Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04
४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण
संबंध प्रोटेक्टेड होते की
संबंध प्रोटेक्टेड होते की नव्हते, परस्पर संमती होती की नव्हती हे कसं सिद्ध करतात? म्हणजे समजा कॉन्डोमला भोक होतं - तर कॉन्डोम कंपनीकडे चाइल्ड सपोर्ट मागायचा का?
परस्परसंमतीने झालेल्या संबंधांनंतरच्या काही महिन्यांत वर असामीने लिहिल्यानुसार परिस्थिती बदलली तर?
आणि अगदी ते जोडपं बेजबाबदार होतं असं ठरलं तरी त्याची शिक्षा फक्त स्त्रीला आणि त्या मुलालाच का?
एक मूल नऊ महिने उदरात आणि नंतर सक्षम होईपर्यंत वाढवणं ही केवढी मोठी कमिटमेन्ट आहे!
अनिच्छेने जन्माला घातलेल्या मुलाची हेळसांड झाली आणि त्याचा परिपाक म्हणून ते मूल गुन्हेगारीकडे वळले, त्याने शेंड्यांची गाडी फोडली, की मग?
(हे सगळे वर आलेलेच मुद्दे आहेत, पण शेंडे एकच एक पोस्ट टाकत राहतात तर मी का नको?!)
आणि यात लोक ३-४ महिने फार
आणि यात लोक ३-४ महिने फार विचार न करता नंतर कॅज्युअली अॅबॉर्शन करतात हे फार मोठे गृहितक आहे. याबद्दल डेटा आहे का कोठे? ज्यांना मूल नको असेल ते शक्य असेल तेव्हा खूप आधीच करत असतील. या मुळातच अपवादात्मक केसेस आहेत. ज्यांनी ३-४ महिन्यांपर्यंत निर्णय घेतलेला नाही अशा स्त्रिया इतक्या सहजपणे नंतर तो निर्णय घेतील असे वाटत नाही. तितके compelling कारण असल्याशिवाय. आणि अशा स्त्रियांना जबरदस्तीने मूल जन्माला घालणे भाग पाडले, तर त्या बाळाची पुढे हेळसांड होण्याचीच शक्यता जास्त आहे.
त्यामुळे सरकारने यात पडू नये असेच माझेही मत आहे. काल काढलेले सगळे मुद्दे हे यात काही स्पेसिफिक केसेस मधे अपवाद असतात का/असावेत का याबद्दल होते. त्यातले सगळे मुद्दे मला पटलेत असे नाही. पण विचार करण्यासारखे आहेत.
बाकी अंमलबजावणीतील
बाकी अंमलबजावणीतील प्रॉब्लेम्स आहेतच. विकु व स्वाती ने लिहीले आहेत वरती. एकतर ज्यांना शक्य आहे ते लोक बाजूच्या राज्यात जाउन करतील. किंवा इल्लिगली करतील - जेथे त्या स्त्रीच्या जीवालाही धोका असू शकतो. त्याला आळा घालायला मग अजून draconian कायदे आणावे लागतील. पैसे व कनेक्शनवाले यातून मार्ग काढतील- ज्यांच्या नोकर्या फ्लेक्झिबल आहेत ते सरळ घर बदलून दुसर्या राज्यात जातील. राहतील ते बहुतांश गरीब लोक.
हा सगळा उद्योग नक्की कशाकरता - काहीही कारण नसताना अॅबॉर्शन्स केली जाण्याबद्दल काही डेटा आहे का?
<<< हे सगळे वर आलेलेच मुद्दे
<<< हे सगळे वर आलेलेच मुद्दे आहेत, पण शेंडे एकच एक पोस्ट टाकत राहतात तर मी का नको?>>>
तेच तेच परत परत लिहून खोटी गोष्ट सुद्धा काही लोकांना पटू लागते. हे प्रचार करणार्यांना माहित असते.
शिवाय प्रत्यक्ष वाद घालण्यापेक्षा आपलेच मत परत परत सांगायचे! हे सोपे असते.
अहो, ट्रंप हरला असे सर्व बाजूनी सिद्ध झाले, निवडणुकांत काहीहि गडबड नाही असे सिद्ध झाले तरी आपले बोलत रहायचे - निवडणूका मधे गडबड होती!!!!!
वर अमितव ने सांगितले आहे, काही लोक कसे एकच उदाहरण घेऊन वाट्टेल ते खरे मनतात. कारण statistics च काय, साधे गणीतहि येत नाही काही लोकांना. पण मोठमोठ्याने बोंबा मारायला जमते!
गर्भपात म्हणजे स्त्री ला आपण
गर्भपात म्हणजे स्त्री ला आपण स्वतंत्र आहोत, आपले शरीर हे केवळ आपले आहे हे सिद्ध करण्याचा एक सर्वमान्य मार्ग अशीच मांडणी होत असेल तर गर्भपात ही अपवादात्मक आणि अपरिहार्य घटना राहील का? गर्भपाताचे उदात्तीकरण होत आहे आणि ते गैर आहे.
मी एक बंडखोर स्त्री आहे आणि मी धर्म, परंपरा ह्यांचे बंधन झुगारून देते आणि ते सिध्द करण्यासाठी मी निदान एक तरी गर्भपात करूनच दाखवते असेही काही नमुने असतील. Planned Parenthood वगैरे वर शोधून त्याची आकडेवारी दिली पाहिजे.
जर स्त्रीला शरीरावर हक्क असेल तर जन्माला येणाऱ्या जीवाला स्वतः: च्या जीवनाचा हक्क असता कामा नये का? निदान त्या बालकाच्या हृदयाचे ठोके, लिंग (वोक अर्थाने नाही जीवशास्त्रीय), विविध अवयव बनल्यावर ही स्त्री स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून ह्या मानवी जीवाला क्रूर प्रकारे ठार मारणे कितपत नैतिक आहे?
जर जीवशास्त्रीय नियमाप्रमाणे स्त्रीला गर्भाशय, अन्य अवयव आणि रचना , बालकाला अंगात बाळगण्याची क्षमता वगैरे दिल्या असतील तर त्यावर त्रागा करून काय होणार? विज्ञान पुढे गेले आणि ही क्षमता विभागून दोघांना देता आली तर हरकत नाही पण तोपर्यंत जे आहे ते स्वीकारणे भाग आहे.
स्त्री स्त्री आहे हा काही पुरुषाचा दोष म्हणता येत नाही. निसर्गाचा म्हणता येईल.
इथे बऱ्याच जणांना "सेफ हेवन
इथे बऱ्याच जणांना "सेफ हेवन लॉ" बद्दल माहिती नाही असं दिसतंय.
बाळाचे हृदयाचे ठोके सुरू झाले की तो एक सजीव होतो, असा साधारण समज आहे. स्कॉट पीटरसनला म्हणूनच बायको आणि "न जन्मलेल्या मुलाच्या" खुनाबद्दल देहांताची शिक्षा दिली होती, ती पण कॅलिफोर्नियासारख्या उदारमतवादी राज्यात. यातच सर्वकाही आले.
>इथे बऱ्याच जणांना "सेफ हेवन
>इथे बऱ्याच जणांना "सेफ हेवन लॉ" बद्दल माहिती नाही असं दिसतंय.
Condescending ! बहुतेक सर्वांना माहीत असेल.
> मी एक बंडखोर स्त्री आहे आणि मी धर्म, परंपरा ह्यांचे बंधन झुगारून देते आणि ते सिध्द करण्यासाठी मी निदान एक तरी गर्भपात करूनच दाखवते असेही काही नमुने असतील.
हास्यास्पद ! पण तरीही Par for the course !
भारतातही ३७७ रद्द झाल्यावर लोक कूल दिसण्यासाठी गे संबंध ठेवतील, असे तारे तोडले गेले होते.
जर जीवशास्त्रीय नियमाप्रमाणे
जर जीवशास्त्रीय नियमाप्रमाणे स्त्रीला गर्भाशय, अन्य अवयव आणि रचना , बालकाला अंगात बाळगण्याची क्षमता वगैरे दिल्या असतील तर त्यावर त्रागा करून काय होणार? विज्ञान पुढे गेले आणि ही क्षमता विभागून दोघांना देता आली तर हरकत नाही पण तोपर्यंत जे आहे ते स्वीकारणे भाग आहे.
स्त्री स्त्री आहे हा काही पुरुषाचा दोष म्हणता येत नाही. निसर्गाचा म्हणता येईल. >> *हताश*
फॉस्टर केअर वगैरे ठीक आहे पण
फॉस्टर केअर वगैरे ठीक आहे पण बर्याच केसेसमध्ये फॉस्टकेअर होम्स मधून मूल फिरत रहाते, चाईल्ड अॅब्युझ होतात, मूल गुन्हेगार बनते. आयुष्य विषारी होते त्याचे. (स्टॅटिस्टिक्स मी शोधलेले नाही.)
शेन्डे आणि तत्सम लोक इतके
शेन्डे आणि तत्सम लोक इतके टोकाचे अडाणी आहेत की टोकाचे स्त्रीद्वेष्टे आहेत हे ठरवता येत नाहीये!!
केवळ हक्क सिद्ध करण्याकरता स्त्रिया अबॉर्शन करर्तील ? परंपरा झुगारण्याकरता? पॉइन्ट प्रूव करण्याकरता ? शेन्डेप्रभृती/ ट्रम्पला खिजवण्याकरता ? इतक्या फालतू कारणांसाठी स्त्रिया गर्भपातासारख्या प्रोसिजर मधून जातील असे सिरियसली वाटते या लोकांना ????
अहो सिरियस मेडिकल प्रोसिजर आहे ती. फुल अनास्थेशिया द्यावा लागतो. योनीमार्गे गर्भाशयात कसली कसली उपकरणे घातली जातात. अगदी तेवढे महत्त्वाचे, आयुष्य बदलण्याइतके महत्त्वाचे कारण असल्याशिवाय का कुणी बाई त्यातून जायला तयार होईल?
तो हार्टबीट चा मुद्दा केवळ इमोशनल फूल्स ना ब्लॅकमेल करण्याकरता वापरला जाणारे रिपब्लिकन म्हातार्यांचे आवडते शस्त्र आहे. माहिती काही नसते, ती घ्यायची इच्छा, तेवढा ओपन माइंडेडनेस नसतो, आणि वर खून , हत्या वगैरे शब्द वापरून भुई धोपटत बसायचे.
मेडिकली पहिल्या काही आठवड्यात गर्भाचे ठोके सुरु झाले तरीही गर्भाशयाबाहेर जिवंत राहण्याची शक्यता नसलेल्या गर्भाला "viable fetus" समजले जात नाही. म्हणजे त्याला बालक, व्यक्ती वगैरे समजले जात नाही. त्याला फक्त " भविष्यात बालक जन्माला येण्याची शक्यता असलेला पेशींचा समूह " असे म्हणता येईल. अमेरिकेत सुद्धा "viable fetus" हे २४ आठवड्यांनंतर समजले जाते. त्यामुळे त्याआधी केलेल्या गर्भपाताला ते हत्या, खून वगैरे भडक शब्द वापरले तरी निरर्थक ठरतात. रो. वि . वेड च्या फ्रेमवर्क मधे In the first trimester, it allowed almost no regulations. In the second, it allowed regulations to protect women’s health. In the third, it allowed states to ban abortions so long as exceptions were made to protect the life and health of the mother. हे रेलेव्हन्ट आणि लॉजिकल वाटते.
मुळात हा कायदा आता आणण्याचा
मुळात हा कायदा आता आणण्याचा विचर का होतो आहे? एकाएकी गर्भपाताचे प्रमाण खूप खूप वाढले आहे का?
मैत्रेयी,
मला या विषयातले काहीहि कळत नाही. पण एकंदरित तुमच्या व इतर बर्याच लोकांच्या म्हणण्यात तथ्य वाटते.
अर्थात लॉजिक, सत्य यांचा संबंध काही लोकांच्या म्हणण्यात दिसून येत नाही. ते लोक तेच तेच मुद्दे परत परत मांडायचे हे चालू ठेवतात, मला तर वाटते कि ते बहुधा उपहासाने लिहीत असावेत!.
- आत्ताच्या आत्ता हा कायदा केला नाही तर एकाएकी सगळ्या स्त्रिया उठसूठ गर्भपात करतील अशी भीति घालायची.
- <<<<माहिती काही नसते, ती घ्यायची इच्छा, तेवढा ओपन माइंडेडनेस नसतो, आणि वर खून , हत्या वगैरे शब्द वापरून भुई धोपटत बसायचे.>>>
मुद्दा असा की गर्भाच्या हृदयाचे ठोके केंव्हा प्रथम ऐकू येतात? य विषयावर या देशात असंख्य जाणकार लोक असणार! त्यांना का विचारत नाही?
आणि जर स्त्रीला भीति वाटत असेल की हे मूल माझ्या जीवावर उठले आहे, तर केवळ या भीतीने कित्येक लोकांनी खून केले आहे नि ते सर्व माफ केले आहेत. मग स्त्रीलाच हा हक्क का नाही? विशेषतः डॉक्टरने सांगितले तर?
हा विषय केवळ निवडणुकांच्या वेळी मतदारांचे लक्ष वाढती महागाई व इतर महत्वाचे प्रश्न यावरून बाजूला करायचे असा आहे.
तसाच मेक्सिकोहून येणार्या लोकांचा प्रश्न. केवळ निवडणुकीपुरता!
परफेक्ट पोस्ट, मैत्रेयी!
परफेक्ट पोस्ट, मैत्रेयी!
सौ सुनार की, एक लुहार की!
परफेक्ट पोस्ट, मैत्रेयी!
परफेक्ट पोस्ट, मैत्रेयी!
मला शेंडेनक्षत्र आणि राज
मला शेंडेनक्षत्र आणि राज ह्यांची कीव येते. जस्ट एफिंग हॅव सम ब्रेन सेल्स फार गाड'स सेक ..
मै उत्तम पोस्ट!
मै उत्तम पोस्ट!
मैत्रेयी पोस्ट आवडले .
मैत्रेयी पोस्ट आवडले .
अॅटलांटिक मधे ह्यावर वेगळा टेक वाचला. क्रिस्टॅनिटी मधे व्हायेबलिटी बद्दल थोडा नरो वा कुंजरो वा असा भाग आहे पण तो दुर्लक्षित केला गेलाय रोमन कॅथलिक डॉक्ट्रिन म मधे . जुडाईस्म श्वास घेतल्यावर व्हायेबलिटी मानतो. इस्लाम ह्याबद्दल एकही चकार शब्द उछारत नाही. अमेरिकेतले तीन मुख्य धर्म (लोकसंख्येनुसार) ह्या प्रकाराबद्दल मतांतरे दाखवतात. स्टेट नी रिलीजन ह्याबद्दल सेपेरेशन हे प्रिंसिपल मान्य करूनही रिलीजन हा ह्या निर्णया मधे ड्रायव्हिंग फॅ़क्टर झाला आहे.
मै पोस्ट आवडली
मै पोस्ट आवडली
मैत्रेयी, पोस्ट अतिशय आवडली
मैत्रेयी, पोस्ट अतिशय आवडली
<<जस्ट एफिंग हॅव सम ब्रेन
<<जस्ट एफिंग हॅव सम ब्रेन सेल्स फार गाड'स सेक ..>>
ते ज्या पक्षाचे लोक आहेत, तिथे ब्रेन सेल्सचा संबंध नसतो. नुसते मोठमोठ्यांने तेच तेच, पुष्कळदा खोटे पण, परत परत सांगायचे.
मै - चांगली पोस्ट
मै - चांगली पोस्ट
एकूण बहुतांश केसेस मधे काही वाद नाहीतच. मग फक्त काही काळानंतर स्त्रिया विनाकारण हे करतील अशी भीती कोण घालत आहे? त्यासंबंधी काही डेटा आहे का हे माहीत नाही. पुन्हा एकदा राइट विंग मीडीयात घुसून माहिती काढावी लागेल असे दिसते.
प्रो लाईफ माथेफिरूंची भूमिका
प्रो लाईफ माथेफिरूंची भूमिका ' no exceptions' अशी आहे. केवळ एखादी बाई मजेमजेखातर गंमत म्हणून नवव्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाऊन अबोर्शन करण्याची मागणी करेल , मग आपण तिला थांबवू असं नाहीये ते.
Rape, incest, incestuous rape, minor mother, fetal abnormality, threat to mothers life अशा कोणत्याच कारणाने गर्भपात नको अशी त्यांची भूमिका आहे.
Life begins at conception हे fertility clinics ना कसं अप्लाय करणार? तिथे तर कारखान्यासारखे millions of embryos बनवून ठेवतात. त्यातले काही आपोआप unviable होत असतील. काही ते destroy करतात. काही embryo वर्षानुवर्षे स्टोअर करतात. दुसऱ्यांना डोनेट करतात.
एका २५ वर्षाच्या बाईने donor embryo वापरून मूल जन्माला घातलं. नंतर कळलं की तो embryo २4 वर्षांपूर्वी फ्रीज केलेला होता. मग आता आईचं वय २५ आणि बाळाचं वय २४ धरणार का?
किंवा मग ivf वाल्याना exempt करतील कारण ती बिलियन डॉलर इंडस्ट्री आहे. तिथे वेठीला धरून जेलात टाकायला कोणी बाई नाहीये तर rich white men will suffer financial loss.
वर आलेला वाएबल फीटसचा संदर्भ
चर्चेत वर आलेला वाएबल फीटसचा संदर्भ अस्थानी आहे. कसा ते सांगतो -
वाएबल या अर्थाने कि गर्भातुन बाहेर आल्यावर फीटस जगण्याची शक्यता (प्रॉबॅबलिटि, वायॅबिलिटि) काय आहे या बाबतीतला अंदाज. हार्टबीट्स नुकतेच सुरु झालेले सुधृढ अर्भक निसर्ग गर्भाबाहेर काढत नाहि. त्या अर्भकाला वाएबल होण्यास अजुन अवकाश असणं हा निसर्गनियम आहे. हा बेसिक फंडा डावलुन, फीटस वायॅबिलिटि वरुन कल्पनाविस्तार करणार्या वान्नबिजसाठी स्लो क्लॅप...
गर्भातल्या अन्वाएबल फीटसला वाएबल होण्याची मुदत्/संधीच द्यायची नाहि, आणि वर तो कसा वाएबल नाहि म्हणुन त्याला पाडण्याचं समर्थन करायचं. हि यांची थॉट प्रोसेस - वैचारीक दारिर्द्र्याचं यापेक्षा दुर्दैवी उदाहरण सापडणार नाहि. चालू द्या...
फीटसला वाएबल होण्याची मुदत्
फीटसला वाएबल होण्याची मुदत्/संधीच द्यायची नाहि, >> एकझॅक्टली. वाएबल व्हायच्या आधीच ज्यांना कुणाला गर्भपात करायचा असेल ते जनरली करतात. तोच तर पॉईंट आहे. काहीही शष्प समजुन घ्यायचं नाही आणि साप म्हणू भुई धोपटायची हेच परत एकदा सिद्ध केल्याबद्द्ल परत एकदा गुड जॉब!
तुमचं म्हणणं मला मान्य आहे.
तुमचं म्हणणं मला मान्य आहे. फिटस कधी मनुष्य होतो हि रेषा आखणे अतार्किक आहे. पण तो व्हायेबल मनुष्य असला तरी त्याला नर्व्हस सिस्टीम नसेल, वेदना सहन करण्याची क्षमता नसेल- हा फरक समजुन घेण्यासारखा आहे. आणि यूएस मधली ९३% अबोरशन्स त्या काळात होतात, <13 weeks.
१) पण व्हाईटहॅट ह्यांनी मांडलेला मुद्दा सुद्धा तुम्ही ऍड्रेस करणं गरजेचं आहे. फर्टिलिटी क्लिनिक्स मधून असे कित्येक व्हायेबल ह्युमन्स नष्ट होतात. तिथे काय ?
२) रेप आणि इन्सेस्टला तरी काय म्हणून अपवाद आहेत ? अभ्रकाचा जगण्याचा हक्क सर्वोच्च आहे ना ? (हा प्रश्न तुमच्या लॉजिकची सीमा समजण्यासाठी आहे- माझे मत दर्शवणारा नाही.)
३) एक रोचक हयपोथेतीकल- जर एक रोगी व्यक्ती एका निरोगी व्यक्तीशी लाईफ लाईन द्वारा जोडला गेला आहे- लाईफ लाईन तोडणे हा निरोगी व्यक्तीचा हक्क असावा कि नको ?
किमान एका राज्याच्या गव्हर्नर
किमान एका राज्याच्या गव्हर्नर ने काँट्रासेप्टिव्ह बॅन करायचे सूतोवाच केले आहे.
I wish I was joking.
गर्भातल्या अन्वाएबल फीटसला
गर्भातल्या अन्वाएबल फीटसला वाएबल होण्याची मुदत्/संधीच द्यायची नाहि >> सिरियसली मुद्दे संपले म्हणून काहीही लिहिले आहे.
"संधीच दिली नाही" हे कितीही ताणता येईल मग. "कॉन्ट्रासेप्शन वापरले म्हणजे तुम्ही कन्सिव व्हायला संधीच देत नाही" म्हणून गळे काढणार? की फर्टाइल असतानाही बाईने से* नाकरला म्हणाजे प्रेग्नन्ट व्हायची "संधी सोडली" म्हणून ओरडणार? अजून पुढे आणखी काय अर्ग्युमेन्ट कराल ?
जोवर ते वाएबल फीटस नाही, त्याला ह्यूमन म्हणून स्टेटस नाही. तशी कम्पॅरिजन पण नाही. इतके काय अवघड आहे समजायला.
काँट्रासेप्टिव्ह बॅन हाच
काँट्रासेप्टिव्ह बॅन हाच पुढचा पॉईंट असणार आहे.
रो चा निकाल ज्या प्रायव्हसीवर सुकोने दिला आहे. त्यावरच ग्रिसवॉल्ड वि. कनेटिकट काँट्रासेप्टिव्ह चा निर्णय आहे.
एकदा काय तो सोक्षमोक्ष करून
एकदा काय तो सोक्षमोक्ष करून टाका व सर्व नागरिकांच्या बेड रूम मध्ये कॅमेरे बसवून हस्तमैथूनही बॅन करून टाका ! होऊदे खर्च !
नक्कू रे! ओल्ड व्हाईट (आणि
नक्कू रे! ओल्ड व्हाईट (आणि ब्राऊनपण) मेल येतील की त्यात!
शिवाय टेक्सास सारखे कुणि
शिवाय टेक्सास सारखे कुणि सरकारला कळवले की गर्भपात करायला बाई चालली आहे तर त्याला/तिला १०,००० डॉ.!
कुण्या बिचार्या बाईचे मिस्कॅरेज झाले तर ती थेट तुरुंगात!!
हे फक्त श्रीमंत, गोरे रिपब्लिकन यांना लागू पडत नाही. विशेषतः ट्रंपच्या बाबतीत!
Pages