झिम्मा - मराठी चित्रपट

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 November, 2021 - 07:38

झिम्मा - मराठी चित्रपट

झिम्मा म्हणून एक मराठी चित्रपट आलाय बघा. काय चित्रपट आलाय. या वर्षात मी पाहिलेला सर्वात आनंददायी चित्रपट. तो देखील कोरोना प्रकरण सुरू झाल्यापासून थिएटरला जाऊन पाहिलेला पहिलाच चित्रपट. या स्पेशल ओकेजनला एखादा छान चित्रपट बघणे नशिबी आला हे भाग्यच म्हणावे.

याच चित्रपटावर चर्चा करायला हा धागा.

ज्यांनी अजून पाहिला नाही ते ट्रेलर बघू शकतात. ट्रेलर सुद्धा फार आवडेल.
झिम्मा ट्रेलर - https://www.youtube.com/watch?v=o8EZsgN167A

चित्रपट मराठी आहे. ओटीटीवर बहुधा नाहीये. पण आला तरी तिथे बघू नका. थिएटरलाच बघा. मराठी चित्रपट ईंग्लंडला गेलाय. आपण थिएटरला जायला हरकत नाही Happy

म्हणजे स्टोरी फार सिंपल आणि चार ओळींची आहे बघा. ट्रेलर पाहिला असेल तर हा पॅराग्राफ वाचूही नका. म्हणजे बघा एक साधारण सात आठ बायका आहेत. वेगवेगळ्या स्वभावाच्या, जातकुळीच्या आणि त्याला साजेश्या पार्श्वभूमीमुळे वेगवेगळे प्रॉब्लेम घेऊन आलेल्या.. या सार्‍याजणी मिळून एका ईंग्लंड टूरवर दंगा घालतात. भांडतात, एकत्र होतात, एकमेकींना समजून घेतात, आणि त्यात त्यांचे प्रॉब्लेम सुटत जातात, जगण्याचा नवा दृष्टीकोन मिळतो.. वगैरे वगैरे.. पण हे सारे फारच सुंदर पद्धतीने घडते.

ईतक्या बायका जेव्हा पडद्यावर सतत दिसत राहतात तेव्हा चित्रपटाची फ्रेम तशीही सुंदरच होते. पण याऊपर ईंग्लंड ईतके छान टिपलेय की कमॉन, हा मराठी चित्रपट आहे, जो कधीकाळी लो बजेट समजला जायचा, हे स्वतःला चिमटा काढून सांगावे लागते.

सगळ्या व्यक्तीरेखा अगदी सुरेख आणि ठसठशीत उभ्या केल्यात पण त्या पेलायला जो समर्थ अभिनय लागतो त्यात डावेउजवे करणे कठीण व्हावे ईतका नैसर्गिक केलाय प्रत्येकीने.. अर्थात तरीही निर्मितीताई किंचित भाव खाऊन जातात. नुसत्या एक्स्प्रेशनवर हश्या वसूल करतात. त्यांच्यासाठी एक बदाम एक्स्ट्रा Happy

गाणी आणि पार्श्वसंगीतही चोख.. झिम्मा शीर्षकगीत सतत डोक्यात पिंगा घालून राहणारे.. संवाद चुरचुरीत तसेच तत्वज्ञान सांगणारे वगैरे फुल्ल पॅकेज आहे चित्रपट! म्हणजे बघत असतानाच सतत जाणवत राहते की आज आपण काहीतरी छान बघतोय.

चित्रपटात चुका काढायच्या म्हटल्या तर लॉजिक लाऊन त्या निघतीलही. पण अश्या चित्रपटांत मॅजिक बघायचे असते. तरच ते अनुभवण्यात मजा. म्हणजे बघा ना, बायकोने ईंटरव्हलमध्ये पॉपकॉर्न न घेता आम्ही चित्रपटातच गुंतून राहिलोय हे शेवटचे कधी घडले आठवत नाही. तसेच चित्रपट संपल्यावर शेवटी नावे पडताना स्क्रीनवर एका कोपर्‍यात त्या बायकांच्या व्हॉटसपग्रूपची चॅट दाखवतात. ती सुद्धा शेवटपर्यंत म्हणजे "कबीर लेफ्ट" येईपर्यंत आम्ही खुर्चीत बसून पाहिली, आय मीन वाचली. असंही रोज रोज होत नाही.

अरे हो, त्या व्हॉटसपग्रूपमधून लेफ्ट होणारा हा कबीर म्हणजे सिद्धार्थ चांदेकर, जो त्या टूरचा आयोजक दाखवला आहे. त्याची अभिनयशैली आवडतेच. हा रोल तर त्याचाच होता. तर चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा आणि सोबत चान्स मारत त्यात अभिनयही करणारा हेमंत ढोमे, त्याचे ईतका सुंदर चित्रपट बनवल्याबद्दल कौतुक आणि आभार.

बाकी मला परीक्षण वगैरे लिहिता येत नाही. एवढी चित्रपट समजायची अक्कल नाही माझ्यात.
पण हे बघा, मी हे पाहिलेय, आणि ते मला फार आवडलेय, तुम्हालाही आवडेल... हे चार लोकांना सांगायला मनापासून आवडते म्हणून हा खटाटोप Happy

थोडेसे अवांतर पण गरजेचे -
आम्ही हा चित्रपट नवी मुंबईच्या सीवूड स्टेशनमधील ग्रॅंड सेंट्रल मॉल मधील सिनेपॉलिसला पाहिला. मॉलमध्ये प्रवेश देताना वॅक्सिन सर्टिफिकेट चेक करूनच आत पाठवत होते. थिएटरमध्ये खुर्च्या एक सोडून एकच बूकिंग होते. आम्ही दोघे नवराबायको ईंटरव्हल पर्यंत याच नियमाचे पालन करत मधली खुर्ची सोडून बसलो होतो. पण पुढे पिक्चरचा प्रभाव पडला. जश्या त्या बायका एकमेकींच्या जवळ आल्या तसे आम्हीही मग ईंटरव्हलनंतर बाजूबाजूच्या खुर्चीवर बसूनच पुढचा पिक्चर पाहिला Happy

असो, सांगायचा मुद्दा हा की सोशल डिस्टंन्सिंग पाळले जाते. चिंता नसावी. त्यामुळे तुम्ही एकटे गेलात तरी शेजारी कोणी लगटून बसायला येणार नाही याची खात्री. त्यामुळे बायकांनी बिनधास्त एकटेही जायला हरकत नाही. तसेच पुरुषांच्या वॉशरूममध्येही सोशल डिस्टन्सिंग पाळून युरिनल एक सोडून एक वापरात असल्याने आपले काम चालू असताना बाजूला कोणी येऊन उभा राहत नाही हे ही फार छान वाटले. पुरुषांनीही हा सुखद अनुभव घेण्यास चित्रपटगृहात जायला हरकत नाही. असे एखादे काहीही कारण शोधा, पण हा चित्रपट चुकवू नका Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईथल्या कॉमेंट वाचून पिक्चर तिसर्‍यांदा बघावासा वाटू लागलाय... बरेच अँगल मिसलेत मी अजून Lol

हो हे मात्र जाणवलं त्या बागेत झोपलेल्या सीनला‌. अरे तुम्ही गपा ना, प्रेक्षकांना कळुदेत ते फिलिंग. >>>> ऑन ए सिरीअस नोट पुरुष प्रेक्षकांना नाही कळत हे असे बायकांना बागेत झोपताना काय फिलींग आले असावे. मला तरी नाही कळले. त्यांनी सांगूनही नाही पोचले. ईथे वाचलेले तेव्हा समजले. पुढच्यावेळी पुन्हा त्या अँगलने सीन बघितला.. आणि मग आवडला. आधी फक्त निर्मिती सावंतची अ‍ॅक्टींग बघूनच हसायला काय ते आलेले Happy

स्वाती + १
बेजवाबदार टुरिस्ट कंपनी आणि चान्देकर !
एक निर्मिती सावंत सोडून बाकी सगळे धन्य !
ती सायली संजीव तर गायत्री दातार २.० आहे, महावरणभात तुप लुक आणि कपडे जबरदस्तीने हिप्पी , अजिबात शोभत नाही तिला.
सुहास जोशीला ती आज्जी का म्हणते ? इतकी काही लहान नाही दिसत.. सुहास जोशीला काकू म्हणण्याइतकी मोठी नक्कीच दिसते , उगीच येड्यासारखा अल्लडपणा !
सिद्धार्थ चान्देकार गुलाबजाम २.० , आत्ता “ माश्या रे माश्या, थांब तुला तळून खातो”, म्हणेल असं वाटतं !

>>> मला तरी नाही कळले. त्यांनी सांगूनही नाही पोचले
धन्यवाद. हे वाचल्यावर मला या चित्रपटाच्या टार्गेट ऑडियन्सचा काहीसा अंदाज येऊ लागला आहे.

>>> सुहास जोशीला ती आज्जी का म्हणते ? इतकी काही लहान नाही दिसत
वा रे वा! सोकु बांदेकरला आई म्हणते ते बरं चालतं तुम्हाला! Proud

पॉला ऐवजी उषा नाडकर्णीला का घ्या ना पण अमरीश पुरी नि त्याच्या हातावर जोक्स मारू नका बरं....

बंजी जंपिंगला खरचं किती पैसे लागतात? असं का काढून टाकलं ते.... मला खरच हवं होतं - निर्मितीला बंजी जंपिंग करताना बघायला मस्त मजा आली असती. शी इज सो मच मोअर देन हर बॉडी...

हे वाचल्यावर मला या चित्रपटाच्या टार्गेट ऑडियन्सचा काहीसा अंदाज येऊ लागला आहे.
>>>>
हे वाचूनही मला मी नक्की कसल्या प्रकारचा ऑडीयन्स आहे जे त्यांनी मला टार्गेट केले हे सुद्धा नाही समजले Happy
जे चित्रपट फारसा लोड न घेता फक्त चार घटका मनोरंजन म्हणून बघतात?
चित्रपटात दिग्दर्शकाने काहीतरी दाखवायचा प्रयत्न केला आहे ते समजले तर ठिक, वा नाही समजले तरी अडत नाही. मनोरंजन झाल्याशी मतलब असा विचार करणारा ऑडियन्स?
डीडीएलजे ते कभी खुशी कभी गम वा हम आपके है कौन ते अगदी हम साथ साथ है आवडीने पुन्हा पुन्हा बघणारे टारगेट ऑडीयन्स..?

निर्मितीला बंजी जंपिंग करताना बघायला मस्त मजा आली असती.
>>>>>
हो, मलाही तो संवाद ऐकल्यावर चित्रपटात आणि त्यांच्या टूर पॅकेजमध्ये ते असेल असे वाटले. तसेच आणखी तसा एक संवाद होता. फर्स्ट एड बॉक्स म्हणजे ईतके लागेल वगैरे अ‍ॅडवेंचर आहे की काय.... झिंदगी ना मिले दोबारा देखील आठवले तेव्हा.. पण फुस्स काहीच नव्हते

'मिनी लंडनला' का >>> Lol टोटली. तो हे कॅथीड्रल संवाद आणि सीन केवळ त्या "मिनी" जोक करता घातला असावा असे वाटते.

बाय द वे तो बागेत आड्वे होण्याचा सीन हे त्या "प्रेक्षकांना नॅरेशन" केल्याचे उदाहरण नव्हे. तेथे त्या एकमेकींशी बोलतात ते नैसर्गिक वाटते. भारतातील (परदेशात सहज न जाणार्‍या) हाउसवाइव्ह्ज जर अशा पार्क्स मधे गेल्या तर तेथे कोणी "स्टेअर" करत नाही याचे अप्रूप त्यांना साहजिकच वाटेल आणि ते बोलताना ओघाने येईल. मी म्हणतोय त्याचे उदाहरण म्हणजे सिद्धार्थ चांदेकरला मैत्रिणी मिळाल्या हे त्या व्हॉट्सॅप चॅट वरून जाणवते. ते स्वगतात सांगायची गरज नाही. आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीचा स्टीरीओटाइप करू नये हे त्या सीन मधून सांगितले तसे इतर अनेक ठिकाणी करायला हवे होते.

मुख्य कथानक सगळे परदेशात असलेला हा पहिलाच असेल का मराठी पिक्चर?

ते शेवटचं व्हॉट्सॅप चॅट ची आयडीया क्वीन मधून कॅापी आहे.. फरक इतकाच की क्वीन मधे फेसबूक पोस्ट्स दाखवल्यात

मुख्य कथानक सगळे परदेशात असलेला हा पहिलाच असेल का मराठी पिक्चर?

Submitted by फारएण्ड on 25 January, 2022 - 01:25 >>>>>>>

पुष्कर जोग आणि अमृता खानविलकरचा 'वेल डन बेबी' पूर्ण परदेशातला आहे. गेल्या वर्षी प्राईमवर पाहिला होता.

आशय जावडेकरचा DNA सिनेमापण पूर्ण परदेशातला आहे. त्यातले सगळे कलाकार, दिग्दर्शक वगैरे सगळच परदेशातलं आहे. तो भारताआधी अमेरिकेत रिलिज झाला होता.

इथल्या नव्या 66 कमेंट वाचून मजा आली.
पिक्चर घाईत केलाय, बरेच धागे अपुरे सोडलेयत हे खरं.पण बघताना हसू आलं, मजा वाटली.
(मृ गो कुठे होती?कोण म्हणून होती?ती कुंकू मधली मानसी ना?मी जरा गोंधळतेय )

ती मृण्मयी देशपांडे. ही गोडबोले. चि. व चि. सौ. कां मधली.

क्षिती जोगने हेमंत ढोमेशी लग्न केलंय हे माहिती नव्हतं!

स्वातीने टाकलेल्या बऱ्याचशा चुका जानवूनही पिक्चर वान टाईम वॉच वाटला..tp hota.

जोकस वर हसू आल
केमिस्ट्री बरीच चांगली वाटली.

दारू वरुन अशी चिडचीड होते ना पिणार्यांची. सो ते नैसर्गिक वाटले.

ही सिरियल असती तर नक्की नको वाटली असती कारण दळण संपलं नसतं, पाने घालत गेले असते अजून.
मूवी २:३० तासात संपतो, सो चालता है..(त्यातही सलमान खान , शाहरुख खान स्टाईलचे नको वाटतात )
पण प्रत्येक पिक्चर समीक्षा म्हणून पाहिला जात नाही - आणि प्रत्येक ठिकाणी twisted plots, उत्तान दृश्ये f words, हाणामाऱ्या नाकोष्या वाटतात.
(ह्या कीबोर्ड वरुन मराठी भयंकर टाइप होतंय.. नाहीतर मराठी शुद्धीकरण वाळे लोक धावून यायचे अंगावर :D)

भरत जाधव आणि रीमा लागूची मुलगी - यांचा एक सिनेमाही संपूर्ण परदेशात शूट केलेला होता बहुतेक (नाव आठवेना)

वेल डन बेबी - हा पण अ आणि अ वाटला होता. त्यापेक्षा झिम्मा परवडला.
एकतर त्या पु.जो.ला ढिम्म अ‍ॅक्टिंग येत नाही. Uhoh
शिवाय स्क्रिप्ट, कॅमेरा अ‍ॅन्गल्स सगळं अगदी तंतोतंत टेक्स्ट बूक नुसार केल्यासारखं होतं.

असो. इथे विषयांतर नको. झिम्माचा टीपी मस्त चालू आहे. Biggrin

हाहाहा किती ती चिरफाड! सगळे मुद्दे बरोबर आहेत पण इतक्या अपेक्षा ठेवून बघण्याचा हा सिनेमाच नाहीये माझ्या मते.
माझ्यासाठी चांगले टेकअवेज -
१. क्षिती जोग आणि सुचित्रा बांदेकर दोघींना अजून चांगल्या भूमिकांमध्ये पहायला आवडेल! We don't see them enough.
२. निर्मिती सावंत इज द बेस्ट!
३. ज्यु. सो कु बरी आहे की. मला ती याआधी फारशी आवडली नाही कधी. झिम्मा मध्ये तिचं काम चांगलं आहे.

भरत जाधव आणि रीमा लागूची मुलगी - यांचा एक सिनेमाही संपूर्ण परदेशात शूट केलेला होता बहुतेक (नाव आठवेना)
>>>>

भरत जाधव आणि मोहन जोशी - मुक्काम पोस्ट लंडन - बंडल चित्रपट होता असे अंधुकसे आठवतेय. दुसरे लग्न केलेल्या बापाला शोधायला गेलेला...

दारू वरुन अशी चिडचीड होते ना पिणार्यांची. सो ते नैसर्गिक वाटले.
>>>>
+७८६

ऑड मॅन आऊटवाली फिलींग दारूच्याबाबत जास्त तीव्रतेने उफाळून येत चीडचीड होणे हे मी सुद्धा अनुभवलेय. मलाही ते रिलेट झाले. फरक ईतकाच की मी माझ्या स्वभावानुसार रिअ‍ॅक्ट होत नाही. सिनेमातील पात्र त्याच्या स्वभावानुसार रिअ‍ॅक्ट होताना दाखवलेय.
एक वेगळ्या धाग्याचा विषय आहे.

बंजी जंपिंगला जेव्हा निर्मिती बंगी जंपी वगैरे काहीतरी बोलते तेव्हा त्या दोघी कुचाळल्या केल्यासारखे हसतात ते देखील रिलेट झाले. असे ओवरस्मार्ट सापडतात आसपास जे मागच्या जनरेशनच्या लोकांच्या चुकलेल्या ईंग्लिश / आधुनिक शब्दांवरून त्यांची टर ऊडवतात. तो सीन फनी न वाटता संतापजनक वाटतो ते याचसाठी. तोच दिग्दर्शकाचा हेतू होता. असे छोटे छोटे पण बोलके प्रसंग फार आहेत चित्रपटात.

जिज्ञासा +१
सुचित्रा बांदेकरने छानच केलंय काम. तिचं असं छान काम हल्ली खूप दिवसांत बघितलं नव्हतं.
पूर्वी झीवर हम पांच लागायचं त्यात ती होती असं मला वाटतंय. काजलभायला 'गुरुमैया, गुरुमैया' म्हणायची ती हीच होती ना?

सरांना आवडतील आणि फटकेबाजी करता येतील असे प्रतिसाद येऊ लागल्याने सर जाम खुष झालेले दिसत आहेत
नैतर मध्ये त्यांची अगदीच कुचंबणा झाली होती

सर, आता द्विशतक तर व्हायलाच हवं, पाहिजे तर आम्ही मदत करतो

आशुचॅम्प धन्यवाद Happy

थिएटरमध्ये पाहिलेल्यांना आवडलेला. आता ओट्टीटी वर आल्यावर ज्यांनी पाहिला त्यांना तितका रुचला नाही असे साधारण चित्र दिसतेय.
त्यावरून हा थिएटरमध्येच बघायचा पिक्चर होता असा निष्कर्श काढायचा का Happy

मला आवडला प्राईमवर बघूनही.
फार काही तरी ग्रेट दाखवतोय असा आव आणलेला नाहीये त्यामुळे दोष जाणवले तरी सोडून दिले गेले! Happy

सर काढा हो निष्कर्ष, बिनधास्त
तुम्हाला कधी निष्कर्ष काढायला कुठल्या गोष्टींची गरज पडली आहे का, स्टटस्टिक्स वगैरे अंधश्रद्धा असतात, शेवटी तुमचा शब्द महत्वाचा

'मायबोली म्हणजे काही जग नाही' हे एका महान व्यक्तीने सांगितलेले सुभाषित लक्षात ठेवा

वर स्वातींनी टार्गेट ऑडियन्सच्या मुद्द्याला स्पर्श केला आहे,
तोच मुद्दा खरा.

व्यवस्थित शिक्षण झालेल्या, चांगल्या आर्थिक परिस्थितीतल्या, रूढार्थाने सगळे छान असणाऱ्या बायका आपल्या आजूबाजूला भरपूर दिसतातच, गावातल्या गावात माहेरी/मैत्रिणीकडे जायचे असले तरी त्यांना सासू, नवऱ्याला परवानगीवजा सांगून जावे लागते. ट्राउसर/वन पीस वगैरे घालायचा तर थेट परगावी ट्रिप ला जाऊन. शेजारच्या घरातील स्वतः ड्राईव्ह करून ऑफिस ला जाणारी मैत्रीण त्यांना सुपर वूमन वाटते.

या बायकांना एकट्या बाया फिरायला गेल्या, दारवा पितायत वगैरे गोष्टींचा अचंबा वाटणारच.
सिनेमातील बायांचे लिबरेशन टिअर 2-3 शहरातील बायांच्या दृष्टीने प्रोजेक्ट केलेले आहे, त्यामुळे काही लोकांना ते फार बेसिक वाटणार हे आहेच.

Pages