झिम्मा - मराठी चित्रपट

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 November, 2021 - 07:38

झिम्मा - मराठी चित्रपट

झिम्मा म्हणून एक मराठी चित्रपट आलाय बघा. काय चित्रपट आलाय. या वर्षात मी पाहिलेला सर्वात आनंददायी चित्रपट. तो देखील कोरोना प्रकरण सुरू झाल्यापासून थिएटरला जाऊन पाहिलेला पहिलाच चित्रपट. या स्पेशल ओकेजनला एखादा छान चित्रपट बघणे नशिबी आला हे भाग्यच म्हणावे.

याच चित्रपटावर चर्चा करायला हा धागा.

ज्यांनी अजून पाहिला नाही ते ट्रेलर बघू शकतात. ट्रेलर सुद्धा फार आवडेल.
झिम्मा ट्रेलर - https://www.youtube.com/watch?v=o8EZsgN167A

चित्रपट मराठी आहे. ओटीटीवर बहुधा नाहीये. पण आला तरी तिथे बघू नका. थिएटरलाच बघा. मराठी चित्रपट ईंग्लंडला गेलाय. आपण थिएटरला जायला हरकत नाही Happy

म्हणजे स्टोरी फार सिंपल आणि चार ओळींची आहे बघा. ट्रेलर पाहिला असेल तर हा पॅराग्राफ वाचूही नका. म्हणजे बघा एक साधारण सात आठ बायका आहेत. वेगवेगळ्या स्वभावाच्या, जातकुळीच्या आणि त्याला साजेश्या पार्श्वभूमीमुळे वेगवेगळे प्रॉब्लेम घेऊन आलेल्या.. या सार्‍याजणी मिळून एका ईंग्लंड टूरवर दंगा घालतात. भांडतात, एकत्र होतात, एकमेकींना समजून घेतात, आणि त्यात त्यांचे प्रॉब्लेम सुटत जातात, जगण्याचा नवा दृष्टीकोन मिळतो.. वगैरे वगैरे.. पण हे सारे फारच सुंदर पद्धतीने घडते.

ईतक्या बायका जेव्हा पडद्यावर सतत दिसत राहतात तेव्हा चित्रपटाची फ्रेम तशीही सुंदरच होते. पण याऊपर ईंग्लंड ईतके छान टिपलेय की कमॉन, हा मराठी चित्रपट आहे, जो कधीकाळी लो बजेट समजला जायचा, हे स्वतःला चिमटा काढून सांगावे लागते.

सगळ्या व्यक्तीरेखा अगदी सुरेख आणि ठसठशीत उभ्या केल्यात पण त्या पेलायला जो समर्थ अभिनय लागतो त्यात डावेउजवे करणे कठीण व्हावे ईतका नैसर्गिक केलाय प्रत्येकीने.. अर्थात तरीही निर्मितीताई किंचित भाव खाऊन जातात. नुसत्या एक्स्प्रेशनवर हश्या वसूल करतात. त्यांच्यासाठी एक बदाम एक्स्ट्रा Happy

गाणी आणि पार्श्वसंगीतही चोख.. झिम्मा शीर्षकगीत सतत डोक्यात पिंगा घालून राहणारे.. संवाद चुरचुरीत तसेच तत्वज्ञान सांगणारे वगैरे फुल्ल पॅकेज आहे चित्रपट! म्हणजे बघत असतानाच सतत जाणवत राहते की आज आपण काहीतरी छान बघतोय.

चित्रपटात चुका काढायच्या म्हटल्या तर लॉजिक लाऊन त्या निघतीलही. पण अश्या चित्रपटांत मॅजिक बघायचे असते. तरच ते अनुभवण्यात मजा. म्हणजे बघा ना, बायकोने ईंटरव्हलमध्ये पॉपकॉर्न न घेता आम्ही चित्रपटातच गुंतून राहिलोय हे शेवटचे कधी घडले आठवत नाही. तसेच चित्रपट संपल्यावर शेवटी नावे पडताना स्क्रीनवर एका कोपर्‍यात त्या बायकांच्या व्हॉटसपग्रूपची चॅट दाखवतात. ती सुद्धा शेवटपर्यंत म्हणजे "कबीर लेफ्ट" येईपर्यंत आम्ही खुर्चीत बसून पाहिली, आय मीन वाचली. असंही रोज रोज होत नाही.

अरे हो, त्या व्हॉटसपग्रूपमधून लेफ्ट होणारा हा कबीर म्हणजे सिद्धार्थ चांदेकर, जो त्या टूरचा आयोजक दाखवला आहे. त्याची अभिनयशैली आवडतेच. हा रोल तर त्याचाच होता. तर चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा आणि सोबत चान्स मारत त्यात अभिनयही करणारा हेमंत ढोमे, त्याचे ईतका सुंदर चित्रपट बनवल्याबद्दल कौतुक आणि आभार.

बाकी मला परीक्षण वगैरे लिहिता येत नाही. एवढी चित्रपट समजायची अक्कल नाही माझ्यात.
पण हे बघा, मी हे पाहिलेय, आणि ते मला फार आवडलेय, तुम्हालाही आवडेल... हे चार लोकांना सांगायला मनापासून आवडते म्हणून हा खटाटोप Happy

थोडेसे अवांतर पण गरजेचे -
आम्ही हा चित्रपट नवी मुंबईच्या सीवूड स्टेशनमधील ग्रॅंड सेंट्रल मॉल मधील सिनेपॉलिसला पाहिला. मॉलमध्ये प्रवेश देताना वॅक्सिन सर्टिफिकेट चेक करूनच आत पाठवत होते. थिएटरमध्ये खुर्च्या एक सोडून एकच बूकिंग होते. आम्ही दोघे नवराबायको ईंटरव्हल पर्यंत याच नियमाचे पालन करत मधली खुर्ची सोडून बसलो होतो. पण पुढे पिक्चरचा प्रभाव पडला. जश्या त्या बायका एकमेकींच्या जवळ आल्या तसे आम्हीही मग ईंटरव्हलनंतर बाजूबाजूच्या खुर्चीवर बसूनच पुढचा पिक्चर पाहिला Happy

असो, सांगायचा मुद्दा हा की सोशल डिस्टंन्सिंग पाळले जाते. चिंता नसावी. त्यामुळे तुम्ही एकटे गेलात तरी शेजारी कोणी लगटून बसायला येणार नाही याची खात्री. त्यामुळे बायकांनी बिनधास्त एकटेही जायला हरकत नाही. तसेच पुरुषांच्या वॉशरूममध्येही सोशल डिस्टन्सिंग पाळून युरिनल एक सोडून एक वापरात असल्याने आपले काम चालू असताना बाजूला कोणी येऊन उभा राहत नाही हे ही फार छान वाटले. पुरुषांनीही हा सुखद अनुभव घेण्यास चित्रपटगृहात जायला हरकत नाही. असे एखादे काहीही कारण शोधा, पण हा चित्रपट चुकवू नका Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"अर्धी अमेरिका युक्रेन ही क्रेन स्वतः रेण्ट करायची युहॉल सारखी कंपनी आहे असे समजते." - अरे हे मिस झालं होतं. खतरनाक आहे हे फा Rofl

अरे हो, हा सिनेमा सुपरहिट झाल्याने मला आनंद झालेला आहे. थेटरमधे मोठ्या पडद्यावर अजुन वेगळा परिणाम नक्की येतो.

झिम्मा एक नंबर टाईम वेस्ट चित्रपट... यापेक्षा अतरंगी रे किंवा संदीप आणि पिंकी फरार परत एकदा बघा...

च्रप्स यांच्या प्रतिसादाने पुन्हा एकदा गोंधळ !
च्रप्स आणि ऋन्मेष यांची वैयक्तिक मते आणि आवडी या बरेचदा प्रवाहाविरुद्ध असतात असा सर्वसाधारणपणे बहुतांश मायबोलीकरांचा समज आहे.
पण ईथे दोघांची मते परस्परविरोधी आहेत.
त्यामुळे झिम्माचा प्रवाह नेमका कुठल्या दिशेने वाहतोय याबाबबत सामान्य मायबोलीकर संभ्रमात
या स्थितीत म्हाळसा यांनी म्हटल्याप्रमाणे वावेताईंच्या मागे मोठी रांग लागण्याची शक्यता..

आता पुष्पा कुठे आला ईथे मध्येच?
बाकी व्याकरणाचा नियम लावता दोघांच्या नावात साम्य आहे. दोघे एक दोन अडीच आहेत. आणि बॉक्स ऑफिसवर घोड्यासारखे धावत आहेत.

काल चित्रपट बघितला. चांगला आहे. नैसर्गिक अभिनय, पार्श्वसंगीत व गाणी, तांत्रिक बाजू आणि विशेषत: इंग्लड जे व जसे दाखवले आहे इत्यादी सर्व खूपच छान. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. बहुतेकजणांना (खरेतर जणींना) आवडेल असा चित्रपट आहे याबद्दल दुमत नाही. त्यातल्या त्यात चित्रपट स्त्रीवर्गात खूपच पॉप्यूलर झालाय. कारण कथानक आणि विविध वयोगट/पार्श्वभूमी असलेली स्त्रीपात्रे यामुळे प्रेक्षक म्हणून मुली/स्त्रिया चित्रपटातील विविध व्यक्तीरेखांशी भावनिकदृष्ट्या कनेक्ट होतात. हा हेतू साधण्यात हा दिग्दर्शक अर्थातच खूप यशस्वी झालाय. प्रेक्षकांनी हे असे कनेक्ट होणे हेच चित्रपटाचे यश असते. (पण कथानक पाहता पुरुष वर्ग चित्रपटाशी असं कनेक्ट होण्याची शक्यता तशी कमीच आहे).

पण एक गोष्ट चित्रपट पाहताना प्रकर्षाने जाणवत राहिली. ती म्हणजे जे कथानक दाखवले आहे (विविध स्वभाग/वय/पार्श्वभूमीच्या स्त्रिया एकतर येणे व त्यामुळे त्यांच्यात घडणारे नाट्य) त्यासाठी इंग्लंडला जाण्याची गरज होती का असे वाटत राहिले. अगदी दोन-तीन प्रसंग सोडले तर इंग्लंडला जाऊनही त्या सगळ्या भारतातच असतात. जे कथानक दाखवलेय त्यातले एक दोन प्रसंग वगळता बाकी सगळे इकडे काश्मीर शिमला कुलू-मनाली किंवा गेलाबाजार गोव्यात सुद्धा अगदी असेच सगळे दाखवता आले असतेच की? देन व्हाय इंग्लंड? व्हाय व्हाय व्हाय? अखंड चित्रपटभर असे काहीसे सातत्याने माझ्या मनात येत राहिले. चित्रपटाच्या सुरवातीला लोकेशन हायलाईट केले असेल तर त्या लोकेशनवर ज्या गोष्टी अनुभवायला मिळतात त्यांची कथानकात सुंदर गुंफण केलेली असणे प्रेक्षकांकडून नकळतपणे अपेक्षित धरले जातेच. तिथे गेल्यानंतर अनुभवायला येणारे कल्चरल शॉक्स, तिथली वैशिष्ट्ये व ठिकाणांचे अनुभव यांची गुंफण व त्या व्यक्तीरेखांच्या प्रतिक्रिया व त्यातून पुढे जाणारे, असे कथानक लिहिता आले असते. अर्थात ते झाले असते तर झिम्मा अजून स्मरणीय झाला असता. या व्यतिरिक्त कथानकात खटकलेल्या किंवा बाळबोध वाटलेल्या अजून मोजक्या काही बाबी आहेत. त्या "इट्स ओके" प्रकारातल्या असल्या तरी चित्रपट मनात घर करून न राहण्याला मात्र त्या चांगलीच मदत करतात. मनाला भिडणाऱ्या गोष्टी दाखवताना पटकथा लेखक आणि दिग्दर्शकाचा खरा कस लागतो. पण ते ठीक आहे. काही अधिक काही उणे.

इथे खूप प्रतिसाद आलेत. अधूनमधून वाचले पण सगळे नाही वाचले. पण हा मुद्दा कदाचित काही प्रतिसादांत येऊनही गेला असेल. असो. पण संपूर्णपणे इंग्लंडमध्ये शुटींग झालेला एक मराठी चित्रपट म्हणून कौतुकास्पद आहे, वादच नाही.

(बाय द वे ती व्यक्तिरेखा साकारणारा स्वत: दिग्दर्शक हेमंत ढोमे आहे हे हा धागा वाचल्यानंतर कळले)

@वावे Lol कारण, "चांगला वाटला" पण "मनाला भिडला नाही". "दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो तोह जिंदा हो तुम" शेवटी हे असं काहीतरी आणि त्याला शोभेल असं नाट्य चित्रपटभर! तरंच सिनेमा मनात घर करून राहतो. Proud Light 1

तिकडे इंग्लडमध्ये असताना अगदी असाच चित्रपट काढावा असे मनात फार फार येऊन गेले होते तेंव्हा. पण मी कल्पना केली होती तो ग्रुप खेडेगावातल्या स्त्रियांचा होता. आणि त्यांना येणारे कल्चरल शॉक्स व त्यातून होणारी विनोदनिर्मिती. परंतु त्याचबरोबर तिथल्या कल्चर आणि लोकांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्व आणि विचारांत घडणारे सकारात्मक बदल. व त्याचमुळे त्यांच्या आयुष्यातील समस्यांना मिळणारी सोल्युशन्स. असे काहीसे कथानक तेंव्हा डोक्यात आले होते. पण ती नुसतीच कल्पना करून थांबलो. कल्पना करणे आणि ती प्रत्यक्ष आणने यात खूप खूप खूप अंतर असते. It takes toll on your life. म्हणून मराठी सिनेमा कसाही असला तरी ह्या निर्माता दिग्दर्शकांचे कौतुकच वाटते.

चांगला वाटला" पण "मनाला भिडला नाही". "दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो तोह जिंदा हो तुम" शेवटी हे असं काहीतरी आणि त्याला शोभेल असं नाट्य चित्रपटभर! तरंच सिनेमा मनात घर करून राहतो.>>>>
@ अतुल.
तुम्ही तळटीप टाकायला विसरलात-
“ निगेटिव वाटणारा पॅाझिटिव्ह रिव्ह्यू किंवा पॅाझिटिव्ह वाटणारा निगेटिव रिव्ह्यू, ज्याने त्याने, ज्याला त्याला, जसा जमेल तसा, वाटेल तसा समजून घ्यावा.. चित्रपट जरूर पहा पण..नाही पाहिल्यास उत्तम” Proud
तुमच्याकडून चित्रपटाला साडे अडिच स्टार

आत्ताच परत एकदा हनिमून ट्रॅव्हल पहिला

ट्रॅव्हल /रोड मुव्ही आणि खूप सारी पात्रे म्हणून दोघांची तुलना मनात झालीच.

1) इकडे सुद्धा खूप सारी कपल्स असल्याने सगळ्याकपल्सच्या स्टोर्या सगळ्यांना पटतील अश्या establish होत नाहीत. (दोन्ही "सगळे" महत्वाचे) बहुदा खूप पात्र असणाऱ्या सिनेमात घडणारी अपरिहार्य गोष्ट असावी ती.

2) झिम्मा मध्ये सायली संजीव मध्येच ट्रिप सोडून जाते, इकडे दिया मिर्झा BF बरोबर पळून जाते.

3) झिम्मा शहाणपण शिकवायला सुहास जोशी, इकडे बोमान-शबाना कपल.

4) दारू पिऊन मोकळे होने दोन्हीकडे

5) सगळ्या सामान्य कपल्स मध्ये भांडणे होतात, भांडणे न होणारे लोक सुपर हिरो असतात (म्हणजे नसतातच) हे सांगायला अभय देओल चे कपल घातले आहे, आणि शेवटी त्याच्या तोंडून संत्र देखील सोलले आहे Happy zoya akhtar वगैरे असोशिअटेड असलेल्या फिल्म मध्ये सुद्धा हे करावे लागते, तर ढोमे नि केले तर अगदीच माफ आहे Lol मराठी प्रेक्षक काही फार एक्सत्रा ओर्डीतरी स्मार्ट नाहीये.

4) शेवटी आपण कोणाच्या प्रेमात आहोत त्या प्रमाणे रिस्पॉन्स ठरतो,
सैराट मध्ये बाकी प्रेक्षकांनी चूक म्हंटलेली गोष्ट इकडे प्रेमात असणारे लोक कशी बरोबर आहे हे लॉजिक लावून सांगत होते Lol (मंजुळे हेअर कटिंग सलून मध्ये बसलेला असतो तो सिन)

5) प्रत्येकाला अपेक्षित असणारी डिटेल्स ची लेवल वेगळी असते.
कासव मूवी मध्ये मुलगा आत्महत्येचा प्रयत्न करतो, ब्लॅक आउट होतो, पुढच्या सिन मध्ये तो हॉस्पिटल मध्ये असतो. यात तो ब्रिज वर किती वेळ असतो, पोलिसांना कोण बोलावते, पोलीस त्याचा आगपिच्छा शोधत नाहीत का? वगैरे गोष्टी दाखवल्या नाहीत म्हणून तो सामान्य पिक्चर आहे असे सांगणारी पोस्ट FB वर वाचलेली.
तेव्हा पासून माझे अंतःकरण विशाल वगैरे झाले आहे. एकाच पिक्चर मध्ये लोकांना वेगवेगळ्या गोष्टी अपील होऊ शकतात, आणि अपूर्ण वाटू शकतात.

त्यामुळे लोकांनी घेतलेली ऑब्जेशन्स पण ठीकच आहेत म्हणायला लागेल .

झिम्मा पाहिलात तर 2 तास TP होईल, आवडला नाहीच तर त्यातले लूज एन्ड शोधण्यात 3 तास TP होईल.

सिम्बा अजून एक छान पोस्ट
शेवटचे टीपी निरीक्षण अचूक. ९५ टक्के लोकांना पिक्चर आवडलाच आहे. फक्त त्यातल्या काही लोकांनी चुका इग्नोर केल्या तर काही त्या शोधण्याची मजा घेत आहेत. क्रिकेटच्या मॅचनंतर एक्स्ट्रा इनिंगचा पोग्राम लागतो तसे आहे हे Happy

Pages