
माबोकरांचे प्रचि दालन..
अर्थात सबकुछ फोटोग्राफी..
प्रकाश-चित्रे : मायबोली आर्ट गॅलरी..
मायबोलीच्या गणेशोत्सव स्पर्धेत रंगाची जोडी या प्रकाशचित्रण उपक्रमाला छानंच प्रतिसाद मिळाला..
रोज वेगळ्या रंगाची जोडी असल्यामुळे रोज नवीन धागा असायचा.
अनेक मायबोलीकर छान फोटोग्राफर आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
या आधी फोटो न टाकणाऱ्या अनेक सभासदांनीही नवीन आहोत म्हणत छान फोटो टाकले आणि सगळ्यांनीच त्यांच कौतुक केलं, प्रतिसाद देऊन हुरुप वाढवला.
आपल्यापैकी अनेक जण उत्तम फोटो काढतात, त्या फोटोंचे विषयही खूप निरनिराळे असतात.
इतरांचे चांगले फोटो पाहून डोळ्यांना, मनाला बरं तर वाटतंच पण काही शिकायलाही मिळतं, नवीन संकल्पना कळतात.
त्याच ठिकाणचा किंवा त्याच विषयावर आपण काढलेलाही एखादा छान फोटो असतो.
तर असे सर्व फोटो एका जागी, एका ठिकाणी बघायला मिळावेत यासाठी हा धागा..
जे प्रकाशचित्र आपण देऊ त्या प्रत्येकाबद्दल एखादी आठवण म्हणा, ठिकाणाबद्दल म्हणा, कशा प्रकारे फोटो काढला यावर चार अथवा जास्त ओळीत माहिती दिली तर अति उत्तम.
चांगल्या चांगल्या फोटोग्राफर्सनी काही टीप्स दिल्या, कॅमेराबद्दल, सेटिंग्ज बद्दल माहिती दिली तर सोन्याहून पिवळं..
फोटोग्राफीच्या काही टिप्स देणारी, मायबोलीकर अवल यांच्या Simple Photography ह्या ब्लॉगची लिंक : https://photographyforcommonpeople.blogspot.com/?m=1
तेव्हा चला मायबोलीकरांनो.. आपापली प्रकाशचित्रं इथे द्यायला सुरुवात करा..
नवोदितांच्या चांगल्या फोटोंचं, आठवणींचंही स्वागतच आहे..
मसाई मारा- केनया : निळी जांभळी सायंकाळ..
जंगलातल्या पार्क राऊंडनंतर जंगललॉजवर परतताना संध्याकाळ गडद होत गेली. आणि एक अविस्मरणीय दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलं;
मसाईमारातला सूर्यास्त.
सर्व साधारणत: आपल्याकडे सूर्योदय आणि सूर्यास्त हे दोन्ही केशरी रंग छटांत होतात पण मसाईमाराच्या स्थानानुसार किंवा काय माहित नाही पण सूर्यास्तावेळी निळ्या रंगाच्या छटा दिसतात.
विस्तीर्ण गवताळ कुरण, घननिळी संध्याकाळ आणि मसाईमारातील Typical अकॅशियाच्या विशिष्ट छत्रीसारख्या (Topiary) आकारामागे मावळणारा सूर्य.
टीप : प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे.
सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
सर्व प्रकाशचित्रे स्वतःची असावीत. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4
या धोरणाचे कृपया पालन करावे..
तसेच "ज्यांना मायबोली.सीसी या किंवा अशा उपक्रमात भाग घ्यायचा असेल त्यानी कृपया हा फोटो मी प्रताधिकार मुक्त करत आहे असे फोटोखाली लिहा." अशी वेमांची सूचना आहे..
त्याचा विचार व्हावा..
(मी या धाग्यावरचे माझे प्रचि प्रताधिकार मुक्त करित आहे..)
वावे आहाहा
वावे आहाहा
वावे, अहाहा...
वावे, अहाहा...
Baby's Day Out मधल्या Construction Site वरच्या सूर्यास्ताची आठवण आली..
@ वावे - खूप सुंदर फोटो आहे
@ वावे - खूप सुंदर फोटो आहे सूर्यास्ताचा..!!
.
धन्यवाद सगळ्यांना
धन्यवाद सगळ्यांना

@निरू, माझी बहीणही हेच म्हणाली.
वावे, अप्रतिम !
वावे, अप्रतिम !
कालच या धाग्याची आठवण आली
कालच या धाग्याची आठवण आली होती. मस्त फोटो वावे.


१.
ही सँन अँन्टेनियो नदी त्याच्या काठाकाठाने चालत टिपलेले फोटोज्.
२.
ही दुसरी बाजू
३.
४.
नदीकाठचे अमर अकबर अँथनी... अमर तर मागेच लागला , कशीबशी पळाले



५.
अजून पुढे...
६.
अर्धातासात टिपलेले बदल
७.
सुंदर फोटो अस्मिता..।
सुंदर फोटो अस्मिता..।
वावे सूर्यास्त भारीए!
अस्मिता, सुंदर प्रचि..
अस्मिता, सुंदर प्रचि..
रावेतच्या पुलावरून घेतलेला
रावेतच्या पुलावरून घेतलेला फोटो
आजचा सूर्योदय
आजचा सूर्योदय

ग्रीष्मातल्या सकाळी आले भरून मेघ..
(तांत्रिक दृष्टीने वसंत ऋतू आहे, पण उन्हाळा या अर्थाने ग्रीष्म
)
अरे इथे बऱ्याच दिवसांत नवीन
अरे इथे बऱ्याच दिवसांत नवीन फोटो आलेले दिसत नाहीत. शेवटचा फोटोही माझाच आहे.
हा कालचा सूर्यास्त.
दोन्ही फोटो सहीच... किती
दोन्ही फोटो सहीच... किती वेगवेगळ्या रंगछटा.
थँक्स मृणाली!
थँक्स मृणाली!
हा कालचा सूर्योदय

हा आजचा
उत्तरायण अगदी डोळ्यांसमोर
Whoa! असं किरमिजी का - फिल्टर
Whoa! असं किरमिजी का - फिल्टर, पोल्यूशन, कुठले ग्रह??? का मलाच गुलाबी ऐवजी किरमिजी रंग दिसतोय????
ठाण्याच्या आमच्या नौपाड्या
ठाण्याच्या आमच्या नौपाड्या च्या घरातून दक्षिणायन सुरू असताना सूर्योदय दिसतो. सकाळी नुसतं बसून सूर्योदय बघणं मला फार आवडत. सूर्योदयाच्या वेळी केशरी आणि तेजस्वी दिसणारा तो लोहगोल पाच च मिनीटात बघू शकणार नाही एवढा प्रखर होतो.
बाल्कनीला बर्ड नेट लावलं असल्याने ती जाळी न येता फ़ोटो काढणं जमलं आहे म्हणून छान वाटतय. मुंबई ठाण्याच्या आकाशात कबुतरं कायमच असतात. एरवी जरी कबुतरांचा राग आला तरी ह्या फ्रेम मध्ये सूर्याला सामोऱ्या जाणाऱ्या कबुतरामुळे फ्रेम जास्त छान दिसतेय अस मला वाटतय.
वावे आणि मनीमोहोर,
वावे आणि मनीमोहोर,
सुंदर प्रचि..
सर्वच फोटो खूप रिफ्रेशिंग !!
सर्वच फोटो खूप रिफ्रेशिंग !!
धाग्याची कल्पना पण आवडली
@अस्मिता - ७ नंबर चा फोटो कुठला (place) आहे ?
आमच्या सोसायटीमधील जंगल ट्रेल
आमच्या सोसायटीमधील जंगल ट्रेल मधल्या लेक मधे पडलेले सुर्याचे प्रतिबिंब (लोढा अमारा कोलशेत रोड ठाणे). नुसत नावच जंगल ट्रेल आहे छोटी बाग
(No subject)
(No subject)
वाह. खुप छान आहेत सगळेच प्रचि
वाह. खुप छान आहेत सगळेच प्रचि.
ही बहुतेक मी कातरवेळ साधलेली.
ही बहुतेक मी कातरवेळ साधलेली. अंधारात काहीच दिसत नव्हतं पण हा फोटो मात्र काढावासा वाटला. सूर्यास्त नुकताच झाला होता. आणि झाडांच्या बरोबर खाली रेवदंडा किल्ल्याची तटबंदी आहे.
हा घरासमोरील टेकडीवर ट्रेकला
हा घरासमोरील टेकडीवर ट्रेकला गेले होते तेव्हाचा सूर्यास्त. रोज जी टेकडी बाल्कनीतून दिसते तिच्या टॉपवर बसून काढलाय
कसले एकेक सही मनमोहक फोटो
कसले एकेक सही मनमोहक फोटो आहेत, नजरसुख.
अरे हा धागा विसरलेच होते.
अरे हा धागा विसरलेच होते. नुकताच सुर्यास्त अनुभवला. त्याचा हा फोटो.
आणी हे बाकीचे काही
ऑफिस खिडकीतुन सुर्यास्त

हा सुर्योदय.. घरासमोरचा व्ह्यु

वा, सगळेच फोटोज मस्त आहेत.
वा, सगळेच फोटोज मस्त आहेत.
मस्त फोटो आलेत सगळेच!
मस्त फोटो आलेत सगळेच!
सीमंतिनी, फिल्टर वगैरे मी कुठला वापरलेला नाही..
मस्त धागा! मस्त प्रचि!!
मस्त धागा! मस्त प्रचि!!
आमच्या वाशी-कोपरखैरनेचे सुर्यास्त
.
.
.
.
.
.
.
.
.
मावळत्या सुर्याला बघणे - आमचा आवडीचा छंद
आणि उगवता सुर्य पाहणे हा माझा
आणि उगवता सुर्य पाहणे हा माझा आवडता छंद.
१.

२.

३.

४.

सगळेच फोटो सुंदर
सगळेच फोटो सुंदर

#सूर्यास्त नागार्जुन सागर
Pages