झिम्मा - मराठी चित्रपट
झिम्मा म्हणून एक मराठी चित्रपट आलाय बघा. काय चित्रपट आलाय. या वर्षात मी पाहिलेला सर्वात आनंददायी चित्रपट. तो देखील कोरोना प्रकरण सुरू झाल्यापासून थिएटरला जाऊन पाहिलेला पहिलाच चित्रपट. या स्पेशल ओकेजनला एखादा छान चित्रपट बघणे नशिबी आला हे भाग्यच म्हणावे.
याच चित्रपटावर चर्चा करायला हा धागा.
ज्यांनी अजून पाहिला नाही ते ट्रेलर बघू शकतात. ट्रेलर सुद्धा फार आवडेल.
झिम्मा ट्रेलर - https://www.youtube.com/watch?v=o8EZsgN167A
चित्रपट मराठी आहे. ओटीटीवर बहुधा नाहीये. पण आला तरी तिथे बघू नका. थिएटरलाच बघा. मराठी चित्रपट ईंग्लंडला गेलाय. आपण थिएटरला जायला हरकत नाही
म्हणजे स्टोरी फार सिंपल आणि चार ओळींची आहे बघा. ट्रेलर पाहिला असेल तर हा पॅराग्राफ वाचूही नका. म्हणजे बघा एक साधारण सात आठ बायका आहेत. वेगवेगळ्या स्वभावाच्या, जातकुळीच्या आणि त्याला साजेश्या पार्श्वभूमीमुळे वेगवेगळे प्रॉब्लेम घेऊन आलेल्या.. या सार्याजणी मिळून एका ईंग्लंड टूरवर दंगा घालतात. भांडतात, एकत्र होतात, एकमेकींना समजून घेतात, आणि त्यात त्यांचे प्रॉब्लेम सुटत जातात, जगण्याचा नवा दृष्टीकोन मिळतो.. वगैरे वगैरे.. पण हे सारे फारच सुंदर पद्धतीने घडते.
ईतक्या बायका जेव्हा पडद्यावर सतत दिसत राहतात तेव्हा चित्रपटाची फ्रेम तशीही सुंदरच होते. पण याऊपर ईंग्लंड ईतके छान टिपलेय की कमॉन, हा मराठी चित्रपट आहे, जो कधीकाळी लो बजेट समजला जायचा, हे स्वतःला चिमटा काढून सांगावे लागते.
सगळ्या व्यक्तीरेखा अगदी सुरेख आणि ठसठशीत उभ्या केल्यात पण त्या पेलायला जो समर्थ अभिनय लागतो त्यात डावेउजवे करणे कठीण व्हावे ईतका नैसर्गिक केलाय प्रत्येकीने.. अर्थात तरीही निर्मितीताई किंचित भाव खाऊन जातात. नुसत्या एक्स्प्रेशनवर हश्या वसूल करतात. त्यांच्यासाठी एक बदाम एक्स्ट्रा
गाणी आणि पार्श्वसंगीतही चोख.. झिम्मा शीर्षकगीत सतत डोक्यात पिंगा घालून राहणारे.. संवाद चुरचुरीत तसेच तत्वज्ञान सांगणारे वगैरे फुल्ल पॅकेज आहे चित्रपट! म्हणजे बघत असतानाच सतत जाणवत राहते की आज आपण काहीतरी छान बघतोय.
चित्रपटात चुका काढायच्या म्हटल्या तर लॉजिक लाऊन त्या निघतीलही. पण अश्या चित्रपटांत मॅजिक बघायचे असते. तरच ते अनुभवण्यात मजा. म्हणजे बघा ना, बायकोने ईंटरव्हलमध्ये पॉपकॉर्न न घेता आम्ही चित्रपटातच गुंतून राहिलोय हे शेवटचे कधी घडले आठवत नाही. तसेच चित्रपट संपल्यावर शेवटी नावे पडताना स्क्रीनवर एका कोपर्यात त्या बायकांच्या व्हॉटसपग्रूपची चॅट दाखवतात. ती सुद्धा शेवटपर्यंत म्हणजे "कबीर लेफ्ट" येईपर्यंत आम्ही खुर्चीत बसून पाहिली, आय मीन वाचली. असंही रोज रोज होत नाही.
अरे हो, त्या व्हॉटसपग्रूपमधून लेफ्ट होणारा हा कबीर म्हणजे सिद्धार्थ चांदेकर, जो त्या टूरचा आयोजक दाखवला आहे. त्याची अभिनयशैली आवडतेच. हा रोल तर त्याचाच होता. तर चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा आणि सोबत चान्स मारत त्यात अभिनयही करणारा हेमंत ढोमे, त्याचे ईतका सुंदर चित्रपट बनवल्याबद्दल कौतुक आणि आभार.
बाकी मला परीक्षण वगैरे लिहिता येत नाही. एवढी चित्रपट समजायची अक्कल नाही माझ्यात.
पण हे बघा, मी हे पाहिलेय, आणि ते मला फार आवडलेय, तुम्हालाही आवडेल... हे चार लोकांना सांगायला मनापासून आवडते म्हणून हा खटाटोप
थोडेसे अवांतर पण गरजेचे -
आम्ही हा चित्रपट नवी मुंबईच्या सीवूड स्टेशनमधील ग्रॅंड सेंट्रल मॉल मधील सिनेपॉलिसला पाहिला. मॉलमध्ये प्रवेश देताना वॅक्सिन सर्टिफिकेट चेक करूनच आत पाठवत होते. थिएटरमध्ये खुर्च्या एक सोडून एकच बूकिंग होते. आम्ही दोघे नवराबायको ईंटरव्हल पर्यंत याच नियमाचे पालन करत मधली खुर्ची सोडून बसलो होतो. पण पुढे पिक्चरचा प्रभाव पडला. जश्या त्या बायका एकमेकींच्या जवळ आल्या तसे आम्हीही मग ईंटरव्हलनंतर बाजूबाजूच्या खुर्चीवर बसूनच पुढचा पिक्चर पाहिला
असो, सांगायचा मुद्दा हा की सोशल डिस्टंन्सिंग पाळले जाते. चिंता नसावी. त्यामुळे तुम्ही एकटे गेलात तरी शेजारी कोणी लगटून बसायला येणार नाही याची खात्री. त्यामुळे बायकांनी बिनधास्त एकटेही जायला हरकत नाही. तसेच पुरुषांच्या वॉशरूममध्येही सोशल डिस्टन्सिंग पाळून युरिनल एक सोडून एक वापरात असल्याने आपले काम चालू असताना बाजूला कोणी येऊन उभा राहत नाही हे ही फार छान वाटले. पुरुषांनीही हा सुखद अनुभव घेण्यास चित्रपटगृहात जायला हरकत नाही. असे एखादे काहीही कारण शोधा, पण हा चित्रपट चुकवू नका
धन्यवाद,
ऋन्मेष
@ सस्मित, अमांना बरे नव्हते
@ सस्मित, अमांना बरे नव्हते का?
चौकशीला हा धागाही वापरू शकता. ईथे साधारण बरेच जणांनी आपला आजार आणि खुशाली कळवली आहे. धाग्याचे शीर्षकही बदलता येईल ..
https://www.maayboli.com/node/80901
@ आशूचॅम्प
@ आशूचॅम्प
अहो दोन तासाचा आहे तोच बघवत नाही
अजुन एक तास सोनाली चे नखरे, क्षिती जोग चे रडणे आणि ढोमेच्या मेणचट संवादांना सहन करण्याची ताकद कोणाला असेल असे वाटत नाही
>>>>>>>
तुम्ही या धाग्यावर झिम्माची एंट्री करू शकता
रटाळ, बंडल, बकवास ..... आणि तरीही पुर्ण बघितलेले चित्रपट !
https://www.maayboli.com/node/61645
आकुकाक वर त्या नियमित लिहितात
आकुकाक वर त्या नियमित लिहितात. बरेच दिवस पोस्ट नाही. चौकशीला उत्तर नाही म्हणुन विचारलं.
मंजुताईंनी लिहिलंय त्या ठीक आहेत फेबुवर आहेत असं.
सस्मित ओके
सस्मित ओके
56 सदाशिव पेठ
56 सदाशिव पेठ
मोहन जोशीं मुळे आवडला. माझे आवडते अभिनेते आहेत ते.
झिम्मा ख्याली खुशाली
झिम्मा ख्याली खुशाली
म्हणजे धागा धो धो पळेल.
आणि तरीही पुर्ण बघितलेले
आणि तरीही पुर्ण बघितलेले चित्रपट>>>>
नाही बघवला पूर्ण देखील
ओके, मग त्या धाग्यासाठी
ओके, मग त्या धाग्यासाठी अपात्र आहे. आईबाबांनाही आवडला नाही असे लिहिले त्यामुळे वाटले पुर्ण बघितला असावा.
आमच्याकडे मीच आईला दाखवला. मराठी मालिका आवडीने बघणार्या आईला हा नक्की आवडेल याची खात्री होतीच. खरे तर ट्रेलरवरूनच हा अंदाज आल्याने थिएटरलाच आमच्यासोबतच नेले असते. पण सध्या ते दिवस राहिले नाहीयेत म्हणून टाळले.
त्यांनी बघितला पूर्ण, पण ते
त्यांनी बघितला पूर्ण, पण ते काय अजूनही बरसात आहे, अनुपमा वगैरे बघतात त्यामुळे त्यांची चिकाटी आणि सहनशीलता अपार आहे
तरीही झिम्मा आवडला नाही म्हणजे बघा
मी त्यांना टीव्हीवर लावून दिला आणि निघून गेलो
परत तोच अत्याचार कोण सहन करणार
पण ते काय अजूनही बरसात आहे,
पण ते काय अजूनही बरसात आहे, अनुपमा वगैरे बघतात त्यामुळे त्यांची चिकाटी आणि सहनशीलता अपार आहे
>>>>
प्रत्येकाची आवड वेगळी असते हो. तुम्हाला यात चिकाटी आणि सहशीलता दिसते पण त्यांना ते आवडते म्हणून ते बघतात. आपल्याला आवडत नाही आपण बघत नाही. आमच्याकडेही आई मराठी मालिका दिवसरात्र बघते. मी एकदम शून्य. जसे खाण्यापिण्याच्या प्रत्येकाच्या आवडी भिन्न असतात तसेच चित्रपट आणि मालिकांबाबतही असते. पण हुमायुन नेचर असे आहे की आपल्याला वाटते आपल्याला आवडते तेच दर्जेदार
यावर मी स्वतंत्र धागा काढू शकतो.. सध्या जरा कामात आहे
मी ढोमेचा आवाज तिसऱ्यांदा
मी ढोमेचा आवाज तिसऱ्यांदा ऐकल्यावर बंद केला. सुहास जोशींचं काम मस्त आहे पण लाईन मारण्याचा प्रसंग बालिश आहे. टिपिकल ढोमे. तो अजून चहयेद्या च्या आधी नीलेश साबळे संचालित विनोदाचा रिअॅलिटी शो होता त्याच जमान्यात आहे. मागच्या सिनेमात तरी राजकारण्याचे कॅरेक्टर इंटरवल पर्यंत छान पकडले होते. नंतर माती खाल्ली. ती चिन्हे दिसू लागली म्हणून उठून गेलो. बायको मोठमोठ्याने खिदळत होती. पण ती झी मराठी, कोरियन, चायनीज. थाई अशा मालिका पाहून टणक झाली आहे. त्यामुळे काही वाटले नाही.
बाकी सरांच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट सर्वोत्कृष्ट आहे याच्याशी सहमत.
सर कामे काय होतच राहतात
सर कामे काय होतच राहतात
तुम्ही पहिले धागा काढा आणि मग काम करा
म्हणजे तोवर आम्ही त्याला 100 च्या पार नेऊ
सर जे रुप कामात नसेल त्याला
सर जे रुप कामात नसेल त्याला धागा काढायचा आदेश द्या. सगळा लोड स्वतःवर घेऊन कसे चालेल? कधीकधी ऑफिसचे काम सुद्धा करावे लागणार ना!
मॅनेजमेंट...
आपल्याला वाटते आपल्याला आवडते
आपल्याला वाटते आपल्याला आवडते तेच दर्जेदार>>>>
नाही माझे असले अजिबात गैरसमज नाहीत, कारण मी शाहरुख चे काही चित्रपट थेटर ला जाऊन पाहिले आहेत आणि त्यावरून माझी आवड अजिबातच दर्जेदार नसून अगदीच भिकार दर्जाची आहे याची खरखरीत जाणीव झाली
खरखरीत >>रखरखीत
खरखरीत >>रखरखीत
चॅंप यांच्या भावना पोहोचल्या असल्या तरीही पंथशिस्त म्हणून सरांच्या मतापेक्षा वेगळ्या मताशी सहमत होऊ शकत नाही. चॅंप यांचे ते वैयक्तिक मत आहे. साहेबांनी कोल्हेंची पाठराखण करून सर्वांना उताणे पाडले तसे सरांनी चॅंप यांना क्लीन चीट दिली तर सांगता येत नाही.
नई खिसणी सारखी खरखरीत
नई खिसणी सारखी खरखरीत
कष्टाचे पैसे गेले हो असला भिकार चित्रपट बघून
अजूनही जीव जळतो त्यासाठी
चॅंप भावनेपेक्षा कर्तव्य
चॅंप भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ. स्वतःला सांभाळा.
होय होय
होय होय
देवाच्या दारी वाहिले म्हणायचं झालं
पैसे काय आज आहेत उद्या नाहीत
सर आणि देव इत्र तत्र सर्वत्र आहेत
ईत्र त्रित्र हो.
ईत्र त्रित्र हो.
@ आशुचँप
@ आशुचँप
पण ते काय अजूनही बरसात आहे, अनुपमा वगैरे बघतात त्यामुळे त्यांची चिकाटी आणि सहनशीलता अपार आहे
>>>>
या बहुधा मालिका असाव्यात. जे या मालिका बघतात त्यांना त्या आवडत असतील. आपल्याला जर त्या मालिका आवडत नसतील तर त्या आपल्याला आवडत नाही आणि का आवडत नाही ईतके सांगणे पुरेसे असते. पण जे लोकं या मालिका बघतात त्यांच्याकडे चिकाटी आणि सहनशीलता अपार आहे म्हणने म्हणजेच दुसर्यांच्या आवडीला नावे ठेवणे. दुसर्यांच्या अभिरुचीवर कॉमेंट पास करणे म्हणजेच आपलीच आवड दर्जेदार असे समजणे. अर्थात हे हुमायुन नेचर आहे. कमी जास्त प्रमाणात आपण सारेच हे करतो. माझ्याकडूनही हे कळत नकळत होत असेल. पण हे चूकच आहे.
असो, माझ्याकडे असे बरेच अनुभव आहेत. संध्याकाळी काम झाल्यावर नवीन धागा काढतो.
पुढचे सविस्तर त्यातच लिहितो. तिथेच चर्चा करूया. ईथे झिम्माच खेळूया
सर तोच मुद्दा पुन्हा वेगळ्या
सर तोच मुद्दा पुन्हा वेगळ्या शब्दात लिहला आहे का?

वरणाला फोडणी देऊन आमटी केल्यागत वाटतंय
चॅंप तुम्हाला त्यांनी
चॅंप तुम्हाला त्यांनी सांगितले आहे. याचा अर्थ आपल्याला धागा चालवायचा आहे. आपण सरांना शंका कसे विचारू शकतो?
सर तुमच्याकडे इतका वेळ।आहे तर
सर तुमच्याकडे इतका वेळ।आहे तर डोंगर पेटवल्याचा किस्सा का लिहीत नाही?
माझे काही वनविभागातले मित्र आहेत ते पण वाट बघत आहेत तुमच्या किस्स्याची
लवकर लिहा ना सर
आपण सरांना शंका कसे विचारू
आपण सरांना शंका कसे विचारू शकतो
शंका नाही हो, पण सरांची इतकी नवनोमेशली प्रतिभा असताना तोच मुद्दा परत लिहिला त्यामुळे गोंधळ झाला इतकाच
हे म्हणजे सुगरणी ने नवऱ्याला तोच पदार्थ वेगळ्या रुपात वाढावा आणि आता याची स्तुती करावी का सत्य सांगावे असा विचार किंवा दुर्घट प्रसंग ओढवावा तसे झाले
म्हणजे तुम्ही सरांना पत्नी
म्हणजे तुम्ही सरांना पत्नी मानले?
तोबा तोबा
तोबा तोबा

जीव का नाही घेत तुम्ही त्यापेक्षा माझा
असं काही नाही. मोहिनी अवतारात
असं काही नाही. मोहिनी अवतारात आशुसुराचा वध केला होता सरांनी.
मोहिनी ही काय त्याची बायको
मोहिनी ही काय त्याची बायको नव्हती आणि सुगरण तर मुळीच नव्हती
यावर मी स्वतंत्र धागा काढू
यावर मी स्वतंत्र धागा काढू शकतो.. सध्या जरा कामात आहे >>>
पसंद अपनी अपनी . इथे सर्वांच्या सोयीसाठी नवीन धागा काढला आहे.
https://www.maayboli.com/node/80951
आणखी बेकार कसा करता आला असता-
आणखी बेकार कसा करता आला असता- >> वावे, आता हा जरा आवडू लागणार दिसतंय!
Pages