झिम्मा - मराठी चित्रपट

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 November, 2021 - 07:38

झिम्मा - मराठी चित्रपट

झिम्मा म्हणून एक मराठी चित्रपट आलाय बघा. काय चित्रपट आलाय. या वर्षात मी पाहिलेला सर्वात आनंददायी चित्रपट. तो देखील कोरोना प्रकरण सुरू झाल्यापासून थिएटरला जाऊन पाहिलेला पहिलाच चित्रपट. या स्पेशल ओकेजनला एखादा छान चित्रपट बघणे नशिबी आला हे भाग्यच म्हणावे.

याच चित्रपटावर चर्चा करायला हा धागा.

ज्यांनी अजून पाहिला नाही ते ट्रेलर बघू शकतात. ट्रेलर सुद्धा फार आवडेल.
झिम्मा ट्रेलर - https://www.youtube.com/watch?v=o8EZsgN167A

चित्रपट मराठी आहे. ओटीटीवर बहुधा नाहीये. पण आला तरी तिथे बघू नका. थिएटरलाच बघा. मराठी चित्रपट ईंग्लंडला गेलाय. आपण थिएटरला जायला हरकत नाही Happy

म्हणजे स्टोरी फार सिंपल आणि चार ओळींची आहे बघा. ट्रेलर पाहिला असेल तर हा पॅराग्राफ वाचूही नका. म्हणजे बघा एक साधारण सात आठ बायका आहेत. वेगवेगळ्या स्वभावाच्या, जातकुळीच्या आणि त्याला साजेश्या पार्श्वभूमीमुळे वेगवेगळे प्रॉब्लेम घेऊन आलेल्या.. या सार्‍याजणी मिळून एका ईंग्लंड टूरवर दंगा घालतात. भांडतात, एकत्र होतात, एकमेकींना समजून घेतात, आणि त्यात त्यांचे प्रॉब्लेम सुटत जातात, जगण्याचा नवा दृष्टीकोन मिळतो.. वगैरे वगैरे.. पण हे सारे फारच सुंदर पद्धतीने घडते.

ईतक्या बायका जेव्हा पडद्यावर सतत दिसत राहतात तेव्हा चित्रपटाची फ्रेम तशीही सुंदरच होते. पण याऊपर ईंग्लंड ईतके छान टिपलेय की कमॉन, हा मराठी चित्रपट आहे, जो कधीकाळी लो बजेट समजला जायचा, हे स्वतःला चिमटा काढून सांगावे लागते.

सगळ्या व्यक्तीरेखा अगदी सुरेख आणि ठसठशीत उभ्या केल्यात पण त्या पेलायला जो समर्थ अभिनय लागतो त्यात डावेउजवे करणे कठीण व्हावे ईतका नैसर्गिक केलाय प्रत्येकीने.. अर्थात तरीही निर्मितीताई किंचित भाव खाऊन जातात. नुसत्या एक्स्प्रेशनवर हश्या वसूल करतात. त्यांच्यासाठी एक बदाम एक्स्ट्रा Happy

गाणी आणि पार्श्वसंगीतही चोख.. झिम्मा शीर्षकगीत सतत डोक्यात पिंगा घालून राहणारे.. संवाद चुरचुरीत तसेच तत्वज्ञान सांगणारे वगैरे फुल्ल पॅकेज आहे चित्रपट! म्हणजे बघत असतानाच सतत जाणवत राहते की आज आपण काहीतरी छान बघतोय.

चित्रपटात चुका काढायच्या म्हटल्या तर लॉजिक लाऊन त्या निघतीलही. पण अश्या चित्रपटांत मॅजिक बघायचे असते. तरच ते अनुभवण्यात मजा. म्हणजे बघा ना, बायकोने ईंटरव्हलमध्ये पॉपकॉर्न न घेता आम्ही चित्रपटातच गुंतून राहिलोय हे शेवटचे कधी घडले आठवत नाही. तसेच चित्रपट संपल्यावर शेवटी नावे पडताना स्क्रीनवर एका कोपर्‍यात त्या बायकांच्या व्हॉटसपग्रूपची चॅट दाखवतात. ती सुद्धा शेवटपर्यंत म्हणजे "कबीर लेफ्ट" येईपर्यंत आम्ही खुर्चीत बसून पाहिली, आय मीन वाचली. असंही रोज रोज होत नाही.

अरे हो, त्या व्हॉटसपग्रूपमधून लेफ्ट होणारा हा कबीर म्हणजे सिद्धार्थ चांदेकर, जो त्या टूरचा आयोजक दाखवला आहे. त्याची अभिनयशैली आवडतेच. हा रोल तर त्याचाच होता. तर चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा आणि सोबत चान्स मारत त्यात अभिनयही करणारा हेमंत ढोमे, त्याचे ईतका सुंदर चित्रपट बनवल्याबद्दल कौतुक आणि आभार.

बाकी मला परीक्षण वगैरे लिहिता येत नाही. एवढी चित्रपट समजायची अक्कल नाही माझ्यात.
पण हे बघा, मी हे पाहिलेय, आणि ते मला फार आवडलेय, तुम्हालाही आवडेल... हे चार लोकांना सांगायला मनापासून आवडते म्हणून हा खटाटोप Happy

थोडेसे अवांतर पण गरजेचे -
आम्ही हा चित्रपट नवी मुंबईच्या सीवूड स्टेशनमधील ग्रॅंड सेंट्रल मॉल मधील सिनेपॉलिसला पाहिला. मॉलमध्ये प्रवेश देताना वॅक्सिन सर्टिफिकेट चेक करूनच आत पाठवत होते. थिएटरमध्ये खुर्च्या एक सोडून एकच बूकिंग होते. आम्ही दोघे नवराबायको ईंटरव्हल पर्यंत याच नियमाचे पालन करत मधली खुर्ची सोडून बसलो होतो. पण पुढे पिक्चरचा प्रभाव पडला. जश्या त्या बायका एकमेकींच्या जवळ आल्या तसे आम्हीही मग ईंटरव्हलनंतर बाजूबाजूच्या खुर्चीवर बसूनच पुढचा पिक्चर पाहिला Happy

असो, सांगायचा मुद्दा हा की सोशल डिस्टंन्सिंग पाळले जाते. चिंता नसावी. त्यामुळे तुम्ही एकटे गेलात तरी शेजारी कोणी लगटून बसायला येणार नाही याची खात्री. त्यामुळे बायकांनी बिनधास्त एकटेही जायला हरकत नाही. तसेच पुरुषांच्या वॉशरूममध्येही सोशल डिस्टन्सिंग पाळून युरिनल एक सोडून एक वापरात असल्याने आपले काम चालू असताना बाजूला कोणी येऊन उभा राहत नाही हे ही फार छान वाटले. पुरुषांनीही हा सुखद अनुभव घेण्यास चित्रपटगृहात जायला हरकत नाही. असे एखादे काहीही कारण शोधा, पण हा चित्रपट चुकवू नका Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अड्मिन,
माझे प्रतिसाद का उडवले?
इथे इतके ट्रोलिंग उघडपणे चालत एका आयडीचे आणि इतर अवांतर प्रतिसाद ते दिसत नाही का?
डिलीट करताना कारणं देवून करा.
—-
स्मिताश्रीपाद,

बाकी उत्तम लिखाण करणारे म्हणजे चांगलीच व्यक्ती हा एक गैरसमज आहे लोकामध्ये. मी तर पाहिलेय , अतिशय वाईट कुचाळक्या करणारे आयडी हेच आहेत मायबोलीवर.

सिम्बा, छान पोस्ट!
१. बौद्धिक वय १३ आहे म्हणून संत्र सोललं.. नाही ज्युस काढून सर्व केला ही मला पळवाट वाटते. चित्रपट माध्यम नीट वापरलं तर खूप सशक्तपणे वापरता येऊ शकतं. इथे पटकथा आणि दिग्दर्शनात आळस करायचा, काही डोकं न लढवता जे सांगायचं आहे ते संवादात टाकायचं ह्याला अर्थ नाही. आता त्या पार्कातल्या सीनला... भारतात असं मोकळं ढाकळं बसता येत नाही हे शब्दांत न सांगता १३ वर्षाच्या माणसाला अनेक प्रकारे सांगता आलं असतं. आधी निर्मिती सावंत आणि साहेबांचा सीन दाखवायचा.. त्यात नजरांपासून कास्ट, क्लास अनेक गोष्टी दाखवता येतील, आणि आता बाकीच्या बाया लोळल्यावर ते तिला आठवतं दाखवायचं. अंग्रेज पोरी पिकनिकला आलेल्या दाखवायच्या आणि त्यांना बघुन निर्मिती हळूच सैलावताना दाखवायची. निर्मिती सैलावल्यावर एक पुरुष बाजुने जाताना दाखवायचा आणि हिला वाटतं तो हिच्याकडे बघतोय म्हणून निर्मिती हिंदीत त्याच्यावर खेकसायला चालू करते तर तो आधी आपल्याच धुंदीत असतो आणि मग निर्मिती त्याच्याशी बोलत्येय समजल्यावर ब्रिटिश आदबित स्मॉल टॉक करताना दाखवायचा... आणखी शंभर प्रकार तू ही सांगू शकशील.
सगळं शब्दांतून उलगडून सांगितलं कारण प्रेक्षकांना समजलं नसतं, ही शुद्ध पळवाट आहे. सैराट पुराण चालू करत नाही, पण .. Proud
आता चार गौरांगना दाखवून एक्स्टॉचं बजेट वाढलं असतं म्हणायचं असेल तर त्या न दाखवताही अजुन विचार केला तर हजार प्रकार सुचतील. पण तितका विचार पटकथा लेखक आणि दिग्दर्शकाने केला तर!

२. 'हे देऊळ' तो निर्मितीला सांगतो मान्य. पण तो इथे आणि कुठेच कधीच कोणालाच काहीच सांगत नाही. बरं तू कंडक्टर असलास तर एक टूर गाईड घेतला आहे, तो त्या बॅसिलिकात अगदी 'बसयला' गेला काक्वांना घेऊन तरी माझी ना नाही, पण साईट सिईंगची ट्रिप होती इतकं तरी वाटेल ना! भांडणाची आणि ते सोडवण्याची ट्रिप हा तुमचा फोकस असेल, सोल्युशन सांगणे , सगळं सोप्पं तर होतं, सगळी उत्तर आपल्याकडेच असतात हे सांगणे तुमचं इतिकर्तव्य जरी असलं तरी गेला आहात ना लंडनला? मग थोडं तसं वागा ना!
तो प्रसंग फा म्हणतोय तसा निर्मितीच्या 'मिनी' जोकची वातावरण निर्मिती Wink आहे.

३. चर्चच्या प्रसंगा बद्दल परत सगळं कसं सोप्पं होतं, तू स्वतःला दोष देऊ नको. हे निर्मिती सांगते त्यात चूक काहीच नाही. त्याने क्षिती एनलायटन होणार आहे हे दाखवायचं आहे. ठीक आहे. पण परत आळशीपणा.
क्षितीला जी समस्या डाचत आहे, ती तिच्या मनात अनेक वर्षे आहे. निर्मितीने जे सांगितलं ते तिला अनेकांनी सांगितलं असणार आहे. तिची बहिण दाखवली आहे, ती प्रेमळ दाखवली आहे. मग निर्मितीच्या काऊंसेलिंगने एनलायटन व्हायचं तर त्यात काही तरी मॅजिक टाका. क्लिशे... तिच्या मनात ज्योत पेटली आणि येशू हसला... मेणबत्ती थरथरत होती ती स्थिर झाली... हे अगदीच मेलोड्रमॅटिक झालं. पण नुसती तीन वाक्यं बोलली आणि आनंदी आनंद गडे नको. एकतर ते इतकं सोपं नाही, ती समस्या काहीशी क्रॉनिक आहे... पण ठीक आहे, तुम्हाला ते व्ह्यायला हवं आहे ना? मग काही तरी मॅजिक (फिगर्टिव्ह) करा. नुसतं रिकामं चर्च वापरायचं हा टिकमार्क चेक केल्यासारखं चर्च दाखवू नका.

बरंच काही लिहिता येईल. शेवटी मला इतकंच म्हणायचं आहे की जे सीन आहेत ते ठीकच आहेत. त्याचा गोषवारा तोच ठेवून पटकथा/ दिग्दर्शन सुधारलं तर ते कन्विंसिंग वाटू शकतील.
बांदेकरच्या मनात साचलेला राग आहे, तो उफाळून यायला दारू हे एक निमित्त आहे. हे थोडा विचार केल्यावर समजलं. पण कन्विंस व्हायला काय करता येईल याचा दिग्दर्शक विचारच करत नाही. मग ते प्रसंग जिवंत कसे वाटतील?
बाकीच्या तुझ्या पोस्टमधले मुद्दे बर्‍यापौकी पटले.

प्रशासक, कारवाई करण्यासाठी पातळी सोडून अपशब्द वापरणे जरुरी आहेच का? ह्या नियमाचा पुनर्विचार होईल का? तुम्ही प्रतिसाद उडवत आहात असे वर वाचले, त्यावरून हे वर्तन तुम्हाला वावगं वाटत आहे हे जगजाहीर आहे. ते उडवणे पुरेसे ठरत नाहीये तर कडेलोट होण्याची वाट कशाला बघा? ताकीद, काही दिवसांसाठी फ्रीज, काही ठिकाणी फ्रीज, दिवसातील # पोस्ट वर लिमिट, डीलेड पोस्ट, सिलेक्टिव्ह मॉडरेशन.. इ. पैकी काही सोयी करता येतील का?

अपशब्द वापरून कारवाई केली तरी काही क्षणात पुनरागमन होतेच, त्यामुळे आयडी उडवण्यापेक्षा वरील उपाय जास्त परिणामकारक ठरतील असे वाटते. या धाग्याशी संबंधित नाही, ...पण आहे ही!

ओके वावे, मला जरा टोटल लागली नव्हती. आता समजलं. वैयक्तिक अनुभव लिहीण्यास हरकत काहीच नाही पण सिनेमातील पात्र बघताना तेवढीच एक फूटपट्टी वापरली जात नाही/जाऊ नये. बरेच वेळा वैयक्तिक विश्वापेक्षा फार भिन्न असे पात्र असते उदा: एनएच-१० मधली दिप्ती नवल. अशी ऑनर किलिंग मानणारी आई आपल्या आसपास अपवादानेच आढळेल पण प्रेक्षकाला तरीही ती कन्व्हिंसिंग वाटते. तसं झिम्मामध्ये काहीच विश्वास बसेल असं वाटलं नाही किंवा हेराफेरी मध्ये जसं suspension of disbelief होतं की डोकं लावायचं नाही, तसं ही नाही झालं. काहीतरी त्रिशंकू अवस्था झाली.

माय लर्निन्ग इज कोणत्या ही विषयावर सरांचा धागा आला व आपले मत वेगळे असले तर वेगळा धागा काढून तिथे लिहायचे किंवा वाहत्या पानावर मत व्यक्त करायचे. त्यांना आत्म क्लेश द्यायचे नाहीत. ह्याची काळजी मी आपण हूनच घेइन माझ्या इथल्या पोस्टी डिलीट केल्या तर नो इशूज.

म्हणजे थोडक्यात बरेच विषय स्पर्श करायचे होते पण नुसतेच जवळ जाऊन सोडून दिलेत.(इथे मला फिबी चं लग्न रिहर्सल मधलं भाषण आठवतं.)

हे सर्व एडिटिंग किंवा काही पैश्यांच्या कमी मुळे होत असेल तर माहीत नाही.

मला मुळात स्वेच्छेने सुहास जोशींच्या खोलीत येऊन पिण्यावरून झापणं झेपलं नाही.दारू पिणारे/न पिणारे शक्यतो एकमेकांना सुधारण्याच्या फंदात पडत नाहीत.न पिणारे थम्सअप सोडा किंवा स्टार्टर खात बसतात.(फक्त ऑफिस पार्टीत कॉन्ट्री मध्ये दारूमुळे रक्कम खूप वाढली तरच भांडणं होतात.) पण हाही त्या पात्राच्या वागणुकीचा दोष म्हणून सोडून देऊ.सोकू ला त्या चांदेकर शी जमवायचं होतं असं वाटत नाही.तिला फक्त अरेंज लग्नापूर्वी स्वतःचा थोडा स्पेस आणि माफक फ्लरटींग(म्हणजे आयुष्यात हॅप्पनिंग वगैरे) हवं असेल.
क्षिती जोग चं पात्र पण पटलं.अशी बरीच असतात आजूबाजूला. शिवाय आपल्या देशात अतिशय हुशार असलं तरी परक्या भाषेत, वातावरणात गोष्टी सुचत नाहीत पटकन.

क्षितीला जी समस्या डाचत आहे, ती तिच्या मनात अनेक वर्षे आहे. निर्मितीने जे सांगितलं ते तिला अनेकांनी सांगितलं असणार आहे. तिची बहिण दाखवली आहे, ती प्रेमळ दाखवली आहे. मग निर्मितीच्या काऊंसेलिंगने एनलायटन व्हायचं तर त्यात काही तरी मॅजिक टाका.
>>
कधीकधी दुसरे कुणी समजावायची गरज नसते.
तुम्ही तुमच्या नेहमीच्या परिस्थिती पासून लांब गेलात, वेगळी चेलेंजेस फेसा केलीत, वेगळ्या लोकांना भेटलात ह्यानेही फरक पडतो.
कधीकधी तुमच्यासाठी सुद्धा ते अती झालेलं असतं - तुम्हालाही त्यातून बाहेर पडायचं असतं - मग बुडत्याला काडीचा आधार मिळतो..
उतू जाऊ पहाणाऱ्या दुधावर पाण्याचा हापका हळूच मारावा तस...

आणि अशा बायका पाहिल्यात. त्यांच्यावर काही पडलाच नाही त्यामुळे आणखीनच कॉन्फिडन्स जाऊन काहीच ना करू शकना र्या. विश्व विस्तारित व्हायला स्कोप नसल्याने (स्वतःच्याच कर्माने सकोप घालवलेल्या) त्या च त्याच भित्या, दुःख कुरवाळणाऱ्या.

तिची बहीण ठरवून तिला एकटीला पाठवते अस वाटल. पण त्यानी तस explicitly दाखवलं असतं तर पब्लिक म्हणाल असतं की संत्र सोललीत - अभिनया तून दाखवायच ना

झिम्मा कालच पहिला prime वर, मला छान वाटला, आवडला म्हणायला हरकत नाही, मुळात मी मूवी बघताना तो मनोरंजन म्हणून बघते, जास्त उहापोह करत नाही, असेच का आणी तसेच का? व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, आपण जे अगदी सोप्पं समजतो ते दुसऱ्यासाठी अवघड हि असू शकते, वक्तीच्या बाजूचा परिसर, झालेले संस्कार, जडणघडण, आलेले अनुभव यावर त्यांच्या प्रतिक्रिया अवलंबून असतात. जसे निर्मिती सावंत लंडन ला आल्यावर ही आपली मंदिर किती भारी हेच विचार करत असते. निर्मिती चा कधी कधी आपणच आपल्यावर निर्बंध लादत असतो हे अगदि आवडल.

असाच एक मूवी आला होता, तीन मैत्रिणी नवऱ्याला देवस्थान जातो असं सांगून कुठ्ल्याशा रिसॉर्ट वर गेल्या होत्या आणी नवरे हि तिथेच बायका नाही म्हणवून मजा करायला आलेली छान होता तोही मूवी कॉमेडी.

मला मूवी बघितल्यावर आताच छान वूमन ओन्ली ट्रिप ला निघून जावे असे वाटले, थोडे अवांतर पण वूमन ओन्ली ट्रिप साठी केसरी कि वीणा वर्ल्ड? कोणी गेलंय का? अनुभव share करा ना, नाहीतर धागा असेल तर सांगा.

“ दारू पिणे वाईट आहे हे सर्वमान्य आहे” - चूक.
Submitted by फेरफटका on 31 January, 2022 - 02:48
>>>>>

चूक काय त्यात? अगदी शोले चित्रपटातही अमिताभ जेव्हा मौसीला धर्मेंद्रचे दुर्गुण मोजून दाखवत होता तेव्हा लडका शराब पिता है म्हणाला होता Happy

सरांचे म्हणणे तुम्ही मान्य करत नाही तोवर तो तेवढाच मुद्दा बोलत राहतील आणि मग तिथे कितीही अवांतर झाले तरी त्याना किंवा अडमनीना किंवा silly तत्सम वाटणार्यांना काहीही प्रॉब्लेम नसेल

चालू द्या तुमचं मस्त चाललं आहे
शेवटी सर हे सर आहेत

ऋन्मेष, मला वाटते त्यांचा आक्षेप 'हे सर्वमान्य आहे' ह्याला आहे. मौसीला (आणि कदाचित अमिताभला) मान्य आहे, पण धर्मेंद्रला नाही. मग सर्वमान्य म्हणता येत नाही.

आशुचँप, मला तुम्ही आणि तुमचे लिखाण आवडते. तुमच्या लिखाणाचा मला व्यक्तिशः फायदा झालेला आहे. त्याबद्दल नंतर केव्हातरी लिहीन.
सरांना सोडा आता. त्यांचे ट्रोलिंग चालू असताना जे आयडी इरीटेट होत नव्हते ते आता उगवलेले आहेत. प्रशासन तलवारबाजी करत आहे. मी या आयडीने कोणतेच लिखाण केलेले नाही. पण तुमचा आयडी जाऊ नये असे मनापासून वाटते. सोडा आता.

दारू पिणे वाईट आहे हे सर्वमान्य आहे>>>>>

सर्वमान्य म्हणजे अगदी १००% का?

कारण मला मान्य नाही.

@ हरचंद
मराठी माझे अफलातून नाही. त्यामुळे सर्वमान्य हा शब्द चुकला असेल. पण मुळात ईथे धर्मेंद्रला मान्य आहे की नाही हा प्रश्नच नाही. कारण ईथे वैयक्तिक मत लक्षात घ्यायचेच नाहीये. फॅक्ट मॅटर करते. जसे की डायबेटीजच्या पेशंटने गोड खाऊ नये हे फॅक्ट आहे. मग ते अमिताभला मान्य आहे का धर्मेंद्रला याने फरक पडत नाही.
दारू वाईट आहे म्हणूनच तर आजवर किराणा दुकानात मिळत नव्हती. वा म्हणूनच तर दारूच्या जाहीरातींवर बंदी आहे. वा म्हणूनच तर ड्युटीवर दारू पिऊ नये असे नियम असतात. आता गटार साफ करणारे दारू पिऊनच ऊतरतात अश्या पळवाट नको. मुळात ही वरची उदाहरणे दारू वाईट असते हे सिद्ध करायला नाहीयेत, तर ती वाईट आहेच हे सिद्ध आहे म्हणून वरचे नियम आहेत.
बाकी दारूला वाईट म्हणताच अल्पश्या प्रमाणात दारू पिणारेही हे पर्सनली घेतात आणि वाद होतो हा अनुभव नेहमीचा आहे. यात मी त्यांना दोषही देत नाही. पण जे आहे ते आहे. येणाऱ्या पिढीला बीअर आणि बोर्नविटा एकच वाटू नये यासाठी असे वाद वेळोवेळी होत राहिलेले चांगले Happy

असो. सविस्तर चर्चा दारूच्या धाग्यावर झालेली आवडेल. या पोस्टनंतरची चर्चा मी तिथे नेतो Happy

कुठलाही अपशब्द न वापरता लिहिल्या पोस्टी उडवायचे कारण द्यावे. कारण त्यामुळे प्रशासन नक्की कुठली पोलीसी नुसार करते हे कळेल.
माझ्य्स पोस्टीत ना अपशब्द होते ना कुणाचे उगाच केलेले ट्रोलिंग पण इतर अनेक आयडी नित्यनेमाने सरास ट्रोलिंग करत आले आहेत, अपशब्द न वापरला तरी ट्रोलिंग करतात त्याचे काय?

Simbaa, vavae, Smita Prasad +1 >> ओ नानबा, माझं नाव बदललं की ओ तुम्ही Wink

सरांचे म्हणणे तुम्ही मान्य करत नाही तोवर तो तेवढाच मुद्दा बोलत राहतील आणि मग तिथे कितीही अवांतर झाले तरी त्याना किंवा अडमनीना किंवा silly तत्सम वाटणार्यांना काहीही प्रॉब्लेम नसेल >>
आशुचँप , मुळात प्रॉब्लेम एखाद्या व्यक्तीची टर उडवणे यासाठी होता....
सर सर असं म्हणत दिल्या जाणार्‍या कमेंट ची सुरुवातीला मजा वाटली पण जेव्हा खुपच व्हायला लागलं तेव्हा कंटाळा आला होता... .
ऋन्मेऽऽष मुद्दा पटवण्यासाठी जे एकामागोमाग एक पोस्ट पाडत बसतो ते पण अजिबात आवडत नाहीत... पण माझ्याकडे दुर्लक्ष करायचा पर्याय आहे सो मी ते करते... तो अशा पोस्टीवर पोस्टी पाडतो म्हणुन त्याला उगीच चिडवत बसणे मला व्यक्तीशः योग्य वाटले नाही म्हणुन मी अशी पोस्ट टाकली.... मस्करी ची कुस्करी व्हायला लागली की त्यात काही मजा नाही... असो...
मला खरच तुमचं लेखन खुप आवडतं... व्यक्तिशः तुमच्याशी माझं काहीच भांडण नाहिये... एखादा उणा अधिक शब्द लिहिला गेला असेल तर क्षमस्व.

झंपी, अहो माझी पण पोस्ट उडाली. या आधीही उडाल्या आहेत एक दोन वेळा. चालायचंच. सुक्या बरोबर ओले जळते कधी कधी. तेवढा अवकाश द्यायला हरकत नाही ना ॲडमिनना? त्यांचीही इतर व्यवधाने सांभाळून ते ही जबाबदारी पार पाडत आहेत. मी जेव्हा काही महत्त्वाचे मायबोलीवर किंवा कुठेही लिहीते तेव्हा त्याची एक प्रत माझ्याकडे ठेवते. बाकी मग इकडे तिकडे लिहिलेले काही चुकूनमाकून उडाले तर मग त्याचे काही वाईट वाटून घेत नाही. माझे सांभाळण्याजोगे लेखन सांभाळण्याची जबाबदारी माझी आहे.

स्मिता हे तुम्हाला वैयक्तिक उद्देशून नव्हते

पण जेव्हा हाच आयडी चांगले चाललेली चर्चा, धागे विस्कटून, अवांतर बोलून, जिथे तिथे मी, माझं, गर्लफ्रेंड शाहरुख घुसवून विकृत आनंद (होय हाच शब्द आहे जो मी मागेही म्हणलं होत, की त्याला विकृत आनंद मिळतो लोकांना त्रास द्यायला, आणि तो चिडत नाही, संयम बाळगतो वगैरे प्लिजच तुमच्याकडे ठेवा, तो चिडला की वेगळ्या आयडीने येऊन शिवीगाळ करतो हे कैक वेळेला अनुभवले आहे) घेत होता तेव्हा लोकं म्हणायचे ते सोडून दुसरे धागा वाचा
आज आता तेच लोकं स्वतःवर आल्यावर तसे वागत नाहीत
मुळात जिथे तो नाहीये आशा कुठल्याही धाग्यावर चर्चा भरकटत नेली, सर सर असे काही लिहिलं आहे हे दाखवून द्यावे, त्याच्याही चांगल्या धाग्यावर केलेलं नाही
जे काही आहेत ते तीन चार धाग्यावर सुरू आहे आणि अकख्या मायबोली वरचे इतके सकस लिखाण सोडून तुम्हाला तेच वाचायला यायचं असेल आणि त्यावरून त्रागा करायचा असेल तर चालू द्या

माझ्यावर वेगळा धागा काढा. ईथे झिम्मावर चर्चा करूया का. कारण झिम्मावर खरेच चांगली चर्चा चालू आहे/झाली आहे.
मी माझ्यावर आलेल्या पोस्ट टाळत आहे. त्यावर भाष्य करणेही टाळत आहे. पण हि विनंती झिम्मा या मराठी चित्रपटासाठी..

आणि वर यांचा असा मानभावीपणा हसूच येतं
वरती कित्येक पोस्ट दारू वर लिहुन हे म्हणतात चर्चा चित्रपटावर करा

माझ्यावर वेगळा धागा काढा म्हणे
गेंडा पण लाजेल सरांना बघून Happy

माझ्यावर वेगळा धागा काढा. ईथे झिम्मावर चर्चा करूया का. कारण झिम्मावर खरेच चांगली चर्चा चालू आहे/झाली आहे.
मी माझ्यावर आलेल्या पोस्ट टाळत आहे. त्यावर भाष्य करणेही टाळत आहे. पण हि विनंती झिम्मा या मराठी चित्रपटासाठी.. >> हीच गोष्ट अनेकांनी अनेक धाग्यावर तुम्हाला सांगितली आहे सर. अशी विनंती तुमच्याकडून येणे ही सुधारणेची पहिली पायरी समजावी कि एक्स मॅन सारख्या आयडीने शिवीगाळ होईल असे समजावे ?

आणि कामात असताना कशाला उगाच विनंत्या ?

अशी विनंती तुमच्याकडून येणे ही सुधारणेची पहिली पायरी समजावी>>>

चुकतेय तुमचं, सुधारणा आपण घडवायची आहे आपल्यात
त्यांना त्यांचे काही चुकलं आहे हेच मान्य नाहीये
आणि कदापि होणारही नाही
वर त्यांना आता स्वतःवर एक धागा काढून हवाय किती ती लाल करून घ्यावी एखाद्याने स्वतःची
आणि त्यावर बोललो तर नैतिकतेच पुळका आलेले मायबोलीकर आपल्यावर टीका करायला टपलेच आहेत

मी आज माझी ट्रेकिंग ची लेखमाला सुरू करतोय
पहिला भाग लिहून झालाय
आवडेल वाचायला अशी आशा आहे

Pages