आयपीएल २०२२

Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57
आयपीएल

आयपीएल २०२२ आली आहे हो!

२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>रॉयल्स ने आज जैस्वाल ला परत खेळवलंय. नीशम, डुसेन पैकी कुणाला तरी जास्त संधी देता आली नसती का?
खेळला ना राव आज तो!!
पडिक्कल मात्र चांगलाच चाचपडत होता आज!!

फेफ, सेनला शेवटच्या ओव्हरमध्ये मार पडायची शक्यता जास्त आहे हे आता तरी पटले का?? सेन, बोल्ट, उमेश यादव सारखे बॉलर सुरुवातीला सलग वापरुन घ्यावेत.... शेवटी कृष्णा, ब्राव्हो, हर्षल पटेल सारखे स्लोअरवन टाकता येणारे आणि व्हेरिएशन असणारे गोलंदाजच जास्त यशस्वी ठरतात!!

आमचे पुन्हा हायलाइट्स पाहून वरातीमागून घोडे Happy

साहा, गिल, पंड्या, रशीद आणि तेवातिया यांची या स्पर्धेतील "चेस" मधली कामगिरी पाहता जेमतेम १८० चा स्कोअर ते चेस करू शकले नाहीत हे आश्चर्य आहे. हायलाइट्स वाल्यांनी निदान शेवट्ची ओव्हर पूर्ण दाखवायला हवी होती. एक दोन बॉलच दाखवले. १००+ ची ओपनिंग, पुढची धुलाई आणि कोणताही चेस सहज जमवणारे लोअर ऑर्डर चे बॅट्समन - इतके असून सुद्धा कसे जिंकले काय माहीत. ती ट्रान्झिशन बहुधा शेवटच्या १० ओव्हरचा पूर्ण रिप्ले पाहूनच कळेल. हायलाइट्स बिनडोक आहेत.

असामी -

२. वॉर्नर ने स्विच हिट करायचा स्टान्स घेऊन बॉल स्कूप करायची हूल देत फक्त बॉल फाईन लेग ला प्लेस करत मारलेली फोर” -

भन्नाट होता तो शॉट. पण त्याने नक्की हूल दिली की त्याला आधी खरोखरच तसा मारायचा होता पण बॉलची दिशा पाहून पुन्हा प्लॅन बदलला यातले काहीही असू शकते. पाहताना तसे कळत नाही. पण वॉर्नर ची एकूण बॅटिंग जबरी होती.

तसेच काल रोहित शर्माने सुरूवात फार मस्त केली होती. "दोईच मारा, लेकिक सॉलिड मारा के नही" टाइप.

बाय द वे, वृद्धिमान साहाची २-३ वर्षांपूर्वी कसोटीतील कामगिरी पाहून तो जिगरवाला आहे हे माहीत होते. पण तो स्वतःला आयपीएल मधे इतका ट्रान्सफॉर्म करू शकेल असे कधीही वाटले नव्हते. त्याची फटके मारायची पध्दत एकदम वेगळी आहे. अगदी शेवटच्या मूमेंटला तो मनगटाने आणखी जोर देतो असे वाटते - थोडेफार पुजारासारखे.

“ सेनला शेवटच्या ओव्हरमध्ये मार पडायची शक्यता जास्त आहे हे आता तरी पटले का??” - अरे नविन आहे तो. शिकेल अनुभवातून. आज पहिल्या दोन ओव्हर्स महागात लागल्यावर तिसरी ओव्हर चांगली टाकली त्याने. बोल्ट, उमेश हे ट्राईड अँड टेस्टेड डेथ ओव्हर्स फेल्युअर्स आहेत.

“ साहा, गिल, पंड्या, रशीद आणि तेवातिया यांची या स्पर्धेतील "चेस" मधली कामगिरी पाहता” - रशिद आणि तेवातिया ह्या बॅटींगमधे गाजराच्या पुंग्या आहेत असं माझं अजूनही मत आहे. गुजराथ बॅटींगमधे गिल, हार्दिक आणि मिलरवर अवलंबून आहेत. साहाची बॅट सद्ध्या चालतीय (गूड फॉर हिम!) पण त्यालाही बर्याच मर्यादा आहेत. सगळ्यात जास्त बॅलन्स्ड टीम लखनौ वाटतीय. ७ ऑलराऊंडर्स आहेत त्यांच्याकडे.

मला वाटतं ते ज्या नंबर वर येतात त्यामुळे मुळातच धोका जास्त असतो. प्रेशर पण खुप. सो प्रत्येक सीजन मध्ये किती वेळा ते (रशिद खान आणि टेवाटिया) येऊन चोख कामगिरी बजावतात त्यावरुन ठरेल की गाजरपुंगी आहे खरी खरी पुंगी. टेवाटियाचे अ‍ॅवरेज ह्या सीजनला तरी चांगलं आहे.
बाकी हातात होती ती मॅच पण सॅम्स नी खरच चांगली टाकली. बुमराहनी चांगली म्हणता म्हणता एक चुक केली आणि सिक्स बसला.

मी आज पहिली मॅच पुर्ण नाही बघू शकलो आणि शेवटी पडिक्कल आणि हेटमायर होते तेव्हा बघायला लागलो. खरय, चांगलाच चाचपडत होता पडिक्कल. वो तो अच्छा हुआ हेटमायर दादा ऑन पॉईंट होते. फिरवलीच लगेच त्यानी मॅच. फार भरवशाचा वाटतो मला हेटमायर.

दुसर्‍या मॅचला आज जेवढी जोरदार सुरवात केली जायंट्सनी तेवढा जोर नाही टिकला पुढे. ओवरॉल मी पण लखनऊ विनिंग टीम वाटत आहे हेच एकतोय बर्याच जण्यांकडून. मला समहाऊ नाही आवडत जायंट्स आणि टायटन्स जास्त आवडतात. एक्स फॅक्टर जास्त आहेत त्यांच्यात असं वाटतं.

रसेल शो ऑफ Sad

आज केकेआरची बॅटींग टोटली मिसफायर झाली.

बुवा, तेवातिया / रशिद हे प्रामुख्यानं बॉलर्स आहेत जे थोडी बॅटींग करू शकतात. त्यामुळे जर त्यांनी त्यांचा प्रायमरी जॉब (बॉलिंग) व्यवस्थित केला आणि बॅटींगमधे हातभार लावला तर ते व्हॅल्यू अ‍ॅड करतात. पण गुजराथ तेवातियाला सहाव्या क्रमांकावर स्पेशलाइझ्ड बॅट्समन म्हणून खेळवत असतील तर त्यांची बॅटींग डेप्थ अगदीच कमी आहे. ती पोझिशन खरं तर पंड्याची आहे जो चौथ्या क्रमांकावर बॅटींग करतो.

इज्जतीचा पंचनामाच की ओ आज केकेआर्चा Sad

हो फेफ, खरय की पंड्याची होती ती पोजिशन पण त्यानी स्वतः जबाबदारी घेऊन वर यायला सुरवात केलीये जी जमत आहे त्याला असं वाटतय.
बाकी रशिद बाबतीत आय अग्री. पक्का बॉलर हु कॅन बॅट. पण कदाचित मी टेवाटियाला पुर्वी फॉलो नाही केलं त्यामुळे असेल पण ह्या सीजनला तो मला बॅट्स्मनच वाटतोय. आणि नं ६ पर्यंत पक्के बॅट्समन असणं नॉर्मलच नाही का? पुढे १-२ मिक्स आणि नंतर शेपूट. आता रशिद नं७ ला चमक दाखवत असल्यामुळे आण्खिन वाढली डेप्थ असं मी म्हणेन.
एरवी नेहमीच्या बॉलरांना यश मिळत नसेल तर परत तेवातियाला देता येते ब्रेकथ्रु करता ही पण जमेची बाजू आहेच.

त्यामुळे जर त्यांनी त्यांचा प्रायमरी जॉब (बॉलिंग) व्यवस्थित केला आणि बॅटींगमधे हातभार लावला तर ते व्हॅल्यू अ‍ॅड करतात >> सॉरी फेफ. ह्या दोघांना एकाच पारड्यात नाही मोजता येणार. रशिद अ‍ॅज अ‍ बॉलर म्हणून भयंकर उजवा आहे, नरेन वगळता एव्हढा विश्वासू स्पिनर नाही. त्याने सुमार बॅटींग केली तरी नुसत्या बॉलिंग साठी तो संघात असेल. तेवाटियाची बॉलिंग हा गाजराच्या पुंगीसारखा प्रकार आहे.

पंजाबच्या एका कोचची मुलाखत वाचली त्यात त्याने यंदा सगळ्या टिम्स बेसबॉल टाईप हिटिंग करण्यासाठी कसे कर्लींग चा वापर करताहेत हे समजावले. जबरदस्त इनोव्हेशन आहे. तुम्ही कधी कर्लिंग केले असेल तर मनगट वापरून कसे फेकायचे हे आठवा नि बॅटींग करताना शेवटच्या फॉलो थ्रू मधे ते करता आले तर कसे व्हिप लॅश होईल त्याचा अंदाज घ्या. पॉवर हिटींग हा सगळ्यांनाच जमणारा प्रकार नाही (म्हणजे पूरन, रसेल, पोलार्ड, हेटमायर, बटलर, वॉर्नर करतात त्या प्रकारचा) पण रशिद खान, होल्डर, साहा ह्यांना ह्या टेक्स्निक चा फायदा होताना लक्षात येतेय.

“ ह्या दोघांना एकाच पारड्यात नाही मोजता येणार.” अरे, नाहीच येणार. रशिद हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा, टेस्ट लेव्हलचा बॉलर आहे, एका आंतरराष्ट्रीय टीमचा कॅप्टन आहे. त्याची बॅटींग हा बोनस आहे. पण तेवातिया हा सुद्धा प्रामुख्यानं बॉलरच आहे. स्पेशलाइझ्ड बॅट्समन म्हणून तो हरियाणाच्या टीममधे सुद्धा बसत नाही. त्याला सहाव्या क्रमांकावर, स्पेशलाइझ्ड बॅट्समन म्हणून खेळवणं हा गुजराथचा नाइलाज आहे.

“ त्याने यंदा सगळ्या टिम्स बेसबॉल टाईप हिटिंग करण्यासाठी कसे कर्लींग चा वापर करताहेत हे समजावले.” टी-२० ने क्रिकेटमधे प्रचंड प्रमाणात इनोव्हेशन्स आणली आहेत.

हारेगा तो मुंबईच.
आज तरी तेंडुलकरला ला टीम मध्ये घ्या , पोलार्डपेक्षा तरी नक्की बरा खेळेल.

शॉर्ट पिच बॉलिंग वर कलकत्त्याला गेल्या दोन मॅचेस मधे छळले होते त्यामूळे त्याचा अती वापर होईल असे वाटलेले पण तसा काही चमत्कार नाही बघायला मिळाला खरा.

आजपण मुंबईच हरणार आहे.
आज तरी छोट्या तेंडुलकरला चान्स द्या.बहुतेक खेळाडू मुंबई संघात पूर्वपुण्याई आहेत. रोहित आणि पोलार्डला तर आमच्या गल्ली संघात पण घेणार नाहीत.

रोहित आणि पोलार्डला तर आमच्या गल्ली संघात पण घेणार नाहीत.>>> Lol पोलार्ड विशेष थकलेला वाटतो की त्याची स्टाईलच तशी आहे काय माहित. मला तर एम आय चे गेम बोअर होतयत बघायला. पुर्वी सि एस के वर्सेस एम आय म्हणजे फुल्ल पर्वणी असायची. सि एस के मुसंडी मारायला बघतय पण टू लेट आय फील.

अरे काय चाललय काय? एम माय म्हणजे नागाच्या पिलाला तू का म्हून खवळिलं मोड मध्ये आहेत आज!

१७-४ चेन्नई आणखी खोलात..
डीआरएस नसल्याने कॉन्वेची मोठी विकेट मिळाली अन्यथा गेम वेगळा असता..
आता धोनी गेला की गेम संपला

रायडूने फोर मारला. पुढच्या बॉलला बाद.
दुबेने फोर मारला. पुढच्या बॉलला बाद.
ब्राव्होने फोर मारला. पुढच्या बॉलला बाद.

गेम चलाना तो कोई धोनी से सीखे.. चाळीसाव्या वर्षीही ही जबाबदारी त्यालाच पेलावी लागतेय.

गेम चलाना तो कोई धोनी से सीखे.. चाळीसाव्या वर्षीही ही जबाबदारी त्यालाच पेलावी लागतेय. >>> सहमत.
धोनी सारखा डोक्याने क्रिकेट खेळणारा अजून पहिला नाही.त्याला नक्की माहित असत काय करायचं ते.

त्याला नक्की माहित असत काय करायचं ते
>>>
+७८६
आणि तो समोरच्यालाही नेमके सांगतो त्याला काय करायचे आहे ते.. त्यामुळे आज त्यासोबत पार्टनरशिप झाली नाही याचे आश्चर्य वाटले

आणि तो समोरच्यालाही नेमके सांगतो त्याला काय करायचे आहे ते. >> त्याने शेवटच्या विकेटला काय नि का सांगितले असावे ? नाहक विकेट गमावली.

मोहसीन खान सर्वात अधिक प्रॉमिसिंग वाटलाय नव्या बॉलर्स मधे. अगदी उमरानच्या तुफान पेस पुढेही.

३३-४

३३-४

Pages