चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोहित्याची मंजुळा आणि सर्जा दोन्ही लहानपणी पाहिलेले. आवडलेले. आता पुन्हा बघायला कसे वाटतील कल्पना नाही. या पिढीतील बच्चेकंपनीला आवडतील का.. की त्यांना ते सुपरहिरो स्टाईलच आवडते?

मला सहानूभूती द्या. मी केजीएफ-२ (संपुर्ण) पाहीला. Sad
कोण, कुणाला? कशासाठी मारतंय काहीही कळेना. देशात ईतकी मोठी सोन्याची खाण असूनही भारत सरकारला माहीत नाही, ह्यापेक्षआ तालीबानी, सोमालीयन बरे. पंतप्रधानासमोर संसदेत जाऊन गोळ्या घातल्या. वारे राॅकीभाई झोपडपट्टीदादा.

एक अप्रतिम पण डावलल्या गेलेल्या सिनेमातील दृश्य. दिग्दर्शकाच्या बुध्दीमत्तेला सलाम. भारतात टॅलेंटची कदर होत नाही हेच खरं.
https://youtu.be/BXxcUAu-1Ls

बॉलीवूडचा उंट जबरी आहे. Lol
आमच्या गेंड्याला आणि पाघोला पण काम मिळत असेल तर बघा. नुसतं बसून खातात टनाटन.

कायपण!

बॉलिवूड का कॅमल Rofl
त्यावरून बगदाद का उंट आठवला.

Lol

मास्टर सज्जाद, मास्टर अफझुलखान, सुलताना Happy

पाठीवर तोफ, पायाला तलवारी, हातात खंजीर Happy

सापडला. आता जरा बाजारहाट करून येतो, भांडी घासून झाली, फोडणी दिली कि एकीकडे पिक्चर बघत बघत पाच शिट्ट्या होईपर्यंत अर्धा बघून होईल.

माला मल्होत्रा हिरविन चे नाव आहे हो
हनीमोर इन मसुरी चित्रपटातली तिची हेअरस्टाईल फार फेमस झालेली

दो राह

>>माला मल्होत्रा.
तीच ना ती जी जंगल की बेटी मध्ये होती? Happy

ऊंट Lol
मला ती मिलिंद गुणाजीची मागे वळून बंदूकीतून गोळी मारायची स्टाईलही आवडली. ऊंट आणि तो दोघे एकमेकांना टक्कर देत होते.

हो Lol

दो राहे नाव आहे चित्रपटाचे. मिलिंद गुणाजी, कंवलजित, मीनाक्षी शेषाद्री अशी भव्य स्टारकास्ट आहे. मिलिंद गुणाजी आदिवासींचा भगतसिंग असतो. सरकारकडून आदिवासींवर हल्ले झाल्याने त्याने बदला घेतलेला असतो. फक्त मीनाक्षी शेषाद्री सुंदर दिसण्याची पराकाष्ठा करत त्याची बाजू लोकांसमोर आणते. त्यामुळे तो प्रेमात पडलेला आहे. त्याने तिला ऑडीओ कॅसेट पाठवून मुलाखत द्यायची ऑपर दिलेली आहे. अट तिने एकटीने यायची. त्याचा माणूस फोन करतो तेव्हां चॅनेलच्या म्हणण्याप्रमाणे ती कॅमेरामन सोबत आणण्याची परवानगी मागते. फोनाफोनी होऊन नेहमीच्या कॅमेरामनला परवानगी मिळते पण एक नाव न ऐकलेली सीक्रेट एजन्सी कॅमेरामनला देशप्रेमाची शपथ घालून अ‍ॅक्सीडेण्ट झाल्याचा बहाणा करून हॉस्पिटलमधे एक टांग वर अडकवून झोपायला सांगते. त्यामुळे त्याच्या जागेवर त्यांचा एजंट कंवलजित जातो. रस्त्यात मीनाक्षी शेषाद्रीसोबत छेडछाड, लक्षात न राहणारी गाणी असा त्यावेळचा "नॉर्मल" मसाला झाला आहे. आता आदिवासी आले आहेत. आदिवासी बायकांना पौराणिक कथेतल्या प्रमाणे ड्रेस दिले आहेत. पुरूष उघडेच आहेत. ज्या बाईला कोडवर्ड सांगायचा आहे ती सगळीकडे फिरतेय. सीक्रेट कसलं ते समजत नाही. मिलिंद गुणाजीचे झोपडे हे डिझाईनर स्टाईलचे आहे. जोत्यावर बांबूचे घर, त्याला चारही बाजूने बांबूचे पॅरापीट, आणि या घरात तो खिडकीपाशी बसला कि बाहेरून ते मातीचे दिसते आणि त्याचा खास माणूस खिडकीजवळ लपून जमिनीवर उभा राहून त्याचे बोलणे ऐकतो हा चमत्कार आहे.
अजून अचाट प्रसंगांना सुरूवात झालेली नाही. गुणाजींनी ट्रेन केलेले पक्षी त्याच्याशी गप्पा मारतात इतकेच दिसले. हे बहुतेक जस्टीफिकेशन असावे. आज-उद्या उर्वरीत होईल बघून. असे सिनेमे सोडायचे नसतात. एक वेळ ब्रह्मास्त्र स्किप केलेले चालते.
( दो राहे)

ती सुवर्णा कपूर बहुदा >> +१, पोलीस की बेटीतली. निदान तुम्ही कत्तलखाना पाहिलाय?

स्वतंत्र धाग्याइतका मसाला अजून मिळाला नाही. पुढे असेल तर स्व-धाग्याचा विचार करता येईल.

Pages