड पडेल अशी कन्व्हिन्सिंग कास्टिंग वाटत नाही. >>>>
मला तर ती कायमच थोराड वाटते. या सिनेमात नायिका देखणी आणि नाजूक हवी होती की जिच्यासाठी नायक त्याचे करिअर पणाला लावेल..
अजय देवगण फार आवडला रनवे
अजय देवगण फार आवडला रनवे मध्ये.
अमिताभ चे काही शब्द पटकन समजत नाहीयेत.तो ग्रिहातुर शब्द आम्ही बराच वेळ ग्रिहातो ऐकून हा अमिताभ काहीतरी एव्हीएशन मधला इंग्लिश किंवा फ्रेंच जारगन वापरतोय समजत होतो.
विमान लँड होतानाचं गाणं सॉलिड आहे.
मी-अनु
मी-अनु
मला तर ती कायमच थोराड वाटते.
मला तर ती कायमच थोराड वाटते. या सिनेमात नायिका देखणी आणि नाजूक हवी होती की जिच्यासाठी नायक त्याचे करिअर पणाला लावेल.
>>1. प्रत्येकाच्या सौंदर्याच्या व्याख्या वेगळ्या असतात.
उ दा. सध्याच्या बऱ्याच बायकाना जशा अती बारीक बायका आदर्श वाटतात तशा सर्वाँना वाटतील च असा नाही. उदा. मला पर्सनली दीपिका पदुकोण फार अशक्त वाटते.
2. अनेक प्रकारच्या माणसाची लग्न होतात कारण दिसणं सोडूनही माणसात काहीतरी असतं.. + दोन जणांच्या रोमेंतिक संदर्भात
आतलं कनेक्शन असेल किंवा शारीरिक पातळी वर च एक्स्प्रेशन असेल .. हे फक्त दिसण्यावर अवलंबून असू शकत नाही
चंद्रा
चंद्रा
ऐकले की एक जुने गाणे आठवते , मी वाऱ्याच्या वेगाने आले
विषय निघालाच आहे म्हणून..
विषय निघालाच आहे म्हणून..
प्रसाद ओकने दहा किलो वजन वाढव अशी अट काय विचार करून घातली असेल त्याचे त्यालाच माहीत.
विहीरीवर पाणी शेंदणे किंवा लांबून हंडे नेऊन पाणी आणणे, घरातली कामे, शेतीची कामे आणि गावरान आहार यामुळे बांधलेले शरीर आणि
काटेकोर डाएट + जिम किंवा योगा याचे शरीर यात फरक असणारच.
तमाशातल्या बायकांचा रोजचा नृत्याचा रियाज + घरातली कामे + आहार यामुळे त्या झिरो फिगर बिगर कधीच दिसणार नाहीत पण बांधा आकर्षक आणि हेल्दी वाटतो. हा फरक दहा किलो वजन वाढवून कसा काय कमी केला जाऊ शकेल?
त्याचे परिणाम विचित्रच होणार.
Pages