झिम्मा - मराठी चित्रपट
झिम्मा म्हणून एक मराठी चित्रपट आलाय बघा. काय चित्रपट आलाय. या वर्षात मी पाहिलेला सर्वात आनंददायी चित्रपट. तो देखील कोरोना प्रकरण सुरू झाल्यापासून थिएटरला जाऊन पाहिलेला पहिलाच चित्रपट. या स्पेशल ओकेजनला एखादा छान चित्रपट बघणे नशिबी आला हे भाग्यच म्हणावे.
याच चित्रपटावर चर्चा करायला हा धागा.
ज्यांनी अजून पाहिला नाही ते ट्रेलर बघू शकतात. ट्रेलर सुद्धा फार आवडेल.
झिम्मा ट्रेलर - https://www.youtube.com/watch?v=o8EZsgN167A
चित्रपट मराठी आहे. ओटीटीवर बहुधा नाहीये. पण आला तरी तिथे बघू नका. थिएटरलाच बघा. मराठी चित्रपट ईंग्लंडला गेलाय. आपण थिएटरला जायला हरकत नाही
म्हणजे स्टोरी फार सिंपल आणि चार ओळींची आहे बघा. ट्रेलर पाहिला असेल तर हा पॅराग्राफ वाचूही नका. म्हणजे बघा एक साधारण सात आठ बायका आहेत. वेगवेगळ्या स्वभावाच्या, जातकुळीच्या आणि त्याला साजेश्या पार्श्वभूमीमुळे वेगवेगळे प्रॉब्लेम घेऊन आलेल्या.. या सार्याजणी मिळून एका ईंग्लंड टूरवर दंगा घालतात. भांडतात, एकत्र होतात, एकमेकींना समजून घेतात, आणि त्यात त्यांचे प्रॉब्लेम सुटत जातात, जगण्याचा नवा दृष्टीकोन मिळतो.. वगैरे वगैरे.. पण हे सारे फारच सुंदर पद्धतीने घडते.
ईतक्या बायका जेव्हा पडद्यावर सतत दिसत राहतात तेव्हा चित्रपटाची फ्रेम तशीही सुंदरच होते. पण याऊपर ईंग्लंड ईतके छान टिपलेय की कमॉन, हा मराठी चित्रपट आहे, जो कधीकाळी लो बजेट समजला जायचा, हे स्वतःला चिमटा काढून सांगावे लागते.
सगळ्या व्यक्तीरेखा अगदी सुरेख आणि ठसठशीत उभ्या केल्यात पण त्या पेलायला जो समर्थ अभिनय लागतो त्यात डावेउजवे करणे कठीण व्हावे ईतका नैसर्गिक केलाय प्रत्येकीने.. अर्थात तरीही निर्मितीताई किंचित भाव खाऊन जातात. नुसत्या एक्स्प्रेशनवर हश्या वसूल करतात. त्यांच्यासाठी एक बदाम एक्स्ट्रा
गाणी आणि पार्श्वसंगीतही चोख.. झिम्मा शीर्षकगीत सतत डोक्यात पिंगा घालून राहणारे.. संवाद चुरचुरीत तसेच तत्वज्ञान सांगणारे वगैरे फुल्ल पॅकेज आहे चित्रपट! म्हणजे बघत असतानाच सतत जाणवत राहते की आज आपण काहीतरी छान बघतोय.
चित्रपटात चुका काढायच्या म्हटल्या तर लॉजिक लाऊन त्या निघतीलही. पण अश्या चित्रपटांत मॅजिक बघायचे असते. तरच ते अनुभवण्यात मजा. म्हणजे बघा ना, बायकोने ईंटरव्हलमध्ये पॉपकॉर्न न घेता आम्ही चित्रपटातच गुंतून राहिलोय हे शेवटचे कधी घडले आठवत नाही. तसेच चित्रपट संपल्यावर शेवटी नावे पडताना स्क्रीनवर एका कोपर्यात त्या बायकांच्या व्हॉटसपग्रूपची चॅट दाखवतात. ती सुद्धा शेवटपर्यंत म्हणजे "कबीर लेफ्ट" येईपर्यंत आम्ही खुर्चीत बसून पाहिली, आय मीन वाचली. असंही रोज रोज होत नाही.
अरे हो, त्या व्हॉटसपग्रूपमधून लेफ्ट होणारा हा कबीर म्हणजे सिद्धार्थ चांदेकर, जो त्या टूरचा आयोजक दाखवला आहे. त्याची अभिनयशैली आवडतेच. हा रोल तर त्याचाच होता. तर चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा आणि सोबत चान्स मारत त्यात अभिनयही करणारा हेमंत ढोमे, त्याचे ईतका सुंदर चित्रपट बनवल्याबद्दल कौतुक आणि आभार.
बाकी मला परीक्षण वगैरे लिहिता येत नाही. एवढी चित्रपट समजायची अक्कल नाही माझ्यात.
पण हे बघा, मी हे पाहिलेय, आणि ते मला फार आवडलेय, तुम्हालाही आवडेल... हे चार लोकांना सांगायला मनापासून आवडते म्हणून हा खटाटोप
थोडेसे अवांतर पण गरजेचे -
आम्ही हा चित्रपट नवी मुंबईच्या सीवूड स्टेशनमधील ग्रॅंड सेंट्रल मॉल मधील सिनेपॉलिसला पाहिला. मॉलमध्ये प्रवेश देताना वॅक्सिन सर्टिफिकेट चेक करूनच आत पाठवत होते. थिएटरमध्ये खुर्च्या एक सोडून एकच बूकिंग होते. आम्ही दोघे नवराबायको ईंटरव्हल पर्यंत याच नियमाचे पालन करत मधली खुर्ची सोडून बसलो होतो. पण पुढे पिक्चरचा प्रभाव पडला. जश्या त्या बायका एकमेकींच्या जवळ आल्या तसे आम्हीही मग ईंटरव्हलनंतर बाजूबाजूच्या खुर्चीवर बसूनच पुढचा पिक्चर पाहिला
असो, सांगायचा मुद्दा हा की सोशल डिस्टंन्सिंग पाळले जाते. चिंता नसावी. त्यामुळे तुम्ही एकटे गेलात तरी शेजारी कोणी लगटून बसायला येणार नाही याची खात्री. त्यामुळे बायकांनी बिनधास्त एकटेही जायला हरकत नाही. तसेच पुरुषांच्या वॉशरूममध्येही सोशल डिस्टन्सिंग पाळून युरिनल एक सोडून एक वापरात असल्याने आपले काम चालू असताना बाजूला कोणी येऊन उभा राहत नाही हे ही फार छान वाटले. पुरुषांनीही हा सुखद अनुभव घेण्यास चित्रपटगृहात जायला हरकत नाही. असे एखादे काहीही कारण शोधा, पण हा चित्रपट चुकवू नका
धन्यवाद,
ऋन्मेष
जिज्ञासा
जिज्ञासा
अमा आल्याचा खूप आनंद झाला.
अमा आल्याचा खूप आनंद झाला.
ऋन्मेषने वैयक्तिक आयुष्यातलं
ऋन्मेषने वैयक्तिक आयुष्यातलं उदाहरण दिलेलं चालत नाही, इतरांनी दिलेली चालतात असं दिसतंय! >>>> अर्रर्र ! खूपच मोठा गैरसमज झालेला दिसतोय. इथे https://www.maayboli.com/node/80655 सरांनी लघुरूपात येऊन जे मार्गदर्शन केले आहे ( एक्स फॅक्टर ओळखू आला तरच हे रूपडे ओळखता येईल ) ते मनावर घेऊन आत्मपरीक्षण केल्यावर प्रश्न पडला कि, आपले लिखाण सरांसारखे सकस का होत नसावे ? याचे उत्तर मिळाले. ते म्हणजे वैयक्तिक उदाहरणे नाहीत. याचमुळे लिखाणाला दर्जा नाही.
ही ज्ञानप्राप्ती झाल्यानेच आता मी युरेका युरेका च्या आनंदात प्रत्येकाला सांगत असतो कि भरपूर उदाहरणे द्या. आपल्या घरातली प्रत्येक गोष्ट सर्वांना समजली पाहीजे. जर कमी पडत असेल तर कल्पनेचा आधार घ्या. विलासलाही बोलवा. दोघांच्या सहकार्याने भरपूर उदाहरणे देत रहा. ती उदाहरणे खरी वाटतात, खोटी वाटतात याची पर्वा करू नये. मायबोली असताना पर्सनल ब्लॉग्ज, फेसबुक वॉल ची गरजच पडायला नको.
मी तर म्हणतो कि कधीतरी अपवादात्मक रित्या पर्सनल उदाहरण देणे हा गंभीर गुन्हा मानायला हवा. अशाने आळस बळावतो. मी तर आज खडकवासल्याला जेव्हढे पर्यटक आले होते त्या सर्वांच्या झिम्मा कसा वाटला म्हणून मुलाखती घेतल्या . तो व्हिडीओ लवकरच टाकेन. सध्या फोटो टाकतो. माझा मुलगाही मायबोलीसाठी आणि सरांसाठी मुलाखती घेत होता. ३०० चे ध्येय सर्वांनीच गांभीर्याने घेतलेले आहे.
सूचना : ही पोस्ट झिम्मा या चित्रपटाशी संबंधित आहे.
झिम्मा चित्रपट कसा वाटला हा
झिम्मा चित्रपट कसा वाटला हा प्रश्न खडकवासला चौपाटी येथील व्यापारी व पर्यटक यांना विचारताना कोल्ड्रिंक्स, भेळ, कुल्फी याचा भुर्दंड बसला. तरी हा खर्च सरांवरच्या प्रेमापोटी झाल्याने तक्रार नाही. (पर्सनल बाबी ठळक टाईपात).

आरारा तुम्ही आमच्याकडे च आलात
आरारा तुम्ही आमच्याकडे च आलात की हो
संपर्कातून फोन नंबर कळवा आपण जाऊ कधी तरी एकत्र सायकलिंग ला
ढोमे कसा सोनाली ला म्हणतो मी वाट पाहीन झिम्मा चित्रपटात तसे
गाडी तुमची आहे ही चँप ?
गाडी तुमची आहे ही चँप ?
बोर्ड लावला असता तर ख्यालीखुशाली समजली असती. दर रविवारी खुष्कीच्या मार्गाने पोहोचणार आहे झिम्मा चित्रपट कसा वाटला हे विचारण्यासाठी.
अमा सहमत -मिसुद्धा फ्लॉड
अमा सहमत -मी सुद्धा फ्लॉड गुज्जु बाय्का पाहील्यात. लॅक ऑफ अपॉर्च्युनिटीतुन बिटर झालेल्या व तो राग जगावरती काढणार्या.
ऑ नाही हो
ऑ नाही हो
खडकवासला म्हणजे आमच्या एरियात आलात असं म्हणायचं होतं
माझी गाडी असती तर मायबोली वर इतका फालतू टाईमपास करायला वेळच मिळाला नसता
झिम्मा चित्रपटात सोनाली कडे कसा वेळच वेळ असतो तसा
शांमा ते तुमच्यासाठी नव्हतं.
शांमा ते तुमच्यासाठी नव्हतं.
शांमा ते तुमच्यासाठी नव्हतं.
शांमा ते तुमच्यासाठी नव्हतं. >>> नसेना का, सरांनी आपल्याला जी शिकवणूक दिलेली आहे त्याप्रमाणे प्रतिसाद ओढवून घेऊनही झिम्मा चित्रपटविषयक धाग्याचे ३०० हे लक्ष पूर्ण करणे महत्वाचे.
झिम्मा चित्रपटा वर ज्या
झिम्मा चित्रपटा वर ज्या प्रकारे चर्चा होत आहे ते बघून छान वाटले. चित्रपटात चांगल्या वाईट बाबी असणारच. त्या कोणत्या याबाबतही मतमतांतरे असणारच. पण मराठी चित्रपट दुर्लक्षले न जाता चर्चेचा विषय होत आहेत हि जमेचे बाजू आहे.
ईतकेच नाही तर जसे बारीकसारीक डिटेल्स देखील चर्चिले जात आहेत, काही लोकांनी चित्रपटातील संवाद जसेच्या तसे लिहिले आहेत, अमुकतमुक प्रसंगातील अमुकतमुक एस्प्रेशन ते हिरोईनींचे कपडे अशी जी सूक्ष्म निरीक्षणे आहेत ते पाहता लोकांनी चित्रपट वरवर नाही तर मन लाऊन पाहिला आहे ही अजून एक सकारात्मक बाब आहे.
बरेच चुका मलाही सापडल्या होत्या वा चर्चेच्या ओघात आलेले मुद्दे पटले. पण चित्रपट ओवरऑल आवडल्याने दुर्लक्ष केले ईतकेच. त्यामुळे बहुतेक चुका दाखवणार्या पोस्ट पटल्या आहेत.
तरी काही आक्षेप पटले नाहीत.
जसे एखाद्या ग्रूप पिकनिकमध्ये सगळे दारू पिऊ लागले तर दारू न पिणार्या व्यक्तीची चीडचीड होऊ शकते. मला स्वतःला हा अनुभव आहे त्यामुळे रिलेट करू शकतो.
वैध व्याच्या लाइफ एक्स्पिरीअन्स मधून गेल्यावर चेहर्यावरची जी कळा जाते रया जाते व एक प्रकारचा केविल वाणे पणा येतो >>>> हे देखील बिलकुल पटले नाही. किंबहुना वाईट वाटले की आजही समाज विधवा बायकांकडून असे दिसायची आणि वागायची अपेक्षा ठेवतो.
त्याच पोस्टमधील ईन्व्हेस्टमेंटचा मुद्दा पटला. जरी आपण बोलताना म्हणत असलो की सात पिढ्या बसून खातील ईतका पैसा कमावून ठेवला आहे तरी आजच्या जमान्यात ते प्रॅक्टीकली शक्य नाही.
झिम्माचे टायटल साँग मात्र जबराट आहे. बहुधा या वर्षातील सर्वोत्तम मराठी गाणे असावे.
स्पर्धेला अजून असल्यास ऐकायला आवडतील.
सर अडचणीच्या मुद्द्यांना बगल
सर अडचणीच्या मुद्द्यांना बगल कसे देतात हे बघणे सॉलिड मनोरंजन आहे
सोनाली त्या ढोमे ला अशीच साईडला टाकते, रेंज येत नाही म्हणून फाफु वगैरे बालिश आवाज काढून
झिम्मा हा एक चांगला / वाईट
झिम्मा हा एक चांगला / वाईट चित्रपट आहे. पण अजून टार्गेट पूर्ण झालेले नसताना ही निरवानिरवीची पोस्ट का आली असावी बरे ?
आशुचँप, याच पानावरच्या आपल्या
आशुचँप, याच पानावरच्या आपल्या तीन पोस्टमधील हि तीन वाक्ये.
१) झिम्मा चित्रपटात सोनाली कडे कसा वेळच वेळ असतो तसा
२) सोनाली त्या ढोमे ला अशीच साईडला टाकते, रेंज येत नाही म्हणून फाफु वगैरे बालिश आवाज काढून
३) ढोमे कसा सोनाली ला म्हणतो मी वाट पाहीन झिम्मा चित्रपटात तसे
आपण झिम्माची पारायणे केलेली दिसत आहेत. हेच चित्रपटाचे यश
जसे एखाद्या ग्रूप पिकनिकमध्ये
जसे एखाद्या ग्रूप पिकनिकमध्ये सगळे दारू पिऊ लागले तर दारू न पिणार्या व्यक्तीची चीडचीड होऊ शकते. मला स्वतःला हा अनुभव आहे त्यामुळे रिलेट करू शकतो.>>>>
ही काय फालतू जबरदस्ती आहे सर
त्या काय दिवसभर ट्रिप वर हातात बाटली घेऊन फिरत नाहीत
दिवसभर फिरून झाल्यावर आपल्या खोलीत, आपल्या वेळेत स्व खुशीने एकत्र येऊन एक दोन पेग पितात
बर हा काही ऑर्गनझर तर्फे आखलेला कार्यक्रम नाही की जिथे सगळ्यांना उपस्थिती लावणे बंधनकारक आहे
त्याने तुमची चिडचिड व्हायचा संबंधच काय? नसेल आवडत तर गप आपल्या रूम वर जाऊन झोपा
तुमच्या रूम वर येऊन जबरदस्ती पीत असतील, तुमची विश्रांती घ्यायची वेळ वाया घालवत असतील धनाना लाईट, म्युझिक लावून तर आक्षेप घेणे समजू शकतो
आपण झिम्माची पारायणे केलेली
आपण झिम्माची पारायणे केलेली दिसत आहेत>>>>
सर आपली आकलनशक्ती फारच कमजोर झालेली दिसत आहे
असे नका करू
मी याच धाग्यावर लिहिलं आहे की मी एकदाच बघितला तोही कसातरी
याला तुमच्या भाषेत पारायण म्हणत असतील तुमचे बरोबर आहे
शेवटी तुमचे बरोबर आहे हे मान्य करावे लागते तोवर तुम्ही चावत बसणार, सो ते काय आपण आधीच मान्य करतो
त्यांनी सूचकपणे आणि लाजत लाजत
त्यांनी सूचकपणे आणि लाजत लाजत सांगितले आहे की दिवसारात्र एखादा धागा काढत सुटला तर इतरांची चीडचीड होऊ शकते याच्याशी ते सहमत आहेत. फक्त शर्मोहया आणि आरक्त झालेल्या गुलाबी गालांमुळे तसे थेट सांगणे शक्य होत नाहीये.
सरांनी ज्यांना झिम्मा आवडलेला
सरांनी ज्यांना झिम्मा आवडलेला नाही त्यांना कानफटावे लागेल असे म्हटलेले आहे त्याच्याशी कर्तव्यबुद्धीने सहमत.
आणि मी चित्रपट बघणे हेच
आणि मी चित्रपट बघणे हेच चित्रपटाचे यश असे सरांना वाटत आहे हे बघून तर मला अक्षरशः हुंदका फुटला
काय ते प्रेम, काय ती खात्री
सर तुम्ही प्रत्यक्ष कधी भेटलात तर या साठी मी लाकडी पुलावर तुमचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करीन
ती एक मुलगी निर्मिती सावंत यांना शर्ट गिफ्ट करते तसा
झिम्मा चित्रपटात
लकडी पुलाच्या ऐवजी
लकडी पुलाच्या ऐवजी शनिवारवाड्यावर जर पुणेरी शालजोडी देऊन सत्कार समारंभ ठेवला तर संपूर्ण मायबोली उपस्थित राहू शकेल. या प्रसंगी वेमा आणि प्रशासकांची भाषणेही ठेवता येतील आणि झिम्माचा एक खेळ पूर्वपरवानगीने ठेवूयात.
माझे सगळे मित्र हेच करायचे>>>
माझे सगळे मित्र हेच करायचे>>>
सर मग तुम्ही त्यांना दारू कशी वाईट आहे हे सांगून त्या पासून परावृत्त केलेच असेल ना?
आणि त्या मित्राच्या वडिलांना पण केलेच असेल
मला खात्री आहे तुम्ही त्यांना मदत केली असणार
झिम्मा चित्रपट मध्ये हेच दाखवले आहे
सगळ्यांनी मिळून दारू पिणे कसे वाईट
(अडमीन या पोस्टमध्ये चित्रपटाचा उल्लेख आहे, कृपया उडवू नये Happy )
सर तुमच्या नेहमीच्या फक्त सिलेक्टिव्ह वाचनाचा सवयीमुळे ही पोस्ट आपल्याकडून वाचायची राहून गेली असेल
होतं असं वयोमानानुसार
तर त्याचे काही उत्तर देणार का?
इथे अवांतर वाटत असेल तर मी
इथे अवांतर वाटत असेल तर मी माझ्या मित्रांना आणि त्यांच्या वडिलांना दारूच्या व्यसनापासून कसे वाचवले यावर एक नवीन धागा काढा सर
अडमीन सध्या कत्तल आम मूड मध्ये आहेत
इतक्या कष्टाने टाइप केलेलं दे दणादण उडवून लावतात
प्रिय अडमीन मराठी टाइप केलेले गायब झालेलं बघून जीवाला यातना होतात हो
वाटल्यास वार्निंग द्या, पण अशी मुंडकी उडवू नका, नम्र विनंती करतोय
त्या मिताच्या नवऱ्याने टर्म
त्या मिताच्या नवऱ्याने टर्म इंशुरन्स काढला असेल आणि त्याचे पैसे मिळाले असतील अशी एक माझी मी समजूत करून घेतली होती पण आता इतका काथ्याकूट करायचा आहे तर मग क्लिनिकली डिप्रेसस्ड व्यक्तीने आत्महत्या केली तर त्याचा टर्म इंशुरन्स क्लेम करता येतो का असा व्यावहारिक प्रश्न पडला आहे मला. एरवी आत्महत्या केल्यास टर्म इंशुरन्स void होतो असे सामान्य ज्ञान आहे.
चँप यांना अनुमोदन.
चँप यांना अनुमोदन.
सरांनी इतरांच्या धाग्यांवर रिक्षा फिरवण्यासाठी आणि हायजॅक करण्यासाठी जो परवाना काढला असेल तो आम्हीही काढू हवे तर. पण असे प्रतिसाद दणादणा उडवणे नकोत हो.
२९४
२९५
वैध व्याच्या लाइफ
वैध व्याच्या लाइफ एक्स्पिरीअन्स मधून गेल्यावर चेहर्यावरची जी कळा जाते रया जाते व एक प्रकारचा केविल वाणे पणा येतो >>>> हे देखील बिलकुल पटले नाही. किंबहुना वाईट वाटले की आजही समाज विधवा बायकांकडून असे दिसायची आणि वागायची अपेक्षा ठेवतो.>> च्च्च किती इथे संत्री सोलावी लागतात. माझ्या जवळ जवळ प्रत्येक प्रतिसादावर हे स्वीपिन्ग जनर लायझेशन आहे असा आक्षेप अस्तो. पण मी एकच आयडी असल्याने व पहिल्यापासून स्वतःच्याच अनुभवावर आधारित लिहीत आले आहे. मिताचे कॅरेक्टर खरेतर काहीच इमोट होत नाही. घाबरली तरी तसेच रड ताना पण एकच . ट्रेन्ड अॅक्ट्रेस आहे काही सर का प्रोडुसरची बायको?! कृपया मार्गदर्शन करावे. तिचे दु:ख व एकटॅ पण आतून असावे व असतो बर्याच बायकांना इमोशनल सपोर्ट त्यामुळे ती सावरलेली असेल व खुशीत असेल. आनंदी राहायचा हक्क तर प्रत्येकाला अस्तो च. एस्प आपन सर्व आता पेंडेमिक मध्ये चित्र विचित्र अनुभवां मधून गेले आहोत. त्यामुळे मी जज करायचे आजिबात कारण नाही.
माझ्या अनुभवा बद्दल वेग्ळा बाफ काढून लिहिते. कुत्रे अॅज युजवल शेजारी बसून अटेन्शन डिमान्ड करत आहे व समोर जेम्स बॉड पिक्चर चालू आहे. सर तुमच्या बाफ वर वयक्तिक मत लिहिल्य बद्दल सॉरी आहे. प्रतिसाद आवडला नाहीतर तुमच्या टीम ला सांगून डिलिट करवा.
किती हे प्रतिसाद..
किती हे प्रतिसाद..
हा धागा झिम्मा साठी कमी आणि एका ठराविक व्यक्ती ला ट्रोल करण्यासाठी जास्त असे एकंदरीत चित्र वाटले.
कुठलीही गोष्ट थोडक्यात असेल तर मजा.. उगीच अतिरेकी चिडवाचिडवी बरी नाही वाटत.. माबो वर उत्तम लिखाण करणाऱ्या काही व्यक्ती या सगळ्यात सामिल आहेत हे बघून वाईट वाटले.
असो..
स्मिता + १
स्मिता + १
कमाल आहे राव, जेव्हा रूनमशेष
कमाल आहे राव, जेव्हा रूनमशेष वर टीका करत होतो तेव्हाही लोकांना प्रॉब्लेम होता
आता त्यांना सर म्हणून आदर देतोय, कौतुक करतोय तरीही प्रॉब्लेम
आणि त्याना व्यक्तिशः हे आवडलं आहे असं त्यांनी लेखी दिलं आहे तरीही
माणसाने काय करावं
न पेक्षा भक्ताने काय करावं ?
To be or not to be that's the question
स्मिता व वावे +१
स्मिता व वावे +१
Pages