Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05
आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Oh my kadvule (god)- तमिळ
Oh my kadvule (god)- तमिळ,पाहिला झीफाईववर.. दोन स्कूल फ्रेंड्स लग्न करतात पण एका वर्षात गैरसमज आणि मिसकम्युनीकेशन मुळे पटेनासे होते.एका सकाळी दोघेही डिवोर्ससाठी कोर्टात असतात संध्याकाळी चार पर्यंत असं काहीतरी घडतं कि सगळं पुन्हा जुळून येतं..रिलेशन्स,इमोशन्स वैल्युज, हलकाफुलका, फिलगुड, सिनेमा आवडला.
अशा स्टोरीज मधे हे कपल पुन्हा
अशा स्टोरीज मधे हे कपल पुन्हा काहि काळाने परत अर्ज दाखल करायला येतिल असं वाटल्यावाचून राहत नसावं
म्हणजे? नाही कळलं मला.
म्हणजे? नाही कळलं मला.
सिनेमा फैन्टसी टाईप आहे. मधल्या काळात नायकाला गॉड भेटतो आणि मना सारखं जगायला सेकंड चान्स देतो..त्याकाळात त्याला त्याचा द्रुष्टिकोण, चुका आणि खरं प्रेम याची जाणिव होते आणि शेवट गोड होतो. इतकंच!!
रिलेशन्स,इमोशन्स वैल्युज..
रिलेशन्स,इमोशन्स वैल्युज.. द्रुष्टिकोण, चुका आणि खरं प्रेम याची जाणिव .... हे सगळे तामीळ मध्ये बघून मराठी मिडीयमच्या पोरांना समजेल का?
मधल्या काळात नायकाला गॉड भेटतो आणि मना सारखं जगायला सेकंड चान्स देतो >>>> Bruce Almighty - जिम कॅरी .. वर्जिनल वर्जन - ओह गॉड तुस्सी ग्रेट हो - सल्लू भाई
हे सगळे तामीळ मध्ये बघून
हे सगळे तामीळ मध्ये बघून मराठी मिडीयमच्या पोरांना समजेल का? Happy>>>>> नाही
Bruce Almighty - जिम कॅरी .. वर्जिनल वर्जन - ओह गॉड तुस्सी ग्रेट हो - सल्लू भाई>>>>>> दोन्ही पाहिलेत..यात नायकांना गॉडची पॉवर मिळते, कडवले मधे फक्त लग्नाच्या आधीपासून आयुष्य सुरू करायचा एक चान्स मिळतो काही अटींवर. (कारण या इंम्पलसीव नायकाला लग्न हि त्याच्या आयुष्यातली एक चुक वाटत असते म्हणून )
राणा दगुबती मूळचा स्लिम फिट
राणा दगुबती मूळचा स्लिम फिट आहे
कदाचित बाहुबलित व्ही एफ एक्स आहेत
येस .. बाहुबली मध्ये vfx आहेत
येस .. बाहुबली मध्ये vfx आहेत..
Nowayout मल्याळम पाहिला काल.
Nowayout मल्याळम पाहिला काल.
एक नायक फायनान्शियल लॉसमधे, बायको माहेरी, उद्या ड्यु डेट असते..डिप्रेशन मधे नायक सुसाईड अटेम्प्ट करणार हैंग करून, सगळी जमवाजमव करतो.. लास्ट मोमेंटला मित्राचा फोन येतो, सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ड, बैंक अकाउंट मधे पैसे पण जमा झालेत म्हणून.. नायक तर हात मागे घट्ट बांधून, गळ्यात दोरी टाकून, तुटक्या टेबलावर, तुटकी खुर्ची ठेऊन चढलाय..आता त्याला नाही मरायचंय पण पुरता अडकून बसलाय..आता?? तो वाचणार कि नाही?? कसा वाचणार??..
सिनेमा फारच डिप्रेसिंग वाटला..
गेले काही दिवस आमच्याकडे Sing
गेले काही दिवस आमच्याकडे Sing 2 ची पारायणे चालू आहेत.. माझ्या दोन्ही लेकींसकट मलाही हा फार आवडला .. सगळीच गाणी अप्रतिम आहेत, सगळ्यात जास्त कोणतं गाणं आवडलं हे सांगता येणं कठीण .. Sing चा पहिला पार्ट नसेल बघितला तरी हा बघू शकता .. मुलांना आणि मोठ्यांनाही नक्की आवडेल
एक नायक फायनान्शियल लॉसमधे,
एक नायक फायनान्शियल लॉसमधे, बायको माहेरी, उद्या ड्यु डेट असते..डिप्रेशन मधे नायक सुसाईड अटेम्प्ट करणार हैंग करून, सगळी जमवाजमव करतो.. लास्ट मोमेंटला मित्राचा फोन येतो, सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ड, बैंक अकाउंट मधे पैसे पण जमा झालेत म्हणून.. नायक तर हात मागे घट्ट बांधून, गळ्यात दोरी टाकून, तुटक्या टेबलावर, तुटकी खुर्ची ठेऊन चढलाय..आता त्याला नाही मरायचंय पण पुरता अडकून बसलाय..आता?? तो वाचणार कि नाही?? कसा वाचणार??..
सिनेमा फारच डिप्रेसिंग वाटला..>> हे मल्लु लोकांची लफडी फार असतात. मेला का मग तो. काय उगीच ग्लोरिफिकेशन.
लास्ट मोमेंटला मित्राचा फोन
लास्ट मोमेंटला मित्राचा फोन येतो,
नायक तर हात मागे घट्ट बांधून,
>>>>
फोन कसा रिसीव्ह करताना दाखवलेय?
येस .. बाहुबली मध्ये vfx आहेत
येस .. बाहुबली मध्ये vfx आहेत.. >>> हो, असेलच. प्रभासही त्यात जसा दिसला तसा त्याच्या दुसर्या कुठल्या सिनेमात दिसत नाही.
फोन कसा रिसीव्ह करताना
फोन कसा रिसीव्ह करताना दाखवलेय?>>>>> अलेक्झाला सांगितले.
मल्लु लोकांची लफडी फार असतात. मेला का मग तो. काय उगीच ग्लोरिफिकेशन.>>>>>> नाही.. वाचला तो आणि मुलगी झाली त्याला.
मल्याळम वाले कोणकोणत्या विषयावर सिनेमे काढतील काही सांगता येत नाही पण चांगले असतात खरं सिनेमे. फाफटपसारा नसतो, कटेंटवर भर असतो..कमीत कमी कैरेक्टर्स घेऊन पण प्रभावी सिनेमे असतात.
अलेक्झाला सांगितले. >>> अच्छा
अलेक्झाला सांगितले. >>> अच्छा. धन्यवाद
अलेक्झाला सांगितले.>> मग काय
अलेक्झाला सांगितले.>> मग काय फार तोट्यात नसणार. घरी अलेक्षा आहे नेट आहे मोबाईल आहे तर. अपर कास्ट असणार.
पोलिटिकली करेक्ट मुलगी झाली. हे असले जीवनाचे
नकली संघ र्श जरा पेटि बुर्झ्वा वाटतात नै. त्या कम्युनिस्ट राज्यात.
ऑफुल अँड ऑसम पॉड्कास्ट मध्ये रेकमेंड केलेले एं ड्रॉइड कुंजप्पन व होम बघितले होते. कुंजप्पन मध्ये त्या हिरोची गफ्रे उगीचच वी मल्लुज अस मल्लुज करत अस्ते ते फार बोअर झाले.
राणा दुगुबाटीला कसलातरी
राणा दुगुबाटीला कसलातरी किडनीचा आजार आहे. हे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते.
https://www.hindustantimes.com/entertainment/bollywood/rana-daggubati-on-battling-heart-problems-and-kidney-failure-my-films-taught-me-to-overcome-the-problems-101616498807819.html
@ blackcat.....स्लिम फिट असणं
@ blackcat.....स्लिम फिट असणं वेगळं...तो हडकलेला दिसतो...बोलताना गळ्याच्या नसा उठून दिसतात..
ये जवानी है दिवानी बघितला.
ये जवानी है दिवानी बघितला.
त्याच्या वडिलांची शेवटची इच्छा बनीने त्याच्या स्वप्नांचा पाठपुरावा करणे ही होती. मग हे कळल्यावर सुद्धा बनीने मध्येच नयनाकडे जाऊन आपली स्वप्ने बॅकफुटला टाकणे यातले लॉजिक कळले नाही.
बनी एवढी नयनाची कोणतीही ठाम स्वप्न नव्हती. मग अशावेळी तिने त्याच्यासोबत फिरत्या आयुष्याला का नकार दिला तेही नीटसे कळले नाही. कारण जेवढा बनी त्याच्या स्वप्नांविषयी आग्रही होता त्याच्या एक टक्का सुद्धा नयना कोणत्याही विशिष्ट स्वप्नासाठी पॅशनेट दिसली नाही.
मधल्या काळात नायकाला गॉड
मधल्या काळात नायकाला गॉड भेटतो आणि मना सारखं जगायला सेकंड चान्स देतो >>>> Bruce Almighty - जिम कॅरी .. वर्जिनल वर्जन - ओह गॉड तुस्सी ग्रेट हो - सल्लू भाई
>>
आणि मराठी वर्जन : अरे देवा - मकरंद अनासपुरे
फायनली आज चंद्रमुखी संपला
फायनली आज चंद्रमुखी संपला मागच्या पाच दिवसापासून रोज थोडा थोडा बघून..
मला कास्टिंग मिसमैच वाटले नाही.. तमाशावाल्या स्त्रीया झीरो फिगर नसाव्यात बहुतेक त्यामुळे अम्रुता खानविलकर थोराड वगैरे नाही वाटली..mrunmayi चा अभिनय छान आहे...
नयनाकडे जाऊन आपली स्वप्ने
नयनाकडे जाऊन आपली स्वप्ने बॅकफुटला टाकणे यातले लॉजिक कळले नाही.-- -- बनी ने आपली स्वप्न बॅकफूटला टाकली नाहीत शेवट नीट बघितला तर कळेल तो नैना ला म्हणतो" साथ मिलके सपने पुरे करेंगे".
बनी एवढी नयनाची कोणतीही ठाम स्वप्न नव्हती. मग अशावेळी तिने त्याच्यासोबत फिरत्या आयुष्याला का नकार दिला तेही नीटसे कळले नाही-- -- नैना ला माहीत होती बनी ची स्वप्न त्यामुळे तो कुठल्याही कमिटमेंट मध्ये अडकणार नाही हेही म्हणून . तसाही नैना च कॅरेक्टर अल्पसंतुष्ट आणि खूप स्वप्नाळू दाखवलय. स्वप्नाळू लोक स्वप्न पाहतात पण सगळेच त्या बद्दल पॅशनेट असतीलच असं नाही.नैनाचंही तसच असावं.
तुमचा आयडी कलकी असणे हा मस्त
तुमचा आयडी कलकी असणे हा मस्त योगायोग
लालसिंग चढ्हा ! मेलडि इज
लालसिंग चढ्हा ! मेलडि इज बैक !
Old monk कन्नड पाहिला काल
Old monk कन्नड पाहिला काल प्राईमवर.
टाईमपास आहे.हलकाफुलका, विनोदी सिनेमा.
तेलुगु चित्रपटसृष्टीत नटांना
तेलुगु चित्रपटसृष्टीत नटांना अफाट टायटल्स/विशेषणे असतात याबद्दल आपण इथे लिहीले होते. अल्लू अर्जुन "स्टाइलिश स्टार", मेगा स्टार चिरंजीवी, पॉवर स्टार पवन कल्याण ई.
एन टी रामाराव यांचे टायटल या सर्वांना फिके पाडते. "विश्व विख्यात नट सार्वभौम" म्हणे. "World famous emperor of acting" - विकीपीडिया वरून
"rocketry the nambi effect"
"rocketry the nambi effect" पहिला , आवडला ..
येस .. बाहुबली मध्ये vfx आहेत
येस .. बाहुबली मध्ये vfx आहेत.. >>> हो, असेलच. प्रभासही त्यात जसा दिसला तसा त्याच्या दुसर्या कुठल्या सिनेमात दिसत नाही.
Submitted by ऋन्मेऽऽष on 5 July, 2022 - 02:00
'साहो' मध्ये आणि नुकताच येऊन गेलेल्या 'राधे श्याम' मध्ये सुजलेला दिसतो।
येस .. बाहुबली मध्ये vfx आहेत
येस .. बाहुबली मध्ये vfx आहेत.. >>
प्रभास बहुतेक अरुण गोविल होईल
प्रभास बहुतेक अरुण गोविल होईल
रामायण झाल्यावर त्याच्या करियरने राम म्हटले , लोक दुसर्या भूमिकेत स्वीकारेनात , काम मिळेना. जुने कलाकार उदा दारासिंग , पुनीत इसार सोडले तर रामायण महाभारत कलाकारांच्या करियरचे नंतर वाटोळे झाले आहे.
( हिंदू संदर्भ वापरला म्हणून लोक रडत येतील आता)
आता तो भीष्माचार्य 100 कोटी लोग इकठ्ठे हो जावो करत नाचत आहे. व्हाट्सपवर एकाने व्हिडीओ पाठवला होता, मी म्हटले 300 कोटी घालून शक्तिमान काढणार आहे तो म्हणून नाचत आहे. तू जा 2 तिकीट काढून बघायला!! काश्मीर फाईल्सच्यावेळी 2 तिकीट काढा म्हणून नाचत होतास , आता असे हिंदी मराठी ऐतिहासिक इ 50 सिनेमे येत आहेत.
हाही गडगडेल बहुतेक.
पोरांना शिंचान , डोरेमान वगैरे बघून बघून हे कितपत आवडेल कल्पना नाही
अरुण गोविल किंवा महाभारत /
अरुण गोविल किंवा महाभारत / रामायण मालिके मधले इतर कलाकार यांची प्रभास शी तुलना करणेच चुकीचे आहे.
अनलाइक गोविल कंपनी, प्रभास इतर तेलगू अभिनेत्यांप्रमाणेच भरपूर फॅमिली बँकिंग घेऊन आलेला नट आहे.
त्याचा बाप मोठा प्रोड्युसर, आणि काका मोठा अभिनेता (मग राजकारणी अगदी केंद्र सरकारात राज्य मन्त्री पद असणारा). घरचीच प्रोडक्शन कंपनी आहे.
सो कितीही सिनेमे पडले तरी काम मिळतच राहील.
Pages