Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05
आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भूलभुलैया २ अतिशय वाईट आहे.
भूलभुलैया २ अतिशय वाईट आहे. दोन तुकड्यांत बघितला, दुसऱ्या दिवशी तर सुरू केलाय तर उरकून टाकू या भावनेने बघितला. सुरवातीला हिमालयाच्या कुशीत वसलेल्या इग्लूतल्या डिस्कोत जत्रा आहे, त्यात सगळे बेदिंग सूटमधे नाचूनही हायपोथर्मियाने मरत नाहीत. जत्रेसाठी मुद्दाम चुकवलेली बस मात्र कुठे तरी खाईत पडून सगळे लोक मरतात. पूर्ण सिनेमाभर कियारा उघडउघड लपून बसली आहे.कार्तिक आणि कियारा यांचा संसर्ग झाल्यासारखे तब्बूचा अभिनय गंडलाय. (ह्या वाक्यावर माझाच विश्वास बसत नाहीये, फार आवडते ती) तब्बुचा मेक अप अतिशय वाईट आहे. तरुण तब्बुचा चेहरा खास करुन दातांची ठेवण, जबडा,जिवणी सिजीआय वाटत राहते, लॉन्ग शॉट मधे तर ओळखायला येत नाही. त्यात तिला भरपूर लांबीचा रोल आहे. फक्त आवाजाने खात्री पटवायची.
राजपाल यादव, अश्विनी केळशीकर आणि संजय मिश्रा या तिकडीने कॉमेडीच्या नावाखाली काहीही आचरट दाखवलेय, अजिबात हसू येत नाही. हे कमी होतं की काय म्हणून अरिजितने 'मेरे ढोलना सुन'चा जीव घेतलाय, कसलेच चढउतार नाहीत, आर्तता-व्याकुळता नाही ,अगदी (नेहमीपेक्षाही कैकपट) एकसुरी करुन माती केलीये. त्यावर कार्तिकचा नाच तर 'भीक नको पण कुत्रा आवर' आहे. जुने 'मेरे ढोलना' ज्यांना आवडते त्यांना चक्क कोतबो वर्दी आहे. पहिल्या भूभुत भूत नसूनही रहस्य शेवटपर्यंत टिकवलंय, इथे भूत सतत दाखवूनही दचकायला सुद्धा होत नाही. अक्षय, विद्या, परेश रावल, रसिका जोशी, राजपाल यादव, मनोज जोशी, विक्रम गोखले यांनी जे काम केले होते ते अमेझिंग होते. त्यामुळे फार निराश करतो हा सिनेमा!
गाणी जी रिमिक्स आहेत तीच लक्षात रहातात. अक्षयचे 'मेरी आँखे भूलभुलैया' गाणं सुद्धा जबर होते .तो अगदी बेपर्वा, vagabond , उथळ, बेभरवशाचा, वेडसर वाटतो, तो camera कडेही बघत नाही, भानच नसलेली व्यक्तिरेखा आहे. इथे नवीन गाण्यात सतत भान, रोखून बघणे व मी किती 'मदनाचा पुतळा' टाईप बॉडी लँग्वेज आहे. कार्तिक रोमँटीक सीन्समधे अनॉयिंग व झपाटलेल्या सीन्समधे वेडसर वाटतो. कियारा लक्षात रहात नाही. आधी कथेला अलाईन न होणाऱ्या गोष्टी दाखवून शेवट गडबडीने गुंडाळलाय.
मी मध्यरात्री स्मशानात बसून बघितला असता तरी टरकले नसते एवढा पांचट आहे. पण बाहेर फार ऊन होतं आणि दुकानात गेलं की पैसे जातात म्हणून मी बघितला.
(No subject)
मीदेखील भुलभुलैया 2 पाहिला...
मीदेखील भुलभुलैया 2 पाहिला... प्रचंड हसू येत होते फर्स्ट हाफ...
आवडला...
मी मध्यरात्री स्मशानात बसून
मी मध्यरात्री स्मशानात बसून बघितला असता तरी टरकले नसते एवढा पांचट आहे. पण बाहेर फार ऊन होतं आणि दुकानात गेलं की पैसे जातात म्हणून मी बघितला. >> तीन एक दिवसांपूर्वी रात्री बघायला घेतलेला.. खरंच पांचट होता पण तो दरवाजा दाखवायचे तेव्हा टरकतच होती.. त्यामुळे अर्ध्यावरच सोडला.. मग रात्री झोपताना वांधे झाले.. खिडक्यांना अजून पडदे लावले नाहीएत त्यामुळे बाहेर चाल्लेली झाडापानांची सळसळ बघत घाबरतच झोपले
अस्मिता अगदी अगदी.
अस्मिता अगदी अगदी.
कार्तिक आर्यन तसा ओके आहे.मला अरिजित चं बदललेलं गाणं पण आवडलं
पण चांगल्या लोकांना पिक्चर द्यायचे म्हणून तुम्ही काहीही कथा नसलेला रिकामा लोकरीचा गुंडा खपवू शकत नाही.मूळ कथा लागते.
शूटिंग खूप अंधारात आहे.मला सारखं जाऊन टीव्ही खसाखसा पुसून यावा वाटत होतं.
मी मध्यरात्री स्मशानात बसून
मी मध्यरात्री स्मशानात बसून बघितला असता तरी टरकले नसते एवढा पांचट आहे >>> हमारी बंगाली उतनी ही अच्छी है, जितनी कि फ्रेंच ( इथे इंग्लीश पण चाललं असतं आणि बंगालीच्या जागी हिंदी पण
)
फर्स्ट हाफ मनोरंजक होता. नंतर काहीच्या काही आणि तिसर्या भागाची पण व्यवस्था केलीय. बहुतेक पहिल्या भागात भूत नसतं असं दाखवल्याने या पिक्चरकडून भूताची अपेक्षाच नव्हती. पण महाराष्ट्र राज्य मिनी लॉटरीच्या दोन रूपयाच्या तिकिटावर दहा रूपये बक्षीस मिळावं तसं भूत दिलंय म्हणून चालला असावा पिक्चर. शिवाय महिलाप्रिय अशा गोष्टी आहेत. अच्छी बीवी का हजबंड सालीने (इथे मराठी अर्थ घ्यावा) हडप लिया, अब मरने के बाद भी उसे वो वापस मिला तो चलता है ! ( चल झूठे )
मधे झोप लागली होती त्यामुळं तांत्रिक बाबाचं प्रेत वरून कसं आलं हे पुन्हा बघावं लागेल. के एन सिंग धागा नसता काढला तर भूलभुलैय्या धागा मटेरिअल वाला पिक्चर होता.
महिलाप्रिय>>>> मी महिलाच आहे
महिलाप्रिय>>>> मी महिलाच आहे हो

मला तर मेव्हणी-तबुबद्दलच सहानुभूती वाटली. वडिलांना बहिणीचं कौतुक, रोज एकाच रिमिक्स गाण्यावर नाचा, काळ्या जादूची आवड असूनही त्यात करिअर करता आलं नाही, ज्या डेलीसोप हिरोवर प्रेम आहे त्याला बहिणच आवडते, मगं पांगळ्या नवऱ्यासोबत संसार, हेकेखोर गुणाजी सासरा, चक्रम सासर, अठरा वर्षे गोडीगुलाबीने संयुक्त कुटुंबात राहा, पुन्हा कुणाला कळलं की मुडदे पाडून दुसऱ्यावर नाव घाला , स्वतःच मूल नाही, खोटारडी नणंद, नणंदेचा फुशारकी मारणारा बि एफ , गावातल्या शंभर लोकांची रोज ऊठबस, सर्वात म्हणजे स्वतः दुष्ट असून प्रदीर्घ काळापासून चांगले वागा... किती अवघड आहे. काय मिळालं तिला, कोंडून घातलं शेवटी
गोविंद नामदेव फक्त हातवारे करायला व वरुन पडायला आहे, तुम्ही काही मिस केले नाहीत. बरं झालं थोडी झोप घेतलीत.
मी महिलाच आहे हो
मी महिलाच आहे हो
मंजुलिका कि दर्दभरी दास्तान असंच नाव पाहिजे होतं पिक्चरचं.
अस्मिता स्वतंत्र धागा तो बनता
अस्मिता स्वतंत्र धागा तो बनता है. आगे बढो.
ह्या स्टोरीवर साऊथ मध्ये
ह्या स्टोरीवर साऊथ मध्ये भरपूर सिनेमे आहेत
बिपाशा बसुचा अलोन आहे
तो मुळात कोरियन मुव्ही आहे
जयेशभाई जोरदार बघितला. सगळंच
जयेशभाई जोरदार बघितला. सगळंच रसायन फसलंय. धड ना कॉमेडी, धड ना स्त्री भृणहत्येचा विषय, धड ना स्त्री-पुरूष समानतेचा विषय - कुठेच काही जमलं नाहीये.
अस्मिता
अस्मिता

भुभू 1 खूप आवडला होता. भुभू 2 बघितला नाहीये पण तरी वाचायला मज्जा आली
अस्मिता
अस्मिता
एकदम जोरदार फटकेबाजी
खूप चांगले कलाकार वाया घालवले आहेत यात.
तब्बू ची भीती न वाटता चुकून मुलतानी मिट्टी फेसपॅक धुवायचा राहिलाय आणि त्यावर कोण्या जुन्या काकवांनी हळदीकुंकवात गेल्यावर भसाभसा कुंकू लावलंय असं वाटतं.
अस्मिता, भारी लिहिलं आहे
अस्मिता, भारी लिहिलं आहे
अस्मिता
अस्मिता

लोकहो पण पिक्चरचे सस्पेन्स / ट्विस्ट नका फोडू. आताच ओटीटीवर रीलीज झालाय दोनेक विकेंड द्या जनतेला बघायला. बेवॉच नसला तरी वन टाईम वॉच नक्कीच आहे.
जोक्स द अपार्ट,
पिक्चर बाकी बॉक्स ऑफिसवर हिट आहे. बहुधा कोविडनंतरचा सर्वात मोठ हिट हाच असावा. कारण काही जमेच्या बाजूही आहेत चित्रपटात.
एक म्हणजे कार्तिक आर्यनचा अभिनय वा विनोदी अभिनय. तो नेहमीप्रमाणेच उत्तम जमलाय. फर्स्ट हाफ जो मनोरंजक झालाय तो त्यानेच पेललाय. बाकीच्या सो कॉल्ड विनोदवीरांनी पाट्याच टाकल्या आहेत.
दुसरे म्हणजे तो दिसायलाही तसा छान आहे. कदाचित फिमेल फॅन फॉलोईंग असेलही.
जसे की कियाराला आहे. तिने अभिनय नाही केला तरे चालतेय. तिला येतही नाही म्हणा. पण तिचे चित्रपटात असणे आणि छान छान दिसणेच पुरतेय. चित्रपटाची फ्रेम सुंदर बनवते ती. मला तर फार आवडते.
गाणी सगळीच ढकलली मी. पण शेवटचे भुलभुलैय्याचे गाणे पुर्ण पाहिले. ते क्लासच आहे. तेव्हाही त्यावर नाचावेसे वाटायचे. आजही नाचावेसे वाटते. आणि ती ट्युन पुर्ण चित्रपटभर स्पेशली सुरुवातीच्या मनोरंजक द्रुश्यात बॅकग्राऊंड म्युजिक म्हणून वापरली आहे त्याने मनोरंजकता वाढते.
बाकी पिक्चरमध्ये ईतर काही उल्लेखनीय नाही. रीलीज झालेला तेव्हा काही लोकांकडून तब्बूच्या अभिनयाचे खूप कौतुक ऐकलेले. ते काही पटले नाही. विशेष काही केले नाहीये तिने. तब्बू म्हटले की जे अपेक्षित असते तेच केलेय.
मला पर्सनली भिती दोनेक द्रुश्यातच वाटली. एक जेव्हा ते सुरुवातीला त्या हवेलीत जातात तेव्हा आणि मग दुसर्यांदा ती लपायला मंजुलिकाच्या रूममध्ये जाते तेव्हा. अर्थात कोणीही भूताच्या तोंडात जात असेल तर भिती वाटतेच.
पण चित्रपट चालण्यामागे तो फारसा भितीदायक नसणे याचाही हात असावा. भितीदायक केला असता तर कोण लोकं थिएटरच्या अंधारात बघायला गेले असते
उलट भितीदायक नसल्याने आम्हाला घरी नेहमीसारखा छान अंधार आणि डिमलाइट माहौल करून बघता आला..
कार्तिक आर्यन दिसायला छान?
कार्तिक आर्यन दिसायला छान?(मनात मोठी किंचाळी)
चंद्रमुखी पाहीला. अगदीच बोअर.
चंद्रमुखी पाहीला. अगदीच बोअर. अमृता. खा. सोसो...धुरळाच जास्त.
ती तमासगीर वाटायला हवी तिथं जराश्शी शालीनच वाटते आणि शालीन वाटायला हवी तिथं जराश्शी चीप वाटते. काहीतरी, कुठंतरी गंडलंय काम.
छकुल्याला मोठे संवाद असतील तेव्हा मलाच धाकधूक वाटत होती. अगदीच लिंबूटिंबू दिसतोय अभिनयात. दिसावयास मात्र छान आहे.
कार्तिक आर्यन दिसायला छान?
कार्तिक आर्यन दिसायला छान?(मनात मोठी किंचाळी) >>> हायला, मला तर पुरुषाच्या नजरेतून बघता वाटतो. बायकांच्या नजरेतून सौंदर्याचे निकष वेगळेही असू शकतात
मला त्याला पाहून खिलाडी चित्रपटातील अक्षय कुमारचीच आठवण येते. अक्षयही तेव्हा मला छान वाटायचा. एक स्मार्ट बॉडी लँगवेज होती.
अनु,
अनु,
गंंमत म्हणून मी असे गूगल सर्च केले.
is kartik aaryan good looking
आणि असा रिजल्ट आला
Bollywood's handsome young man Kartik Aaryan is known for his good looks and charming screen presence. Kartik Aaryan. Mumbai: Bollywood's handsome young man Kartik Aaryan is known for his good looks and charming screen presence. He has a massive number of fans on social media much of which is dominated by females.02-Nov-2019
मग त्याच वाक्यात प्रश्नचिन्ह टाकले.
तर असा रिजल्ट आला
Kartik Aaryan is undoubtedly one of the most sought-after Bollywood actors of his generation. In just a short time span, the handsome hunk has managed to carve a niche for himself in the industry. Having entered Bollywood in 2011 with Luv Ranjan's Pyaar Ka Punchnama, the actor quickly climbed the ladder of success.22-Nov-2021
कदाचित फिमेल फॅन फॉलोईंग
कदाचित फिमेल फॅन फॉलोईंग असेलही. जसे की कियाराला आहे. >> हरे राम हरे राम ! हरे कृष्णा कृष्णा राम !!
बेवॉच नसला तरी वन टाईम वॉच
बेवॉच नसला तरी वन टाईम वॉच नक्कीच आहे
>>>>> सहमत
टाइमपास , डोके बाजूला ठेवून बघायला म्हणून भुभू २ बरा आहे.
एखाद दुसरा सिन वगळला तर फॅमिली सकत बघता येऊ शकतोय.
बाकी कार्तिक आर्यन अक्षय कुमारची कॉपी करण्यात जराही कसर सोडत नाहीये
चित्रपटात देखील आणि प्रमोशनमध्येही
Y बघायला गेलो
Y बघायला गेलो
शो कँसल
रिक्षा 200 रु फुकट
शो कँसल>> का? कोणी बंदी आणली
शो कँसल>> का? कोणी बंदी आणली का?
Hulu वर Good Luck to You, Leo
Hulu वर Good Luck to You, Leo Grande पाहिला. आवडला. एमा थॅाम्प्सनचा अभिनय उत्तम.
एक निवृत्त विधवा स्वत:च्या आनंदासाठी, जे सुख तिला तिच्या वैवाहिक आयुष्यात कधीच मिळाले नाही ते मिळवण्यासाठी सेक्स वर्करला भेटते. सुरूवातीला आपले हे काय चालले आहे, आपण काय करतोय अशी मनाची तगमग तिने छान दाखविली आहे.
प्राईमवर ९६ पाहिला. मुळ तमिळ
प्राईमवर ९६ पाहिला. मुळ तमिळ असावा पण हिंदी वर्जन पाहिले. त्रिशा व विजय सेतुपतीचा उत्तम अभिनय आहे. ओरिजिनलचं म्युझिक गाजलं आहे पण हिंदीत गाणी नव्हती.
The Black Phone छान आहे. मला
The Black Phone छान आहे. मला तरी आवडला. परवाच रिलीज झालाय.
काल पाहिला The Black Phone .
काल पाहिला The Black Phone . काही कळलेच नाही. Villain असा का वागत आहे , आधीच्या मुलांचे काय झाले .
डिटेक्टिव्ह तर काहीच काम करत नाहीत. काही सीन मस्त होते पण भीती नाही वाटली.
दसवी पास बघायला घेतला
दसवी पास बघायला घेतला
सुरुवातीला चांगला वाटला वेगळा विषय म्हणून
नंतर मग त्यातले लॉजिक रानोमाळ पळून गेलं
आठवी पास विद्यार्थ्यांना सही करता येत नाही?
जेल मध्ये अभिषेक सोडा कोणालाच कैद्यांचे कपडे नाहीत?
इंग्रजीत इतिहास वाचून शिकणारा माणूस अनपढ गवार?
असो, अनेक आहेत लिहून कंटाळा येईल इतपत
यामी गौतम नेहमीच्या मठ्ठ पण सुंदर दिसण्याच्या पराकाष्ठा करण्याचा प्रयत्नात
अभिषेक चा वावर सहज आहे पण पटकथा इतकी भिकार आहे की सांगता सोय नाही
त्याची बायको मस्त घेतलीय, यामीच्या वाटचा अभिनय पण तीच करत असावी
असह्य झालं तेव्हा सोडून दिला
कार्तिक आर्यन टीनएज क्रश आहे.
कार्तिक आर्यन टीनएज क्रश आहे... तिशी पुढच्या काकवांना नाही आवडत तो... ते अजून रितिक किंवा सलमान मधेच अडकले आहेत...
आता माझ्या समोर एक नवं आव्हान
आता माझ्या समोर एक नवं आव्हान आहे.
कार्तिक आर्यन न आवडणारी 30 च्या खालची स्त्री शोधणे.
त्याशिवाय केस बांधणार नाही
Pages