चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारएण्ड - एन टी रामाराव यांना मॅटिनी आयडॉल ही उपाधी होती. ते देवांच्या भूमिका जास्त करायचे.

हो. आणि NTR चा मेन प्रतिस्पर्धी म्हणजे सुपरस्टार कृष्णा, महेश बाबू चा बाप.

साऊथचे त्या काळचे सर्वात भारी सुपरस्टार म्हणजे जेमिनी गणेशन.
कारण त्यांनी चक्क रेखाला जन्म दिला. हिलाकुं रख दिया.

साऊथचे त्या काळचे सर्वात भारी सुपरस्टार म्हणजे जेमिनी गणेशन.
कारण त्यांनी चक्क रेखाला जन्म दिला. हिलाकुं रख दिया. >> आता कुठल्याही पुरुषाने एखाद्या मुलीला जन्म दिला तर हिलाकुं रख देणारच ना हो. Lol

“ आता कुठल्याही पुरुषाने एखाद्या मुलीला जन्म दिला तर हिलाकुं रख देणारच ना हो” Lol

इथे रनवे ३४ बद्दल लिहिलं गेलंय का? काल एक तास पाहिला. इतक्या ढोबळ चूका जाणवतात कि पुढे बघावा का ह्या संभ्रमात आहे. कास्टींगमधे अमिताभ आणि बोमन इराणीचं नाव असल्यामुळे थोडा बघेन.

मी पण रनवे काल थोडा वेळ बघितला.. कंटाळा आला म्हणून सोडून दिला..sully सारखं काहीतरी बनवायचा प्रयत्न होता बहुतेक

नेटफ्लिक्स वर ऑपरेशन रोमिओ बघितला. शरद केळकर, किशोर कदम नावं बघून सुरू केला पाहायला. टाईमपास आहे. बराच संथ पण आहे मधेमधे, मी बर्‍याच ठिकाणी पुढे ढकलला. पण शरद केळकर साठी बघावाच लागला Happy लैच आवडतो मला. निराश नाही केलं त्याने. त्याचा रोल मस्त झालाय, किशोर कदम ने पण लहान भूमिकेत चांगलं काम केलंय.
हिरो अगदीच बंडल कोण आहे माहित पण नाही , हिरवीन पण नविन. भुमिका चावला पण आहे छोट्या रोलमधे.
हा हिरो हिरवीन कपल डेट नाईटला जातात, टाईमपास करत रात्र कार मधे घालवायचा विचार असतो पण त्यांच्या प्लान सगळा चौपट होतो. शरद केळकर किशोर कदम मुळे. तो कसा ती ही स्टोरी.

रन-वे ३४ बघीतला प्राइमवर. ठीक आहे. बर्याच गोष्टी ढापल्यात. उदा. तो ATC Controller ब्रेकिंग बॅड मधल्या जेसीच्या ड्रगिस्ट गर्लफ्रेंडच्या बापासारखा आहे. सलीवरुन पण थोडा प्रेरित आहे.
न आवडलेल्या गोष्टी - बच्चनचा अभिनय उगीचच आक्रस्ताळेपणा करतो. आता बच्चन बोअर करतो.
तपासकाम खुपच थिल्लरपणे दाखवले आहे. सलीवरुन जरा व्यवस्थित तरी ढापायचे. Happy
गंमत म्हणजे दुबईहुन कोचिनला जाण्यार्या विमानात एकही मल्लु नाही Happy

Submitted by mandard on 27 June, 2022 - 08:47

“गंमत म्हणजे दुबईहुन कोचिनला जाण्यार्या विमानात एकही मल्लु नाही” - येस्स! हे अगदी ठळकपणे जाणवतं. किंबहूना त्या त्रिवेंद्रमच्या एटीसीत कॅमेरा आल्यावर पहिला मल्लू अ‍ॅक्सेंट ऐकलाय. बाकी विमानाची सिटींग अरेंजमेंट, पीए सिस्टीम न वापरता बोलले गेलेले इमोशनल संवाद अगदी शेवटच्या रांगेतल्या प्रवाश्यांना ऐकू जाणं, विमानाच्या आतली ३ बाय ३ सिटींग अरेंजमेंट, विमानाला कॉल-साईन नसणे (नुसतंच एअरलाईन चं नाव आणि मॉडेल नंबर), अजय देवगणचा फुकाचा अ‍ॅटीट्यूड अशा अनेक चमत्कारिक कलाकृतींनी पहिला हाफ भरलेला आहे.

रन वे ३४ बघायला हरकत नाही एकदा
अमिताभचा तोच तोच अभिनय आहे खरे, पण अजय देवगणलाही हे लागू होते. तरी चालतात दोघे. आपापल्या रोलला सूट आहेत.
दोघेही अ‍ॅटीट्यूड राखणारे दाखवलेत. तरीही आमनेसामने येतात तेव्हा दोघांची जुगलबंदी अशी फार दाखवली नाही. पण ते ही ठिक आहे एका अर्थी, पिक्चरचा फोकस तिथेच गेला असता.

अमिताभच्या एंट्रीला तो किती भारी आहे दाखवायला त्याचे जे कोडकौतुक चालते तेव्हा चाचा चौधरी का दिमाग कम्प्युटर से भी तेज है आठवले.
अर्थात अजय देवगणची मेमरी सुद्धा फुल्ल शकुंतला देवी दाखवली आहे.

तरीही फर्स्ट हाफमधील अ‍ॅक्शन पेक्षा मला सेकंड हाफचा कोर्ट ड्रामा चांगला वाटला.
चुका खूप असाव्यात असे वाटते. लॉजिक शोधणार्‍या पब्लिकने चित्रपटाच्या वाटेला न जाणे उत्तम.
पण ज्यांना साधारणपणे अमिताभ आणि अजय देवगण आवडत असतील तर वाटेला जायला हरकत नाही.

ता.क. - अजय देवगण सोबतची पायलट मुलगी तापसी पन्नू हवी होती असे वाटले. पर्सनल चॉईस.

पायलटच्या आयुष्याबद्दल बरेच नवनवीन गोष्टी समजल्या. अर्थात त्या चुकीच्याही असू शकतात. हल्ली कोण फारसा अभ्यास करून चित्रपट बनवते. मी जसे मायबोलीवर धागे काढतो तसे चित्रपट निघतात, चार दिवस थिएटर आणि मग ओटीटीवर झळकतात असे वाटते.

मृणाल देव तरूण असताना धडाधड ऐतिहासिक सिनेमे काढले असते तर बरं झालं असतं >>> Lol

(शांत प्राणी यांच्या या कॉमेण्टवरची पोस्ट. तेथे अवांतर होईल म्हणून इथे)

हो सर्व थोर पुरूषांची बायको किंवा आई म्हणून सीन्स शूट करून घ्यायला हवे होते. आता वापरता आले असते.

तिच्या कारकीर्दीचा ग्राफ काढायला हवा कोणीतरी. रॉ डेटा देतोयः शतक-वाइज भूमिकांची संख्या

१७ वे शतकः १००
१८ वे शतकः १००
१९ वे शतकः १००
२० वे शतकः ०
२१ वे शतकः १

तो "१" म्हणजे राजवाडे अ‍ॅण्ड सन्स. त्यात तिला मुंबईला कसे जायचे माहीत नसते. कसे असणार. तिला रायगड किल्ला माहीत. जिल्हा नाही. कल्याण म्हंटले तर दरवाजा किंवा सुभेदाराची सून फक्त माहीत.

"१" म्हणजे राजवाडे अ‍ॅण्ड सन्स. त्यात तिला मुंबईला कसे जायचे माहीत नसते. कसे असणार. तिला रायगड किल्ला माहीत. जिल्हा नाही. कल्याण म्हंटले तर दरवाजा किंवा सुभेदाराची सून फक्त माहीत. Lol

Lol

सध्या 83 बघतेय. रणवीर सिंग नाहीच आहे त्यात.
एक आवाज सोडला तर फार आवडला तो.
ड्रामा आहे पण तेवढा तर हवाच.

तो "१" म्हणजे राजवाडे अ‍ॅण्ड सन्स. त्यात तिला मुंबईला कसे जायचे माहीत नसते. कसे असणार. तिला रायगड किल्ला माहीत. जिल्हा नाही. कल्याण म्हंटले तर दरवाजा किंवा सुभेदाराची सून फक्त माहीत. >>>>> Happy .
तिचा एक तो " &" की काहीतरी एक होता. शिवानी रांगोळेचा पहिला चित्रपट

मृणाल कुलकर्णी ,सचिन खेडेकर आणि सुलेखा तळवलकर यांचा एक मराठी चित्रपट आहे. ज्युलिया रॉबर्ट्सचा स्टेप मॉम सिनेमा आहे, त्यावर आधारित आहे. मी सगळा नाही बघितलेला.

'तुझ्या माझ्यात' असं काहीतरी नाव आहे त्याचं. मृणाल कुलकर्णी आणि सचिन खेडेकर चा डिव्होर्स होतो. सुलेखा तळवलकर स्टेप मदर. मग कळतं की मृणाल कुलकर्णी कॅन्सर पेशंट आहे. आणि हे सचिन खेडेकर ला पण ती अर्थातच खूप उशिरा सांगते वगैरे..

हो. वावे तसाच एक हिंदी सिनेमा सुद्धा आहे, काजोल-करिना-अर्जुन रामपाल चा.

रनवे ३४ बघताना फ्लाईट सिनेमा इतका आठवायला लागला कि तो बंद करून पुन्हा फ्लाईट बघितला.

आज घरातले सगळे जुरासिक वर्ल्ड पाहून आले. ओटीटीवर आल्यावर पाहण्याचा माझा निर्णय साफ चुकीचा आहे असे सर्वांचे ठाम मत झाले आहे. आर आर आर मधला चपटा होणारा वाघ आणि ज्युरासिकच्या कोणत्याही भागात कधीही फुसके न दिसलेले डायनोसॉर्स हा फरक ठळक आहे. बाकी वेग पडल्यानंतर स्केरी सॉन्स, थरार, जीवघेणे पाठलाग हा फॉर्म्युला पाठ असल्याने टाळले.

“ तो "१" म्हणजे राजवाडे अ‍ॅण्ड सन्स. त्यात तिला मुंबईला कसे जायचे माहीत नसते. कसे असणार. तिला रायगड किल्ला माहीत. जिल्हा नाही. कल्याण म्हंटले तर दरवाजा किंवा सुभेदाराची सून फक्त माहीत” - Lol

रनवे ३४ संपवला. हीरोज ची हीरोगिरी, बायकांचं छान छान दिसणं ह्याच हिंदी सिनेमाच्या सीमा आहेत असं वाटायला लावणारा आणखी एक सिनेमा. इतका खर्च करतात तर त्यातला थोडा कथेच्या बांधणीवर केला तर नक्की काय फरक पडेल कुणास ठाऊक!

>>नेटफ्लिक्स वर ऑपरेशन रोमिओ बघितला. <<
चांगला आहे. शेवटचा सीन तर अगदि ब्रिल्यंट. इंडियन मेल शोविनिझमला दाखवलेली मिडल फिंगर अगदि अ‍ॅप्ट...

अरुण गोविल किंवा महाभारत / रामायण मालिके मधले इतर कलाकार << नंतर काम न मिळुन ह्यांना काही फरक पडला नसावा. रामायण केले नसते तर ५/१० चित्रपटांमधे करीयर संपले असते त्यांचे नाहीतर..
ऑपरेशन रोमिओ <<ठिक होता शरद केळकर मुळे बघायला छान वाटला.
मेजर मुव्ही आवडला. संदीप उन्नीक्रिशन् न च्या लाईफ वर आहे नोव्ह, २००८ च्या मुंबई अटॅक वर

रॉकेटरी पाहिला. खूप आवडला.
माधवन ने भूमिकेसाठी बरंच वजन वाढवलं असावं.
शेवटच्या 10 मिनिटातला ट्विस्ट आवडला.बरेच लोक डोळे पुसत टाळ्या वाजवत होते.

लव्ह अँड शुक्ला नावाचा चित्रपट नेफिवर बघितला. अतिशय संथ आणि रटाळ. फक्त बेरोजगार मधला पापड्या दिसला एका छोट्या भूमिकेत हा सुखद धक्का. यातला मेन हिरो नंतर is love enough sir मध्ये ड्राइवरच्या भूमिकेत दिसला. Is love enough Sir आवडला. हाही संथ आहे पण अजिबात कंटाळा येत नाही. कुठेही निराशा नाही. शेवटही आशादायक आहे.
मोतीचूर चकनाचूर आवडला. अथिया सुंदर वाटली नाही पण नवाझपुढे कुणीही सुंदर दिसेल. भाषा नीट समजत नव्हती म्हणून सबटायटल बघावे लागत होते.
तुलसीदास मस्त वाटला एकदम हलका फुलका.

सुब्रमण्यपुरम गावातील एक पुरातन बंद रहस्यमय मंदिर.जो कुणी मंदिराबद्दल माहिती काढायचा किंवा रहस्य उलगडायचा प्रयत्न करतो तो सर्पदंशाने मरतो.
नायक एक मेडिकल स्टुडंट, मेडिकल कैम्पसाठी त्याच गावात जातो आणि मंदिराचे रहस्य उलगडतो..साप त्याला पण मारायला येतो बरं का पण नायक एकदम अलर्ट असतो नेहमी त्यामुळे त्याला काही होत नाही.
चांगलाय सिनेमा karthikeya तेलुगु ,प्राईमवर.

मोतीचूर चकणाचूर मस्त आहे. मी तर दोन तीनदा बघितलाय. ती दोन्ही घरं, अथियाची मावशी , आई ,नवाजची आई व भाऊ, दोन्ही कुटूंब , या घरातून त्या घरातली पळापळ , इंदौर/भोपाळ फार आवडलं . धमाल आहे.
कार्तिकेय बघेन मृ , आवडेल असं वाटतंय.

नेटफ्लिक्स वर Get Smart (Anne Hathaway, Steve Carell, Dwayne Johnson) आणि The man from Toronto (Kevin Hart) बघितला , Action comedy आहेत, धमाल आहेत. The man from Toronto मधे बरीच हिंसक दृष्यं आहेत, यात छोट्याशा भूमिकेत बिग बँगची पेन्नी आहे.

जर्सी स्लो वाटला.

प्राईम वर भरपूर नवीन कंटेट आहे पण बघण्यासारखा दिसत नाही. नेटफ्लिक्स छान आहे.
महिनाअखेरीस प्राईम संपले कि पुन्हा रिन्यू नाही करणार लवकर.

अरे बापरे प्राइम वर एक डॉट कॉम मॉम नावाचा भयान क सिनेमा आहे. एक टकल्या मुलगा मिलीनेर होतो वत्याची खेडेगावची आईला तिकीट पाठवून बोलावून घेतो. एक लगेच गणपतीचे गाणे आहे. मुलगा मिल्नेर झाला म्हणू आभार्स टाईप . आता ह्या खेड वळ बाईची सून आगावु श्रीमंत असणे आवश्यक आहे. ती घरी गेल्या गेल्या हाताने जेवते, टेबलावर खरकटा हात ठेवुन उठते. सकाळी दार उघडते व अलार्म वाजतो पोलिस येतात. मग सुपर्मार्केट मध्ये गेल्यावर भाजी तोडून खाते व कचरा खाली फेकते इथपरेन्त बघितला व बंद केला. ज्येना व्हिजिट वैताग इज अ‍ॅन इमोशन मला तर पंधरा मिनिटात स्ट्रेस आला. ती बाई फारच विचित्र दिसते. त्यापेक्षा वेकणा परवडला.

थॉर लव्ह एंड थंडर बघितला. थॉर छान दिसतो. व लहान मुलांचा सिनेमा आहे बाकी. अगदी लहान पोरे घाबरतील. १२ - १३ ठीक आहे.

एखादा चित्रपट आवडला असे सांगितल्याबरोबर धावत पळत येऊन दहा मिनिटात बंद केला किंवा नाही आवडला म्हटले तर लगेच पुढच्याच कमेण्टीत याच्यासारखा सुंदर चित्रपट नाही, का नाही आवडला असे प्रतिसाद देणार्‍या क्युट पब्लीकला दहा हजार एकरची जहागिरी जाहीर करण्याचा खूप मोह होतो, पण आवरावा लागतोय. एक तर आपण पाईप मधे राहतो .. पण फूल ना फूलाबाईं ची पोफळी म्हणून काही तरी द्यावेच लागेल.

Pages