झिम्मा - मराठी चित्रपट

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 November, 2021 - 07:38

झिम्मा - मराठी चित्रपट

झिम्मा म्हणून एक मराठी चित्रपट आलाय बघा. काय चित्रपट आलाय. या वर्षात मी पाहिलेला सर्वात आनंददायी चित्रपट. तो देखील कोरोना प्रकरण सुरू झाल्यापासून थिएटरला जाऊन पाहिलेला पहिलाच चित्रपट. या स्पेशल ओकेजनला एखादा छान चित्रपट बघणे नशिबी आला हे भाग्यच म्हणावे.

याच चित्रपटावर चर्चा करायला हा धागा.

ज्यांनी अजून पाहिला नाही ते ट्रेलर बघू शकतात. ट्रेलर सुद्धा फार आवडेल.
झिम्मा ट्रेलर - https://www.youtube.com/watch?v=o8EZsgN167A

चित्रपट मराठी आहे. ओटीटीवर बहुधा नाहीये. पण आला तरी तिथे बघू नका. थिएटरलाच बघा. मराठी चित्रपट ईंग्लंडला गेलाय. आपण थिएटरला जायला हरकत नाही Happy

म्हणजे स्टोरी फार सिंपल आणि चार ओळींची आहे बघा. ट्रेलर पाहिला असेल तर हा पॅराग्राफ वाचूही नका. म्हणजे बघा एक साधारण सात आठ बायका आहेत. वेगवेगळ्या स्वभावाच्या, जातकुळीच्या आणि त्याला साजेश्या पार्श्वभूमीमुळे वेगवेगळे प्रॉब्लेम घेऊन आलेल्या.. या सार्‍याजणी मिळून एका ईंग्लंड टूरवर दंगा घालतात. भांडतात, एकत्र होतात, एकमेकींना समजून घेतात, आणि त्यात त्यांचे प्रॉब्लेम सुटत जातात, जगण्याचा नवा दृष्टीकोन मिळतो.. वगैरे वगैरे.. पण हे सारे फारच सुंदर पद्धतीने घडते.

ईतक्या बायका जेव्हा पडद्यावर सतत दिसत राहतात तेव्हा चित्रपटाची फ्रेम तशीही सुंदरच होते. पण याऊपर ईंग्लंड ईतके छान टिपलेय की कमॉन, हा मराठी चित्रपट आहे, जो कधीकाळी लो बजेट समजला जायचा, हे स्वतःला चिमटा काढून सांगावे लागते.

सगळ्या व्यक्तीरेखा अगदी सुरेख आणि ठसठशीत उभ्या केल्यात पण त्या पेलायला जो समर्थ अभिनय लागतो त्यात डावेउजवे करणे कठीण व्हावे ईतका नैसर्गिक केलाय प्रत्येकीने.. अर्थात तरीही निर्मितीताई किंचित भाव खाऊन जातात. नुसत्या एक्स्प्रेशनवर हश्या वसूल करतात. त्यांच्यासाठी एक बदाम एक्स्ट्रा Happy

गाणी आणि पार्श्वसंगीतही चोख.. झिम्मा शीर्षकगीत सतत डोक्यात पिंगा घालून राहणारे.. संवाद चुरचुरीत तसेच तत्वज्ञान सांगणारे वगैरे फुल्ल पॅकेज आहे चित्रपट! म्हणजे बघत असतानाच सतत जाणवत राहते की आज आपण काहीतरी छान बघतोय.

चित्रपटात चुका काढायच्या म्हटल्या तर लॉजिक लाऊन त्या निघतीलही. पण अश्या चित्रपटांत मॅजिक बघायचे असते. तरच ते अनुभवण्यात मजा. म्हणजे बघा ना, बायकोने ईंटरव्हलमध्ये पॉपकॉर्न न घेता आम्ही चित्रपटातच गुंतून राहिलोय हे शेवटचे कधी घडले आठवत नाही. तसेच चित्रपट संपल्यावर शेवटी नावे पडताना स्क्रीनवर एका कोपर्‍यात त्या बायकांच्या व्हॉटसपग्रूपची चॅट दाखवतात. ती सुद्धा शेवटपर्यंत म्हणजे "कबीर लेफ्ट" येईपर्यंत आम्ही खुर्चीत बसून पाहिली, आय मीन वाचली. असंही रोज रोज होत नाही.

अरे हो, त्या व्हॉटसपग्रूपमधून लेफ्ट होणारा हा कबीर म्हणजे सिद्धार्थ चांदेकर, जो त्या टूरचा आयोजक दाखवला आहे. त्याची अभिनयशैली आवडतेच. हा रोल तर त्याचाच होता. तर चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा आणि सोबत चान्स मारत त्यात अभिनयही करणारा हेमंत ढोमे, त्याचे ईतका सुंदर चित्रपट बनवल्याबद्दल कौतुक आणि आभार.

बाकी मला परीक्षण वगैरे लिहिता येत नाही. एवढी चित्रपट समजायची अक्कल नाही माझ्यात.
पण हे बघा, मी हे पाहिलेय, आणि ते मला फार आवडलेय, तुम्हालाही आवडेल... हे चार लोकांना सांगायला मनापासून आवडते म्हणून हा खटाटोप Happy

थोडेसे अवांतर पण गरजेचे -
आम्ही हा चित्रपट नवी मुंबईच्या सीवूड स्टेशनमधील ग्रॅंड सेंट्रल मॉल मधील सिनेपॉलिसला पाहिला. मॉलमध्ये प्रवेश देताना वॅक्सिन सर्टिफिकेट चेक करूनच आत पाठवत होते. थिएटरमध्ये खुर्च्या एक सोडून एकच बूकिंग होते. आम्ही दोघे नवराबायको ईंटरव्हल पर्यंत याच नियमाचे पालन करत मधली खुर्ची सोडून बसलो होतो. पण पुढे पिक्चरचा प्रभाव पडला. जश्या त्या बायका एकमेकींच्या जवळ आल्या तसे आम्हीही मग ईंटरव्हलनंतर बाजूबाजूच्या खुर्चीवर बसूनच पुढचा पिक्चर पाहिला Happy

असो, सांगायचा मुद्दा हा की सोशल डिस्टंन्सिंग पाळले जाते. चिंता नसावी. त्यामुळे तुम्ही एकटे गेलात तरी शेजारी कोणी लगटून बसायला येणार नाही याची खात्री. त्यामुळे बायकांनी बिनधास्त एकटेही जायला हरकत नाही. तसेच पुरुषांच्या वॉशरूममध्येही सोशल डिस्टन्सिंग पाळून युरिनल एक सोडून एक वापरात असल्याने आपले काम चालू असताना बाजूला कोणी येऊन उभा राहत नाही हे ही फार छान वाटले. पुरुषांनीही हा सुखद अनुभव घेण्यास चित्रपटगृहात जायला हरकत नाही. असे एखादे काहीही कारण शोधा, पण हा चित्रपट चुकवू नका Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि अशा रीतीने त्रिशतक झळकवण्यात धागा यशस्वी

हुररा अवांतर धागे खड्याप्रमाणे वेचून वेचून अडमीन यांनी हटवले तरी सरांचे फॅन्स मागे हटले नाहीत आणि त्यांनी सरांनी दिलेला शब्द खरा ठरवला

सर्वांचे अभिनंदन व आभार
आमच्या सरांवर आपला असाच लोभ राहावा ही नम्र विनंती

एका ठराविक व्यक्ती ला ट्रोल करण्यासाठी जास्त असे एकंदरीत चित्र वाटले. >>> हे राम ! हे वाचण्याआधी उठा ले रे बाबा ! मुंग्यांनी मेरूपर्वत गिळला काय ? गब्बरच्या घरी गावकर्‍यांनी दरोडा घातला काय ? बंटी और बबलीला पापभिरूंनी लुटले काय ? मि. नटवरलाल कुणी पांढरपेशाने कुतूबमिनार विकला काय ? हे जर अशक्य असेल तर ट्रोलांचे महागुरू स्वतः कसे ट्रोल होतील ?

उलट ३०० चा आदेश पूर्ण करताना या वेळी किती कठीण आव्हाने होती भक्तांसमोर याचे कौतुक व्हायला हवे होते. भलाई को तो जमाना ही नही रहा. या क्लबमधे समावेश होण्यासाठी सरांचा ट्रोलिंगरूपी तीर्थप्रसाद मिळाला नसल्याने समजू शकतो.

वावे, माझ्यासाठी होतं का? Wink थेट सांगू शकतेस Happy ऋन्मेषला वैयक्तिक उदाहरणाबद्दल जे लिहीलं तेच इतरांना ही लागू. पण नाही घेतली हिंट नि चालूच ठेवलं तर प्रतिसादातलं जेवढ पटलं त्यावर प्रतिसाद द्यायचा. जि चा प्रश्न आवडला कारण सिनेमा इ माध्यमे नकळत माहितीचा प्रसार्/अपप्रचार करत असतात. विमा इ नियम मला माहिती नाहीत पण फॅक्चुअली करेक्ट काय असेल ते दाखवावं. तिथे खरंच विम्याची प्रॉडक्ट प्लेसमेंट हवी होती की कोणता विमा असं ५० वर्ष काळजी घेऊ शकतो.
(ऊप्स ३०० झाले होते की...)

जिज्ञासा! Biggrin
विमा नाही चालायचा. टेस्ला किंवा cryptocurrency किंवा ऍपलला किंवा dividends स्टॉक ला अप्रोच झाले असते तर चांगली प्लेसमेंट झाली असती. शिवाय वर लोकांना इतकं काय काय शिकायला मिळालं त्यात 'गुंतवणूक ' ची भर पडली असती.

काल शेवटी prime वर पहिला,
अगदी 200+ प्रतिसाद शिव्या घालाव्या इतका वाईट वाटला नाही,

काही ठिकाणी बाळबोध वाटतो हे खरे, पण प्रेक्षकांचे avg बौद्धिक वय 13 वर्षे असते, त्यांना प्रसंग उकलून सांगावे लागतात हे सुद्धा खरं

अगदी पहिल्या काही प्रतिसादात घेतलेले आक्षेप डोक्यात ठेऊन पाहिले, तर त्यांची किंचित उत्तरे मिळाली असे वाटतंय कदाचित एडिटिंग मध्ये त्या "थोडक्यात उत्तरे द्या" चे " एका वाक्यात उत्तरं द्या" किंवा " गाळलेल्या जागा भरा" झाले असावे.

1) चित्रपट लंडन मध्ये का घडतो? या सगळ्या बायांना त्यांच्या स्वभावातून बाहेर पडण्यासाठी पूर्ण वेगळ्या सांस्कृतिक वातावरणाची आवश्यकता होती. भारतात अगदी कुठेही गेलेल्या दाखवल्या असत्या तरी निर्मिती सावंत इतक्या सहजपणे पॅण्ट घालून आल्या नसत्या, किंवा पार्कात इतक्या बिनधास्त आडव्या झाल्या नसत्या, बार मध्ये फक्त बाया बाया जाऊन दारू पीत बसल्या नसत्या.
पिक्चर घडायला टिपिकल भारतीय वातावरण नको होते

2) गुज्जू मुलीची व्यक्तिरेखा-
एका प्रसंगात तिचे संसारात आकंठ बुडालेले असणे दाखवले आहे. pre planned ट्रिप ला निघताना शेवटच्या क्षणापर्यंत ती सूचना देत असते, ती सायली संजीव "मनात आले आणि ती गेली" ने इंप्रेस होते. कदाचित पुढचा तिचा एखादा शॉट एडिटिंग मध्ये उडाला असेल.
म्हणजे ठेवला असता तरी लोकांनी फार बालबोधिकरण केले आहे म्हणून शिव्या घातल्या असत्या Wink

3) गूगल वरून पत्ता शोधणे त्यात मोठेसे काय?
मोबाइल बंद पडतो, कुठेतरी जाऊन ती चार्ज करते, डायरेक्शन लिहून घेते आणि फॉलो करत येते.
लिफ्ट मध्ये शिरायला घाबरणाऱ्या , टॉयलेट ला जायचा सोबत नाही म्हणून आवरणार्या मुलीकडून इतके सगळे होणे is a बिग लीप.

4) हे त्यांचे देऊळ: - हे explaination तो कोणाला देतोय ते पण पहा ना!! हे तो सोकू किंवा बांदेकर ला सांगत नाही, निर्मिती सावंत , जिला बाकी कशाचा गंध नसतो तिला देतो, ते अगदीच खटकत नाही.

5) निर्मिती आणि क्षिती जोग चा चर्च मधला प्रसंग आवडला त्या बद्दल लिहितो थोड्या वेळात

सी, तुझ्यासाठी असं नव्हतं. पण आपण सगळे आपल्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित मतं, विचार बनवत असतो, बदलतही असतोच. त्यामुळे वैयक्तिक अनुभव लिहायला हरकत नसली पाहिजे. पण तुझा मुद्दा पण बरोबर होता, की ते पात्र तसा विचार का करतं वगैरे चित्रपटात संवाद, अभिनय यातून पोचलं पाहिजे. पण मग अमांनी वैयक्तिक अनुभवावर आधारित प्रतिसाद लिहिल्यावर, त्यांनी तरी का लिहायचा, असं मला वाटलं म्हणून मी तसं लिहिलं. त्यानंतर अमांनी तेवढा भाग काढून टाकला.

सिम्बा,
अगदी 200+ प्रतिसाद शिव्या घालाव्या इतका वाईट वाटला नाही,
पिक्चर कुणाला आवडलाय, धागा कुणी काढलाय ते बघा की Happy

सिम्बा छान पोस्ट. छान मुद्दे. चर्चच्या प्रसंगाबद्दलही लिहा जरूर.
एकाच प्रसंगाबद्दल विविध दृष्टीकोनातून विचार होतोय, लोकं आपापल्या वैयक्तिक अनुभवांशी रिलेट करून बघत आहेत, ओवरऑल छान चर्चा होतेय. अन्यथा बरेचदा धागा भरकटला की तो माझा असूनही त्यावर मी वाचायचे, लिहायचे सोडून देतो. चालू घडामोडी धाग्यांवर असे बरेचदा होते. पण ईथे तुरळक अवांतर पोस्ट आलेल्या त्याही अ‍ॅडमिनने उडवल्या असल्याने बहुतांश चर्चा विषयालाच धरून होतेय हे देखील चांगले वाटतेय.

पिक्चर कुणाला आवडलाय, धागा कुणी काढलाय ते बघा की Happy >> वावे Happy

सर तुम्ही अवांतर चर्चेबद्दल बोलताय हे वाचून डोळ्यात पाणी आलं
आज किती वेळा रडवणार आहात मला
अकख्या रविवारची मी तुमच्यामुळे साश्रु नयनांनी सगळी कामे केली

बरं मी एक पोस्ट टाकली होती मध्ये ती वाचनात आली का विपु मध्ये टाकू?

निर्मिती सावंत फारच "ही" दाखवली आहे,
अतिशय छोटे अनुभव विश्व, भावना बोलण्यातून सांगायचा प्रॉब्लेम, दुसरा सांगत असलेल्या गोष्टीत समरस न होता आपला समांतर ट्रॅक चालू ठेवणे वगैरे.
अश्या व्यक्तीकडून कोणी कौंसेलिंग सदृश्य संभाषणाची अपेक्षा ठेवली नसती (प्रेजुडीस)
एरवी इन्व्हेस्टमेंट बँकर ची बायको आणि पोलिटीशीअन ची बायको हार्ट to हार्ट बोलतील हे शक्यच नाही.
चर्च मध्ये डिस्त्रब असणाऱ्या क्षिती जोग ला ती सावरते, नेमका मुद्दा स्वतःच्या लिमिटेड व्होकॅब्युलरी मधून सुद्धा पोहोचवते.
इकडे ती अचानक flowing भाषेत बोलायला लागली असती तर कृत्रिम वाटले असते, पण ती तिच्याच भाषेत, तिच्या पाहण्यातले उदाहरण घेऊन बोलते.

एकंदरीत तो प्रसंग कनविनसिंग वाटतो

6) होलटीकल्चर मध्ये इंटरेस्ट असणारी क्षिती फुलांचा वास घाबरत घेते:-
कुणीतरी हटकेल म्हणून ती घाबरत असते, फुलांच्या वासाची भीती नसते तिला. इन जनरल कोणत्याही प्रकारचे कॉनफ्रँटेशन टाळणारे पात्र दाखवले आहे ते.

सिम्बा - मलाही पिक्चर बघताना खूप गोष्टी जाणवल्या नाहीत्, ज्या नंतर इथे वाचताना जाणवल्या. बघताना कंटाळा आला नाही. बघणेबल वाटला पिक्चर. (तुलनेने 'चोरीचा मामला' मी दहा-पंधरा मिनिटांच्या वर पाहू शकलो नाही)

पण एका राजकारण्याच्या बायकोला "हे यांचे देऊळ" इतकी प्राथमिक माहिती द्यावी लागते ? भारतात काय चर्चेस, कॅथीड्रल नाहीत का? मला तो पूर्ण प्रसंग केवळ त्या "मिनी" वर असलेला विनोद करण्याकरता घातला आहे असे वाटले.

बाकी बरेचसे मुद्दे पटले - गुज्जू मुलीला वाटलेले आश्चर्य, गूगल मॅप. लंडनला जाण्याचे कारण ते आहे हे खरे, पण त्याचा तितकासा वापर केलेला नाही चित्रपटात. आपल्याकडेही ज्या स्त्रिया आपल्या घरी/गावात इतक्या मोकळेपणाने वागू शकत नाहीत त्या दुसरीकडे - मनाली वगैरे- ट्रिपला गेल्यावर जितपत मोकळेपणाने वागतात तितपतच या दाखवलेल्या आहेत. फक्त एकच - तो पार्कात सहजपणे आडवे होण्याचा सीन - सोडला तर तसे बाकी कथानक कोठेही चालले असते.

बाय द वे आता लक्षात नाही पण सुचित्रा बांदेकर जेव्हा दारूवरून चिडते तेव्हा तिची मुलगी - सोनाली - तेथेच दारू पित बसलेली असते ना? तो राग त्यावर असेल मग.

स्मिता आणि vave +1
पानेच्या पाने ओलांडून पुढे जावे लागते या silly प्रतिसादापायी, very irritating

फा
नाही सोनाली आणि सायली तेव्हा चांदेकर च्या रूम मध्ये असतात

*सॉरी ते पहिल्या दारूच्या प्रसंगात,
भांडणाच्या प्रसंगात आठवत नाही त्या असतात का तिकडे

पानेच्या पाने ओलांडून पुढे जावे लागते या silly प्रतिसादापायी, very irritating>>>>
चला कोणाला तरी पटलं म्हणायचं माझं म्हणणं
धन्यवाद तुम्हाला

सुचित्रा बांदेकरला रोज रोज दारू पिण्याबद्दल आक्षेप असतो असं मला वाटतंय. पहिल्या दिवशी ती नाही काही बोलत. शिवाय हे मुख्यतः सुहास जोशीमुळे होत असतं, त्यामुळे ती तिला म्हणते की तुम्ही ठरवाल तशीच ही ट्रिप होणार नाहीये वगैरे वगैरे. बाकी बायका कुठल्याच बाजूने आग्रही नसतात.

शिवाय हे मुख्यतः सुहास जोशीमुळे होत असतं>>>>

असे काही नाही. त्या त्यांच्या त्या पीत असतात, कुणालाही तु घेच म्हणून आग्रह नाही करत. सुचेता बांदेकरलाही काय तु घेत नाही वगैरे कोणी बोलत नाही. आणि निर्मिती ताई तर त्यासाठीच रात्रीच्या उठून खोलीत आलेल्या असतात. उलट दारुचा स्टॉक सुहास जोशी सगळ्यांना वाटतात दिलदारपणे

सुचित्रा बांदेकरला रोज रोज दारू पिण्याबद्दल आक्षेप असतो असं मला वाटतंय.
>>>>>

हो.
तसेच हे चूक की बरोबर हा वेगळा मुद्दा झाला. किंबहुना तिची रिॲक्शनसुद्धा चित्रपटात ओवररीॲक्ट केलेय म्हणूनच दाखवले आहे. तिच्या वागण्याचेही समर्थन नाहीये. पण असे कोणी चिडू शकते हे बिलकुल शक्य आहे. म्हणजे असे कोणी चिडते का, उगाच सीन क्रिएट करायचा म्हणून काहीही दाखवलेय असे मला तरी बिलकुल वाटले नाही.

कुणालाही तु घेच म्हणून आग्रह नाही करत.
>>>>
वाद चालू असताना एक बाई घाबरून वा अपराधीपणाची भावना मनात येऊन ग्लास खाली ठेवते. तिला सुहास जोशी पुन्हा दम देत ग्लास ऊचलायला लावते असाही एक सीन आहे बहुधा. कोणाला आठवत असेल तर प्लीज कन्फर्म करा.

ते बांदेकर बाई आक्रस्ताळेपणा करायला लागतात म्हणून घाबरतात. तर सुहास जोशी सांगतात की कशाला घाबरायचं उगाच आपण काय चुकीचे करत नाहीये. बरोबरच आहे ते, उगाच कोणीही येऊन तुम्ही काय दारू पिताय म्हणून आरडाओरडा करू लागला तर कशाला ऐकावे.

पण असे कोणी चिडू शकते हे बिलकुल शक्य आहे. म्हणजे असे कोणी चिडते का>>>
उगाचच आहे, त्यांचा काही एक संबंध नसतो. मला असे कोणी फालतुमध्ये येऊन बोलले तर त्या व्यक्तीला शांतपणे तुझ्या रुममध्ये जा आणि परत इथे येऊ नको असे सांगेन. अगदीच खुमखुमी असेल तर चांदेकरला जाऊन तक्रार कर, इथे कटकट करु नको

मला असे कोणी फालतुमध्ये येऊन बोलले तर
>>>

एक्झॅक्टली!
म्हणजे कोणी असे बोलू शकते.. हे अविश्वसनीय नाहीये.
ईतकाच माझा मुद्दा आहे Happy

सुचित्रा बांदेकरला रोज रोज दारू पिण्याबद्दल आक्षेप असतो असं मला वाटतंय.
>>>>>

हो.
तसेच हे चूक की बरोबर हा वेगळा मुद्दा झाला. किंबहुना तिची रिॲक्शनसुद्धा चित्रपटात ओवररीॲक्ट केलेय म्हणूनच दाखवले आहे. तिच्या वागण्याचेही समर्थन नाहीये. >>> सर मायबोलीवर दारू पिणे वाईट आहे हा झेंडा अतिरेकी पद्धतीने नाचवल्यावर असे मत मांडणे हे स्वतःलाच विरोधाभासी नाही का ? (व्यर्थ आहे हे माहिती असूनही Happy )

झोपायचे असल्याने विचारून टाकतो.
https://www.maayboli.com/node/80969
इथे तुम्ही ओव्हररिअ‍ॅक्ट झालाय असे मान्य केलेय का तुम्ही वरच्या प्रतिसादात ?

चित्रपटात तिची रिॲक्शन ओवररिॲक्ट केल्यासारखी दाखवली आहे असे लिहिले आहे. माझ्यामते नाही. फरक आहे Happy

सर मायबोलीवर दारू पिणे वाईट आहे हा झेंडा...
>>>>

दारू पिणे वाईट आहे हे सर्वमान्य आहे. ते मी म्हणतो म्हणून नाहीये. तुम्ही असे म्हणत आहात जसे मी दारू नामक पेयाला बदनाम करत आहे Happy

Pages