झिम्मा - मराठी चित्रपट

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 November, 2021 - 07:38

झिम्मा - मराठी चित्रपट

झिम्मा म्हणून एक मराठी चित्रपट आलाय बघा. काय चित्रपट आलाय. या वर्षात मी पाहिलेला सर्वात आनंददायी चित्रपट. तो देखील कोरोना प्रकरण सुरू झाल्यापासून थिएटरला जाऊन पाहिलेला पहिलाच चित्रपट. या स्पेशल ओकेजनला एखादा छान चित्रपट बघणे नशिबी आला हे भाग्यच म्हणावे.

याच चित्रपटावर चर्चा करायला हा धागा.

ज्यांनी अजून पाहिला नाही ते ट्रेलर बघू शकतात. ट्रेलर सुद्धा फार आवडेल.
झिम्मा ट्रेलर - https://www.youtube.com/watch?v=o8EZsgN167A

चित्रपट मराठी आहे. ओटीटीवर बहुधा नाहीये. पण आला तरी तिथे बघू नका. थिएटरलाच बघा. मराठी चित्रपट ईंग्लंडला गेलाय. आपण थिएटरला जायला हरकत नाही Happy

म्हणजे स्टोरी फार सिंपल आणि चार ओळींची आहे बघा. ट्रेलर पाहिला असेल तर हा पॅराग्राफ वाचूही नका. म्हणजे बघा एक साधारण सात आठ बायका आहेत. वेगवेगळ्या स्वभावाच्या, जातकुळीच्या आणि त्याला साजेश्या पार्श्वभूमीमुळे वेगवेगळे प्रॉब्लेम घेऊन आलेल्या.. या सार्‍याजणी मिळून एका ईंग्लंड टूरवर दंगा घालतात. भांडतात, एकत्र होतात, एकमेकींना समजून घेतात, आणि त्यात त्यांचे प्रॉब्लेम सुटत जातात, जगण्याचा नवा दृष्टीकोन मिळतो.. वगैरे वगैरे.. पण हे सारे फारच सुंदर पद्धतीने घडते.

ईतक्या बायका जेव्हा पडद्यावर सतत दिसत राहतात तेव्हा चित्रपटाची फ्रेम तशीही सुंदरच होते. पण याऊपर ईंग्लंड ईतके छान टिपलेय की कमॉन, हा मराठी चित्रपट आहे, जो कधीकाळी लो बजेट समजला जायचा, हे स्वतःला चिमटा काढून सांगावे लागते.

सगळ्या व्यक्तीरेखा अगदी सुरेख आणि ठसठशीत उभ्या केल्यात पण त्या पेलायला जो समर्थ अभिनय लागतो त्यात डावेउजवे करणे कठीण व्हावे ईतका नैसर्गिक केलाय प्रत्येकीने.. अर्थात तरीही निर्मितीताई किंचित भाव खाऊन जातात. नुसत्या एक्स्प्रेशनवर हश्या वसूल करतात. त्यांच्यासाठी एक बदाम एक्स्ट्रा Happy

गाणी आणि पार्श्वसंगीतही चोख.. झिम्मा शीर्षकगीत सतत डोक्यात पिंगा घालून राहणारे.. संवाद चुरचुरीत तसेच तत्वज्ञान सांगणारे वगैरे फुल्ल पॅकेज आहे चित्रपट! म्हणजे बघत असतानाच सतत जाणवत राहते की आज आपण काहीतरी छान बघतोय.

चित्रपटात चुका काढायच्या म्हटल्या तर लॉजिक लाऊन त्या निघतीलही. पण अश्या चित्रपटांत मॅजिक बघायचे असते. तरच ते अनुभवण्यात मजा. म्हणजे बघा ना, बायकोने ईंटरव्हलमध्ये पॉपकॉर्न न घेता आम्ही चित्रपटातच गुंतून राहिलोय हे शेवटचे कधी घडले आठवत नाही. तसेच चित्रपट संपल्यावर शेवटी नावे पडताना स्क्रीनवर एका कोपर्‍यात त्या बायकांच्या व्हॉटसपग्रूपची चॅट दाखवतात. ती सुद्धा शेवटपर्यंत म्हणजे "कबीर लेफ्ट" येईपर्यंत आम्ही खुर्चीत बसून पाहिली, आय मीन वाचली. असंही रोज रोज होत नाही.

अरे हो, त्या व्हॉटसपग्रूपमधून लेफ्ट होणारा हा कबीर म्हणजे सिद्धार्थ चांदेकर, जो त्या टूरचा आयोजक दाखवला आहे. त्याची अभिनयशैली आवडतेच. हा रोल तर त्याचाच होता. तर चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा आणि सोबत चान्स मारत त्यात अभिनयही करणारा हेमंत ढोमे, त्याचे ईतका सुंदर चित्रपट बनवल्याबद्दल कौतुक आणि आभार.

बाकी मला परीक्षण वगैरे लिहिता येत नाही. एवढी चित्रपट समजायची अक्कल नाही माझ्यात.
पण हे बघा, मी हे पाहिलेय, आणि ते मला फार आवडलेय, तुम्हालाही आवडेल... हे चार लोकांना सांगायला मनापासून आवडते म्हणून हा खटाटोप Happy

थोडेसे अवांतर पण गरजेचे -
आम्ही हा चित्रपट नवी मुंबईच्या सीवूड स्टेशनमधील ग्रॅंड सेंट्रल मॉल मधील सिनेपॉलिसला पाहिला. मॉलमध्ये प्रवेश देताना वॅक्सिन सर्टिफिकेट चेक करूनच आत पाठवत होते. थिएटरमध्ये खुर्च्या एक सोडून एकच बूकिंग होते. आम्ही दोघे नवराबायको ईंटरव्हल पर्यंत याच नियमाचे पालन करत मधली खुर्ची सोडून बसलो होतो. पण पुढे पिक्चरचा प्रभाव पडला. जश्या त्या बायका एकमेकींच्या जवळ आल्या तसे आम्हीही मग ईंटरव्हलनंतर बाजूबाजूच्या खुर्चीवर बसूनच पुढचा पिक्चर पाहिला Happy

असो, सांगायचा मुद्दा हा की सोशल डिस्टंन्सिंग पाळले जाते. चिंता नसावी. त्यामुळे तुम्ही एकटे गेलात तरी शेजारी कोणी लगटून बसायला येणार नाही याची खात्री. त्यामुळे बायकांनी बिनधास्त एकटेही जायला हरकत नाही. तसेच पुरुषांच्या वॉशरूममध्येही सोशल डिस्टन्सिंग पाळून युरिनल एक सोडून एक वापरात असल्याने आपले काम चालू असताना बाजूला कोणी येऊन उभा राहत नाही हे ही फार छान वाटले. पुरुषांनीही हा सुखद अनुभव घेण्यास चित्रपटगृहात जायला हरकत नाही. असे एखादे काहीही कारण शोधा, पण हा चित्रपट चुकवू नका Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशूचॅम्प तुम्ही कशाला ह्याच्या नादी लागता , स्वतः ची एनर्जी वाया घालवू नका , संयमी पणाच ढोंग करून इतरांचा छळ करणं , स्वतः चच खरं करण्यासाठी कसेही शब्द फिरवायचे हा छंद आहे ह्याचा , एक नंबरचा अटेंशन सीकर माणूस आहे

मी आज माझी ट्रेकिंग ची लेखमाला सुरू करतोय
पहिला भाग लिहून झालाय
आवडेल वाचायला अशी आशा आहे>>>>>>>>>
येस...नक्कीच.

"मी आज माझी ट्रेकिंग ची लेखमाला सुरू करतोय
पहिला भाग लिहून झालाय
आवडेल वाचायला अशी आशा आहे" - नक्की येऊ दे आशु. तुझ्या सायकलवार्या वाचायला सॉलिड मजा आली होती (फेसबूकवर एका मित्राच्या फोटोजमधून ते पाहिलं होतं, पण तू केलेलं त्याचं शब्दांकन अत्यंत प्रवाही होतं Wink )

ट्रोलिंग करू नये ह्या विचारांचं स्वागत आहे आणि ते मत स्विकारार्ह सुद्धा आहे. जेव्हा एका बाजूनं त्रास दिला जातो तेव्हा ते इग्नोर करा वगैरे सल्ले येतात आणि त्याला प्रतिवाद केला की 'हे अति होतंय' वगैरे वाटतं, लोकांना कंटाळा येतो हे सुद्धा स्वाभाविक आहे. पण चुकीच्या गोष्टीचा प्रतिवाद करायला हवा आणि तो जेव्हा नियमांच्या चौकटीत राहून केला जातो तेव्हा त्यातही काही गैर नाही.

बाकी सर, तुम्ही शोले - अमिताभ, धर्मेन्द्र, मौसी वगैरे चपखल उदाहरणानं तुमचा मुद्दा पुढे रेटलाच आहे पटवून दिलाच आहे. ह्यापेक्षा मोठा दृष्टांत कुठून आणणार? Happy

<<<पण जेव्हा हाच आयडी चांगले चाललेली चर्चा, धागे विस्कटून, अवांतर बोलून, जिथे तिथे मी, माझं, गर्लफ्रेंड शाहरुख घुसवून विकृत आनंद (होय हाच शब्द आहे जो मी मागेही म्हणलं होत, की त्याला विकृत आनंद मिळतो लोकांना त्रास द्यायला, आणि तो चिडत नाही, संयम बाळगतो वगैरे प्लिजच तुमच्याकडे ठेवा, तो चिडला की वेगळ्या आयडीने येऊन शिवीगाळ करतो हे कैक वेळेला अनुभवले आहे) घेत होता तेव्हा लोकं म्हणायचे ते सोडून दुसरे धागा वाचा
आज आता तेच लोकं स्वतःवर आल्यावर तसे वागत नाहीत>>> एकदम मनातल बोललात.

सरांचे म्हणणे तुम्ही मान्य करत नाही तोवर तो तेवढाच मुद्दा बोलत राहतील आणि मग तिथे कितीही अवांतर झाले तरी त्याना किंवा अडमनीना किंवा silly तत्सम वाटणार्यांना काहीही प्रॉब्लेम नसेल ///

एखाद्या आयडीमुळे जास्त क्लिक मिळत असतील पेज व्ह्यू वगैरे तर त्याला सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीसारखं जपायला लागत असेल. विशेषतः if that person is not getting paid, then this is free labor he is providing- रोज धागे काढणं, चालवणं, सगळीकडे कमेंटी करणं. त्यामुळे मग त्याने इतरांचे धागे भरकटवले तरी चालेल पण त्याच्या धाग्यावरील अवांतर पोस्ट उडवल्या जाणार कारण तो नाराज व्हायला नको.
(हा अर्थात माझा अंदाज/स्पेक्युलेशन आहे.)

चित्रपटासोबत ईथली चर्चाही हिट झाली आहे असे वाटते. आज मला फेसबूकवर एक मेसेज आला.

तुम्ही हेमंत ढोमे यांचे जवळचे मित्र आहात ना. मला मदत कराल का. मी एक गीतकार आहे.

फेसबूक प्रोफाईल चेक केले तर ते लॉक होते. लोकं आपले फेसबूक लॉक करून अनोळखी लोकांना मैत्रीची रिक्वेस्ट वा प्लीज मला मदत करा असे मेसेज कसे टाकतात मला आजवर समजले नाही. मला तो मेसेज म्हणजे कोणाचातरी चावटपणा वाटल्याने रिप्लाय न देता आयडी ब्लॉक केला Happy

व्हॉटसपवरून.... कोणाकडे बातमी असल्यास लिंक शोधा

*रेकॉर्डब्रेक झिम्मा - अभिनंदन*

*'झिम्मा'ची सिनेमागृहात पंच्याहत्तरी; प्रेक्षकांची जिंकली मनं*

लॉकडाऊन नंतर संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात प्रदर्शित झालेला 'झिम्मा' (Jhimma) हा पहिलाच मोठा मराठी चित्रपट आहे. या शर्यतीत बॉलिवूडचेही अनेक सिनेमे असताना देखील ‘झिम्मा' ने आपली घोडदौड कायम ठेवली. गेले अडीच महिने 91 टक्के प्रेक्षकांची पसंती मिळवत महाराष्ट्राचा नंबर एक चित्रपट असल्याचा मान 'झिम्मा'ने पटकावला आहे. आजही अनेक सिनेमे प्रदर्शित होत असताना ‘झिम्मा'ने आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. सोशल मिडीयावरही 'झिम्मा'च्या लोकप्रियतेबद्दल अद्यापही चर्चा सुरु आहे आणि आता बघता बघता या चित्रपटाने सिनेमागृहात 75 दिवस साजरे केले आहेत.

एका दिवशी एकाच चित्रपटगृहात सलग अठरा खेळ हाऊसफुल्ल करण्याचा अनोखा विक्रम या चित्रपटाने केला. प्रेक्षकांसह समीक्षकांची मने जिंकणारा हा आशयघन चित्रपट तिसऱ्या आठवड्यात आधीपेक्षा जास्त शोज मिळवून सुपरडुपर हिट ठरला.

जगभरात 60 पेक्षा जास्त शहरांमध्ये प्रदर्शित झाला. झिम्माने आपल्या 50 व्या दिवशी महाराष्ट्रात ९० पेक्षा जास्त चित्रपटगृहांमध्ये राहुन आपला गौरवशाली 50 दिवस साजरा करण्याचा रेकॉर्ड बनवला.

कोविड काळात पन्नास टक्के आसन क्षमता असतानाही प्रेक्षकांना सिनेमागृहात आणून 14. 50 कोटीची कमाई करणारा हा ब्लॉकबस्टर चित्रपट आजही सिनेमागृहात प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. हा सिनेमा काही दिवसांपूर्वी ओटीटीवर प्रदर्शित झाला असला तरीही चित्रपटगृहात जाऊन 'झिम्मा' पाहणारा प्रेक्षकवर्गही कायम आहे. ॲमेझॉन प्राईम इंडियावर भारतातील पहिल्या पाच चित्रपटांमध्ये झळकण्याचा बहुमान पटकावला आहे.

महाराष्ट्रातल्या महिलांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले. अनेकींनी 'झिम्मा' पासुन प्रेरित होऊन सहलींचे आयोजनही केले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सहलींचे फोटोज ‘झिम्मा'च्या टीमपर्यंत पोहोचवले. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आणि प्रेमामुळे आज झिम्माने अमृतोत्सवापर्यंत मजल मारली. इतकेच नाही तर मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृहांची दारेही पुन्हा उघडली. सलग 11 आठवडे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा चित्रपट आता केवळ चित्रपट राहिला नसून तो आता एक सोहळा झाला आहे.

झिम्मा चा ट्रेलर खूप आवडला होता. ते पाहून मस्त करमणुकप्रधान सिनेमा असेल असे वाटले होते. शेवटी परवा पाहिला. (तोवर इथले काहीही वाचले नव्हते). तर सांगायचे म्हणजे ट्रेलरमधले सीनच आवडले व बाकी सिनेमाने निराश केले. खूप पात्रे असल्याने प्रत्येकाला थोडेथोडे महत्व देण्यात, सिनेमाच्या पात्रांचे कथानक भावनाप्रधान बनवण्यात खिचडी झाली व रया गेली. Sad
अमितव, आत्ता कळला चित्रपट धाग्यावर ‘शाम सिंघम‘ सिनेमावर तुम्ही दिलेला प्रतिसाद. नाहीनाही, तो सिनेमा अशाप्रकारे अपेक्षाभंग झालेला नाही. Happy

Lol Lol Lol

Lol
त्यांची जाळ 'झिम्मा' बघायला जाताना त्यांना म्हणेल 'परमसामी, तुमी तोवर 'पुष्पा' ला जावून या कसं , तुमचं आपलं झुकेगा नै , झुकेगा नै , मगं झिम्मा खेळाव तरी कसा माणसाने...'

बायडेन म्हणेल "परम" सामी ते - पुतिनराव. हुकूमशहा. आम्ही म्हणजे चेक्स अ‍ॅण्ड बॅलन्सेस मधे तारेवरची कसरत करणारे सामी. एक इन्फ्रा बिल पास होईना. त्यापेक्षा जंगलातून दुधाचे टँकर बाहेर काढणे परवडले. अर्ध्या अमेरिकेला युक्रेनमधे आपण पडू नये असे वाटते, तर उरलेली अर्धी अमेरिका युक्रेन ही क्रेन स्वतः रेण्ट करायची युहॉल सारखी कंपनी आहे असे समजते. त्रासच त्रास.

युक्रेन ही क्रेन स्वतः रेण्ट करायची युहॉल >> हाहा

झिम्मा अमेरिकेत कुठे बघायचा? vpn वापरल तरी अमेझॉन अकाऊंट अमेरीकेच आहे

चांगला रिव्ह्यू लिहीणाऱ्यांनी डावीकडे जा.. वाईट रिव्ह्यू लिहीणाऱ्यांनी उजवीकडे जा.. आणि मिक्स रिल्ह्यू लिहीणाऱ्यांनी वावे ताईंना फॅालो करा Lol
E40FF1CD-C3F3-45D7-8F0A-BF8ABEC63C3C.jpeg

लोल! सगळे मीम्स भारी..
अर्धी अमेरिका युक्रेन ही क्रेन स्वतः रेण्ट करायची युहॉल सारखी कंपनी आहे असे समजते. >> हाहाहा

Pages