४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वर मार्जोरि ग्रीन ह्यांनी काय म्हंटले आहे ते वाचले ना? हे सर्व डेमोक्रॅटच करताहेत. कारण त्यांना आमच्या गन्स हिसकाऊन घ्यायच्या आहेत!!
शिवाय आज टकर नि हॅनिटी काय म्हणतात - ही बायडेनचीच चूक कशी आहे हे ते सिद्ध करतील मग शेंडेनक्षत्र आपल्याला सांगतील. कारण फॉक्स न्यूज फेअर नि बॅलन्सड आहे, खरे आहे की खोटे, लॉजिकल की नाही याच्याशी त्यांचा संबंध नाही. त्यामुळे त्यान्नी धादांत जरी खोटे सांगितले तरी ते जबाबदार नाहीत!!!
खरे तर बायडेन राष्ट्राध्यक्ष नि काँग्रेस मधे डेमोक्रॅट आल्यावर शेंडेनक्षत्र अमेरिका सोडून जातील असे मला वाटले होते. कारण या देशाचे आता काही खरे नाही. कदाचित इथे असे लिहीले तरी व्यक्तिस्वातंत्र्य आहे - भारतात गुंड येतील घरात!!
जाऊ द्या. आता पुढच्या जानेवारीत सिनेट नि हाउस मधे रिपब्लिकन लोकांचे बहुमत झाले की आपण सगळे कायदे पास करून घेऊ. शिवाय २०२४ मधे ट्रंप आला की काय, मज्जाच मज्जा! मग तुमच्यासकट सगळ्या व्हाईट ख्रिस्चन नसलेल्या लोकांना हाकलून देणार!
अपवाद फक्त ज्यूंचा एक तर त्यांच्याजवळ भरपूर पैसे आहेत, नि ज्यूंच्या विरुद्धा बोलायला xxx मधे दम लागतो! आणि इथे तर पायात बोन स्पर
होऊन बसले आहे, अगदी व्हाईट ख्रिस्चन अमेरिका करू. भलेहि सगळ्या टेक्निकल कम्पन्या परदेशात जाऊ देत. आपण अबॉर्शन बंद, बायका घरात, मेक्सिकन लोकांना गुलाम म्हणून ठेवून घेऊ. आणि सगळे वेल्फेअर, मेडीकेअर सोशल सेक्यूरिटी बंद करून टाकू - मेले तर मेले लोक!!

शेंडेनक्षत्र, तुम्ही असे करा - सर्व रिपब्लिकनांसाठी भरपूर पैसे गोळा करा - विशेषतः ट्रंपला द्या. राष्ट्राध्यक्ष झाल्याने त्याचे बरेचसे नुकसान झाले आहे, शिवाय सगळे लोक त्याच्या विरुद्ध खटला भरायला निघाले आहेत तर त्याचाहि खर्च आहेच. तर भरपूर पैसे द्या.

कारण माझे असे आहे की डेमोक्रॅटची मते पटली तर मी त्यांना पैसे देतो म्हणून बोलतो. पैशाचा प्रश्न आहे. फुक्कटचे मिळते म्हणून टकर हॅनिटी ग्रीन, बोबर्ट कॉथॉर्न ट्रंप यांचे ऐकून उगीच काहीच्या बाही खरडत बसत नाही!! मुख्य म्हणजे मी मागे लिहिल्याप्रमाणे राजकाकरणावर चर्चा म्हणजे निव्वळ मूर्खपणाचा टाईमपास आहे, नि मला तर काय वेळच वेळ, म्हणून असले काहीतरी लिहितो. शिवाय मी मूर्खपणा केला तर कुणाला आश्चर्य वाटायला नको!!

एकदम अ‍ॅप्ट पोस्ट आहे. हवं तर सेल्फ डीफेन्स साठी गन बाळगण्याचा हक्क काढून नका घेऊ पण अशा चण्या फुटाण्यासारख्या सहज अव्हेलेबल करू नका ना, विशेषतः असॉल्ट वेपन्स कुणाही सामान्य माणसाला मिळणे अशक्य अवघड असले पाहिजे. ड्रायव्हिंग लायसन्स मिळते का इतके सहज? ड्रायव्हिंग हा काही जन्मसिद्ध हक्क नाही हे लोकांना मान्य होते. मग गन रीफॉर्म्स चा बाऊ का? अर्थात हे सर्व लॉजिकल आणि कितीही नो ब्रेनर वाटले तरी गन्स आणि एनारए सपोर्टर्स येऊन काहीतरी प्रचंड ट्विस्टेड आणि निर्लज्ज थॉट मांडतात. आता म्हणतील सगळ्या टीचर्स कडे गन्स असत्या तर हे झाले नसते. हताश आणि नि:शब्द व्हायला होते आहे.

हा मेंटल हेल्थ इश्यू नाही. गन इश्यू आहे. माझा देश गन अ‍ॅडिक्ट आहे. हे त्या एए मधल्या सारखं रोज म्हणायची गरज आहे.

<<<अमेरिकन लोकांचे बंदूक प्रेम अतिशय अतर्क्य आणि टोकाचे दुराग्रही आहे.>>>
अतर्क्य नाही. घटना लिहिण्यापूर्वी जेंव्हा देश स्वतंत्र झाला नव्हता, तेंव्हा ब्रिटिशांचे वर्चस्व नकोसे झाले होते. पण ब्रिटिश सैनिक बंदुका वापरून कायद्याची अंमलबजावणी करत. त्याला उत्तर द्यायला गन बाळगण्याचा अधिकार सर्वांना दिला.

आता तशी परिस्थिती नाहीये, पण या बिनडोक रिपब्लिकनांना ते कोण समजवणार? मुळात अक्कल नाहीच इथल्या लोकांत, रिपब्लिकन काय नि डेमोक्रॅट काय,. म्हणून काहीतरी १७७६ साली लिहीलेले प्रमाण धरून नि नंतर परस्परविरोधी कायदे करून इतका घोळ घातला की आता एन आर आय सारखे स्वार्थी लोक कायदे बनवणार्‍या लोकांना पैसे चारून हवे ते कायदे करून घेतात. आणि दुसरे कुणि दुसर्‍या पक्षाला पैसे देऊन आपले काम करतात.
कायदे करणारे म्हणजे बुधवार पेठेतल्या काही बायकांसारखे. त्या बायकांना जरा तरी काही लाज, डिग्निटी असेल. इथल्या राजकारण्यांना नसते.
त्या कायद्यांमधे कधी अक्कल वापरली असेल तरी त्या कायद्याची अंमलबजावणी करणारे सुद्धा थोडेफार शहाणे असायला पाहिजेत ना?

सध्या या प्रचंड देशात सर्वत्र पसरलेल्या लोकांमधे जे अगदी विरळ वस्तीत रहातात, त्यांना गन बाळगण्याशिवाय गत्यंतरच नाही. जंगली श्वापदे (अस्वले, कोयोटी इ.) यांचा कधीहि हल्ला होऊ शकतो. शिवाय जर कुणि जीवघेणा हल्ला केला तर पोलिस येईस्तवर काय मरून जायचे? आपले आपले संरक्षण करायलाच पाहिजे. गांधीजींनी पूर्व बंगालमधल्या स्त्रियांना नि हिंदूंना सांगितले की बलात्कार, जीवघेणा हल्ला यांचा प्रतिकार करू नका. तसली अहिंसा इथे (माझ्या मते कुठेच) चालत नाही. म्हणून गन पाहिजे. आता तर कित्येक लोक म्हणतात, शाळेतल्या शिक्षकांना बंदूक वापरण्याचे शिक्षण देण्यात यावे. शिवाय शाळेभोवती सशस्त्र पोलीसांचा पहारा हवा.
असले हल्ले करणारे बहुधा मानसिक रुग्ण असतात. तसे इतरहि देशात खूप मानसिक रुग्ण असतील, पण तिथे बंदुका इतक्या स्वस्त नसल्याने असे मास शूटिंग कमी.
५० वर्षांपूर्वी ब्रिटनमधे असाच शाळेतल्या मुलांवर हल्ला झाला होता. पण तिथले सर्व पक्षांचे लोक जरा सुसंस्कृत नि शहाणे होते. त्यांनी असे काही कायदे केले की आता तिथे असले प्रकार ऐकू येत नाहीत!!
पण अमेरिका, अमेरिका!!

"When a woman is assaulted she may not stoop to think in terms of himsa or ahimsa. Her primary duty is self-protection. She is at liberty to employ every method or means that come to her mind in order to defend her honour. God has given her nails and teeth. She must use them with all her strength and, if need be, die in the effort. The man or woman who has shed all fear of death will be able not only to protect himself or herself but others also through laying down hi (or her) life -" M.K.Gandhi.

मग हे ऐकायला येत नाही फारसे. मी ऐकले ते बरेचदा.
बाकी बोलून काय फायदा? काही करणे तर शक्यच नव्हते! कारण हिंदू एकूणच एकत्र येणे कठिण.

<< गांधीजींनी पूर्व बंगालमधल्या स्त्रियांना नि हिंदूंना सांगितले की बलात्कार, जीवघेणा हल्ला यांचा प्रतिकार करू नका. तसली अहिंसा इथे (माझ्या मते कुठेच) चालत नाही. >>
-------- महात्मा गांधी यांनी असे म्हटले होते हा खोट्या प्रचाराचा भाग आहे. ते नक्की काय म्हणाले होते हे पडताळून पहाणे सहज शक्य आहे, सर्व साधने उपलब्द असतांना झक्की अजूनही खोटा प्रचार करत आहेत. खोटी विधाने करुन गांधी यांचे थोरपण काडीचेही कमी होणार नाही.

वर भरत यांनी लिहीलेले आहे. खालील लिंकवर अधिक माहिती मिळेल, help yourself, जेणेकरुन भविष्यात खोट्याला बळी पडणार नाही.
https://www.mkgandhi.org/momgandhi/chap62.htm

वरील गांधींच्या विचारांत नक्की अभिमान बाळगावा असं काही आहे का? चीड आणणारे पुरुषसत्ताक मनोवृत्तीचे विचार आहेत.

हो. ते आहे. गांधी सनातनी विचारांचे होते. स्त्रीचे शील तिच्या प्राणांपेक्षा मोलाचं असे त्यांना वाटे.
पण त्यांच्या नावावर जे खपवलंय ते निखालस खोटं आहे.

चला धागा भरकटला!
आता नेहेमीप्रमाणे गांधी सावरकर, ब्राह्मण व इतर, स्त्रिया वि.पुरुष असे सुरु होऊन लोक रिपब्लिकन डेमोक्रॅट्स ना विसरून जातील.

नाहीतरी मायबोलीवर बोंबाबोंब करून जगात काही फरक पडत नाही.

अमेरिकेत गोळीबाराचे जे प्रकार होत आहेत ते सर्व डेमोक्रॅट लोकांनी केले आहेत. स्पष्ट पुरावा आहे - जरा मार्जोरी तेलर ग्रीन काय म्हणते इकडे लक्ष द्या.
शिवाय गोळीबाराचा संबंध गन शी लावून माध्यमे उगाचच ओरडा करतात. सत्य हे आहे की लोकांच्या मानसिक प्रकृतीकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. खरा मुद्दा तो आहे. पुरावा हवा असेल तर टकर कार्ल्सन काय म्हणतो इकडे लक्ष द्या.
क्यू अनॉन, ट्रंप. माइक लिंडेल इ. लोक स्पष्टपणे सांगत असता अजूनहि २०२० ची निवडणूक बायडेन जिंकला असा खोटा प्रचार लोक करत आहेत!! आता तर डिसूझा च्या सिनेमात चक्क दाखवले आहे लोक इकडून तिकडे बॅलट्स नेत होते. कॅमेरा खोटे बोलतो का? (कॅमेरामागचा माणूस भलेहि खोटे बोलत असेल. ) असे खोटे खोटे कॅमेरात दाखवता येते का? प्रत्यक्ष पडद्यावर बघूनहि तुमची खात्री पटत नाही?

आणला धागा पूर्वपदावर!!

<< वरील गांधींच्या विचारांत नक्की अभिमान बाळगावा असं काही आहे का? चीड आणणारे पुरुषसत्ताक मनोवृत्तीचे विचार आहेत. >>
------- त्यांचे सर्वच विचार मानायला हवे असे नाही. अनेक बाबतीत कर्मठ आहेत पण त्यांच्या नावावर खोटे कशाला खपवायचे?
काय गरज आहे?

<< चला धागा भरकटला!
आता नेहेमीप्रमाणे गांधी सावरकर, ब्राह्मण व इतर, स्त्रिया वि.पुरुष असे सुरु होऊन लोक रिपब्लिकन डेमोक्रॅट्स ना विसरून जातील.
नाहीतरी मायबोलीवर बोंबाबोंब करून जगात काही फरक पडत नाही.
Submitted by नन्द्या४३ on 26 May, 2022 - 07:36 >>

------- गांधी यांनी जे म्हटलेच नव्हते ते त्यांच्या नावावर खपवण्याचा खोडसाळपणा करुन धागा भरकटवला.

अहो डिसूझाने निवडणुकांमधे मते कशी चोरली डेमोक्रॅट्सनी हे स्पष्ट दाखवले आहे त्याच्या सिनेमात. तर बायडेनच्या धाग्यावर त्याचा संदर्भ असणारच ना!
मुद्दा असा आहे की ११७ व्या कॉन्ग्रेसने याची दस्खल घ्यायला पाहिजे नि चौकशी केली पाहिजे असे मला वाटते.

स्कुल शूटिंगमध्ये पोलिसांच्या action (की inaction) बद्दल प्रश्न निर्माण झालेत. ते तासभर आत गेलेच नाहीत. Waited for more backup it seems. पण एक तास? रियली?
२१ लोक (त्यात १९ लहान मुलं) मारली गेल्यावर मग पोलीस आत गेले. Apparently they were worried
about their own safety.
काही पालक "तुम्ही आत जा नाहीतर मला गन द्या ,मी तरी जातो" म्हणत होते त्यांना जाऊ दिलं नाही. Handcuff, pepper spray वापरून पालकांना थांबवलं. आम्ही जाणार नाही, तुमची पोरं आत असली तरी तुम्हीपण जायचं नाही- असा प्रकार.

२१ लोक (त्यात १९ लहान मुलं) मारली गेल्यावर मग पोलीस आत गेले. Apparently they were worried
about their own safety.
काही पालक "तुम्ही आत जा नाहीतर मला गन द्या ,मी तरी जातो" म्हणत होते त्यांना जाऊ दिलं नाही. Handcuff, pepper spray वापरून पालकांना थांबवलं. आम्ही जाणार नाही, तुमची पोरं आत असली तरी तुम्हीपण जायचं नाही- असा प्रकार.
>>>>
हॉरिबल

काँग्रेसने कशाला दखल घ्यावी त्या दिसुझाच्या सिनेमाची ? ट्रम्पचे खंडीभर वकील आहेत की खंडीभर केस करून छटाकभर पण पुरावा न देऊ शकणारे. त्यांनी सिनेमातले जे काय पुरावे असतील ते घेऊन कोर्टात जावे.

पण कोर्टात सगळे जज डेमोक्रॅट च्या बाजूचे आहेत, ते दादच देत नाहीत! म्हणून काँग्रेस.
आता २०२२ मधे रिपब्लिकन काँग्रेस झाल्यावर सगळे उघडकीला येईल! मॅकॉनेल आणि कंपनी हिलरी, पेलोसि सगळ्यांना जेलमधे टाकेल, बायडेन नि हॅरिसला इम्पीच. की पुनः रिपब्लिकन प्रेस्डेन्त. मग ते निवडणुकीचे कायदे सरळ करतील नि डेमोक्रॅट्स ची मते फ्रॉड ठरवतील.

अहो भरत तुम्ही गांधीजींचे प्रार्थना प्रवचन भाग १ वाचले आहे का? विशेषतः पान २८-२९?
तर ज्रा ते वाचून या. मला सुद्धा जमले गूगल करून. तुम्ही तर काय सर्वज्ञ!! तुम्हालाहि जमेल!
आता तो बाबा जर एकदा एक एकदा एक असे बोलत असेल तर आपण त्यातले काय खरे समजायचे?

तुम्हाला एक खरे वाटले मला दुसरे! तुमच्यासारखे असले तर बरोबर नाहीतर सगळे चूक असे आहे का तुमचे? मग आम्ही बुवा चूक.
इथे रिपब्लिकन लोकांच्या बाजूने लिहीणारे साधारणतः अशीच वृत्ति ठेऊन लिहितात.
तर त्याची मला सवय आहे, मी काहीहि मनाला लावून घेत नाही!

नुकत्याच घडलेल्या गोळीबाराच्या घटनांवर रिपब्लिकन च्या प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणे सिनिकल व किळसवाण्या आहेत. टाळूवरचे लोणी खाणे ! शाळाना भक्कम कुलूप लावा, म्हणजे शाळेला आग लागली की मग सगळे आतच अडकणार. सर्व शिक्षकांना गन्स द्या, म्हणजे आणखी लाखो गन्स ची विक्री होणार आणी गन कंपन्यांचे उखळ पांढरे ! त्यातला काही भाग अर्थातच रिपब्लिकन्स ना मिळणार ! ट्रम्प ने तर बळी पडलेल्या मुलांची नावे वाचून दाखवली व प्रत्येक नावा नंतर एक घंटा ! Disgusting !

हार्डकोअर qanon लोकांकडून हे शूटिंगच पूर्णपणे होक्स असल्याचे बोलले जात आहे. सँडी हुकच्या वेळी उजव्यांचा अॅलेक्स जोन्स सुद्धा हेच बडबडला होता. आम्ही गुड फेथ पडलो, नाहीतर शेंडेंच्या लॉजिकने सगळे रिपब्लिकन लोक हेच मानतात म्हणलो असतो.

नुकत्याच घडलेल्या गोळीबाराच्या घटनांवर रिपब्लिकन च्या प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणे सिनिकल व किळसवाण्या आहेत. टाळूवरचे लोणी खाणे ! >>
विकु आमच्या टेक्सास मधल्या कुठल्याही फोरम वर गेलात तर बरेच पॅरेंट्स हेच म्हणत आहेत. काहींनी तर सांगितल आहे कि पुर्वी ते बंदुक घेवूनच शाळेत जायचे. तेव्हा कधी मास शुटींग झाल नव्हत अस त्यांच म्हणन. Sad आता तर बर्‍याच पालकांच्या मते टीचर लोकांना बंदुकीचे ट्रेनिंग कंपल्सरी करावे. टिचर जवळ बंदुक असती तर हे घडलेच नसते अस ह्या पालकांना वाटत.
टेक्सासात येवून आता १७ वर्षे झाली. बरीच लोक एकवेळ एखादा दिवस मीट न खाता रहातील पण बंदुक, हंटिंग ह्यांच्या रक्तात भिनलेले आहे एवढ मला कळलय. अगदी ऑफिसातले गरीब्/सज्जन कुटुंब वत्सल टिम मेंबर्स बंदुक्/अ‍ॅबोर्शन वर फेबु वर जे शेअर करतात ते बघुन आपण ह्यांच्याबरोबर काम करतो ? असा प्रश्न रोज पडतो.

मग नेकी और पूछपूछ! अजुन कुठल्याच रेड स्टेटने शिक्षकांना बंदुक कंपलसरीचा फतवा का बरं नाही काढलाय? होऊद्या धूमशान! तसंही डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन स्टेटचा मामला असतो. मग नक्की अडलंय कुठे?

Pages