झिम्मा - मराठी चित्रपट
झिम्मा म्हणून एक मराठी चित्रपट आलाय बघा. काय चित्रपट आलाय. या वर्षात मी पाहिलेला सर्वात आनंददायी चित्रपट. तो देखील कोरोना प्रकरण सुरू झाल्यापासून थिएटरला जाऊन पाहिलेला पहिलाच चित्रपट. या स्पेशल ओकेजनला एखादा छान चित्रपट बघणे नशिबी आला हे भाग्यच म्हणावे.
याच चित्रपटावर चर्चा करायला हा धागा.
ज्यांनी अजून पाहिला नाही ते ट्रेलर बघू शकतात. ट्रेलर सुद्धा फार आवडेल.
झिम्मा ट्रेलर - https://www.youtube.com/watch?v=o8EZsgN167A
चित्रपट मराठी आहे. ओटीटीवर बहुधा नाहीये. पण आला तरी तिथे बघू नका. थिएटरलाच बघा. मराठी चित्रपट ईंग्लंडला गेलाय. आपण थिएटरला जायला हरकत नाही
म्हणजे स्टोरी फार सिंपल आणि चार ओळींची आहे बघा. ट्रेलर पाहिला असेल तर हा पॅराग्राफ वाचूही नका. म्हणजे बघा एक साधारण सात आठ बायका आहेत. वेगवेगळ्या स्वभावाच्या, जातकुळीच्या आणि त्याला साजेश्या पार्श्वभूमीमुळे वेगवेगळे प्रॉब्लेम घेऊन आलेल्या.. या सार्याजणी मिळून एका ईंग्लंड टूरवर दंगा घालतात. भांडतात, एकत्र होतात, एकमेकींना समजून घेतात, आणि त्यात त्यांचे प्रॉब्लेम सुटत जातात, जगण्याचा नवा दृष्टीकोन मिळतो.. वगैरे वगैरे.. पण हे सारे फारच सुंदर पद्धतीने घडते.
ईतक्या बायका जेव्हा पडद्यावर सतत दिसत राहतात तेव्हा चित्रपटाची फ्रेम तशीही सुंदरच होते. पण याऊपर ईंग्लंड ईतके छान टिपलेय की कमॉन, हा मराठी चित्रपट आहे, जो कधीकाळी लो बजेट समजला जायचा, हे स्वतःला चिमटा काढून सांगावे लागते.
सगळ्या व्यक्तीरेखा अगदी सुरेख आणि ठसठशीत उभ्या केल्यात पण त्या पेलायला जो समर्थ अभिनय लागतो त्यात डावेउजवे करणे कठीण व्हावे ईतका नैसर्गिक केलाय प्रत्येकीने.. अर्थात तरीही निर्मितीताई किंचित भाव खाऊन जातात. नुसत्या एक्स्प्रेशनवर हश्या वसूल करतात. त्यांच्यासाठी एक बदाम एक्स्ट्रा
गाणी आणि पार्श्वसंगीतही चोख.. झिम्मा शीर्षकगीत सतत डोक्यात पिंगा घालून राहणारे.. संवाद चुरचुरीत तसेच तत्वज्ञान सांगणारे वगैरे फुल्ल पॅकेज आहे चित्रपट! म्हणजे बघत असतानाच सतत जाणवत राहते की आज आपण काहीतरी छान बघतोय.
चित्रपटात चुका काढायच्या म्हटल्या तर लॉजिक लाऊन त्या निघतीलही. पण अश्या चित्रपटांत मॅजिक बघायचे असते. तरच ते अनुभवण्यात मजा. म्हणजे बघा ना, बायकोने ईंटरव्हलमध्ये पॉपकॉर्न न घेता आम्ही चित्रपटातच गुंतून राहिलोय हे शेवटचे कधी घडले आठवत नाही. तसेच चित्रपट संपल्यावर शेवटी नावे पडताना स्क्रीनवर एका कोपर्यात त्या बायकांच्या व्हॉटसपग्रूपची चॅट दाखवतात. ती सुद्धा शेवटपर्यंत म्हणजे "कबीर लेफ्ट" येईपर्यंत आम्ही खुर्चीत बसून पाहिली, आय मीन वाचली. असंही रोज रोज होत नाही.
अरे हो, त्या व्हॉटसपग्रूपमधून लेफ्ट होणारा हा कबीर म्हणजे सिद्धार्थ चांदेकर, जो त्या टूरचा आयोजक दाखवला आहे. त्याची अभिनयशैली आवडतेच. हा रोल तर त्याचाच होता. तर चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा आणि सोबत चान्स मारत त्यात अभिनयही करणारा हेमंत ढोमे, त्याचे ईतका सुंदर चित्रपट बनवल्याबद्दल कौतुक आणि आभार.
बाकी मला परीक्षण वगैरे लिहिता येत नाही. एवढी चित्रपट समजायची अक्कल नाही माझ्यात.
पण हे बघा, मी हे पाहिलेय, आणि ते मला फार आवडलेय, तुम्हालाही आवडेल... हे चार लोकांना सांगायला मनापासून आवडते म्हणून हा खटाटोप
थोडेसे अवांतर पण गरजेचे -
आम्ही हा चित्रपट नवी मुंबईच्या सीवूड स्टेशनमधील ग्रॅंड सेंट्रल मॉल मधील सिनेपॉलिसला पाहिला. मॉलमध्ये प्रवेश देताना वॅक्सिन सर्टिफिकेट चेक करूनच आत पाठवत होते. थिएटरमध्ये खुर्च्या एक सोडून एकच बूकिंग होते. आम्ही दोघे नवराबायको ईंटरव्हल पर्यंत याच नियमाचे पालन करत मधली खुर्ची सोडून बसलो होतो. पण पुढे पिक्चरचा प्रभाव पडला. जश्या त्या बायका एकमेकींच्या जवळ आल्या तसे आम्हीही मग ईंटरव्हलनंतर बाजूबाजूच्या खुर्चीवर बसूनच पुढचा पिक्चर पाहिला
असो, सांगायचा मुद्दा हा की सोशल डिस्टंन्सिंग पाळले जाते. चिंता नसावी. त्यामुळे तुम्ही एकटे गेलात तरी शेजारी कोणी लगटून बसायला येणार नाही याची खात्री. त्यामुळे बायकांनी बिनधास्त एकटेही जायला हरकत नाही. तसेच पुरुषांच्या वॉशरूममध्येही सोशल डिस्टन्सिंग पाळून युरिनल एक सोडून एक वापरात असल्याने आपले काम चालू असताना बाजूला कोणी येऊन उभा राहत नाही हे ही फार छान वाटले. पुरुषांनीही हा सुखद अनुभव घेण्यास चित्रपटगृहात जायला हरकत नाही. असे एखादे काहीही कारण शोधा, पण हा चित्रपट चुकवू नका
धन्यवाद,
ऋन्मेष
आणखी कोणी झिम्मा पाहिला का आज
आणखी कोणी झिम्मा पाहिला का आज?
मराठी चित्रपटाचा धागा आहे. थिएटरात ३०० करोड आपण करू शकत नसलो तरी मायबोलीवर ३०० प्रतिसाद तरी करू शकतो.
कामात बिझी होतो. घाईतच धागा
कामात बिझी होतो. घाईतच धागा काढला आणि घाईतच लिंक दिली. त्यामुळे चुकीच्या धाग्याची दिली.
त्यामुळे आपणा सर्वांची गैरसोय झाली आणि तरीही आपण तक्रार केली नाही याबद्दल सर्वांचे कौतुक.
या वेळी अचूक लिंक दिली आहे.
https://www.maayboli.com/node/80964
झिम्मा आवडला नाही हे वाचून बर
झिम्मा आवडला नाही हे वाचून बर वाटल.
डिझाईनर बॅग्ज फ्लाँट करत , लास वेगासला जाऊन व्होडका वगैरे पिणार्या,किंवा हुक्का बारमध्ये जावून हुक्का ट्राय करणार्या बायाचे फोटो बघतोय असच वाटत होत चित्रपट बघताना.
तो स्वप्नील जोशीचा बळी पण तितकाच भंकस आणि चाईल्डीश आहे.
अमितव
अमितव

"चित्रपटात काय न दाखवल्यामुळे 'हुश्श' झालं" असंही काही वेळा होतंच की. तसं आहे हे! वेडिंगचा शिनेमामधे शेवटी स्वप्नील जोशी प्रकट न होता श्रेयस तळपदे प्रकट होतो तेव्हाही मला असंच 'हुश्श' झालं होतं
सिद्धार्थ चांदेकरची कामं आवडतात, पण तोचतोचपणा वाटतो आता. गुलाबजाम, वजनदार आणि आता झिम्मा.
ऋन्मेष, मलाही आवडला होता
ऋन्मेष, मलाही आवडला होता झिम्मा .... इथे पहिल्या आठवड्यात तिकीटे न मिळाल्याने दुसऱ्या आठवड्यात सहकुटुंब सहपरिवार पाहिला होता... आईलाही घेऊन गेले होते... तीन पिढ्यांनी एकत्र बघून मजा घेता येईल असे चित्रपट हल्ली निघत नाहीत त्यामुळे आणि एकंदरीतच सर्वांचा सहज अभिनय, गंभीर विषयाची हलकीफुलकी मांडणी ....शिवाय करोना काळात थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पहायला न मिळाल्याने मनसोक्त आनंद लुटला.... !!!
मला आवडला. फार अपेक्षा ठेवून
मला आवडला. फार अपेक्षा ठेवून पहायला सुरुवात केली नव्हती म्हणून बरा वाटला. अगदी नावं ठेवावी असाही नाही आणि नावाजावा असाही नाही. टिपी आहे.
झिम्मा - आवडावा असा नाहीये.
झिम्मा - आवडावा असा नाहीये. अगदीच फालतू आहे असाही नाहीये.
मी इकडे प्रतिसाद दिलाच नाही
मी इकडे प्रतिसाद दिलाच नाही का? राहिला वाटतं.
झिम्मा मी पण पाहिला.बराय.
मराठी सिनेमांकडून मला जास्त अपेक्षा नसतात म्हणून काही वाटलं नाही.
ऋन्मेष, मलाही आवडला होता
ऋन्मेष, मलाही आवडला होता झिम्मा .... इथे पहिल्या आठवड्यात तिकीटे न मिळाल्याने दुसऱ्या आठवड्यात सहकुटुंब सहपरिवार पाहिला होता... आईलाही घेऊन गेले होते... तीन पिढ्यांनी एकत्र बघून मजा घेता येईल असे चित्रपट हल्ली निघत नाहीत त्यामुळे आणि एकंदरीतच सर्वांचा सहज अभिनय, गंभीर विषयाची हलकीफुलकी मांडणी ....शिवाय करोना काळात थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पहायला न मिळाल्याने मनसोक्त आनंद लुटला.... !!!
Submitted by abhishruti on 28 January, 2022 - 08:32
>>>>
संपुर्ण पोस्टला अनुमोदन
स्पेशली तीन पिढ्यांना एकत्र बघता येतील असे चित्रपट.. पर्रफेक्ट. आमच्याकडेही आम्ही नवराबायको, माझी आई आणि माझी लेक.. तीन पिढ्या तिन्ही चित्रपटप्रेमी.. पिक्चर मोबाईलवर नाही तर टीव्हीवरच कास्ट करून बघतो. आईने बघण्यासारखा असेल तर तिला बोलावतो, लेकीने बघण्यासारखा असेल तर तिला सोबत बसवतो. तिन्ही पिढ्यांनी एकत्र बघावेत असे पिक्चर खरेच हल्ली मोजके निघतात.. ना लेकीला दाखवायची सोय ना आईसमोर बघायची सोय..
तीन पिढ्याना एकत्र
तीन पिढ्याना एकत्र बघण्यासारखा >>>
माझ्या आज्जी ला ( वय 84 ) हौसेने घेऊन गेले होते मी हा चित्रपट बघायला. तिला "मराठी पिच्चर" फार आवडतात.
माझ्या लहानपणी ती मला तिच्यासोबत माहेरची साडी बघायला एकदा घेऊन गेली होती असं आठवतंय. त्या वयात सुद्धा हे भयंकर आहे हे माझ्या बालमनाला जाणवलं होतं. त्यानंतर अजून थोडं मोठं झाल्यावर आजी आजोबांना घेऊन आम्ही दोघी बहिणींनी शाळकरी वयात मैने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है, चाची 420 ई चित्रपट पाहिले .तर या चित्रपट प्रेमी आज्जीला आवडेल आणि त्या निमित्ताने तिला मल्टिप्लेक्स , मॉल ई दाखवता येईल म्हणून उत्साहानं घेऊन गेले..
सुरवात बरी झाली.. आजी मजेत एन्जॉय करत होती
आणि दारू पिण्याचा सीन आला.. तिथेच तिचा मूड गेला.. बायका एकत्र बसून दारवा काय पितात बाई.. असा पुढच्या मागच्या सगळ्यांना ऐकू जाईल असा डायलॉग तिने मारला.
दुसऱ्या दारू पार्टी सीन मध्ये आजी सुचित्रा बांदेकर च्या बाजूने होती.
सोनाली ने सिगारेट ओढली तेव्हा पण तिने काय काय डायलॉग मारले ...आता आठवत नाही...
घरी परत येताना तिला विचारलं, काय आजी आवडला का पिच्चर,
" हा तसा बरा आहे पण फार दारू पिताना दाखवल्यात बायका.. शोभतं का ते" असे उत्तर मिळाले .. मग मी विषय बदलून टाकला..
तात्पर्य - "तीन पिढ्याना आवडणारा" हे पूर्णपणे खरं नाहीये..
सिद्धार्थ चांदेकरच्या जागी
सिद्धार्थ चांदेकरच्या जागी स्वप्नील जोशी असता तर अजून चांगला झाला असता पिक्चर. सायली संजीव कपूरच्या ऐवजी सईला घ्यायला पाहीजे होतं. हिंदीत जर झिम्मा आला तर स्वप्नील जोशीच्या जागी शाहरूख खानला घ्यावं लागेल. चक दे २.० नाव दिलं तर सुपरहीट होईल.
झिम्मा मध्ये काय गंभीर विषय
झिम्मा मध्ये काय गंभीर विषय होता की त्याची मांडणी हलकी-फुलकी झाली म्हणून चांगलं वाटलं?
दुपारी घरी पडायला मिळत नाही हा गंभीर विषय?? ज्येनुइनली विचारते आहे. मला खरच कळलं नाही.
चाईल्ड अॅब्युज , डिप्रेशन
चाईल्ड अॅब्युज , डिप्रेशन (क्लिनिकल डिप्रेशन to be specific you know), म्हातार्या लोकांकडून मदतीची अपेक्षा , Drinking while pregnant issue, तरून पोराला मैत्रिण नसणे, फ्युचर हजबंड सारखा फोन करतो/बोलायचा प्रयत्न करतो/ फार स्वीट वागतो , तरूण माणसाला घरच्या लोकांनी प्रेम करून छ्ळणे (लाडु देणे/रिमोट वर्क न होण्याचा तगादा लावणे, वगैरे) हे सर्व गंभीर विषय डिल केलेत. अगदी हसण्यावारी नेवून डील केलेत.
https://www.instagram.com/p
https://www.instagram.com/p/CZDw5g4JGTW/
झिम्मा मध्ये काय गंभीर विषय
झिम्मा मध्ये काय गंभीर विषय होता की त्याची मांडणी हलकी-फुलकी झाली म्हणून चांगलं वाटलं?
>>>>>>
झिम्मामध्ये काय गंभीर विषय होता हे देखील प्रेक्षकांना न कळणे ईतकी हलकी फुलकी मांडणे हेच झिम्माचे यश
झिम्मा चित्रपट दुसर्यांदा
झिम्मा चित्रपट दुसर्यांदा पाहताना मला तो क्वीन चित्रपट आठवला. कंगणा राणावतचा. तो देखील चांगला होता. पण मी फार उशीरा पाहिला. तोपर्यंत त्याबद्दल खूप भारी भारी ऐकले होते. त्यामुळे माझ्या अपेक्षा कदाचित खूप वाढल्या होत्या. त्यामुळे चित्रपट चांगला असूनही माझ्या त्या वाढलेल्या अपेक्षा पुर्ण न झाल्याने मी संतुष्ट नाही झालो. झिम्माबाबत बहुधा बहुतेकांचे हेच झाले असावे.
दुपारी घरी पडायला मिळत नाही
दुपारी घरी पडायला मिळत नाही हा गंभीर विषय?? ज्येनुइनली विचारते आहे. मला खरच कळलं नाही.
Submitted by सीमंतिनी on 29 January, 2022 - 03:50
>>>>
आजही कित्येक बायकांना घरी काम न करता दुपारी लोळत पडायला संकोच वाटतो हा खरेच तुम्हाला गंभीर विषय वाटत नाही?
मला आठवतेय आमच्या जुन्या चाळीत आमच्याकडे एकच बेड होता. त्यावर रात्री माझी आजी झोपायची. मी आणि आईबाबा खाली गाद्या अंथरून झोपायचो. दिवसा मात्र झोपायचे झाल्यास मी आणि बाबा त्या बेडवरच झोपायचो. पण आजी असेपर्यंत आईला कधीच मी आयुष्यात एकदाही त्या बेडवर झोपलेले पाहिले नाही. आणि हो, माझी आई जॉब करायची.
अर्थात आज आमच्या घरातील घड्याळाचे काटे फिरले आहेत. पण आजही कित्येक घरांमध्ये हे चित्र असेलच.
घरात पडायचे कशाला पण ?
घरात पडायचे कशाला पण ? शांतपणे गादीवर झोपायचे.
खूप इंटरेस्टिंग कंमेंट्स
खूप इंटरेस्टिंग कंमेंट्स आहेत !! बऱ्याच अंशी सहमत ..
आधी solution शोधून त्याला प्रॉब्लेम चिकटवण्याची कंमेंट / निरीक्षण फार छान
मला वाटतंय कि नंतर ज्यांनी पहिला त्यांच्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या त्यामानाने त्यांना चित्रपट तेवढा भारी वाटलं नाही
ग्रुप मधले भांडण फारच लुटुपुटुचे वाटत होते , स्क्रिप्ट मध्ये लिहिलंय भांडायचं म्हणून भांडतोय असा होते , मला आधी वाटले कि ह्या सर्व बायकांचे भांडण हा तरुण टूर ऑपरेटर कसे सोडवतो हा बराच चांगला प्रसंग असेल पण तसे काहीच वाटले नाही
सिद्धार्थ चांदेकर स्मोकिंग सिन अनावश्यक वाटला
सिद्धार्थ चा clients घेऊन गेलो मैत्रिणी घेऊन आलो हा पंच खूप छान पण बऱ्याच कंमेंट्स मध्ये सांगितल्या प्रमाणे ते कथेतून यायला हवं होत
एकंदरीत - वेगळी थिम हा मोठा प्लस पॉईंट आहे/होता , चांगल्या पटकथे नि अजून खूप चांगला चित्रपट होऊ शकला असता ....
नया रूप नयी रात
नया रूप नयी रात
या चित्रपटावर पण संशोधन व्हायला हवे.
हा धागा म्हणजे अमानवीय झालाय
हा धागा म्हणजे अमानवीय झालाय
आपोआपच प्रतिसाद गायब होतात
सरांनी हायजॅक केलेल्या
सरांनी हायजॅक केलेल्या धाग्यावरच्या त्यांच्या पाऊलखुणा पुरातत्व खात्याने जपाव्यात इतक्या निगुतीने सांभाळल्या जातात.
सिद्धार्थ क्लायंट घेऊन गेलो..
सिद्धार्थ क्लायंट घेऊन गेलो...मै. घेऊन आलो नंतर तोच पहिला wA ग्रुपमधून बाहेर पडल्यामुळे मै. नसून परत त्या क्लायंटच वाटल्या.
सरांनी हायजॅक केलेल्या
सरांनी हायजॅक केलेल्या धाग्यावरच्या त्यांच्या पाऊलखुणा पुरातत्व खात्याने जपाव्यात इतक्या निगुतीने सांभाळल्या जातात>>>
सर हे मायबोली वरचे निळ्या डोळ्यांचे बालक आहे
सीमा. चाईल्ड अब्यूज गंभीर नि
पण त्या बाईना चाईल्ड अब्युजला
पण त्या बाईना चाईल्ड अब्युजला सामोरे जावे लागणे आणि बायकांनी सज्ञान वयात विना जबरदस्ती दारुचा आनंद घेणे या दोन गोष्टींना एकत्र करण्याचे लॉजिक खरेच कळलं नाही. मी ओरडायला शिकले म्हणे अन्याय झाला तर. इथे नक्की कोण कोणावर अन्याय करत होते?
>>> आयुष्यभर सावली
>>> आयुष्यभर सावली
सॉलिड वर्णन केलस. एका शब्दात सार सांगितलयस.
आशुचँप, मलाही नाही कळले. पण
आशुचँप, मलाही नाही कळले. पण चाईल्ड अब्यूज घडलेल्या व्यक्तीची मानसिकता काय असते याचा काहीच अभ्यास्/माहिती नाही म्हणून मी उगा बेनेफिट ऑफ डाऊट दिला. तिला बायकांनी दारू पिणे आवडत नसेल तरी त्यांच्या रूममध्ये बसायची सक्ती थोडींच आहे? बहुतेक हॉटेलात जिम/स्वीमिंग पूल इ इतर जागाही असतात. बायका पितात तोवर तिकडे जावं. दारू पिऊन उलटी केली, मारामारी केली इ शुद्धीत असणारीला निस्तरायला लागेल असे प्रकार झाले तर भांडणे ठीक पण नाहीतर उगा काय...
मी आधीच शंका व्यक्त केली होती
मी आधीच शंका व्यक्त केली होती, ती खरी निघाली.
चांगला मराठी सिनेमा म्हणजे फक्त ट्रेलर भारी आणि अख्खा सिनेमा म्हणजे नाही पाहिला तरी चालेल असं झालं आहे गेली काही वर्षे.
पूर्वी तो सचिन पिळगावकर, इंग्रजी सिनेमाची कथा ढापुन मराठी सिनेमा करायचा, पण मस्त असायचे त्याचे सिनेमे.
कळायचे पण नाही ढापलय ते. ओरिजनल मराठी वाटायचं.
बायकांनी दारू पिणे आवडत नसेल
बायकांनी दारू पिणे आवडत नसेल तरी त्यांच्या रूममध्ये बसायची सक्ती थोडींच आहे? >>>>
तेच की बाकी जणी आपापल्या खोल्यात आहेत बसलेल्या
तर हिनेही बसावं ना, तिची मुलगी पण नाही जात कोणाला शिकवायला, आगाऊ दिसत असूनही
हिलाच लै खुमखुमी तत्वज्ञान पाजळण्याची
Pages