झिम्मा - मराठी चित्रपट
झिम्मा म्हणून एक मराठी चित्रपट आलाय बघा. काय चित्रपट आलाय. या वर्षात मी पाहिलेला सर्वात आनंददायी चित्रपट. तो देखील कोरोना प्रकरण सुरू झाल्यापासून थिएटरला जाऊन पाहिलेला पहिलाच चित्रपट. या स्पेशल ओकेजनला एखादा छान चित्रपट बघणे नशिबी आला हे भाग्यच म्हणावे.
याच चित्रपटावर चर्चा करायला हा धागा.
ज्यांनी अजून पाहिला नाही ते ट्रेलर बघू शकतात. ट्रेलर सुद्धा फार आवडेल.
झिम्मा ट्रेलर - https://www.youtube.com/watch?v=o8EZsgN167A
चित्रपट मराठी आहे. ओटीटीवर बहुधा नाहीये. पण आला तरी तिथे बघू नका. थिएटरलाच बघा. मराठी चित्रपट ईंग्लंडला गेलाय. आपण थिएटरला जायला हरकत नाही
म्हणजे स्टोरी फार सिंपल आणि चार ओळींची आहे बघा. ट्रेलर पाहिला असेल तर हा पॅराग्राफ वाचूही नका. म्हणजे बघा एक साधारण सात आठ बायका आहेत. वेगवेगळ्या स्वभावाच्या, जातकुळीच्या आणि त्याला साजेश्या पार्श्वभूमीमुळे वेगवेगळे प्रॉब्लेम घेऊन आलेल्या.. या सार्याजणी मिळून एका ईंग्लंड टूरवर दंगा घालतात. भांडतात, एकत्र होतात, एकमेकींना समजून घेतात, आणि त्यात त्यांचे प्रॉब्लेम सुटत जातात, जगण्याचा नवा दृष्टीकोन मिळतो.. वगैरे वगैरे.. पण हे सारे फारच सुंदर पद्धतीने घडते.
ईतक्या बायका जेव्हा पडद्यावर सतत दिसत राहतात तेव्हा चित्रपटाची फ्रेम तशीही सुंदरच होते. पण याऊपर ईंग्लंड ईतके छान टिपलेय की कमॉन, हा मराठी चित्रपट आहे, जो कधीकाळी लो बजेट समजला जायचा, हे स्वतःला चिमटा काढून सांगावे लागते.
सगळ्या व्यक्तीरेखा अगदी सुरेख आणि ठसठशीत उभ्या केल्यात पण त्या पेलायला जो समर्थ अभिनय लागतो त्यात डावेउजवे करणे कठीण व्हावे ईतका नैसर्गिक केलाय प्रत्येकीने.. अर्थात तरीही निर्मितीताई किंचित भाव खाऊन जातात. नुसत्या एक्स्प्रेशनवर हश्या वसूल करतात. त्यांच्यासाठी एक बदाम एक्स्ट्रा
गाणी आणि पार्श्वसंगीतही चोख.. झिम्मा शीर्षकगीत सतत डोक्यात पिंगा घालून राहणारे.. संवाद चुरचुरीत तसेच तत्वज्ञान सांगणारे वगैरे फुल्ल पॅकेज आहे चित्रपट! म्हणजे बघत असतानाच सतत जाणवत राहते की आज आपण काहीतरी छान बघतोय.
चित्रपटात चुका काढायच्या म्हटल्या तर लॉजिक लाऊन त्या निघतीलही. पण अश्या चित्रपटांत मॅजिक बघायचे असते. तरच ते अनुभवण्यात मजा. म्हणजे बघा ना, बायकोने ईंटरव्हलमध्ये पॉपकॉर्न न घेता आम्ही चित्रपटातच गुंतून राहिलोय हे शेवटचे कधी घडले आठवत नाही. तसेच चित्रपट संपल्यावर शेवटी नावे पडताना स्क्रीनवर एका कोपर्यात त्या बायकांच्या व्हॉटसपग्रूपची चॅट दाखवतात. ती सुद्धा शेवटपर्यंत म्हणजे "कबीर लेफ्ट" येईपर्यंत आम्ही खुर्चीत बसून पाहिली, आय मीन वाचली. असंही रोज रोज होत नाही.
अरे हो, त्या व्हॉटसपग्रूपमधून लेफ्ट होणारा हा कबीर म्हणजे सिद्धार्थ चांदेकर, जो त्या टूरचा आयोजक दाखवला आहे. त्याची अभिनयशैली आवडतेच. हा रोल तर त्याचाच होता. तर चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा आणि सोबत चान्स मारत त्यात अभिनयही करणारा हेमंत ढोमे, त्याचे ईतका सुंदर चित्रपट बनवल्याबद्दल कौतुक आणि आभार.
बाकी मला परीक्षण वगैरे लिहिता येत नाही. एवढी चित्रपट समजायची अक्कल नाही माझ्यात.
पण हे बघा, मी हे पाहिलेय, आणि ते मला फार आवडलेय, तुम्हालाही आवडेल... हे चार लोकांना सांगायला मनापासून आवडते म्हणून हा खटाटोप
थोडेसे अवांतर पण गरजेचे -
आम्ही हा चित्रपट नवी मुंबईच्या सीवूड स्टेशनमधील ग्रॅंड सेंट्रल मॉल मधील सिनेपॉलिसला पाहिला. मॉलमध्ये प्रवेश देताना वॅक्सिन सर्टिफिकेट चेक करूनच आत पाठवत होते. थिएटरमध्ये खुर्च्या एक सोडून एकच बूकिंग होते. आम्ही दोघे नवराबायको ईंटरव्हल पर्यंत याच नियमाचे पालन करत मधली खुर्ची सोडून बसलो होतो. पण पुढे पिक्चरचा प्रभाव पडला. जश्या त्या बायका एकमेकींच्या जवळ आल्या तसे आम्हीही मग ईंटरव्हलनंतर बाजूबाजूच्या खुर्चीवर बसूनच पुढचा पिक्चर पाहिला
असो, सांगायचा मुद्दा हा की सोशल डिस्टंन्सिंग पाळले जाते. चिंता नसावी. त्यामुळे तुम्ही एकटे गेलात तरी शेजारी कोणी लगटून बसायला येणार नाही याची खात्री. त्यामुळे बायकांनी बिनधास्त एकटेही जायला हरकत नाही. तसेच पुरुषांच्या वॉशरूममध्येही सोशल डिस्टन्सिंग पाळून युरिनल एक सोडून एक वापरात असल्याने आपले काम चालू असताना बाजूला कोणी येऊन उभा राहत नाही हे ही फार छान वाटले. पुरुषांनीही हा सुखद अनुभव घेण्यास चित्रपटगृहात जायला हरकत नाही. असे एखादे काहीही कारण शोधा, पण हा चित्रपट चुकवू नका
धन्यवाद,
ऋन्मेष
सचिन ने नंतर हिंदी सिनेमे पण
सचिन ने नंतर हिंदी सिनेमे पण ढापुन मराठीत आणले ते पण कळले कितीक जणांना
मुलगी तर स्वतःच पिते की
मुलगी तर स्वतःच पिते की कबीरच्या रूम मध्ये सायली सोबत. तो प्रकार पण कळला नाही. भावी नवरा आला की मी इथे आईबरोबर वेळ घालवायला आले आहे नि इतर बाया दारू पिताना आई एकटी पडली तर मला कबीरचं मेन्स्ट्रुअल हायजिनवर प्रबोधन करायचं....
मुलगी तर स्वतःच पिते की
मुलगी तर स्वतःच पिते की कबीरच्या रूम मध्ये सायली सोबत>>>
हो ना बाकीच्यांना सुनवण्यापेक्षा स्वतःच्या मुलीला आधी सांग की बाय
आणि एकत्र ट्रिप एन्जॉय करायला म्हणून आल्यात असे कुठेही जाणवत नाही माय लेकीच्या नात्यात
एडिटिंग चा आणखी एक घोळ.
एडिटिंग चा आणखी एक घोळ. चाईल्ड अब्युझरच्या तोंडाला दारूचा उग्र दर्प होता हे वाक्य चुकून एडिट झालं, आणि म्हणून तिला चीड आणि इ. इ. आहे. तुम्हा झेंटल(वी)मन लोकांना सगळं सांगावं लागतं.
आई बरोबर आली म्हणून फ्लर्ट पण आईसंगे करायची सक्ती आहे का? आणि प्रोडक्ट प्लेसमेंट पण आईसंगे? त्या प्रोडक्ट वाल्यांनी कंडीशन घातलेली, सोकु आणि ती टीन असताना प्लेसमेंट झाली पाहिजे.
आणि दारू म्हटलं की अनेक लोक बादरायण उचकतात. आणि जगात लॉजिक सोडून वागताना माझ्या आजूबाजूला ढिगाने जनता असताना त्या रानोमाळ लॉजिक जनतेच प्रतिनिधित्त्व कोण करणार. रानोमाळ लॉजिक अनुशेष सिनेमात कोण भरून काढणार? काय म्हणता... ऑलरेडी काढलाय भरून अनेकांनी.. बरं बरं. शिकवू नका उगाच!
बाकी प्रेग्नंट राहायचं म्हणून दारू सोडायची तर तिला कदाचित चांदेकर सोबत प्रेग्नंट नसेल राहायचं. जबरदस्ती का?
ऑ चांदेकर कुठं आला प्रेग्नेंट
ऑ चांदेकर कुठं आला प्रेग्नेंट प्रकरणात
त्याला त्याच्या कंपनीचेच काय घेणे देणे नसते
इतका त्रयस्थ आणि विचित्र मालक आहे, या पेक्षा एखादा गोड बोलणारा आणि शांत डोक्याने काम करणारा मॅनेजर ठेवावा आणि त्याकडे ट्रिप ची जबाबदारी द्यावी
इतकी चिडचिड तेही क्लाएंत वर?? बापरे
निम्म्या लोकांनी तिथेच ट्रिप चे पैसे परत मागायला हवे होते
मुलगी तर स्वतःच पिते की
मुलगी तर स्वतःच पिते की कबीरच्या रूम मध्ये सायली सोबत. तो प्रकार पण कळला नाही.
>>>
हो ना बाकीच्यांना सुनवण्यापेक्षा स्वतःच्या मुलीला आधी सांग की बाय
>>>>
>>>>
सीमंतिनी आणि आशूचॅम्प,
आईला माहीत नसेल मुलगी पिते. म्हणून तर कबीरच्या रूममध्ये जाते.
मुलांनी आईवडीलांच्या नकळत दारू पिणे हे फार नॉर्मल आहे. माझे सगळे मित्र हेच करायचे. उलट एका मित्राला घरी वडिलांसोबत दारू पिताना पाहिलेले तेव्हा मला धक्का बसलेला. कारण हे नवीन होते माझ्यासाठी.
हे मुलांबाबत, तर मुलींबाबत मुलीने आईच्या नकळत दारू पिणे आणखी स्वाभाविक नाही का..
Happy सीमा. चाईल्ड अब्यूज
Happy सीमा. चाईल्ड अब्यूज गंभीर नि आयुष्यभर सावली पडेल असा विषय आहे. बाकी विषय म्हणजे माझा पास....>> तो विषय गंभीरच आहे आणि त्याला ज्या प्रकारे हास्यास्पद ट्रीटमेंट दिली आहे त्यासाठी लिहिले आहे मी. इव्हन क्लिनिकल डिप्रेशन सुद्धा गंभीरच आहे ना. प्रत्येक व्यक्तीला एकेक इशु दिलाय डिल करायला आणि ते सगळे विषय एकाच प्रकारे,एकाच तराजू मध्ये तोलुन (सो कॉल्ड हल्कीफुल्की ) ट्रीटमेंट दिली आहे त्यावर प्रॉब्लेम आहे म्हणुन सर्कॅस्टीकली लिहिल आहे ते. अगदी डिप्रेशन विषयी बोलताना ती स्पेसिफिकली क्लिनिकल डिपेशन असा शब्द वापरते. त्यावरून कुणालातरी वाटेल कि खरच अभ्यास करून केलाय चित्रपट. पण तस नाही झाल.
बाया नेहमीच्या धकाधकीतुन बाहेर पडल्या आहेत आणि प्रवासात विनोद निर्मिती होत झालेल दाखवल असत ( निर्मीती सावंतच्या कॅरॅक्टर प्रमाणे. ) तर उलट आवडल असतं. गंभीर विषय घुसडून इमोशनल करण्याच काहीच कारण नव्हत अस वाटल. (अन हे मला वाटुन काहीही उपयोग नाही हे ही माहित आहे. पण माबोवर लिहायला बरेच दिवसातून मिळाल्याने लिहिती आहे झालं. लोल )
( आणि क्लिनिकल डिप्रेशनला पास अस तुम्ही लिहिल्यानं तो विषय गंभीर नाही अस इंटरप्रीट होतय . मायबोलीवर, लिहिताना टोन खरचं कळत नाही. )
सीमा, तुझा सर्काझम आला होता
सीमा, तुझा सर्काझम आला होता लक्षात. क्लिनीकल डिप्रेशन ह्या विषयाला ही पास दिला कारण डिप्रेशन विषय गंभीर असला तरी क्षिती सध्या डिप्रेस्ड व्यक्ती बरोबर राहात नाही. आजार लक्षात न येणे याबद्दल गिल्ट असणे हे तसं बर्याच आजारात घडू शकतं. कॅन्सर पेशंट्स मध्ये ऐकीवात आहे की एकदम स्टेज ४ लक्षात आली नि २ महिन्यात सगळं संपलं. तिथेही माघारी उरलेल्या जोडीदाराला लक्षात कसं नाही आलं म्हणून वाईट वाटत अनेक वर्ष. असं अनोळखी बाईने चर्चमध्ये दोन समजुतीच्या गोष्टी सांगून दु:ख ओसरेल इतकं सोपं थोडी असतं. हास्यास्पद ट्रीटमेंटला अगदी +१०००
ऋन्मेष, तुझी आई-आजी, तुझे
ऋन्मेष, तुझी आई-आजी, तुझे मित्र इ दाखले देतोस ते ठीक आहे, पण आपलं भावविश्व कसे आहे त्यापेक्षा त्या पात्राचे भावविश्व कसे आहे, ते मांडले कसे आहे हे महत्त्वाचे. ते पात्र्/कॅरॅक्टर प्रेक्षकांपर्यंत पोहोचतच नाही. जर ऋन्मेषचे मित्र/ ऋन्मेषचे कुटूंबिय इ उदाहरणे वापरून सिनेमातले पात्र जस्टीफाय करायचे असेल तर पैसे मोजून थिएटरला का जायचं? तुझ्याच घरी एखाद्या पार्टीला अवचित टपकू.... ते जास्त एंटरटेनिंग होईल.
)
(काळजी करू नको; येणार नाहीये... हे उगा ३०० पर्यंत जाण्यासाठी
माझे सगळे मित्र हेच करायचे>>>
माझे सगळे मित्र हेच करायचे>>>
सर मग तुम्ही त्यांना दारू कशी वाईट आहे हे सांगून त्या पासून परावृत्त केलेच असेल ना?
आणि त्या मित्राच्या वडिलांना पण केलेच असेल
मला खात्री आहे तुम्ही त्यांना मदत केली असणार
झिम्मा चित्रपट मध्ये हेच दाखवले आहे
सगळ्यांनी मिळून दारू पिणे कसे वाईट
(अडमीन या पोस्टमध्ये चित्रपटाचा उल्लेख आहे, कृपया उडवू नये
)
ओके ओके सर. आत्ता माझ्या
ओके ओके सर. आत्ता माझ्या लक्षात आले त्या धाग्यावर तुम्ही सर्वांना अट्टल दारूडे, बेवडे का ठरवत आहात.
तुमच्या आजूबाजूला सर्वच जण दारू पिऊन उद्धस्त झालेले होते, मुलं तर पीतच होती, मुलीही पीत होत्या आणि हे सर्व वडिलांसोबत बसून व्हायचे, इतके की ते देशोधडीला लागले, संसार उद्ध्वस्त झाले, मृत्यू झाले...
सर तुमच्या विश्वाची आत्ता कल्पना आली. तुम्ही कोणत्या वातावरणात राहता, कुठल्या माणसांच्यात राहता याचे तुमच्या मनावर किती खोल परिणाम झाले असतील हे समजायला या पोस्टची मदत झाली. नाहीतर कॉलेजला गंमत म्हणून दारू पिलेल्या मित्रांना मी न पिता कंपनी दिली यावरून तुम्ही आख्खा खंबा चढवल्याप्रमाणे का तांडव करत आहात हे मला कधीही समजले नसते सर. यासाठी झिम्मा चित्रपटाचे आणि या धाग्याचे आभार. पोस्ट चित्रपटाशी सांबंधित आहे हे प्रशासनाने मोठ्या मनाने लक्षात घ्यावे.
या धाग्यावर च्रप्स, एस वालेकर, एस एन यांनी हजेरी न लावल्याबद्दल कडक निषेध !
चित्रपटाचा उल्लेख राहिला हो
चित्रपटाचा उल्लेख राहिला हो
पटदिशी पोस्ट गायब होईल अशाने
झिम्मा चित्रपटात सोनाली गायब झाली आहे हे क्षिती जोग ला इतक्या उशिरा कसे समजते, एरवी ती क्षणोक्षणी घाबरत असते, आता जेव्हा खरोखरच एकटी असते तेव्हा इतकी निवांत बसून राहते
धन्यवाद चँप.
धन्यवाद चँप.
झिम्मा चित्रपटाचे वैशिष्ट्य असे आहे की आज सायकल फिरवायला नेण्याचा कंटाळा केला. झिम्मा चित्रपट प्राईमवर आहे हे ठाऊक असल्याने आज कुत्र्याला फिरवायला नेले. कारण झिम्मा चित्रपट कधीही बघता येत असल्याने काल मुलाच्या हाताला कुत्र्याने हिसडा दिल्याने आज सायकलिंग राहीले.
झिम्मा हा मराठी चित्रपट आहे
झिम्मा हा मराठी चित्रपट आहे हे सांगताना या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते की काल गाडीची हेडलाईट असेम्ब्ली मी ऑनलाईन मागवून स्वतः बसवली आणि अडीच हजारांची बचत केली. झिम्मा चित्रपट मी गाडीतल्या नवीन अॅण्ड्रॉईड सिस्टीमवर न बघता मूनरेकर पाहिला. पण त्यावर झिम्मा सुद्धा दिसतो याची खात्री झाली आहे.
मी पाहिला हा सिनेमा. function
मी पाहिला हा सिनेमा. function at() { [native code] } अगदीच उथळ ट्रीटमेंत. तो ढोमे चे पात्र मला खरंच सुबोध टेंप्लेटच वाटले. आईशप्पत.
सो कु मला पहिल्या पासुनच आवड त नाही. त्यात तिने सध्या जिथे तिथे केळेवाली बुरुम बुरुम करून भयंकरच वैताग दिलेला. पण तिचे कपडे छान आहेत. तिच्या मनात दुव्हिधा आहे. हेमंत शी सुरक्षित पण बोअरिन्ग संसार करायचा का टूर ऑपरेटर बरोबर लफडे नो कमिट मेंट ह्यात तिला बेकार चॉइस आहे. दोन्ही ऑप्शन बाद आहेत.
बांदेकरीण आजिबात आव डत नाही. कायम थोरली जाउ बेअरिन्ग असते तुला दारु प्यायची नाही तर गप खोलीत बस पब्लिकला का त्रास?!
सोकु ची आई वाटत नाही. मुळात कोणतीच व्यक्तिरेखा पकड घेत नाही व डेप्थ नाही. function at() { [native code] अगदी कमी लाइफ एक्स्पिरीअन्स असलेल्या स्त्रियांना ह्या सिनेमात मजा येइल. साहस आहे एक प्रकारे पण विमेन हॅव्ह डन मच बेटर अँड मोअर एल्स वेअर.
शिती जोग आजिबात विडो वाटत नाही. हे मी नेहमी म्हन त आले आहे. वैध व्याच्या लाइफ एक्स्पिरीअन्स मधून गेल्यावर चेहर्यावरची जी कळा जाते रया जाते व एक प्रकारचा केविल वाणे पणा येतो तो तिच्यात नाही. तिला आपण विडो झालो आहोत हे तरी रजिस्टर झाले आहे कि नाही असे वाट्ते. ती अजूनही मानसि क वय त्या कॉलेज मधी ल नवर्याच्या प्रेमात पडलेली मुलगीच आहे. हे लगेच लक्षात येते. नवर्याने मजबूत पैसे ठेवले आहेत म्हणे. हे असे नसते हो ताई. यु नीड टु बस्ट युअर बिहाइड जस्ट टु सर्वाइव अँड रेज अ चाइल्ड प्रॉपरली. तडफड होते जिवाची पण व्यक्त करता येत नाही कार्ण कोणाला तुमचे ऐ कूनच घ्यायचे नसते.
सुहास जोशी कॅरेक्टर फसलेले आहे. ही वर वर एकदम कॅट आजी वाट्ते पण दबून घरकाम करणारी खो टे बोलू बाई आहे. किती ते ढोंग.
हिने खरेच जीवनात काही केलेले नाही. ते दुरून लोकांअन बघणे किती क्रीपी आहे.
निर्मिती सावंत जमली आहे. ते ग्लासात हात बुडवणे यक्क झाले अगदी पन असतात अशी लोक. मी एकदा सिंगा पूर मध्ये पार्कात शुद्ध सांगली कोल्हा पूर कडील मराठीत नवरा बायकोंचे उत्तम भां डण ऐकले आहे. ( मान खाली घालून खुदुखुदू व्याख्या विक्ख्ही वुख्ह्हू)
गुज राती बोलणारॅअॅ मुलगी जाम इरिटेटिन्ग. उगीचच आहे.
इं टर नेट वरील मित्राला भेटणारी मुलगी पण वैताग आहे. पण तिचे चॉइस नोर्मल आहेत.
प्रॉडक्ट प्लेसमेम्त फारच विनोदी.
व खरेच ऑपरेटर च्या रूम मध्ये जाणे अशोभनीय आहे. नॉट अलाउड अॅज पर पॉलिसी. पण ह्याचीच कंपनी . कोण काय बोलणार.
म्हणूनच गृप टूरस नॉट माय कप ऑफ टी. एस्प विथ मराठी बायकाज.
गाणी युसलेस आहेत
शांत मॅन - मी आलरेडी फीडबॅक
नोटिफिकेशन आले म्हणून धागा बघितला...
शांत मॅन - मी आलरेडी फीडबॅक दिला आहे.. झीम्मा टाईम वेस्ट चित्रपट आहे...
नवर्याने मजबूत पैसे ठेवले
नवर्याने मजबूत पैसे ठेवले आहेत म्हणे. हे असे नसते हो ताई. >>> कशी धांसू एंट्री घेतलीत, अमा!!! किती दिवसांनी दिसलात.
हा नवर्याने पैसे ठेवले प्रकार तर अजिबात झेपला नाही. मुलगी अजून १५ वर्ष तरी डिपेंडट आणि क्षिती तिशीत. म्हणजे अजून सुमारे ५० वर्ष + १५ वर्ष इतकी तजवीज हवी. नवर्याने केली होती म्हणता ... एवढी खात्रीची कोणती इंव्हेस्टमेंट आहे????
हा चित्रपट आहे, आदर्श
हा चित्रपट आहे, आदर्श जगण्याची स्पर्धा नाही. फ्लॉड माणसे बघितली नाही का? इथे फ्लॉड माणसे तळ्यात मळ्यात वागतात, कन्फ्युज वागतात इ. म्हटलं असतं तर समजू शकतो, आदर्शच चेक मार्क पाहिजे हे फारच विनोदी आहे.
नवरा मेल्यावर बाईने केविलवाणे दिसलेच पाहिजेच. राया केल्यावर रया गेली पाहिजे. हे वाचून फारच करमणूक झाली.
That Mita character needs to
डिलीट केले. सरां च्या बाफ वर वाद नको.
झिम्मा ओटीटीवर अजूनही आहे
झिम्मा ओटीटीवर अजूनही आहे म्हणून आता मी सायकल चालवून आलो. झिम्मा मधे सदानंद चांदेकर नाहीत पण त्यामुळे कडक पाण्याने स्नान करू नये असे काही नाही. आणि ही पोस्ट झिम्मा शी संबंधित असल्याने आता मुलाला घेऊन मस्त फिरायला चाललो आहे. अशा रितीने झिम्मा चित्रपटाशी संबंधित ३०० पोस्टकडे कूच केले आहे.
झिम्मा बद्दल एक बेसिक प्रश्न-
झिम्मा बद्दल एक बेसिक प्रश्न-
आधी मिताची बहीण सोबत जाणार असते. मग तिला काम असतं म्हणून जाता येत नाही. तेव्हा त्या लहान मुलीला पण नेणार असतात ना? अन्यथा कुठे ठेवणार तिला?मग बहीण जाऊ शकत नाही तर मुलीला मिता का नेत नाही? आणि मुलगी पण काही हट्ट करत नाही?
Ha ha Pautine.
Ha ha Pautine.
केविल वाणॅ दिसले पाहिजे >>
अहो माझा काहीच आग्रह नाही. पन कॅरेक्टर बिलीव्हेबल वाटत नाही. एस्प. ती स्वतःच मी गिल्ट खाली आहे. दबलेली आहे असे म्हणते पण तशी दिसत नाही इतकेच. मेरी विडो हे इंग्रजी एक्स्प्रेशन आपल्या ला माहीतच असेल. की. एक नवा मराठी पिक्चर येत आहे त्यात ही एक लाल अलवाण वाली बाई एकदम गोंडस गुब गुबीत चेहर्याची दाखवली आहे. पन फ्लॉड असावी.
फ्लॉड कॅरेक्टर माहीत नाही असे माबो वर वावरून शक्यच नाही . अय अॅम ग्लाड यु वेरे एंट र टेंन्ड.
३०० पोस्टीस माझा हात भार आहे व्हव. व्याख्या विक्ख्ही वुख्हू.
तस्या इरिटेटिन्ग गुजराती फ्लॉड बायका मुली मात्र नेहमी दिसतात व फ्लाय स्वॅटर ने हाकून द्याव्या असाच पहिला रिफ्लेक्स असतो.
Pautine >> Its Poutine!
Pautine >> It's Poutine!
झिम्मा चित्रपटाचे विचार मनात
झिम्मा चित्रपटाचे विचार मनात घोळवत दुचाकीचे पाययंत्र दामटत खडकवासल्याला पोहोचलो. आता मात्र मुलगा नवीन सायकल त्याला पाहीजे म्हणून हटून बसला आहे. म्हणजे मला जाडीभरडी माऊंटन बाईक चालवावी लागेल. बालहट्ट हा स्त्री हट्टापेक्षा खतरनाक असतो हे झिम्मा पाहताना जाणवले नव्हते. पण बाप पण स्वार्थी असतो हे झिम्मा पाहून आता बरेच दिवस झाल्यावर आज समजले.
आता गळून गेल्याचा अभिनय करण्यासाठी झिम्मामधला निर्मिती सावंतचा अभिनय आठवावा कि बांदेकरणीचा आठवावा हा विचार करतोय. बांदेकरणीने हम पांच मालिकेत राखी टंडन गायब झाल्यावर खरखरीत आवाजाने (चँप प्लीज नोट) वीट आणला होता. इथे वीट आणणे सरांशी संबंधित नाही याची प्रशासनाने नोंद घ्यावी.
मात्र आपली प्रत्येक अॅक्टिव्हिटी मायबोलीकरांना समजली पाहीजे हे झिम्माच्या निमित्ताने लक्षात आले हे केवळ झिम्मामुळेच शक्य झाले याबद्दल झिम्माच्या निर्माता दिग्दर्शक आणि लेखक व टीमचे मनःपूर्वक आभार.
Pouting ?!
Pouting ?!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अमा is back !!!! प्रतिसादातली
अमा is back !!!! प्रतिसादातली चिरफाड वाचूनच कोणाचा प्रतिसाद असेल ते कळले . चांगले लिहिलेय.
ऋन्मेषने वैयक्तिक आयुष्यातलं
ऋन्मेषने वैयक्तिक आयुष्यातलं उदाहरण दिलेलं चालत नाही, इतरांनी दिलेली चालतात असं दिसतंय!
एकूण काय, criticize
एकूण काय, criticize करण्याच्या हेतूने का होईना अनेकांनी झिम्मा चित्रपट मन लावून पाहिलेला दिसतोय!
डिलीट केले वैयक्तिक उदाहरण
डिलीट केले वैयक्तिक उदाहरण पहिला प्रतिसाद पण ऑफेन्सिव्ह व विनोदे असेल तर डिलीट करायला सांगा अॅडमिन ना.
सॉरी सर माझ्या मुळे तुमच्या बाफ चा तोल ढळला. चालु द्या.
अमा धमाल लिहलं आहे
अमा धमाल लिहलं आहे
Pages